Meta tags:
description= SANDRP च्या कामाच्या मराठी नोंदी;
Headings (most frequently used words):
प्रवाह, सिंधू, नदीच्या, सोबतीने, वाहताना, धराशायी, चिनाब, सोहनी, आणि, मस्त, कलंदर, नर्मदा, शोण, जोहिल्ला, राधा, यमुना, शहरं, मनस्विनी, resilience, नावं, रहस्य, posts, navigation, search, कशासाठी, categories,
Text of the page (most frequently used words):
आणि (90), नदी (47), नाही (32), आहे (31), काही (26), काय (20), होते (20), आहेत (19), 2017 (19), february (18), सिंधू (17), पाणी (15), गोष्टी (13), आपल्या (13), अनेक (13), sandrp (13), नदीसूक्त (12), खूप (12), uncategorized (11), साहित्य (11), संस्कृती (11), तिच्या (11), कधी (11), comment (10), नदीच्या (10), परिणीता (10), इथे (10), posted (10), चिनाब (10), नद्या (9), tagged (9), समुद्रात (9), नाहीत (9), नर्मदा (9), अगदी (9), म्हणतात (9), लाल (9), प्रवाह (8), असते (8), आपण (8), leave (8), त्या (8), जाते (8), इतके (8), आपली (8), तिची (8), पूर (8), सोहनी (8), com (7), amazon (7), असो (7), म्हणून (7), गंगा (7), मला (7), लोक (7), समुद्र (7), होता (7), तिथे (7), कोण (7), म्हणजे (7), मध्ये (7), माहितीये (7), समुद्राला (7), गोष्ट (7), जोहिल्ला (7), कलंदर (7), सगळे (6), नको (6), फक्त (6), येते (6), कमी (6), त्याला (6), वेगळी (6), तेव्हा (6), होत (6), जातात (6), झाले (6), आले (6), सुंदर (6), असे (6), शोण (6), सेहवान (6), शाहबाझ (6), घडा (6), सोबतीने (5), वाहताना (5), एका (5), मागे (5), आपले (5), वाहते (5), the (5), नदीत (5), तुला (5), रात्री (5), घेऊन (5), येत (5), फोटो (5), आली (5), केले (5), आला (5), एकदा (5), झाला (5), परत (5), किंवा (5), प्रत्येक (5), काहीतरी (5), गोमती (5), राधा (5), संत (5), पार (5), वाळवंट (5), get (4), wordpress (4), जास्त (4), अदृश्य (4), किमी (4), you (4), देवी (4), तशी (4), असतात (4), कारण (4), photo (4), सगळं (4), जाँ (4), मेरी (4), असेल (4), पूर्वी (4), आता (4), कोरड्या (4), delta (4), त्याने (4), शहरे (4), heracleion (4), च्या (4), देव (4), देखील (4), केला (4), यमुना (4), काहे (4), शाम (4), मटकी (4), चूक (4), बरोबर (4), शरीफ (4), येतात (4), बघणार (4), धराशायी (4), this (3), website (3), तापी (3), सुन्दर (3), आपल्याला (3), अजून (3), हजारो (3), पासून (3), पर्यंत (3), समुद्राच्या (3), आपला (3), know (3), what (3), wild (3), आधी (3), river (3), मगरी (3), मस्त (3), वर्षे (3), अशा (3), खरं (3), होवून (3), कशी (3), नाव (3), सांगायचं (3), किती (3), माणसं (3), सकाळी (3), करणारी (3), वगैरे (3), नदीचे (3), बदलत (3), गाणी (3), होतो (3), कविता (3), पुढे (3), तशीच (3), मरे (3), मासे (3), सारखे (3), मोठ्या (3), बघितले (3), वर्षापूर्वी (3), झाली (3), अशी (3), मधल्या (3), त्याचे (3), कधीतरी (3), जुन्या (3), जागा (3), पाण्याने (3), paris (3), मधली (3), नाईल (3), आवडते (3), तरी (3), चिरंतन (3), संपन्न (3), alcmene (3), zeus (3), यांची (3), अवशेष (3), बंदर (3), दगडी (3), नाहीच (3), तीर (3), पनघट (3), जाओ (3), कृष्ण (3), गेला (3), रंग (3), कभी (3), त्यात (3), शोणला (3), तिचे (3), हात (3), मिळाली (3), तिचा (3), नुसते (3), लागतात (3), होतात (3), त्याच्या (3), हिल्सा (3), बॉम्ब (3), सुफी (3), कशाला (3), सिंध (3), कच्चा (3), घड़िया (3), असतं (3), सगळ्या (3), करून (3), लांब (3), मिळत (3), site (2), like (2), required (2), comments (2), content (2), log (2), sign (2), subscribed (2), subscribe (2), create (2), free (2), blog (2), खाडी (2), वाशिष्ठी (2), नसते (2), जिवंत (2), पाण्याची (2), विसरत (2), आहोत (2), search (2), posts (2), अस्पर्श (2), त्याची (2), थेट (2), सुंदरबन (2), काढत (2), सांगितले (2), source (2), बंगालच्या (2), इतक्या (2), लवकर (2), होतं (2), पवित्र (2), ठेवणारे (2), खरे (2), गंगेत (2), डॉल्फिन (2), तसा (2), होण्याच्या (2), parineeta (2), वाटते (2), indicator (2), दिला (2), अंधाऱ्या (2), बाहेर (2), बया (2), वाट (2), गोड (2), फार (2), बाई (2), खाली (2), बहिण (2), मुखाजवळ (2), खारी (2), बोलेलं (2), पाहिलेलं (2), स्पर्श (2), कोरल (2), बेट (2), अरे (2), काळ (2), कसं (2), above (2), लहानपणी (2), एकच (2), नावं (2), भंकस (2), गंगेची (2), १००० (2), करते (2), विलीन (2), मारते (2), जान (2), जातं (2), मुझे (2), कहो (2), सदा (2), journeys (2), lovers (2), मांजर (2), तिला (2), वाहतात (2), पाउस (2), बांध (2), उत्सव (2), चंद्राची (2), नदीची (2), नदीला (2), कहर (2), कितीही (2), होईल (2), जवळचा (2), सरता (2), सगळी (2), वर्षी (2), गेले (2), डार्लिंग (2), छोटे (2), ऐकले (2), झाडे (2), ऐकू (2), जाऊ (2), दोन (2), सगळेच (2), नदीने (2), red (2), खोल (2), दिसली (2), बॉस (2), resilience (2), समोर (2), बागमती (2), कोसी (2), माझ्या (2), करता (2), त्याचा (2), असं (2), पाहिजे (2), जाम (2), मेरा (2), that (2), अनुभूती (2), अंग (2), कोरी (2), शोधणारी (2), बनवणारी (2), नव्या (2), मनस्विनी (2), channels (2), मधून (2), जाणीवपूर्वक (2), मनसोक्त (2), वाहणाऱ्या (2), and (2), तरीही (2), बाग (2), माणसे (2), तरुण (2), असणारे (2), पलीकडचा (2), राजा (2), म्हटले (2), helen (2), troy (2), यांचा (2), मुलगा (2), त्यांच्या (2), मधे (2), वैभवशाली (2), खरी (2), गम्मत (2), दोघे (2), कळले (2), होणार (2), भग्न (2), हवेत (2), कदाचित (2), anchor (2), पात्र (2), सापडते (2), भिंती (2), उपनदी (2), समृद्ध (2), सोकी (2), लागेल (2), भरलेले (2), गेली (2), शहरं (2), कविकल्पना (2), धीरे (2), मथुरा (2), नगरपति (2), तुम (2), गोकुल (2), झालं (2), तीरी (2), जाताना (2), सोडून (2), कडे (2), जातो (2), अबिदाच्या (2), आनंदी (2), म्हणते (2), जाऊन (2), साहिरने (2), सांगायची (2), कारवां (2), मेरे (2), बहुत (2), कठिन (2), डगर (2), क्या (2), लाऊ (2), त्यातली (2), गाणे (2), नेहमी (2), तिने (2), पूजा (2), जात (2), राजकन्या (2), दासी (2), नर्मदेला (2), नर्मदेने (2), अरबी (2), तोडून (2), तसेच (2), कथा (2), लग्न (2), सोनभद्र (2), बघायचे (2), सखी (2), कपडे (2), माझी (2), भारतात (2), कलंदरच्या (2), रंगात (2), बॉम्बने (2), शांत (2), शिया (2), धम्माल (2), पीर (2), फकीर (2), फकिरी (2), वेडे (2), ओळख (2), मासेमार (2), सिंधूच्या (2), टाकला (2), हिंदू (2), कवी (2), गायक (2), तीरावर (2), वाळवंटात (2), हिरवा (2), भेटायला (2), एखादी (2), दर्ग्यावर (2), पाकिस्तानात (2), वाईट (2), सांगितलेस (2), संपतात (2), story (2), शब्द (2), जुनी (2), चंद्र (2), भागा (2), सोहनीची (2), होती (2), मधील (2), धरून (2), खरंच (2), जीव (2), सरोवर (2), लाखो (2), देखणी (2), पसरते (2), rann (2), बनी (2), सौंदर्य (2), okavango (2), कामाच्या (2), मराठी (2), नोंदी (2), started, design, with, name, email, write, loading, collapse, bar, manage, subscriptions, view, reader, report, privacy, already, have, account, now, join, other, subscribers, videos, झरे, विहीर, शास्त्री, शंकरपर्णी, वशिष्ठी, मुलाखत, महाराष्ट्रातील, वाटप, कावेरी, categories, केवळ, कधीच, परीसंस्थेचा, भाग, एकेक, ओंजळी, असतेच, झर्याचे, त्यांच्याच, दुष्काळ, पुराच्या, गर्तेत, अडकलेला, महाराष्ट्र, किंमत, जाणतो, नद्यांना, निर्झरना, टाक्यांना, तळ्यांना, पर्ह्याना, विहिरींना, चाललो, कशासाठी, for, older, navigation, vashishthi, ganga, डार्क, विश्वे, वाटतात, murky, dangerous, रोरावती, माहिती, प्रकाशातले, ठोकताळे, आपलीच, उत्तरं, उत्तरात, बसले, ठाकाठोकी, गिरी, नुसती, २५००, परद्वीप, श्रीलंके, आतुन, मार्ग, मासेमारांनी, शास्त्रज्ञांना, कोळी, solid, आवडतात, sailors, wide, waters, freshwater, pulse, bay, bengal, natureasia, खऱ्या, खुणा, तुमचं, हरिद्वार, गंगेला, boring, केलं, जन्मतःच, द्र, होच, गंगेतले, आंधळे, हिंस्त्र, शार्क, सारखेच, गुपित, mythical, सिंधुत, समुद्रातल्या, नदीतल्या, डॉल्फिनमध्ये, फरक, कसे, सिंधु, टेथिसचा, crocodile, vashisthi, वाशिष्ठीत, प्रदूषण, शंकरच, विष, प्यालेली, तिच्यात, pollution, हसू, नाहीयेत, सीतेने, शाप, फल्गु, गयेत, वाळूखाली, अशीच, वाहत, आलीये, शेकडो, आपल्यासाठी, खरंतर, सीतेनी, वरदानच, दिले, फाल्गुला, आपल्याच, एकट्या, विश्वात, वाहण्याचे, हिरण्यकेशी, गुहेतुन, अचानक, कौतुक, किलोमीटर, limestone, खडकातून, बोलून, दगडाला, विरघळवत, दिसत, म्हणुन, इतकेच, तशीही, गुपिते, बाळगणारी, १३०००, फूट, hamza, वाहती, हिच्यामुळे, पोटात, असत, खोटं, तळाशी, मोठ्ठं, रीफ, सापडलं, प्रवाळाचं, कोरलला, खार, लागतं, तापमान, अंश, चालत, सूर्यप्रकाश, लागतो, उकळा, चहा, हिरवं, गर्द, रिओ, नेग्रो, शार, काळी, मातकट, दाट, sluggish, शक्य, reef, inside, guardian, रहस्य, आवडत, बोलते, पाहिजेत, माणसाला, जन्मभर, पुरणार, एकात, गर्दी, लिहिणारी, वाचणारी, फिलोसोफीवाली, चर्चसमोर, पाणीपुरी, खाणारी, डॉक्टर, बनणारी, नावे, नर्मदेची, तापीची, शक्तीस्वरूप, भीमा, विठ्ठलाच्या, पायी, उगीच, रेंगाळते, चंद्रभागा, तापत, तळपत, विदर्भ, खानदेशातून, डोकं, उशाशी, आश्वस्त, अर्कजा, पुस्तकी, fantasy, साठी, सिंधच्या, लोकांना, पुरांनी, हैराण, पुराली, अफगाण्यांना, जबाबदार, वडील, अब्बासिन, आकाशाचा, तुकडा, चोरते, निलाब, जिला, बांधता, मान, घालून, सगळ्यांचं, ऐकते, जान्हवी, परदेशी, सुलक्षणी, पद्मा, होताना, ढगांकडे, बघणारी, मेघना, दगडांवरून, खळखळ, उड्या, रेवा, गंभीर, घरंदाज, वळणारी, संजीव, कुमार, सही, यात, गीता, दत्त, तिच्यासाठीच, गाणं, actually, राहू, नावपण, राहत, अंजान, कहाँ, रहती, खलघाट, येथील, मर्रे, wise, friend