Meta tags:
Headings (most frequently used words):
my, 2011, sunday, करून, wednesday, september, शिक्षण, क्लिक, july, gvkale, शासकीय, sms, 2012, now, visiters, online, on, lokmat, pageviews, total, photot, website, तक, अब, ख़बरें, आजतक, list, blog, this, gajanan, followers, योजना, जीवनाचा, यशस्वी, सेवेने, जुडला, विभाग, तालुक्याचा, मंठा, मिशन, translate, विकास, मानव, सुधारित, पर्व, नवे, विकासाचे, क्रांती, loksatta, join, मराठवाडा, सहज, 27, june, friday, शकता, मिळवू, माहिती, january, ती, हवी, आपण, जिथे, वेब, महत्वाच्या, kale, 24, 23, बातम्या, वर्तमान, ताज्या, chanal, vitthalrao, वाचा, थेट, येथे, पत्रे, दैनिक, प्रमुख, आणि, स्थळे, संकेत, इतर, माझी, माझ्याबद्दल, 2010, मूलमंत्र,
Text of the page (most frequently used words):
आहे (65), #शिक्षण (27), आणि (23), #share (18), #सर्व (17), #गजानन (14), #आहेत (14), काळे (14), #माहिती (14), #सेवा (13), #शासकीय (11), #विठ्ठलराव (10), नाही (10), विकास (10), #मंठा (9), प्रत्येक (9), येथे (9), शिक्षणाचे (9), करणे (8), sms (8), तसेच (8), होत (8), महाराष्ट्र (8), उपलब्ध (8), this (7), loading (7), twitter (7), महत्त्व (7), facebook (7), विविध (7), शिक्षक (7), करण्यात (7), जिल्हा (7), जालना (7), प्रमाणपत्र (7), शासन (7), करतो (7), शिक्षणाची (6), केलेले (6), पोस्ट (6), 2011 (6), द्वारा (6), email (6), pinterest (6), निर्णय (6), माध्यमातून (6), blogthis (6), आवश्यक (5), तालुका (5), साधन (5), आपले (5), होणार (5), करून (5), तीन (5), त्या (5), च्या (5), असे (5), करण्यासाठी (5), वेब (5), अधिकारी (5), विद्यार्थी (5), योजना (5), तक्रार (5), प्राथमिक (5), राज्य (5), जीवनाचा (4), म्हणजे (4), काही (4), क्लिक (4), संधी (4), तयार (4), थेट (4), संकेत (4), त्यामुळे (4), करुन (4), आपण (4), आर्थिक (4), अशा (4), समान (4), सर्वांना (4), वर्षे (4), विभाग (4), जास्त (4), परिषद (4), उपयोग (4), उच्च (4), केंद्र (4), एका (4), gvkale (4), शालेय (4), राबविण्यात (4), पालक (4), येत (4), नागरिक (4), पंचायत (4), बदल (4), शासनाच्या (4), यांना (4), त्याचा (4), येईल (4), शाळा (4), शाळेत (3), अंक (3), दाखल (3), हवी (3), याचा (3), सरकार (3), अवलंबून (3), सुरू (3), हक्क (3), com (3), महा (3), देण्यासाठी (3), नागरिकांना (3), भूमिका (3), काम (3), केवळ (3), राठोड (3), वापर (3), मूलमंत्र (3), gajanan (3), शिक्षणाच्या (3), कायदा (3), टक्के (3), आलेली (3), kale (3), देशाला (3), कार्यक्रम (3), शिक्षणाचा (3), दृष्टीने (3), अनेक (3), लक्षात (3), देण्यात (3), प्रयत्न (3), विभागात (3), अनन्यसाधारण (3), दिले (3), वर्ग (3), कार्यालये (3), निर्माण (3), यशस्वी (3), दैनिक (3), संगणक (3), स्थळ (3), sunday (3), blog (3), संपूर्ण (3), मिशन (3), वित्त (3), राज्यातील (3), स्वागत (3), निधी (3), संबंधित (3), साईट (3), कारण (3), कधी (3), तालुक्यात (3), अशी (3), हवे (3), जिल्हाधिकारी (3), कर्तव्य (3), आरोग्य (3), मराठी (3), विकासाचे (3), आले (3), नवे (3), त्याच्या (3), 2012 (3), and (3), आता (3), भविष्यात (3), संगणकीय (3), join (3), माध्यमिक (3), मुलाला (3), त्यासाठी (3), यांनी (3), अधिकार (3), म्हणून (2), महत्त्वाचे (2), आलेल्या (2), यामुळे (2), कमी (2), करता (2), खूप (2), त्यांच्या (2), त्यात (2), प्राधान्य (2), अर्थात (2), घोषणा (2), तरीही (2), प्रत्यक्ष (2), मिळण्यासाठी (2), असा (2), अवलंब (2), वयोगटातील (2), नवीन (2), त्याची (2), तरतूद (2), क्षमता (2), सर्वसामान्य (2), खरी (2), व्यक्तिमत्त्वाचा (2), कायद्याने (2), सक्तीचे (2), गेल्या (2), यांची (2), मार्गदर्शक (2), विशेष (2), चौदा (2), त्याला (2), समस्या (2), करण्याबाबत (2), अंमलात (2), अनिवार्य (2), प्रथम (2), प्रशासन (2), ग्रामपंचायती (2), हायटेक (2), समित्या (2), परिणामी (2), पर्व (2), क्रांती (2), द्वारे (2), july (2), मानव (2), तालुक्यांना (2), समितीत (2), पातळीवरील (2), अध्यक्ष (2), सचिव (2), राहणार (2), बालकल्याण (2), नागरीकांना (2), जनतेस (2), घेवून (2), forms (2), क्लिकवर (2), महत्वाच्या (2), कागदपत्रे (2), उपयोगी (2), पेन्शन (2), मुंबई (2), न्यायालय (2), year (2), assessment (2), for (2), return (2), कंम्प्लेंट (2), new (2), wednesday (2), गव्हर्नन्स (2), पारदर्शकरित्या (2), दैनंदिन (2), उतारा (2), माध्यमातुन (2), इंटरनेटच्या (2), म्हणजेच (2), प्रकल्प (2), सेवे (2), कोटी (2), खरे (2), मिळणाऱ्या (2), असते (2), चांगले (2), एखाद्या (2), माणसाच्या (2), दिली (2), लागते (2), विद्यार्थ्यांना (2), सर्वांगीण (2), आपल्या (2), मोठा (2), जातात (2), विषयक (2), सामाजिक (2), मानवी (2), वाढवून (2), असणारे (2), मुलींपैकी (2), प्रमाण (2), शिक्षणावरच (2), करा (2), जिथे (2), माहितीचा (2), कंपनी (2), तालुक्याच्या (2), आदेश (2), प्रशिक्षण (2), संचालनालय (2), सेवेने (2), अंतर्गत (2), जात (2), जोडले (2), गतीने (2), september (2), विस्तार (2), प्रतिनिधी (2), चव्हाण (2), मुख्याध्यापक (2), विजय (2), केंद्रप्रमुख (2), केले (2), पवार (2), अभ्यासक्रम (2), संजय (2), आपल्याला (2), vitthalrao (2), कौशल्ये (2), दिव्य (2), करण्यास (2), लोकाभिमुख (2), छोट्याश्या (2), www (2), 295वा (2), मदत (2), नमस्कार (2), तिसरे (2), माहितीचे (2), ध्येय (2), जास्तीत (2), वेळेत (2), वात्रटिका (2), मिळणे (2), massge (2), यासाठी (2), समाज (2), तरी (2), हवा (2), होईल (2), प्रमुख (2), वर्ष (2), घेऊन (2), view (2), मुख्य (2), नियोजन (2), उद्देशाने (2), एकत्रित (2), ठिकाणी (2), घटक (2), एकाच (2), mantha (2), लोकमत (2), कार्यरत (2), गतीमानता (2), लेखा (2), please (2), chanal (2), website (2), राज्याच्या (2), इतर (2), 98070807070, केली, होईलया, येतील, पृथ्वीराज, gajanankale, http, मुख्यमंत्री, दरडोई, मिशनच्या, उत्पन्नवाढीच्या, orkut, अंमलबजावणीसाठी, आंबड, बारावीच्या, दहावी, येणार, प्रकारात, वाढीच्या, उत्पन्न, वतीने, समितीच्या, समावेश, तालुक्यांचा, जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी, created, बदनापूर, परतूर, जिल्ह्यातील, web, sons, समितीचे, पाच, other, गटविकास, bigadda, blogs, wordpress, कोटींचा, गोष्टी, वर्षाकाठी, कार्यकारी, सेवेअंतर्गत, सहाय्यक, useful, 351, पदे, most, लोकनीती, माजी, संपादक, गटसाधन, एकूणच, receve, बातम्या, ठरणार, सरकारच्या, व्या, आयोगातून, दुसऱ्या, हप्त्यापोटी, निधीतून, ग्रामपंचायतींसह, खरेदी, अतिमागास, send, सव्वाशे, निवडक, type, टप्प्यात, पहिल्या, box, व्याप्ती, परीक्षेतील, मिळाले, प्रयत्नांना, सालापासून, 2006, आणण्यासाठी, बरोबर, इतरांच्या, तालुक्यांच्या, प्रगतशील, मागास, mobile, सुधारित, your, कार्यक्रमाची, बारावीपर्र्यंत, नापास, कर्मचार्यांना, विनामूल्य, पाठवले, वाचा, पत्रे, कार्यालयातून, ६००, कर्मचर्यांना, मिनिटात, पोहचत, सेवेचा, फायदा, विभागाला, वर्तमान, प्रसिद्ध, गूगल, साह्याने, खाते, पुरवली, साठी, प्रशिक्षणा, दरम्यान, सर्वाना, स्थळे, विषयी, रोज, संधर्भात, मेसज, सहायक, मार्गदर्शन, गटसमन्वयक, निर्मिती, काल, कामे, इंटरनेट, सगळे, महाजालाने, पदावर, याच, महाजालाच्या, विभागा, complete, कनिष्ट, तालुक्यातील, सध्या, 184, ५५०, घडामोडी, बैठका, माझ्या, पगार, profile, स्तरावरील, वरिष्ट, अधिकाऱ्यांचे, देवून, पाठवून, विद्यार्थ्यांसाठी, साहित्याची, बेकार, औषधोपचार, बालकांसाठी, सकाळ, तपासणी, महिलांची, गर्भवती, डॉक्टरांमार्फत, तज्ज्ञ, विज्ञानकंेद, बालभवन, प्रयोगशाळांसाठी, स्वयंरोजगारासाठी, सुविधा, वाहतूक, गावांची, ग्रामीण, पुस्तकखरेदी, फनिर्चर, लाईट, सोलर, अभ्यासिकेसाठी, शाळांत, गावातील, मोठ्या, शिकवणी, युवकांना, व्यवसाय, सदस्य, सदरील, बनवून, घेण्यात, भ्रमणध्वनी, क्रमांक, माझी, उपलोड, तालुक्याचा, जुडला, january, times, लेख, कौशल्याचे, blogspot, अंतर्भाव, मिशनमध्ये, कार्यक्रमांचा, लोकसत्ता, प्रयोगशाळा, परीक्षण, माती, फिरती, गार्डन, किचन, परसबाग, बचतगटाच्या, ज्या, ताज्या, संगणकावर, साधुन, तंत्रज्ञानाच्या, माफक, दरात, प्रभावीपणे, जलदगतीने, माणसाला, धोरणास, मंजुरी, ख़बरें, आजतक, june, कामात, friday, lokmat, photot, pageviews, total, now, visiters, शोधण्यासाठी, विस्तारीत, शोधा, online, समन्वय, आणून, translate, केंद्रीत, hours, कामकाजाबरोबरचं, आपात्कालीन, परिस्थितीतही, सेतू, केंद्रांमार्फत, विभागाच्या, एकत्रितरित्या, पुरवण्यास, शासनाने, मदतीने, नाममात्र, किमतीत, वितरणाच्या, कार्यप्रणाली, सोयीचे, सरस, आणणे, मिळविणे, उद्देश्य, दारापर्यंत, खिडकी, पध्दतीद्वारे, जलद, खर्चात, कटीबध्द, followers, सहजसाध्य, सातबारा, चौकशीसंदर्भातील, सर्वकष, अद्ययावत, शंका, निरसन, संगम, साधणारे, दालन, copy, स्थानिक, लेखापरीक्षा, कोषागारे, शेती, शेखर, मिळतील, गायकवाड, महिती, अधीनियम, २००५, प्रकरण, अर्थ, सहज, मिळवू, शकता, छोटासा, लेखक, ब्लॉगिंग, विश्वात, विभागीय, पाहण्यास, nagpur, करीत, महान्यूज, मंत्रिमंडळ, रोजगाराची, खात्री, नोकरीची, भारताचे, कायदे, नियम, शासनाची, blogger, powered, वृत्त, महाऑनलाईन, भारतातील, आपणास, कोणत्याही, जिल्हाच्या, भेट, द्या, theme, नंतर, निवडा, inc, जिल्ह्यात, भारत, awesome, right, झाले, दळणवळण, व्हावी, 15u8gszlxl_6prbbezpfwwfvohbkki52w, वात्रटिका28मार्च2024, घरपोच, प्रदान, मार्गांचा, याद्वारे, मोबाईलवर, आधारित, देवाणघेवाण, पद्धतीने, सार्वजनिक, इलेक्ट्रॉनिक, प्रदानता, अधिनियम, आणण्यात, जाईल, file, ऑनलाईन, पोर्टल, google, इलेक्ट्रॉनिक्स, पध्दतीने, देण्याबाबत, कार्यवाही, drive, कोणतीही, https, लिंक, सूर्यकांत, केला, जावे, loksatta, लिकवर, ग्रामपंचायत, जगभर, झळकली, जावी, खरेदीसाठी, वापरण्याचे, भोसले, येत्या, दिवसांत, ग्रामपंचयातींसह, मराठवाडा, list, संरचनेचा, इंटरनेटद्वारे, एकमेकांशी, जोडल्या, जाणार, सूर्यकांती, धोरणामध्ये, यांच्या, डोळसे, भाषा, राहील, प्रशासनाच्या, प्रकल्पासाठी, अत्याधुनिक, कार्यालयांमध्ये, अनेकदा, परिस्थितीत, मुख्यालयाशी, शेतमजुर, नॉन, क्रीमीनल, जातीचे, राष्ट्रीयत्व, इत्यादी, स्टेट, वाईड, एरिया, नेटवर्क, योजनेअंतर्गत, ago, मंत्रालयाशी, जोडण्यात, रहिवाशी, तालुकास्तरापासून, ग्रामपतळी, पर्यंतची, जोडणी, बिनतारी, दळणवळणाद्वारे, करावयाची, स्वॅनमुळे, व्हिडीओ, कॉन्फरन्सींग, मेल, सुविधेचा, आपत्कालीन, भुमिहीन, ज्येष्ठ, शक्य, येवु, नसते, टाळाटाळ, करतात, महत्वाचे, गुन्हे, अपघात, पोहचु, शकत, डाऊनलोड, प्रस्तावित, आला, पाने, शकेल, दाखला, कार्यान्वित, करण्याच्या, केंद्राच्या, निम, खाजगी, 28मार्च2024, निवासी, उत्पन्नाचा, यांचे, धोरणानुसार, शिवाजी, झाल्यास, पाहात, असलेले, अधिकाराचे, विधेयक, सहा, हात, हातात, एकमेकांच्या, दोघांनीही, पाठवणे, पालकांचे, कसूर, साध्य, शिक्कामोर्तबाची, शिक्षा, होण्याचे, प्रावधान, शाळांवरही, प्रकारचे, निर्बंध, घालण्याची, विधेयकात, संविधानात, हेच, तत्त्वांच्या, स्वरूपात, राज्यसंस्थेचे, वाट, संसदेच्या, विकसित, कृती, आयामांसह, होणे, सर्वांपर्यंत, संस्थाचालक, प्रशासक, घटकांत, जागृती, जिज्ञासा, करणारे, करतानाच, गुणवत्तापूर्ण, करण्यावरही, देत, दहा, शिक्षणक्षेत्र, साताठ, महिन्यांपासून, कारणाने, जीवनोपयोगी, चर्चेत, गरजेचे, राष्ट्रीय, जीवनात, असणे, उचितच, गेली, होती, स्वातंत्र्यानंतर, मूल्ये, चौपन्न, तोंडही, पाहिलेले, शाळेची, भरल्यामुळे, सोडणाऱ्यांची, संख्याही, सुमारे, आठव्या, इयत्तेपर्यंत, गळतीचे, jalna, dist, मुलांनी, दलित, मार्गदर्शनासाठी, दहावीआधीच, ऐंशी, सोडतात, आदिवासी, गटातील, अर्ध्यावर, सोडणाऱ्यांचे, नव्वद, पार्श्वभूमीवर, मिळूनही, लाभ, शाळेचे, maharashtra, अर्धशतक, atom, उलटूनही, शिक्षणापासून, वंचित, असलेल्या, मुलांची, संख्या, मोठी, म्हणूनच, नागरिकाचा, निःशुल्क, वयापर्यंत, भारतीयाला, home, ठरले, india, निरक्षरतेची, posts, चुटकीसरशी, सुटेल, subscribe, अपेक्षा, माझ्याबद्दल, स्वयंसेवी, संस्थेच्या, वर्षाच्या, अभ्यासानुसार, भारतात, किमान, शारीरिक, जीवनविषयक, दृढ, बहुमोलाची, ग्रामशिक्षण, समित्यांतून, निर्णया, घोषणांवर, ध्येयधोरणांवर, मोकळी, चर्चा, मिळायलाच, मिळायला, अन्न, प्रत्येकाला, जसे, कामी, ज्ञानाधिष्ठित, संघातून, समाजाच्या, निर्मितीत, विद्यार्थ्याला, उतरायला, मिळवून, भागणार, तिचा, करण्याची, मार्ग, वास्तवात, अनुभवातून, आत्मसात, असला, गावच्या, शाळांच्या, आवश्यकता, बालवाडीपासून, बदलणाऱ्या, एकच, असेल, खेडे, पायरीवर, पायऱ्या, दर्जा, बदलतो, महाविद्यालयापर्यंत, एकवाक्यता, सुसूत्रता, परिसर, शिक्षणात, घटकांचे, संघटन, उत्कृष्ट, शिक्षणपद्धतीचा, असतात, स्तरावर, पोहोचेल, आवश्क, शैक्षणिक, ध्येयधोरणांत, निर्णयप्रक्रियेत, जनसहभागाचे, चार, येणे, कालानुरूप, दृष्टिकोन, प्रयोग, जागरूकपणे, पाहून, अपेक्षित, समजून, घेणे, प्रत्येकाचे, वर्षात, ठरते, धोरणात्मक, सुवर्णमंगल, यांच्यापुढे, महाराष्ट्राच्या, अंमलबजावणी, करायला, शिक्षणाकडे, विचार, उद्दिष्ट, मानल्यास, मूल्यमापन, विद्यार्थ्याच्या, व्यक्तिमत्त्वाचे, सर्वांनीच, पोहचेल, कसे, बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती, डोळसपणे, जनतेला, देशातील, आव्हान, विषय, किंबहुना, जन्मलेल्या, साधनसुविधा, नव्या, अभ्यासपद्धती, महाराष्ट्रात, असायला, देऊन, सर्वांसाठी, प्रसाराला, प्रोत्साहन, देणे, दर्जाचे, सरकारला, स्वीकारणे, सहजरीत्या, घडत, घडवताना, घ्यावे, लागतात, शिक्षणक्षेत्रात, बदलांची, गती, उत्तम, राष्ट्रनिर्मितीचे, आवाहन, कळकळीचे, होण्यासाठी, संकल्प, मागचा, प्रभावी, मुल्यांच्या, आधारावरच, पुढील, शिक्षणातील, पूर्तता, कामाची, बचत, वेळेची, देशाचे, भवितव्य, असल्याने, महासत्ता, राष्ट्र, मिळालेल्या, बनवण्यात, युवक, महत्त्वपूर्ण, बजावू, शकतात, त्यामुळेच, विद्यार्थ्यांचा, झाल्याने, करणाऱ्या, गरज, महत्वाची, जाऊन, बसतो, संस्कार, जातो, संपुर्ण, तुमच्, मात्र, शिकलेल्, यांच्, चरित्राचा, घडविण्याकडे, फारच, थोडे, लक्ष, देतो, होते, म्हणाले, गांधी, महात्मा, यातील, रचला, सर्वोत्तम, प्रकट, मानवतेच्या, पुस्तकापेक्षा, जास्, पुस्तक, कोठे, असू, शकते, विद्यार्थ्यांच्या, पाया, शाळेतच, दिशा, विकासासाठी, द्यावे, वीरकर, सहकार्य, प्रणालीद्वारे, होण्याकरिता, पंजरकर, गौतम, वाव्हळ, दत्तात्रय, हेलसकर, भाऊसाहेब, जाधव, हरिभाऊ, वायसे, संतोष, तळणी, रमेश, प्रशालेचे, अधिक, लिंबाजी, जरी, संघटनाचे, तंत्रज्ञान, वायाळ, वाघमारे, कार्य, पूर्ण, गटशिक्षणाधिकारी, उद्देश, सुसज्ज, परिचालक, मुलभूत, प्रसिध्द, अधिकारांसाठी, शिखरावर, तितकाच, याशायाच्या, अर्जित, शिक्षणामध्ये, ज्ञान, असतो, जितका, वेळी, केल्यामुळे, लाईन, अद्यावायात, वेबसाईटवर, 2010, मुख्यध्यापक, संपर्क, नाझरकर, केंद्रसमन्वयक, अशोक, परिपत्रके, अभिमान, बायस, प्रेमदास, वाटते, मुलांना, पूर्ती, घटनेच्या, यासाठीचे, अपुरे, पडले, प्रजासत्ताकाच्या, घटनेला, साठ, आली, सार्वत्रिकरण, तंत्रज्ञानाचा, न्याय, नविन, नागरी, तत्त्वे, पुस्तकातच, शिक्षणावर, राहिली, देश, साक्षर, व्हावा, हव्या, मिळावी, सर्वांनी, गुणवत्तानुरूप, गेलेच, पाहिजे, विकासकार्यात, समाज्यातील, जोपर्यंत, घ्यावा, सर्वसाधारण, गरजा, प्रशिक्षित, निर्धाराने, करावे, लागेल, खर्च, तात्काळ, विकासात, शिक्षणास, अत्यंत, स्थान, निरनिराळे, सर्वसामान्यांपर्यंत, राबविण्यासाठी, वेबसाईटचा, मनुष्यबळ, प्रशासकीय, होण्याच्या, वाढ, भांडवल, करण्याचे, देशाच्या, मध्ये, विकासातील, महत्त्वाची, विश्वसनीयता, वेग, राबविले, कामकाजातील, घेऊनच, सहभागी, साम्रगीपर्यंत, असेच, प्रक्रिया, वास्तविक, काय, लोकांना, ह्याची, कल्, पना, केलेली, जमिनीचे, किंवा, वस्तुचे, मोल, मोजावे, टॉक, चाललेली, एक्, सचेंज, बाजारातील, आपल्, शेअरचे, मूल्यांकन, तसे, मूल्, यांकन, शिकल्यामुळे, पैसे, कमवू, शकतील, शिकायची, मरणापर्यंत, पोहचलो, एकविसाव्या, देशाची, प्रगती, येणारी, याकडे, दुर्लक्ष, अचूकता, समाजात, रुजलेच, आपला, समाजच, कारणीभूत, सांगावे, पारदर्शकपणा, शतकातही, जन्मापासुन, कायद्याचा, बडगा, उगारून, गरजच, कामकाजामध्ये, कार्यालयीन, पुस्तके, वाचली, परिक्षा, सर्वानी, उत्तीर्ण, झालो, नव्हे, शहर,
Text of the page (random words):
forms for assessment year 2011 12 जिल्हा परिषद अर्थ विभाग माहितीचा अधिकार प्रकरण राज्य महिती माहितीचा अधिकार अधीनियम २००५ शेखर गायकवाड शेती विषयक माहिती सातबारा लेखा व कोषागारे संचालनालय संचालनालय स्थानिक निधी लेखापरीक्षा महाराष्ट्र विभागीय चौकशीसंदर्भातील सर्वकष व अद्ययावत माहिती आणि शंका निरसन असा संगम साधणारे लोकाभिमुख दालन येथे क्लिक करा व जा थेट महाराष्ट्र शासनाच्या जी आर विभागात जिथे आपणास सर्व जी आर पाहण्यास मिळतील उच्च न्यायालय मुंबई भारत सरकार संकेत स्थळ संकेत स्थळ महाराष्ट्र शासन भारतातील कोणत्याही जिल्हाच्या वेब ला भेट द्या प्रथम क्लिक करा नंतर राज्य निवडा व थेट जा त्या जिल्ह्यात एका क्लिकवर जालना जिल्हा परिषद महाऑनलाईन आपले स्वागत करीत आहे शासकीय दैनंदिन वृत्त शासनाची सर्व महत्वाच्या