Meta tags:
description= काही विसरलेली नाती, परत जोडण्यासाठी;
Headings (most frequently used words):
काही, एक, जुना, धागा, विसरलेली, नाती, परत, जोडण्यासाठी, ओव्हर, टॉप, रोखठोक, सत्यदेव, दुबे, असेच, यापुढे, थांबू, नको, तू, मी, पण, मराठी, मेनू,
Text of the page (most frequently used words):
आहे (9), त्या (8), काही (7), asuph (6), मराठी (5), posted (5), this (4), wordpress (4), com (4), जुना (4), धागा (4), आता (4), मला (4), 2007 (4), ओव्हर (4), टॉप (4), with (3), करा (3), घ्या (3), आवडले (3), sex (3), acting (3), आणि (3), site (2), like (2), subscribed (2), देणगी (2), सबस्क्राइब (2), blog (2), भाषांतर (2), कोठे (2), आजकाल (2), the (2), कुठेही (2), येथे (2), यापुढे (2), थांबू (2), नको (2), ऑक्टोबर (2), मुलाखत (2), पाहीजे (2), त्यांना (2), शांती (2), सत्यदेव (2), दुबे (2), झालोच (2), गप्प (2), तुझ्या (2), वेश (2), असतातच (2), मस्तवाल (2), विसरलेली (2), नाती (2), परत (2), जोडण्यासाठी (2), सुरु, करूया, design, collapse, bar, manage, subscriptions, view, reader, report, content, लॉग, साइन, गोपनियता, already, have, account, log, now, sign, create, free, website, पानही, आपण, भरवणार, अतुल, सबनीसनॆ, वर्डप्रेसमधे, language, category, आणली, आणी, विचारले, थोडे, करशील, विषयांतर, करायची, सवय, असलेल्या, त्यातूनच, कल्पना, सुचली, चालू, करून, टाकूया, नादाने, नाहीतरी, लिहीणे, होते, केलेले, स्वैर, इंग्रजी, http, 2005, destination, कसाही, शेवटी, येशील, वाकडी, वाट, वेडी, इथे, विश्राम, घेतॆ, पावसाचे, शैत्य, काजव्यांची, लख्ख, झाडे, गर्द, कालेखातसुद्, चित्त, चाकाटे, उजेडे, लौकिकी, रंगुन, त्याला, वर्ख, लौकिकापल्याडच्या, अद्, भुती, गर्क, चांदणे, भोगून, झालॆ, सावल्यांची, मैफली, गाउन, झाल्या, मौन, झाले, गोड, आपुल्या, वाटा, निराळ्या, वाढत्या, संध्येत, माझ्या, सावल्या, वाटेत, आल्या, कवी, बोरकर, शब्द, येतात, भाषा, जातात, भाव, जाणार, असेच, हाहा, तथ्य, एकूणच, वाचनीय, प्रेक्षकांनापण, सांगायचे, तुम्हीही, सरेंडर, करायला, शिकले, नाही, सांगण्याचा, अधिकार, तुम्हाला, आहेच, अनुभव, घेताना, स्वतःला, सोडून, द्या, नाहीतर, can, haapen, उदाहरण, दिलेकी, आपल्याला, लवकर, समजत, म्हणून, तीच, analogy, वापरून, म्हणतो, problem, same, people, only, talk, पश्चिमेकडून, आले, म्हणजे, बरोबर, अशी, धारणा, होऊन, बसली, असताना, फारच, युजिनिओ, बार्बाचा, लेख, वाचला, all, bullshit, तिकडे, पश्चिमेकडे, डोक्याला, पाहिजे, अशांत, माणूस, that, why, you, should, act, play, केल्यावर, लोक, काय, बोलतात, निरर्थक, साप्ताहीक, सकाळच्या, २००७, दिवाळी, अंकातील, माधव, वझे, यांनी, घेतलेली, यांची, झकास, नोव्हेंबर, रोखठोक, मोठा, आहेकी, त्यांचा, व्यवसाय, करत, माझा, मोठेपणाही, कर्जाउच, म्हणूनच, राहतो, कारण, कर्जाऊ, मापदंडाचे, हप्ते, तुला, असेंच, फेडावे, लागणार, मात्र, मापदंडाप्रमाणे, खांना, कुठे, बांधू, जाउदे, थोडा, छोटा, त्यामध्ये, होउदे, तरी, मोठी, होतील, फसतोस, दिखाव्याला, अस्सल, गावरान, दुःखाला, सुटाबुटातला, साहेब, समजून, तोलतोस, त्त्याच, कर्जाने, आणलेल्या, मापदंडाने, व्यावसायिक, तटस्थता, जपणाऱ्या, तुझ्यासारख्या, टिकेकराला, दिसतो, फक्त, आवेश, असतो, नग्नतेला, थोड़, स्वीकार्य, बनवण्यासाठी, सुसंस्कृत, समाजासाठी, बनवतात, आम्हालाही, क्षण, निसटत्या, सोबतीचे, खांच्या, कथा, शब्दांनाच, पागळे, करतात, पाळमूळं, उखडतात, सर्जनशीलतेच्या, संकेतांची, असतात, हेकेखोर, बलप्रदर्शन, करणारी, उगीचच, कपडे, काढून, आपले, निरागस, नग्नत्व, मिरवणारी, नसतात, उच्चब्रू, शालीन, वगैरे, नियम, पाळणारी, सुसंस्कृतपणाचे, चाकोरीत, रहाणारी, तशी, थोडीशी, बरेच, उतरली, खाली, जातील, थेट, काळजाच्या, आरपार, जरा, वाटतंय, एका, वाक्यात, केलेल्या, दिवस, रात्रींचे, अस्तित्व, नाकारलेस, तेंव्हा, राहिलो, जानेवारी, 2016, सामग्री, वगळा, शोध, यांचा, कोण, मुखपृष्ठ, मेनू,
Text of the page (random words):
एक जुना धागा काही विसरलेली नाती परत जोडण्यासाठी मेनू मुखपृष्ठ मी कोण शोध घ्या यांचा सामग्री वगळा एक जुना धागा काही विसरलेली नाती परत जोडण्यासाठी ओव्हर द टॉप posted on जानेवारी 17 2016 by asuph जरा ओव्हर द टॉप वाटतंय अस एका वाक्यात एक केलेल्या दिवस रात्रींचे अस्तित्व तू नाकारलेस तेंव्हा मी गप्प राहिलो काही दु ख असतातच तशी थोडीशी ओव्हर द टॉप आणि ते बरेच आहे उतरली खाली जर ती तर जातील थेट काळजाच्या आरपार काही दु ख नसतात उच्चब्रू शालीन वगैरे नियम पाळणारी सुसंस्कृतपणाचे चाकोरीत रहाणारी काही दु ख असतात हेकेखोर बलप्रदर्शन करणारी उगीचच कुठेही कपडे काढून आपले निरागस नग्नत्व मिरवणारी त्या दु खांच्या कथा शब्दांनाच पागळे करतात पाळमूळं उखडतात सर्जनशीलतेच्या संकेतांची ती तर असतातच मस्तवाल पण बनवतात आम्हालाही मस्तवाल काही क्षण त्या निसटत्या सोबतीचे व्यावसायिक तटस्थता जपणाऱ्या तुझ्यासारख्या टिकेकराला दिसतो फक्त तो वेश तो आवेश पण तो वेश असतो त्या नग्नतेला थोड़ स्वीकार्य बनवण्यासाठी तुझ्या सुसंस्कृत समाजासाठी तू पण फसतोस त्या दिखाव्याला आणि अस्सल गावरान दुःखाला सुटाबुटातला साहेब समजून तोलतोस त्त्याच कर्जाने आणलेल्या मापदंडाने म्हणूनच मी गप्प राहतो कारण तुझ्या कर्जाऊ मापदंडाचे हप्ते तुला असेंच तर फेडावे लागणार मी मात्र त्या मापदंडाप्रमाणे त्या दु खांना कुठे बांधू त्यांना जाउदे ओव्हर द टॉप मी थोडा छोटा