Meta tags:
Headings (most frequently used words):
january, 2017, tuesday, friday, arunodaya, followers, me, blog, archive, लांछन, खाणे, एक, 13, स्त्रिया, आया, about, 17, 16, monday, zala, 21, saturday, february, wednesday, 2018, 19, 2020, september, बाया,
Text of the page (most frequently used words):
आहे (21), the (19), आया (17), #आहेत (13), #त्या (12), ह्या (12), and (11), आपण (11), #january (9), #किती (9), #bhalerao (8), #होते (8), #comments (7), #म्हणजे (7), posted (7), #खाणे (7), एका (6), book (6), गोड (6), काय (6), 2017 (6), त्यांचे (6), आहोत (6), loaded (5), #february (5), march (5), सिम्बायोसिस (5), स्त्रिया (5), मराठी (5), about (5), अर्थ (5), होतो (4), अर्थाने (4), प्रकार (4), तरी (4), एकसारखे (4), असे (4), फुले (4), बिया (4), असेच (4), काठ्या (4), भाकर्या (4), गुळ (4), अनेकवचन (4), शब्द (4), जणू (4), तिळ (4), आपल्या (4), स्त्री (4), नद्या (4), अनेक (4), april (4), काव्य (4), with (4), स्मरण (4), december (4), कमला (3), होत (3), चित्र (3), when (3), घेतो (3), अतिशय (3), july (3), अर्थात (3), तेव्हा (3), बाया (3), प्रत्येक (3), कवी (3), september (3), october (3), november (3), कमी (3), high (3), मला (3), आठवण (3), झाली (3), देतात (3), गुल (3), may (3), झाले (3), वापरतो (3), म्हणतो (3), which (3), माहीत (3), आणि (3), त्यांना (3), उदाहरण (3), त्याच्या (3), गूढ (3), बोलणे (3), अति (3), for (3), क्लाउन (3), मध्ये (3), त्यात (3), जीव (3), sun (3), अशा (3), फिश (3), वेगवेगळ्या (2), बित्व (2), फुलविणारी (2), लाठ्या (2), नाव (2), झाडे (2), त्यांच्या (2), आम्हाला (2), गाय (2), खात (2), चारा (2), नाहीत (2), ख्रिश्चन (2), आता (2), ह्याच (2), वळणाने (2), घरी (2), कविता (2), काव्यमय (2), संपादित (2), पहा (2), हिंदू (2), मुसलमान (2), सगळ्याच (2), वेगवेगळी (2), येतात (2), एकाच (2), प्रकारच्या (2), सगळ्या (2), आयांचे (2), आईपण (2), सारखेच (2), नसते (2), गटच (2), वडील (2), वगैरे (2), उदाहरणे (2), ज्याच्याबद्दल (2), that (2), अनेकवचनी (2), tuesday (2), व्हावे (2), काटेरी (2), मुक्ततेचे (2), कवीला (2), गृहावर (2), मानल्या (2), तुरुंगातल्या (2), how (2), खाजगी (2), पुरुष (2), ओळी (2), केला (2), काही (2), येत (2), नाही (2), वाचवतो (2), माशाला (2), हेच (2), दिसेल (2), जीवावर (2), today (2), खरेच (2), तुरुंगाच्या (2), बोलतो (2), याकारांत (2), संखेने (2), सगळ्यांनाच (2), भिंतीवरच्या (2), व्याकरणात (2), असा (2), नियम (2), ज्या (2), ईकारांत (2), स्त्रीलिंगी (2), नामाचे (2), त्याचे (2), रूपांतर (2), without (2), दृष्टी (2), अक्षराने (2), नदी (2), काठी (2), first (2), भाकरी (2), लेखणी (2), लेखण्या (2), time (2), अपवाद (2), दासी (2), एकवचनासारखेच (2), zala (2), त्याला (2), झाला (2), money (2), choice (2), what (2), june (2), gadgets (2), all (2), equipped (2), drugs (2), रोखठोक (2), प्रतीक (2), देतो (2), fully (2), आपल्याला (2), लहान (2), होता (2), reading (2), but (2), sushant (2), असते (2), तिळगुळ (2), घ्या (2), बोला (2), posts (2), 2020 (2), video (2), unseen (2), released (2), म्हणे (2), has (2), कडक (2), dna (2), 2018 (2), values (2), august (2), होकारालाच (2), डझन (2), सगळ्यांच्यात (2), जोडपे (2), friday (2), त्रिकूट (2), पंचक (2), वर्गाची (2), आठवडा (2), आकार (2), जास्त (2), फिया (2), एकसारखा (2), कोटी (2), सहस्त्र (2), लक्ष (2), अनेकत्वाचे (2), विकणे (2), सुख (2), सगळे (2), वेश्या (2), एकच (2), वेगवेगळे (2), arunodaya (2), मिळून (2), लावणाऱ्या (2), मोलाने (2), प्रकाराच्या (2), लावण्याचा (2), motion, off, this, intelligent, life, there, doze, just, them, story, was, नझिम, ह्यांनी, newcomb, डिसोझा, युनिस, मिरर, मुंबई, out, took, they, sunday, vast, most, blue, away, far, brilliant, fiction, sky, love, guy, aghast, films, druggie, reads, stood, प्रांजळ, मुक्तांचे, भोगून, तुरुंगवास, महिन्याचा, असून, जुन्या, काळातले, मुलांच्या, तीन, एकदा, भालेराव, distracting, अनंत, माझे, सांगत, show, अपार, him, सोनचाफ्याचे, तुम्हाला, लिहिणारे, ओळीत, न्याय, मृदू, intended, मोठा, करावे, आले, आम्ही, तिचीही, मुक्तपणे, निमित्ताने, असल्याने, कवीने, मुक्ता, look, अत्याचेच, माझ्या, पहात, पहिल्यांदाच, भावना, बोलके, एव्हढे, आभाळाखाली, तुरुंगातून, खुल्या, मूर्तिमंत, स्वातंत्र्याचे, आनंद, इतका, दिसली, असलेली, हिकमत, carefully, rhea, शेतात, पडलो, बाहेर, sarah, अनिमोनवर, ह्यांच्या, roof, example, say, पिळी, कान, बळी, देत, car, म्हणू, means, राहतो, जिवाबरोबर, stereo, तोच, general, मासा, असलेला, other, पट्टे, थाटाचे, विदुषकी, ह्याचे, fancy, माशाचे, म्हणून, caption, meaning, mean, पद्धतीची, सांगतात, जीवशास्त्र, सांगते, हीच, उत्क्रांतीची, प्रेरणा, क्वचितच, पुण्याचे, टेकडीवरचे, कॉलेज, ह्याचा, असावा, जीवशास्त्रात, दोन, not, जीवांचे, एकमेकांना, मदत, करीत, एकत्र, राहणे, उत्क्रांतीकार, डार्विन, भले, does, सिम्बायोसिसचे, वागणूक, कवितात, psychologist, त्यांच्यापासून, करतात, हल्ला, than, नकोसे, अर्थातच, सारखे, making, financial, उदार, बायजी, ऐजीच्या, असतात, जोडी, जीवही, बांडगूळ, वाढणारे, स्वतः, कित्येकवेळा, साह्यकारी, wednesday, मुक्ताचे, अशी, केली, उद्धृत, संरक्षण, अवघे, आदर्श, your, psychology, संबंधात, anemone, पुरवतो, खाद्य, get, अनिमोनला, विष्ठेने, ahead, leaving, विषापासून, स्त्रवण्याने, पदार्थाच्या, core, behind, स्निग्ध, highlights, more, टाकतो, विष, हल्लेखोरावर, काट्याने, invertebrates, म्हणते, सुपंथ, धरू, मंडळातले, picture, रविकिरण, व्हा, भाषा, गुळाची, भाषेने, रांगड्या, पणाने, जातो, जाणल्या, तरीही, आवर्जून, लोक, संक्रांतीचे, भाषी, मित, खुणावते, छोटे, नव्हे, हिंदी, गूढच, खाल्ला, वाटून, जणात, सात, पांडवांनी, एवढा, लहानपणा, तिळाचा, monday, पाहताच, होती, प्राण्यांचा, मांसाहार, खायचा, गुपचूप, जायचा, ठिकाणी, गुप्त, जेवण्यासाठी, जायचे, तसेच, संभोग, जसे, गेली, अनैतिक, क्रिया, अन्न, वाचले, वर्षामागे, खूप, पुस्तक, वाले, फिक्शन, सायन्स, शिरवाडकरांचे, लांछ्न, जाणवतो, बोलण्याचे, शाकाहार, 