website एका क्लिकवर भारताचे कायदे नियम संधी रोजगाराची खात्री नोकरीची मंत्रिमंडळ निर्णय महान्यूज पेन्शन उपयोगी कागदपत्रे पेन्शन उपयोगी कागदपत्रे 2 ag nagpur शासन निर्णय शोधण्यासाठी विस्तारीत शोधा उच्च न्यायालय मुंबई new return forms for assessment year 2011 12 friday july 6 2012 द्वारा पोस्ट केलेले गजानन विठ्ठलराव काळे येथे 7 40 am email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest wednesday june 27 2012 द्वारा पोस्ट केलेले गजानन विठ्ठलराव काळे येथे 7 51 am email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest wednesday september 7 2011 ई क्रांती विकासाचे नवे पर्व द्वारा पोस्ट केलेले गजानन विठ्ठलराव काळे येथे 9 15 pm माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व सेवा माफक दरात प्रभावीपणे पारदर्शकरित्या आणि जलदगतीने सर्वसामान्य माणसाला देण्यासाठी राज्याच्या ई प्रशासन 2011 धोरणास मंजुरी दिली आहे महाराष्ट्र शासन नागरीकांना त्यांच्या दारापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून एक खिडकी पध्दतीद्वारे जलद गतीने कमी खर्चात पारदर्शकरित्या शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द आहे विविध शासकीय विभागात ई गव्हर्नन्स कार्यप्रणाली अंमलात आणून कामात गतीमानता आलेली आहे तसेच प्रत्येक विभागात समन्वय साधुन ई गव्हर्नन्स वर जास्त भर देण्यात येत आहे ई शासनाच्या मदतीने नाममात्र किमतीत नागरिक केंद्रीत सेवा वितरणाच्या सोयीचे सरस बदल आणणे आणि सेवा मिळविणे हे उद्देश्य आहे नागरिकांना सेतू महा ई सेवा केंद्रांमार्फत सर्व विभागाच्या शासकीय सेवा एकत्रितरित्या पुरवण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे स्टेट वाईड एरिया नेटवर्क या योजनेअंतर्गत सर्व तालुका कार्यालये ही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालये आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालये मंत्रालयाशी म्हणजेच राज्य मुख्यालयाशी जोडण्यात आलेली आहेत तसेच भविष्यात तालुकास्तरापासून ग्रामपतळी पर्यंतची जोडणी बिनतारी दळणवळणाद्वारे करावयाची आहेत स्वॅनमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सींग ई मेल च्या सुविधेचा वापर होत आहे आपत्कालीन परिस्थितीत माहितीचे दळणवळण यामुळे सहजसाध्य झाले आहे याचा उपयोग दैनंदिन कामकाजाबरोबरचं आपात्कालीन परिस्थितीतही होत आहे महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातुन जनतेस शासकीय निम शासकीय तसेच खाजगी सेवा देण्यात येत आहेत शासकीय सेवे अंतर्गत ७ १२ उतारा ८ अ चा उतारा निवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र भुमिहीन शेतमजुर प्रमाणपत्र नॉन क्रीमीनल प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र इत्यादी देण्यात येत आहे राज्यातील नागरीकांना महा ऑनलाईन या पोर्टल द्वारे इलेक्ट्रॉनिक्स पध्दतीने सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे तसेच जनतेस कोणतीही तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये जावे लागते अनेकदा प्रत्यक्ष तक्रार करणे शक्य नसते त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास टाळाटाळ करतात परिणामी महत्वाचे गुन्हे अपघात यांची माहिती वेळेत पोहचु शकत नाही हे लक्षात घेवून तक्रार दाखल करण्यासाठी ई कंम्प्लेंट हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे ई कंम्प्लेंट द्वारे म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातुन अशी तक्रार दाखल करता येवु शकेल हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न सुरू आहेत ई प्रशासन धोरणामध्ये मराठी ही प्रथम आणि अनिवार्य भाषा राहील ई प्रशासनाच्या विविध प्रकल्पासाठी अत्याधुनिक संगणकीय संरचनेचा वापर केला जाईल नागरिकांना शासनाच्या विविध सेवा घरपोच प्रदान करण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करण्यात येईल याद्वारे मोबाईलवर आधारित आर्थिक देवाणघेवाण कार्यक्रम राबविण्यात येईल नागरिकांना संगणकीय पद्धतीने सेवा देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक सेवा अनिवार्य इलेक्ट्रॉनिक प्रदानता अधिनियम अंमलात आणण्यात येईल ग्रामपंचायती पंचायत समित्या होणार हायटेक केंद्र सरकारच्या 13 व्या वित्त आयोगातून