Meta tags:
Headings (most frequently used words):
मराठी, सुबोध, शुक्रवार, श्री, बरेच, आणि, आहे, २०२०, काही, ब्लॉग, २०२१, सोमवार, बहु, महाजालावरचे, दुवे, आलोक, तक्रार, मुक्त, नियतकालिक, प्रश्न, स्वातंत्र्याचा, असतो, लेखन, कोश, कार, फडके, अरुण, उत्सव, ह्यांचं, निधन, नावात, गैरवर्तनाची, होत, त्यावेगळेही, ग्रंथ, सूचिकार, थोर, शरद, केशव, साठे, भाषणांचे, सुशान्त, लेखनाचे, जुलै, हा, शोधा, जून, रविवार, २४, जानेवारी, डिसेंबर, गुरुवार, १४, मे, बुधवार, २०१६, सुबोधच्या, लेबल, म्हणे, ब्लॉगविश्व, पेज, पृष्ठदृश्ये, एकूण, दिनांक, माझ्याबद्दल, संग्रहण, २०१४, ऑगस्ट, १८, २०१५, ऑक्टोबर, करा,
Text of the page (most frequently used words):
आहे (111), #नाही (89), आणि (83), #ह्या (65), #काही (48), #होतं (39), असं (35), #करून (32), #मराठी (32), #म्हणजे (31), करा (29), काय (27), #त्या (26), तरी (26), असे (26), #सुबोध (25), अशा (24), #त्यांच्या (23), त्यामुळे (22), मला (21), होता (21), आपल्या (21), होती (21), शेअर (21), काम (20), नाव (19), अनेक (19), एका (18), नाहीत (17), करत (17), म्हणून (17), आज्ञावली (16), झालं (16), करता (15), असते (15), गोष्टी (15), असतात (15), असेल (15), अशी (15), त्याला (15), येईल (15), होते (15), आपण (14), सहज (14), शक्य (14), मुक्त (14), संगणकीय (14), आम्ही (14), केला (14), त्यांनी (14), होत (14), आपल्याला (14), झाली (13), असतं (13), त्याच्या (13), प्रत (13), विचार (12), आहेत (12), त्याने (12), घेऊन (12), केवळ (12), आला (12), गोष्ट (12), विविध (11), आता (11), सुबोधने (11), उत्सव (11), करायला (11), असा (11), किंवा (11), वापर (11), लागलं (11), स्वरूपात (10), करणं (10), कारण (10), निर्माण (10), त्यांना (10), त्याची (10), तेव्हा (10), लेखन (10), असतो (9), नसते (9), नावे (9), लक्षात (9), तिथे (9), होतो (9), चर्चा (9), विशिष्ट (9), अधिकार (9), नंतर (9), तयार (9), बदल (9), संअव्य (9), मुंबई (9), होऊ (9), करण्यात (9), पुस्तक (8), आली (8), वेगवेगळ्या (8), त्यासाठी (8), येत (8), प्रयत्न (8), आपली (8), ह्याची (8), आलं (8), येतात (8), संगणक (8), त्याचं (8), ज्या (8), निर्मिती (8), आवश्यक (8), मर्यादित (8), श्री (8), माहिती (8), प्रती (8), झाले (8), सामग्री (8), प्रतिमुद्राधिकार (7), उपलब्ध (7), फडके (7), यंत्र (7), विषय (7), केली (7), घरी (7), उदा (7), येतो (7), त्यात (7), दोन (7), नव्हे (7), सुधारणा (7), सर्व (7), कुणी (7), सुबोधच्या (7), व्यवस्था (7), करते (7), भाषा (7), सोय (7), करू (7), twitter (7), ईमेल (7), pinterest (7), येथे (7), यास (7), येणार (7), हेब्लॉगकरा (7), facebook (7), रूढ (6), मात्र (6), कोणत्याही (6), प्रतीकरण (6), जून (6), पुरवठा (6), माझे (6), नव्हतं (6), असतील (6), त्याचा (6), तंत्र (6), लोक (6), डिसेंबर (6), झाला (6), कमी (6), कधी (6), त्यांची (6), आलोक (6), आले (6), माझ्या (6), शब्द (6), उच्च (6), योजना (6), खूप (6), येते (6), प्रश्न (6), केले (6), २०२० (6), https (6), मर्यादा (6), तुम्हाला (6), असो (6), त्यांचं (5), दिलं (5), बंधन (5), असताना (5), नियतकालिक (5), कार्यक्रम (5), ठिकाणी (5), काहीही (5), पाहिजे (5), २०१५ (5), लागले (5), 2009 (5), करताना (5), नये (5), तिला (5), वापरकर्त्यांना (5), कौतुक (5), सरांनी (5), वैशिष्ट्य (5), परंपरा (5), करणे (5), हवा (5), कविता (5), मराठीत (5), येतं (5), असंही (5), काळात (5), तुम्ही (5), मागणी (5), राहिला (5), येऊ (5), टिप्पण् (5), फार (5), नव्हती (5), तिचं (5), कोश (5), करायचा (5), नियंत्रण (5), निरर्थक (5), सकाळी (5), श्रेय (5), नव्हता (5), साठे (5), ह्यांच्या (5), ऑक्टोबर (5), अरुण (5), बदलल्याने (5), संस्कृती (5), सगळं (5), अर्थ (5), लागतात (5), लागली (5), कार्यकारी (5), ह्यासाठी (5), सोपं (5), वितरित (5), हवी (4), कळलं (4), एखाद्या (4), ह्यांना (4), हवं (4), रात्री (4), ह्यांनी (4), त्यांचे (4), लागतं (4), वापरून (4), करण्याचा (4), अगदी (4), मित्र (4), दोन्ही (4), यंत्रणा (4), उपयोग (4), करणारी (4), विकता (4), वाद (4), भाग (4), राहतात (4), समजून (4), आज्ञालेख (4), कोणता (4), मराठीच्या (4), संगणन (4), मनात (4), खरी (4), वापरकर्ते (4), सहभागी (4), एकदा (4), कालवश (4), ह्याचा (4), वाचायला (4), इतकी (4), मूल्य (4), शकतात (4), कोणतीही (4), आधारित (4), असला (4), करणारे (4), त्यांचा (4), साहाय्य (4), कशाला (4), ग्रंथ (4), २०२१ (4), माझा (4), मान्य (4), वेळी (4), मोठ्या (4), साधन (4), तसं (4), काळ (4), जाऊन (4), विषयवार (4), मांडणी (4), हेतू (4), भारतीय (4), प्राधिकृत (4), स्पष्ट (4), गेल्यावर (4), मान्यता (4), स्वातंत्र्याचा (4), भावनिक (4), गप्पा (4), पूर्ण (4), संवाद (4), शुद्ध (4), प्रमाण (4), गेले (4), गणित (4), प्रकाशित (4), ऑगस्ट (4), जुलै (4), com (4), फरक (4), एकत्र (4), लागलो (4), असू (4), मते (4), संवादच्या (3), सुबोधला (3), सामग्रीचं (3), बराच (3), आधारे (3), हेही (3), ह्यांचं (3), वाचन (3), वापरू (3), मिळाला (3), त्यांत (3), ग्रंथसूचीचे (3), कालखंडातील (3), दुसरा (3), अतिशय (3), साहित्य (3), कसा (3), संज्ञा (3), माझं (3), बदलणे (3), होऊन (3), ध्वनिमुद्रण (3), उद्देश (3), वाचता (3), बदलला (3), येणं (3), झेंडा (3), युक्तिवाद (3), येण्यासाठी (3), ब्रिटिश (3), तोम्या (3), म्हणता (3), भेट (3), अनावश्यक (3), कार्यशाळेच्या (3), केलं (3), साजरे (3), आपले (3), अन्याय (3), उपस्थित (3), शकेल (3), अमुक (3), नेमकं (3), भरून (3), दिलेला (3), आणली (3), असले (3), ग्रंथांची (3), जानेवारी (3), देत (3), सूची (3), नफा (3), आवश्यकता (3), बरंच (3), द्यायला (3), नोंद (3), व्हायचा (3), वापरता (3), प्रतीकरणाचं (3), व्यक्तीला (3), झाल्या (3), घेता (3), सुशान्त (3), होत्या (3), उलगडलेलं (3), व्यक्ती (3), उणीव (3), मोठी (3), होताच (3), लेखनाच्या (3), इतर (3), अजून (3), छायाचित्राचे (3), संअव्यचा (3), असेलही (3), पाहिलं (3), संबंधांमागचं (3), काहीच (3), माणसामाणसांतल्या (3), आल्मेडा (3), असायचा (3), आशिष (3), कुणाला (3), मुख्य (3), सहवास (3), आधी (3), सगळे (3), इतरांना (3), उपक्रम (3), उल्लेख (3), हवे (3), सगळंच (3), देणारी (3), दाखल (3), करावी (3), कष्ट (3), पोहोचलो (3), www (3), अर्थातच (3), मिळाली (3), क्रिया (3), वेगवेगळे (3), खेळ (3), दिसला (3), घेतली (3), वर्णन (3), प्रसंग (3), माहीत (3), अद्याप (3), घ्यायला (3), लागते (3), म्हणतात (3), आज्ञावल्या (3), नियतकालिकाचं (3), तशी (3), मिळतात (3), आयोजित (3), बॉम्बे (3), सक्रिय (3), सातत्याने (3), केलेली (3), देण्याची (3), काढून (3), वर्षांत (3), सुरू (3), नव्या (3), प्रणाली (3), सर्वस्वी (3), ह्यांची (3), क्षमता (3), महत्त्वाची (3), संकलित (3), घेणं (3), न्यायालयात (3), अभ्यासक (3), नोंदवणं (3), नवी (3), लक्ष (3), घेतले (3), होणं (3), राहतो (3), आपला (3), वाटत (3), गोळा (3), पुस्तकाची (3), चालत (3), ह्यात (3), येणाऱ्या (3), सांगू (3), संअव्यमुळे (3), बरेच (3), ह्याच (3), दिवशी (3), आमच्या (3), घटना (3), रुग्णालयात (3), जाणीव (3), वापरकर्त्यांवर (3), उपयोगी (3), तिथेच (3), जितका (3), करतो (3), जरी (3), विदा (3), टाळायला (2), राजभाषेला (2), महत्त्वाचे (2), संकोच (2), शासनाने (2), शेवटच्या (2), अजूनही (2), दूर (2), त्यातल्या (2), लोकनियुक्त (2), मराठीला (2), टिप्पण्या (2), आज्ञावल्यांचा (2), शुक्रवार (2), २०१६ (2), राज्याच्या (2), बाब (2), करण्यासाठी (2), संदर्भसाधन (2), पलीकडे (2), वेगळे (2), अभ्यास (2), पडत (2), त्यावर (2), मतभेद (2), एकाच (2), विरोध (2), गोष्टींचं (2), व्याकरण (2), नव्हतो (2), लिहिले (2), पाठ (2), थोपटून (2), आक्षेप (2), केल्या (2), सोम्याचे (2), नावात (2), योग्य (2), घेणे (2), शेवटी (2), तरीही (2), यायला (2), केलेल्या (2), पाठिंबा (2), ह्यावर (2), स्मरणं (2), जाण्याने (2), महत्त्वाचं (2), भान (2), तिच्या (2), ज्ञानव्यवहारात (2), सुधारल्याने (2), सुचवलं (2), होणार (2), राहिली (2), मुद्दा (2), टपाल (2), मतं (2), प्रत्यक्ष (2), बदलून (2), निमित्ताने (2), एवढाच (2), उघड (2), च्या (2), परिचय (2), रूपात (2), वापराव्या (2), महाजालाच्या (2), इपब (2), म्हटलं (2), शाळांपुढील (2), आव्हाने (2), नावीन्यपूर्ण (2), आम्हा (2), आवडली (2), वाटलं (2), वाचनातून (2), माझ्यासाठी (2), वडिलांची (2), सुबोधचा (2), सोबत (2), महाजालावर (2), खायला (2), सगळ्या (2), मगच (2), विसरू (2), मित्रांशी (2), वागलो (2), बोललो (2), सहकारी (2), संध्याकाळी (2), प्रमोद (2), बापट (2), बदलांसह (2), कामांत (2), पद्धतीने (2), वापरकर्त्यांच्या (2), परस्पर (2), रक्षण (2), प्रतिमुद्राधिकाराचा (2), ज्यांना (2), साक्षर (2), फलक (2), संदेश (2), निर्मात्यांना (2), होईल (2), अनेकदा (2), झालेली (2), महाजालीय (2), सांगताना (2), उलट (2), varnamudra (2), aalok (2), आधुनिक (2), पुढील (2), शुभेच्छा (2), असत (2), वैधानिक (2), स्वरूप (2), नवीन (2), तीन (2), फारसं (2), अडवण्यात (2), आठवत (2), श्रीनिवास (2), सुबोधचं (2), चौफेर (2), सतत (2), विश्लेषण (2), टॅम (2), नेमक्या (2), शब्दांत (2), सुबोधची (2), सुबोधही (2), दिवस (2), भेटण्यासाठी (2), मनांत (2), हळू (2), भेटू (2), मांडली (2), नियतकालिकांतल्या (2), लांब (2), वेधून (2), वेगळं (2), पोतडीतून (2), वाचकगटाच्या (2), पुस्तकातली (2), जागा (2), शाळांत (2), परीक्षा (2), माझ्यासोबत (2), कोणताही (2), जिज्ञासा (2), केंद्राच्या (2), वतीने (2), लेख (2), घालण्यासाठी (2), पुण्याला (2), गेला (2), आनंद (2), विद्यार्थ्यांना (2), सुचवायचा (2), यायचं (2), नीट (2), कल्पना (2), मिरवत (2), आयुष्यात (2), बोलता (2), किती (2), वाटायचं (2), वाटायला (2), जायचं (2), बेत (2), जुन्नरला (2), नेमके (2), मित्रांना (2), अथवा (2), पहिली (2), त्रास (2), देता (2), प्रतिमुद्राधिकाराने (2), जास्त (2), मार्ग (2), त्यांनाच (2), करायच्या (2), सोयीचं (2), एकच (2), समजूत (2), विशेष (2), निरवलंब (2), करावं (2), संबंध (2), टप्प्यावर (2), वाटतं (2), कालौघात (2), अधिकाराचा (2), प्रत्यक्षात (2), शकत (2), क्रयवस्तू (2), येईलच (2), पुस्तकाचं (2), घेतलं (2), तिचा (2), देण्याचा (2), लागतो (2), तिची (2), आज्ञावलीवर (2), विषयावरील (2), अधिक (2), सॉफ्टवेयर (2), संअव्यविरोधी (2), संकेतस्थळ (2), संकेतस्थळावरील (2), टिपण (2), defectivebydesign (2), org (2), मुद्रणतंत्र (2), नावाची (2), पूर्वी (2), आढळतात (2), वितरण (2), येशूच्या (2), ह्यांचा (2), कालांतराने (2), शुभवर्तमान (2), फोफावला (2), मुद्रणतंत्राच्या (2), साहाय्याने (2), शक्यता (2), करायची (2), आकार (2), संसाधनं (2), पुस्तकं (2), सगळी (2), इथे (2), यंत्रलेख (2), आज्ञावलीत (2), यंत्रलेखाच्या (2), राहू (2), पैसे (2), वापरण्यासाठी (2), शकते (2), घेण्याचा (2), करणार (2), झाल्यास (2), बंधनं (2), कशी (2), वापरणाऱ्या (2), व्यवहार (2), इंग्लिशेत (2), तथा (2), वापरण्यात (2), करायचं (2), व्यवस्थापन (2), अडवणूक (2), स्वातंत्र्य (2), उपाय (2), पुस्तके (2), माणसांना (2), जोडलेलं (2), पुरवू (2), संकेतात (2), प्रकाशिका (2), लेखिकेला (2), टप्पा (2), महाग (2), देशांच्या (2), राहिल्या (2), दिसू (2), वाढू (2), परिस्थिती (2), संचित (2), शून्यैकी (2), रूपांतरित (2), रूप (2), आकाराला (2), माणसांच्या (2), कृती (2), माणसं (2), देणाऱ्या (2), खिडकी (2), यंत्रात (2), त्याच्याकडून (2), करवून (2), कोणत्या (2), क्रमाने (2), मालिका (2), करण्याचे (2), म्हणे (2), घेत (2), इतरही (2), १९५० (2), तेच (2), लेखक (2), त्यानंतर (2), नाकारता (2), उत्साह (2), भाऊ (2), १९९० (2), ग्रंथात (2), एप्रिल (2), आलेल्या (2), संख्येने (2), मुख्यपृष्ठ (2), लागला (2), व्यक्त (2), इतके (2), पिशव्या (2), हितसंबंध (2), तितकंच (2), पोस्ट (2), काळातील (2), धार्मिक (2), खरंच (2), ठरू (2), थोडी (2), 2010 (2), दुधाच्या (2), 2011 (2), समाधि (2), संभोग (2), आपापल्या (2), कसलीच (2), प्रत्येक (2), दिवसभर (2), बऱ्यापैकी (2), प्रचार (2), कळली (2), उंचच (2), ठेवत (2), घडून (2), फारशी (2), करतात (2), रोजी (2), बघायला (2), श्रम (2), आशा (2), करावेच (2), लागतील (2), इतकेच (2), चांगल्या (2), ग्रंथातील (2), तास (2), उंच (2), येतील (2), तितका (2), हरकत (2), घेण्यासाठी (2), चांगलं (2), बहु (2), फेब्रुवारी (2), सोमवार (2), २०१४ (2), मजकूरही (2), ह्याचं (2), लावणाऱ्या (2), तेवढंच (2), बोलत (2), संदर्भ (2), मोजक्या (2), अभ्यासकांना (2), नावं (2), लेखात (2), १९५१ (2), पडलेला (2), झालेल्या (2), आपलं (2), कोणतेही (2), प्रतीकरणीय (2), मिळवण्यासाठी (2), केशव (2), ठरत (2), शरद (2), असणाऱ्या (2), रंग (2), महत्त्वाचा (2), गुरुजी (2), विद्यापीठाच्या (2), माहीतच (2), सोयी (2), निधन (2), मजा (2), गाणं (2), सामाजिक (2), सूचिकार (2), कौशल्य (2), ब्लॉग (2), ह्यांचे (2), वर्षे (2), ग्रंथसंग्रहालय (2), शिक्षण (2), साठवलेलं (2), दुपारी (2), परिणाम (2), 2020 (2), आडकाठी (2), बाजाराला (2), सगळा (2), शंकर (2), क्षेत्रातली (2), असल्याने (2), 2014 (2), स्वाभाविक (2), मानवी (2), गांगल (2), आधार (2), 2021 (2), काढली (2), कोशाने (2), नृत्यं (2), कार (2), खंड (2), इंग्लिश (2), क्षणी, उद्रेकाच्या, म्हणण्यात, गैर, नोकरी, वाटू, समज, अशाच, करतोय, यायची, असही, योग्यतेचं, कुणाशी, मोकळं, त्यांच्याविषयीच, घडणार, झोप, नसतीलच, थांबला, काढायला, वर्तन, बदललेलं, झोपायला, आग्रहाने, दिसतच, लावलं, करावा, वाटते, घडायचं, यंत्रांनी, असमाधान, कामाविषयीचं, दाखवलं, आयाआयटीत, दुरुत्तरं, अपेक्षा, सांगायला, कधीच, वैयक्तिक, नवलाई, सुबोधविषयी, पायांतलं, त्राणच, निघाला, तिथून, गेलं, लावून, पुढची, कळवलं, पुढचा, असतानाची, संपली, लाजही, आग्रह, आणलं, कसे, खायची, घडेल, हसूही, इच्छा, मूर्खपणाचं, सहकाऱ्यांना, लागायचा, परस्परक्रियेतून, वॉटरमार्क, मालवल्याचं, लावले, खात, सहन, त्राग्याचा, असमाधानाचा, उमगलेलं, असतानाच, प्राणज्योत, घडतंच, नोकरीत, बसलो, गणेश, चिडचिड, प्रारंभी, सदस्यत्व, गोष्टींशी, त्यांपैकी, घ्या, भेटल्यानंतर, राहायचं, सुचतच, आणखीही, योजनांची, सुबोधकडे, आश्वासन, सहकार्य, शाळेने, याची, गेलो, मीही, पत्र, पत्राचा, दाखवायच्या, वाचून, मुलांना, बाकी, लाभलं, atom, जरा, कामं, थेट, कर्ता, संधी, पुन्हा, उपक्रमात, आप्तवाक्य, राबवलेल्या, वाचकगटाने, लिहायच, स्वाक्षरी, अनुमतिपत्रावर, संकेतस्थळावर, अर्जुनवाडकरांचे, आपणहून, दायित्व, सोडण्यापर्यंतचं, येण्यापासून, सुधारक, ठरला, मारायचा, कोलटकरांविषयी, ह्यांच्याशी, शहाणे, अशोक, दिवशीही, दिवसापासून, आदल्या, पूर्वतयारीला, कार्यशाळा, युनिकोडाची, छायाचित्, मिळवणं, बोलायची, आलो, दोघांचं, लाभला, पैलू, जगण्याला, माणसाच्या, तसाच, प्रेरणांनी, जसा, त्यातून, लिहिता, पुष्कळच, लिहिण्यासारखं, शकणार, संध्याकाळ, आल्या, लक्षातही, समजावलं, दोघांनी, बापटांना, गोष्टींमध्ये, जणांना, जगणंच, आरोपी, जावंसंच, कामावर, चुकीचं, मनस्थिती, वाईट, अनुभवता, प्राधान्याने, लोकांशी, चार, जमलेल्या, लावण्याची, भेटून, व्यवस्थापकांना, गणेशोत्सवांच्या, बनवून, त्यासाठीचे, जागृती, शाळांविषयी, गणेशोत्सवांत, आखले, वर्षांपूर्वी, जुनी, जिज्ञासू, दबावगट, मार्गदर्शन, चालवायला, बचतगट, कळल्या, वृत्तीने, असाच, सगळ्यांना, जाणवली, प्रतिमा, मित्राची, कार्यकर्त्या, रसिक, शब्दही, घेतला, ह्याआधीही, मूळ, भाजायचा, स्टॉलमन, रिचर्ड, करणारच, सामग्रीला, सबंध, छापत, सूचना, पुस्तकांवर, राजवाडे, इतिहासाचार्य, परिसराला, तिच्यावर, मुक्तपणे, ज्ञान, वाटचालीसाठी, पुरवल्या, स्वागत, राहणं, अनुसरणारं, संकेतांना, विद्याव्यवहारातील, साधार, जातात, ज्ञानशाखांवर, कृष्णाचा, वितळतही, सामग्रीच, राहावी, सीमारेषा, वापरायला, नवा, चर्चापीठासारखा, उदयानंतर, नियतकालिकांची, पहिले, वाहिलेले, शास्त्रचर्चेस, परवान्या, नित्यमुक्त, करण्याची, परवान्यांतर्गत, श्रेयनिर्दश, धारकांची, जिथे, स्वतःसाठी, परवाना, सामग्रीत, इतक्या, नियतकालिकात, अंतर्गत, आलेलं, अवतरतं, जमा, होतात, पोळी, जोडीला, सर्वांच्या, राखलेले, हक्क, अनुसरण, धूसर, ज्ञानशाखांतल्या, चर्चापीठांनी, मोबदला, राबवण्याची, रंगमंचावर, व्यासपीठ, विकतो, संअव्यमुक्त, प्रकाशकही, धरते, जोम, नसली, रंगमंच, पद्धती, वितरितही, शब्दांपेक्षा, मिळणं, उचित, निर्मात्यांकडे, कलाकृतीचा, वापरताही, ष्टेज, सोयीचा, निर्वाहाचा, मिळणार, मोल, कलाकृतीचं, अवतरतात, आवश्यकताच, संदेशाची, वाचू, लिहिलेला, भक्तिगीतं, सामान्यतः, नसतेच, दही, अस्मादिकांचं, पाहण्यासारखं, वैविध्यंही, लेखांचं, कालिकात, नियककालिकाचं, pahile, pushpa, दूध, हवंच, पुष्प, पहिलं, छानछान, प्रकटीकरण, अंकात, प्रकाशकांकडे, पहिल्या, नियतकालिकाच्या, अस्मादिकांचे, संपादक, नियतकालिकाचे, नटनट्या, drm, supportfaq, about, smashwords, read, theoldleanpubmanual, leanpub, वितरकांकडे, प्रकार, साहित्यव्यवहारात, निर्णय, स्मरणच, उत्सवे, बान्धवः, एकसारखे, यस्तिष्ठति, श्मशाने, राजद्वारे, परतफेड, निभावलं, नसतात, मित्रलक्षण, उमजून, करायचंय, देण्याऐवजी, चैव, ह्यापुढे, वाढदिवस, जातंच, स्वीकारायला, अचानक, कुणाचं, विचारच, ज्याविषयी, जाणीवही, त्यांचेही, अनुभवांतून, असणार, क्रियाप्रतिक्रियांतून, व्यसने, दुर्भिक्षे, जाणवण्याच्या, कृत्रिम, थांबायचा, प्रामाणिकपणे, त्यानुसार, थांबण्यासाठी, सांगितलं, झालंय, दूरध्वनी, वागायचं, नेताना, रुग्णालयातच, तेव्हापासून, ठरवलं, ठेवलं, श्वासोच्छ्वासावर, वर्तनात, राष्ट्रविप्लवे, केईएम, कोमात, झाल्याने, साखर, ठरेल, तेव्हाचा, वडील, सहजकर्म, काढला, ध्वनिमुद्रणं, गोष्टींत, त्यांविषयी, इच्छिणारे, प्रसंगांत, वयाच्या, अपरिहार्य, मोलाची, वाहिलेलं, गोष्टीही, घडू, रविवार, मनोगत, मिसळपाव, अक्षरे, ऐसी, अक्षरनामा, हाकारा, पाहत, सुकर, अभिव्यक्ती, आशयाची, लेखनाला, पुरुष, सर्जनशील, सारखं, वाढतो, वावर, मराठीचा, बाळगायला, ह्यांमुळे, लेखस्थळे, आशयी, सारखी, आवृत्त्या, दैनिकांच्या, घातलेली, चित्रफिती, लैंगिक, आयुष्यातली, भाषणांचे, प्रियजनवियोग, योग, वापरण्याचा, सुबोधविषयीच, त्यांमुळे, दोघांनाही, काहींच्या, इहवादी, स्मृतिशेष, संज्ञांऐवजी, धर्मसंबद्ध, व्यक्तींचा, दुवे, महाजालावरचे, लेखनाचे, सुखाचे, होतील, अनुदिनी, सृजनक्षण, शिक्षणप्रयोग, शंभर, मेंदू, चंदूचा, आपलंसं, अनपेक्षित, २०१८, पाठीवर, महानगराच्या, विक्राळ, व्यसन, कार्यक्रमांची, भाषेवर, त्यांतील, घालता, डोक्यात, free, काहीतरी, आठवतंय, javascripts, provided, निष्कारणही, the, मुख्यत्वे, भेटीगाठी, javascript, मनसोक्त, कडोविकडीचे, वावरायचा, अभ्यासविषय, आव्हानात्मक, source, छान, आयुष्यातले, खरोखरंच, दिनांक, मिसळून, मित्रपरिवारात, तिथल्या, आल्यामुळे, गैरवर्तनाची, तक्रार, केंद्रात, घेऊनच, सहकाऱ्यांपुढे, विभागांतर्गत, लिटररी, ठरलेल्या, बारगळल्या, बऱ्याचशा, सांगत, आखत, नंतरही, सांगायची, योजनेचं, अडकलेले, निर्वाहाच्या, ज्यांच्यापुढे, काढावी, धर्तीवर, मॅगझिनच्या, टाइम्स, पृष्ठदृश्ये, पत्रिका, त्रैमासिक, साहित्याचा, निवडक, एकूण, महिन्यांनी, राहतं, दुर्लक्षित, असलं, वैशिष्ट्यपूर्ण, नियतकालिकांतलं, मानाने, पुस्तकांच्या, तंत्रज्ञान, संगणकअभियांत्रिकी, लोकांच्या, यांतुन, शिडी, म्हणाला, मित्राचं, तर्कप्रेमी, marathi, असलेल्या, गणिताचा, मर्ढेकरांची, शीर्षक, पत्राला, होण्याचीच, वाहते, वीज, होइल, शिडीवरून, पाठवल्या, टपालाने, सर्वांना, ओळी, कवितेतल्या, मर्ढेकरांच्या, स्वर, अक्षरांनी, टीएएम, आद्याक्षरी, मूड, आस्पेक्ट, टेन्स, अनुक्रमे, खाली, वरखाली, संगणकविज्ञान, मार्मिक, मुंबईतल्या, आयाआयटी, नंतरच्या, मित्रांत, काढावा, संग्रहच, नावाचा, उवाच, अफाट, unicode, मांडण्याची, एखादी, स्पष्टपणे, भरायच्या, चर्चांत, ह्याचाच, चालणाऱ्या, सांगितली, shubhanan, gangal, शोधण्यात, आकृतिबंध, तर्काचे, तर्काचा, अधोरेखित, अंतरही, दृष्टिकोणातलं, पाहण्याच्या, तर्कबुद्धीकडे, टवाळकीचं, चर्चेनंतर, असायचाच, व्याप्ती, चर्चेनंतरच्या, महिना, असणाऱ्यांत, गप्पांत, दैनंदिनीत, राहिल्याची, मारत, उशिरापर्यंत, कार्यक्रमानंतर, नेमकी, कार्यक्रमात, सुमारास, २००२च्या, चर्चेतही, उपक्रमांना, निदान, सहजच, जमायचे, चर्चेसाठी, तालीमकक्षात, नेहरू, वरळीच्या, जवळची, घरापासून, तेव्हाच्या, भेटीची, अनौपचारिक, बरंचसं, गटाचं, कुणालाच, बातमी, राहिलंय, रोचक, दिसतील, शोधा, नसले, सहवासात, जवळीक, लाभूनही, काहींचा, भेटत, वेगवेगळी, बोध, जाणिवेचा, तपासू, येतच, हरवल्याची, क्वचितच, सुबोधशी, मैत्रीत, लक्षणं, मैत्री, जीवलग, ज्याला, रूढार्थाने, एकमेकांशी, क्वचित, फारच, व्यक्तिगत, परस्परांच्या, जुळलं, नातं, मैत्रीचं, सहभागाला, चर्चेचा, पुढेपुढे, राहून, सहजपणे, जमवाजमव, संवादची, घेणारे, ब्लॉगविश्व, होणारे, चर्चेत, असलो, टेकतं, थोडं, पायऱ्यांवर, दुकानांच्या, बंद, तासन्, उभं, केंद्र, कडेला, मार्गाच्या, उरायचं, भानच, वेळेचं, रंगायच्या, उपनगरांतले, राहणारे, जवळ, पेज, व्यरंसीत, रात्रीरेव, संवादासाठीच, संवादनंतरच्या, संवादचं, येण्याजोगं, साहित्यावर, दाखवायचा, शुक्रवारी, तिसऱ्या, महिन्याच्या, द्वारे, उमदेपणाही, दाद, अट्टाहासही, ऐकवण्याचा, आपलंच, नसायचा, दाखवण्याचा, व्हायचं, बरं, मंत्रमुग्ध, घेणाऱ्यांत, दाखवून, अद्भुत, प्रायोजित, जादुगाराने, यायचे, बोलण्यात, दिवाळीअंकांचे, लेखांचे, पुस्तकांपुरतं, असायचं, सांगण्यासारखं, blogger, त्यातलं, त्याच्याकडे, अनुषंगाने, सेमी, अंश, शेतकऱ्याच्या, पाहून, लेण्याद्री, शिवनेरी, दुसऱ्या, राहिलो, धर्मशाळेत, धरून, मिळू, एसटीची, जाणारी, सप्टेंबर, केल्यावर, विचारणा, घाटमाथ्यावरच्या, वृत्तीत, लगेच, जाता, देशावर, घाटमाथ्यावरून, पोहोचल्यावर, नाणेघाटात, परतायचं, निघून, निघालो, ठरवून, नोव्हेंबर, नाणेघाटाला, जाणवलं, उशिरा, मुंबईला, भटक्या, पार, शाळेतही, ओळखीने, वांद्र्याला, प्रयोग, मैदानांत, उपाहारगृहांत, युक्त्या, भेटण्याच्या, मिळेनाशी, प्रोफाइल, भेटण्यासाठीची, आमची, योगदान, पाडण्यात, गोव्यात, त्याच्याविषयी, केलेला, जन्मशताब्दीनिमित्ताने, बोरकरांच्या, पहा, सहभागच, उपक्रमांत, वाचकगटा, आपल्यासोबत, माझ्याबद्दल, सांगता, प्रकट, कुठेही, कठीण, भाकितं, आदर, आलीच, उणावतच, दिसायचं, धारणा, ठाम, प्रभुत्व, निरक्षर, किमान, विद्यार्थ्याचं, शिकता, विज्ञान, पुरत, कळण्यासाठी, म्हणायचा, उतरणं, उतरण्याचे, संग्रहण, बोलण्यातून, अनेकजण, सजग, प्रयोजनं, व्यावहारिक, शिकणाऱ्यांची, शिक्षणव्यवस्थेत, ज्ञानाचा, शिक्षणातला, यूट्यूबेवर, तोच, पाठपुरावाही, त्यासाठीचा, सुबोधनेच, उद्योगही, घालण्याचा, सल्ले, विद्यार्थ्यांची, अर्थाने, त्यांतून, खऱ्या, शोकसभेपर्यंत, लोकप्रिय, 