Meta tags:
Headings (most frequently used words):
2013, about, this, 22, july, friday, saturday, blog, me, how, wednesday, february, 2017, sunday, october, 13, monday, 29, 12, june, january, 26, december, 28, 2012, translate, search, cute, little, angel, archive, followers, हम्पी, विजयनगरचे, साम्राज्य, happy, racist, bitch, weird, dreams, पुलंचे, एक, पत्र, black, hole, sewing, projects,
Text of the page (most frequently used words):
आहे (39), the (26), and (22), that (19), नाही (17), आणि (17), was (15), about (12), but (12), this (9), आहेस (9), अर्थ (9), dream (9), हम्पी (8), shilpa (8), विचार (8), with (8), she (8), 2013 (7), comments (7), posted (7), काय (7), प्रश्न (7), आपण (7), तुला (7), कुणी (7), had (7), her (7), like (6), you (6), मला (6), त्या (6), आहेत (6), कारण (6), कुणाला (6), where (6), when (6), june (5), साम्राज्य (5), are (5), होते (5), उत्तर (5), स्वत (5), तिला (5), आनंद (5), प्रत्येक (5), december (4), october (4), january (4), february (4), july (4), black (4), side (4), one (4), तुझ्या (4), तरी (4), आला (4), कशासाठी (4), त्याला (4), होऊ (4), काही (4), म्हणजे (4), जीवनाला (4), not (4), people (4), dreams (4), from (4), can (4), get (4), school (4), child (4), bitch (4), came (4), told (4), any (4), मंदिर (4), विजयनगरचे (3), blog (3), here (3), hole (3), other (3), going (3), may (3), पुलंचे (3), चंदू (3), अशा (3), पत्र (3), ज्यांना (3), असं (3), जीवनाचा (3), झाला (3), सर्वस्व (3), येतो (3), अट्टाहास (3), काहीतरी (3), येईल (3), were (3), did (3), really (3), front (3), well (3), lady (3), calling (3), again (3), some (3), life (3), good (3), great (3), just (3), white (3), then (3), said (3), parents (3), for (3), racist (3), don (3), प्रचंड (3), दगडी (3), कुंड (3), theme (2), november (2), 2012 (2), 2017 (2), little (2), posts (2), things (2), sewing (2), something (2), etc (2), watching (2), friday (2), after (2), everything (2), near (2), very (2), learn (2), saturday (2), विमान (2), होतं (2), निराशा (2), सारे (2), कुठून (2), महत्वाचा (2), वाटतं (2), शोधत (2), लाभलं (2), महान (2), राहिलं (2), देखील (2), किंमत (2), लागतं (2), लागतो (2), करताना (2), आपल्याला (2), कधीच (2), निर्मम (2), अत्यंत (2), मूर्ख (2), त्याचं (2), हवं (2), असतं (2), स्व (2), आपलं (2), अर्पण (2), केला (2), करायला (2), शकत (2), फक्त (2), निर्माण (2), होतात (2), इथे (2), करायचा (2), लिहायचं (2), साहित्य (2), करायची (2), त्याची (2), गंगोत्री (2), आपल्या (2), सारं (2), आवडेल (2), जगात (2), नये (2), दिलं (2), असतो (2), द्यावे (2), लागते (2), अगदी (2), होता (2), झाले (2), पाहिजे (2), झालेल्या (2), शेवटचा (2), दीस (2), गोड (2), व्हावा (2), कधी (2), आधी (2), येते (2), उगवलं (2), दिसतो (2), असावी (2), वाच (2), नाहीतर (2), जीवनाचं (2), साहजिक (2), deaths (2), वर्षी (2), दिवशी (2), सोनं (2), अस्वस्थ (2), which (2), live (2), whatever (2), happening (2), happen (2), teenager (2), village (2), house (2), scary (2), huge (2), red (2), dot (2), scared (2), who (2), wasn (2), anything (2), see (2), all (2), why (2), would (2), never (2), many (2), deja (2), real (2), too (2), thing (2), feel (2), understand (2), before (2), tell (2), hmm (2), your (2), still (2), freaky (2), sex (2), use (2), have (2), person (2), weird (2), around (2), ghost (2), woman (2), racial (2), slurs (2), street (2), there (2), went (2), fuck (2), think (2), americans (2), indians (2), course (2), forget (2), cops (2), want (2), nothing (2), keep (2), put (2), pto (2), feeling (2), happy (2), शहर (2), कोरीव (2), मंदिरे (2), विठ्ठल (2), मंदिरात (2), बाजूला (2), मोठे (2), मोठ्ठे (2), असे (2), लोक (2), काम (2), how (2), picture, window, images, powered, blogger, utehil, followers, 2008, 2009, march, 2010, 2011, september, archive, view, complete, profile, hello, friends, find, authentic, marathi, recipes, regularly, prepare, cute, angel, search, translate, subscribe, atom, home, older, create, jewelry, sometimes, painting, crochet, fun, satisfactory, making, better, than, computer, projects, short, film, holes, milky, way, learned, absorbs, comes, different, story, takes, gives, back, funnel, interesting, more, update, नातेवाईक, ठाकूर, लष्करात, हवाई, दलात, त्यांच्या, जवळच्या, मित्राचं, अपघातात, निधन, झालेलं, प्रसंगी, आयुष्याबद्दलच, वाटून, त्यांनी, पुलंना, लिहिलं, त्यास, दिलेलं, जुलै, १९५७, प्रिय, सर्व, पत्राचा, सारांश, हाच, जुन्या, लोकांनीही, विचारून, घेतला, कस्त्वम, कुत, आयात, कोण, सगळ्यात, काण्ट, पासून, विनोबांपर्यंत, सर्वजण, प्रश्नाचं, थोरांच्या, मानानं, अल्पमतीच, सुचण्याचं, भाग्य, पत्रामुळं, तुलाही, वाटलं, धन्य, मनाच्या, अवस्थेत, सुचतो, तुझं, ज्याप्रमाणे, जमिनीवर, पंखा, नुसताच, फिरवीत, त्याचप्रमाणे, जागच्या, जागी, नुसतं, घुमत, जमिनीवरचे, पायच, सोडून, उड्डाण, घ्यावं, अलिप्तपणाने, भूगोल, पाहिल्यासारखा, करावा, त्याचे, देण्याची, ताकद, अहंकारानं, सुरू, सापडत, संपूर्ण, व्हावं, घोडे, पेंड, खाते, इथेच, पत्रात, अखिल, स्त्री, जातीला, हीन, लेखून, मोकळा, बायका, त्यांच्यात, अजिबात, आढळत, अशाच, वाटलेल्या, बाईचं, छोटं, पोर, पाहिलं, त्याच्या, सुखदु, खाशी, तिच्या, इतकं, कोणी, रममाण, झालं, माणसाला, ठावूक, एकरूप, होणारं, दुसरं, कोणीतरी, भयंकर, अहंकार, तुझ्याशी, त्व, विसरून, करणारी, व्यक्ती, हवी, असा, कुणाच्यात, तुझा, तयार, शकतोस, नाहीस, शकतात, स्त्रिया, ज्यांची, अजून, ओळख, पटली, तुझी, पहा, आप्पांसाठी, जगते, वैयक्तिक, महत्वाकांक्षा, सुनीता, स्वतंत्रपणे, खूप, गोष्टी, करु, शकली, असती, तिच्यात, असामान्य, बुध्दीमत्ता, तिने, आपले, माझ्यासाठी, ठेवले, माझ्याशिवाय, नसतो, इतके, पुरुष, समर्पणाच्या, वरच्या, अवस्थेला, जाऊन, पोहोचत, सदैव, मृत्यूच्या, छायेत, वावरत, असतोस, ऑफिसमध्ये, रोज, सोनापुरावरून, जातो, अनेकांची, अंतिमयात्रा, दिसते, सारा, यासाठीच, नाटकं, लिहायची, विनोदी, गायचं, गाणी, शेवट, ठरलेलाच, उत्पन्न, कोणती, अहंकारात, किंबहुना, असलं, तरच, अस्तित्वाला, विचारातून, नक्की, संभवत, असेल, असल्या, निराशेने, घेरले, फ्लाईंग, करावं, कारकुनांनी, मानेचा, काटा, मोडेपर्यंत, झिजावं, भंग्यांनी, संडास, साफ, करावे, स्त्रियांनी, बाळंतपणाच्या, यातना, भोगाव्या, इतकंच, गाणाऱ्यांनी, गावं, चित्रकारांनी, चित्रं, काढावी, द्यावं, प्रश्नाइतकाच, द्यावा, विचारता, येण्यासारखा, शहाण्यांनी, प्रश्नाच्या, मागे, लागू, याचं, कुणालाही, सापडलं, यात, होऊन, फूल, स्त्रीकेसर, पुंकेसर, मऊमऊ, तुकड्यांचा, पुंजका, एवढंच, दिला, प्रेयसीला, देवाला, च्या, कोटाला, लावलं, फुलाला, आणला, जीवनालाही, असाच, आणावा, घेण्यात, नसून, देण्यात, निरपेक्ष, बुध्दीने, हवेत, विरणाऱ्या, अल्पजीवी, स्वरांची, संगीतिका, नदीत, दीपदान, करतात, तशी, सोडली, नावडेल, माना, डोलावतील, नाकं, मुरडतील, कामा, देताना, चुकांचे, अपूर्णत्वाच्या, जाणीवेचे, तन्मयतेचा, बस्स, एवढेच, करण्यासाठी, आलो, तुकोबा, म्हणतात, याचिसाठी, म्हणतो, रोजचा, हवा, रोजच्यातला, कोणता, दिवस, कळलं, आईला, पोरापासून, घेण्याचा, कुठे, पोराला, जन्मल्यापासून, देत, वासरू, पीत, असताना, गाईचे, समाधानी, ध्यान, पाहिले, मळा, शिंपावा, कुठल्याही, क्षत्रात, वैमानिक, अगर, हमाल, बोजा, टाकायचाच, आनंदाने, टाकावा, वैतागाच्या, ठिणग्या, लगेच, पायाखाली, विझवाव्या, वैताग, कंटाळा, मलाही, क्षुद्रपणा, स्वार्थ, तसा, आपल्यातही, आढळणार, याची, चिंता, जगण्याला, धार, मनाचा, आम्ल, झडतो, फिलॉसॉफर, वाचण्यापेक्षा, ललित, लेखक, डोस्टोवस्की, गोर्की, डिकन्स, शेक्सपियर, रंग, देणारी, माणसे, तत्वद्न्यांचं, माझं, सूत, जमलं, शून्याला, भागत, बसणारी, मंडळी, त्यापे्क्षा, दारासमोर, फुलबाग, लाग, अत्तराच्या, कुपीतले, झाकण, उघडल्यासारखा, दरवळायला, लागेल, ऐसा, मझा, लग्न, जरूर, गरिबाच्या, रसिक, सालस, पोरीशी, चित्रकला, येत, संगीत, यावं, केवळ, दिखाऊ, ऍकम्प्लिशमेंट्स, नव्हेत, खऱ्या, कलांची, जोपासना, करता, स्वास्थ्यात, ठेव, नवं, दर्शन, घडवील, चंदोबा, शक्ती, स्त्रीत, असते, परमेश्वराची, अगाध, कृती, साऱ्या, जिवीताची, प्रेरणा, पुष्कळदा, विसरते, वेड्यासारखे, वागते, दुर्दैव, तुझे, सोबती, अचानक, गेले, अंतर्मुख, होणंही, म्हणतोस, their, justified, dear, boy, whose, justifiable, माझा, भाऊ, औषधांच्या, अभावी, वयाच्या, अकराव्या, वारला, माझे, वडील, निर्व्यसनी, निष्पाप, प्रामाणिक, पन्नाशीच्या, हृदयविकाराने, वारले, परवा, मुंबईत, गोळीबारात, माणसं, मेली, हिरोशिमा, त्याबद्दल, लिहायला, ज्या, जन्माला, येणं, जस्ट्फाइबल, होईल, मरणाचं, जस्टिफिकेशन, बसू, हाती, आलेल्या, क्षणाचं, करायचं, जीवनाच्या, क्षणांची, मजा, हीच, दुसऱ्याला, दिले, शुध्द, माती, जीवन, मातीमोल, वाटायचं, सुध्दा, एकच, दुसऱ्याच्या, जीवनात, सुख, कसं, देता, याचा, करीत, करतो, भाग्यवान, आणतात, भाई, scientist, study, proved, actually, means, they, dreaming, them, experience, lived, right, against, feet, glued, ground, kumkum, forehead, traditional, maharashtrian, sari, coming, death, mother, got, intense, woke, shock, realized, far, big, city, breathing, normally, knew, bit, blackened, teeth, these, years, random, living, our, wada, whom, thought, times, repeated, kinda, also, lot, moment, funny, happens, experienced, over, been, through, while, fears, saw, love, eat, food, drink, wine, beer, wouldn, enjoying, meal, even, frequently, chased, gun, intention, till, sudden, stopped, ass, freaks, out, 4th, 30pm, old, verbally, attacked, parked, crossing, park, legal, parking, kept, educate, herself, should, laws, come, what, respond, asked, stumbled, second, native, seriously, since, passing, interferes, fire, called, because, didn, fight, ran, away, husband, reported, address, number, plate, him, cop, illegal, whole, freedom, speech, yourself, area, full, crap, campbell, san, jose, infested, lower, quality, education, happened, started, give, look, show, being, giving, crime, isn, tried, alert, refused, email, yahoo, group, saying, has, help, ever, mean, incident, chair, whitey, small, minded, fuckin, mind, nobody, needs, hear, ready, same, monday, last, couple, months, excited, almost, everyday, reason, wish, share, yet, sure, know, time, anyways, day, folks, sunday, मागच्याच, कर्नाटकातील, ठिकाणी, जाण्याचा, सुयोग, युनेस्कोची, world, heritage, साईट, विजयनगरच्या, साम्राज्याची, खुण, विजयनगर, संपन्न, राजधानी, होय, सगळीकडून, मोठमोठ्या, पाषाणांनी, वेढलेले, पाषाणावरच, मोठमोठी, अतुत्तम, दर्जाची, कामे, केलेली, उभारली, अच्युतराया, विरुपाक्ष, मुख्य, अक्षरशः, जाण्याआधी, दोन्ही, असलेले, corridor, जिथे, पूर्वी, पूजेचे, फुले, फुलमाला, विक्रेते, बसायचे, प्रवेश, करतेवेळी, तुम्हाला, रस्त्याच्या, दिसेल, सांगतात, येथे, क्रीडेसाठी, जमायचे, मोठ्या, मंदिराजवळ, लहानमोठे, खरेतर, पूर्वीच्या, सामुदाईक, जागा, होत, तिथे, जलक्रीडा, करणे, भेटणे, गप्पा, टप्पा, कारणाने, भेटत, कुंडच्या, मध्यभागी, उंच, असलेला, चौथरा, शब्दशः, भिंत, खांब, उंबरठा, सगळीकडेच, सुंदर, नाजूक, अत्युत्तम, दर्जाचे, केले, रामायण, महाभारत, संदर्भ, घेऊन, केलेले, wednesday, outlet, express, kind, towards,
Text of the page (random words):