दुसऱ्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या निधीतून ग्रामपंचायतींसह पंचायत समितीत संगणक खरेदी करण्यात आले आहेत ज्या त्या गावांची माहिती एकत्रित संगणकावर उपलब्ध व्हावी एका क् लिकवर ती ग्रामपंचायत जगभर झळकली जावी या उद्देशाने हा निधी संगणक खरेदीसाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत परिणामी येत्या काही दिवसांत ग्रामपंचयातींसह पंचायत समित्या हायटेक होणार आहेत भविष्यात या सर्व ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत एकूणच ई क्रांती भविष्यात विकासाचे नवे पर्व ठरणार आहे गजानन विठ्ठलराव काळे गटसाधन केंद्र मंठा माजी कार्यकारी संपादक सा लोकनीती मंठा राज्यातील महाराष्ट्र विकास सेवेअंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब वर्ग 2 ची 351 पदे निर्माण करण्याबाबत 03 08 2012 57 kb email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest sunday july 24 2011 सुधारित मानव विकास मिशन योजना द्वारा पोस्ट केलेले गजानन विठ्ठलराव काळे येथे 11 00 am गजानन वि काळे गट साधन केंद्र मंठा मागास तालुक्यांना प्रगतशील तालुक्यांच्या इतरांच्या बरोबर आणण्यासाठी 2006 सालापासून 25 अतिमागास तालुक्यात राबविण्यात आलेल्या मानव विकास मिशन च्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले त्यामुळे या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून हे मिशन पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक सव्वाशे तालुक्यात राबविण्यात येईल आता या तालुक्यांना वर्षाकाठी तीन ते पाच कोटींचा निधी उपलब्ध होईलया माध्यमातून संबंधित तालुक्यात शिक्षण आरोग्य बालकल्याण आणि दरडोई उत्पन्नवाढीच्या योजना राबविण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली मिशनच्या जिल्हा पातळीवरील अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष तर जिल्हा नियोजन अधिकारी सचिव राहणार आहेत तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी अध्यक्ष तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सचिव राहणार आहेत जालना जिल्ह्यातील परतूर बदनापूर जालना घनसावंगी आंबड भोकरदन मंठा जाफराबाद या तालुक्यांचा समावेश आहे या समितीच्या वतीने शिक्षण आरोग्य व बालकल्याण उत्पन्न वाढीच्या योजना या तीन प्रकारात काम करण्यात येणार आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग मोठ्या गावातील माध्यमिक शाळांत अभ्यासिकेसाठी सोलर लाईट फनिर्चर पुस्तकखरेदी ग्रामीण विद्यार्थ्यांना बारावीपर्र्यंत वाहतूक सुविधा प्रयोगशाळांसाठी साहित्याची मदत तालुक्याच्या ठिकाणी बालभवन व विज्ञानकंेद तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी औषधोपचार बेकार युवकांना स्वयंरोजगारासाठी व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण बचतगटाच्या माध्यमातून परसबाग किचन गार्डन योजना फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे अशा कार्यक्रमांचा या मिशनमध्ये अंतर्भाव आहे सदरील लेख www gvkale blogspot com वर उपलब्ध आहे email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest sunday january 23 2011 मंठा तालुक्याचा शिक्षण विभाग जुडला sms सेवेने द्वारा पोस्ट केलेले गजानन विठ्ठलराव काळे येथे 1 59 pm मंठा प्रतिनिधी आज काल सर्व कामे इंटरनेट च्या माध्यमातून गतीने होत आहे सगळे जग या महाजालाने जोडले जात आहे याच महाजालाच्या माध्यमातून मंठा तालुका शिक्षण विभागा अंतर्गत कार्यरत असणारे गजानन काळे यांनी तालुक्यातील 12 केंद्रप्रमुख 184 मुख्याध्यापक व सर्व ५५० शिक्षक यांना sms सेवेने जोडले आहे नवीन शासन निर्णय शासकीय घडामोडी बैठका कधी होणार पगार कधी होणार प्रशिक्षण कधी होणार जिल्हा तालुका स्तरावरील वरिष्ट अधिकाऱ्यांचे आदेश विविध माहिती संधर्भात दर रोज तीन sms विनामूल्य पाठवले जातात त्यामुळे तालुक्याच्या कार्यालयातून थेट सर्व ६०० कर्मचर्यांना काही मिनिटात सर्व माहिती पोहचत आहे त्यामुळे या sms सेवेचा मोठा फायदा मंठा तालुका शिक्षण विभागाला व कर्मचार्यांना होत आहे या sms सेवा जग प्रसिद्ध कंपनी गूगल व वे टू sms या कंपनी च्या वेब च्या साह्याने खाते तयार करून पुरवली जात आहे या साठी प्रशिक्षणा दरम्यान सर्वाना या सेवे विषयी माहिती देवून मेसज पाठवून सदस्य बनवून