Meta tags:
Headings (most frequently used words):
2010, tuesday, may, काही, गॅजेट, रुब्रिक, नवीन, मोबाईल, कार्यप्रणाली, विंडोज, फोन, ऑगस्ट, च्या, निमित्त्ताने, मोटोरोला, क्यूब, आणि, बनवूया, ड्रॉईड, इंटरनेट, एक्सप्लोरर, प्रथमच, ६०, पेक्षा, कमी, आय, पॅडला, वायफायचा, archive, एक, जग, मराठी, october, 12, saturday, july, 31, sunday, monday, april, लिहा, मुक्त, followers, माहिती, हवीये, का, मी, फोटो, जे, मला, आवडले, चला, कीडा, त्रास,
Text of the page (most frequently used words):
आहे (26), #share (15), आणि (15), #इंटरनेट (11), #काही (8), #विक्रम (7), #मोबाईल (7), #नवीन (7), 2010 (6), http (6), #एक्सप्लोरर (6), #pinterest (5), #posted (5), #सर्व (5), this (5), च्या (5), आता (5), facebook (5), email (5), blogthis (5), twitter (5), कमी (5), labels (5), गेले (5), पहा (5), comments (4), ऑगस्ट (4), विंडोज (4), new (4), gadgetkida (4), करा (4), वायफाय (4), ग्राहक (4), जवळजवळ (4), आहेत (4), असून (3), वेबकिट (3), org (3), त्यांनी (3), vikramuk (3), may (3), माझा (3), होता (3), बर् (3), webkit (3), com (3), मायक्रोसॉफ्टने (3), केली (3), windows (3), ब्राऊजर (3), काळ (3), व्हिडीयो (3), पोस्ट (3), एका (3), वापर (3), तक्रारी (2), ॅपलने (2), आपण (2), असलेले (2), मॉडेल (2), लोकमान्य (2), शनिवारी (2), होते (2), इंस्टॉल (2), उपलब्ध (2), केलेले (2), ॅपलचे (2), बाजारात (2), त्याच्या (2), जाहिर (2), आयपॅड (2), tuesday (2), कीडा (2), रुब्रिकक्यूब (2), काळात (2), मध्ये (2), मात्र (2), प्रथमच (2), खाली (2), प्रमाण (2), बाजू (2), महिन्यात (2), वर्षे (2), क्रोम (2), जवळ (2), नंतर (2), आपला (2), क्रोमने (2), गूगल (2), आयई (2), नाही (2), सफारी (2), हँडसेट (2), करून (2), याचा (2), डाऊनलोड (2), nightly (2), जरूर (2), असा (2), बेटा (2), ड्रॉईड (2), आला (2), घसरण (2), अपेक्षा (2), याच (2), गोष्टी (2), प्रयत्न (2), खरोखर (2), सारख्या (2), असे (2), साजरा (2), आले (2), posts (2), ह्या (2), अशा (2), फोन (2), october (2), july (2), home (2), तसेच (2), वेदांचा (2), लागले (2), कार्यप्रणाली (2), संपर्कात (2), apple (2), गेल्या (2), लिहीले (2), गॅजेट (2), april (2), प्रसिध्द, त्यात, खेळापैकी, उतरवण्याची, सर्वाधिक, जगातल्या, घोषणा, gadg, games, power, kee, monday, पेक्षा, टाकले, मागे, होतानाचा, असतात, ठो़कळ्याच्या, फिरवून, स्मृतींना, अनुभवातून, प्रणाम, विकीपीडीया, निमित्त्ताने, वैयक्तीक, saturday, काम, बुध्दीवंताचे, एखाद्या, आणणे, पुन्हा, तुकडे, प्रत्यक्ष, असतो, बनवलेला, phone, जोडून, तुकड्यांना, mobile, मायक्रोसॉफ्टची, रंगवलेल्या, कार्यप्रणालीचा, पॉईंटनी, त्यांचा, सफारीला, एक्स्पोरर, वाचवला, हिस्सा, फायरफॉक्सने, दिली, पसंती, बहुसंख्यांनी, ज्यातील, घालवला, human, which, झाल्या, २००९, उभा, मार्च, कारणे, याची, आणली, एकत्र, फ्लेक्सीबलीटी, believes, फायरफॉक्स्ची, कोड, something, वेबकिटचा, every, day, उंबरठ्यावर, नेट, ॅपलच्या