how about this how about this this blog is my outlet to express any kind of feeling towards anything in life wednesday february 22 2017 हम्पी विजयनगरचे साम्राज्य हम्पी विजयनगरचे साम्राज्य मागच्याच वर्षी कर्नाटकातील हम्पी या ठिकाणी जाण्याचा सुयोग आला हम्पी हि युनेस्कोची world heritage साईट आहे कारण कारण हम्पी हे शहर विजयनगरच्या साम्राज्याची खुण आहे विजयनगर साम्राज्य हे एक संपन्न साम्राज्य होते हम्पी हि राजधानी होय सगळीकडून मोठमोठ्या पाषाणांनी वेढलेले हम्पी हे शहर या पाषाणावरच प्रचंड मोठमोठी आणि अतुत्तम दर्जाची दगडी कोरीव कामे केलेली मंदिरे उभारली विठ्ठल मंदिर अच्युतराया मंदिर विरुपाक्ष मंदिर हि मुख्य मंदिरे आहेत प्रत्येक मंदिर अक्षरशः प्रचंड आहे मंदिरात जाण्याआधी दोन्ही बाजूला प्रचंड मोठे दगडी छत असलेले corridor आहेत जिथे पूर्वी पूजेचे साहित्य फुले फुलमाला इ विक्रेते बसायचे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतेवेळी तुम्हाला रस्त्याच्या बाजूला एक मोठ्ठे कुंड दिसेल असे सांगतात कि येथे लोक क्रीडेसाठी जमायचे प्रत्येक मोठ्या मंदिराजवळ असे लहानमोठे खरेतर मोठे आणि मोठ्ठे कुंड आहेत हे कुंड म्हणजे पूर्वीच्या सामुदाईक जागा होत लोक तिथे जलक्रीडा करणे भेटणे गप्पा टप्पा इ कारणाने भेटत प्रत्येक कुंडच्या मध्यभागी एक उंच छत असलेला चौथरा आहे प्रत्येक म्हणजे शब्दशः प्रत्येक भिंत खांब छत उंबरठा सगळीकडेच सुंदर नाजूक आणि अत्युत्तम दर्जाचे दगडी कोरीव काम केले आहे रामायण महाभारत इ संदर्भ घेऊन हे काम केलेले आहे posted by shilpa at 3 51 pm 2 comments sunday october 13 2013 happy me for the last couple of months or so i am feeling very happy and excited about life almost everyday reason i don t wish to share just yet but sure is the good one or i just think so i don t know may be the time can tell i feel like a teenager again anyways have a great day folks posted by shilpa at 10 04 pm no comments monday july 29 2013 racist bitch on june 4th 2013 around 2 30pm one old white as ghost woman near the school verbally attacked me with racial slurs i parked on the street and about to go get my child and this bitch came to me crossing the street and told me not to park there it was a legal parking so i told her that she kept going so i told her to educate herself and went on but then she said you should learn the laws before you come here what the fuck where the fuck she think she came from i had to respond that so i went to her and asked where did you parents came from she stumbled for a second and said my parents are native americans seriously bitch since when red americans are white as a ghost many indians were passing by but of course no one interferes with a live woman on fire forget about this i called the cops because i didn t want any fight in front of my child s school parents as i was calling she ran away with her husband i reported her house address and number plate cops came and as i told him the cop said it s not illegal to be a racist there is nothing i can do i get the whole freedom of speech thing but keep it to yourself if the area wasn t full with indians it would be still a crap like campbell and san jose infested with white people and lower quality education i happened to see that bitch again at school and she started to give me the look of course i did too i don t want to put up a show in front of my child but if being racist or giving racial slurs is not a crime then if my child isn t around she is going to get it i tried to alert people in school but the pto refused to put up any email to yahoo group saying it has nothing to do with pto really then forget about any other help from my side ever and i mean it was that a co incident that the chair person was a whitey hmm well people may be small minded but keep your fuckin mind with you nobody needs to hear it or be ready for the same posted by shilpa at 6 00 pm no comments friday july 12 2013 