2016, older, home, atom, subscribe, poetry, marathi, tukaram, writting, profile, complete, view, archive, blog, आयर्न, 2015, 2014, 2013, 2012, 2011, 2010, followers, blogger, powered, theme, गुळात, लोह, व्युत्पत्तीचा, कारण, नसून, माणसांचा, दोष, गोडपणा, प्रतीकातला, असाच, साखर, कच्ची, गुलचा, संस्कृतात, म्हणतात, आला, वरून, संस्कृत, असावे, चांगल्या, कारणीभूत, व्युत्पत्तीशास्त्र, होण्यामागे, त्यातला, शिवाय, लोहासारखे, गुळातल्या, माणसांचे, असूनही, गुळासारखे, त्यामुळेच, कदाचित, लोखंडासारखे, प्रमाणात, टाळता, वनस्पतीला, ह्यांचे, नरां, तिथे, पिळुनी, किरणे, सूर्याची, मातीत, ओल्या, साधते, स्वर्ण, करायासी, रुप्याचेही, जिथे, स्वयमन्य, सोन्याची, आम्हा, किमया, दिव्य, कुठे, शिकलासि, सोनचाफ्या, होत्या, शोधल्यावर, दिसल्या, ज्यात, दिसले, सावरकरांचे, संकेतस्थळावर, मृदूचेतन, स्वर्णचंपक, शोधताना, ज्यांनी, काळदाते, सुधाताई, जात, मायदेवांच्या, रविवारी, असताना, हॉस्टेलला, इंजिनीअरिंग, पुण्याला, त्यांचीही, केले, मायदेव, मिळाले, सुगंधी, इंटरनेट, गंमत, उधळी, त्याच्यावरती, तिच्यावरी, खुले, चमेली, सोनचाप्याची, प्रियाच, भुले, निर्मितां, पाहुनी, तुज, अंदमानच्या, सावरकरांची, नसतो, पाहिले, window, गौण, इतके, करतील, वळता, नक्कीच, साधनेत, मिळाला, तास, अर्धा, खाण्याचा, दर्जाचा, खालच्या, त्यांच्यासाठी, जीवन, आपसूकच, गेले, होऊन, संत, साधू, मोठे, मोठ, येतेच, जाणीव, अपराधी, प्रकारची, खाताना, काहीही, त्यामुळे, नाकारता, आहार, खरा, लिहिणाऱ्या, who, भिंतीवर, वाचून, सूर्याच्या, joyful, feel, soil, now, right, wife, strife, roll, yearn, waves, cares, wall, एकूणातच, white, against, leaning, devotion, respectful, ground, sat, then, saturday, लांछन, लागेल, म्हणावे, लांछनच, म्हातारपणी,
Text of the page (random words):
arunodaya zala arunodaya zala tuesday september 8 2020 loaded dna has released an unseen video of sushant which is intended to show that sushant is high on drugs but look carefully he is reading a book when rhea is distracting him which druggie reads a book when high most of them just doze off but this intelligent guy is reading a book and what a brilliant choice of a book is it a fiction love story about films no the book is by a financial psychologist sarah newcomb ph d and it is about money psychology and how to get ahead without leaving your values behind it highlights more on core values than money making and what a choice of a caption of the book loaded general meaning of loaded is equipped with all gadgets for