घेण्यात आले आहे व भ्रमणध्वनी क्रमांक घेवून ते वेब वर उपलोड करण्यात आले हे कार्य पूर्ण करण्यासाठी गजानन काळे यांना गटशिक्षणाधिकारी बी के राठोड विस्तार अधिकारी शिवाजी भोसले यांचे मार्गदर्शन केले तसेच गटसमन्वयक के जी राठोड तळणी प्रशालेचे मुख्याध्यापक लिंबाजी चव्हाण शिक्षक संघटनाचे प्रतिनिधी विजय वायाळ संजय वाघमारे गौतम वाव्हळ दत्तात्रय हेलसकर भाऊसाहेब जाधव हरिभाऊ वायसे संतोष वीरकर केंद्रप्रमुख विजय पंजरकर मुख्यध्यापक संजय नाझरकर केंद्रसमन्वयक अशोक राठोड अभिमान बायस प्रेमदास पवार संगणक परिचालक रमेश पवार यांनी सहकार्य केले email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest sunday september 5 2010 यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण द्वारा पोस्ट केलेले गजानन विठ्ठलराव काळे येथे 3 19 pm यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच याशायाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तुमच् यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण मानवतेच्या पुस्तकापेक्षा जास् त चांगले पुस्तक कोठे असू शकते असे महात्मा गांधी म्हणाले होते खरी समस्या ही आहे की वास्तविक शिक्षण म्हणजे काय लोकांना ह्याची कल् पना नाही एखाद्या जमिनीचे किंवा एखाद्या वस्तुचे मोल मोजावे स् टॉक एक् सचेंज बाजारातील आपल् या शेअरचे मूल्यांकन करतो तसे आपण शिक्षणाचे मूल् यांकन करतो जे शिकल्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील असेच शिक्षण मुलांना द्यावे असे आपल्याला वाटते मात्र शिकलेल् यांच् या चरित्राचा विकास घडविण्याकडे आपण फारच थोडे लक्ष देतो शिक्षणाची गरजच नाही शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे एकविसाव्या शतकातही आपल्याला कायद्याचा बडगा उगारून शिक्षणाचे महत्त्व सांगावे लागते शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजलेच नाही त्यासाठी आपला समाजच कारणीभूत आहे आपण केवळ आपल्या प्राथमिक गरजा व उपलब्ध साधन साम्रगीपर्यंत पोहचलो आहे देशाची प्रगती विकास व येणारी संधी याकडे आपले दुर्लक्ष होत आहे विद्यार्थ्यांना गुणवत्तानुरूप शिक्षण दिले गेलेच पाहिजे विकासकार्यात समाज्यातील प्रत्येक वर्ग जोपर्यंत सहभागी होत नाही आपल्या प्रजासत्ताकाच्या राज्य घटनेला साठ वर्षे होत आली तरीही शिक्षणाचे सार्वत्रिकरण समान सामाजिक न्याय समान संधी आणि समान नागरी कायदा ही मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या पुस्तकातच राहिली आहेत संपूर्ण देश साक्षर व्हावा सर्वांना हव्या त्या शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले आहेत आर्थिक विकासात शिक्षणास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे निरनिराळे विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवून मानवी भांडवल निर्माण करण्याचे शिक्षण हे मुख्य साधन आहे देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासातील शिक्षणाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन शिक्षण विषयक कार्यक्रम राबविले जातात शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊनच राज्य शासन सर्वसाधारण शिक्षणावर मोठा खर्च करतो शिक्षणक्षेत्र गेल्या साताठ महिन्यांपासून या ना त्या कारणाने विशेष चर्चेत आहे अर्थात राष्ट्रीय जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असणे उचितच आहे गेली दहा वर्षे संसदेच्या शिक्कामोर्तबाची वाट पाहात असलेले शिक्षणाच्या अधिकाराचे विधेयक सहा ते चौदा वर्षे या वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे त्याला शाळेत पाठवणे हे पालकांचे कर्तव्य आहे त्यात कसूर झाल्यास कायद्याने शिक्षा होण्याचे प्रावधान आहे शाळांवरही अशा प्रकारचे निर्बंध घालण्याची तरतूद विधेयकात आहे संविधानात मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपात राज्यसंस्थेचे कर्तव्य म्हणून सर्वांना शिक्षणाची तरतूद होती पण स्वातंत्र्यानंतर अर्धशतक उलटूनही प्राथमिक शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांची संख्या खूप मोठी आहे म्हणूनच शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्यासाठी सक्तीचे व निःशुल्क शिक्षण चौदा वर्षे वयापर्यंत प्रत्येक भारतीयाला मिळण्यासाठी कायदा करणे आवश्यक ठरले अर्थात केवळ कायदा