2012, कामामुळे, शिक्षणक्षेत्रातल्या, त्यामुळेच, कळायचं, तोंडून, 2013, नसे, जमलं, संचितही, गाठीशी, मोलही, सुधारण्यासाठी, अनुभवांचं, पाहिल्या, 2015, आणखी, बसणं, 2016, सुचायची, त्यालाच, आणण्याची, संस्था, पालक, विद्यार्थ्यांचे, पाहिजेत, वापरले, संवादभेटी, चालल्या, क्रियापदांचं, इलेक्ट्रॉनिक्स, शुभानन, वाचलं, कादंबऱ्यांपर्यंत, अमेरिकी, पुस्तकापासून, तत्त्वज्ञान, दीक्षितांच्या, हरि, अडवलेली, पदवीने, उतरला, पदविका, विषयातली, औपचारिक, राजीव, गतीही, शुद्धलेखन, विषयांत, ऐकावं, त्याच्याकडूनच, रसग्रहण, उत्कर्षबिंदूचं, साधलेल्या, ओळीने, लायकीचे, गाडण्याच्याच, शहर, बरे, कवितेत, वाचतही, साने, पवारांच्या, नसो, संज्ञांचा, व्याकरणातल्या, बोलण्यातही, एऱ्हवीच्या, व्हायचे, व्हायच्या, विश्लेषणावर, व्याकरणिक, करण्याचं, संवादाच्या, ह्यांच्यातल्या, आमचं, दिसायच्या, वाचलंच, तुमचा, आवडायची, वोलायचा, प्रभावी, इतकं, पुस्तकांविषयी, आवडलेल्या, मॅथेमॅटिक्स, एलिमेंटरी, व्हिजन, सॉयर, डब्ल्यू, प्रयोगांकडे, शिक्षणक्षेत्रांतल्या, उत्खनन, दया, फेसबुकावर, आवडल्यावर, सूक्ष्म, भाषेची, अनुमती, शुद्धलेखनाविषयीचे, आजोबा, प्रेमळ, नव्हते, राहिल, तर्ककर्कश, पोहोचला, अर्जुनवाडकर, युनिकोड, कृष्ण, देशी, साहित्यातले, प्रवाद, लेबल, तज्ज्ञांना, विषयांतल्या, वृत्ती, मिळवायची, विषयाची, मार्गाने, मिळेल, कुतूहल, विषयात, गटही, सुचवला, जाण, बारकावे, कानांत, मिश्कीलपणा, आताही, संग्रहातली, विदूषक, सकाळ, वाचलेली, त्यावेळी, ठरवला, वाचण्याचा, वगळून, प्रेमकविता, पाडगांकरांच्या, मंगेश, आयआयटीत, ठळक, कवितेतला, व्यंजन, वाचताना, पाऊस, वैद्य, टिपायचा, अचूक, सौंदर्यस्थळं, कवितेतली, झालाय, उशीर, जाणवायला, कवितावाचनाचं, अर्थवाही, कवितावाचन, कळायचे, त्यांच्यासाठी, प्रसिद्ध, हास्यास्पद, नोंदवलं, झडली, चर्चाही, स्वीकारले, प्रदीर्घ, त्यांच्याशी, गटावर, सातत्य, नव्हतीही, पटत, चिकाटी, त्याप्रमाणे, बदलत, परिश्रम, गुणांच्या, गोष्टींचा, नेटकेपणा, लिहिण्यात, शिकल्याने, कार्यशाळेत, ओळखही, ग्रंथसूचीच्या, ६व्या, खंडाला, ग्रंथकार, अल्पपरिचय, जोडला, प्रथम, चर्चेने, अनुभव, कोशाच्या, मनाचं, वार्ताही, प्रसारमाध्यमांना, असणं, पोचली, दोहोंचं, कुणास, औचित्य, ठाऊक, अटळ, वादपरंपरा, तऱ्हेचे, सूचिकार्य, मोठेपण, कृतज्ञतापूर्वक, लेखननियमांसंदर्भात, असतानाही, जुळणारी, मतांशी, माझी, वादचर्चेनंतरची, गटावरच्या, सरांचा, ध्यास, बॅंकेतील, आमंत्रित, बैठकीत, नोकरीतून, परिषदेने, स्वेच्छानिवृत्ती, साधनांतून, लेखकांची, कृतीला, ज्ञानेश्वरीची, उणावत, मानली, स्वाभाविकच, ह्याव्यतिरिक्त, रूपांविषयी, कोशातल्या, परिस्थितीत, अमृतानुभवाचा, फुटत, फाटे, बांधता, पदसंदर्भकोश, निकषाने, जुळतं, दुसरी, ओवीसूची, आपापसात, अर्थभेदकता, व्युत्पत्ती, ज्ञानदेवी, लेखनपरंपरा, सांभाळावी, अवधानं, आधारलेली, लोकव्यवहारावर, मध्ये, कामी, प्रसंगी, समाविष्ट, पत्रव्यवहार, प्रमाणात, लेखनसरणीतले, सुसंगत, प्रयत्नांनी, नियमावलीच्या, राहवत, केल्यावाचून, वृत्तीचं, जन्म, मृत्यु, सहमत, भूमिकांशी, ह्याबाबतच्या, हयात, लेखननियम, नवे, प्रकृतीशी, लेखननियमांचा, भाषेत
Text of the page (random words):
त किंवा विशिष्ट आज्ञावलीच्या साहाय्यानेच वाचायला हवं ही सोय आहे पण हे यंत्र किंवा ही आज्ञावली नेमकं काय काय करू शकते हे तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नाही तुमची कोणकोणती माहिती ती गोळा करते हे आम्ही सांगू पण तेवढीच माहिती गोळा करते ह्याची खात्री काय असं तुम्ही आम्हाला विचारता कामा नये विचारून काही उपयोगही नाही कारण ते यंत्र किंवा आज्ञावली वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला देतो तेव्हाच तुम्ही हे मान्य केलेलं असतं की आम्ही केवळ आज्ञावली वापरू पण ती कशी काम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही तसा प्रयत्न आमच्याकडून झाल्यास आम्ही दरोडेखोर ठरू आणि दंडास पात्र होऊ इतकी सगळी बंधनं कशासाठी आहेत प्रतीकरण रोखण्यासाठी संगणकीय सामग्रीचं जे वैशिष्ट्य आहे तेच अडवण्यासाठी केवळ तितकंच नाही विदा ही गोष्ट विक्रीयोग्य आहे हे जाणवलेलं आहे संगणक वापरणाऱ्या व्यक्ती आपले व्यवहार संगणकाच्याच आधाराने करत असतील तर त्यांच्या व्यवहारांविषयीची विदा अनिर्बंधपणे मिळवता येण्यासाठी संगणकीय व्यवहारावर नियंत्रण मिळवावं लागेल म्हणजे वापरकर्ते संगणक वापरतील पण त्यावर त्यांचं नियंत्रण कमीत कमी असेल अशा यंत्रणा निर्माण करण्यात येतात असं करण्यासाठी संगणकीय व्यवहारांत जी यंत्रणा राबवतात तिला इंग्लिशेत डिजिटल राइट मॅनेजमेंट तथा डीआरएम अशी संज्ञा वापरण्यात येते तिचं मराठीकरण करायचं तर संगणकीय अधिकार व्यवस्थापन तथा संअव्य असं करता येईल वस्तुतः पाहिलं तर हे संअव्य म्हणजे संगणकीय अडवणूक व्यवस्थापन असतं वापरकर्त्यांना संगणकीय सामग्री सहज वापरता येणार नाही अशा अडचणी पेरून ठेवणं वापरकर्त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करण्याचे उपाय योजणं हे ह्या व्यवस्थांचं काम असतं असं करण्यामागे विविध कारणं