, घटीसाठी, daa, दाखवत, वाढ, आकडी, दोन, चौथ्या, सलग, लावला, ब्राऊजरने, गूगलच्या, हातभार, इतक्या, ॅप्लिकेशनच्या, unique, १९९९, species, झाली, ऐतिहासीक, संख्येत, यांच्या, वापरणार्, एक्स्प्लोररच्या, एप्रिल, पाहणीनुसार, बनलेले, केवळ, जोडलेला, किती, तर्कशास्त्री, १९२०, पुण्यतिथी, टिळकांची, खगोलतज्ञही, गंगाधर, बाळ, लिहीलेल्या, माहित, जणांना, विचार, रोजी, आहोत, विसरत, arctic, करतांना, विरोध, the, त्याला, करतील, पुढे, म्हणून, vedas, फ्रेंडशीप, महान, वयाच्या, पुस्तकांनी, सार्वजनिक, करणे, उद्देश, समाजजागृती, एकत्रीकरण, लोकांचे, ज्यामुळे, निष्णात, कार्य, मोठे, वकील, सुरुवात, गणेशोत्सवाची, जाणतोच, तितकेच, योगदान, स्वातंत्र्यलढ्यातले, त्यांचे, झाला, देहांत, क्रांतीकारकाचा, स्वराज्याचे, खंदे, विचारवंत, थोर, पुरस्कर्ते, वर्षी, पासष्ठाव्या, दिवस, आजचा, व्यक्तीमत्वाच्या, ज्यात, कॅमेर्, जोडण्यात, पूर्व, ४५००, ठरवला, त्याचे, रोबोटला, मृग, मोटो, नक्षत्राच्या, महत्वाकांक्षी, मोटोरोलाचा, स्थानावरून, इसवी, पाहण्यात, नुकताच, सेकंद, गणनही, मूळ, दाखवले, सोडवायला, मोटोड्रॉईडला, धक्कादायक, निकाल, आलेले, आदरणीय, स्थितीवरून, सुधारणा, आर्यांचे, बरेच, स्थलांतर, हिमयुगाचा, संदर्भ, पंचांग, वेगळे, थोडे, आजचे, मित्रांनो, चालू, पंचांगातील, मांडल्या, रुब्रिकचा, 1aug, नक्षत्रांच्या, science, tilak, ved, sunday, मोटोरोला, क्यूब, रुब्रिक, गेला, केला, सोडवण्याचा, ठोकळा, आलेल्या, simple, सांभाळला, बाबतीत, लागल्या, येऊ, वेगाने, तितक्याच, तरी, घेतले, लक्षात, स्वागत, जोरदार, झालेले, आयपॅडचे, धरला, रस्ता, मायक्रोसॉफ्टचा, तक्रारींच्या, कनेक्शनबद्दल, पर्यंत, अनेक, ॅपल, सपोर्टचे, फोरम, भरू, सोमवार, प्रश्नांबद्दल, पाहिले, १३०, फोरमपोस्ट, १३०००, हून, जास्त, वेळा, याचश्या, स्वप्न, वेग, मिळू, लागेल, पॅडला, वायफायचा, त्रास, browser, तुमचा, ३जी, टेस्ट, फायरफॉक्स, वापरतो, स्कोर, १००, महिनाअखेरीला, फक्त, अखेर, विकले, झाले, नुकतेच, केले, ०००, तरीही, सध्या, म्हणणे, दुकाने, बंद, असल्याने, विक्री, अपेक्षेपेक्षा, प्रश्नांनी, महाजाळ्याचा, acidtests, view, निर्माते, सोयीचे, followers, हवीये, माहिती, counters, hit, website, india, महाराष्ट्र, दापोली, profile, complete, आवडले, आभारी, march, powered, blogger, january, february, मला, archive, चला, मुक्त, बनवूया, फोटो, यांचा, श्री, drop, आयपॅडच्या, आल्याचे, वापरकर्त्याने, ॅपलकडून, काढून, टाकण्यात, mbell75, मालकांनी, मिनीटांनी, संकेत, weak, signal, येणारे, अडथळे, connection, अडथळा, ओंकार, लिहा, जोशी, मराठीमध्ये, लिहीण्यासाठी, गमभन, मराठी, subscribe, इतके, atom, older, ipad, comment, प्रश्नांचे, गांभिर्य, acid3, करण्यासाठी, यापैकी, परत, स्वताचा, मो़झिल्लाने, देऊन, फिचर्स, आढळणारी, सर्वत्र, ब्राऊसिंगसारखी, मल्टीटॅब, वेळी, त्याच, अपयश, मायक्रोसॉफ्टला, आणण्यात, एक्सप्लोररकडे, त्यांना, आणण्यासाठी, पहाव्या, उघडत, नसे, अजूनही, साईटस, कॉम्पीटॅबिलीटी, मोड, लागतात, निवडले, ज्या, ग्राहकांनी, theme, किंवा, ऑपेरा, सारखे, वाढवला, एक्सप्लोररला, सुरुवातीला, सर्वोत्कॄष्ट, राहीला, सफारीवर, बनवण्यात, आलेला, नाईट्ली, एकेकाळी, बनला, वर्ग, ऑपेराने, सुद्धा, जगातील, सर्वात, वेगवान, लौकीक, प्रामाणिक, फायरफॉक्सचा, तीन, वर्जन्स, लागली, सततच्या, मिळणार्, प्लग, आवॄत्या, हवा, आताच्या, तसा, बदलण्याची, सोय, कस्टमायझेशन, पाहून, मोझिल्लाचा, जीमेल, priscimon, आलेली, येईल, microsoft, testdrive, जेव्हा, आवॄत्ती, थोड्या, इथून, सुधारणांची, नक्कीच, करतो, यशानंतर, प्रमाणे, संपूर्ण, करता, पहावे, बनवलेल्या, running, blog, 2008, four, easy, steps, वापरून, वापरण्यासाठी, असणे, गरजेचे, www, safari, download, नव्याने, कडून, आठवा, एक्सप्लोररचा, फार, माझे, जूने, स्वतःच, मिळून, ग्राहकांमध्ये, वापरतात, यात, सुरुवातीच्या, निराशा, होती, होणारी, गोष्टीनी, पाहूया, नाहीत, घोडामैदान, जवळच, गडबडीत, केल्या, पुरे, पडले, वेब्स्लाईसेस, क्लीक, शेअरींग, फेवरेईट, बार, आरएसएस, फीडसारखेच, फायरफॉ़क्स,
Text of the page (random words):
गॅजेट कीडा गॅजेट कीडा gadg et y kee daa a unique species of human which believes in something new every day tuesday october 12 2010 नवीन मोबाईल कार्यप्रणाली विंडोज फोन ७ पहा मायक्रोसॉफ्टची नवीन मोबाईल कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष वापर होतानाचा व्हिडीयो मायक्रोसॉफ्टने असे १० मोबाईल हँडसेट बाजारात उतरवण्याची घोषणा केली आहे posted by विक्रम at 11 05 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels 7 gadgetkida mobile phone vikramuk windows saturday july 31 2010 १ ऑगस्ट च्या निमित्त्ताने मित्रांनो आजचे पोस्ट थोडे वेगळे आहे आज १ ऑगस्ट बरेच जण आजचा दिवस फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करतील त्याला माझा विरोध नाही पण तो साजरा करतांना आपण काही विसरत आहोत का याचा विचार मात्र जरूर करा किती जणांना माहित आहे की आज १ ऑगस्ट ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी आहे १ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या पासष्ठाव्या वर्षी या थोर विचारवंत क्रांतीकारकाचा देहांत झाला त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदान आपण जाणतोच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हे त्यांनी केलेले एक मोठे कार्य होते ज्यामुळे लोकांचे एकत्रीकरण करून समाजजागृती करणे असा त्यांचा मूळ उद्देश होता निष्णात वकील तसेच स्वराज्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले लोकमान्य तितकेच महान तर्कशास्त्री व खगोलतज्ञही होते त्यांनी लिहीलेल्या arctic home in the vedas सारख्या पुस्तकांनी वेदांचा काळ आर्यांचे स्थलांतर हिमयुगाचा काळ संदर्भ विकीपीडीया पंचांग आणि चालू पंचांगातील सुधारणा इ गोष्टी मांडल्या नक्षत्रांच्या स्थितीवरून त्यांनी वेदांचा काळ इसवी सन पूर्व ४५०० वर्षे असा ठरवला तसेच त्याचे मृग नक्षत्राच्या स्थानावरून केलेले गणनही दाखवले अशा या आदरणीय व्यक्तीमत्वाच्या स्मृतींना माझा प्रणाम posted by विक्रम at 12 51 