, says, new, horizons, when, meet, सोड, ओलाडून, बुक, चांगले, डील, मिळाले, end, meeting, सजल, वाटा, समुद्राकडे, अंत, बघितला, अघटीत, येतोच, हवामान, बदलतं, फुटतात, रुस्क्या, ओथंबून, धरणांनी, बांधले, रौद्र, तसे, नदीचा, बिहारमध्ये, पौर्णिमेच्या, आसपास, नावांमधून, फिरायचे, गायचे, मारूनमुटकून, शिस्त, लावण्यासाठी, बांधलेले, embankment, फुटले, तोंड, पाडून, बसा, घ्या, नदीवर, करा, पाऊस, येणारच, वर्षांनी, येईल, येणार, कृष्णा, हिचे, समुद्रा, शून्यावर, २००६, घाला, चुलीत, आलाच, भारताने, गंगेचे, रोखले, फराका, बांधावरून, वळवले, खारे, तिथले, वाघ, अतीव, क्रूर, man, eaters, होण्या, मागचे, मोट्ठे, क्रौर्य, पुरा, नंतरची, abc, net, पाण्यामुळे, macro, invertebrates, वाढले, पक्षी, मोठे, सुरेल, बेसूर, बुल, frogs, खेकड्या, yabbies, भरपूर, पावसाने, productivity, लाट, उसळवली, estuary, समुद्रापर्यंत, पोचली, सचैल, गोपी, न्हाल्या, एखाद्या, नीरव, पिताना, येतील, ऑस्ट्रेलिया, त्यांचा, lyrical, आपल्यासारखेच, australian, लोकांनी, त्यांचे, पिऊन, टाकले, भेटे, बेभान, वर्षात, नव्हते, तीरावरच्या, थकलेल्या, eucalyptusआणि, gum, बनांच्या, मुळापाशी, थंडगार, पोचले, घराच्या, पार्किंग, यायची, गायब, आत्ता, चेहऱ्यावर, दुनिया, देखी, शांतता, सहनशीलता, निसर्गाकडून, शिकावी, मांजरांकडून, अनोळखी, गावाच्या, sidewalk, चालताना, हरवले, सुकडी, झुपकेदार, शेपटीची, माझ्याकडे, बघून, हसली, हायला, ओळखीची, देखा, इथेपण, ओरिजिनल, लिहिता, विदुषक, चंचले, सत्य, माझेच, माझ्यापुरतेच, त्यावर, जीवनाची, रक्तमुद्रा, दान, इतरांकडून, स्वीकार, भावछटेसाठी, कुठेतरी, कोणीतरी, तिसऱ्याने, लिहून, ठेवलेलं, आठवतं, खुश, nerolac, आठवतीये, वाला, क्रीम, अस्सच, म्हणायचं, तंतोतंत, how, hate, word, second, hand, readymade, कपड्यांमध्ये, बसविण्यासारखी, लखलखीत, यांनाच, असावी, बेशिस्त, नद्यांसारखी, मुलभूत, प्रश्नांची, उत्तरे, आपल्यातच, तोकड्या, रक्ताच्या, रसरशीत, अनुभवात, अभिजात, वगैरेशी, फारसे, देणे, घेणे, नसणारी, पुस्तकात, कवितेत, साहित्यात, अनुभूतीच्या, कुबड्या, तोडणारी, erosion, खातात, deposition, बनवतात, आमच्या, बघा, उतावली, बकाल, उफराट्या, तुडुंब, भरतील, कुचकामी, धरणे, embankments, तोडतील, नेम, ऐकत, once, 100, years, रेकॉर्ड्स, सुद्धा, बिंदास, मोडतात, record, त्यांचेच, सुपुत्र, घाण, त्यांच्यात, गटारे, सांडत, अगदीच, रंगीबेरंगी, होड्या, बोटी, डौलदारपणे, सांभाळतात, सभ्य, सरळसोट, britishgeographer, युरोपातल्या, खूपशा, शिस्तबद्ध, नाकासमोर, चालणाऱ्या, माफक, वळणं, घेणाऱ्या, थोड्या, सीन, रोम, tiber, rhine, main, danube, कालवा, अमेरिकेत, category, scenic, rivers, अपार, स्वतः, भोवती, अस्पर्श्तेचे, दिसणारे, कुंपण, वागवणाऱ्या, संस्कारित, मुंबई, बाकी, समुद्राची, भरती, ओहोटी, सुरूच, राहणार, लगबग, चालणारे, व्यायाम, गमतीशीर, करणारे, तरुणी, नारळाची, जवळच, mangroves, शेजारची, बिट्टी, उद्या, परवा, हजार, वर्षानंतर, समुद्राने, बागेला, गिळले, हरकत, माझ्यासाठी, वृद्ध, थकलेली, सांगणाऱ्याचे, ऐकणाऱ्याचे, स्वतःच, ढापणाऱ्या, नसतात, विसरली, श्रीमंत, असली, वेड्यांच्या, राहतात, त्याच, झोपलेल्या, शहरांना, कुशीतून, उठवतात, 1200, वर्षा, mediterranean, बुडाले, पडली, ज्याला, बंदरांचा, इजिप्तचे, अविभाज्य, पुरते, विसरून, राहिले, शहराचे, पडले, heracles, ग्रीक, देवावरून, देवांचा, तुझ्या, अहिल्ये, सारखी, नवऱ्याचे, amphitryon, रूप, मुलाला, ग्रीसने, अहिल्येसारखी, शिळा, शापित, atlasobscura, मुखाशी, egypt, सर्वात, भेटले, तेच, ज्यांना, भेटता, क्षणी, भेटीने, मंथन, cleopatra, julius, caeser, alexandria, cleopatraचा, अख्खा, राजवाडा, गिळला, विसरलो, चिरतरुण, cleopatraच्या, संपल्या, उत्खनन, लाजणारे, दोरखंडांनी, त्यांना, आतच, बरे, वाटत, समुद्रातील, national, institute, oceanography, आणखी, मोती, हरप्पन, काळातील, lustrous, ware, pottery, संस्कृतींचे, अडकलोय, कृष्णाच्या, गोष्टीत, अंह, द्वारकेची, अरेबिअन, शिरत, archaeological, evidence, सांगतो, १४००, वसली, त्यांनी, रोखून, धरायचे, प्रयत्न, बांधल्या, गोमतीला, बांधून, घालायचा, प्रयास, द्वारका, बुडलीच, नावाचे, मुंबईसारखे, दशकांपूर्वी, दृष्ट, तलम, कापड, मग्रूर, व्यापारी, यांनी, हळूहळू, पडत, वठलेले, मिठाने, गाव, गरीब, आरशासारखे, लख्ख, कचरा, साहीर, पहुचात, जमुना, सुनसान, मृदुल, समीर, उसे, भूल, पाओ, मनोहर, वेश, छोड़, नन्द, राज, उतारके, ताज, फिर, बांसुरी, बजाओ, pessimistic, गुलझार, रितुपर्णो, मथुरेहून, बरंच, घागर, काहीच, द्वारकेला, राधेने, भला, हुआ, मोरी, फुटी, पनिया, भरन, छूटी, यमुनातीराचे, parochial, greener, pastures, ठीक, खरा, वाटतो, कबीराचा, दोहा, आवाजात, वैतागलेले, त्रासिक, चहाडीखोर, भांडखोर, तेरा, श्याम, बड़ा, अलबेला, में, मार, गयो, डेला, नदियन, नहाये, अकेला, समीकरणच, शेवटी, वैतागुन, नारे, पैय्या, पडू, पलिकडे, सौतन, आणेल, deep, rooted, insecurities, मात्र, कारवामध्ये, नंदकिशोर, lines, खुसरोच्या, अच्छे, निझाम, पिया, मधवा, सूफी, निजामुद्दीन, औलिया, जमना, somehow, reports, घुसडवले, तलाश, वेळा, असीन, नवे, हाती, अस्सल, कलाकृती, जोहिल्लेचे, नव्हती, होकार, माहित, जोहिल्लेची, मानले, नर्मदेच्या, गैरसोय, उमगली, जिचा, धरला, यःकश्चित, बोलावले, स्वाभिमानी, फिरली, विषण्ण, पूर्वेला, निघून, उपसागराकडे, स्वतःचे, खोरे, बनविले, समुद्रास, कुमारिका, राहिली, क्षणात, पाश, पश्चिमेकडे, धावली, bollywood, वाटले, हीच, तिच्याशी, हातात, घेतला, हसून, बोलले, काहीही, खोर्याबद्दल, वाचताना, नावातला, नाद, आवडला, उगम, एकमेकांच्या, अमरकंटक, biosphere, reserve, मधला, मैकाल, पर्वताची, लेक, मैकालला, नर्मदेचे, देखण्या, करायचे, सोनभद्रला, हिला, जरतारी, नेसवले, कसा, आवडती, देव्याच, नुसत्या, त्याहून, कर्मनाशा, किर्तीनाशा, फाल्गु, पुण्य, पापही, निर्भत्सना, पावित्र्य, विटाळ, नसलेल्या, आल्या, चार, चिराग, तेरे, बलन, हमेशा, पंजवा, बालन, आइया, बला, झूलेलालन, सिंधड़ी, सेहवन, दमा, लाली, जित, देखू, देखण, संचारलेली, याला, करणार, मस्तानी, केस, मोकळे, गोलगोलगोलगोलगोल, फिरते, माझे, संसारिक, आयुष्य, मुर्शिदने, दिलेली, आझ्माइश, बदलून, घरी, उरुसात, मेंदीने, भरलेली, ताटे, हिंदूकडून, मुसलमानाकडे, कडून, सुन्नी, बाईकडून, तृतीयपंथीयाकडे, संपणारे, उरूस, मातम, मिलन, प्रभुशी, एकरूप, होणे, लग्नच, संध्याकाळ, कलली, दर्ग्यात, घुमू, गाऊ, नाचू, चढत, भिनत, रक्तात, सईद, मजहूब, हजीरी, संसारात, बुडलेली, बुरखा, फेकून, जीवघेण्या, गिरक्या, घेते, निळ्या, फरशीवर, याचे, होण्याआधी, शिविस्थान, मोरोक्कोच्या, इब्न, बटूटाने, याचा, उल्लेख, बखरीत, पर्शिया, भारतामधले, नदीतीरावरचे, महत्वाचे, ट्रेड, रूट, ठिकाणी, कट्टर, धर्म, टिकत, अनेकानेक, लोकांच्या, घामात, चलाखीत, हसण्यात, रडण्यात, प्रेमात, व्यवहारात, कलेत, कट्टरतेचा, उडत, मुंबईत, तालावर, नाचवणारा, धम्मालमध्ये, नाचत, देश, परदेशातले, बायका, तृतीयपंथी, विसरलेले, नसणारे, सिंधूचे, मोहना, dawn, नाडलेल्या, झिडकारलेल्या, विचित्र, weirdos, मुळात, जोवर, तोवर, गाण्यात, बुल्लेह, शाहच्या, सचल, सरमस्तच्या, शब्दात, वेड्यावाकड्या, खाऱ्या, पाण्यात, धरणामागे, अडकलेल्या, माशात, सेहवानवर, म्हणे, अर्रे, मुसलमानांच्या, पलिकडचा, दर्यापंथी, भ्रतहरी, मानतात, नवनाथांचा, अवतार, झुलेलाल, झिन्दापीर, पंथाचा, प्रमुख, इराण, किनारी, 12व्या, शतकात, संगीतकार, इथलाच, जसे, पाणवठे, हिरवे, ओयासिस, तशाच, याच्या, धुरकट, भकास, जिथेजिथे, तिथेतिथे, कलंदरचा, धर्माच्या, कसंय, जगातल्या, बघायच्या, होत्या, सिंधला, जाणार, झुलेलालचे, नदीतले, मुर्शिदला, येणारे, नदीतीराने, गाठणार, कलंदरची, संपणारी, कोणजाणे, मानवापलीकडे, गेलेल्या, बायकांमध्ये, वेड्या, फकीरांमध्ये, दर्वेश्यांमध्ये, भिकार्यांमध्ये, ओळखीचे, दिसेल, गिरकी, घेईन, टाकण्याचे, मनाला, लाऊन, घायचे, संबंध, माझा, माथेफिरू, isis, मेले, सगळीकडे, होतेच, वाटून, घ्यायचे, परवाच, सीरियाचे, aleppo, उत्खननात, सापडल्यासारखे, चालायचेच, नसताना, युद्ध, सृष्टी, स्थिती, महिवाल, every, great, same, थोडक्यात, पृथ्वी, शाहण्या, म्हाताऱ्यानी, बघितल्या, चेहरे, बदलतात, तीच, म्हजे, जशी, चेन, चंद्रा, मुलगी, सूर्याचा, रांझाने, चिनाबच्या, बासरी, वाजवली, हीर, चिनाबतीरीच, मिरजा, साहिबां, इथलेच, सस्सी, पन्नू, सस्सीला, चिनाबमधे, सोडले, अनेकांनी, सांगितलेली, गीते, म्हणजेच, आजची, चिवट, कच्चे, घडने, जीत, चढी, हुई, जहां, मजबूत, कश्तीयो, किनारा, नहीं, मिला, जेव्हा, भारतातून, रुंदावत, भटकभवान्या, धारांमध्ये, गुंफल्या, भोवतीच, रचल्या, गेल्या, वारीस, शाहच, जाणे, मशिदी, भरजरी, रंगांनी, चित्रे, रंगवलेली, शेतकरी, अजूनही, सूर, गुणगुणतात, नागिणी, सखे, वैरीण, ऐकून, क्षणा, क्षणाला, विरघळत, जाणारा, गच्च, सोहनीच, आठवते, प्राणांचे, मोल, नाविका, लावी, आधि, century, miniature, depicting, sohni, mahiwal, chenab, wikimedia, commons, कथांची, गाण्यांची, चित्रांची, सुरुवातच, जादुई, प्रसंगाने, ज्यात, मेहेर, घड्याला, विनवत, हतबलतेने, म्हणत, शकत, दोघेही, विरघळणार, वादळी, उतरली, अर्ध्यात, आल्यावर, विरघळतोय, नदीतील, पाय, धरत, नाका, तोंडात, विश्वासू, साथ, देत, मेहेरला, सोहनीला, ओलांडावी, लागायची, कुंभार, माठ, घडवायची, त्यातलाच, उराशी, पल्याड, जायची, नणंदेने, हळूच, नेहमीच्या, घड्याच्या, जागी, ठेवला, आधीचीही, महत्वाची, सांगणारे, सुर, शाह, अब्दुल, लतीफ, भिताई, विलक्षण, किमयागार, यांच्या, कथेवर, रचलेले, काव्य, मुरलेल्या, लोककथेसारखे, कोणी, घडले, बुडली, तिनेच, गायली, आवे, कच्चीये, रक्खीये, उम्मीद, कच्चीयाना, होणा, अंजाम, कच्ची, मिट्टी, नाम, चना, असतो, गाज, होणं, नाहीये, चाललेल्या, वाटेला, लागेलच, माळरान, अख्खं, but, thats, विरली, बरसतेच, विसरलेच, फारसं, नसतं, तारा, जोडायच्या, चुकार, प्रतिबिंब, बघायचं, चाफ्याचं, एखादं, फुल, उचलून, केसात, खोचायचं, ओंजळभर, हसायचं, पापणीभर, साठवायचं, अर्थहीन, absurd, ऐकायची, मुद्दा, असा, नसतोच, बहुतेक, दिवस, पुरतं, सिंधुपण, सामील, व्हायची, गोंधळात, भागाला, भिजवायची, १८००s, भूकंप, सगळंच, बदललं, रुपेन, सरस्वती, बनास, लिटल, रणमध्ये, प्रत्येकीची, झंजावाती, फुलतं, नुसतं, स्फोट, सृजनाचा, इतका, बिचकतात, जरा, ऑक्टोबर, डिसेंबरमध्ये, flamingos, pelicans, painted, storks, गुलाबाचं, रान, टाकतात, कोल्हे, हिंडतात, गाढवं, मोर, वेगळाच, misfits, भटके, जिप्सी, भाषा, यांचीच, जाणारी, येणारं, गाढवे, मीठाचे, शुभ्र, डोंगर, आधांतरी, तरंगणारे, भूत, दिवे, लगबगीने, charting, her, old, remembered, ways, sea, गोची, कुठेय, शोधताना, दिशांनी, धावते, इथेच, लुणी, कच्छच्या, रणात, विरघळते, little, kachh, dandekar, आपल्याकडे, रेलचेल, love, kutch, चंदेरी, माती, खारा, निष्ठुर, वारा, promise, एकटी, फिरले, समुद्रच, पावसाळ्यात, आजदेखील, भरून, आफ्रिकेतली, सगळ्यात, नायगर, हिची, यडी, सहारा, वाळवंटाकडे, वाकडी, बनवते, मसिना, वाळवंटाजवळ, येणारा, भात, वाढवणारा, मासेमारी, करणारा, प्रदेश, जगभर, ज्यांचा, पृथ्वीवर, निजणारी, मैत्रीण, राहते, फेमो, सांगते, झोपाताना, कोरडे, जाग, direct, लॉग, केबिनमधून, हिप्पो, unpredictability, हार्टब्रेकिंग, बहराच्या, बाहूंची, cnn, अशाही, ज्या, angola, namibia, botswana, तून, वाहणारी, १५००, पेक्षा, बोत्स्वानात, पोचल्यावर, नुसतीच, धावधाव, give, लिटरली, आटले, डगरीने, तिथेच, पोहोचते, वाफ, महत्वाचा, प्रवास, असणे, नव्हेच, नवी, कुणी, ओके, yes, well, यही, देखो, गेलेच, परिपूर्ती, तसं, चक्रच
Text of the page (random words):
मातम नाही मिलन प्रभुशी एकरूप होणे लग्नच कलंदरच्या लाल रंगात सिंधू नदी आहे संचारलेली याला कोण बॉम्बने शांत करणार लाली मेरे लाल कि जित देखू उत लाल लाल देखण मै गई मै भी हो गई लाल चार चिराग तेरे बलन हमेशा पंजवा बालन आइया बला झूलेलालन सिंधड़ी दा सेहवन दा सखी शाहबाझ कलंदर दमा दम मस्त कलंदर परिणीता tagged लाल शाहबाझ कलंदर सिंधू सेहवान शरीफ leave a comment नर्मदा शोण जोहिल्ला february 23 2017 february 24 2017 by sandrp posted in नदी आणि संस्कृती नदी आणि साहित्य नदीसूक्त uncategorized पुण्य आले की पापही आले पूजा आली की निर्भत्सना आली पावित्र्य आले की विटाळ आला देवी आली की देवी नसलेल्या कम देवी आल्या भारतात नद्या देव्याच आहेत असे नाहीत काही नुसत्या नद्या आहेत काही त्याहून कमी आहेत कर्मनाशा किर्तीनाशा फाल्गु आणि माझी आवडती जोहिल्ला नर्मदा खोर्याबद्दल वाचताना ही नदी तिच्या नावातला तो नाद खूप आवडला होता नर्मदा शोण किंवा सोनभद्र आणि जोहिल्ला यांचा उगम तसा एकमेकांच्या जवळचा अमरकंटक biosphere reserve मधला नर्मदा मैकाल पर्वताची लेक राजकन्या मैकालला नर्मदेचे लग्न देखण्या सोनभद्र बरोबर करायचे होते नर्मदेला एकदा सोनभद्रला बघायचे होते तिने आपली दासी आणि सखी जोहिल्ला हिला आपले जरतारी कपडे नेसवले आणि सांगितले जा बघ तर शोण कसा आहे तो जोहिल्ला गेली पण अगदी bollywood मध्ये होते तसेच झाले शोणला वाटले हीच नर्मदा काही कथा म्हणतात त्याने तिच्याशी लग्न केले काही म्हणतात त्याने फक्त तिचा हात हातात घेतला काही म्हणतात ते हसून बोलले काहीही असो नर्मदेने हे बघितले व एका क्षणात सगळे पाश तोडून ती पश्चिमेकडे धावली शोणला आपली चूक उमगली आपण जिचा हात धरला ती काही वैभवशाली राजकन्या नाही यःकश्चित दासी आहे ती त्याने नर्मदेला बोलावले पण ती स्वाभिमानी नदी काही परत फिरली नाही विषण्ण होवून शोण पूर्वेला निघून गेला गंगेत विलीन झाला आणि बंगालच्या उपसागराकडे गेला नर्मदेने आपले स्वतःचे खोरे बनविले आणि अरबी समुद्रास मिळाली कुमारिका राहिली पण जोहिल्लेचे काय झाले तिची काही चूक नव्हती तिने शोणला होकार दिला की नाही हे देखील माहित नाही पण जोहिल्लेची पूजा होत नाही तिचे पाणी पवित्र नाही मानले जात ती फक्त शोण आणि नर्मदेच्या मधली गैरसोय अशी ही जोहिल्ला परिणीता tagged जोहिल्ला नर्मदा शोण leave a comment राधा यमुना february 23 2017 february 24 2017 by sandrp posted in नदी आणि संस्कृती नदी आणि साहित्य नदीसूक्त uncategorized साहिरने कहर केला आहे तो ना तो कारवां की तलाश है मध्ये मी ते गाणे अनेक अनेक अनेक वेळा ऐकले असीन नेहमी नवे काहीतरी हाती येते अस्सल कलाकृती सारखे त्यातली एक ओळ म्हणजे बहुत कठिन है डगर पनघट की अब क्या भर लाऊ मै जमना से मटकी somehow हे इतके आवडते की काही reports मध्ये पण घुसडवले आहे p सांगायची गोष्ट अशी की कारवां मधल्या या lines खुसरोच्या आहेत मेरे अच्छे निझाम पिया बहुत कठिन है डगर पनघट की अब क्या भर लाऊ मै मधवा से मटकी इथे कृष्ण नाही तर सूफी संत निजामुद्दीन औलिया आहे साहिरने मात्र कारवामध्ये त्याचे नंदकिशोर केले आहे त्यात कोण नाही शाम राधा आणि