असतात मुख्य कारण हे नफा कमावणं हे असतं त्यासाठी यंत्र हार्डवेयर किंवा आज्ञावली सॉफ्टवेयर ह्यांचा वापर करण्यात येतो तेव्हा संअव्य ही व्यवस्था वापरकर्त्यांवर अनावश्यक बंधनं घालणारी त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करणारी व्यवस्था आहे तिच्या नावात जरी अधिकाराचा उल्लेख असला तरी तिचा हेतू अडवणूक करणं हाच आहे कारण ह्या व्यवस्थांच्या वापराविनाही ते संगणकीय व्यवहार शक्य आहेत उदा संगणकीय पुस्तक वाचता येण्यासाठी एखाद्या संअव्य वापरणाऱ्या विशिष्ट आज्ञावलीची आणि तिला लागणाऱ्या विशिष्ट स्वरूपातील पुस्तकाची आवश्यकता नाही इपब सारख्या मुक्त स्वरूपात इ पुस्तके तयार करता येतात आणि ती वाचण्यासाठी वेगवेगळ्या मुक्त आज्ञावल्यांपैकी कोणतीही आज्ञावली वापरली तरी चालते उदा संअव्य वापरून जी पुस्तकं वाचायला मिळतात ती आपल्याला आपल्या मित्रांना देता येत नाहीत कारण प्रतीकरण शक्य नाही मुद्रित पुस्तकांपेक्षा संगणकीय पुस्तकाचं प्रतीकरण सहज शक्य आहे पण ते इथे ते अडवण्यात येते संअव्य वापरून ज्या गोष्टी वापराव्या लागतात त्यांत प्रतीकरणच अडवण्यात येते असे नाही वापरकर्त्यांची विविध प्रकारची माहिती ती आज्ञावली वा ते यंत्र संकलित करत असू शकते पण ते नेमके काय करते आहे हे वापरकर्त्यांना कळण्याची सोय नसते कारण ते यंत्र नेमके काय करते वा ती आज्ञावली काय करते हे पाहण्याची सोय वापरकर्त्यांना उपलब्ध नसते त्यामुळे वापरकर्ते अगतिक असतात संअव्ययुक्त गोष्टी मुक्त नसल्याने त्या वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या यंत्रांत वा आज्ञावलीत परस्पर बदल घडवून आणू शकतात उदा एका प्रसिद्ध उद्योगसमूहाने आपल्या वापरकर्त्यांच्या वाचनयंत्रांतून ऑरवेलच्या १९८४ ह्या कादंबरीच्या प्रती परस्पर उडवून टाकल्या संअव्यच्या समर्थनार्थ वेगवेगळे युक्तिवाद करण्यात येतात त्यातला एक म्हणजे संअव्यमुळे प्रतिमुद्राधिकाराचे रक्षण होते हा आहे प्रतिमुद्राधिकाराचा उद्देश प्रतीकरण मर्यादित करणे असा आहे म्हणजे प्रतीकरण प्रतिमुद्राधिकारधारकाच्या अनुमतीनेच व्हावे असा आहे प्रतिमुद्राधिकाराचा भंग झाल्यास शिक्षेची तरतूद असते प्रतिमुद्राधिकार त्यावेगळ्या वापरावर नियंत्रण ठेवत नाही संअव्यमुळे वापरकर्त्यांवर अतिरिक्त बंधने येतात ती अनावश्यक असतात संअव्यमुळे प्रतिमुद्राधिकार अबाधित राहतो असं नाही ज्या कुणाला अनधिकृतरीत्या प्रत करून घ्यायची आहे ते ह्या व्यवस्थांचा वापरच करणार नाहीत आणि ज्यांना अनधिकृत वापर करायचा नाही त्यांना ह्या व्यवस्था वापरल्यामुळे अनावश्यक बंधनांना सामोरे जावं लागतं आपल्या स्वातंत्र्याचा संकोच करून घ्यावा लागतो संअव्य वापरून प्रतिमुद्राधिकाराचं रक्षण होतं असं म्हणणं हे साक्षर व्हा असे फलक लिहिण्याइतकंच हास्यास्पद आहे ज्यांना ते वाचता येणार नाहीत म्हणजे जे निरक्षर आहेत त्यांच्यासाठी तो संदेश लिहिलेला आहे आणि जे संदेश वाचू शकतात म्हणजे जे साक्षर आहेत त्यांना त्या संदेशाची आवश्यकताच नसते संअव्यचा वापर केला नाही तर निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचं मोल मिळणार नाही त्यामुळे त्यांच्या निर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असा युक्तिवाद अनेकदा करण्यात येतो पण संअव्य न वापरताही निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचा उचित मोबदला मिळणं शक्य आहे अनेक लेखक आपली पुस्तके अशा पद्धतीने वितरितही करत असतात ही पद्धती अद्याप फारशी रूढ झालेली नसली तरी जोम धरते आहे अनेक प्रकाशकही आपण संअव्यमुक्त पुस्तकं विकतो असे सांगताना आढळतात उदा https www smashwords com about supportfaq drm आणि https leanpub com theoldleanpubmanual read उलट संअव्यचा वापर राबवण्याची यंत्रणा ही सामान्यतः प्रत्यक्ष निर्मात्यांकडे नसतेच ती प्रकाशकांकडे वा वितरकांकडे असते संअव्यचा वापर टाळायला हवा कारण ही व्यवस्था मुक्त आज्ञावल्यांचा वापर करत नाही हे तर्कतःच स्पष्ट आहे ती वापरकर्त्यांवर बंधन घालते त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करते त्यामुळे शक्य तितकी ही गोष्ट टाळायला हवी संअव्य टाळण्यासाठी काय काय करता येईल ज्यांत विशिष्ट आज्ञावली वा विशिष्ट यंत्राचाच वापर आवश्यक आहे अशा गोष्टी शक्य तितक्या टाळाव्या त्यांऐवजी मुक्त स्वरूपात असणाऱ्या गोष्टी वापराव्या उदा संगणकीय पुस्तकांसाठी इपब अथवा पीडीएफ अशा विशिष्टच एका आज्ञावलीवर आधारित नसलेल्या स्वरूपांची निवड करावी ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी फ्री सॉफ्टवेयर फाउंडेशनचे संअव्यविरोधी चळवळीचे संकेतस्थळ https www defectivebydesign org पाहता येईल ह्या संकेतस्थळावरील https www defectivebydesign org guide हा विभाग बराच उपयुक्त आहे प्रस्तुत लेखात ह्या संकेतस्थळावरील माहितीचा साभार उपयोग केला आहे दि ०४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय संअव्यविरोधी दिन साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने हे लहानसे टिपण लिहिले आहे प्रतिमुद्राधिकार शर्विलकी पायरसी ह्यांबाबत एका लेखकाचं मत येथे डिसेंबर ०४ २०२० ४ टिप्पण्या यास ईमेल करा हेब्लॉगकरा twitter वर शेअर करा facebook वर शेअर करा pinterest वर शेअर करा गुरुवार १४ मे २०२० मराठी लेखन कोश कार श्री अरुण फडके ह्यांचं निधन अरुण फडके गुरुजी गेले त्यांच्या मराठी लेखन कोशाने मराठी प्रमाण शुद्ध लेखनाच्या क्षेत्रातली एक मोठी उणीव भरून काढली अमुक शब्द कसा लिहायचा ह्यावर अडलेल्या व्यक्तीला सहज वापरता येईल असं संदर्भसाधन उपलब्ध झालं प्रमाण शुद्ध लेखनाच्या नियमावल्यांना मर्यादा असतातच पण तरी त्यांचा