Meta tags:
Headings (most frequently used words):
ब्लॉग, माझा, कविता, की, स्क्रम, copyright, विश्व, मराठी, सूचना, लेखनाची, नवीन, भेट, थेट, संपर्क, विजेते, स्पर्धेचे, अटकमटक, saturday, 2021, december, 2022, thursday, july, 29, पूर्वीचं, फोटो, लेखन, अस्मादिक, विषयवार, सूची, स्टँड, कॉमेडी, बटवा,
Text of the page (most frequently used words):
आणि (16), the (16), #स्क्रम (10), are (8), and (8), हैं (8), #होती (8), काय (8), that (8), #स्प्रिंट (8), #प्रोडक्ट (7), #scrum (7), #product (7), #sprint (7), #बटवा (7), तीन (7), #april (7), november (6), december (6), बायको (6), #july (6), अनिकेत (6), share (6), नोट (6), आता (6), संदीप (6), this (5), होता (5), तरी (5), three (5), झालं (5), त्या (5), असं (5), september (5), चित्रे (5), मुलगा (4), email (4), goal (4), january (4), august (4), लक्ष्य (4), कविता (4), for (4), these (4), बाबा (4), काम (4), पुडा (4), लेगो (4), हातात (4), पाचशेची (3), झाली (3), february (3), इसे (3), 2021 (3), तिने (3), march (3), होतं (3), तुला (3), may (3), चार (3), बैकलॉग (3), काही (3), पाँच (3), वेळ (3), june (3), नाही (3), sandeep (3), एकदा (3), सरळ (3), ध्यान (3), पाणी (3), क्लिक (3), तिला (3), backlog (3), posted (3), करते (3), गाडी (3), गेली (3), called (3), रिकामा (3), together (3), आहे (2), जरा (2), त्याचा (2), कामं (2), सगळी (2), बाहेर (2), म्हातारी (2), मला (2), ठरवलं (2), पाहिलं (2), येईल (2), होतो (2), अजून (2), सांगायचा (2), म्हणजे (2), झाला (2), आवाज (2), सिग्नल (2), राहिला (2), देईन (2), सर्व (2), जाऊ (2), अनुभववाद (2), निरीक्षण (2), अनुकूलन (2), आधारस्तंभ (2), प्रबंधन (2), आत्म (2), जटिल (2), respect (2), मूल्य (2), openness (2), focus (2), courage (2), values (2), adaptation (2), inspection (2), transparency (2), पारदर्शिता (2), सम्मान (2), five (2), कोई (2), इवेंट्स (2), आसान (2), जैसे (2), इवेंट (2), इंक्रीमेंट (2), नहीं (2), खुलापन (2), रोल्स (2), क्या (2), साथ (2), धैर्य (2), प्रतिबद्धता (2), pillars (2), events (2), त्यात (2), आला (2), article (2), you (2), term (2), had (2), माहिती (2), थोडा (2), complex (2), असा (2), क्वार्टर्स (2), थ्री (2), अँड (2), नाईन (2), सगळेच (2), हक्क (2), empiricism (2), work (2), four (2), master (2), place (2), like (2), event (2), artifacts (2), increment (2), about (2), then (2), last (2), not (2), roles (2), self (2), they (2), how (2), when (2), what (2), देऊन (2), अटकमटक (2), बाईने (2), pinterest (2), atakmatak (2), www (2), मगाशी (2), twitter (2), तिरीमिरीत (2), सुरक्षित (2), सोफ्यावर (2), होते (2), facebook (2), सगळे (2), comments (2), जणू (2), blog (2), labels (2), लघुकथा (2), posts (2), बघतच (2), 2022 (2), कथा (2), copyright (2), blogthis (2), http (2), blogspot (2), हॅप्पी (2), एकदम (2), म्हणून (2), मराठी (2), com (2), म्हणाली (2), ब्लॉग (2), october (2), schwaber, fifth, inside, across, take, marathon, development, sutherland, sprints, done, ken, सांगावे, does, easier, from, somebody, long, worked, used, will, weeks, मना, say, been, week, jeff, developing, भावले, think, भेट, commitment, माझा, स्पर्धेचे, विजेते, स्टँड, कॉमेडी, फोटो, strong, game, fad, refinement, both, संपर्क, don, synergy, daily, planning, created, framework, retrospective, थेट, review, software, takes, क्रिकेट, river, who, summary, अस्मादिक, states, coach, says, united, stanza, जर्सी, develop, न्यू, परदेशी, aspects, वसे, देसी, managing, which, means, remember, useful, cross, 2011, stayed, mind, thank, 2012, ernesto, custodio, writing, agile, 2007, genesis, credit, 2010, 2009, keep, 2008, core, decide, functional, जना, steps, developers, collaborate, making, decisions, owner, job, usability, putting, let, गझल, keeps, flowing, convey, but, role, achieve, आठवणींचा, profile, complete, view, सूची, विषयवार, देश, team, project, third, manager, nothing, else, least, know, speaking, इदं, globe, नवीन, see, मुद्दत, जरूर, हफ्ते, हफ्तों, ब्लॉगवरील, ह्या, रिफाइनमेंट, डेवलमैंट, मैरेथोन, पांचवीं, अंदर, रिव्यू, रेट्रोस्पेक्टिव, बोलेगा, नदी, डेली, रहे, उपयोगी, होने, पायदान, दीपश्री, तथा, आर्टिफैक्टस, साहित्याचे, ह्यांनी, निरंतर, चलती, रहती, कहिये, लिहिलेल्या, प्लैनिंग, तालमेल, लेना, सोच, ठिकाना, देखे, चीज, मुश्किल, अपनाना, जिसका, वैसे, समझना, saturday, मैत्रं, यत्र, तत्र, सर्वत्र, दुनियाभर, श्वेबर, किया, आर्टिफैक्ट्स, समझो, झोलझमेल, खेल, मजबूत, फ्रेमवर्क, प्रदान, केन, सॉफ्टवेयर, डेवलपमेंट, लिए, दोनों, योगदान, जेफ, सदरलैंड, ओनर, निर्णय, thing, अंतिम, हाथ, करने, देगा, सार, रखिए, याद, चरण, अगर, कहे, कोच, कौन, chtire, कैसे, करें, थामोगे, note, mrs, लेखनाची, difficult, though, simple, understand, name, message, सूचना, management, committment, 2014, address, your, enter, feedburner, delivered, विश्व, deepashree, में, करे, समझ, कहते, मास्टर, तीसरे, रोल, जिक्र, ह्यांजकडे, बातों, अंजाम, देना, डेवलपर्स, मिलकर, बारे, बात, with, ध्येय, reserved, पास, कौशल, साधन, written, साधना, यही, तीनों, मैनेजर, has, बनती, chitre, टीम, material, rights, all, प्रोजेक्ट, 2013, thursday, year, गडबडीत, कुणा, भिकाऱ्याला, दिल्यावर, दुसरा, ठेवायचा, बटव्याकडे, दिसतंय, खिसे, नव्हता, चाचपडले, फेकलेल्या, सुटायच्या, आधी, खिशातली, आली, नेमकी, परवा, नेमका, ड्रायवर, कारचं, पुन्हा, फक्त, ब्लॉक्सचा, रमलेला, खेळण्यात, येत, नेहमीसारखं, ग्लोव्ह, कंपार्टमेंट, उघडलं, चिडतोस, ग्लुकोज, बिस्किटांचा, कशाला, राहिले, आपला, अहो, घेतलं, गाडीतला, नव्हती, तिच्या, हातातला, दाखवत, सारखी, म्हणत, देवापुढे, आहेस, लगेच, रस्त्यावरच्याकडे, पाच, देशील, सकाळपासून, बोलतो, निघणारही, त्यामुळे, अनिकेतने, करताय, म्हणेपर्यंत, बाईला, दिलीसुद्धा, सिग्नलला, थांबली, फोनवर, वाचत, साखर, तेव्हड्यात, खिडकीवर, टकटक, ठेवायला, भिकेसाठी, उभी, नुकताच, लाल, तेव्हा, पिऊन, खिडकीतून, माझ्याकडे, केलं, असेल, कारच्या, उघड्या, चक्क, पाहिली, माझ्या, अंगावर, भिरकावला, बाजूच्या, गल्लीत, निघून, पाचशे, थिंक, बेगर, दिले, डेजचं, होऊन, टाकला, इतकी, तिचं, आजचं, नेक्स्ट, दिलेस, सगळं, घेतली, दिलंय, सांगतो, पैसे, चिडलोय, इतके, लकी, बाईसाठी, रूपये, ह्याचं, छोटा, आईही, द्यायची, कसला, त्रास, होतोय, समजूत, घालत, चमकले, मानेने, खेळतोय, दुजोरा, देत, अनिकेतनं, तिघंही, दोन, म्हणाल्यावर, घोट, बाजूला, होतंस, वाईट, एकीकडे, वाटत, दाखवून, म्हणाला, खेळतानाच, फसवलं, येतोय, तूच, इतका, कसा, गंडलो, कळत, नाहीये, अरे, ठीक, विसरलेच, बोहनी, उघड, 2015, बोलता, बायकोलाही, अशावेळी, त्याला, किंवा, कोकम, सरबत, काहीही, देणं, 2018, आवश्यक, असतं, पायातले, शूज, काढून, बसला, पटकन, होतंच, आईच, विचार, गेल्यावर, अनिकेतची, सांग, नक्की, आईच्या, मनात, 2020, राहणार, लहान, तेव्हापासून, असाच, शक्य, चिडणार, चिडला, मात्र, धुसफुसत, आणायला, त्याच्याजवळ, पूर्वीचं, गिफ़्ट, माजलेत, स्साले, भीक, मागतात, जोर, दाखवतात, गप्प, 2017, 2016, read, sometime, बसलो, चडफडाट, येऊन, डोकं, बसली, घरात, तोच, तणतणत, दुपारची, उन्हाने, आधीचा, बाई, भणभणत, नाटक, किचनमधून, दोघीही, आल्या, दोघींनाही, कळेना, ह्याला, शांततेत, लेखन, हसली, वगैरे, करायला, पडलो, बँकेचंही, ज्या, सह्या, पाहिजे, लागला, होत्या, करून, झाल्या, आपल्या, ड्रायवरला, म्हणालो, अगं, बोलायला, दुपार, येईपर्यंत, नकळत, हसू, आलं, अनिकेतचं, देव, तोंडी, मुद्दा, त्याची, नीट, गोष्ट, छोट्यांच्या, ठिकाणी, फिरून, येणार, शेवटी, एकदाचा, पाहिलंस, घरीच, माहितीच, शांत, त्याचे, अनिकेतचा, जवळपास, दहा, वर्षांचा, स्वतःचं, असंच, ब्लॉक्स, भाग, एकमेकांवर, रचतानाचा, हलका, subscribe, सोडला, बाकी, पाहिल्यापासून, पहिला, टिळक, जसे, रोडवर, किती, गर्दी, असते, चालवेल, खरं, बाजीराव, पॉटरचा, घोडयावर, शेजारी, older, home, atom, वयाचा, खेळत, हॅरी, कुणी,
Text of the page (random words):
अटकमटक अटकमटक मराठी मैत्रं यत्र तत्र सर्वत्र saturday december 3 2022 स्क्रम की कविता वैसे तो आसान है स्क्रम समझना मुश्किल है पर वह सोच अपनाना जरा देखे तो क्या भी है ये चीज जिसका दुनियाभर है ठिकाना १ जेफ सदरलैंड और केन श्वेबर दोनों का है ये योगदान सॉफ्टवेयर डेवलपमेंट के लिए स्क्रम फ्रेमवर्क किया प्रदान २ धैर्य प्रतिबद्धता ध्यान खुलापन और सम्मान ये हैं स्क्रम के मूल्य पारदर्शिता निरीक्षण अनुकूलन ये हैं मजबूत आधारस्तंभ ३ पाँच तीन तीन का ये खेल ना समझो इसे झोलझमेल पाँच इवेंट्स तीन आर्टिफैक्ट्स और तीन रोल्स का है तालमेल ४ स्प्रिंट प्लैनिंग डेली स्क्रम स्प्रिंट रिव्यू स्प्रिंट रेट्रोस्पेक्टिव यह तो हैं चार इवेंट्स पर हैं ये पांचवीं इवेंट स्प्रिंट के अंदर ५ प्रोडक्ट डेवलमैंट तो जैसे मैरेथोन पर स्प्रिंट करते हैं इसे आसान स्प्रिंट की मुद्दत होती है कब तक एक हफ्ते से चार हफ्तों तक ६ कोई तो बोलेगा जरूर कि बैकलॉग रिफाइनमेंट होती है तो कहिये इवेंट नहीं जैसे नदी है जो निरंतर चलती रहती है ७ प्रोडक्ट बैकलॉग स्प्रिंट बैकलॉग और इंक्रीमेंट इन आर्टिफैक्टस पर रहे ध्यान प्रोडक्ट का लक्ष्य स्प्रिंट का लक्ष्य तथा प्रोडक्ट उपयोगी होने के ये पायदान ८ प्रोडक्ट ओनर का काम है प्रोडक्ट के बारे में निर्णय लेना डेवलपर्स साथ मिलकर करते हैं इंक्रीमेंट को अंजाम देना ९ तीसरे रोल का जिक्र करे तो इसे कहते स्क्रम मास्टर सौ बातों की एक बात समझ लो ये नहीं है कोई प्रोजेक्ट मैनेजर १० इन तीनों रोल्स की बनती है स्क्रम टीम प्रोडक्ट का लक्ष्य साधना यही एक ध्येय इन के पास होते हैं कौशल और साधन कौन क्या कब कैसे करें काम इस का करते हैं आत्म प्रबंधन ११ अंतिम चरण कहे कोच संदीप सार यह स्क्रम का रखिए याद जटिल काम करने स्क्रम देगा साथ अगर थामोगे अनुभववाद का हाथ १२ note धैर्य courage प्रतिबद्धता committment ध्यान focus खुलापन openness सम्मान respect मूल्य values पारदर्शिता transparency निरीक्षण inspection अनुकूलन adaptation आधारस्तंभ pillars लक्ष्य goal आत्म प्रबंधन self management जटिल complex अनुभववाद empiricism scrum is simple to understand difficult to master though let s see what this thing is that s been used across the globe 1 jeff sutherland and ken schwaber both worked together and for developing software co created scrum framework 2 courage commitment focus openness respect these are scrum values transparency inspection adaptation these are the strong pillars 3 it s a game of five three three don t think of it as a fad five events three artifacts and the synergy of three roles 4 sprint planning daily scrum sprint review sprint retrospective these are four events that take place inside the fifth event called sprint 5 product development is like a marathon it s easier when done in sprints how long does a sprint last from a week to four weeks 6 somebody will say that backlog refinement takes place then convey it s not an event but like a river that keeps on flowing 7 product backlog sprint backlog and increment are three artifacts product goal sprint goal and product usability are the steps 8 product owner s job is making decisions about the product developers collaborate to putting together the increment 9 speaking about the third role it s called scrum master if nothing else then at least know that this is not a project manager 10 together these roles are called a scrum team that s cross functional to achieve product goal they are self managing which means they decide who what when and how aspects of the work 11 coach sandeep says in the last stanza remember the summary of scrum it s useful to develop complex work if you keep empiricism at core 12 credit for the term पाँच तीन तीन 5 3 3 i had read this article sometime in the