Meta tags:
Headings (most frequently used words):
2011, friday, june, 30, 2013, blog, गोडगप्पा, my, list, followers, about, me, गुणी, माझी, जिवंत, नवं, वर्ष, किल्ले, देवगिरी, विश्वास, archive, labels, january, february, 14, 2016, tuesday, april, wednesday, 23, december, july, thursday, sunday, monday, ओळख,
Text of the page (most frequently used words):
आणि (51), #नाही (36), आहे (28), मला (21), #असेल (18), होत (18), #वर्ष (18), #गुणी (17), #होते (17), #माझ्या (17), काय (16), खूप (16), घरी (14), #तिला (14), काही (13), #म्हणून (12), कधी (11), #तिच्या (11), माझी (10), त्या (10), 2011 (9), विचार (9), किंवा (9), आपण (9), बाबा (8), apurva (8), ago (8), फक्त (8), अजून (8), होती (7), आम्ही (7), तेव्हा (7), सुरु (7), comments (7), posted (7), पुढ (7), एखाद (7), वाटत (6), #विश्वास (6), तिची (6), बाहेर (6), घेऊन (6), years (6), कुणी (6), असतील (6), मात्र (6), किती (6), कन्नड (6), मोठ्ठी (6), करून (6), labels (6), जागा (6), आता (6), बहुतेक (5), च्या (5), दोन (5), थोड (5), दिवस (5), मराठी (5), जास्ती (5), देवगिरी (5), किल्ला (5), लहान (5), करत (5), अगदी (5), नाव (5), बघत (5), आमच्या (5), 2013 (5), होता (5), लगेच (5), असा (5), june (5), खाली (5), असणार (5), आपल्याला (5), औरंगाबाद (4), आधी (4), बरोबर (4), गोष्ट (4), बघून (4), गरज (4), थोडी (4), वेरूळ (4), अशा (4), गेली (4), नात (4), आमच (4), सगळ्या (4), येणार (4), नवीन (4), गेले (4), माहिती (4), नाहीये (4), सगळ (4), friday (4), म्हणाले (4), तरी (4), केल (4), तीच (4), वेळ (4), जायची (4), माझ (4), याच (4), जाऊ (4), संकल्प (4), मागच्या (4), january (4), काहीही (4), त्याच्या (4), खूष (4), झाल (4), गाडी (3), काढून (3), अशी (3), आपल्या (3), मध्ये (3), कमी (3), कशी (3), जाऊन (3), म्हणजे (3), पळून (3), मुख्य (3), प्रत्येक (3), वेळी (3), शिकली (3), तुझ्या (3), गाव (3), सांगितलं (3), नंतर (3), शकत (3), झाली (3), नव्हत (3), लांब (3), सचिन (3), नेहमी (3), दिवसात (3), देऊन (3), अंगावर (3), गाडीवर (3), बसायची (3), लक्षात (3), तशी (3), तिन (3), final (3), येईल (3), जाणवलं (3), आले (3), निवांत (3), वाट (3), माझे (3), जरा (3), आमची (3), उडी (3), april (3), प्रयत्न (3), खोलीत (3), कायमच (3), लोक (3), गच्चीवर (3), आजूबाजूला (3), बघू (3), नाहीच (3), ठरत (3), पाळीव (3), 2016 (3), मान्य (3), december (3), july (3), ठरवत (3), बाबांनी (3), घाबरत (3), त्याला (3), finally (3), जायचं (3), आपली (3), अश्या (3), गोडगप्पा (3), झाले (3), ठेवायची (3), february (3), कुठ (3), आठवत (3), नव्हती (3), गुणू (3), ताई (3), म्हटलं (3), अवघड (2), येताना (2), धुमधडाक्यात (2), एकटी (2), एकत्र (2), असते (2), नव्या (2), त्याच (2), कुत्र (2), करणार (2), चुकून (2), दादा (2), माणसांना (2), प्रश्न (2), गोष्टी (2), वगैरे (2), शिवाय (2), नवं (2), गुणा (2), अविस्मरणीय (2), विशेष (2), तीन (2), लागत (2), माणूस (2), बाकी (2), dilogue (2), आली (2), पासून (2), बक्षीस (2), sunday (2), tuesday (2), admission (2), गुणे (2), त्यात (2), रहायची (2), कसे (2), कॉलेजला (2), मुळात (2), असताना (2), बदलली (2), माझ्यावर (2), शाळेत (2), किस्सा (2), पाणी (2), असला (2), पुन्हा (2), wednesday (2), व्हायला (2), चालू (2), खुश (2), संपत (2), college (2), तिचा (2), दाराजवळ (2), झाड (2), जिवंत (2), मनापासून (2), ओळखून (2), स्थान (2), बहिण (2), लागायचा (2), प्रचंड (2), छोटे (2), एकच (2), परत (2), त्यामुळ (2), फार (2), जवळ (2), सगळे (2), तेव्हापासून (2), कुणीही (2), गेल्यावर (2), बसून (2), अंतर (2), आजोळ (2), गेल्या (2), तोफेवर (2), सरकार (2), सकाळी (2), expressions (2), ठरलं (2), एकदम (2), परिणामी (2), ठरवलं (2), त्यातून (2), मनात (2), शकतात (2), सवय (2), घेऊ (2), अजिंठा (2), आत्ता (2), इथून (2), पोहोचलो (2), वेळेत (2), पळत (2), चार (2), हळूच (2), काम (2), स्वतःच (2), चांद (2), मिनार (2), फारशी (2), साधारण (2), पिल्लू (2), फोटो (2), कधीच (2), पायथ्याशी (2), त्याची (2), हुशार (2), करायचं (2), घराबाहेर (2), गेल (2), एका (2), तोफ (2), किल्ल्याच (2), आम्हाला (2), राजधानी (2), heroine (2), यात (2), मस्त (2), काळात (2), प्रेम (2), कळणार (2), इतकी (2), केली (2), ओळख (2), कधीतरी (2), फुल (2), सध्या (2), नको (2), घालून (2), असाव्यात (2), बाप (2), दिसलं (2), जोडप (2), प्रकार (2), thursday (2), देखण (2), समोर (2), छोटी (2), madam (2), german (2), असत (2), submission (2), पक्क (2), बघितलं (2), शब्द (2), दोघ (2), चालत (2), अनुभव (2), धरून (2), blog (2), स्वा (2), सावरकर (2), कविता (2), मनातून (2), monday (2), संपला (2), पुढे (2), पूर्ण (2), गेला (2), भारी (2), नव्हता (2), दिसत (2), रुबाबदार (2), हौशी (2), बघायचं (2), about (2), बाईसाहेब (2), blogger (2), दुसर (2), त्यांना (2), बोलत (2), झालेलं (2), सगळ्यांनी (2), जागेवर (2), templates (2), skip (2), मिळाल (2), त्यांच्या (2), उत्तर (2), काल (2), आवडत (2), आज्जी (2), तसं (2), पहिल्यांदा (2), तिचे (2), लागली, यासाठीही, रात्री, द्यायची, नियम, आमच्याकड, वाले, घासाकड, अंथरूण, ठेऊया, ठेवलं, थंडीच्या, पोचायच्या, आधीच, खात, आईसाठी, फूटभर, shepherd, लाब्राडोर, कळलेलं, वैतागून, शोध, मोहीम, दिवसातच, आधीपासूनच, ठेवल्यामुळ, सोडण, उठेपर्येंत, संध्याकाळी, पोचलो, घातलेली, इतका, गोंडस, जीव, गोधडी, पुरेस, आवडतच, छोटुस, त्रासदायक, कुठल, ठेवायचं, छोटू, बाळ, जाईल, राहायला, ताऱ्यासारख, मुंबईला, साठी, दुसरीकडेच, job, घालतील, दिलेलं, गादीशेजारी, बेडखाली, ध्रुव, मलाही, झोपली, अढळ, जागेमुळ, लागलेली, खास, मान, पाउल, उठलं, म्हणणार, अंदाजान, बसलीच, नावाबद्दल, शेजारी, तयार, तब्ब्येतीला, होईना, आईपासून, पहिलीच, घाबरून, training, जपून, आईची, आठवण, घरात, खोली, कुठतरी, कॉटवर, झोपणार, यावर, ठाम, म्हातारी, गादी, बघतील, घातली, गादीच्या, पटला, पडलोही, आजारी, जमल, आठवडाभरात, सांगलीत, dnyaneshwar, anujna, एवढे, मुद्दे, tai, बास, anu, credit, picture, त्यातलाच, घरदार, कॉलेज, लिहायचं, log, आईने, विचारलं, अप्पु, तिच्याबद्दल, हवय, सोडून, तुला, डिसेंबरला, पुढच, संभाषण, वर्षी, सांगलीतल्या, government, आलेलं, अचानक, पापण्यात, जळली, लंका, लाह्यांपरी, आसू, उच्चारण, होण्याआधी, उच्चाटन, शब्दा, sidebar, दगडाची, पार्थिव, भिंत, सरली, contact, कागद, चाल, लिही, असे, वदली, वाचलेली, कुणाची, home, वालचंद, rss, posts, मिळाली, तिथून, अनादिकाळापासून, अर्थातच, आणूया, तेव्हाही, देऊया, वाटल, याला, माउलीला, इलाज, डॉक्टरनी, गोड, पडली, ऐकायला, मिळाले, म्हणाली, बाई, त्यानंतरचा, पोरगी, हिंदी, serial, डिरेक्टर, जेव्हा, तीनदा, सांगू, सांगण्याजोगा, repeat, जपायची, दुपारी, नीट, सुचवलं, आजच, मागतीय, भारतात, आईन, गच्चीवरून, कुत्र्याची, बंगल्यात, राहतो, यापुढ, करीन, miss, आवड, आणू, जबाबदारी, घेते, मारणार, म्हणतीस, स्पीडनी, पडलेली, नाहीस, आणूच, दिलस, आमच्यातल, करते, बसणारी, खिडकीतून, छोट्याश्या, गच्चीच्या, माहोलात, आपल्यात, बाजूने, धरलेला, जाईपर्येंत, त्यांनी, सगळ्यांच्या, आठवडा, हळू, पळायचा, शाळा, मूड, यायच्या, यायचा, आमच्यावर, स्पीडमध्ये, तिच्यावर, चिडचिड, आळवणी, मारायची, speed, breaker, बाबांची, घाबरट, टुन्नकन, प्रियकरांबरोबर, मारेल, चोरून, पाहुणे, अपवाद, असायचे, कुत्र्याला, गुणीपणावर, पाठवाव, बद्दल, ट्रेनिंग, नजकातसे, घ्यायचे, घ्यायची, जाण्याचा, guilty, बाबांचं, गाडीची, किल्ली, दिसली, माणसावरच, उतू, व्हायच, चांगला, तूला, येईपर्यंत, देतो, जीवाला, आपल्यालाच, राहील, जातात, पायातल्या, जागेत, अलगद, तोंड, सगळीकड, निरखत, वाटायचं, driver, आहोत, हिचे, truck, शेजारून, लाज, दिली, घुटमळत, गैरसमज, मुल, टिल्यांना, चांगल, खेळण, वाटायची, शेपूट, जागेला, घोडा, बनव, खऱ्या, असल, म्हणाल, त्यापुढ, आपोआप, बसेल, स्वघोषित, खोलीतल्या, उभी, दार, कधीही, उघडल, ठेवलेली, धुम्म, बनवून, इंटरेस्ट, ऐकण्यात, गप्पा, तरच, गुरगुरली, option, गालिच्यावर, ट्राय, राहिली, करायची, यायला, गालिच्याची, बाहेरचं, जाण्याकड, लक्ष, होत्या, असायचं, द्यायचा, तिच, पाय, मधल्या, लहानपणीचे, हिच, hall, दाराला, गुणून, दंगा, सुरूच, घ्या, मुलांबद्दल, कृत्य, उलट, संहारक, सोडले, कुणा, मुलावर, हातात, निघाल, कुंड्यातून, सामर्थ्यान, राहायचो, बाबांच्या, चांगल्या, वास्तविक, चष्मा, सापडेना, टाकलेला, बघितलायस, power, electronics, सुटेल, पर्येंत, प्रश्नांना, सामोरी, प्राणी, गप्पांमुळ, बहिष्कार, जाहीर, गुणीन, पोळ्यांवर, काकूंच्या, स्वयंपाकाच्या, भाषा, समृद्ध, वक्तशीर, command, दादाच, शिकवल्या, विसरून, मूक, जाण्यातहि, काळा, आपल्याकड, बघती, प्रात्यक्षिक, करण्यात, दिसला, दाखवण्यात, आमचा, खरच, stapled, झाला, shake, hand, तुकडा, जरी, पोळ्या, शिकवायला, विसरलो, गुणीच, शिक्षण, शुद्ध, पोळीत, माध्यमातून, झालं, आवडल्या, गुणीला, सगळेच, जास्तीच, करायच्या, तिच्याशी, आख्खी, वाक्य, नकोत, गाडीवरून, बिच्चारे, गुणीची, विरोध, देत, मुळचा, विषय, बदलेपार्येंत, वरसुद्धा, आणायला, बघणार, झाल्यावर, बसायला, आवडायचं, फेरी, पाडून, मारायला, एवढी, आईच्या, जायच्या, अजिबात, हट्ट, आईचा, ठराविक, वेळा, बसलेलं, दोनदा, सोडल्या, घरातलं, maximum, काळजी, समजायची, कचरा, फिरवायला, आदेश, दात, शिवशिवतात, phase, कार्यानुभवाचा, तास, कागदाचे, सक्त, तुकडे, केले, दादाचा, पाहिजे, कायम, चेहरा, नेला, घरभर, कसा, पसरला, शकतो, बूट, कुंड्यात, चावला, पाण्याच्या, आरपार, दिसायला, घेतली, त्यांनीच, चिडून, थोडा, संकल्पाच, त्यांची, इतक्याश्या, अति, आल्यावर, arrange, marriage, hardly, दिवसांचा, सहवास, ताकद, आयुष्यातलं, आपल्याहून, महत्वाच, दुसर्याला, देऊ, ओळखीत, वाटतीय, नुकतीच, गेलंय, बालपण, खूपस, कुटुंब, लग्नानंतर, चुलत, वर्षापूर्वीची, गडबड, मुळ, assignments, termwork, year, 2nd, पुरण, गम्मत, असल्यान, पडला, जीजू, निघतंय, वाक्यानंतर, गप्पांमध्ये, वेळात, थोड्या, विसर, सरळ, पुरता, पुराणाचा, करणं, उरल, त्राण, जीवात, अर्थात, माहेरी, सांगताना, गेलो, आवडेल, जीजूंना, करताना, कौतुक, त्याचं, तिथ, आलेल्या, त्यांच्याशिवाय, नाहीयेत, mostly, बोलतो, नवऱ्याबद्दल, मुलीशी, एकुलती, काकांकडे, गेलेल्या, मोठ्या, वर्षांचा, पाऊस, सोसूनही, तुकतुकीत, राहिलेली, बलदंड, ज्या, राजाच, गेल्यागेल्याच, कर्तबगारीच्या, जातो, दिसतात, तोफा, आकाराच्या, देखणी, आलेला, पर्यटक, भरपूर, काढणारे, आविर्भावान, येतोय, गोळा, तोफेतून, पल्ल्याच्या, pose, शाही, acting, ढकलतानाची, तोफेला, प्रमाणे, इतक्या, अत्यंत, गप्पाष्टक, माझा, stamina, वर्णन, निम्म, दमले, बांधताना, सुद्धा, बुरुजावरून, नसताना, ठरतात, आपल्यासाठी, नकळत, आपल्याही, खुपदा, लिहायचा, दिसतो, बसणार, चढून, frame, कॅमेऱ्याच्या, तुमच्या, आकर्षण, मेंढा, बुरुजावर, तोफखान्यातून, टोकाला, बेस्ट, त्यासाठी, काढायचा, type, लावलंय, बोट, फुग्यासारख, हवा, प्रवेशद्वार, पोस्ट्स, months, 238, just, walking, times, change, month, २६९, गृहितक, अब्द, list, archive, जाते, माझिया, करायला, बनवण्याचे, जीवाभावाच, लिहीतीय, हरकत, try, आहेत, जवळचे, लिहिणारे, ब्लोग, जमणारी, लिखाण, मना, लेखाजोखा, बस्स, followers, empress, welcome, willkommen, profile, complete, view, powered, deluxe, created, writes, बात, वर्षाचा, पारिजात, सरत्या, गुलमोहर, मास्टरपीस, रत्नम, मणी, दलपती, अस्वस्थ, maithili, अजूनही, सत्यवान, वटवट, thinks, सुरुवातीचे, एकमेकांवरचा, निघाले, थरथरत, आधार, कुणाचा, कोण, नेमक, हात, एकमेकांचा, यांच, निरखून, दिसतंय, चालण्यात, फारस, दिसण्यात, लागण्यासारख, कळण्यासाठी, पुढच्या, तरुणपणात, engineering, येण्यासाठी, विषयांतर, बोलता, याबद्दल, असतो, जीवघेणा, घेवून, क्षणी, लाटण, उगवला, दुसरा, आधाराची, चालण्यासाठी, दोघांना, दृष्ट, थाटात, अशक्य, भाव, सहजीवनान, वर्षांच्या, आजोबांना, कळल, डोळ्यातले, एकमेकांबद्दल, बनवतोय, शक्य, सहज, देतोय, साथ, गोष्टीत, मिळालेला, विश्वासाचं, कोल्हापुरी, संध्याकाळ, आजोबा, स्वभावाच, certificate, पडण्याहून, फिरायला, गजरा, भलत्या, तशा, ओलांडलेल, सत्तरी, तेवढ्यात, नजरेत, स्वप्न, नात्याचं, चालाल, प्रवेशिका, विनायकाने, त्याच्याकडून, lucky, ठरलो, एखादा, नेहमीच, फालतू, ठेवेल, भितीन, झोप, नसेल, वर्षांनाही, कंत्राटदार, नवा, एखाद्या, माणसाला, नशीब, स्वतःच्याच, आपल, नक्कीच, थोडासा, गर्व, होतंय, साजर, आगमन, निघत, कंत्राट, मुदतीची, महिन्यांच्या, बारा, मानतो, चीज, नशिबाची, भीती, हितगुज, फिरतीवर, ठरवते, celebration, सध्यातरी, 