नदी हे समीकरणच आहे इतके की शेवटी राधा वैतागुन म्हणते नदी नारे न जाओ शाम पैय्या पडू का तर तो पलिकडे जाऊन सौतन आणेल म्हणून deep rooted राधा insecurities तेरा श्याम बड़ा अलबेला मेरी मटकी में मार गयो डेला कभी गंगा के तीर कभी यमुना के तीर कभी नदियन नहाये अकेला हे रंग खूप आनंदी आहेत वैतागलेले त्रासिक चहाडीखोर भांडखोर पण आनंदी मग यमुनातीराचे parochial जग सोडून शाम greener pastures कडे जातो तेव्हा कविकल्पना वगैरे ठीक पण खरा वाटतो तो कबीराचा दोहा अबिदाच्या आवाजात भला हुआ मोरी मटकी फुटी मै पनिया भरन से छूटी रे बरंच झालं घागर नको यमुना नको शाम नको काहीच नको कृष्ण द्वारकेला गोमती तीरी जाताना राधेने म्हटले असेल कदाचित फार pessimistic झाले का मग इथे आपले गुलझार आणि रितुपर्णो 3 you म्हणतात कृष्ण गेला होता मथुरेहून परत एकदा मनोहर वेश छोड़ नन्द राज सर से उतारके सुन्दर ताज फिर काहे बांसुरी बजाओ मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ धीरे धीरे पहुचात जमुना के तीर सुनसान पनघट मृदुल समीर उसे काहे भूल ना पाओ मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ ही खरी कविकल्पना परिणीता tagged यमुना राधा साहीर 1 comment शहरं february 23 2017 february 24 2017 by sandrp posted in नदी आणि संस्कृती नदी आणि साहित्य नदीसूक्त uncategorized सोकी बंदर नावाचे छोटे बेट आहे सिंधू नदीच्या मुखाजवळ आपल्या मुंबईसारखे काही दशकांपूर्वी दृष्ट लागेल असे समृद्ध तलम कापड आणि मग्रूर व्यापारी यांनी भरलेले हळूहळू समुद्र आत आला आणि सिंधू मागे पडत गेली सोकी बंदर आज एक वठलेले मिठाने भरलेले गाव आहे इतके गरीब की आरशासारखे लख्ख कचरा नाहीच गोमती नदी अंह द्वारकेची गोमती गंगेची उपनदी नाही अरेबिअन समुद्रात आत आत शिरत असे archaeological evidence असे सांगतो की १४०० bc पासून इथे अनेक समृद्ध शहरे वसली त्यांनी समुद्राला रोखून धरायचे खूप प्रयत्न केले भिंती बांधल्या गोमतीला बांधून घालायचा प्रयास केला पण प्रत्येक द्वारका बुडलीच आज देखील गोमती नदीचे १ ५ किमी पात्र समुद्राच्या आत सापडते आणखी काय काय सापडते तिथे माहितीये दगडी भिंती दगडी anchor मोती हरप्पन काळातील lustrous red ware pottery अनेक संस्कृतींचे अवशेष पण आपण अडकलोय फक्त कृष्णाच्या गोष्टीत समुद्रातील दगडी anchor photo national institute of oceanography तशीच cleopatra आणि julius caeser यांची alexandria cleopatraचा अख्खा राजवाडा गिळला पाण्याने आपण सगळे विसरलो होतो त्याला पण चिरतरुण cleopatraच्या गोष्टी संपल्या नाहीत काही वर्षापूर्वी समुद्रात उत्खनन झाले आणि काही लाजणारे भग्न अवशेष दोरखंडांनी हवेत आले त्यांना आतच बरे वाटत असेल कदाचित आणि नाईल नदीच्या मुखाशी delta मधे होते वैभवशाली heracleion egypt चे सर्वात संपन्न बंदर पण तुला heracleion ची खरी गम्मत माहितीये इथे helen of troy आणि paris भेटले होते तेच दोघे ज्यांना भेटता क्षणी कळले की आपल्या भेटीने मंथन होणार heracleion चे अवशेष फोटो atlasobscura com या शहराचे नाव पडले heracles या ग्रीक देवावरून कोण होता हा माहितीये alcmene आणि देवांचा देव zeus यांचा मुलगा यांची गोष्ट अगदी तुझ्या अहिल्ये सारखी zeus देखील एकदा alcmene च्या नवऱ्याचे amphitryon चे रूप घेऊन आला पण त्यांच्या मुलाला ग्रीसने देव केले ना alcmene अहिल्येसारखी शिळा झाली ना zeus शापित झाला असो तर हे heracleion 1200 वर्षा पूर्वी mediterranean समुद्रात बुडाले नाईल कमी पडली ज्याला बंदरांचा राजा इजिप्तचे अविभाज्य अंग वगैरे म्हटले होते त्याला लोक पुरते विसरून गेले राहिले काय तर helen of troy आणि paris च्या गोष्टी शहरे चिरंतन नसतात गोष्टी चिरंतन असतात शहरे विसरली जातात कितीही संपन्न श्रीमंत सुंदर असली तरीही वेड्यांच्या गोष्टी मागे राहतात त्याच गोष्टी कधी मग या झोपलेल्या शहरांना नदीच्या समुद्राच्या कुशीतून उठवतात शहरे वृद्ध थकलेली गोष्टी तरुण सदा नव्या प्रत्येक सांगणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे वय स्वतःच ढापणाऱ्या म्हणून मला ती बाग खूप आवडते तिथे लगबग चालणारे लोक व्यायाम करणारी गमतीशीर माणसे भंकस करणारे तरुण तरुणी नारळाची झाडे जवळच असणारे mangroves त्या शेजारची बिट्टी नदी तिच्या पलीकडचा समुद्र हे सगळेच उद्या परवा हजार वर्षानंतर समुद्राने बागेला अगदी गिळले तरी हरकत नाही बाग आणि तिच्या गोष्टी माझ्यासाठी चिरंतन आहेत बाकी नदी आणि समुद्राची भरती ओहोटी सुरूच राहणार की परिणीता tagged गोमती नाईल मुंबई सिंधू leave a comment मनस्विनी february 23 2017 february 24 2017 by sandrp posted in नदी आणि संस्कृती नदी आणि साहित्य नदीसूक्त uncategorized युरोपातल्या नद्या जाम सुन्दर खूपशा शिस्तबद्ध नाकासमोर channels मधून चालणाऱ्या काही जाणीवपूर्वक माफक वळणं घेणाऱ्या अगदी थोड्या मनसोक्त वाहणाऱ्या paris मधली सीन किंवा रोम मधली tiber किंवा rhine main danube चा सुंदर