Meta tags:
Headings (most frequently used words):
ignited, mind, thursday, 2011, कविता, may, 28, 2026, tuesday, march, 12, 2013, friday, january, 20, 2012, monday, october, 31, september, 22, माझ्याबद्दल, थोडेसे, नव्या, पोस्टची, माहिती, थेट, इनबॉक्समध्ये, मागवण्याकरता, तुमचा, इमेल, पत्, ता, इथे, द्, या, blog, archive, मैफिलीत, माझ्या, ब्लॉगअड्डा, मराठी, ब्लॉगर्स, नेटवर्क, marathi, bloggers, network, amazon, आयुष्याची, परिभाषा, शोध,
Text of the page (most frequently used words):
share (15), #माझ्या (12), कविता (11), आणि (8), काही (8), आहे (7), email (6), unique (6), poet (6), कधी (5), कवितेत (5), pinterest (5), facebook (5), blogthis (5), this (5), comments (5), posted (5), समीर (5), नाईक (5), ignited (4), mind (4), नाही (4), शोध (4), त्या (4), सहज (3), september (3), october (3), january (3), march (3), may (3), 2011 (3), परिक्रमा (3), मला (3), असे (3), अर्थ (3), भान (3), labels (3), प्रयत्न (3), आयुष्याची (3), परिभाषा (3), theme (2), शकता (2), august (2), 2012 (2), 2013 (2), किर्र (2), अंधाऱ्या (2), रात्री (2), तुझा (2), स्थिर (2), शांत (2), डोह (2), 2026 (2), subscribe (2), नव्या (2), थेट (2), करतो (2), मात्र (2), तुमच्या (2), मार्ग (2), तिचा (2), छंद (2), यमक (2), मनात (2), शब्द (2), प्रयत् (2), थोडेसे (2), posts (2), पाऊलखुणा (2), शोधून (2), खूणांचा (2), thursday (2), पुन्हा (2), मजला (2), स्वत (2), जागोजागी (2), ओढून (2), थोडे (2), जगता (2), वाटा (2), आहेत (2), यांचेही (2), छोटे (2), यावरही (2), लिहील्यात (2), कवितेच्या (2), पाहीले (2), तुझ्या (2), awesome, inc, images, powered, blogger, molotovcoketail, amazon, laptops, मराठी, ब्लॉगर्स, नेटवर्क, marathi, bloggers, network, ब्लॉगअड्डा, मैफिलीत, खाली, दिलेला, विजेट, कोड, आपल्या, ब्लॉगवर, लावून, तुम्ही, ब्लॉग, इतरांपर्यंत, पोहोचवू, november, december, 2010, february, april, june, july, blog, archive, पोस्टची, माहिती, इनबॉक्समध्ये, मागवण्याकरता, तुमचा, इमेल, पत्, इथे, view, complete, profile, तसा, रूढार्थाने, कवी, सुचतात, म्हणतात, प्रतीभेचे, देणे, असेलही, कदाचित, परंतु, गोष्ट, १००, टक्के, खरी, विचारांना, भावनांना, व्यक्, करण्यासाठी, सुंदर, भला, सोपा, अजिबात, जोडून, तयार, होत, लिहिताना, असलेली, संकल्पना, वापरले, जाणारे, सोपी, भाषा, यासर्वांचे, नक्कीच, राखावे, लागते, याचे, राखण्याचा, किती, साध्य, झाला, तुम्हीच, सांगू, माझ्याबद्दल, atom, home, older, अस्तित्वाच्या, बघताना, असण्याच्या, नसण्याच्याही, अलिकडच्या, पलिकडच्याही, भूतकाळातील, वर्तमानाच्या, भविष्याच्याही, खूणांना, कळत, नकळत, जन्म, देत, जातो, सतत, असेच, चालू, राहणार, इथल्या, अस्तिवाच्या, असण्यापर्यंत, कधीकाळी, कुणी, घेईल, हात, धरून, कुणीतरी, पोहोचेल, अंतरंगापर्यंत, पुढे, खरंच, असा, केला, गेलाच, नक्की, काय, हाती, लागेल, त्यांच्या, निराश, होणार, नाहीत, याची, खात्री, त्यांना, सापडतील, प्रामाणिक, सगळेच, जपता, येत, लक्षात, असताना, सुद्धा, प्राणपणाने, केलेले, मनाचा, थांग, शोधावा, त्यांनी, अलिप्ततेचे, रहस्य, सोडवावे, सदैव, चाललेला, लढा, पाहावा, सत्, असत्, संघर्ष, शिकावे, त्यातून, घ्यावे, घेण्यासारखे, वाटलेच, ओढल्या, हाताने, हातावरती, नवरेषा, कळली, थोडी, साकारावे, गुज, मनीचे, जपून, ठेविले, हृदयाशी, झोकून, द्यावे, मुक्त, मोकळ्या, अवकाशी, तुझीया, कुरळ्या, केसांमध्ये, माळावी, प्राजक्ताचे, सडे, सभोवती, फुले, तुजवरी, उधळावी, पाण्याला, पाजावे, पाणी, खळखळत्या, ओढ्याचे, जेंव्हा, रंगाचे, फटकारे, रंगवावे, रंगांना, केंव्हा, स्वप्ने, भिरभिरणारी, हळूच, अलगद, कवेत, घ्यावी, चेहर्, यावरती, हसून, आनंदाची, वाटावी, गाणी, चौकटीतच, गच्च, बसवले, जगणे, चौकटीला, मोडॆ, अशाच, वेळी, कसे, उमगले, अडणारे, कोडे, नाजूक, कोष, विणावे, कोठे, जगण्यात, झूरावे, स्वातीचे, थेंब, कोणते, निसटून, जावे, संदर्भांचे, माग, जिव्हारी, पुसट, शोधतो, स्वप्नांचे, माझे, छळत, राहते, अबोल, क्रंदन, मौनाचे, monday, तूच, गेलीस, दुर, अचानक, कोणताही, मागमूस, नसलेल्या, अवघ्या, पुसलेल्या, पाहता, खाणाखूणा, मिटलेल्या, स्वप्नांमध्ये, मधेच, कुठूनी, काचा, खसकन, घूसलेल्या, आशा, तितक्या, कणखर, खोलखोल, रूतलेल्या, शोधत, येईन, थांब, जरा, अवचित, दिसलेल्या, इच्छांपुढती, मार्गच, नमती, हजार, युक्त्या, सुचलेल्या, मिटले, मधले, अंतर, सारे, तशात, स्फुरलेल्या, friday, शोधतोय, आभाळ, थेंबांनी, भरलेलं, कवितेतल्या, पावसासाठी, थोडीशी, प्राजक्ताची, फूलं, वेचली, माळण्यासाठी, काहीशा, चांदण्या, चंद्रमा, तुकडे, पेरले, प्रेम, विरह, भावना, ठेवल्यात, शिल्लक, वापरण्यासाठी, जगण्यातील, नात्यातील, गुंता, भावनांची, घालमेल, ओळी, नवे, जूने, विषय, राखून, माझा, स्वतःचा, जगाचा, आमचा, परस्परसंबंध, हेही, ताडून, पाहीलंय, सहाय्याने, एकांत, शांतता, रितेपणा, गर्दी, भरलेले, साचलेपण, विकारांचा, भडका, येथेच्छ, कुठेतरी, गुंतलेल्या, मनाला, आणले, पडलेले, पीळ, सोडवू, कवितेने, अनेक, अजूनही, शब्दांशी, चाचपडतोय, अडखळतोय, कवितेपाशी, नसावी, असावा, कवितेचा, कवितेला, शोधण्याचा, ओळीतून, tuesday, नमामि, देवी, नर्मदे, कधीतरी, व्हावी, माझी, माते, तुझी, तुझे, स्मरणही, दूर, करी, भास, भ्रमा, पात्रात, गात्रात, स्थित, नर्मदेश्वर, उत्तररात्री, मनामध्ये, मालकंसाचे, गंभीर, स्वर, इतक्या, उशीराही, दर्शनाचा, मोह, आतून, उतरलेले, जाणीवपुर्वक, बांधलेले, विचारात, मांडलेले, चुकून, सांडलेले,
Text of the page (random words):