year 2021 and the term 3 5 3 had stayed in my mind thank you ernesto custodio for writing that article on agile genesis blog posted by संदीप चित्रे at 10 10 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels कविता thursday july 29 2021 बटवा माजलेत सगळे स्साले एक तर भीक मागतात आणि वर जोर दाखवतात बाई होती आणि ते पण म्हातारी म्हणून चडफडाट झाला तरी गप्प बसलो अनिकेत घरात आला तोच असा तणतणत भर दुपारची वेळ उन्हाने डोकं आधीचा भणभणत होतं आणि त्यात हे नाटक झालं किचनमधून आई आणि बायको दोघीही बाहेर आल्या दोघींनाही कळेना की ह्याला एकदम काय झालं अनिकेत तिरीमिरीत पायातले शूज काढून सोफ्यावर बसला बायको पटकन पाणी आणायला आत गेली आणि आई त्याच्याजवळ येऊन बसली आईच्या मनात विचार आला की हा लहान होता तेव्हापासून असाच एक तर शक्य तो चिडणार नाही पण चिडला की मात्र धुसफुसत राहणार आईच ती तिला तर माहिती होतंच पण आता बायकोलाही माहिती झालं होतं की अशावेळी त्याला पाणी किंवा कोकम सरबत देऊन थोडा वेळ काहीही न बोलता जाऊ देणं आवश्यक असतं शेजारी त्याचा नाईन अँड थ्री क्वार्टर्स वयाचा मुलगा खेळत होता हॅरी पॉटरचा पहिला भाग पाहिल्यापासून अनिकेतचा जवळपास दहा वर्षांचा मुलगा स्वतःचं वय असंच सांगायचा नाईन अँड थ्री क्वार्टर्स त्याचे लेगो ब्लॉक्स एकमेकांवर रचतानाचा हलका क्लिक असा आवाज सोडला तर बाकी घर शांत होतं थोडा वेळ शांततेत गेल्यावर अनिकेतची बायको म्हणाली हं आता सांग नक्की काय झालं शेवटी एकदाचा अनिकेत जरा नीट बोलायला लागला अगं मगाशी सगळी कामं करायला बाहेर पडलो होतो ना ती सगळी कामं झाली बँकेचंही काम झालं आणि ज्या काही सह्या वगैरे पाहिजे होत्या त्या करून झाल्या आपल्या ड्रायवरला म्हणालो की चल आता घरीच जाऊ आता दुपार म्हणजे तुला तर माहितीच आहे टिळक रोडवर किती गर्दी असते त्यात एक जण कुणी सरळ चालवेल तर खरं सगळेच जसे बाजीराव आणि सगळेच जणू घोडयावर आई उघड हसली नाही पण तिला नकळत हसू आलं हे एक अजून अनिकेतचं म्हणजे सांगायचा मुद्दा येईपर्यंत त्याची गोष्ट चार ठिकाणी फिरून येणार तर सिग्नलला गाडी थांबली होती मी फोनवर काही तरी वाचत होतो तेव्हड्यात खिडकीवर टकटक झाली पाहिलं तर एक म्हातारी भिकेसाठी उभी होती सिग्नल नुकताच लाल झाला होता त्यामुळे गाडी लगेच निघणारही नव्हती तिच्या हातातला रिकामा बटवा मला दाखवत ती सारखी म्हणत होती काय तरी दे रे बाबा गाडीतला आहेस रस्त्यावरच्याकडे बघ रे बाबा काय धा पाच देशील ते दे पण सकाळपासून हा बटवा रिकामा हे तू तरी बोहनी कर काय पण दे पण काय तरी तर दे रे बाबा मी नेहमीसारखं कारचं ग्लोव्ह कंपार्टमेंट उघडलं की तिला ग्लुकोज बिस्किटांचा पुडा देईन आज नेमका पुडा नव्हता परवा एकदा कुणा भिकाऱ्याला पुडा दिल्यावर दुसरा पुडा गाडी ठेवायचा राहिला असं दिसतंय मग मी गडबडीत खिसे चाचपडले सिग्नल सुटायच्या आधी खिशातली जी नोट हातात येईल ती देईन असं ठरवलं हातात जी नोट आली ती नेमकी पाचशेची आपला ड्रायवर बघतच राहिला अहो सर काय करताय असं तो म्हणेपर्यंत मी पाचशेची नोट त्या बाईला दिलीसुद्धा अरे ठीक आहे ना तूच ठरवलं होतंस ना की जी नोट हातात येईल ती