कालवा अमेरिकेत अजून एक category जाणीवपूर्वक मनसोक्त वाहणाऱ्या wild and scenic rivers अपार सुंदर तरीही स्वतः भोवती अस्पर्श्तेचे न दिसणारे कुंपण वागवणाऱ्या संस्कारित सरळसोट नदी फोटो britishgeographer com या घाण नाहीत त्यांच्यात गटारे सांडत नाहीत त्या अगदीच कोरड्या होत नाहीत रंगीबेरंगी होड्या काही मोठ्या बोटी डौलदारपणे सांभाळतात सभ्य आणि आमच्या बघा कोसी बागमती उतावली बकाल उफराट्या कधी पाण्याने तुडुंब भरतील आणि कुचकामी धरणे embankments तोडतील नेम नाही बर channels चे या ऐकत नाहीत या आपले once in 100 years रेकॉर्ड्स सुद्धा बिंदास मोडतात record ठेवणारे पण त्यांचेच सुपुत्र या erosion ने जुन्या जागा खातात आणि deposition ने नव्या बनवतात मनस्विनी काही माणसं बेशिस्त नद्यांसारखी आपल्या मुलभूत प्रश्नांची उत्तरे आपल्यातच आपल्या तोकड्या पण रक्ताच्या रसरशीत अनुभवात शोधणारी अभिजात साहित्य वगैरेशी फारसे देणे घेणे नसणारी पुस्तकात कवितेत साहित्यात आपल्या अनुभूतीच्या कुबड्या न शोधणारी काहीतरी तोडणारी आणि काहीतरी बनवणारी लखलखीत कोरी अनुभूती यांनाच येत असावी आणि मी बघ प्रत्येक भावछटेसाठी मला कुठेतरी कधीतरी काहीतरी कोणीतरी तिसऱ्याने लिहून ठेवलेलं आठवतं आणि त्याने मग मी जाम खुश होते तुला ती nerolac ची ad आठवतीये मेरा वाला क्रीम मला अगदी अस्सच म्हणायचं होतं तंतोतंत how i hate that word सगळी second hand अनुभूती readymade कपड्यांमध्ये अंग बसविण्यासारखी ch विदुषक मधल्या चंचले सारखे ते सत्य माझेच माझ्यापुरतेच असते कारण त्यावर माझ्या जीवनाची रक्तमुद्रा असते त्याचे दान करता येत नाही कि इतरांकडून त्याचा स्वीकार करता येत नाही असं पाहिजे देखा इथेपण ओरिजिनल नाही लिहिता येत p परिणीता tagged कोसी नदीसूक्त बागमती leave a comment resilience february 23 2017 february 24 2017 by sandrp posted in नदी आणि साहित्य नदीसूक्त uncategorized resilience आणि सहनशीलता निसर्गाकडून शिकावी किंवा मांजरांकडून मी आज अनोळखी गावाच्या sidewalk वर चालताना हरवले तर समोर एक सुकडी झुपकेदार शेपटीची मांजर माझ्याकडे बघून हसली हायला ही ओळखीची खूप वर्षापूर्वी आपल्या घराच्या पार्किंग मध्ये यायची मग गायब झाली ती आत्ता दिसली बघ चेहऱ्यावर दुनिया देखी है बॉस अशी शांतता परत आली ऑस्ट्रेलिया मध्ये दोन मोठ्या नद्या आहेत मरे आणि डार्लिंग त्यांचा delta एक आहे सुंदर lyrical नद्या आपल्यासारखेच australian लोकांनी पण त्यांचे सगळेच पाणी पिऊन टाकले समुद्राला भेटे पर्यंत नद्या कोरड्या पण या वर्षी बेभान पाउस झाला मरे नदीने असे वाहते पाणी २३ वर्षात बघितले नव्हते तिच्या तीरावरच्या थकलेल्या eucalyptusआणि red gum बनांच्या खोल खोल अंधाऱ्या मुळापाशी आता थंडगार पाणी पोचले एखाद्या नीरव रात्री ऐकले तर झाडे पाणी पिताना ऐकू येतील आपण जाऊ एकदा पाण्यामुळे macro invertebrates वाढले मग पक्षी छोटे मासे मग मोठे मासे सुरेल बेसूर बुल frogs खेकड्या सारखे yabbies एका भरपूर पावसाने नदीत जी productivity ची लाट उसळवली ती थेट estuary पर्यंत आता समुद्रापर्यंत पोचली सचैल गोपी न्हाल्या गं पुरा नंतरची मरे डार्लिंग फोटो abc net au तशीच आपली कृष्णा हिचे समुद्रा जवळचा प्रवाह वर्षे सरता सरता शून्यावर आले २००६ मध्ये सगळी नदीची गाणी कविता घाला चुलीत पण या वर्षी पूर आलाच भारताने गंगेचे इतके पाणी रोखले फराका बांधावरून इतके वळवले की सुंदरबन खारे होत गेले तुला माहितीये तिथले वाघ अतीव क्रूर आणि man eaters होण्या मागचे हे मोट्ठे कारण आहे क्रौर्य आणि बांध पण कितीही तोंड पाडून बसा रड घ्या कोरड्या नदीवर कविता करा पाऊस येणारच पुढे मागे होईल कमी जास्त होईल अगदी २३ वर्षांनी येईल पण येणार पूर म्हणजे नदीचा उत्सव पूर्वी बिहारमध्ये पौर्णिमेच्या आसपास पूर आला की लोक नावांमधून फिरायचे चंद्राची नदीची गाणी गायचे आता नदीला मारूनमुटकून शिस्त लावण्यासाठी बांधलेले embankment फुटले की कहर होतो फक्त आणि अंत बघितला की अघटीत पाउस येतोच हवामान बदलतं बांध फुटतात रुस्क्या नद्या ओथंबून वाहतात धरणांनी जास्त बांधले तर पूर रौद्र होत जातात सिंधू नदीचे झाले तसे सजल वाटा समुद्राकडे वाहतात journeys end in lovers meeting ते सोड पण ही मांजर इतके समुद्र ओलाडून इथे कशी आली लवकर बुक केले म्हणून चांगले डील मिळाले असेल तिला or like a wise friend says journeys get new horizons when lovers meet परिणीता tagged गंगा नदीसूक्त मर्रे leave a comment नावं february 23 2017 february 24 2017 by sandrp posted in नदी आणि संस्कृती नदी आणि साहित्य नदीसूक्त uncategorized above खलघाट येथील नर्मदा फोटो परिणीता मुझे जाँ न कहो मेरी जाँ मेरी जाँ जाँ न कहो अंजान मुझे जान कहाँ रहती है सदा संजीव कुमार काय सही होता ना यात आणि गीता दत्त तिच्यासाठीच होत हे गाणं actually you know what जान वगैरे राहू दे एका नदीचे नावपण एक राहत नाहीत बदलत जातं दगडांवरून खळखळ उड्या मारते