Meta tags:
Headings (most frequently used words):
२०११, मंगळवार, गुरुवार, ब्लॉग, जीवनमूल्य, isalute, गड, सुळक्यांचा, माहुली, महागाईमधील, ढग, शब्दांचे, विश्व, कॉम, मंडळी, steve, राजमाची, स्वस्ताई, येती, एक, जोड, किल्ला, प्रत्येकालाच, वेगळा, कायदा, करायचा, का, रेवणीचे, अवशेष, आढळणारा, मराठी, चिवचिवाट, पाखरे, २१, शनिवार, मार्च, २०१२, ऑक्टोबर, २२, सप्टेंबर, बुधवार, २७, जुलै, जून, अशी, २६, एप्रिल, मागील, पानावरून, नविनतम, लेखन, संग्रहण, सध्या, मी, काय, करतोय, पृष्ठे, कंधार,
Text of the page (most frequently used words):
आहे (54), आणि (37), #आहेत (27), करा (25), fort (23), #शेअर (19), नाही (18), असे (17), #पत्रकार (15), #काही (13), 2010 (11), #परंतु (11), आयफोन (10), #दुर्ग (9), #सामान्य (9), अशा (9), त्याचे (8), म्हणजे (8), #माहुली (8), किंवा (8), 2011 (8), त्या (8), होत (7), हल्ला (7), facebook (7), अशी (7), twitter (7), होते (7), अनेक (7), #अवशेष (6), कंधार (6), मराठी (6), हेब्लॉगकरा (6), यास (6), ईमेल (6), प्रतिक्रिया (6), 2009 (6), वादळ (6), २०११ (6), शांत (6), विक्रम (6), लेखक (6), टॅग्ज (6), वर्तमानपत्र (6), स्टीव (6), pinterest (6), बालेकिल्ले (6), यात (6), केला (6), होता (5), कायदा (5), माणूस (5), दोन (5), maharashtra (5), गोष्ट (5), झाली (5), मोठा (5), केले (5), येते (5), रुपयात (5), काय (5), श्रीवर्धन (5), मागील (5), एका (5), आता (4), असते (4), लोकोपयोगी (4), स्वतंत्र (4), लोकांना (4), किती (4), सर्व (4), होतो (4), प्रयत्न (4), अधित्यका (4), करत (4), त्यामुळे (4), कारण (4), खूप (4), येईल (4), त्यात (4), याची (4), त्यावेळी (4), वेगळ्या (4), हल्ले (4), इतिहास (4), तटबंदी (4), मध्ये (4), marathi (4), म्हणून (4), सप्टेंबर (4), ऑक्टोबर (4), स्वस्तातील (3), त्याच्या (3), गरज (3), रेवणी (3), shivaji (3), करून (3), जून (3), गडावर (3), असावी (3), पळसगड (3), मला (3), त्याची (3), होती (3), तरी (3), खास (3), लागले (3), सुळक्यांचा (3), निखील (3), दुर्गाची (3), वागळे (3), झालेले (3), खर्च (3), राजमाची (3), जुलै (3), येतो (3), वर्षात (3), steve (3), एप्रिल (3), वागणूक (3), मार्च (3), महाग (3), लागली (3), यांच्या (3), आयपॉड (3), येत (3), भंडारदुर्ग (3), जात (3), किल्ले (3), समाजात (3), आयक्लाउड (3), करणारे (3), फक्त (3), आयपॅड (3), असतात (3), महाराष्ट्र (3), प्रत्येकालाच (3), करण्याचा (3), कधी (3), त्यांच्यावर (3), मिड (3), विषमता (3), निर्माण (3), लक्षात (3), दुय्यम (3), लेखातील (3), फरक (3), तेच (3), तोटा (3), म्हणतात (3), त्यांच्या (3), असा (3), भरपूर (3), सहन (3), सुळके (3), करणारी (3), असो (3), गडकोट (3), मागणी (3), जीवनमूल्य (3), पाडवा (2), तुमच्या (2), पाऊस (2), गोष्टीवर (2), बांधील (2), पोस्ट (2), journalism (2), आला (2), विचार (2), किल्ला (2), 2012 (2), सध्या (2), उपदुर्ग (2), माहिती (2), रंगीत (2), ऑगस्ट (2), कोणत्या (2), दसरा (2), ब्लॉग (2), नोव्हेंबर (2), जातो (2), याबाबत (2), जानेवारी (2), उत्सव (2), दिवसापासून (2), घेतले (2), म्हणजेच (2), तसा (2), फेब्रुवारी (2), स्वस्तात (2), पाने (2), खरी (2), जाते (2), कशी (2), शिवाजीमहाराजांनी (2), जरा (2), पत्रकारांनी (2), घटक (2), राजकीय (2), लक्ष (2), करतो (2), मोठे (2), कायद्याची (2), यांच्यावरील (2), नाहीत (2), पत्रकारिता (2), पुढे (2), प्राणघातक (2), कोणती (2), करावी (2), तोरसेकर (2), भाऊ (2), मुद्दे (2), हिंद (2), वेगळा (2), नये (2), आजकाल (2), हवे (2), समाजातील (2), त्यातल्या (2), काळी (2), आंबेडकर (2), फुले (2), शाहू (2), आले (2), पुन्हा (2), समता (2), झाले (2), करण्यासाठी (2), विचारवंत (2), आम्ही (2), पूर्वीच्या (2), एखाद्या (2), त्यामुळेच (2), शोषित (2), वेगळी (2), करायची (2), व्यावसायिक (2), करणाऱ्या (2), असेच (2), माणसाला (2), विशेष (2), असावा (2), त्यांना (2), समतेचे (2), यासाठी (2), योजना (2), मूर्तीचे (2), तोफा (2), पुणे (2), उंच (2), आपल्याला (2), मूर्ती (2), मुक्काम (2), बरेच (2), मनरंजन (2), वरून (2), आवश्यक (2), प्रदेश (2), जुने (2), कंधारच्या (2), वैशिष्ट्य (2), राजमाचीवर (2), जाता (2), छोट्या (2), असेल (2), मीटर्स (2), चढून (2), देखणा (2), चर्चा (2), लाकडी (2), दुसरीकडे (2), महाराष्ट्रातील (2), व्यवहार (2), कार्य (2), मंगळवार (2), समान (2), गरजेचे (2), येथे (2), रेवणीचे (2), पूरक (2), दोन्ही (2), पसारा (2), उदाहरण (2), पूर्वी (2), असावे (2), पाण्याची (2), टाकी (2), लेणी (2), अतिशय (2), गोष्टी (2), करण्याची (2), लागला (2), खंडाळ्याच्या (2), असल्याने (2), दिसत (2), परिणाम (2), यांनी (2), अचानक (2), तीन (2), जिंकला (2), शनिवार (2), झालेला (2), मिळून (2), दुर्गांचा (2), rajmachi (2), तयार (2), kandhar (2), चित्रपट (2), शिक्षक (2), भटोबा (2), स्वता (2), जुना (2), वजीर (2), सकाळी (2), apple (2), म्हणता (2), कसे (2), रुपये (2), स्टीवने (2), maharaj (2), मुघल (2), तलवार (2), अवघड (2), गुरुवार (2), जंगल (2), पावसाळ्यात (2), मुस्लीम (2), iphone (2), mahulifort (2), देणाऱ्या (2), प्राणी (2), विसापूर (2), लोहगड (2), माझे (2), विकास (2), रात्री (2), महुलीही (2), newspapers (2), माझ्याबद्दल (2), विश्वकप (2), महागाई (2), jobs (2), माहुलीचा (2), ठाकरे (2), सत्य (2), जॉब (2), बातमी (2), गडाभोवती, जंगली, दाट, जाण्याची, झाडी, वाचली, दिसतात, विरोधाभास, तळातील, गावात, अजूनही, कर्करोगाने, रान, चमत्कारिक, आजारी, महिनाभर, १६६१, सर्वांसाठी, उभा, जाईल, वाटले, देत, न्याय, साक्ष, बिबट्याचा, वेगवेगळ्या, जंगलात, एकीकडे, हल्ल्यासंदर्भात, सुळक्यांच्या, दुर्गाचे, झाला, प्रसन्न, कारणांनी, नैसर्गिक, अत्यंत, अफाट, पुरस्कार, आग्रही, वातावरण, बळकटीपणाची, डोस, पाजायचे, एकूणच, रौद्रता, कायद्याने, दरी, वावर, भव्यता, सोडून, नोंद, असल्याची, प्रकारचे, करायचा, आगगाड्या, शुभेच्छा, ऐकलेली, असताना, नवर्याची, विष्णू, यशस्वीपणे, अगदी, दरवाजे, isalute, निधन, जॉबचे, अभ्यासण्यासारख्या, राजमाचीचे, मजा, नव्हती, इच्छा, फारच, घाटातून, बोगद्यातून, दुसर्या, बोगद्यात, जाणार्या, उदास, न्याहाळताना, कोणाला, द्यायची, एकमेव, करवली, सर्वत्र, एकमेकास, सणासुदीची, राज्यवहारकोषात, बालेकिल्ल्याचा, धामधूम, शब्दप्रयोग, सगळीकडून, असत, वेगवेगळे, हवालदार, दोघांचे, गेले, वर्षाव, बांधून, काढावेच, अर्थात, लीलया, अधित्यकांचा, युवक, इथले, म्हणूनही, शुभेच्छांचा, गणले, मानले, जाऊ, अतिअवघड, नव्हते, डीझेल, होणार्या, धोका, तहात, मुघलांना, येतात, द्यावा, माहुलीला, पत्रकारसुद्धा, शिवाय, जिंकून, दुर्गही, प्रसंगाला, विस्तार, फार, संतप्तही, वरती, पुरंदरच्या, कोकणातले, तेवढाच, लिंग्या, अपप्रवृत्ती, शंकर, संघटनेचे, ब्रह्मा, चंदेरी, दुर्गावरून, १६५७, शहाजीराजांनी, निजामशाहीचा, कारभार, पत्रकारावरील, पत्रकारितेवरील, चालवला, संरक्षण, प्रसंगी, प्रेम, नवरी, लढे, शेकडो, गडात, प्रवेश, करता, प्रस्थापित, २०१२, द्यावे, आपल्या, मोडून, घालवली, हयात, इतिहासाचे, पृष्ठ, मुखपृष्ठ, शिडीवरून, घेऊन, दुर्गाच्या, येथून, पायथ्याच्या, जेवढे, गावाचे, नाव, अशीच, माहुलीच, उभ्या, माध्यमातून, चढाची, दमछाक, वर्ष, वाट, लोखंडी, कितीतरी, शिडीच्या, गुन्हेगारी, यांचा, सुरक्षेसाठी, तळकोकणची, हाताची, ओळख, पटत, ओलांडू, पत्रकाने, राजधानीच, अलीकडे, मजबूत, धूसर, शिल्लक, वाताहत, रेषा, इतर, हाताला, लोकांकडून, राजकारण, युवकांनी, पत्रकारांच्या, चढणीचे, तसेच, वाढले, अशे, आवाहन, पेललेले, भान, समोरच, महुलीविषयी, गेल्याने, लिहिले, ठेवले, जवळचे, अंधारया, यातील, पक्षीय, मुखवटा, पाहण्यास, आश्चर्य, पक्षाला, वाटल्यावाचून, व्यक्तीला, राहिले, इंग्रजांनी, गुन्हा, विजयाने, हल्ल्यांकडे, नोंदही, केली, गुंडांनी, खरया, फाडण्याचा, नवरा, अनेकांना, बनवून, दुर्गांसारखे, पाळणे, १६७०, मर्यादा, त्यांनी, प्रतिक्रियाच, होणारा, राजांच्या, तेंव्हा, लिखाणातून, बदनाम, दुर्गावर, चढवून, हैराण, हेतुपूर्वक, मुघलाने, दुर्गात, बालेकिल्ला, वर्षभर, देण्यास, रुपयाला, वृतपत्र, दिवसापूर्वी, दिवसाला, रुपयासुद्धा, १९९, विक्रेत्यांनी, दिव्य, विदर्भात, गेला, दिला, किमान, होण्यासाठी, विरोध, त्याने, कोणत्याना, इथे, पक्षाशी, कोणत्यातरी, समूह, ज्या, समूहाची, मान्य, दर्शवला, जरी, स्पर्धेतून, असेलच, आठवत, हेही, गोष्टीला, लोकमत, आठवा, पुण्यात, समाजसेवेच्या, मिळणाऱ्या, आपण, अडकून, मोहात, पुरवण्यांच्या, असणाऱ्या, लाखो, अजून, सत्याचा, आहेच, दोष, माणसाचाही, राहतो, वाचत, समजुतीत, पूर्ण, रोज, विक्रत्यांचे, परत, त्यावर, वाहतूक, स्पर्धेमध्ये, बंद, पडली, मागे, देणारे, वृतपत्रे, चांगली, कमिशन, टोपलीत, कचऱ्याच्या, पाठपुरवठा, आलेच, भावनेतून, कोठेतरी, आवळतात, कोणीही, सवयच, झालेली, तुम्हाला, माणसाची, चर्चाहि, बोलत, आठवते, तुम्ही, उलट, वर्षापूर्वी, वाद, चालल्या, दिले, जाणारे, म्हणा, भाववाढ, तसेही, तरीही, होतात, कागद, शाई, मनुष्यबळ, भाववाढीचे, सर्वांचे, प्रकारच्या, स्वस्त, तसे, वाढली, वेळा, शक्यच, असणे, असाल, म्हणत, सगळ्याच, बोलले, याहून, सर्वसामान्य, वाचायला, जाहिरातींच्या, सवय, एकदा, करतात, आकर्षित, देऊन, शक्य, जोरावर, अंक, असावेत, मिळवण्याचा, फायदा, जास्त, लावतात, आपलीच, तेही, सगळीकडे, रंगबेरंगी, सर्वत्रच, वाढल्यावर, भाव, डीझेलचे, पेट्रोल, चालू, मते, पुरवण्यासहित, मिळत, जोरदार, महागाईची, बिंबवतात, मनावर, लोकांच्या, याच, राग, बालेकिल्ल्यांमध्ये, ट्विट, घाटात, नेहमीप्रमाणे, रेल्वेमार्गातील, मुंबई, उघडले, पहिलीच, जाऊन, स्थानकावर, चालत, उढेवाडीकडे, दिसली, ripstevejobs, लोणावळ्याहून, धक्काच, ठाकरवाडी, बनवला, ठेवतो, उढेवाडी, ग्रामसहाय्य, गाव, टुमदार, घेणार, माझा, छोटे, विकणार, वाटत, पाहून, लेणे, कोंडाण्याचे, खाली, उतरून, विकेल, बसला, घाटवाटेवर, कोणत्याही, उंची, उत्सुकता, जगासमोर, जसे, अधिक, थोडी, आणेल, पहिले, श्रीवर्धनची, बालेकिल्ल्यापेक्षा, स्टीवसुद्धा, निराश, जवळच, झालो, पाहता, येणाऱ्या, दिवसापूर्वीच, देशावर, कोकणातून, एकमेकांना, असलेले, नावे, सुचेनासे, अॅपलचे, माथेरान, आगळावेगळा, मेडिया, दृष्टीपथात, इवेन्ट, लाइव, चौफेर, ब्लॉगवर, परिस्थितीत, आल्यानंतर, आयुष्याला, प्रबोधन, माझ्या, सारख्या, माणसाच्या, त्यातून, असणारच, बौद्धिक, महागाईमधील, भेसळयुक्त, असलेतरी, सुखाचे, पानांचे, कितीही, नवीनच, स्वस्ताई, मिळणार, शेवटी, धरून, मिंधे, संपादक, घेणारे, पगार, गलेलठ्ठ, त्याप्रमाणे, टिकू, आपणच, घेतला, निर्णय, पोहचवायची, स्वरुपात, शकतात, कुठली, जनतेपर्यंत, परिमाण, ज्ञानेंद्रियांना, मिळाला, गावाचा, राहू, स्टीवच्या, जोड, राबवल्या, विश्वाची, बर्याच, सफर, संस्थेने, मुंबईच्या, घडवली, वेगळाच, आनंद, वापरताना, बुधवार, सुखाची, समृद्ध, वेगळीच, अनुभूती, औषधे, दारू, छोटेसे, आयुष्य, जॉब्स, ऋणी, शतशा, प्रणाम, जगाला, लेखातून, दिलेली, देणगी, कायम, आहारी, त्यांची, लैंगिक, रायरेश्वर, रुचिका, विशेषाधिकार, लष्कर, लक्ष्मीपूजन, लिंगाणा, लोकप्रतिनिधी, रामोशी, लोकशाही, लोणावळा, वसई, वारकरी, विजयादशमी, विनयभंग, विनोद, विभाजन, रायगड, बेरड, वैद्य, मिश्रदुर्ग, तिरोडकर, मनोज, अमराठी, ब्लॉगर्स, मल्टीप्लेक्स, मागधी, मामा, मालवण, अभियंता, रामजन्मभूमी, मुख्य, मुली, लीग, मुहर्त, मेवाती, म्यानमार, राज, राजेश, राजवैद्य, व्यसन, मदत, संस्कृती, श्रद्धा, श्रद्धांजली, संग्रामदुर्ग, तुकाराम, संत, संबळगड, संवादकौशल्य, संस्थापक, बाजार, सक्कर, तेंडूलकर, सचिन, मित्र, सच्चा, साईबाबा, समाज, शौरसेनी, कमोडिटी, शांताराम, शिवभारत, व्ही, शंकराचार्य, वाडा, शहीद, कणेकर, शिरीष, शिवजयंती, शिवनेरी, शिवसामर्थ्य, शुभारंभ, शिवसेना, शिवसेनाप्रमुख, शिवसैनिक, शिवाजीमहाराज, मंदिर, शिवाजीमहाराजांचे, शिक्षण, शीख, मनमोहनगड, मकरसंक्रांति, सह्याद्री, दुष्काळ, तानाजी, तालिबान, तिळगूळ, कोंडके, दादा, दिपावली, दुखणे, देवगिरी, तरुण, दौलताबाद, द्विराष्ट्र, धर्मनिरपेक्षता, धर्मांधता, नववर्ष, नक्षलवाद, ढसाळ, नामदेव, मालुसरे, पिढी, पंचतारांकित, डिप्लोमॅटीक, लेन, जेम्स, जेसिका, टिळक, टॅगी, टॅगा, टोपी, टोल, पाटील, तणाव, वाय, विश्वेश्वरय्या, काकोडकर, अनिल, सेन, विनायक, कोटणीस, निर्मुलन, पंढरपूर, भूजल, भास्करराव, मस्जिद, बाबरी, जांभेकर, बाळशास्त्री, बाळासाहेब, बीओटी, घोरपडे, देशपांडे, ब्रह्मदेश, ब्रिटीश, भन्नाट, भवानी, भारतमाता, भारतरत्न, भारतीयत्व, पातळी, बाजीप्रभू, बर्मा, पद्मदुर्ग, पुण्यतिथी, पन्हाळा, परंपरा, कृष्णा, परराष्ट्रमंत्री, परांजपे, पर्जन्यरोपण, पाकिस्तान, पावसाळा, प्रफुल्लकुमार, बबन, प्रशिक्षण, फाळणी, फुटबॉल, फुटीरवादी, फेसबुक, ट्रेडिंग, फॉरेक्, बंड, सरपोतदार, सामना, जीवधन, rayreshvar, pandharpur, panhala, pune, raigad, thakare, raj, ramjanbhumi, ruchika, pakistan, tendulkar, sachin, salher, sambalgad, sangramdurg, baba, sai, satya, pakistanजीना, padmdurg, shikh, manoj, kille, gandhi, kobad, kokandiva, lingana, lohgad, manmohangad, tirodkar, cinema, orkut, language, mns, mumbai, lig, muslim, myanmar, naxalist, nh4, savarkar, shivajimaharaj, bos, vinayak, sharma, utsav, shantaram, vari, vasai, sen, visapur, umaji, site, heritage, world, worldcup, worldcup2011, blogger, प्रायोजित, द्वारे, underi, naik, shivneri, rathod, shivsena, sindhudurg, sapkal, sindhutai, sinhgad, networking, social, socialist, sps, trading, sword, taktical, taliban, mahraj, temple, plaza, toll, torana, khudiram, khanderi, सालोटा, kejriwal, aanna, aarushi, aayodhya, aayurved, afspa, amruteshvar, arnala, arvind, ज्ञानेश्वर, bajiprabhu, thackrey, balasaheb, theater, bharatmata, burma, bussiness, cartoonist, hajare, हुकुमशहा, chavand, भांडेपाटील, साल्हेर, सपकाळ, सिंधुताई, सिंधुदुर्ग, सिंहगड, जोहर, सिद्दी, सीमा, सुर्यकांत, हिंदू, महोत्सव, सुवर्ण, स्मारक, सावरकर, स्वातंत्र्यवीर, हडसर, हास्य, हिंदु, cbi, china, kenjalgad, bill, gurucharan, year, new, happy, hindu, india, janjira, janlokpal, gtl, lane, jems, jesika, jinha, jivdhan, jokes, kashmir, kasmir, das, gadkot, cricket, anil, kondke, dada, daulatabad, detective, devgiri, diplomatic, diwali, kakodkar, kotnis, freedom, drinker, teacher, education, experience, festivals, fifa, football, fighter, जीवन, जीना, संपवण्यासाठी, दुर्गबांधणीचे, दिसते, घेतल्यावर, शोध, इथेच, गोष्ठी, पाहावेत, आवशेष, वैशिष्ट्यपूर्ण, भोवतीच, स्थलदुर्गाला, हवा, पाहिलाच, अवश्य, अभ्यासकांनी, दुर्गाला, बांधकाम, हस्तीनख, खंदकाच्या, वलय, जीभी, डॉक्टर, कधीना, पेशे, इत्यादी, कलाकार, इतिहासकार, संशोधक, दुकानदार, वकील, पत्रकारच, आढळतात, व्यवसाय, आढळणारा, कव्हर्ड, त्याला, इंग्रजीमध्ये, पाहण, अथवा, बांधकामाला, रोषाला, पंजाच, उभारणी, अंदाजे, कल्पना, विशाल, त्यावरून, राहिला, पायाचा, येण्याच्या, मूर्तीचा, त्यापैकी, ठिकाणे, पाहण्यासारखी, विहीर, जवळची, लालमहाल, बघण्यासारखे, हिंदुस्तानात, आधीची, आली, दरवाज्यावर, उभारण्यात, भिंत, भक्कम, दरवाजासमोर, भासू, रक्षण, होऊ, मारा, आल्या, अस्लुअने, शत्रुजवळ, ज्यावेळी, बाहेरून, दरवाजा, बळकटहि, द्वारसमूह, करणे, प्रवेश्द्वाराविषयी, समाजाच्या, कारणाने, रंजी, नागरिकच, बाकी, असेलतर, ठरवणे, अर्थ, पत्रकारांना, नागरिकावरील, त्यावरील, देशाचा, अशाच, तोही, समाजाचा, सापडल्यावर, प्रकरणात, होतेच, लोक, करण्यात, सौदेबाजी, लोकांनीही, त्यांच्यावरही, मिळाली, विषमतेला, त्याच, ठरवण्यात, यांना, कनिष्ठ, प्राप्त, श्रेष्ठत्व, व्यवहारी, बुद्धिवंत, प्रकारची, श्रेष्ठ, फोफावला, वर्णवर्चस्ववाद, वर्णवाद, दिली, पिडीत, सत्ताधारी, उच्चवर्णीय, स्पेक्ट्रम, मागणारे, सामोरे, लागेल, राहून, अलिप्त, प्रामाणिकपणे, संघटना, धरू, थीम, वाढीस, होणार, भावना, कोणी, होईल, झोडपलेले, कधीतरी, जमावाने, लागते, जावे, काम, हल्ल्याचा, हप्ते, सेवा, उखळनारे, खंडण्या, गैरवापर, त्याचा, असतो, दबदबा, त्यांचा, पुरवणारा, मानायची, तपास, समाजकार्य, कारवाई, लाऊन, त्यांच्यासाठी, आडून, करतीलच, पद्धतीने, पोलीस, कंधारमध्ये, हौद, जिहाद, आरुषी, आठवणी, हजारे, आण्णा, आदर्श, आभास, आयुर्वेद, आयोध्या, आरोळी, आँग, आषाढ, आळंदी, इख्लासखान, इस्लामीकरण, उंदेरी, शर्मा, नाईक, उमाजी, आठवण, सॅन, अनिस, १८५७, २००, अंधश्रद्धा, अध्यक्ष, आयोगाचे, अणुऊर्जा, अनाथ, अनुभव, विद्यापीठ, डीम्ड, अभिमत, अमृतेश्वर, केजरीवाल, अरविंद, अर्नाळा, राठोड, ओर्कुट, कृष्णराजसागर, चित्रपटगृह, गोपाल, बूट, गोल्डन, चंगळवाद, चमत्कार, चाकण, चावंड, चिमाजीआप्पा, आगरकर, चीन, छत्तीसगड, शिवाजी, छत्रपती, जंजिरा, विधेयक, लोकपाल, साधेसुधे, गणेश, गैरकारभार, कायद्या, कोहिनूर, काश्मीर, किंग्जफोर्ड, केंजळगड, केळकर, गांधी, कोबाद, कोल्हापूर, हिरा, क्रांतिकारक, गुरुचरण, क्रिकेट, खांदेरी, बोस, खुदिराम, गडकिल्ले, गांधींचे, गुडी, दास, सीबीआय, शब्दांचे, शीशमहाल, पाणी, यादव, राष्ट्रकुट, बांधणी, काळात, काकतीयांच्या, मिळते, झिरपून, विहारींनाही, आतल्या, उपयोग, दुसरा, पाण्याचा, खंदकातील, तीस, करण्यासारखी, अभ्यास, खलजी, घलक, खांद्काची, राणीमहाल, बारुदखाना, मशीद, बारादरी, जिने, दगडी, गाडे, फांचे, बुरुज, पडलेले, बहमनी, इतस्ततः, स्थलदुर्गात, राज्य, कंधारवरून, शाह्यानी, निजाम, निजामशाही, बरीद्शाही, रुंदी, भरलेला, पाखरे, पत्ता, मेल, तुमचा, करतोय, चिवचिवाट, येती, दिलेल्या, भेटी, पाखरांनी, एकूण, आतापर्यंत, कॉम, मंडळी, विश्व, डिसेंबर, पाण्याने, मुख्यपृष्ठ, खंदक, शाबूत, विलक्षण, स्थलदुर्ग, येथील, मराठवाड्यातील, जुनी, atom, घ्या, सदस्यत्व, पानावरून, लेखन, नविनतम, संग्रहण, पृष्ठे,
Text of the page (random words):