द्यायची मग आता कसला त्रास होतोय बायको समजूत घालत होती आणि आईही मानेने दुजोरा देत होती अनिकेतनं अजून दोन तीन घोट पाणी पिऊन घेतलं तेव्हा पुन्हा एकदा फक्त लेगो ब्लॉक्सचा क्लिक क्लिक आवाज येत होता आता सांगतो का चिडलोय ते त्या बाईने पाचशेची नोट हातात घेतली एकदा ती नोट पाहिली मग माझ्याकडे पाहिलं आणि आणि काय केलं असेल तिने कारच्या उघड्या खिडकीतून चक्क तो बटवा माझ्या अंगावर भिरकावला आणि ती बाजूच्या गल्लीत निघून गेली पाचशे रूपये दिले ह्याचं वाईट नाही वाटत पण तिने रिकामा बटवा दाखवून मला सरळ सरळ फसवलं त्याचा येतोय इतका कसा मी गंडलो ते कळत नाहीये पण बाबा तू कशाला चिडतोस लेगो खेळण्यात रमलेला छोटा मुलगा असं म्हणाल्यावर आई बायको आणि अनिकेत तिघंही चमकले तो बाजूला खेळतोय हे जणू सगळे विसरलेच होते एकीकडे लेगो खेळतानाच तो मुलगा म्हणाला मे बी डू यु थिंक की तो बटवा त्या बेगर बाईसाठी लकी होता आणि तू इतके पैसे एकदम दिलेस म्हणून हॅप्पी होऊन त्या बाईने तुला बटवा गिफ़्ट देऊन टाकला ती इतकी हॅप्पी झाली की तिने तिचं आजचं आणि नेक्स्ट काही डेजचं सगळं लक तुला दिलंय पाहिलंस अनिकेत छोट्यांच्या तोंडी देव बोलतो ते असं आई म्हणाली आणि ती देवापुढे साखर ठेवायला गेली मगाशी तिरीमिरीत अनिकेतने सोफ्यावर फेकलेल्या बटव्याकडे अनिकेत आणि बायको बघतच राहिले posted by संदीप चित्रे at 11 24 pm 3 comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels कथा लघुकथा older posts home subscribe to posts atom पूर्वीचं लेखन 2022 1 december 1 स्क्रम की कविता 2021 1 july 1 2020 4 september 1 august 1 july 1 april 1 2018 4 november 2 april 1 february 1 2017 1 july 1 2016 1 january 1 2015 1 december 1 2014 2 august 1 march 1 2013 2 november 1 april 1 2012 3 december 1 june 1 april 1 2011 2 november 1 april 1 2010 4 november 1 september 1 may 1 january 1 2009 13 september 1 august 1 july 1 june 1 may 1 april 2 march 1 february 2 january 3 2008 21 december 2 november 2 october 1 september 1 august 2 july 1 june 2 may 1 april 1 march 2 february 3 january 3 2007 12 december 2 november 3 october 3 september 4 अस्मादिक संदीप चित्रे न्यू जर्सी united states देसी वसे परदेशी view my complete profile विषयवार सूची आठवणींचा देश 13 इदं न मम 1 कथा लघुकथा 1 कविता 22 क्रिकेट 4 गझल 7 भावले मना सांगावे जना 25 स्टँड कॉमेडी फोटो ब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते संपर्क थेट भेट name email message नवीन लेखनाची सूचना enter your email address delivered by feedburner मराठी ब्लॉग विश्व copyright सर्व हक्क सुरक्षित http www atakmatak blogspot com ह्या ब्लॉगवरील संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे सर्व हक्क सौ दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित copyright all rights for the material that sandeep chitre has written and posted on the blog http www atakmatak blogspot com are reserved with mrs deepashree sandeep chtire
|