उपयोग होतो पण तो उपयोग करून घ्यायलाही काही तयारी करावी लागते ती सर्वसामान्यांच्या सहज आवाक्यातली नसते लेखनकोशासारखं संदर्भसाधन अशा प्रसंगी कामी येतं पण असं साधन तयार करणं हे सोपं नाही प्रमाण शुद्ध लेखन ही लोकव्यवहारावर आधारलेली गोष्ट आहे तिला अनेक अवधानं सांभाळावी लागतात लेखनपरंपरा व्याकरण व्युत्पत्ती अर्थभेदकता इ ह्या गोष्टींचं आपापसात सगळंच जुळतं असंही नाही त्यामुळे एकाच निकषाने सगळं बांधता येत नाही फाटे फुटत राहतात अशा परिस्थितीत फडके ह्यांच्या लेखन कोशातल्या काही रूपांविषयी मतभेद होणं ही गोष्ट स्वाभाविकच मानली पाहिजे पण त्यामुळे त्यांचं श्रेय उणावत नाही फडके ह्यांची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मराठीच्या लेखननियमांचा अभ्यास करून रूढ नियमावलीवर आधारित असा लेखनकोशच केला नाही तर त्या रूढ नियमावलीतल्या उणिवांचा धांडोळा घेऊन त्या उणिवांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नही करून पाहिला त्यांच्या भाषेत मराठीच्या प्रकृतीशी सुसंगत असे नवे लेखननियम तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला ह्याबाबतच्या त्यांच्या अनेक भूमिकांशी मी सहमत नव्हतो आणि नाही पण तरीही अभ्यासक म्हणून त्यांच्या ह्या वृत्तीचं कौतुक केल्यावाचून राहवत नाही त्यांच्या नव्या नियमावलीच्या प्रयत्नांनी मराठीच्या लेखनसरणीतले अनेक प्रश्न लक्षात यायला साहाय्य झालं हे मात्र नोंदवणं आवश्यक आहे मराठी लेखन कोशाच्या रूपात त्यांचा प्रथम परिचय झाला एम ए च्या वर्षांत कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि ओळखही झाली त्यांच्या कार्यशाळेत शिकल्याने माझ्या लिहिण्यात बराच नेटकेपणा आला हेही नोंदवलं पाहिजे वाचन विचार ह्यांनी आपण बदलत राहतो त्याप्रमाणे त्यांची अनेक मतं पटत नव्हतीही एका इ टपाल गटावर त्यांच्याशी प्रदीर्घ वाद चर्चाही झडली त्या चर्चेने खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता आला एक अनुभव नोंदवणं अतिशय आवश्यक आहे मराठीच्या नव्या लेखननियमांसंदर्भात मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या एका बैठकीत मला आमंत्रित करण्यात आलं आणि त्यासाठी अरुण फडके ह्यांनी माझं नाव सुचवलं होतं असं मला कळलं ही घटना इ टपाल गटावरच्या वादचर्चेनंतरची आहे माझी अनेक मतं त्यांच्या मतांशी जुळणारी नाहीत हे स्पष्ट असतानाही त्यांनी माझं नाव सुचवलं होतं ही गोष्ट कृतज्ञतापूर्वक नोंदवणं आवश्यक आहे असं करायला मनाचं मोठेपण लागतं ज्ञानव्यवहारात वादपरंपरा अटळ असते पण तिचं औचित्य आणि तिच्या मर्यादा ह्या दोहोंचं भान असणं महत्त्वाचं असतं आज त्यांच्या जाण्याने ही स्मरणं मनात येत राहतात त्यांच्या स्मृतीलाच नव्हे तर कृतीला निष्ठेला आणि कष्टांनाही विनम्र अभिवादन येथे मे १४ २०२० 1 टिप्पणी यास ईमेल करा हेब्लॉगकरा twitter वर शेअर करा facebook वर शेअर करा pinterest वर शेअर करा बुधवार ६ जुलै २०१६ नावात बरेच काही आहे आणि त्यावेगळेही बरेच काही आहे ०१ ज्या ज्या ठिकाणी अजूनही बॉम्बे असे नाव रूढ आहे आहे तिथे मुंबई असे नाव वापरणे योग्य आहे हे माझे स्पष्ट मत आहे अशा सुधारणांना विरोध का व्हावा हे मला कळत नाही माझा एक मित्र काही कारणांनी माझे नाव चुकीचे उच्चारतो म्हणून मी माझे नाव सुधारून सांगू नये ह्यात कोणता शहाणपणा आहे हे मला कळलेले नाही ०२ बॉम्बेचे मुंबई झाले केले ही मांडणीच चुकीची आहे ब्रिटिश येण्यापूर्वीपासून मुंबई हे नाव आहे ब्रिटिशांनी त्यांच्या उच्चाराप्रमाणे ते लिहिले ते गेल्यावर मुंबई हा उच्चार आणि लेखन माहीत असणारे लोक सत्तेवर आले ते येऊनही काही वर्षे बॉम्बे हे नाव काही ठिकाणी चालत होते यथावकाश सगळीकडे मुंबई अशी सुधारणा झाली हेच मद्रास कलकत्ता इ बाबत झाले काही पक्षांनी ह्याबाबत आपली पाठ थोपटून घेतली काही विरोधकांनी आक्षेप घेतले शिवीगाळही केली पण ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी चुकीच्या कारणासाठी केल्या आहेत सोम्याचे नाव एखादा तोतरा मनुष्य तोम्या असे उच्चारत असेल आणि त्याला अनुसरून इतरही तोम्या असे उच्चारू लागले त्यामुळे सोम्याचे नाव तोम्या होत नाही लोक तोम्याऐवजी सोम्या म्हणू लागले हा बदल नाही सुधारणा आहे हे लक्षात न घेता पाठ थोपटून घेणे किंवा आक्षेप घेणे निरर्थक आहे ०३ ब्रिटिश राजवटीच्या परंपरेतून जो विधिव्यवहार आणि न्यायव्यवहार भारतात रूढ झाला त्यात तयार झालेल्या व्यवस्थांत आणि अधिनियमांत काही ठिकाणी बॉम्बे असे नाव मुंबईऐवजी वापरात आहे नव्या विधिव्यवस्थेच्या नियमानुसार काही अधिनियम किंवा अध्यादेश काढून बॉम्बेऐवजी मुंबई अशी सुधारणा करण्यात येत असेल तर ते मला मान्य आहे त्यासाठी कुणी सक्रिय प्रयत्न करत असेल तर माझा त्यांना पाठिंबा आहे अट इतकीच की त्यांनी हा बदल आहे असे न म्हणता ही सुधारणा आहे हे स्पष्ट केले पाहिजे ०४ नाव सुधारल्याने बदलल्याने काय होणार हा नामी मुद्दा मांडण्यात येतो नावे बदलणे भावनिक आहे असे हिणवण्यात येते नावे बदलून काही होत नाही ही बाब सर्वस्वी खरी नाही नाव बदलल्याने नाव बदलते एवढा काही वेळा एवढाच परिणाम होतो ही उघड बाब आहे तरी नाव बदलण्याची प्रथा आहे ब्रिटिश गेल्यावर भारताचा झेंडा बदलला इतकेच कशाला आजही एका भारतीय पक्षाचा झेंडा दुसऱ्याला चालत नाही भाजपावाले लाल बावटा लावणार नाहीत आणि माकपवाले भगवा फडकवणार नाहीत हा झेंडा बदलल्याने जो आणि जितका फरक पडलेला आहे तितकाच फरक नावे बदलल्याने होतो मराठवाड्यात विद्यापीठाच्या नामांतरासाठी नावातील सुधारणेसाठी नव्हे एक पिढी लढत राहिली शेवटी ते नाव बदलण्यातही आले नावे बदलून जेवढा फरक पडतो तेवढा ह्या उदाहरणातही पडला आहे चर्चा केल्याने जेवायला मिळत नाही म्हणून चर्चा निरर्थक ठरत नाहीत जेवण मिळवण्यासाठी श्रम करावेच लागतात चर्चांचे फलित वेगळे असते श्रमांचे वेगळे तेव्हा केवळ भावनिक म्हणून हिणवण्यानेही काही फरक पडत नाही नावे बदलणे भावनिक असतेच ते भावनिकच असेल तर भावनिक गोष्टीं दुर्लक्षणीय मानणाऱ्यांनी त्यावर इतकी चर्चा कशाला करावी आंब्याच्या झा़डाला पेरू लागत नाहीत म्हणून आंबे लावणे निरर्थक ठरवणे एक तर मूर्खपणाचे आहे किंवा लबाडीचे आहे ०५ नावे सुधारणे बदलणे हे करणे पुरेसे नाही हे आपल्याला माहीतच अाहे मग नावे बदलण्याव्यतिरिक्त जे करायचे ते आपल्या परीने करत राहावे नावे सुधारल्याने बदलल्याने काही होत नाही असे म्हणत नावे सुधारण्याला बदलण्याला विरोध करणे हे ढोंगीपणाचे आहे ०६ वरील मजकूर लिहिण्याला कारण घडलेली घटना म्हणजे उच्च न्यायालयांच्या नावांत केंद्रीय शासनाने त्याच्या मते केले बदल माझ्या मते हा बदल नसून सुधारणा आहे असो पण शासनाने अजूनही एक महत्त्वाचे काम करणे आवश्यक आहे मुंबई उच्च न्यायालय असे नाव जरी असले तरी ह्या उच्च न्यायालयात राज्याच्या राजभाषेलाच मराठीलाच प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही हा नागरिकांवर अन्याय आहे मराठीला प्राधिकृत भाषेचा दर्जा मिळाला तर उच्च न्यायालयात मराठी कागदपत्रांची इंग्लिश भाषांतरे करून द्यावी लागणार नाहीत राज्याच्या राजभाषेला उच्च न्यायालयात प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता नसणे हे लोकनियुक्त प्रतिनिधीला विधिमंडळात मते मांडण्यास अटकाव करण्यासारखेच अन्याय्य आहे सर्व पक्षांच्या लोकनियुक्त प्रतिनिधींनी राजभाषेवरील हा अन्याय दूर करण्यासाठी एकत्र यायला हवे राजभाषेला उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळावी ह्यासाठी लढा उभारणाऱ्या लोकांना सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यायला हवा हा अन्याय दूर करायला हवा येथे जुलै ०६ २०१६ कोणत्याही टिप्पण् या नाहीत यास ईमेल करा हेब्लॉगकरा twitter वर शेअर करा facebook वर शेअर करा pinterest वर शेअर करा शुक्रवार ९ ऑक्टोबर २०१५ मराठी ग्रंथ सूचिकार श्री शरद केशव साठे आज ०९ ऑक्टोबर २०१५ दुपारी एक दुःखद वार्ता कळली मराठी ग्रंथ सूचिकार श्री शरद केशव साठे काही दिवसांपूर्वी कालवश झाल्याची १८०० ते १९५० ह्या काळातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करून ह्या सूचिकार्याची पायाभरणी श्री शंकर गणेश दाते ह्यांनी केली राज्य मराठी विकास संस्थेने ह्यापुढील कालखंडातील १९५१ ते १९९० ह्या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करण्याचे काम साठे सरांकडे सोपवले होते ते साठे सरांनी पूर्ण करत आणले होते त्यातल्या शेवटच्या ५ वर्षांच्या कालखंडाचे काम सर करत होते पण दुर्देवाने ते पूर्ण होऊ शकलेले नाही १९५१ ते १९८५ ह्या ३५ वर्षांत प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची साठे सरांनी ४ भागांत मराठी ग्रंथसूची भाग ३ ते ६ तयार केली ह्यासाठी मुख्य आधार त्यांनी घेतले ते कोलकात्याच्या राष्ट्रीय ग्रंथसूचीचे नॅशनल बिब्लिओग्राफीचे खंड आणि मुंबईच्या एक्झामिनर ऑफ बुक्स ह्यांच्या तालिकांचे तिमाही अंक ह्यांचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर आणि मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे ह्यांच्या दाखल नोंद वह्यांचाही पूरक वापर त्यांनी केला अभ्यासकांना आपल्या क्षेत्रात आधी काय काम झाले आहे ह्याची माहिती करून घेण्यासाठी ग्रंथसूचीसारखे साधन उपयोगी ठरते ग्रंथसूचीतील ग्रंथवर्णन ह्या भागात ग्रंथांच्या माहितीची विषयवार मांडणी केलेली असते त्यानंतर लेखक ग्रंथनाम विषय प्रकाशक प्रकाशनस्थळ अनुवादित ग्रंथ ह्यांसारख्या निर्देशसूची नेमका ग्रंथ हुडकायला साहाय्य करतात संगणकपूर्व काळातील विदागार डेटाबेस रचण्याचे हे काम आहे अत्यंत निष्ठापूर्वक सातत्याने हे काम सरांनी केले ह्याव्यतिरिक्त अमृतानुभवाचा पदसंदर्भकोश ज्ञानेश्वरीची ओवीसूची मुंबई विद्यापीठाच्या ज्ञानदेवी खंड ३ मध्ये समाविष्ट ज्ञानेश्वरपंचकाच्या ज्ञानेश्वर निवृत्तिनाथ सोपानदेव मुक्ताई चांगदेव अभंगांची चरणसूची आणि शब्दसूची ह्यासारखी कामेही सरांनी केली पदसंदर्भकोशात ग्रंथात आलेल्या प्रत्येक शब्दाची नोंद असते तो ग्रंथात कुठे आला आहे ह्याचा पत्ता दिलेला असतो आणि तो शब्द ज्या ओळीत वापरलेला आहे त्या ओळीचा मजकूरही दिलेला असतो त्यामुळे शब्दाच्या वापराचा संदर्भ त्वरित कळून येतो इतकेच नव्हे तर ग्रंथातील पुनरुक्त शब्द त्यांची वारंवारता ग्रंथातील अनन्य शब्द ह्यांचीही माहिती मिळते मराठी ग्रंथसूचीचे काम हाती घेण्यापूर्वी केलेली ही कामे करायला ११ वर्षांत सुमारे ७००० तास लागल्याचा उल्लेख सरांनी आपल्या एका लेखात केला आहे विविध तऱ्हेचे सूचिकार्य हा सरांचा ध्यास होता बॅंकेतील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी १९५० ते १९९० ह्या कालखंडातील मराठी ग्रंथसूचीचे काम स्वीकारले सातत्य चिकाटी आणि परिश्रम ह्या गुणांच्या आधारे ते काम बऱ्यापैकी पूर्ण केले मराठी ग्रंथसूचीच्या ६व्या खंडाला त्यांनी ग्रंथकार अल्पपरिचय कोश जोडला आहे त्यासाठी त्यांनी विविध साधनांतून माहिती गोळा केली लेखकांची जन्म मृत्यु वर्षे हयात लेखकांचे पत्ते व संपर्कक्रमांक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केला सूचिकार्यासारखे मोजक्या अभ्यासकांना उपयोगी पडणारे आणि त्यांचे कितीतरी श्रम वाचवणारे कार्य त्यांनी सातत्याने केले हे अर्थातच फारशी प्रसिद्धी मिळवून देणारे काम नव्हे पण ते किचकट काम सर प्रसिद्धीची आस न बाळगता निरलसपणे करत राहिले ते १ ऑक्टोबर २०१५ रोजी...
|