झालोच त्यामध्ये तर होउदे ती दु खं तरी मोठी होतील आणि मी पण मोठा झालोच आहेकी त्यांचा व्यवसाय करत माझा मोठेपणाही कर्जाउच आहे ना रोखठोक सत्यदेव दुबे posted on नोव्हेंबर 29 2007 by asuph साप्ताहीक सकाळच्या २००७ दिवाळी अंकातील माधव वझे यांनी घेतलेली सत्यदेव दुबे यांची मुलाखत झकास आहे मी युजिनिओ बार्बाचा एक लेख वाचला आहे this is all bullshit त्यांना तिकडे पश्चिमेकडे डोक्याला शांती पाहिजे acting ला तर अशांत माणूस पाहीजे that is why you should act in a play acting केल्यावर मग शांती ते लोक काय बोलतात ते निरर्थक आहे पश्चिमेकडून आले म्हणजे बरोबर अशी आजकाल एक धारणा होऊन बसली असताना हे मला फारच आवडले प्रेक्षकांनापण मला सांगायचे आहे की तुम्हीही सरेंडर करायला शिकले पाहीजे हे आवडले ते नाही आवडले हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहेच पण अनुभव घेताना स्वतःला सोडून द्या नाहीतर it is like sex it can t haapen sex चे उदाहरण दिलेकी आपल्याला लवकर समजत म्हणून तीच analogy वापरून मी म्हणतो problem with acting is the same as it is with sex people only talk हाहा पण तथ्य आहे एकूणच वाचनीय मुलाखत असेच काही posted on ऑक्टोबर 22 2007 by asuph शब्द येतात भाषा जातात भाव जाणार कोठे यापुढे थांबू नको तू posted on ऑक्टोबर 22 2007 by asuph कवी बा भ बोरकर यापुढे थांबू नको तू आपुल्या वाटा निराळ्या वाढत्या संध्येत माझ्या सावल्या वाटेत आल्या चांदणे भोगून झालॆ सावल्यांची ओढ आता मैफली गाउन झाल्या मौन झाले गोड आता लौकिकी रंगुन जा तू और त्याला वर्ख आहे लौकिकापल्याडच्या त्या अद् भुती मी गर्क आहे पावसाचे शैत्य येथे काजव्यांची लख्ख झाडे गर्द कालेखातसुद् धा चित्त चाकाटे उजेडे जा कुठेही जा कसाही शेवटी येशील येथे वाकडी वा वाट वेडी या इथे विश्राम घेतॆ मी केलेले स्वैर इंग्रजी भाषांतर http asuph wordpress com 2005 09 21 the destination मी पण मराठी posted on मे 3 2007 by asuph अतुल सबनीसनॆ वर्डप्रेसमधे मराठी language category आणली आणी मला विचारले की थोडे भाषांतर करशील का आता विषयांतर करायची सवय असलेल्या मला त्यातूनच कल्पना सुचली की मराठी blog च चालू करून टाकूया त्या नादाने नाहीतरी मराठी लिहीणे होते कोठे आजकाल तर आता हे पानही आपण भरवणार मी पण मराठी create a free website or blog at wordpress com देणगी घ्या सबस्क्राइब करा subscribed एक जुना धागा sign me up already have a wordpress com account log in now गोपनियता एक जुना धागा देणगी घ्या सबस्क्राइब करा subscribed साइन अप करा लॉग ईन report this content view site in reader manage subscriptions collapse this bar design a site like this with wordpress com सुरु करूया
|