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels 1aug science tilak ved sunday may 9 2010 रुब्रिक क्यूब आणि मोटोरोला ड्रॉईड नुकताच एक व्हिडीयो पाहण्यात आला ज्यात मोटोरोलाचा नवीन आणि महत्वाकांक्षी मोबाईल हँडसेट मोटो ड्रॉईड एका रोबोटला जोडण्यात आला होता आणि त्याच्या कॅमेर् याचा वापर करून रुब्रिकचा ठोकळा सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आलेले निकाल खरोखर धक्कादायक आहेत मोटोड्रॉईडला रुब्रिकक्यूब सोडवायला केवळ २४ सेकंद लागले जोडलेला व्हिडीयो पहा रुब्रिकक्यूब हा जगातल्या सर्वाधिक प्रसिध्द खेळापैकी एक असून त्यात एका ठो़कळ्याच्या सर्व बाजू रंगवलेल्या असतात आणि तो 9 x 9 x 9 तुकड्यांना जोडून बनवलेला असतो हे सर्व तुकडे फिरवून पुन्हा सर्व बाजू सारख्या आणणे हे खरोखर एखाद्या बुध्दीवंताचे काम आहे वैयक्तीक अनुभवातून बनलेले मत posted by विक्रम at 3 29 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels gadgetkida games new power मी मोबाईल विक्रम monday may 3 2010 इंटरनेट एक्सप्लोरर प्रथमच ६० पेक्षा कमी नेट अ ॅप्लिकेशनच्या पाहणीनुसार एप्रिल महिन्यात इंटरनेट एक्स्प्लोररच्या वापरणार् यांच्या संख्येत ऐतिहासीक घसरण झाली असून ते प्रमाण आता ६० च्या खाली गेले आहे इंटरनेट एक्सप्लोरर ४ च्या १९९९ नंतर प्रथमच हे प्रमाण इतक्या खाली गेले आहे ह्या घटीसाठी हातभार मात्र गूगलच्या क्रोम या ब्राऊजरने लावला आहे सलग चौथ्या महिन्यात क्रोमने दोन आकडी वाढ दाखवत अ ॅपलच्या सफारीला २ पॉईंटनी मागे टाकले आहे मार्च २००९ मध्ये इंटरनेट एक्स्पोरर ८ जाहिर झाल्या नंतर मायक्रोसॉफ्टने जवळ जवळ ९ ग्राहक घालवला आहे ज्यातील बहुसंख्यांनी गूगल क्रोम ला पसंती दिली आहे फायरफॉक्सने आपला हिस्सा वाचवला असून आता तो २५ च्या उंबरठ्यावर उभा आहे याची कारणे इंटरनेट एक्सप्लोरर स्वतःच आयई ५ ६ ७ आणि ८ हे सर्व मिळून इंटरनेट एक्सप्लोररचा जवळजवळ ९९ ग्राहक वापरतात यात आयई ७ आणि ८ ने सुरुवातीच्या काळात निराशा केली होती आठवा आय ई ८ ला सुरुवातीला जीमेल उघडत नसे आणि अजूनही काही साईटस कॉम्पीटॅबिलीटी मोड मध्ये पहाव्या लागतात याच काळात ज्या ग्राहकांनी फायरफॉ़क्स सफारी किंवा ऑपेरा सारखे ब्राऊजर निवडले त्यांना परत इंटरनेट एक्सप्लोररकडे आणण्यात मायक्रोसॉफ्टला अपयश आले त्याच वेळी मल्टीटॅब ब्राऊसिंगसारखी आता सर्वत्र आढळणारी फिचर्स देऊन मो़झिल्लाने स्वताचा ग्राहक वाढवला जे आणण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररला जवळजवळ तीन वर्षे लागली सततच्या मिळणार् या प्लग ईन नवीन आवॄत्या वर्जन्स आणि हवा तसा बदलण्याची सोय कस्टमायझेशन पाहून मोझिल्लाचा आताच्या फायरफॉक्सचा ग्राहक वर्ग प्रामाणिक राहीला सफारीवर बनवण्यात आलेला वेबकिट नाईट्ली पहा http nightly webkit org एकेकाळी सर्वोत्कॄष्ट ब्राऊजर बनला होता ऑपेराने सुद्धा आपला जगातील सर्वात वेगवान हा लौकीक बर् यापैकी सांभाळला पुढे आलेल्या गूगल क्रोमने वेबकिटचा कोड आणि फायरफॉक्स्ची फ्लेक्सीबलीटी एकत्र आणली या सर्व गडबडीत मायक्रोसॉफ्टने काही नवीन गोष्टी प्रयत्न केल्या पण ते पुरे पडले नाहीत वन क्लीक