ती रेवा गंभीर घरंदाज मागे न वळणारी ती नर्मदा जिला बांधता येत नाही ती गंगा खाली मान घालून सगळ्यांचं सगळं ऐकते ती जान्हवी परदेशी जाते तेव्हा सुलक्षणी पद्मा समुद्रात विलीन होताना ढगांकडे बघणारी मेघना आपल्या पुस्तकी fantasy साठी सिंधू सिंधच्या लोकांना पुरांनी हैराण करते ती पुराली अफगाण्यांना जबाबदार वडील वाटते तेव्हा अब्बासिन कधी आकाशाचा तुकडा चोरते तेव्हा निलाब तापत तळपत विदर्भ खानदेशातून जाते ती तापी डोकं उशाशी घेऊन आश्वस्त करते ती अर्कजा शक्तीस्वरूप वाहते ती भीमा विठ्ठलाच्या पायी उगीच रेंगाळते ती चंद्रभागा गंगेची १००० नावे नर्मदेची १००० तापीची २१ सांगायचं काय अरे किती बोलते ही d की खूप नावं पाहिजेत अगदी खूप एका माणसाला एकच नाव जन्मभर कसं पुरणार किती माणसं असतात एकात गर्दी असते रात्री लिहिणारी वेगळी सकाळी वाचणारी वेगळी भंकस करणारी माणसं वेगळी फिलोसोफीवाली वेगळी चर्चसमोर पाणीपुरी खाणारी वेगळी डॉक्टर बनणारी वेगळी तुला लहानपणी एकच नाव होते हे मला म्हणून आवडत नाही परिणीता tagged गंगा तापी नर्मदा सिंधू leave a comment रहस्य february 23 2017 february 24 2017 by sandrp posted in नदी आणि संस्कृती नदी आणि साहित्य नदीसूक्त वाशिष्ठी uncategorized above reef inside amazon river source the guardian amazon नदीच्या तळाशी मोठ्ठं कोरल रीफ सापडलं ना प्रवाळाचं बेट नदीत कोरल अरे पण कोरलला खार आणि गोड पाणी लागतं त्याला तापमान एक अंश इथे तिथे होवून चालत नाही सूर्यप्रकाश लागतो amazon म्हणजे उकळा चहा काळ हिरवं गर्द पाणी तिची ती रिओ नेग्रो तर कशी शार काळी मातकट दाट sluggish नदी मग कसं शक्य आहे हे पण आहे खरं नदीच्या पोटात काय काय असत ना बोलेलं न बोलेलं पाहिलेलं न पाहिलेलं स्पर्श अस्पर्श खरं खोटं amazon तशीही फार गुपिते बाळगणारी बाई तिच्या १३००० फूट खाली अजून एक नदी वाहते hamza amazon ची अदृश्य वाहती बहिण हिच्यामुळे amazon आपल्या मुखाजवळ कमी खारी आहे आपली हिरण्यकेशी पण तशी गुहेतुन अचानक बाहेर येते म्हणून आपल्याला कोण कौतुक पण ही बया अनेक किलोमीटर वाट काढत आहे limestone खडकातून गोड बोलून त्या दगडाला विरघळवत आपल्याला ते दिसत नाही म्हणुन ते नाही इतकेच सीतेने शाप दिला ती फल्गु मस्त वाहते गयेत वाळूखाली अशीच वाहत आलीये ती शेकडो वर्षे अदृश्य फक्त आपल्यासाठी खरंतर सीतेनी वरदानच दिले की फाल्गुला आपल्याच अशा अंधाऱ्या एकट्या विश्वात वाहण्याचे वाशिष्ठीत इतके इतके प्रदूषण शंकरच वाटते ना ती विष प्यालेली आणि तिच्यात इतक्या मगरी मगरी काय pollution indicator आहेत का हसू नको नाहीयेत त्या indicator पण आहेत तिथे crocodile in vashisthi river photo parineeta गंगेत आणि सिंधुत डॉल्फिन समुद्रात असतात डॉल्फिन आणि समुद्रातल्या आणि नदीतल्या डॉल्फिनमध्ये तसा जास्त फरक नाही ते इथे कसे कारण गंगा गंगा होण्याच्या आधी आणि सिंधू सिंधु होण्याच्या आधी टेथिसचा समुद्र होता तिथे स मु द्र होच गंगेतले आंधळे हिंस्त्र शार्क नदी सारखेच गुपित ठेवणारे mythical की खरे नद्या आपल्या खऱ्या खुणा विसरत नाहीत इतक्या लवकर तुमचं ते हरिद्वार पण समुद्रात होतं गंगेला पवित्र boring देवी आपण केलं तशी ती जन्मतःच wild बंगालच्या freshwater pulse in bay of bengal source natureasia com समुद्रात जाते गंगा २५०० किमी ची नदी नाही ती अजून हजारो किमी वाहते थेट सुंदरबन पासून परद्वीप पासून श्रीलंके पर्यंत समुद्राच्या आतुन आपला मार्ग काढत मासेमारांनी सांगितले हे शास्त्रज्ञांना you know what मला कोळी लोक solid आवडतात sailors of the wide waters तर आपल्याला काय माहिती असते प्रकाशातले सगळे आपले ठोकताळे आणि आपलीच उत्तरं मग त्या उत्तरात काही बसले नाही के त्याची ठाकाठोकी गिरी नुसती ही डार्क विश्वे जास्त सुन्दर वाटतात अस्पर्श अदृश्य murky dangerous पण म्हणून रोरावती जिवंत तर असो परिणीता tagged amazon ganga vashishthi leave a comment posts navigation older posts search search for प्रवाह कशासाठी दुष्काळ आणि पुराच्या गर्तेत अडकलेला महाराष्ट्र पाण्याची किंमत जाणतो पण आपण आपल्या नद्यांना निर्झरना टाक्यांना तळ्यांना पर्ह्याना विहिरींना विसरत चाललो आहोत का त्यांच्याच काही गोष्टी पाणी हे केवळ पाणी कधीच नसते ते एका जिवंत परीसंस्थेचा भाग असते एकेक ओंजळी मागे असतेच झर्याचे पाणी categories कावेरी तापी नदी आणि संस्कृती नदी आणि साहित्य नदीसूक्त पाणी वाटप महाराष्ट्रातील नद्या मुलाखत वशिष्ठी खाडी वाशिष्ठी शंकरपर्णी शास्त्री uncategorized videos नदी झरे खाडी विहीर ई create a free website or blog at wordpress com प्रवाह नदीच्या सोबतीने वाहताना create a free website or blog at wordpress com subscribe subscribed प्रवाह नदीच्या सोबतीने वाहताना join 39 other subscribers sign me up already have a wordpress com account log in now privacy प्रवाह नदीच्या सोबतीने वाहताना subscribe subscribed sign up log ...
|