नव्हते स्टीवच्या आयफोन ने मला एका वेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे एक वेगळाच आनंद मला आयफोन वापरताना मिळाला आहे आयफोन ५ आल्यानंतर तो मी कोणत्याही परिस्थितीत घेणार होतो आणि माझा जुना आयफोन विकणार होतो परंतु आता मी तो जुना आयफोन विकेल असे वाटत नाही कारण तो स्टीवने बनवला आहे आयपॉड आयफोन आयपॅड आयक्लाउड हि स्टीवने जगाला दिलेली देणगी आहे आणि यासाठी आम्ही त्याचे कायम ऋणी राहू माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याला बौद्धिक सुखाचे एक नवीनच परिमाण देणाऱ्या सर्व ज्ञानेंद्रियांना सुखाची एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या आणि माझे छोटेसे आयुष्य समृद्ध करणाऱ्या स्टीव जॉब्स ना शतशा प्रणाम यास ईमेल करा हेब्लॉगकरा twitter वर शेअर करा facebook वर शेअर करा pinterest वर शेअर करा 2 प्रतिक्रिया गुरुवार २२ सप्टेंबर २०११ महागाईमधील स्वस्ताई लेखक विक्रम एक शांत वादळ टॅग्ज महागाई वर्तमानपत्र newspapers मागील काही दिवसापासून महागाईची जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे त्यात पेट्रोल डीझेलचे भाव वाढल्यावर तर सर्वत्रच याबाबत बोलले जाते तसेही सगळ्याच गोष्टी आजकाल महाग होत चालल्या आहेत यात वाद नाही परंतु मागील १० वर्षात एक गोष्ट महाग झाली नाही याबाबत कोणीही काही बोलत नाही किंवा चर्चाहि करत नाही ती माणसाची सवयच आहे म्हणा असो तर ती गोष्ट कोणती हे तुमच्या लक्षात आले कि नाही तुम्ही म्हणत असाल कि मागील १० वर्षात महाग झाली नाही अशी गोष्ट असणे शक्यच नाही परंतु तसे आहे त्या गोष्टीवर सर्व प्रकारच्या भाववाढीचे परिणाम होतात जसे डीझेल कागद शाई मनुष्यबळ या सर्वांचे परिणाम त्या गोष्टीवर होत असतात परंतु तरीही ती मागील काही वर्षात वाढली नाही परंतु काही वेळा ती स्वस्त झाली तर ती गोष्ट म्हणजे वर्तमानपत्र यात कधी भाववाढ झालेली तुम्हाला आठवते का उलट काही वर्षापूर्वी २ रुपयात दिले जाणारे वर्तमानपत्र आता १ रुपयात तेही भरपूर पाने आणि रंगबेरंगी पुरवण्यासहित मिळत आहे हे कसे शक्य होत असावे फक्त जाहिरातींच्या जोरावर कि समाजसेवेच्या भावनेतून ते स्वता तोटा सहन करून हे करत आहेत ज्या गोष्टीला तयार होण्यासाठी किमान ४ ५ रुपये खर्च येत असावा परत त्यावर वाहतूक खर्च विक्रत्यांचे कमिशन आलेच अशी गोष्ट फक्त १ रुपयात देणारे रोज लाखो रुपये तोटा सहन करून अजून तग धरून कसे काय टिकू शकतात व्यावसायिक स्पर्धेतून हे होत आहे हे जरी मान्य केले तरी हि वर्तमानपत्र कोणत्याना कोणत्या समूहाची बांधील आहेत आणि ते समूह कोणत्यातरी राजकीय पक्षाशी बांधील आहेत हे लक्षात येईल त्यामुळेच ते इथे तोटा सहन करून दुसरीकडे कोठेतरी याहून जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असावेत का स्वस्तात अंक देऊन ते सर्वसामान्य माणसाला आकर्षित करतात आणि एकदा सवय लागली कि जे त्यांना हवे आहे तेच वाचायला लावतात म्हणजेच ते आपलीच मते लोकांच्या मनावर बिंबवतात म टा पुण्यात आला त्यावेळी त्याने काय केले आठवा जरा किती रुपयात तो लोकांना दिला गेला आता विदर्भात दिव्य मराठी येत आहे १९९ रुपयात वर्षभर म्हणजे १ रुपयासुद्धा नाही दिवसाला काही दिवसापूर्वी वृतपत्र १ रुपयाला देण्यास काही विक्रेत्यांनी विरोध दर्शवला होता त्यावेळी लोकमत ने काय केले हेही आठवत असेलच जनतेपर्यंत कुठली माहिती कोणत्या स्वरुपात पोहचवायची हा निर्णय वरून घेतला जातो आणि त्याप्रमाणे गलेलठ्ठ पगार घेणारे संपादक मिंधे झालेले पत्रकार राग आवळतात आणि सामान्य माणूस तेच सत्य आहे याच समजुतीत वाचत राहतो यात तसा सामान्य माणसाचाही दोष आहेच स्वस्तात मिळणाऱ्या भरपूर पाने असणाऱ्या आणि रंगीत पुरवण्यांच्या मोहात अडकून आपण त्यांच्या आहारी जातो व सत्याचा पाठपुरवठा करणारी पत्रकारिता कचऱ्याच्या टोपलीत जाते अशी किती तरी चांगली वृतपत्रे मागे पडली किंवा बंद झाली आहेत या स्पर्धेमध्ये हे तुमच्या लक्षात येईल स्वस्तातील दारू स्वस्तातील औषधे शेवटी प्राणघातक असतात मग स्वस्तातील वर्तमानपत्र कितीही पानांचे आणि रंगीत असलेतरी ते भेसळयुक्त असणारच ना त्यातून खरी प्रबोधन करणारी माहिती कशी मिळणार आपणच विचार करा या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातून घेतले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र यास ईमेल करा हेब्लॉगकरा twitter वर शेअर करा facebook वर शेअर करा pinterest वर शेअर करा 7 प्रतिक्रिया बुधवार २७ जुलै २०११ राजमाची एक जोड किल्ला लेखक विक्रम एक शांत वादळ टॅग्ज अधित्यका इतिहास बालेकिल्ले श्रीवर्धन fort in maharashtra rajmachi राजमाची हा एक आगळावेगळा दुर्ग आहे त्याचे दोन बालेकिल्ले हे त्याचे वैशिष्ट्य श्रीवर्धन आणि मनरंजन अशी नावे असलेले हे बालेकिल्ले एकमेकांना पूरक आहेत कोकणातून देशावर येणाऱ्या घाटवाटेवर हा दुर्ग लक्ष ठेवतो