ignited mind ignited mind काही थेट आतून उतरलेले काही जाणीवपुर्वक बांधलेले थोडेसे विचारात मांडलेले थोडे चुकून सांडलेले शब्द thursday may 28 2026 परिक्रमा किर्र अंधाऱ्या रात्री तुझा स्थिर शांत डोह इतक्या उशीराही मला तुझ्या दर्शनाचा मोह उत्तररात्री मनामध्ये मालकंसाचे गंभीर स्वर तुझ्या पात्रात माझ्या गात्रात स्थित नर्मदेश्वर तुझे स्मरणही दूर करी माझ्या भास आणि भ्रमा कधीतरी व्हावी माझी माते तुझी परिक्रमा नमामि देवी नर्मदे समीर पु नाईक posted by unique poet at 8 10 pm no comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest tuesday march 12 2013 कविता २ मी शोधतोय एक आभाळ थेंबांनी भरलेलं कवितेतल्या पावसासाठी थोडीशी प्राजक्ताची फूलं वेचली आहेत कवितेत माळण्यासाठी काहीशा चांदण्या आणि चंद्रमा यांचेही छोटे छोटे तुकडे पेरले आहेत कवितेत प्रेम विरह आणि त्या भावना ठेवल्यात मी शिल्लक कवितेत वापरण्यासाठी जगण्यातील अर्थ नात्यातील गुंता भावनांची घालमेल यावरही काही ओळी लिहील्यात कवितेच्या छंद यमक अर्थ नवे जूने विषय यांचेही भान राखून पाहीले माझा स्वतःचा जगाचा शोध आमचा परस्परसंबंध हेही ताडून पाहीलंय कवितेच्या सहाय्याने एकांत शांतता रितेपणा कधी गर्दी भरलेले मन नी साचलेपण कधी विकारांचा भडका यावरही येथेच्छ लिहील्यात कविता कुठेतरी गुंतलेल्या मनाला पुन्हा ओढून आणले काही पडलेले पीळ सोडवू पाहीले कवितेने असे एक ना अनेक मी अजूनही शब्दांशी चाचपडतोय अडखळतोय कवितेपाशी आणि ही कविता नसावी असावा प्रयत्न कवितेचा कवितेला शोधण्याचा काही ओळीतून समीर पु नाईक posted by unique poet at 10 24 pm 2 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest friday january 20 2012 कविता १ तूच गेलीस दुर अचानक कोणताही मागमूस ना पाऊलखुणा नसलेल्या त्या वाटा अवघ्या पुसलेल्या जागोजागी शोधून पाहता खाणाखूणा मिटलेल्या स्वप्नांमध्ये मधेच कुठूनी काचा खसकन घूसलेल्या पण आशा माझ्या तितक्या कणखर खोलखोल त्या रूतलेल्या शोधत येईन थांब जरा तू अवचित वाटा दिसलेल्या इच्छांपुढती मार्गच नमती हजार युक्त्या सुचलेल्या मिटले मधले अंतर सारे तशात कविता स्फुरलेल्या समीर पु नाईक posted by unique poet at 7 50 pm 3 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest labels कविता १ monday october 31 2011 आयुष्याची परिभाषा माझे मजला छळत राहते अबोल क्रंदन मौनाचे संदर्भांचे माग जिव्हारी पुसट शोधतो स्वप्नांचे असे स्वातीचे थेंब कोणते जगता जगता निसटून जावे मनात नाजूक कोष विणावे अन कोठे जगण्यात झूरावे अशाच वेळी कसे उमगले हे अडणारे कोडे चौकटीतच गच्च बसवले जगणे चौकटीला मोडॆ चेहर् यावरती हसून थोडे आनंदाची वाटावी गाणी काही स्वप्ने भिरभिरणारी हळूच अलगद कवेत घ्यावी रंगाचे फटकारे ओढून रंगवावे रंगांना केंव्हा पाण्याला पाजावे पाणी खळखळत्या ओढ्याचे जेंव्हा प्राजक्ताचे सडे सभोवती फुले तुजवरी उधळावी तुझीया कुरळ्या केसांमध्ये जागोजागी माळावी झोकून द्यावे स्वत स्वत ला मुक्त मोकळ्या अवकाशी