Meta tags:
Headings (most frequently used words):
तू, 2023, blog, 23, sunday, saturday, कोण, होतास, काय, झालास, 2020, महाराष्ट्रातील, कचाटयात, तरुण, पिढीचे, परिषद, भवितव्य, कंत्राटदारांच्या, फोटो, छायाचित्र, पत्रकारिता, अशीही, जर्नलिझम, जगभरात, गाजलेली, काही, छायाचित्रे, व्हाटस, ऍपचे, तरुणाईवर, गारुड, report, पत्रकार, संवादक, वास्तव, may, january, 2024, tuesday, december, 19, november, 11, april, आणि, february, search, this, about, me, archive, followers, marathiblogvishwa, friday, माध्यमे, abuse,
Text of the page (most frequently used words):
आहे (105), आणि (82), #आहेत (47), #पत्रकार (43), #नाही (42), व्हाटस (41), असे (35), #काही (26), #वृत्तपत्र (24), #छायाचित्र (24), #होती (22), #मात्र (21), #त्या (21), त्यामुळे (20), होते (19), समाज (18), share (18), झाली (18), जात (17), अनेक (16), केली (16), #तरुण (16), माध्यम (15), झाले (15), अशी (15), केले (14), कंत्राटी (14), वृत्तपत्रे (14), एका (14), यांनी (13), फोटो (13), वापर (13), आम्ही (13), केला (13), सरकारी (13), निर्माण (13), आता (13), त्यांना (13), अधिक (12), ऍपचा (12), काय (12), असते (11), माध्यमे (11), केवळ (11), प्रश्न (11), असा (11), याचा (10), काम (10), अशा (10), आले (10), पत्रकारिता (10), लोक (10), परिषद (10), रोटी (10), अथवा (9), कंत्राटदार (9), बातम्या (9), 2023 (9), देखील (9), आपल्या (9), प्रयत्न (9), आली (9), मध्ये (9), संदेश (8), तरी (8), शिवसेनाप्रमुख (8), भारतातील (8), नोक (8), त्यांनी (8), होता (8), विचार (8), सर्व (8), माध्यमातून (8), ठाकरे (8), असलेल्या (8), करून (8), हाती (8), झाला (8), त्यात (7), संख्या (7), वृत्तपत्रांनी (7), कालखंडात (7), वृतपत्र (7), april (7), करीत (7), टीव्ही (7), february (7), करता (7), बातमी (7), जगभरात (7), च्या (7), कोणत्याही (7), कोण (7), पत्रकारांना (7), लोकांच्या (7), किंवा (7), खरे (7), घेऊन (7), जाते (7), आदमी (7), काळात (7), this (7), सरकार (7), कर्मचारी (6), खूप (6), मोठी (6), संपादक (6), बंद (6), माहिती (6), सम्राट (6), निकालो (6), बाळासाहेब (6), प्रा (6), जाहीर (6), वृत्तपत्रात (6), भवितव्य (6), त्याला (6), सर्व्हिसेस (6), येणार (6), विविध (6), मोठ्या (6), बाहेर (6), म्हणून (6), मालक (6), घेतला (6), blogthis (6), सामान्य (6), email (6), जातात (6), twitter (6), facebook (6), प्रकार (6), pinterest (6), comments (6), करुन (6), 2020 (6), करण्यात (5), वर्षे (5), परिषदेला (5), करण्याची (5), ठेवले (5), भारतीय (5), सुरुवात (5), may (5), म्हणजे (5), मोठा (5), कमी (5), पत्रकारांनी (5), कारण (5), पाच (5), सुरू (5), नंतर (5), भारतात (5), भारत (5), कायम (5), हजार (5), यात (5), इत्यादी (5), निर्णय (5), 000 (5), यांची (5), विरोधी (5), विश्वासार्हता (5), शेषन (5), भूमिका (5), होतो (5), यांच्या (5), अगदी (5), चार (5), मला (5), यांचा (5), इंडिया (5), लागले (5), छायाचित्रकार (5), ज्या (5), परिस्थिती (5), संदेशाची (5), कोटी (5), कर्मचा (5), याची (5), सम्राटांनी (5), याचे (5), बेरोजगार (5), त्याचा (5), विरुद्ध (4), मालकांनी (4), कोणी (4), त्याचे (4), शासनाने (4), तेव्हा (4), छोटी (4), स्पर्धा (4), महाराष्ट्र (4), वृत्तपत्रातील (4), गेली (4), करणारे (4), माध्यमांचे (4), क्षेत्रामध्ये (4), असल्याचे (4), विकत (4), करतात (4), बारा (4), नोकरभरती (4), अँकर (4), तुम्ही (4), फक्त (4), आपली (4), लक्षात (4), पाहिले (4), वास्तव (4), वाटत (4), वृत्तपत्रांची (4), गांधी (4), आपले (4), दोन (4), लोकप्रिय (4), पुढे (4), होतील (4), त्यांची (4), आजच्या (4), सत्ताधारी (4), नये (4), असतो (4), प्रत्येक (4), भाग (4), यांचे (4), असेल (4), जॉन (4), भाषा (4), पगार (4), दिले (4), छायाचित्रे (4), महाराष्ट्रात (4), त्याने (4), कंत्राटदारांच्या (4), सांगितले (4), जर्नलिझम (4), द्वारे (4), छायाचित्राच्या (4), खाता (4), त्यावर (4), पुन्हा (4), january (4), ऍपचे (4), असतात (4), december (4), वृत्तपत्राचे (4), सर्वसामान्य (4), सरकारला (4), सोडून (4), असल्याने (4), गारुड (4), घेतली (4), गरज (4), पिढीने (4), होतास (4), पिढीचे (4), झालास (4), दिली (4), माणूस (4), बेलता (4), कधी (4), इतर (4), म्हणाले (4), करण्यासाठी (4), फायदा (4), मुख्य (3), blog (3), बाबासाहेब (3), तलवार (3), लेखन (3), नफा (3), सत्य (3), फार (3), आपल्याला (3), वाटू (3), जाणे (3), आंबेडकर (3), आलेल्या (3), वृतपत्रे (3), करते (3), जाहिराती (3), बहिष्कार (3), नाहीत (3), याच (3), यासाठी (3), पद्धतीने (3), नव्हे (3), वेगवेगळ्या (3), पत्रकाराला (3), व्यवसाय (3), जाणार (3), तसे (3), महाराष्ट्रातील (3), एखाद्या (3), एखादे (3), नोकरी (3), घेवाण (3), खींचो (3), व्यंगचित्र (3), कॉम (3), देवाण (3), शोध (3), व्दारे (3), जातो (3), स्थानिक (3), सध्या (3), मराठवाडा (3), कमान (3), खोट (3), त्याची (3), वृत्तपत्रांच्या (3), फेब्रुवारी (3), घेतले (3), पक्षाचे (3), अख़बार (3), किंमत (3), देऊन (3), सारे (3), आहोत (3), रोजी (3), विशेष (3), कथा (3), असताना (3), वाढली (3), भारतावर (3), लिहिलेला (3), न्यूज (3), इलाहाबादी (3), इंग्रजांची (3), अकबर (3), राजवट (3), खोट्या (3), मदतीने (3), स्वतंत्र (3), नामविस्तार (3), तोप (3), करण्याचा (3), हॉटेलमध्ये (3), बेरोजगारांची (3), पंचतारांकित (3), छापून (3), केलेल्या (3), कशी (3), जेव्हा (3), फेसबुक (3), आपण (3), माध्यमांनी (3), जनतेशी (3), घातला (3), मुक़ाबिल (3), होऊ (3), तीसरा (3), लाख (3), कला (3), दृश्य (3), प्रकारच्या (3), तीन (3), नोकरीस (3), असत (3), राज्य (3), शासकीय (3), आला (3), देशातून (3), घटना (3), बाजूला (3), march (3), जगातील (3), उपस्थित (3), june (3), रंगीत (3), निवडणूक (3), जबाबदारी (3), घेतात (3), इंग्रज (3), संपादकांना (3), जास्त (3), किमान (3), देशात (3), पध्द्तीने (3), येथे (3), बदलण्याची (3), लोकांना (3), वाईट (3), माध्यमांची (3), इंदिरा (3), आणीबाणी (3), प्रमाणात (3), देण्यात (3), काळामध्ये (3), दिसते (3), एकदा (3), साध्या (3), मुख्यमंत्री (3), शकणार (3), बनले (3), पैसा (3), होईल (3), लागणार (3), दिला (3), november (3), करणे (3), यासारख्या (3), महात्मा (3), सांगू (3), म्हणणे (3), काळ (3), सर्वच (3), 2024 (3), उदाहरणे (3), देवाणघेवाण (3), सुरु (3), मुलांना (3), बाजू (3), अंकाच्या (2), नॅशनल (2), निषेधार्ह (2), देशभरात (2), आवश्यक (2), प्रसिध्द (2), कारणीभूत (2), संधी (2), देतात (2), दृष्टी (2), करत (2), फोटोंच्या (2), परिणाम (2), निवड (2), आणून (2), म्हणूनच (2), लांगूलचालन (2), असू (2), महत्त्व (2), करताना (2), अपेक्षा (2), माणसाला (2), त्यामुळेच (2), दक्षिण (2), ताकद (2), वृत्तपत्रांमध्ये (2), स्वातंत्र्यानंतरच्या (2), व्यक्ती (2), कुशल (2), पत्रकारितेत (2), एखादा (2), देतो (2), संपूर्ण (2), गोष्ट (2), स्वातंत्र्य (2), माणसे (2), मुलांचे (2), टाइम्स (2), लोकमान्य (2), यांना (2), मॅककुरी (2), काढले (2), असतील (2), लिहिले (2), दृष्टिकोन (2), पंतप्रधान (2), नव्हता (2), आयुक्त (2), संपल्यावर (2), खूपच (2), 9860091855 (2), तिने (2), नव्हते (2), परंतु (2), एकत्र (2), विद्यापीठाचा (2), होण्याची (2), यातील (2), चिंचोलकर (2), कधीच (2), लागला (2), प्रसिद्ध (2), दुसऱ्या (2), औरंगाबादला (2), जशी (2), मागे (2), क्षण (2), वातावरण (2), देश (2), यांच्यासह (2), रहे (2), अफगाण (2), कुणाला (2), पाकिस्तान (2), करतो (2), पवार (2), चर्चा (2), शरद (2), लोकशाही (2), युक्तिवाद (2), शिकत (2), छावण्या (2), पूर्वी (2), लढा (2), धर्म (2), ग्रुप (2), गमावून (2), म्हटले (2), आयोजकाला (2), वेगळे (2), स्वातंत्र्यलढ्याच्या (2), पंधरा (2), भाष्य (2), आजवर (2), त्याच्या (2), पानांचे (2), वाचकाला (2), किमतीमध्ये (2), कमीत (2), शिवसैनिकांना (2), मालामाल (2), कंपन्या (2), चॅनल (2), साहित्य (2), देण्यास (2), शाई (2), पत्रकारांमध्ये (2), करावी (2), वृत्तकागद (2), भाव (2), हवेत (2), यंत्रसामुग्री (2), टक्के (2), सवलती (2), तडजोडी (2), शंका (2), उद्या (2), पडू (2), वाट्टेल (2), जाहिरातींसाठी (2), झालेल्या (2), पेन्शन (2), ठरेल (2), चालणारी (2), रुपयाला (2), सामाजिक (2), कुठलीही (2), हॉटेल (2), महागडी (2), शिवसेनाप्रमुखांनी (2), शिक्षक (2), चांगले (2), पदे (2), खालीलप्रमाणे (2), करण्यास (2), स्पष्ट (2), पदवी (2), वृतपत्रांची (2), theme (2), तिथे (2), 800 (2), दिवाळी (2), दिल्या (2), वाढत (2), खुली (2), प्रगत (2), कंत्राटदारांमार्फत (2), झाडावर (2), प्रकारची (2), निमशासकीय (2), इंटरनॅशनल (2), राज्यात (2), भरल्या (2), जागा (2), आयटी (2), इंटेलिजन्स (2), सिक्युरिटी (2), बदल (2), मोठे (2), खात्यातील (2), उपयोग (2), भरडला (2), एकाधिकारशाही (2), दिवस (2), त्यांचे (2), असलेले (2), पक्षाच्या (2), नेत्यांनी (2), विरोध (2), सरकारतर्फे (2), तीच (2), सभेसाठी (2), saturday (2), जिथे (2), हाच (2), अर्थ (2), स्फोटक (2), प्रश्नावर (2), विद्यार्थी (2), साधी (2), शासन (2), गुन्हेगारी (2), बनली (2), येते (2), आयोजित (2), असलेला (2), नसलेल्या (2), नकळत (2), संज्ञापन (2), नकोशी (2), रंजन (2), प्रकाशित (2), होय (2), दिशा (2), योग्य (2), पडतो (2), म्हणतात (2), परिणामी (2), कायदे (2), माध्यमांवर (2), प्रमुख (2), जेवढे (2), परिषदेतून (2), नोकरीची (2), शकत (2), नोकरदारास (2), झालेले (2), अनुभव (2), धरला (2), देणे (2), जनतेचे (2), एकंदरीत (2), बांधिलकी (2), ज्यांची (2), कोठे (2), स्वतः (2), दहा (2), करावे (2), उत्तर (2), वयोमर्यादा (2), संघटना (2), वृत्तपत्राने (2), एकंदर (2), येथून (2), प्रशिक्षण (2), हिंदी (2), घेता (2), शिवसेनाप्रमुखांना (2), आरक्षण (2), वेळ (2), तिस (2), आपसात (2), कणाहीन (2), घेत (2), कंत्राटदारामार्फत (2), दावा (2), वर्षात (2), असणार (2), होणार (2), जनसंपर्क (2), वाचकापर्यंत (2), सहभागी (2), कोणते (2), पोहोचविणे (2), याला (2), posts (2), ज्यांच्या (2), टाईम्स (2), प्राप्त (2), अब्दुल्ला (2), मदत (2), येऊन (2), तसेच (2), वृत्तपत्राची (2), परिस्थितीत (2), ठरले (2), दररोज (2), पत्रकारितेचा (2), कचाटयात (2), दिलेली (2), तरुणाईवर (2), सर्वाधिक (2), हवे (2), बाजार (2), कुर्दी (2), सिर्फ़ (2), शक्ती (2), गमती (2), जीव (2), खेलता (2), एकमेकांना (2), पाठविले (2), मैं (2), पूछता (2), हूँ (2), धाक (2), यंत्रणा (2), निघाले (2), असले (2), वीस (2), पिढीवर (2), मागील (2), पर्यंत (2), होत (2), येईल (2), चित्र (2), वर्षाच्या (2), पूर्ण (2), अकरा (2), व्हावे (2), जनतेची (2), लक्ष (2), नागरिक (2), गंभीर (2), जाणारी (2), गेले (2), आल्या (2), छापलेले (2), मिळतो (2), मिळते (2), अनेकांचे (2), निमंत्रित (2), परदेशी (2), व्टिटर (2), sunday (2), यशस्वी (2), पेक्षा (2), करण्याचे (2), कागदावर (2), घरात (2), विचारले (2), घालण्यात (2), नाव (2), तशी (2), पाहता (2), दिनांक (2), भांडवलदारांनी (2), 1990 (2), किती (2), त्यातील (2), july (2), छायाचित्रात (2), ठिकाणी (2), रस्त्यावर (2), 2013 (2), शाळेत (2), 2015 (2), सुविधा (2), व्हिडिओ (2), शिक्षकांनी (2), सहज (2), आवडते (2), खेळायला (2), जैन (2), ब्रायन (2), त्यावेळी (2), दंगा (2), बसलेली (2), वृत्तपत्रांवर (2), शकते (2), कधीही (2), पडले (2), आणीबाणीच्या (2), प्रमाणे (2), मुलीला (2), सोलापूर (2), बसलेले (2), मिळविण्यासाठी (2), तिच्या (2), लोकप्रियता (2), येतो (2), अलीकडच्या (2), टिळक (2), वाट (2), वाटचालीमध्ये (2), कालखंडामध्ये (2), करायला (2), परवानगी (2), मुलाचा (2), लागली (2), असावे (2), जाहिरातीच्या (2), आयलान (2), 2019 (2), हळूहळू (2), अब्ज (2), दीड (2), लोकांची (2), पिढी (2), जगभरातील (2), अमेरिकेतील (2), सवंग (2), संवादक (2), home (2), एकंदरच, अंक, सुटका, वृत्तपत्रांकडे, स्थिती, सद्यस्थिती, घ्यायचे, कशासाठी, सहीसलामत, त्यांच्या, गमावलेली, शिवसेनाप्रमुखांबद्दल, आस्था, शिवसेना, नियमित, चांगली, प्रश्नांशी, पडलो, पुरेशा, परिषदा, सदैव, राहतीत, वाचन, पूर्वप्रसिद्धी, अशीही, ओळी, शक्तीही, ठामपणे, अखबार, माझे, वडील, बिकते, सांगायचे, एबी, सुना, लिहिणार, माझ्या, केव्हाच, काहीही, बिघडलेली, दिनो, कबूल, आहेच, केल्यावर, वृत्तपत्रातून, बिक, राहिलेली, छपा, वावगे, हद्दपारच, मराठी, सरकारवर, कारणे, रक्कम, तोटा, जाहिरातीतून, तोट्यात, प्रचंड, निघेल, चॅनल्स, स्थितीत, शिकवणे, नाममात्र, काढावा, दर्शकांकडून, चालविणे, बातम्यांसाठी, विकले, असला, डॉक्टरांवर, अवघ्या, रुपयाचे, शिक्षकांवर, भरून, लागतो, 200, भांडवलदारांची, चालवत, ताब्यात, आमचा, व्यवसायामध्ये, मिळवण्याचा, त्यांनीच, अधिकार, चॅनल्सही, क्षेत्रात, निष्कर्ष, स्वीकारतात, प्रत्येकाला, प्रकारचा, मालकांकडून, मुले, प्रबोधनात्मक, अवलंबित्व, भांडवलदारांवर, बडया, जवळ, काढायचे, जागतिकीकरण, मिळविणे, परखड, चॅनल्सची, इच्छा, वृतपत्रांना, व्ही, बहुराष्ट्रीय, सत्ताधार्, दौरे, वृत्तपत्रासाठी, समाजाचे, उद्योगांसाठी, मिळवणे, बाजारपेठ, जगाची, जागतिकीकरणामुळे, याकडेच, परावलंबित्व, लागलेले, जनतेच्या, मांडण्याची, चालविण्याची, ज्याप्रमाणे, जागतिक, सेवेची, त्याप्रमाणे, देण्याची, समाजाला, जागृत, दाखवण्याची, मालकी, झालेली, क्षेत्रे, मागविण्यास, झपाट्याने, स्पर्धेसाठी, भरपूर, चतुराईने, दबाव, संस्थां, येऊ, नयेत, टीव्हीशी, सरकारकडून, बांधून, इंग्रजांना, खुर्चीला, करावा, आयोजन, सभेचे, मैदानात, महाविद्यालयाजवळील, भुवन, सरस्वती, विरोधकांतर्फे, तापलेले, मराठवाड्यात, त्यावेळचे, प्रसंग, बोलण्यासाठी, काळातील, होण्याआधीच्या, घंटा, वाचक, वृत्तपत्रांपासून, दिवसेंदिवस, दूर, वृत्तपत्रांचा, अट्टाहास, धरून, सभेत, संख्येने, ळासाहेब, दैनिकाने, वाक्य, खोचक, गये, दबाके, लोकांच्याही, दुम, वाघाचे, असायलाच, खाली, शेपूट, औरंगाबादच्या, धोक्याची, बाब, परत, विनंती, मुद्रित, अहमदनगर, पोलिसांनी, कारने, मुंबईहून, राहण्यासाठी, वक्ते, वृत्तपत्रांसाठी, आठवते, घटनेनंतर, subjects, रवींद्र, friday, mainly, deals, with, पूछने, सवाल, the, समझते, related, राहतील, होशियार, mass, बहोत, खुदको, तुम, communication, पाहून, हसू, छद्मीपणाने, वाटून, नामशेष, नामधारी, दुसरी, फटकारल्यावर, दर्जाहीन, उचलूनही, मान, पुढच्या, संपेपर्यंत, पडला, चेहरा, पत्रकाराचा, काळातही, त्याा, करो, बजाय, मुँह, अपना, दिखा, किसे, बत्तीसी, ठेवली, काळानंतर, भाषण, त्याखाली, दिवसांनी, शिवसैनिकांनी, बहुतांश, बसले, व्यवसायात, चढून, संयुक्तिक, लोकसेवेसाठी, आजची, दिशेने, वाटेल, पसरले, भेटीच्या, निघतात, खोल्यांमध्ये, कालखंड, चोप, येणाऱ्या, पुढचा, संताप, पाहत, बाबत, पक्षा, सारा, मुद्दा, हॉटेलमधील, लपून, लावून, जाण्याचा, पकडून, चढलेल्या, बसला, मार, साथ, कर्मचाऱ्यांनीही, युनियन, मूलभूत, शिवसेनेची, कहर, झालेला, बातमीच्या, समूहाची, पळून, काहींनी, बसण्याचा, कुटुंबामार्फत, चालविली, त्यातले, समीर, आम्हाला, मिळणारा, लागलो, हॉटेलच्या, औरंगाबाद, काढला, हजर, निमंत्रणानुसार, तुमच्या, गोष्टीला, मगच, चालते, शोधून, प्रतिनिधी, पद्धतशीरपणे, काटा, उडवली, मांडली, खिल्ली, आठवले, कोरोनाच्या, तेवढ्यात, अनेकांच्या, विराजमान, खुर्चीवर, आमंत्रण, पोहोचू, शकली, ऐनवेळी, लिहितात, अख्खे, छापाल, निघा, बदलले, परिषदेची, ऐकताच, देऊ, खात्री, छापेल, चालणार, माघार, गेल्याची, वृतपत्रांचा, हाकलून, त्यादरम्यान, कोणताही, करायची, मान्य, उरलेला, कोणालाही, मानतो, अपमान, पत्रकारांचा, लिखाण, सरकारची, बाहेरील, आढावा, वृत्तपत्रांचे, शिव, सिन्हा, गुळगुळीत, सुशांत, नाऊ, कुमार, शुभ्र, नाविका, समूह, नेटवर्कच्या, आरूर, सावंत, चोप्रा, गौरव, त्रिपाठी, चित्रा, चौधरी, सुधीर, नेटवर्कचे, टुडे, लियाकत, रुबिका, गोस्वामी, अर्णब, अमन, अमिश, रिपब्लिक, डीडी, छपाईसाठी, दिसत, घडताना, प्रथमच, मागविण्याची, समावेश, मिळाली, श्रीवास्तव, अशोक, न्यूजचे, त्यागी, देवगण, भांडवली, अदिती, एक्सप्रेसच्या, पाराशर, प्राची, यासाठीची, टीव्हीच्या, नरसिंहन, आनंद, सीएनएन, टीव्हीचे, ज्यांच्यावर, स्वीकार, स्वत्व, बेरोजगारी, आठपानी, दारिद्रय, धोका, लोकशाहीलाही, घेणे, वाचकांना, नकोसे, विचारापेक्षा, मांडणी, माध्यमेच, रंगाच्या, सजावट, वृत्तपत्राच्या, महत्वाची, होण्यासाठी, सदृढ, प्रगल्भ, प्रश्नांची, गोष्टींना, क्षेत्रातील, साखळी, चालविणाऱ्या, आरोग्य, शेतमालाचे, आरोप, रंगांमध्ये, सोळा, पानी, भरवतात, द्वेषाचा, सांगता, मिळत, कृष्णधवल, अँकरवर, आघाडीने, बनवली, आघाडी, दुष्काळ, येत, पक्षांनी, अशातच, ठेवण्याचे, गुंतवून, प्रश्नात, भावनिक, ठेवून, लोकांचे, यासारखे, काळपट, मालकांना, तेवढेच, विरोधाभास, वृतसंस्था, महसूल, अधिकाऱ्यांची, नेत्यांना, घ्यावी, जाणीव, शस्त्र, महत्त्वाचे, लढण्यासाठी, सेन्सॉरशिप, लादण्यात, इंग्रजांच्या, भारतीयांचे, वर्तमानपत्र, स्वतःचे, देण्यासाठी, खंबीरपणे, इंग्रजांविरुद्ध, नेत्याने, गांधींना, कार्यरत, पठाविणे, आझाद, मौलाना, भारताचे, लिहिण्यापूर्वी, शंकर, नेतृत्वाखालील, संघटित, शक्तीचा, प्रत्यय, काळच्या, हातून, यावरून, मिळून, लढ्याला, सत्ता, असल्यामुळे, शोषण, सामील, चळवळीत, असंतोष, बंधने, जनजागृतीमुळे, पाहिजे, घालवले, तुंरुंगात, टाकण्यात, निदर्शनास, लेख, 1977, उठल्यानंतर, पक्षांनीही, राहिले, बरोबर, त्यानंतरच्या, तारीख, वर्ष, आपणाला, अजूनही, संपादकांमध्ये, परंपरा, शिल्लक, केलेली, बाणेदार, टिकून, यांच्यासारख्या, विचारलेल्या, भारताने, जागतिकीकरणाचा, रॉय, मोहन, राम, राजा, टाकणे, अँकर्सवर, सांगतात, हेच, निवडणुकीमध्ये, पक्षाचा, गणेश, नेहरू, गांधींचे, जवाहरलाल, पंडित, ठरला, प्रेरणादायी, नेतृत्व, काँग्रेस, शेर, उपकार, दारुण, tuesday, पराभव, जनता, सत्तेवर, सिद्ध, रविंद्र, सौजन्याने, सुवर्णधन, वाटावे, अनुभवाला, ओळखाव्या, ठाम, सम्राटांच्या, नेत्याची, सभा, धुमाकूळ, याविषयी, भारतीयांच्या, फोनच्या, स्मार्ट, हवा, मालकीची, विश्लेषण, समाजमाध्यमे, एखादी, इन्स्टाग्राम, स्वरूपाचे, युट्यूब, माणसाच्या, नसताना, खोटे, कुठलेही, पोहोच, गती, ठरवणे, बनतील, रिल्स, बसली, सर्वसामान्यांचा, निवडणुकीच्या, इतरांना, नसायचे, वेळोवेळी, गोपनीय, विचारधारा, सारले, भारतीयांची, स्वतःच, असली, मिरवू, प्राण, टाकून, सर्वसामान्यांना, अपवाद, वगळता, पेड, तडजोडींमध्ये, नशा, उतरणारी, गुंग, मानन्यात, पूर्णतः, धन्यता, आवाज, सर्वांच्या, विकून, प्रमाणामध्ये, पडली, क्रिकेट, अडचणीत, क्षेत्रांशी, आर्थिक, निगडित, बातम्यांना, मध्यम, जपणारी, संस्कृती, प्रसिद्धी, सेलिब्रिटी, कोंडीमुळे, दाखविला, वैचारिक, रस्ता, हद्दपार, घरचा, अग्रलेखांची, लांबी, अग्रलेखच, नाहीसे, अभिरुची, समाजसेवेसाठी, सोडविण्यास, वाचकाच्या, सर्वस्वी, दृष्टीने, अवघड, बातम्यांचा, लेखनाचा, प्रारंभापासून, शतकाच्या, स्तर, एकविसाव्या, ॲक्सेस, तंत्रज्ञानाच्या, लोकशिक्षण, सिनेमा, प्रबोधन, सॉफ्टवेअर्सचा, वृत्तपत्रांमधील, कोणत्या, जास्तीत, चालवितो, मिळविल्यास, वाचल्या, लढ्यात, चालवित, तशा, ठाऊकही, वृतपत्राचे, कशा, बुद्धिमत्तेचा, विदेशी, देशी, हातमिळवणी, पक्षाशी, भांडवलदारांच्या, मांडायला, सर्वसामान्यांचे, पक्षाची, हातात, नसून, कृत्रिम, तेच, वळविले, समाजात, बदलाचे, दिशेला, ठराविक, राजकीय, साधन, बिंबवले, मनावर, अत्यावश्यक, वस्तू, निश्चिंत, राजकारणी, मानणारी, म्हणीप्रमाणे, मासा, फेक, लहान, माशास, पसरविण्यास, व्यवस्था, करू, गिळतो, प्रयत्नही, घेण्याचा, माहितीरंजनाच्या, पडतील, कालखंडातील, जाणून, कळू, देशभरातील, शेवटपर्यंत, पाहिली, चांगल्या, टाकत, गुंगवून, मायाजालात, महागड्या, गाजविण्याचा, फसविले, माध्यमांमुळे, जडले, व्यसन, अनेकांना, रंगा, अपुरे, संरक्षण, फसवणुकीस, होणाऱ्या, परदेशात, सायबर, अण्णा, अनंत, डोकेदुखी, वैद्य, द्वेषमूलक, जाणाऱ्या, संचार, ओळख, संपादकाचे, अग्रलेख, पसरविल्या, माध्यमांद्वारे, वाचण्यासाठी, भालेराव, पदोपदी, अधिराज्य, बनला, मनावरही, वृतपत्रासारखी, राहतात, ध्येयवादी, विसंबून, काळाच्या, पडद्याआड, संपादकाच्या, नावाने, प्रबोधनाविषयीचे, विषयासंबंधीचे, चंचल, बळी, वृत्तीने, भडीमार, रंजनाचा, ओळखली, माधव, दाखविणे, गडकरी, लोकसत्ता, जनतेला, गोविंद, तळवळकर, बोलू, simple, विचारला, निलोफर, शरीराचे, मेल्यानंतर, मुलगी, अवस्थेत, मरणासन्न, कुपोषणामुळे, मिळाला, पुरस्कार, पुलित्झर, प्रतिष्ठेचा, छायाचित्रासाठी, डेमीर, किनाऱ्याला, तोडण्यासाठी, वाहून, मृतदेह, घातलेला, चड्डी, निळ्या, शर्ट, लाल, मृत्यू, उलटून, बोट, समुद्रातच, एजियन, बोटीतून, लचके, पाहणारे, कॅनडाला, दुष्काळात, जून, जिओग्राफिकच्या, दर्शवते, वास्तविक, संघर्षाचे, लोकांवर, दुःख, देशांमधील, युद्धग्रस्त, काढली, झालेल्यांची, उपासमार, सुदानमधील, गिधाड, 1993, कार्टर, केव्हिन, आफ्रिकेतील, आत्महत्या, महिन्यानंतर, केव्हीनने, निराश, जगभरातून, केव्हीनवर, टीका, असल्याचेही, तिच्यामागे, जाण्यासाठी, कुटुंब, मुखपृष्ठावर, करायचा, समज, अनेकजण, app, messaging, instant, मानतात, रंजक, गरिबीने, युक्रेनमधील, दुकानांमध्ये, media, त्यां, कंपनीमध्ये, याहू, जाऊन, अमेरिकेमध्ये, मैत्री, यांच्यासमवेत, अॅक्टन, तेथे, आयफोन, टप्पा, गप्पा, मित्रमंडळींना, social, सारखे, धरुन, अपघातात, मुठीत, सप्टेंबर, कंटाळून, यादवीला, सीरियातील, आयलानचे, काढलेले, गमावले, पत्नीला, मुलासह, वर्षांच्या, गालेब, आयलानसह, पिळवटणारे, घालण्याचे, काळीज, व्हाट, विशेषतः, घटनेला, प्रारंभ, धनी, टीकेचे, त्याचबरोबर, मिळविली, वाटचाली, मांडण्याचा, लेखाजोखा, 