example when i say my car is fully loaded it means it is equipped with stereo sun roof and all other fancy gadgets it does not mean he is fully high on drugs posted by the bhalerao at 10 04 pm no comments friday january 19 2018 स्त्री पुरुष सिम्बायोसिस सिम्बायोसिस हा शब्द आपण क्वचितच वापरतो अर्थात जे पुण्याचे आहेत त्यांना हे एका टेकडीवरचे कॉलेज आहे हे माहीत असते पण ह्याचा अर्थ काय असावा तर हे जीवशास्त्रात सांगतात की दोन जीवांचे एकमेकांना मदत करीत एकत्र राहणे उत्क्रांतीकार डार्विन भले म्हणू देत की बळी तो कान पिळी पण जीवशास्त्र सांगते की सिम्बायोसिस हीच उत्क्रांतीची प्रेरणा आहे स्त्री पुरुष संबंधात आदर्श वागणूक ही सिम्बायोसिस पद्धतीची आहे सिम्बायोसिसचे उदाहरण म्हणून एका माशाचे उदाहरण देतात ह्याचे नाव आहे क्लाउन फिश वर विदुषकी थाटाचे पट्टे असलेला जो मासा आहे तोच क्लाउन फिश हा एका काटेरी जिवाबरोबर राहतो काटेरी जीव anemone त्याच्या काट्याने हल्लेखोरावर विष टाकतो व माशाला वाचवतो व एका स्निग्ध पदार्थाच्या स्त्रवण्याने माशाला त्याच्या विषापासून वाचवतो क्लाउन फिश त्याच्या विष्ठेने अनिमोनला खाद्य पुरवतो व जे invertebrates अनिमोनवर हल्ला करतात त्यांच्यापासून संरक्षण देतो ही जोडी जणू अवघे धरू सुपंथ असेच म्हणते आहे अर्थात हे झाले साह्यकारी सिम्बायोसिस कित्येकवेळा एका जीवावर स्वतः वाढणारे बांडगूळ जीवही असतात हे म्हणजे ऐजीच्या जीवावर बायजी उदार सारखे व अर्थातच नकोसे उदाहरण झाले posted by the bhalerao at 9 37 pm no comments wednesday february 8 2017 स्मरण मुक्ताचे आज मुंबई मिरर मध्ये युनिस डिसोझा ह्यांनी नझिम हिकमत ह्यांच्या तुरुंगाच्या भिंतीवरच्या कवितात एक कविता उद्धृत केली आहे ती अशी today is sunday for the first time they took me out in the sun today and for the first time in my life i was aghast that the sky is so far away and so blue and so vast i stood there without a motion then i sat on the ground with respectful devotion leaning against the white wall who cares about the waves with which i yearn to roll or about strife or my wife right now the soil the sun and me i feel joyful and how तुरुंगातल्या एका कवीला सूर्याच्या मुक्ततेचे स्मरण व्हावे व ह्या ओळी वाचून तुरुंगाच्या भिंतीवर काव्य लिहिणाऱ्या सावरकरांची आठवण झाली व त्या शोधताना मला अंदमानच्या संकेतस्थळावर सावरकरांचे एक चित्र दिसले ज्यात भिंतीवरच्या काही ओळी दिसल्या त्या शोधल्यावर अशा होत्या कमला काव्य आणि हे सोनचाफ्या तू शिकलासि तरी कुठे ही दिव्य किमया आम्हा स्वयमन्य नरां जिथे रुप्याचेही करायासी जड स्वर्ण न साधते ओल्या मातीत सूर्याची किरणे पिळुनी तिथे मृदूचेतन सोन्याची स्वर्णचंपक ही फुले सुगंधी तुज पाहुनी निर्मितां मन हे भुले प्रियाच सोनचाप्याची चमेली किती ही खुले तो तिच्यावरी ती त्याच्यावरती उधळी फुले काय गंमत हे कमला काव्य मला इंटरनेट वर मिळाले व ते ज्यांनी कवी वा गो मायदेव संपादित केले