weird dreams weird ass dreams just freaks me out when i was 18 i frequently use to have a dream where i was chased by some person or i had a gun in intention to use it till i was about 24 all of a sudden this dream stopped i understand that fears or things you saw etc can get real in your dreams but it s still freaky i love to eat good food and drink good wine or beer well who wouldn t but never had a dream where i was enjoying some great meal or even had a great sex dream or a freaky sex dream whatever many times i had a repeated dream kinda like a deja vu of a dream i also had a lot of deja vu moment in real life too but funny thing is when this happens i feel like i ve experienced it and and when it s over i understand that i ve been through this before why can t i tell that while it s happening hmm scientist did a study which proved that people actually live the dreams that means whatever they are dreaming is really happening to them i happen to experience that i was teenager i had a dream where i was in my village in front of the house where i lived which is right against a well my feet were glued to the ground and a scary lady with a huge red dot kumkum on her forehead in a traditional maharashtrian sari was coming at me or calling me i was scared to death and calling my mother it got so intense that i woke up in a shock when i realized that i am far from the village in a big city i was again breathing normally i happen to knew that lady who wasn t really scary or anything but i was scared to see her huge dot and a little bit blackened teeth when i was about 6 or 7 after all these years why would i dream about some random lady living in our wada about whom i never thought about posted by shilpa at 10 32 pm no comments saturday june 22 2013 पुलंचे एक पत्र पु लं पुलंचे एक पत्र पुलंचे नातेवाईक चंदू ठाकूर हे लष्करात हवाई दलात होते त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं त्यास पु लं नी दिलेलं उत्तर १० जुलै १९५७ प्रिय चंदू तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे कस्त्वम कुत आयात तू कोण आहेस कुठून आला आहेस पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच पण तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे असं मला वाटलं ते धन्य आहेत हा महान प्रश्न आहे मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस बायका मूर्ख का तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे स्वत शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी काय भयंकर अहंकार आहे नाही तुझ्याशी स्वत चं स्व त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे पण तू असा विचार केला आहेस का तू कुणाच्यात तुझा स्व अर्पण करायला तयार आहेस का निर्मम होऊ शकतोस का नाही तू होऊ शकत नाहीस मी होऊ शकत नाही होऊ शकतात फक्त स्त्रिया ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही तुझी आई पहा ती आप्पांसाठी जगते तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले माझ्याशिवाय तिला विचार नसतो इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत दु खे निर्माण होतात ती इथे तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा लिहायचं नाटकं लिहायची विनोदी साहित्य लिहायचं गायचं गाणी करायची कशासाठी शेवट तर ठरलेलाच आहे पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात त्याची गंगोत्री कोणती त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे मी आहे तर जग आहे किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु ख निराशा तुला असल्या निराशेने घेरले आहे तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं चंदू कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं भंग्यांनी संडास