1985, वर्षानंतर, भोजनासाठी, युद्धाच्या, कुबड्या, ठेवलेल्या, मागची, इमारत, छान, चिरेबंदी, हिरवळ, बाकी, सगळे, व्यवस्थित, काढताना, हसत, परिणामाविषयी, छत्र्याच्या, गरजच, युद्धावरच्या, फोटोच्या, संग्रहातला, फोटोग्राफरने, दाखवण्यासाठी, रूढ, मार्गाने, जाता, वेगळ्या, तऱ्हेने, दाखवून, होत्या, जागी, इथे, सीमेवर, हात, नव्हताच, युद्धकाळातलाही, युद्धानंतर, वर्षानी, विशिष्ट, बटालियनमधले, काहीजण, खुर्चीत, उभे, टिपिकल, फोटोतल्या, माणसांना, पाय, बसायची, कुणाचा, जबडा, फाटलेला, कुणाच्या, गमावलेल्या, डोळ्यावर, कायमची, काळी, पट्टी, चढलेली, छत्र्या, फोटोला, त्याकाळात, निर्वासितांच्या, ओळखले, मुलीचे, छावणीत, सांगताना, आठवण, डोळ्यांच्या, हिरव्या, मुली, ज्यामध्ये, सापडला, तंबू, उभारलेला, शाळा, मुलींचा, मॅककुरीला, बागच्या, शोधले, नासिर, पाहिल्या, पेशावरच्या, काढण्यासाठी, छावण्यांचे, निर्वासित, सीमेवरील, जिओग्राफिकने, स्टीव्ह, 984, समजले, गुल, शरबत, तरूणीला, वर्षांची, गाजलेले, निघून, सर्वात, शतकातील, विसाव्या, अजरामर, यामुळे, अभिव्यक्ती, पार्श्वभूमी, प्रकाश, डोळ्यातील, टिपला, वळून, क्षणात, जाऊ, उठली, लाजाळू, क्षणांनंतर, पाहिला, कॅमेराही, तिचे, तिलाही, तशीच, उत्सुक, तिच्याविषयी, वाटते, शक्यता, सहमत, प्रथम, वाटलं, करा, येणा, कशाने, कुर, धुळे, नागरिकांना, परिसरातील, मंगळवेढा, सोलापूरच्या, घटनेमध्ये, अशाच, भारतातही, घडलेल्या, एखाद, बदनाम, व्यक्तीला, पुणे, साक्री, लागलेली, एमआयडीसी, फिरत, खोटी, जोडलेला, व्हिडिओदेखील, तसा, त्यामध्ये, घडत, सातत्याने, गोष्टी, कुंभ, जिल्ह्यातील, घटनाही, जमावाने, वापरले, उपकरणांची, नवीन, वाची, कोणतेही, म्हणता, नसते, करणाऱ्यांना, लागतात, भोगावे, सर्वांना, दुष्परिणाम, उद्देशाने, घडल्या, हल्ला, गटाने, कार्यकर्ते, मानवाधिकार, चौदाशे, घडलेली, ऍपच्या, वर्षांत, पसरवण्याचे, मारण्यात, जीवे, जमावाकडून, संदेशामुळे, ठार, चोरली, शेअरबजार, 2017, search, about, chincholkar, ravindra, profile, complete, view, archive, 2018, 2012, subscribe, october, september, august, 2011, followers, marathiblogvishwa, abuse, report, luoman, blogger, powered, images, छायाचि, atom, स्वरुपाची, मधील, इस्त्राईल, तंत्रज्ञान, सुधारणा, सेवेमध्ये, परीने, तोकडे, गारु, संमोह, राहायचे, उथळ, वरून, अडकून, older, नात, ठेवता, विश्वास, माहितीवर, करण्या, आळा, प्रकाराला, पसरविण्याच्या, यावर, ठरते, कितपत, अवलंबून, नवे, पाठवता, कंपनीने, एवढी, डॉलर, मिलियन, अस्तित्व, विलीन, घडीला, देशांमध्ये, स्टेटस, सहा, पाठवतात, भाषांमध्ये, कर्ते, 1182, 180, सरासरी, एकट, कोटींपेक्षा, देशातील, परिभाषा, नवी, भाषेत, आपापल्या, घातले, अक्षरशः, 2014, मार्क, कारभार, इंग्रजीत, लावला, सहका, ऍक्टन, यचा, आठवडयात, कॉमने, गांजलेला, निर्मिती, चालले, बोलताना, झुकरबर्ग, what, विचारण्यासाठी, ऍपला, त्यारुनच, करणाऱ्या, मोठ, त्यावेळेला, खरेदी, वेधले, त्याकडे, कंपन्यांचे, फेसबुकने, 4300, पसंती, नियम, उपलब्ध, जाणवते, कारणांचा, तेच्या, आलेले, दिसून, फायदे, समाजघटकांसाठी, समाजातील, हवामानाची, शेतकऱ्यांना, आलेली, जकांना, कार्यामध्ये, विधायक, पाठवून, ग्रामस्थांना
Text of the page (random words):
ठ्या संख्येने सभेसाठी आले होते परिस्थिती स्फोटक बनली होती या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईहून कारने निघाले होते मात्र परिस्थिती स्फोटक असल्याने पोलिसांनी अहमदनगर येथून विनंती करून त्यांना परत पाठविले त्यावर औरंगाबादच्या एका हिंदी दैनिकाने शेपूट खाली केलेल्या एका वाघाचे व्यंगचित्र छापून ठाकरे दुम दबाके भाग गये असे खोचक वाक्य त्याखाली लिहिले या घटनेनंतर काही दिवसांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुन्हा औरंगाबाद येथे आले एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला सर्व वृत्तपत्रांच्या पत्रकारांना आमंत्रण देण्यात आले होते सर्व पत्रकार आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खुर्चीवर विराजमान झाले पत्रकार परिषदेला सुरुवात होणार होती तेवढ्यात शिवसेनाप्रमुखांना आठवले की एका हिंदी वृत्तपत्राने व्यंगचित्र छापून त्यांची खिल्ली उडवली आहे तेव्हा त्यांनी पत्रकारांना विचारले की त्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत काय मी होय असे उत्तर दिले त्यावर शिवसेनाप्रमुख म्हणाले त्या पत्रकारांनी येथून चालते व्हावे मगच पत्रकार परिषद होईल आम्ही या गोष्टीला विरोध केला आणि सांगितले की तुमच्या पक्षाच्या निमंत्रणानुसार सर्व पत्रकार या ठिकाणी हजर झालेले आहेत आता ऐनवेळी एखाद्या पत्रकाराला पत्रकार परिषदेतून हाकलून देणे हा एकंदरीत सर्वच पत्रकारांचा अपमान आहे असे आम्ही मानतो त्यामुळे कोणालाही या पत्रकार परिषदेतून बाहेर जाणे सांगू नये शिवसेनाप्रमुखांनी हे मान्य केले आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करायची असे ठरले मात्र त्यादरम्यान पुन्हा शिवसेनाप्रमुखांना शंका आली आणि ते म्हणाले उद्या तुम्ही असे छापाल की शिवसेनाप्रमुखांनी माघार घेतली तर ते चालणार नाही आम्ही त्यावर सांगितले की उद्या कोण काय छापेल याची खात्री कोणी देऊ शकणार नाही उत्तर ऐकताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला पत्रकार परिषदेची काही गरज नाही तुम्ही निघा असे सांगितले त्यामुळे ती पत्रकार परिषद सोडून आम्ही त्या पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर पडू लागलो हा सारा प्रकार पाहत असलेल्या शिवसैनिकांना याचा खूप संताप आला त्यामुळे त्यांनी फक्त पुढचा विचार न करता बाहेर येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला चोप देण्यास सुरुवात केली त्यामुळे पत्रकारांमध्ये भेटीच्या वातावरण पसरले आणि वाटेल त्या दिशेने पत्रकार पडू लागले हॉटेल बाहेरील झाडावर चढून बसले तर कोणी हॉटेलमधील खोल्यांमध्ये लपून बसण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बाहेर रस्त्यावर पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात कहर म्हणजे त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेची कर्मचारी युनियन होती त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनीही शिवसैनिकांना साथ दिली काही पत्रकारांना खूप मार बसला झाडावर चढलेल्या पत्रकारांना पकडून शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये खुर्चीला बांधून ठेवले नंतर शिवसेना किंवा शिवसेनाप्रमुखांबद्दल काहीही वावगे लिहिणार नाही हे कबूल केल्यावर त्यांची सुटका झाली आम्ही तीन चार पत्रकार मात्र सहीसलामत बाहेर पडलो अशा काही पत्रकार परिषदा सदैव लक्षात राहतीत अशा आहेत पूर्वप्रसिद्धी एबी मराठी दिवाळी अंक at november 11 2023 no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest sunday april 23 2023 महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या कचाटयात एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है वह सिर्फ़ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ यह तीसरा आदमी कौन है कवी धूमिल यांनी एका कवितेतून संसदेला विचारलेला हा प्रश्न आता महाराष्ट्र सरकारला विचारण्याची वेळ आली आहे कारण आता महाराष्ट्रातही या तिस या व्यक्तीचा प्रवेश होतो आहे शासनाने विविध खात्यात नोकरभरती जाहीर करावी आणि तरुण पिढीने त्या नोक या मिळवाव्या हे अपेक्षित असते मात्र आता कंत्राटदार या तिस या पात्राच्या हाती सारी सूत्रे सोपविली जात आहेत सरकारी नोक यांचे खाजगीकरण केले जात असल्याने त्याचे भयंकर चटके तरुण पिढीला सोसावे लागणार आहेत केंद्रीय कामगार मंत्राालयाच्या शासकीय अहवालानुसार सध्या महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या 38 लाखांपेक्षा अधिक आहे त्यात पुरुष बेरोजगार 28 लाख 56 हजार महिला बेरोजगार 9 लाख 44 हजार आणि ट्रान्सजेंडर बेरोजगार 230 आहेत बेरोजगारांची आकडेवारी मोजण्याची पध्द्तीही सदोष आहे अनेक बेरोजगार नोंदही करीत नाहीत हे विचारात घेतल्यास एकट्या महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा अधिक बेरोजगार असू शकतात 20 ते 30 वयोगटातील आजूबाजूच्या तरुण पिढीकडे पाहिल्यास 10पैकी केवळ 3 जण कंपन्या किंवा इतरत्र नोकरीस असलेले दिसतात सरकारी नोकरभरती बारा वर्षांंपासून बंदच असल्याने सरकारी कार्यालयात आधीपासूनच कंत्राटी पध्द्तीने कर्मचारी नेमून कामे करुन घेतली जात आहेत 12 ते 25 हजाराच्या तुटपुंज्या पगारावर दहा बारा वर्षापासून काम करणारे असे कंत्राटी कर्मचारी यावर्षी कामावर घेतात की नाही या भीतीसह दरवर्षी मुलाखतीला सामोरे जातात त्यांना आजवर निदान सरकारर्तर्फे कंत्राटी म्हणून नेमले जात होते आम्ही सरकारी नोकरीत आहोत असे ते म्हणू शकत होते मात्र आता त्यांना सरकार नव्हे तर कंत्राटदार नेमणूकपत्र देणार आहे म्हणजे त्या कंत्राटी कर्मचा यासाठी आयुक्तापेक्षाही कंत्राटदार हा मोठा आणि मालक असणार आहे सरकारी नोकरांचा पगार आणि पेन्शन याचा अर्थव्यवस्थेवर मोठा भार अहे त्यामुळे विकासकामांसाठी पैसा पुरत नाही हे कारण पुढे करुन सरकारी नोक यांच्या खाजगीकरणाचा मार्ग सरकारने स्वीकारला आहे कंत्राटदारामार्फत नोकरदार नेमल्याने राज्य शासनाच्या खर्चात 20 ते 30 टक्के बचत होईल असा दावा सरकारतर्फे केला जात आहे विविध खात्यातील 75 हजार जागा या कंत्राटदारांमार्फत भरल्या जाणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे महाराष्ट्र राज्यात शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये यापुढे पाच वर्षात भरली जाणारी 136 प्रकारची पदे नऊ खाजगी संस्थाव्दारे कंत्राटी पध्द्तीने भरण्यात येणार आहेत हा शासन निर्णय 14 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आलाआहे त्यामुळे कोणत्याही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाला आता या कंत्राटदार संस्थाच्या मार्फत कंत्राटी नोकरभरती करावी लागणार आहे आधीच बेकार्रीने गांजलेल्या महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या हवाली करण्याचा हा निर्णय आहे देशात आणि महाराष्ट्रात आजवर जिथे जिथे कंत्राटी पध्द्तीने नोक या दिल्या गेल्या तिथे तिथे कंत्राटी कर्मचा यांची पिळवणूकच झाली आहे यात सर्व फायदा कंत्राटदारांनी लाटला आहे महाराष्ट्रात महामार्ग तयार करण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले त्याथून काही रस्ते चांगले झाले मात्र कंत्रटदारांनी दहापट वसुली करुनही टोल बंद होण्याऐवजी टोलचे दर वाढत आहेत सर्वसामान्य माणूस त्यात भरडला जात आहे कंत्राटी नोकरभरतीत यापेक्षा काही वेगळे घडेल अशी अपेक्षा करुन उपयोग नाही विविध खात्यातील 75 हजार जागा या कंत्राटदारांमार्फत भरल्या जाणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे महाराष्ट्र शासनाने चार संवर्गात या कंत्राटी पदांची वर्गवारी केली आहे ती खालीलप्रमाणे कामाचे स्वरुप पदाचा प्रकार पात्रता