त्यांचीही मला आठवण झाली मी पुण्याला इंजिनीअरिंग हॉस्टेलला असताना दर रविवारी मायदेवांच्या घरी जात असे हे आपल्या सौ सुधाताई काळदाते ह्यांचे वडील होत ते रविकिरण मंडळातले कवी असून जुन्या काळातले लहान मुलांच्या कविता लिहिणारे कवी होते व त्यांचे बोलणे अतिशय मृदू व प्रांजळ असे अशा कवीने हे कमला काव्य संपादित करावे हा मोठा काव्यमय न्याय आहे ह्या ओळीत तुम्हाला दिसेल की तुरुंगातल्या कवीला सोनचाफ्याचे स्मरण व्हावे हे अपार काव्यमय आहे असेच माझे वडील कै अनंत भालेराव हे एकदा तीन महिन्याचा तुरुंगवास भोगून घरी आले तेव्हा सांगत होते की आम्ही तुरुंगातून बाहेर पडलो व आम्हाला शेतात एक गाय चारा खात असलेली दिसली व आम्हाला इतका आनंद झाला की काय स्वातंत्र्याचे मूर्तिमंत चित्र आहे की खुल्या आभाळाखाली एक गाय मुक्तपणे चारा खात आहे मुक्ततेचे एव्हढे बोलके चित्र व भावना मी पहिल्यांदाच पहात होतो माझ्या अत्याचेच नाव मुक्ता असल्याने ह्या निमित्ताने आज तिचीही आठवण झाली हेच स्मरण मुक्तांचे posted by the bhalerao at 10 27 pm no comments saturday january 21 2017 खाणे एक लांछन खाणे एक लांछ्न वि वा शिरवाडकरांचे एक सायन्स फिक्शन वाले पुस्तक मी खूप वर्षामागे वाचले होते त्यात अन्न खाणे ही क्रिया त्या गृहावर अतिशय अनैतिक मानल्या गेली होती आज जसे संभोग हा अति खाजगी प्रकार आहे तसेच त्या गृहावर खाणे हे अति खाजगी मानल्या जायचे प्रत्येक जण जेवण्यासाठी अति गुप्त अशा ठिकाणी जायचा व मग गुपचूप खायचा आज मांसाहार केला तरी प्राण्यांचा आपण जीव घेतो आहोत हे काही टाळता येत नाही आणि शाकाहार केला तरी वनस्पतीला काय जीव नसतो का हे नाकारता येत नाही त्यामुळे काहीही खाताना एक प्रकारची अपराधी जाणीव येतेच जे मोठ मोठे साधू संत होऊन गेले त्यांचे जीवन पाहिले तर खाणे हा प्रकार त्यांच्यासाठी अतिशय खालच्या दर्जाचा होता हेच दिसेल खाण्याचा अर्धा तास त्यांना मिळाला तर ते साधनेत नक्कीच वळता करतील इतके खाणे त्यांना गौण म्हातारपणी आहार आपसूकच कमी होतो खरा पण एकूणातच खाणे हे एक लांछनच म्हणावे लागेल posted by the bhalerao at 10 25 pm no comments tuesday january 17 2017 स्त्रिया आया बाया स्त्रिया आया बाया ह्या खरेच अनेकवचनी आहेत अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात स्त्री स्त्रिया बी बिया नदी नद्या काठी काठ्या भाकरी भाकर्या लेखणी लेखण्या अपवाद आहेत दासी दृष्टी जोडपे त्रिकूट पंचक आठवडा डझन शत सहस्त्र लक्ष कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच वापरतो आता ह्याच वळणाने आया पहा त्यात हिंदू आया मुसलमान आया ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच आया मध्ये येतात त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का त्या अर्थाने आया हा एक गटच होतो अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या पण त्यांचे बित्व किती एकसारखे असेच नद्या काठ्या लाठ्या भाकर्या वगैरे वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त पण फिया म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण या म्हणतो आहोत posted by the bhalerao at 9 41 am no comments monday january 16 2017 स्त्रिया आया बाया ह्या खरेच अनेकवचनी आहेत अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात स्त्री स्त्रिया बी बिया नदी नद्या काठी काठ्या भाकरी भाकर्या लेखणी लेखण्या अपवाद आहेत दासी दृष्टी जोडपे त्रिकूट पंचक आठवडा डझन शत सहस्त्र लक्ष कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच वापरतो आता ह्याच वळणाने आया पहा त्यात हिंदू आया मुसलमान आया ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच आया मध्ये येतात त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का त्या अर्थाने आया हा एक गटच होतो अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या पण त्यांचे बित्व किती एकसारखे असेच नद्या काठ्या लाठ्या भाकर्या वगैरे वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त पण फिया म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण या म्हणतो आहोत posted by the bhalerao at 10 08 pm no comments friday january 13 2017 तिळ गुळाची भाषा आज संक्रांतीचे आपण मराठी लोक आवर्जून म्हणतो की तिळगुळ घ्या गोड बोला आणि तरीही आपण मराठी जाणल्या जातो ते आपल्या रोखठोक पणाने आपल्या रांगड्या भाषेने हे काय गूढ आहे गोड बोलण्याचे आज आपण काय प्रतीक देतो आहोत तर तिळ व गुळ तिळ पाहताच आपल्याला जाणवतो तो तिळाचा लहानपणा एवढा एक लहान तिळ म्हणे पांडवांनी सात जणात वाटून खाल्ला होता हे एक गूढच हिंदी गूढ गुळ नव्हे मराठी गूढ म्हणजे हे छोटे प्रतीक जणू आपल्याला खुणावते आहे मित भाषी व्हा गुळात आयर्न लोह चांगल्या प्रमाणात असते म्हणे म्हणजे गोड बोलणे हे लोखंडासारखे कडक झाले की कदाचित त्यामुळेच गुळासारखे गोड असूनही मराठी माणसांचे बोलणे गुळातल्या लोहासारखे कडक रोखठोक होते शिवाय त्यातला गोड अर्थ गुल होण्यामागे व्युत्पत्तीशास्त्र कारणीभूत असावे कारण गुळ हा शब्द संस्कृत गुल वरून आला आहे म्हणतात अर्थात संस्कृतात गुलचा अर्थ कच्ची साखर असाच आहे तेव्हा आपल्या गुळ ह्या प्रतीकातला गोडपणा गुल झाला तर तो दोष मराठी माणसांचा नसून व्युत्पत्तीचा आहे तेव्हा तिळगुळ घ्या व तरी गोड बोला posted by the bhalerao at 9 52 pm no comments older posts home subscribe to posts atom about me the bhalerao writting on tukaram and marathi poetry view my complete profile blog archive 2020 1 september 1 loaded dna has released an unseen video 2018 1 january 1 2017 5 february 1 january 4 2016 98 december 2 november 2 october 17 september 11 august 27 july 27 june 2 may 5 april 2 march 2 february 1 2015 7 december 4 november 2 april 1 2014 2 may 2 2013 3 march 1 february 2 2012 3 march 1 january 2 2011 12 december 1 october 1 july 2 june 1 may 2 april 1 march 2 february 1 january 1 2010 22 december 4 november 2 october 1 august 5 july 4 april 2 march 4 followers picture window theme powered by blogger
|