लोणावळ्याहून उढेवाडीकडे चालत जाऊन राजमाचीवर जाता येते तर पुणे मुंबई रेल्वेमार्गातील खंडाळ्याच्या घाटात ठाकरवाडी या छोट्या स्थानकावर उतरून खाली कोंडाण्याचे लेणे पाहून मोठा चढ चढून राजमाचीवर जाता येते उढेवाडी एक छोटे टुमदार गाव आहे राजमाची ग्रामसहाय्य योजना या मुंबईच्या संस्थेने या छोट्या गावाचा विकास करण्यासाठी बर्याच योजना राबवल्या आहेत समोरच श्रीवर्धन हा बालेकिल्ला आहे दोन्ही बालेकिल्ल्यांमध्ये जवळच पाण्याची टाकी आहेत मनरंजन या बालेकिल्ल्यापेक्षा श्रीवर्धनची उंची थोडी अधिक आहे दुर्गात लेणी आहेत वरून मोठा प्रदेश पाहता येतो विसापूर लोहगड धक माहुली माथेरान असा चौफेर प्रदेश दृष्टीपथात येतो राजमाचीचे हे दोन बालेकिल्ले स्वतंत्र दुर्ग मानले जात या दोघांचे हवालदार वेगवेगळे असत शिवाजीमहाराजांनी इ स १६६१ मध्ये महिनाभर श्रीवर्धन गडावर मुक्काम केला होता गडाभोवती दाट झाडी आहे त्यात बिबट्याचा वावर आहे एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न आहे राज्यवहारकोषात बालेकिल्ल्याचा अधित्यका असा शब्दप्रयोग केला आहे दोन बालेकिल्ले हे एकमेकास पूरक आहेत म्हणून बांधून काढावेच लागले अर्थात दोन्ही अधित्यकांचा पसारा मोठा असल्याने स्वतंत्र गड म्हणूनही गणले जाऊ लागले दोन अधित्यका आणि तेच दोन स्वतंत्र गड असे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे पाण्याची टाकी लेणी दरवाजे तटबंदी अशा अनेक गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत खंडाळ्याच्या घाटातून एका बोगद्यातून दुसर्या बोगद्यात जाणार्या आगगाड्या न्याहाळताना फारच मजा येते यास ईमेल करा हेब्लॉगकरा twitter वर शेअर करा facebook वर शेअर करा pinterest वर शेअर करा 0 प्रतिक्रिया मंगळवार २१ जून २०११ प्रत्येकालाच वेगळा कायदा करायचा का लेखक विक्रम एक शांत वादळ टॅग्ज जे डे निखील वागळे पत्रकार पत्रकार journalism मिड डे समाजात लोकोपयोगी कार्य व्यवसाय व्यवहार करणारे फक्त पत्रकारच आहेत का डॉक्टर वकील शिक्षक दुकानदार संशोधक इतिहासकार कलाकार पत्रकार इत्यादी असे अनेक पेशे आहेत जे लोकोपयोगी कार्य करत असतात त्यातल्या प्रत्येकालाच कधीना कधी समाजाच्या रोषाला या न त्या कारणाने सामोरे जावे लागते त्यातल्या प्रत्येकालाच जमावाने कधीतरी झोडपलेले असते कारण सामान्य माणूस त्यांच्यावर जेवढे प्रेम करतो तेवढाच काही प्रसंगी संतप्तही होतो अशा प्रसंगाला व्यावसायिक धोका असे म्हणतात त्यात पत्रकारसुद्धा येतात मग त्यांना खास संरक्षण किंवा कायदा याची गरज का असावी पत्रकारितेवरील हल्ला आणि पत्रकारावरील हल्ला यात फरक आहे मिड डे चे पत्रकार जे डे आणि निखील वागळे यांच्यावरील झालेले एखाद्या संघटनेचे हल्ले यात फरक आहे डे यांनी समाजातील अपप्रवृत्ती आणि गुन्हेगारी यांचा मुखवटा फाडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांच्यावर समाजातील खरया गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे त्यामुळे अशा हल्ल्यांकडे गुन्हा म्हणून पाहण्यास हवे परंतु एखाद्या व्यक्तीला किंवा राजकीय पक्षाला लक्ष बनवून हेतुपूर्वक हैराण किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न लिखाणातून होतो तेंव्हा होणारा हल्ला हा त्याची प्रतिक्रियाच असते त्यामुळे त्यांनी मर्यादा पाळणे गरजेचे असते पत्रकारिता आणि पक्षीय राजकारण यातील रेषा धूसर असते आणि ती पत्रकाने ओलांडू नये अलीकडे काही लोकांकडून त्याचे भान न ठेवले गेल्याने अशे हल्ले वाढले आहेत तसेच आजकाल पत्रकारांच्या सुरक्षेसाठी किंवा होणार्या हल्ल्यासंदर्भात खास कायदा करण्याची मागणी होत आहे विशेष म्हणजे समतेचे पुरस्कार करणारे विचारवंत आणि पत्रकार यासाठी आग्रही आहेत एकीकडे शाहू फुले आंबेडकर यांच्या समतेचे डोस पाजायचे आणि दुसरीकडे अशा कायद्याने सामान्य माणूस आणि पत्रकार अशी दरी निर्माण करायची हे मोठे चमत्कारिक आहे हा विरोधाभास नाही का समता म्हणजे सर्व समान किंवा सर्वांसाठी समान मग तो कायदा असो न्याय असो किंवा वागणूक पूर्वीच्या काळी असे होते उच्चवर्णीय सत्ताधारी लोकांना वेगळी आणि पिडीत शोषित लोकांना वेगळी वागणूक दिली जात असे त्यामुळेच पूर्वीच्या काळी वर्णवाद वर्णवर्चस्ववाद फोफावला होता त्या लोकांना आम्ही श्रेष्ठ विचारवंत बुद्धिवंत म्हणून खास वागणूक मिळाली होती आणि व्यवहारी श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते आणि कनिष्ठ शोषित यांना दुय्यम ठरवण्यात आले होते आणि त्याच विषमतेला संपवण्यासाठी शाहू फुले आंबेडकर यांनी त्यांची पूर्ण हयात घालवली होती हि विषमता मोडून पुन्हा समता