2009, किल्ले, आठवड्यात, प्रयत्नांच, काढल्यानंतर, महिनाभर, सुट्टी, सगळ्यात, पर्यंतची, करू, वर्षीच्या, टाकत, वर्तमानपत्रात, क्षण, सुखाचे, त्यानुसार, table, time, भविष्य, उत्सुकतेन, चिडत, वर्षहि, ढकललं, आपल्यावर, त्यान, वर्षावर, आदल्या, जाणार, वर्षाशी, perfect, तुझे, मंद, गीते, लिहिती, संवादी, सूर, व्हायाचे, लहरी, कैदी, कैद्यामाधला, मुक्त, मुक्तामधला, घालू, वठलेल, समीरण, चित्रित, दिसलेलं, होणार, म्हटली, धरणीही, आभाळ, भूमीला, योग्य, माझ्याहून, पीस, गरुडाची, पायी, तुझिया, लंगर, भरारी, दिव्य, सांगायचं, त्यांच्याही, मोठ्ठ्यांनी, त्याहून, पाळण, करण, वर्षाला, वाटलं, विचारात, feel, वर्षीचा, बुद्धी, भावना, पाळत, रिवाज, देण्याचा, सल्ला, दिवसांपूर्वी, करायचा, जळला, पद्धतीन, शेंडा, बुंधा, येत, उत्सुकता, खूऊऊऊऊउप, साध्या, बदलत, कुतुहलाने, पेक्षा, नेहमीसारखे, पालटतो, पान, कॅलेंडरच, दावा, किंबहुना, देण्यासाठी, पाजलावण्याचा, आशयाचा, फलक, शेजारीच, वरपर्येंत, जाण्यास, परवानगी, लाल, प्रवास, गडाच्या, गेलं, नावच, चेहऱ्यावरची, प्रश्नचीन्ह, अक्कल, सोडवणे, प्रतिक, चौकशी, अज्ञान, भागाबद्दल, किल्ल्याच्या, थांबते, कळलं, केल्यावर, स्थानकावर, कसब, वाजता, जवळपास, नाश्ता, दमदमीत, प्राप्त, जवळच्या, बांधली, विजयाचे, त्याचा, यातील, छापलेले, कागदावर, तिकीट, रुपये, office, खाती, विभागाचे, पुरातत्व, छोटेसे, भारत, उभारलेले, रुपया, जमा, देखरेखीसाठी, शाबूत, इमारत, उंच, वास्तू, भव्य, चालून, असलेली, अंशी, नसणार, बर्याच, तटबंदी, दर्शन, प्रथम, पहिला, येणारा, केलाय, गृहस्थांनी, समजल, पक्की, स्थलांतरित, राहत, मूळ, मुलगी, जगलेली, nh4, विकांताला, सारे, मुद्दा, राहिला, discussion, त्यातला, म्हणतात, मुंबई, उरलेले, नातेवाईक, बघितल्यावर, इत्यादी, उशिरा, येतात, जिल्हे, कोणते, नेमके, भागात, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, महाराष्ट्राशी, उरलेल्या, गावात, पुणे, map, लिहिलेली, नुसत, सीमेवर, कर्नाटका, कुठे, exact, राज्यात, चालेल, देतात, कर्नाटकात, संदर्भ, कर्नाटक, लिहिलेलं, शंका, हजार, म्हटल्यावर, सारख्या, जाणाऱ्या, planning, वेड्या, जाताना, तिथे, दौलताबाद, केला, नेण्याचा, तुघलकानेही, यादवांची, गाड्या, काळाची, एके, नक्की, अप्रूप, आपुलकी, किल्ल्याबद्दल, main,
Text of the page (random words):
काही करणार नाहीस मनातून थोड मान्य पण उत्तर होत तू मला आणूच नाही दिलस कधी तर कळणार तरी कस मी काही करते का नाही ते अश्या सगळ्या माहोलात बाबा मनापासून माझ्या बाजूने होते हे मला माहिती होत आणि दादा घरी नव्हता त्यामुळ आई एकटी पडलेली शिवाय आपली पोरगी बक्षीस म्हणून मागतीय तर देऊया अस वाटल बहुतेक माझ्या माउलीला आणि finally मला ते तीन गोड शब्द ऐकायला मिळाले आई म्हणाली बर बाई आण हिंदी serial ची डिरेक्टर असते तर या dilogue ला मी तीनदा repeat केल असत दुपारी बाबांनी हळूच सुचवलं आजच आणूया जमल तर विचार पटला मला आणि आम्ही दोघ बाहेर पडलोही थोडी शोध मोहीम आधीपासूनच सुरु ठेवल्यामुळ संध्याकाळी मी बाबा आणि आमच नवीन लाब्राडोर पिल्लू घरी पोचलो इतका गोंडस जीव छोटुस बाळ माझ पिल्लू घराबाहेर ठेवायचं हा नियम बरोबर नाही हे मी घरी पोचायच्या आधीच ठरवलं मग गच्चीवर ठेऊया रात्री यासाठीही माझ मन तयार होईना तिची आईपासून लांब अशी पहिलीच वेळ असणार घाबरून जाईल न ती मग तिला आईची आठवण येणार नाही अशी आमच्या घरात फक्त एकच जागा होती माझी खोली ती माझ्या बरोबर कॉटवर झोपणार नाही यावर आई आणि बाबा पण ठाम होते पण मी खाली गादी घातली आणि गादीच्या शेजारी ती झोपली तर तेव्हापासून कायमच माझ्या खोलीत माझ्या गादीशेजारी किंवा माझ्या बेडखाली तिला ध्रुव ताऱ्यासारख अढळ स्थान होत तिच्या या जागेमुळ सकाळी उठलं कि तिच्या अंदाजान फूटभर पुढ पाउल ठेवायची सवय लागलेली मलाही पुढ job साठी मुंबईला गेल्यावर गुणी नव्हती बरोबर पण सवय मात्र नव्हती गेली picture credit anu tai anujna dnyaneshwar एक दोन दिवस झाले तरी माझ तिच्या नावाबद्दल काही ठरत नव्हत finally बाबांनी नाव ठेवलं गुणी मी शाळेत असताना आमच्याकड german shepherd होती आणि तीच नाव होत गुणी म्हणून बहुतेक दुसर कुठल नाव आवडतच नव्हत आम्हाला ठरलं final गुणी गुणू खूप हुशार होती तिला दोन तीन दिवसातच नाव कळलेलं स्वतःच त्यानंतरचा आठवडा गुणी म्हटलं कि ती कशी आपल्याकड बघती याच प्रात्यक्षिक करण्यात आणि दाखवण्यात गेला आमचा गुणी खरच किती गुणी आहे हा एक stapled dilogue झाला पुढ आमच्या घरी आम्ही बहुतेक तिला shake hand वगैरे गोष्टी शिकवायला विसरलो तेव्हा गुणीच शिक्षण शुद्ध मराठी माध्यमातून झालं आम्ही सगळेच बाबा थोड जास्तीच तिच्याशी ती एक मूक पाळीव प्राणी आहे हे विसरून बोलत राहायचो बाबांच्या चष्मा कुठ सापडेना गुणे बघितलायस का इथून पासून माझ्या गुणू power electronics सुटेल ना ग पर्येंत सगळ्या प्रश्नांना गुणी सामर्थ्यान सामोरी गेली या सगळ्या गप्पांमुळ असेल पण गुणा खूप गोष्टी शिकली भाषा समृद्ध होती तिची command कमी शिकली आम्ही कमी शिकवल्या पण आख्खी वाक्य समजायची तिला मस्त दात शिवशिवतात त्या phase मध्ये गुणी फक्त कार्यानुभवाचा तास चालू ठेवायची घरी कागदाचे किती छोटे छोटे तुकडे केले जाऊ शकतात कचरा वेळेत घराबाहेर नेला नाही तर घरभर कसा पसरला जाऊ शकतो बूट किती चावला कि त्यातून आरपार दिसायला लागत हे सगळ करून बघितलं तिन आम्ही कुणी चिडून कुणी केल हे सगळ म्हटलं कि मात्र चेहरा पाडून maximum बिच्चारे expressions देत खाली बघत बसायची विषय बदलेपार्येंत वरसुद्धा नाही बघणार मग तेव्हा थोडी मोठ्ठी झाल्यावर ती गाडीवर बसायला शिकली आणि प्रचंड आवडायचं तिला गाडीवरून फेरी मारायला हुशार तर एवढी कि कधी घेऊन जाऊ शकतात आणि कधी नाही हे पण पक्क माहिती होत तिला आईच्या आणि माझ्या कॉलेजला जायच्या वेळेत अजिबात हट्ट नाही करणार पण अश्या ठराविक वेळा सोडल्या तर घरातलं कुणीही बाहेर निघाल आणि हातात गाडीची किल्ली दिसली कि तीच त्या माणसावरच प्रेम उतू जायचं घेऊन नाही गेल तर परत येईपर्यंत आपल्यालाच guilty वाटत राहील पण बसायची मस्त गाडीवर पायातल्या जागेत अलगद पण निवांत बसून फक्त तोंड बाहेर काढून heroine सगळीकड निरखत बसायची कधी कधी तर वाटायचं आपण driver आहोत हिचे truck किंवा मोठ्ठी गाडी आली शेजारून कि मात्र लगेच मन लगेच आत घ्यायची घाबरट कधी कधी मग पळायचा मूड यायचा तिला जास्ती स्पीडमध्ये कधीच नाही उडी मारायची खाली speed breaker ला गाडी हळू झाली कि टुन्नकन उडी मारेल आणि मग पळत येईल बरोबर पाहुणे आले कुणी आणि जर घाबरत असतील कुत्र्याला तर मग तिला गच्चीवर पाठवाव लागायचा आधी माझ्या खोलीत जाण्याचा option ट्राय करायची नाहीच म्हटलं तर मग जायची वर finally पण मग अश्या वेळी बाहेरचं माणूस जाण्याकड खूप लक्ष असायचं तिच ते गेले कि हिच मागच्या दाराला दंगा सुरूच आत घ्या मला गेले ते लहान मुलांबद्दल मात्र थोड उलट ती कधीच कुणा लहान मुलावर गुरगुरली नाही परिणामी सगळ्या टिल्यांना पण चांगल खेळण वाटायची ती मग तिची शेपूट ओढ तिचा घोडा बनव असल सगळ सुरु व्हायला वेळ लागायचा नाही तीच ती पण ओळखून होती बहुतेक कुणीही लहान मुल घरी आल कि गुणी आपोआप मागच्या दाराजवळ जाऊन उभी रहायची दार उघडल कि धुम्म पळून जायची गच्चीवर सगळ्यांच्या गप्पा ऐकण्यात प्रचंड इंटरेस्ट होता तिला प्रत्येक खोलीत आपली आपली जागा बनवून ठेवलेली तिन बाबा कधीही म्हणाले गुणे जागेवर जा तुझ्या कि हि त्याच खोलीतल्या तिच्या स्वघोषित जागेवर जायची त्यापुढ जर म्हणाल इथ नाही तुझ्या खऱ्या जागेला तरच मग दाराजवळ जाऊन बसेल लहानपणीचे दिवस सोडले तर खूप कमी संहारक कृत्य केली गुणून गाडीवर किंवा hall मधल्या गालिच्यावर पाय द्यायचा नाही हे पण madam ओळखून होत्या गालिच्याची जागा बदलली आणि तिला यायला जागा राहिली नाही कि घुटमळत रहायची थोडी जागा करून दिली कि त्यातून वाट काढून येणार एकदम नजकातसे बाबा तिच्या ट्रेनिंग बद्दल आणि तिच्या गुणीपणावर खूप खुश असायचे कायमच अपवाद एकच तिचे ते दिवस मग तेव्हा आमची heroine