करून निरक्षरतेची समस्या चुटकीसरशी सुटेल अशी अपेक्षा नाही एका स्वयंसेवी संस्थेच्या गेल्या वर्षाच्या अभ्यासानुसार भारतात किमान तीन कोटी मुलांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही शाळेची फी न भरल्यामुळे शाळा सोडणाऱ्यांची संख्याही सुमारे तीन कोटी आहे आठव्या इयत्तेपर्यंत विद्यार्थी गळतीचे प्रमाण चौपन्न टक्के आहे दलित मुलींपैकी दहावीआधीच ऐंशी टक्के शाळा सोडतात तर आदिवासी गटातील मुलींपैकी शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱ्यांचे प्रमाण नव्वद टक्के आहे या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा हक्क कायद्याने मिळूनही त्याचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी देशाला दृढ संकल्प करून त्याची पूर्ती करण्यासाठी निर्धाराने काम करावे लागेल संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हे सर्व शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास मूल्यमापन प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे त्याच्या क्षमता त्याची बुद्धिमत्ता छंद सवयी वृत्ती दृष्टिकोन जीवनविषयक मूल्ये आणि क्षमता शारीरिक कृती या सर्व आयामांसह होणे आवश्यक आहे त्यासाठी शिक्षक पालक संस्थाचालक प्रशासक विद्यार्थी या सर्व घटकांत जागृती आणि जिज्ञासा हवी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करतानाच उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण करण्यावरही सरकार भर देत आहे कालानुरूप नवीन विषय नवे अभ्यासक्रम आवश्यक साधनसुविधा नव्या अभ्यासपद्धती यांना प्राधान्य देऊन त्यांच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे हे एक आव्हान आहे कारण बदल स्वीकारणे सहजरीत्या घडत नाही असे बदल घडवताना अनेक निर्णय घ्यावे लागतात शिक्षणक्षेत्रात बदलांची गती खूप कमी आहे शिक्षण राष्ट्रनिर्मितीचे विकासाचे प्रमुख साधन म्हणून महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे जागरूकपणे पाहून अपेक्षित बदल समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते धोरणात्मक निर्णय आणि घोषणा यांच्यापुढे प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रयोग यांना महत्त्व आहे पालक शिक्षक सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका या कामी बहुमोलाची आहे ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळवून भागणार नाही तिचा उपयोग करण्याची कौशल्ये आणि मार्ग त्याला अनुभवातून आत्मसात करता येणे ही खरी आवश्यकता आहे शाळांच्या पालक शिक्षक संघातून गावच्या ग्रामशिक्षण समित्यांतून अशा निर्णया घोषणांवर ध्येयधोरणांवर मोकळी चर्चा हवी कारण शैक्षणिक ध्येयधोरणांत आणि निर्णयप्रक्रियेत जनसहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे शालेय शिक्षणात विद्यार्थी शिक्षक पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन विद्यार्थी वय या सर्व बदलणाऱ्या गोष्टी आहेत जरी अभ्यासक्रम एकच असेल तरीही शाळा शिक्षक शहर वा खेडे तसेच इतर अनेक घटक यामुळे शिक्षणाचा दर्जा बदलतो व त्यात एकवाक्यता सुसूत्रता येत नाही यासाठी या सर्व घटकांचे संघटन करणे व उत्कृष्ट शिक्षणपद्धतीचा अवलंब सर्व स्तरावर पोहोचेल असा प्रयत्न करणे आवश्क आहे महाराष्ट्राच्या या सुवर्णमंगल वर्षात जनतेला आणि सरकारला एक कळकळीचे आवाहन आहे की उत्तम दर्जाचे आणि सर्वांसाठी शिक्षण हे आपले प्राथमिक ध्येय असायला हवे महाराष्ट्रात जन्मलेल्या किंबहुना देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार असला तरी तो वास्तवात उतरायला हवा जसे प्रत्येकाला अन्न मिळायला हवे तसेच प्रत्येक मुलाला शिक्षण हे मिळायलाच हवे हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकार आणि समाज अशा दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहचेल याचा सर्वांनीच विचार करायला हवा कारण यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण हेच आहे गजानन वि काळे गट साधन केंद्र मंठा email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest home subscribe to posts atom माझ्याबद्दल गजानन विठ्ठलराव काळे mantha dist jalna maharashtra india नमस्कार मी गजानन विठ्ठलराव काळे माझ्या या छोट्याश्या साईट वर मी आपले स्वागत करतो मी सध्या कनिष्ट सहायक लेखा या...
|