अनुभव पगार अकुशल शिपाई हेल्पर स्वीपर इ अट नाही एक ते दोन वर्षे 25 000 ते 28 800 अर्धकुशल सुतार माळी स्टोअर असिस्टंट इ बारावी किमान दोन वर्षे 25 000 ते 32 800 कुशल ग्रंथपाल जनसंपर्क अधिकारी निरीक्षक इत्यादी पदवी व तत्सम किमान 1 ते पाच वर्षे 27 500 ते 71 000 अतिकुशल शिक्षक अधीक्षक अभियंता लेखापाल मिडिया एक्सपर्ट इत्यादी पदवी बीई पाच ते वीस वर्षे 27500 ते 2 92 000 ही एकंदर 75 000 पदे भरण्यासाठी निवडण्यात आलेल्या कंत्राटदार संस्थांची नावे खालीलप्रमाणे आहेत ॲक्सेस टेक सर्व्हिसेस लि सीएमएस आयटी सर्व्हिसेस प्रा लि सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा लि एस २ इन्फोटेक इंटरनॅशनल प्रा लि सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा लि सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा लि उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा लि या कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत त्यांची कार्यपध्द्ती कशी आहे हे प्रश्न तूर्त बाजूला ठेवले तरीही या कंत्राटदारांच्या हाती सोपविल्या जाणा या तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आहे हे उघड सत्य आहे सरकारी नोकरी आता विसरा हाच एकमेव अर्थ यातून निघतो कंत्राटदारामार्फत का होईना आम्ही नोक या देतोय असा दावा यासंदर्भात केला जात आहे मात्र मागील बारा वर्षात सरकारी नोकरभरती न झाल्याने बेकारांची संख्या खूप वाढली आहे वयोमर्यादा संपून अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्णत्वास जाणे अशक्य झाले आहे एक दोन वर्षांनी नोकरीची वयोमर्यादा वाढविणे हा यावरचा उपाय नाही कंत्राटीकरणामुळे नोकरदारास कायम नोकरीची कुठ्लीही हमी राहणार नाही त्याची नोकरी कायम कंत्राटी राहील तो अनुभव इतर नोकरीस पात्र धरला जाणार नाही कंत्राटदार नोकरदारास कधीही नोकरीवरुन काढू शकेल त्याबाबत कोठे दादही मागता येणार नाही सरकारी नोकर जे काम करतात त्यापेक्षा अधिक काम कंत्राटी कर्मचा यांना जवळपास निम्म्या वेतनावर करावे लागणार आहे जेवढे दिवस काम केले तेवढ्याचाच पगार मिळैल हक्काच्या सुट्या रजा भत्ते पदेान्नती यासारख्या सवलती हद्द्पार होणार आहेत कंत्राटदार या कर्मचा यांचे मालक होतील त्यांनी कमी पगार दिला पिळवणूक केली तरी साधी तक्रारही करता येणार नाही पगारवाढ हा शब्दच विसरावा लागेल पेन्शन ग्रॅच्युइटी याचे तर नावही काढता येणार नाही कंत्राटदार आरक्षण आणि गुणवत्ता यासारख्या नियमांचे पालन करतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल याशिवाय कायम नोकरी नसल्याने कंत्रटी कर्मचा यांचे लग्न होऊ शकणार नाही नैराश्याच्या गर्तेत तरुण पिढी सापडेल यासारख्या सामाजिक समस्याही निर्माण होतील वर्षभर कुठलीही सुटी न घेता शेतात राबणारा शेतकरी शेतीमालास भाव न मिळाल्याने जसा हवालदिल होतो आणि व्यापारी काही तासात फार्से श्रम न करता मालामाल होतो तसे यात कंत्राटी कर्मचारी वेठबिगारांसारखे राबतील पण कंत्राटदार मात्र मालामाल होतील महाराष्ठ्रतील बेरोजगारांची संख्या लक्षात घेता 75 हजार नोक या नगण्य आहेत या सरकारी नोक यात आरक्षण मिळावे यासाठी विविध जाती संघटना आरक्षणाची मागणी करीत लाखोंचे मोर्चे काढीत आहेत आणि आपसात भांडत आहेत आता सरकारी नोक याच नाहीत हे वास्तव कोणी लक्षात घेत नाही विशेष म्हणजे जेव्हा हा शासन निर्णय जाहीर झाला तेव्हा विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यास वरवरचा विरोध दर्शविला मात्र तुम्ही सत्तेत असताना घेतलेला निर्णय आम्ही अमलात आणीत आहोत असे सरकारतर्फे सांगताच सारे चिडीचूप झाले सरकार कोणत्याही पक्षाचे असो धोरणे तीच असणार हाच याचा अर्थ आहे एरवी साध्या साध्या प्रश्नावर आंदोलने करणा या एकाही विद्यार्थी संघटनेने याबाबत साधी प्रतिक्रीयाही नोंदविलेली नाही हे विसेष आहे सरकारी नोकरांच्या कर्मचारी संघटना कायम पेन्शनच्या आश्वासनात दंग आहेत आपलीच लेकरे असणा या तरुण पीढीचे भवितव्य आपण नासवतोय याचे भान कोणालाच नाही एकंदर तरुण पिढीसमोर असलेल्या खाजगीकरणाच्या आणि कंत्राटी नोकरीच्या संकटाला कोणीही वाली नाही तरुण पिढीने आता स्वप्ने तरी कशी पाहायची एक भयाण वास्तव त्यांना गिळंकृत करण्यासाठी वाट पाहते आहे यातील काही भाग दिव्य मराठीच्या दिनांक 23 एप्रिल 2023 च्या अंकात प्रकाशित झाला आहे at april 23 2023 no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest saturday may 2 2020 छायाचित्र पत्रकारिता फोटो जर्नलिझम छायाचित्र पत्रकारिता फोटो जर्नलिझम हा पत्रकारितेचा एक विशेष प्रकार आहे छायाचित्राच्या मदतीने बातमी वाचकापर्यंत पोहोचविणे याला छायाचित्र पत्रकारिता म्हणतात सामान्य पत्रकारितेमध्ये बातमी केवळ भाषा आणि शब्दांद्वारे संकलित केली आणि प्रकाशित केली जाते मात्र छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या बातम्या किंवा बातम्यांची कथा वाचकांपर्यंत पोहोचविल्यास त्या अत्यंत प्रभावी ठरतात छायाचित्राच्या माध्यमातून जो पत्रकारिता करतो त्याला छायाचित्र पत्रकार म्हणतात प्रसिध्द छायाचित्र पत्रकार रघु राय यांच्या मते एखादया प्रसंगाच्या पाठीमागे असणारे सत्य छायाचित्राच्या माध्यमातून जो प्रखरपणे पुढे आणतो तोच खरा छायाचित्र पत्रकार होय घटना सोपी करुन सांगणे हा संज्ञापनाचा मूळ हेतू असतो शब्दांपेक्षा दृश्य माध्यमातून संज्ञापन अधिक प्रभावीपणे साधता येते म्हणूनच वृत्तपत्रात बातम्यांबरोबर छायाचित्रांचा वापर केला जातो