साकारावे गुज मनीचे जपून ठेविले हृदयाशी कळली मजला थोडी आहे आयुष्याची परिभाषा पुन्हा ओढल्या हाताने या हातावरती नवरेषा समीर पु नाईक posted by unique poet at 5 31 pm 8 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest labels आयुष्याची परिभाषा thursday september 22 2011 शोध अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधून बघताना माझ्या असण्याच्या आणि नसण्याच्याही अलिकडच्या आणि पलिकडच्याही भूतकाळातील वर्तमानाच्या भविष्याच्याही मी नव्या खूणांना कळत नकळत जन्म देत जातो हे सतत असेच चालू राहणार आहे माझ्या इथल्या अस्तिवाच्या असण्यापर्यंत कधीकाळी माझ्या खूणांचा कुणी शोध घेईल त्या खूणांचा हात धरून कुणीतरी पोहोचेल माझ्या अंतरंगापर्यंत जर पुढे खरंच कधी असा प्रयत्न केला गेलाच तर नक्की काय हाती लागेल त्यांच्या ते निराश होणार नाहीत याची खात्री आहे मला त्यांना सापडतील काही प्रामाणिक प्रयत्न सगळेच नाही जपता येत हे लक्षात असताना सुद्धा प्राणपणाने केलेले माझ्या मनाचा थांग शोधावा त्यांनी माझ्या अलिप्ततेचे रहस्य सोडवावे माझ्या आत सदैव चाललेला लढा पाहावा सत् असत् चा संघर्ष शिकावे त्यातून आणि घ्यावे घेण्यासारखे काही वाटलेच तर समीर पु नाईक posted by unique poet at 2 05 pm 3 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest labels शोध older posts home subscribe to posts atom माझ्याबद्दल थोडेसे unique poet तसा मी रूढार्थाने कवी नाही मला कधी कविता सुचतात तर कधी मी कविता करतो असे म्हणतात की हे प्रतीभेचे देणे आहे असेलही कदाचित परंतु ही गोष्ट मात्र १०० टक्के खरी आहे की तुमच्या विचारांना भावनांना व्यक् त करण्यासाठी कविता सुंदर आणि भला मार्ग आहे मात्र हा मार्ग सहज सोपा अजिबात नाही ट ला फ जोडून कविता तयार होत नाही कविता लिहिताना तिचा छंद यमक तिचा अर्थ तुमच्या मनात असलेली संकल्पना कवितेत वापरले जाणारे शब्द सहज सोपी भाषा यासर्वांचे भान नक्कीच राखावे लागते माझ्या कवितेत मी याचे भान राखण्याचा प्रयत् न करतो तो प्रयत् न किती साध्य झाला आहे हे तुम्हीच सांगू शकता view my complete profile नव्या पोस्टची माहिती थेट इनबॉक्समध्ये मागवण्याकरता तुमचा इमेल पत् ता इथे द् या subscribe to ignited mind by email blog archive 2026 1 may 1 परिक्रमा किर्र अंधाऱ्या रात्री तुझा स्थिर शांत डोह 2013 1 march 1 2012 1 january 1 2011 17 october 1 september 1 august 1 july 1 june 1 may 1 april 2 march 2 february 3 january 4 2010 32 december 5 november 6 october 5 september 7 august 9 ignited mind खाली दिलेला विजेट कोड आपल्या ब्लॉगवर लावून तुम्ही हा ब्लॉग इतरांपर्यंत सहज पोहोचवू शकता मैफिलीत माझ्या ब्लॉगअड्डा मराठी ब्लॉगर्स नेटवर्क marathi bloggers network laptops amazon awesome inc theme theme images by molotovcoketail powered by blogger
|