शेअरींग फेवरेईट बार आरएसएस फीडसारखेच वेब्स्लाईसेस इ गोष्टीनी ग्राहकांमध्ये होणारी घसरण फार कमी केली नाही पहा माझे जूने पोस्ट आता जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा आवॄत्ती आलेली आहे मी थोड्या सुधारणांची अपेक्षा नक्कीच करतो विंडोज ७ च्या यशानंतर आणि विंडोज मोबाईल ७ प्रमाणे संपूर्ण नव्याने बनवलेल्या इंटरनेट एक्सप्लोरर ९ कडून अपेक्षा बर् याच आहे पाहूया घोडामैदान जवळच आहे इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा इथून डाऊनलोड करता येईल http ie microsoft com testdrive जरूर वापरून पहावे असे काही वेबकिट डाऊनलोड करा http nightly webkit org हे वापरण्यासाठी सफारी इंस्टॉल असणे गरजेचे आहे http www apple com safari download आणि वेबकिट इंस्टॉल करण्यासाठी पहा http priscimon com blog 2008 06 04 four easy steps to running webkit on windows तुमचा ब्राऊजर टेस्ट करा http acid3 acidtests org मी फायरफॉक्स वापरतो माझा स्कोर आहे ९४ १०० posted by विक्रम at 10 51 am 2 comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels browser gadgetkida new vikramuk windows tuesday april 6 2010 आय पॅडला वायफायचा त्रास आयपॅड अ ॅपलचे नवीन स्वप्न अखेर बाजारात उपलब्ध झाले अ ॅपलने नुकतेच जाहिर केले आहे की गेल्या शनिवारी ३ ०० ००० आयपॅड विकले गेले तरीही अ ॅपलचे म्हणणे आहे की काही दुकाने शनिवारी बंद असल्याने विक्री अपेक्षेपेक्षा कमी आहे सध्या फक्त वायफाय असलेले मॉडेल उपलब्ध आहे ३जी मॉडेल या महिनाअखेरीला मिळू लागेल अ ॅपलने तक्रारींच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचा रस्ता धरला आहे आयपॅडचे झालेले जोरदार स्वागत लक्षात घेतले तरी तितक्याच वेगाने त्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत आणि बर् याचश्या तक्रारी आहेत वायफाय कनेक्शनबद्दल आयपॅडच्या काही मालकांनी कमी वायफाय संकेत weak signal संपर्कात येणारे अडथळे connection drop आणि महाजाळ्याचा कमी वेग अशा प्रश्नांनी अनेक अ ॅपल सपोर्टचे फोरम भरू लागले आहेत गेल्या सोमवार पर्यंत वायफाय प्रश्नांबद्दल जवळजवळ १३० फोरमपोस्ट लिहीले गेले आणि ते १३००० हून जास्त वेळा पाहिले गेले ह्या प्रश्नांचे गांभिर्य इतके आहे की जवळजवळ दर ५ १० मिनीटांनी संपर्कात अडथळा आल्याचे एका वापरकर्त्याने mbell75 लिहीले आहे जे पोस्ट आता अ ॅपलकडून काढून टाकण्यात आले आहे posted by विक्रम at 6 06 am 1 comment email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels apple gadgetkida ipad new vikramuk older posts home subscribe to posts atom मराठी लिहा मराठीमध्ये लिहीण्यासाठी गमभन चा वापर करा या सोयीचे निर्माते श्री ओंकार जोशी यांचा आभारी आहे followers काही माहिती हवीये का website hit counters मी विक्रम दापोली महाराष्ट्र india view my complete profile काही फोटो जे मला आवडले चला एक मुक्त जग बनवूया archive 2010 15 october 1 नवीन मोबाईल कार्यप्रणाली विंडोज फोन ७ july 1 may 2 april 1 march 1 february 5 january 4 simple theme powered by blogger
|