चोरून पळून जायची तिच्या प्रियकरांबरोबर मग बाबांची फुल चिडचिड तिच्यावर आणि आमच्यावर पण परत यायच्या बाईसाहेब तेव्हा बाबा तिची शाळा घ्यायचे अस जातात का पळून लाज आहे का जीवाला तुझ्या मी देतो कि तूला बघून चांगला वगैरे सुरु व्हायच बाबांचं गैरसमज नकोत म्हणून एक दोनदा मी बाहेर जाऊन बसलेलं आठवत मला बाकी दादा आणि आईचा कुत्र घरी आणायला मुळचा विरोध असला तरी गुणीची जास्ती काळजी त्यांनीच घेतली तिच्या पाण्याच्या कुंड्यात कायम पाणी पाहिजे असा दादाचा सक्त आदेश होता तिला फिरवायला घेऊन जाण्यातहि दादाच जास्ती वक्तशीर होता आमच्या एका स्वयंपाकाच्या काकूंच्या पोळ्यांवर गुणीन जाहीर बहिष्कार टाकलेला वास्तविक चांगल्या पोळ्या करायच्या त्या पण गुणीला नाहीच आवडल्या त्या त्यांच्या पोळीत थोडा जरी काळा तुकडा दिसला तर बाहेर काढून ठेवायची गुणी तिच्या कुंड्यातून त्यांनी वैतागून काम सोडण पुरेस त्रासदायक झाल होत माझ्या आईसाठी कुणी काही खात असेल तर त्याच्या घासाकड बघायचं नाही हे एक बाबांनी तिला दिलेलं खास training चुकून बघत बसलीच तर बाबा फक्त म्हणणार कुठ बघायचं madam लगेच खाली मान घालतील किंवा दुसरीकडेच कुठतरी बघतील म्हातारी झाली तशी तब्ब्येतीला जपून राहायला लागली गुणा थंडीच्या दिवसात अंथरूण घालून दे वाले expressions द्यायची आणि अंगावर घातलेली तिची छोटू गोधडी सकाळी उठेपर्येंत नीट जपायची प्रत्येक किस्सा सांगण्याजोगा आहे तिचा किती सांगू पुढ जेव्हा खूप आजारी पडली आणि डॉक्टरनी सांगितलं नाही काही इलाज आता याला तेव्हाही मी भारतात जाईपर्येंत तग धरलेला तिन गुणी नाहीये आता आपल्यात गच्चीच्या छोट्याश्या खिडकीतून आमची वाट बघत बसणारी गुणी आमच्यातल कुणी घरी येताना दिसलं कि फुल स्पीडनी गच्चीवरून खाली पळत नाही येणार आता आल कि उडी मारणार नाही अंगावर किती miss करीन मी तिला यापुढ कायमच मागच्या वर्षी २४ डिसेंबरला गुणू गेली आम्हाला सोडून तेव्हापासून ठरवत होते तिच्याबद्दल लिहायचं हा त्यातलाच एक प्रयत्न posted by apurva at sunday february 14 2016 16 comments labels गुणी नात पाळीव tuesday april 30 2013 मी मुक्तामधला मुक्त तू कैद्यामाधला कैदी माझे नि तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी माझ्यावर लिहिती गीते त्या मंद समीरण लहरी माझ्यावर चित्रित होते गरुडाची दिव्य भरारी जड लंगर तुझिया पायी तू पीस कसे होणार माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार आभाळ म्हणाले नाही धरणीही नाही म्हटली मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही पापण्यात जळली लंका लाह्यांपरी आसू आले उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्दा झाले दगडाची पार्थिव भिंत मग पुढे अचानक सरली मी कागद झाले आहे चाल लिही असे ती वदली शाळेत असताना वाचलेली कुणाची आहे आठवत नाहीये posted by apurva at tuesday april 30 2013 1 comments labels कविता काहीही मराठी स्वा सावरकर wednesday january 23 2013 जिवंत सगळ्यांनी सांगितलं नको पाणी घालू आता ते झाड आहे वठलेल खर सांगायचं तर हे मला त्यांच्याही आधी दिसलेलं पण शेंडा जळला असला तरी बुंधा तग धरून आहे मला मनापासून वाटत झाड अजून जिवंत आहे posted by apurva at wednesday january 23 2013 0 comments friday december 30 2011 नवं वर्ष एक वर्ष संपत आणि नवीन वर्ष सुरु होत कधी धुमधडाक्यात कधी साध्या पद्धतीन पण नवीन वर्ष नेहमी च खूऊऊऊऊउप उत्सुकता घेऊन येत खर तर काय बदलत कॅलेंडरच पान पालटतो आपण नेहमीसारखे पण नेहमी पेक्षा खूप जास्ती कुतुहलाने दोन चार दिवसांपूर्वी विचार करत होते या वर्षीचा संकल्प काय करायचा संकल्प करण अवघड आणि पाळण त्याहून अवघड याच विचारात होते आणि वाटलं नव्या वर्षाला काय वाटत असेल येताना चुकून काही भावना किंवा बुद्धी असेल च त्याला तर नवीन वर्ष काय feel करत असेल १ january ला खूष होत असेल की घाबरत असेल जाणार वर्ष काही हितगुज करत असेल का नव्या वर्षाशी मोठ्ठ्यांनी सल्ला देण्याचा रिवाज वर्ष पण पाळत असतील का खूष होत असेल न येणार वर्ष आपल आगमन धुमधडाक्यात साजर होतंय हे बघून गर्व वाटत असेल त्याला ही थोडासा नक्कीच वाटत असणार ठरवत असेल का एखाद वर्ष आपण