छायाचित्रांप्रमाणेच व्यंगचित्र नकाशा आलेख रेखाटन कल्पनाचित्रे आदींचा वापर करुन संज्ञापन साधले जाते छायाचित्र पत्रकारितेसाठी पत्रकारितेची दृष्टी असलेला छायाचित्रकार आवश्यक असतो कोणत्याही घटनेचा सर्वांत महत्त्वाचा नेमका क्षण कॅमेऱ्याने टिपणे यातच त्याचे कौशल्य असते वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध करताना त्याच्या तांत्रिक गुणवत्तेपेक्षा त्यातील पत्रकारिता मूल्यास अधिक महत्त्व दिले जाते प्रसिद्धीसाठी निवड करताना छायाचित्र बातमीला पूरक आणि छापण्यायोग्य असावे अशी अपेक्षा असते त्याखेरीज ते बनावट दिशाभूल करणारे न्यायालयीन कारवाई ओढवून घेणारे वाचकावर विपरीत परिणाम करणारे हीन अभिरुचीचे असू नये असे काही निकषही पत्रकारितेत मानले जातात एखादा छायाचित्र पत्रकार शब्दांऐवजी फोटोंच्या माध्यमातून आपली बातमी दृष्टिकोन कथा माहिती देतो म्हणूनच छायाचित्र पत्रकार एक कुशल छायाचित्रकार असणे आवश्यक आहे परंतु छायाचित्र पत्रकार केवळ छायाचित्रकार नसतो फोटोंच्या माध्यमातून सांगायचं असलं म्हणून पत्रकाराची शोधक दृष्टी त्याच्याकडे असणंही महत्त्वाचं आहे जगभरात गाजलेली काही छायाचित्रे 1 छायाचित्र कला हीसुद्धा विविध दृश्य आपल्या कॅमेऱ्यात पकडते आणि ती क्षणचित्रे छायाचित्रकार साकार करतो छायाचित्रकला ही एक कला नव्हेच असा एक युक्तिवाद पूर्वी केला जात असे एखादे दृश्य निवडायचे चौकटीत आणायचे आणि फोटो घ्यायचा यात कला कुठे आहे ते केवळ एक तंत्र आहे असेच म्हटले जात असे परंतु जेव्हा आशय आणि दृष्टिकोन भरलेली छायाचित्रे छायाचित्रकार साकारू लागले तेव्हा जगाला यातील कलेचा साक्षात्कार होऊ लागला याचे उत्तम उदाहरण प्रसिद्ध लेखक व पत्रकार अनिल अवचट यांच्या फोटोग्राफी या लेखात वाचायला मिळते महायुद्धातले अनेक फोटो पाहिले पण एका फोटोने मन जसे चरचरले तसे दुसऱ्या कशाने नव्हते मुख्य म्हणजे तो फोटो युद्धभूमीवरचा नव्हताच युद्धकाळातलाही नव्हता युद्धानंतर काही वर्षानी विशिष्ट बटालियनमधले लोक एकत्र आले त्याचा एक ग्रुप फोटो होता काहीजण खुर्चीत बसलेले कोणी मागे उभे असा तो टिपिकल ग्रुप फोटो फोटोतल्या माणसांना कुणाला हात नाही कुणाला पाय नाही कुणाचा जबडा फाटलेला कुणाच्या गमावलेल्या डोळ्यावर कायमची काळी पट्टी चढलेली माणसे जशी आपल्याला छत्र्या घेऊन फोटोला त्याकाळात बसायची तसे इथे फक्त छत्र्याच्या जागी वेगवेगळ्या प्रकारच्या कुबड्या ठेवलेल्या मागची इमारत छान चिरेबंदी पुढे हिरवळ बाकी सगळे व्यवस्थित फक्त हे असे आणि मुख्य म्हणजे फोटो काढताना ते हसत होते युद्धाच्या परिणामाविषयी वेगळे भाष्य करण्याची गरजच नाही तो फोटो युद्धावरच्या फोटोच्या संग्रहातला होता तो फोटोग्राफरने परिस्थिती दाखवण्यासाठी रूढ मार्गाने न जाता अगदी वेगळ्या तऱ्हेने दाखवून आपली निवड केली होती 2 अफगाण पाकिस्तान सीमेवर निर्वासितांच्या अनेक छावण्या होत्या 1 984 मध्ये छायाचित्र पत्रकार स्टीव्ह मॅककुरी यांना नॅशनल जिओग्राफिकने अफगाण पाकिस्तान सीमेवरील निर्वासित छावण्यांचे फोटो काढण्यासाठी निमंत्रित केले त्यांनी पेशावरच्या बाहेर छावण्या पाहिल्या नासिर बागच्या छावणीत मॅककुरीला मुलींचा शाळा म्हणून उभारलेला तंबू सापडला ज्यामध्ये पंधरा मुली शिकत असत त्यात हिरव्या डोळ्यांच्या एका मुलीला त्याने पाहिले मॅककुरी यांनी ही आठवण सांगताना लिहिले आहे मी या तरूणीला शोधले ती फक्त बारा वर्षांची होती ती खूपच लाजाळू होती आणि मला वाटलं की मी इतर मुलांचे छायाचित्र प्रथम काढले तर ती सहमत होण्याची शक्यता जास्त आहे मला वाटते की तिच्याविषयी मी जशी उत्सुक होती तशीच तिलाही होती कारण तिचे कधीच छायाचित्र घेतले नव्हते आणि तिने कॅमेराही कधीच पाहिला नव्हता काही क्षणांनंतर ती उठली आणि निघून जाऊ लागली पण एका क्षणात तिने मागे वळून पाहिले तो क्षण मी टिपला तिच्या डोळ्यातील प्रकाश पार्श्वभूमी आणि अभिव्यक्ती यामुळे छायाचित्र अजरामर झाले विसाव्या शतकातील सर्वात गाजलेले छायाचित्र म्हणून ते ओळखले गेले हे छायाचित्र युद्धग्रस्त देशांमधील मुलांचे दुःख आणि सामान्य लोकांवर अशा संघर्षाचे वास्तविक परिणाम दर्शवते नॅशनल जिओग्राफिकच्या जून 1985 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र प्रसिध्द झाले नंतर अनेक वर्षानंतर त्या मुलीचे नाव शरबत गुल असल्याचे समजले 3 दक्षिण आफ्रिकेतील छायाचित्र पत्रकार केव्हिन कार्टर यांनी 1993 मध्ये दक्षिण सुदानमधील दुष्काळात उपासमार झालेल्यांची काही छायाचित्रे काढली त्यातील एका छायाचित्रासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला या छायाचित्रात कुपोषणामुळे मरणासन्न अवस्थेत बसलेली एक छोटी मुलगी दिसते ती मेल्यानंतर तिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी वाट पाहणारे एक गिधाड तिच्यामागे बसलेले असल्याचेही छायाचित्रात दिसते त्या मुलीला मदत का केली नाही अशी टीका केव्हीनवर जगभरातून झाली त्यामुळे निराश झालेल्या केव्हीनने तीन महिन्यानंतर त्याने आत्महत्या केली 4 सीरियातील यादवीला कंटाळून सप्टेंबर 2015 मध्ये जीव मुठीत धरुन अब्दुल्ला कुर्दी याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा आयलान या मुलाचा मृत्यू झाला अगदी तीन वर्षाच्या आयलान कुर्दी या मुलाचा लाल टी शर्ट व निळ्या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला निलोफर डेमीर यांनी काढलेले आयलानचे छायाचित्र जगभरात अनेकांचे काळीज पिळवटणारे ठरले या अपघातात अब्दुल्ला यांनी आयलानसह गालेब य...
|