प्रस्थापित करण्यासाठी शेकडो लढे द्यावे लागले कितीतरी वर्ष खर्च करावी लागली आणि आता पुन्हा अशीच वेगळ्या प्रकारची विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे पत्रकार हा समाजाचा घटक नाही का तोही देशाचा एक सामान्य नागरिकच आहे त्यावरील हल्ला आणि सामान्य नागरिकावरील हल्ला यात फरक का असावा पत्रकारांना विशेष कायदा करण्याचा अर्थ सामान्य माणसाला दुय्यम ठरवणे नाही का असेच असेलतर लोकोपयोगी व्यवहार करणाऱ्या बाकी लोकांनीही अशाच वेगळ्या कायद्याची मागणी करायची का कारण त्यांच्यावरही असे हल्ले झालेले आहेत पत्रकार खूप मोठे समाजकार्य करतो असे मानायची गरज नाही तो लोकोपयोगी सेवा पुरवणारा एक घटक आहे परंतु त्यांचा समाजात जो दबदबा असतो त्याचा गैरवापर करणारे हि भरपूर आहेत खंडण्या उखळनारे हप्ते मागणारे काही पत्रकार नाहीत का २ जी स्पेक्ट्रम मध्ये सौदेबाजी करण्यात काही लोक पुढे होतेच ना अशा प्रकरणात पत्रकार सापडल्यावर त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून कोणती पत्रकार संघटना कधी पुढे येत का जर पत्रकारांनी प्रामाणिकपणे अलिप्त राहून काम केले तर असे हल्ले होणार नाहीत डे यांच्यावरील हल्ल्याचा तपास पोलीस त्यांच्या पद्धतीने करतीलच परंतु त्यांच्या आडून पत्रकारांनी त्यांच्यासाठी वेगळ्या कायद्याची मागणी लाऊन धरू नये त्यामुळे समाजात विषमता निर्माण होईल आणि मी पत्रकार म्हणजे वेगळा कोणी व सामान्य माणूस म्हणजे दुय्यम अशी भावना वाढीस लागेल जय हिंद जय महाराष्ट्र या लेखातील मुद्दे भाऊ तोरसेकर यांच्या लेखातील आहेत यास ईमेल करा हेब्लॉगकरा twitter वर शेअर करा facebook वर शेअर करा pinterest वर शेअर करा 6 प्रतिक्रिया मंगळवार २६ एप्रिल २०११ रेवणीचे अवशेष आढळणारा कंधार लेखक विक्रम एक शांत वादळ टॅग्ज इतिहास कंधार किल्ले गडकोट दुर्ग रेवणी fort in maharashtra kandhar fort मराठवाड्यातील कंधार येथील स्थलदुर्ग विलक्षण देखणा आहे त्याची तटबंदी शाबूत आहे खंदक पाण्याने भरलेला आहे खांद्काची रुंदी अभ्यास करण्यासारखी आहे तीस मीटर्स तरी असेल खंदकातील पाण्याचा दुसरा उपयोग म्हणजे आतल्या विहारींनाही त्याचे पाणी झिरपून मिळते काकतीयांच्या काळात या दुर्गाची बांधणी झाली असावी राष्ट्रकुट यादव खलजी तु घलक बहमनी बरीद्शाही निजामशाही मुघल निजाम अशा अनेक शाह्यानी कंधारवरून राज्य केले कंधारच्या या स्थलदुर्गात जुने अवशेष इतस्ततः पडलेले आहेत राणीमहाल बुरुज तटबंदी तो फांचे गाडे दगडी जिने बारादरी मशीद मूर्तीचे अवशेष बारुदखाना शीशमहाल हौद का रंजी असे बरेच कंधारमध्ये बघण्यासारखे आहे लालमहाल आणि जवळची विहीर हि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत मूर्तीचे जे अवशेष आहेत त्यापैकी एका मूर्तीचा एक पायाचा पंजाच काय तो राहिला आहे पण त्यावरून ती मूर्ती किती विशाल असेल याची कल्पना आपल्याला येते ती मूर्ती अंदाजे २२ मीटर्स उंच असावी कंधार दुर्गाची उभारणी तोफा हिंदुस्तानात येण्याच्या आधीची अस्लुअने त्याच्या प्रवेश्द्वाराविषयी चर्चा करणे आवश्यक आहे हा द्वारसमूह देखणा आणि बळकटहि आहे लाकडी दरवाजा हा पूर्वी बाहेरून दिसत असल्याने ज्यावेळी शत्रुजवळ तोफा आल्या आणि दरवाज्यावर मारा होऊ लागला त्यावेळी त्याचे रक्षण करण्याची गरज भासू लागली त्या लाकडी दरवाजासमोर एक अतिशय भक्कम भिंत उभारण्यात आली अशा बांधकामाला जीभी अथवा हस्तीनख असे म्हणतात असे बांधकाम कंधारच्या दुर्गाला आहे दुर्ग अभ्यासकांनी कंधार अवश्य पाहिलाच हवा स्थलदुर्गाला आवश्यक अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण दुर्गबांधणीचे आवशेष पाहावेत एक गोष्ठी इथेच आहे परंतु खूप शोध घेतल्यावर दिसते खंदकाच्या भोवतीच वलय म्हणजे रेवणी रेवणीचे अवशेष येथे आढळतात ते पाहण गरजेचे आहे इंग्रजीमध्ये त्याला कव्हर्ड वे असे म्हणतात यास ईमेल करा हेब्लॉगकरा twitter वर शेअर करा facebook वर शेअर करा pinterest वर शेअर करा 5 प्रतिक्रिया जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ याची सदस्यत्व घ्या पोस्ट atom मागील पानावरून नविनतम लेखन ब्लॉग संग्रहण 2012 1 मार्च 2012 1 माहुली सुळक्यांचा गड 2011 13 ऑक्टोबर 2011 1 सप्टेंबर 2011 1 जुलै 2011 1 जून 2011 1 एप्रिल 2011 4 फेब्रुवारी 2011 4 जानेवारी 2011 1 2010 47 नोव्हेंबर 2010 1 ऑक्टोबर 2010 3 सप्टेंबर 2010 2 ऑगस्ट 2010 3 जुलै 2010 6 जून 2010 2 एप्रिल 2010 3 मार्च 2010 6 फेब्रुवारी 2010 8 जानेवारी 2010 13 2009 32 डिसेंबर 2009 12 नोव्हेंबर 2009 3 ऑक्टोबर 2009 3 सप्टेंबर 2009 10 ऑगस्ट 2009 4 तुमचा ई मेल