एखाद्या माणसाला काय देऊन जायचं किंवा काय घेऊन जायचं त्याच्याकडून नशीब म्हणून जी काही चीज मानतो आपण त्याची बारा महिन्यांच्या मुदतीची कंत्राट निघत असतील न आणि कंत्राटदार दर वेळी नवा नवं वर्ष घाबरत ही असेल एखाद वर्ष भीती वाटत असेल त्याला त्याच्या स्वतःच्याच नशिबाची आपण lucky नाही ठरलो तर एखादा माणूस नेहमीच आपल्याला फालतू वर्ष म्हणून लक्षात ठेवेल या भितीन झोप लागत नसेल वर्षांनाही एखाद वर्ष अविस्मरणीय ठरत असेल खूप सुखाचे चार क्षण देऊन खूष करून टाकत असेल एखाद वर्ष माणसांना वर्षहि उत्सुकतेन वर्तमानपत्रात भविष्य बघत असतील आपल्याला काय काय करायचं याच time table ठरवत असतील त्यानुसार एखाद वर्ष चिडत असेल आदल्या वर्षावर त्यान स्वतःच एखाद काम आपल्यावर ढकललं म्हणून किंवा एखाद वर्ष खूष होत असेल मागच्या वर्षीच्या प्रयत्नांच फळ आपल्या काळात मिळाल म्हणून जाऊ दे सध्यातरी ३१ च celebration काय करायचं हे ठरवते संकल्पाच नाहीच ठरत आहे अजून posted by apurva at friday december 30 2011 3 comments labels काहीही मराठी वर्ष संकल्प friday july 1 2011 किल्ले देवगिरी आत्ता पर्यंतची माझी हि सगळ्यात मोठ्ठी सुट्टी आहे आणि महिनाभर निवांत घरी काढल्यानंतर गेल्या आठवड्यात पूर्ण फिरतीवर होते मी तशी मी पक्की nh4 वर जगलेली मुलगी आहे मूळ गाव आजोळ राहत गाव स्थलांतरित आजोळ उरलेले सारे नातेवाईक सगळे सगळे nh 4 वर च्या गावात फार फार तर १० २० km आजूबाजूला त्यामुळ उरलेल्या महाराष्ट्राशी फारशी ओळख नाहीये माझी मला खानदेश विदर्भ मराठवाडा इत्यादी भागात नेमके कोणते जिल्हे येतात हे खूप उशिरा समजल किंबहुना अजून हि perfect माहिती आहे असा दावा नाही करू शकत मी तर मुद्दा असा की गेल्या विकांताला मी औरंगाबाद ला गेले होते तिथे जाताना planning होते की दोन दिवसात अजिंठा वेरूळ बघून घेऊ साधारण map बघितल्यावर मात्र जाणवलं की अजिंठा आणि वेरूळ यात बर च अंतर आहे पुणे मुंबई म्हणतात त्यातला च प्रकार मग ठरवलं की फक्त वेरूळ बघू आणि final discussion नंतर ठरलं कि आधी देवगिरी चा किल्ला बघू मग वेळ राहिला तर वेरूळ औरंगाबाद पासून फक्त १० km वर देवगिरी आहे दौलताबाद या किल्ल्याबद्दल फारशी आपुलकी नव्हती पण अप्रूप नक्की च होत एके काळाची यादवांची राजधानी आणि वेड्या तुघलकानेही त्याची राजधानी देवगिरी ला नेण्याचा प्रयत्न केला होता हे आठवत होत मला आम्ही दमदमीत नाश्ता करून जवळपास १० वाजता औरंगाबाद बस स्थानकावर पोहोचलो जरा चौकशी केल्यावर कळलं कि कन्नड बस थांबते देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मी माझ या भागाबद्दल च अज्ञान आधी च मान्य केलाय त्याचा च किस्सा त्या गृहस्थांनी इथ कन्नड लिहिलेली बस येईल म्हटल्यावर माझ्या मनात हजार शंका मुळात आपल्याला कन्नड लिहिलेलं कळणार कस हे लोक कर्नाटक चा संदर्भ असा कन्नड म्हणून का देतात आणि तसं ही अस नुसत कन्नड म्हणून कस चालेल त्या राज्यात म्हणजे exact कुठे शिवाय औरंगाबाद कुठ कर्नाटका सीमेवर आहे कि इथून सारख्या कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या असाव्यात माझ्या चेहऱ्यावरची प्रश्नचीन्ह बघून मी काही अक्कल पाजलावण्याचा आत माझे प्रश्न सोडवणे हे कसब माझ्या जवळच्या माणसांना प्राप्त आहे मला हळूच सांगितलं गेलं कन्नड नावच गाव आहे इथ जवळ च लाल गाडी चा प्रवास करून गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आम्ही किल्ल्याच प्रथम दर्शन च देखण आहे मोठ्ठी तटबंदी खूप खूप खूप च मोठ्ठी आणि अजून ही बर्याच अंशी शाबूत असलेली पुढ बर च अंतर चालून गेल्यावर चांद मिनार ची भव्य वास्तू हि उंच इमारत देखरेखीसाठी आणि मुख्य म्हणजे विजयाचे प्रतिक म्हणून बांधली गेली अशा आशयाचा फलक शेजारीच यात वरपर्येंत जाण्यास मात्र परवानगी नाही थोड अजून चालाल कि दिसत मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशिका देण्यासाठी उभारलेले भारत सरकार चे छोटेसे पुरातत्व विभागाचे office फी फक्त ५ रुपये आणि तिकीट एकदम भारी कागदावर छापलेले परिणामी यातील एक हि रुपया सरकार खाती जमा होत नसणार हा मनात येणारा पहिला विचार आत गेल्यागेल्याच किल्ला आपल्याला त्याच्या कर्तबगारीच्या दिवसात घेऊन जातो समोर