साफ का करावे स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं चित्रकारांनी चित्रं का काढावी जगात कुणी कुणाला दु ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही हे आहे हे असं आहे यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे नाही तरी फूल म्हणजे काय असतं काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना पण आपण त्याला अर्थ दिला कुणी ते प्रेयसीला दिलं कुणी देवाला दिलं कुणी स्वत च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते आणि मग जीवनाला अर्थ येतो हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली कुणाला आवडेल कुणाला नावडेल कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील मला त्याचं दु ख वा आनंद होता कामा नये दु ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे अपूर्णत्वाच्या जाणीवेचे आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा बस्स एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो पोराला जन्मल्यापासून ती देत येते तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का जीवनाचा मळा आपण शिंपावा उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस वैमानिक ऐस अगर हमाल ऐस बोजा टाकायचाच आहे तो आनंदाने टाकावा वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या वैताग कंटाळा मलाही येतो क्षुद्रपणा दिसतो स्वार्थ दिसतो पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी म्हणजे मग जगण्याला धार येते मनाचा आम्ल झडतो तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच डोस्टोवस्की गोर्की डिकन्स शेक्सपियर वाच जीवनाला रंग देणारी माणसे ही तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर तिला चित्रकला येत असावी तिला ते नाहीतर संगीत यावं पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते परमेश्वराची ही अगाध कृती आहे साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे ती स्वत ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते हे दुर्दैव आहे तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु ख झाले साहजिक आहे अंतर्मुख होणंही साहजिक आहे तू म्हणतोस की their deaths were not justified my dear boy whose deaths are justifiable माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते निष्पाप होते प्रामाणिक होते ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली आणि हिरोशिमा त्याबद्दल लिहायला हवं का ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात भाई posted by shilpa at 10 07 am no comments saturday january 26 2013 black hole after watching a short film on black holes in the milky way i ve learned that black hole absorbs everything that comes near it but on the other side of the black hole is a different story one side takes it and the other side gives everything back like a funnel that s very interesting i am going to learn more and may be update here posted by shilpa at 10 47 pm no comments friday december 28 2012 sewing projects i like to create things sewing jewelry sometimes painting something crochet etc it s fun and satisfactory that you are making something better than watching tv or computer posted by shilpa at 1 50 am no comments older posts home subscribe to posts atom translate search this blog cute little angel about me shilpa hello friends find here the authentic marathi recipes that i regularly prepare view my complete profile blog archive 2017 1 february 1 हम्पी विजयनगरचे साम्राज्य 2013 5 october 1 july 2 june 1 january 1 2012 8 december 1 november 2 september 1 june 2 january 2 2011 4 november 1 october 2 february 1 2010 15 december 1 july 2 june 3 march 2 february 3 january 4 2009 5 october 5 2008 1 december 1 followers picture window theme theme images by utehil powered by blogger
|