पत्ता सध्या मी काय करतोय चिवचिवाट अशी पाखरे येती जीवनमूल्य ला आतापर्यंत एकूण पाखरांनी भेटी दिलेल्या आहेत मराठी मंडळी कॉम ब्लॉग विश्व शब्दांचे ढग कृष्णराजसागर सीबीआय १ मे १८५७ २०० अंधश्रद्धा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अधित्यका अनाथ अनिस अनुभव अभिमत डीम्ड विद्यापीठ अमृतेश्वर अरविंद केजरीवाल अर्नाळा आँग सॅन सू की आठवण आठवणी आण्णा हजारे आदर्श आभास आयक्लाउड आयपॅड आयपॉड आयफोन आयुर्वेद आयोध्या आरुषी आरोळी आषाढ आळंदी इख्लासखान इतिहास इस्लामीकरण उंदेरी उत्सव उत्सव शर्मा उपदुर्ग उमाजी नाईक एस पी एस राठोड ओर्कुट कंधार कायद्या काश्मीर किंग्जफोर्ड किल्ले केंजळगड केळकर कोबाद गांधी कोल्हापूर कोहिनूर हिरा क्रांतिकारक क्रिकेट खांदेरी खुदिराम बोस गडकिल्ले गडकोट गांधींचे विचार गुडी पाडवा गुरुचरण दास गैरकारभार गोपाल गणेश आगरकर गोल्डन बूट चंगळवाद चमत्कार चाकण चावंड चित्रपट चित्रपटगृह चिमाजीआप्पा चीन छत्तीसगड छत्रपती शिवाजी जंजिरा जन लोकपाल विधेयक जिहाद जीना जीवधन जीवन जे डे जेम्स लेन जेसिका टिळक टॅगा टॅगी टोपी टोल डिप्लोमॅटीक डी वाय पाटील डॉ विश्वेश्वरय्या डॉ अनिल काकोडकर डॉ विनायक सेन डॉ कोटणीस तटबंदी तणाव तरुण पिढी तानाजी मालुसरे तालिबान तिळगूळ दसरा दादा कोंडके दिपावली दुखणे दुर्ग दुष्काळ देवगिरी दौलताबाद द्विराष्ट्र धर्मनिरपेक्षता धर्मांधता नववर्ष नक्षलवाद नामदेव ढसाळ निखील वागळे निर्मुलन पंचतारांकित पंढरपूर पत्रकार पत्रकार journalism पद्मदुर्ग पन्हाळा परंपरा परराष्ट्रमंत्री एस म कृष्णा परांजपे पर्जन्यरोपण पळसगड पाऊस पाकिस्तान पाडवा पावसाळा पुणे पुण्यतिथी प्रफुल्लकुमार प्रशिक्षण फाळणी फुटबॉल फुटीरवादी फेसबुक फॉरेक् स ट्रेडिंग बंड बबन बर्मा बाजीप्रभू देशपांडे बाबरी मस्जिद बालेकिल्ले बाळशास्त्री जांभेकर बाळासाहेब ठाकरे बीओटी बॅ भास्करराव घोरपडे ब्रह्मदेश ब्रिटीश भंडारदुर्ग भन्नाट माणूस भवानी तलवार भारतमाता भारतरत्न भारतीयत्व भूजल पातळी मकरसंक्रांति मदत मनमोहनगड मनोज तिरोडकर मराठी मराठी अमराठी मराठी चित्रपट मराठी ब्लॉगर्स मल्टीप्लेक्स महागाई महाराष्ट्र मागधी माझ्याबद्दल मामा मालवण माहुली मिड डे मिश्रदुर्ग मी मुख्य अभियंता मुघल मुली मुस्लीम मुस्लीम लीग मुहर्त मेवाती म्यानमार राज ठाकरे राजेश तलवार रामजन्मभूमी रामोशी बेरड रायगड रायरेश्वर रुचिका रेवणी लष्कर विशेषाधिकार लक्ष्मीपूजन लिंगाणा लैंगिक छळ लोकप्रतिनिधी लोकशाही लोणावळा लोहगड वर्तमानपत्र वसई वारकरी विकास विजयादशमी विनयभंग विनोद विभाजन विश्वकप विश्वकप २०११ विसापूर वैद्य राजवैद्य व्यसन व्ही शांताराम शंकराचार्य शनिवार वाडा शहीद शिरीष कणेकर शिवजयंती शिवनेरी शिवभारत शिवसामर्थ्य शिवसेना शिवसेनाप्रमुख शिवसैनिक शिवाजीमहाराज शिवाजीमहाराजांचे मंदिर शिक्षक शिक्षण शीख शुभारंभ शेअर बाजार कमोडिटी शौरसेनी श्रद्धा श्रद्धांजली श्रीवर्धन संग्रामदुर्ग संत तुकाराम संबळगड संवादकौशल्य संस्कृती संस्थापक सक्कर सचिन तेंडूलकर सच्चा मित्र सण सत्य साईबाबा समाज सरपोतदार सह्याद्री सामना सालोटा साल्हेर सिंधुताई सपकाळ सिंधुदुर्ग सिंहगड सिद्दी जोहर सीमा सुर्यकांत भांडेपाटील सुवर्ण महोत्सव स्टीव जॉब स्मारक स्वतंत्र स्वातंत्र्यवीर सावरकर हडसर हास्य हिंदु हिंदू हुकुमशहा ज्ञानेश्वर aanna hajare aarushi aayodhya aayurved afspa amruteshvar apple arnala fort arvind kejriwal bajiprabhu balasaheb thackrey bharatmata theater burma bussiness cartoonist cbi chavand china cricket dada kondke daulatabad fort detective devgiri fort diplomatic diwali dr anil kakodkar dr kotnis drinker education teacher experience facebook festivals fifa football fort fort in maharashtra freedom fighter gadkot gtl gurucharan das happy new year hindu india iphone janjira fort janlokpal bill jems lane jesika jinha jivdhan jokes kandhar fort kashmir kasmir kenjalgad khanderi fort khudiram bos kille kobad gandhi kokandiva lingana fort lohgad fort maharashtra mahulifort manmohangad manoj tirodkar marathi marathi cinema marathi language mns mumbai muslim lig myanmar naxalist newspapers nh4 orkut padmdurg fort pakistan pakistanजीना pandharpur panhala fort pune raigad fort raj thakare rajmachi ramjanbhumi rayreshvar ruchika sachin tendulkar salher fort sambalgad sangramdurg satya sai baba savarkar shikh shivaji maharaj shivajimaharaj shivneri fort shivsena ...
|