दिसतात खूप तोफा लहान मोठ्या आकाराच्या आणि जवळ लांब पल्ल्याच्या नेहमी प्रमाणे आजूबाजूला त्या तोफेला ढकलतानाची acting करत किंवा तोफेवर बसून शाही pose देऊन किंवा तोफेतून आलेला गोळा आपल्या अंगावर येतोय अशा आविर्भावान फोटो काढणारे भरपूर पर्यटक होते च तोफखान्यातून पुढ अजून थोड चढून गेल कि एका बुरुजावर आहे मेंढा तोफ या किल्ल्याच मुख्य आकर्षण तुमच्या कॅमेऱ्याच्या frame मध्ये बसणार नाही इतकी मोठ्ठी अत्यंत देखणी आणि इतक्या वर्षांचा उन पाऊस सोसूनही रुबाबदार आणि तुकतुकीत राहिलेली बलदंड तोफ ज्या त्या काळात राजाच विशेष प्रेम असणार या तोफेवर याच बुरुजावरून चांद मिनार पुन्हा दिसतो आणि साधारण त्याच्या टोकाला आपण बोट लावलंय अशा type चा फोटो काढायचा असेल तर हि त्यासाठी ची बेस्ट जागा किल्ला बांधताना किती दमले असतील लोक अजून निम्म वर्णन ही नाही झालेलं पण stamina संपला माझा लिहायचा बाकी पुन्हा कधीतरी posted by apurva at friday july 01 2011 5 comments labels किल्ला thursday june 9 2011 विश्वास काही अनुभव खुपदा आपल्याही नकळत आपल्यासाठी अविस्मरणीय ठरतात त्यात विशेष अस काहीही नसताना सुद्धा तशी हि २ वर्षापूर्वीची गोष्ट आहे college च 2nd year संपत आल होत आणि माझी termwork assignments मुळ खूप गडबड चालू होती माझी चुलत बहिण नुकतीच तिच्या लग्नानंतर पहिल्यांदा च घरी आली होती आमच घर अगदी एकत्र कुटुंब नाहीये पण आमच खूपस बालपण एकत्र गेलंय आणि मी तिची एकुलती एक लहान बहिण असल्यान ती हि माझी खूप वाट बघत असणार हे माहिती होत मला मी काकांकडे गेले आणि आमची गप्पाष्टक सुरु झाली थोड्या च वेळात माझ्या लक्षात आल कि आमच्या गप्पांमध्ये दर २ वाक्यानंतर सचिन च नाव निघतंय माझे जीजू अर्थात सरळ होत ते पहिल्यांदा माहेरी आलेल्या मुलीशी आपण तिच्या नवऱ्याबद्दल च बोलतो mostly पण नंतर हे हि लक्षात आल कि बाईसाहेब दुसर काही बोलत च नाहीयेत त्यांच्याशिवाय त्यांना काय आवडत काय नाही आवडत अस झाल तेव्हा ते काय म्हणाले तिथ गेलो तेव्हा सगळ्यांनी त्याचं कस कौतुक केल प्रत्येक गोष्ट करताना जीजूंना आवडेल का हा च विचार बाप रे आता सांगताना गम्मत वाटतीय पण तेव्हा मला सचिन पुरण जरा अति च झालेलं घरी आल्यावर मी विचार करत होते खूप वेळ अशी कशी बदलली माझी ताई तीच arrange marriage आहे म्हणजे hardly १० दिवसांचा सहवास आणि त्यात इतकी ताकद आपल्या आयुष्यातलं आपल्याहून महत्वाच स्थान दुसर्याला कुणी कस देऊ शकत आणि ते हि इतक्याश्या ओळखीत दिवस संपला पण तो विचार काही पूर्ण गेला नव्हता मनातून पण दुसरा दिवस उगवला तो submission च लाटण घेवून च engineering मध्ये हा एक जीवघेणा प्रकार असतो याबद्दल निवांत कधीतरी बोलता येईल सध्या विषयांतर नको final submission झाल आणि मी घरी येण्यासाठी निघाले हवा गेलेल्या फुग्यासारख माझ्या जीवात हि काही त्राण उरल नव्हत विचार करणं लांब च पण सचिन पुराणाचा पुरता विसर पडला होता मला तेवढ्यात समोर एक देखण जोडप दिसलं सत्तरी ओलांडलेल आज्जी भलत्या हौशी असाव्यात संध्याकाळ च्या वेळी अगदी गजरा घालून फिरायला बाहेर पडण्याहून जास्ती काय certificate असत हौशी स्वभावाच आणि आजोबा हि कोल्हापुरी थाटात रुबाबदार दिसत होते तरुणपणात अगदी दृष्ट लागण्यासारख जोडप असणार हे अजून थोडी पुढ आले आणि मला जाणवलं कि दिसण्यात फारस नाही पण चालण्यात वय दिसतंय यांच थरथरत एकमेकांचा हात धरून चालत होते दोघ हि नेमक कोण कुणाचा आधार आहे हे कळण्यासाठी जरा निरखून बघितलं मी आणि पुढच्या क्षणी मला जाणवलं कि या दोघांना हि चालण्यासाठी आधाराची गरज आहे बस्स मला उत्तर मिळाल विश्वास एकमेकांवरचा विश्वास आहे जो त्यांना तसं खर तर अशक्य अशा गोष्टीत साथ देतोय सहज शक्य बनवतोय आणि काल माझ्या ताई च्या डोळ्यातले भाव काय होते ते कळल मला आज्जी आजोबांना त्यांच्या ४० ५० वर्षांच्या सहजीवनान जो विश्वास मिळालेला एकमेकांबद्दल त्या विश्वासाचं तशा नात्याचं स्वप्न काल ताई च्या नजरेत होत बहुतेक एक पक्क आणि जीवाभावाच नात बनवण्याचे सुरुवातीचे प्रयत्न होते ते तिचे posted by apurva at thursday june 09 2011 1 comments labels नात मराठी विश्वास monday june 6 2011 ओळख hi लिखाण हि अगदी ...
|