Meta tags:
Headings (most frequently used words):
january, 2015, thursday, कालगणना, मार्ग, आज, मतलबाचा, वाचकभेटी, जगभर, विखुरलेले, वाचक, नवे, मेट्रो, मोनो, लढाई, किनारी, पानिपतची, counter, कधी, झाली, पुन्हा, एकदा, भारतातील, दाभोळचा, सप्ताहातील, followers, flag, friday, 23, 22, 15, sunday, 11, monday, wednesday, सुचलेलं, july, 31, 2013, वाचकांचे, स्वागत, blog, archive, about, me, गॅस,
Text of the page (most frequently used words):
आहे (43), #share (21), #नाही (20), असे (16), सुरू (13), आता (11), #कालगणना (11), #मात्र (11), #झाली (11), #काही (10), #january (9), कीं (9), #फडणीस (9), #phadnis (8), आहेत (8), मार्ग (8), 2015 (8), आणि (8), प्रभाकर (8), twitter (7), लाइन (7), facebook (7), गॅस (7), posted (7), email (7), काय (7), blogthis (7), होईल (7), this (7), pinterest (7), अशी (7), तरी (6), इसवी (6), #मेट्रो (6), इतर (6), फार (6), नवीन (5), वर्ष (5), चालू (5), तारीख (5), पुढे (5), पुन्हा (5), त्या (5), संवत (5), उपयुक्त (5), होते (5), दक्षिण (4), पश्चिम (4), त्याची (4), वर्षगणना (4), comments (4), अशा (4), मराठी (4), झाले (4), पाहिजे (4), करून (4), गेला (4), गेली (4), म्हणून (4), july (4), रस्ता (4), ठरेल (4), म्हणजे (4), असली (4), झाला (4), असा (4), जात (4), गेल्या (4), नको (4), सोय (4), लिहिले (4), होऊन (4), विक्रम (4), तेथे (3), कर्नाटकात (3), पर्याय (3), होणार (3), अधिक (3), त्याला (3), सर्व (3), thursday (3), जाणार (3), विचार (3), केली (3), येथे (3), उपयुक्तता (3), पूर्वी (3), त्याचे (3), त्याना (3), comment (3), adar (3), and (3), june (3), may (3), march (3), february (3), बोगदा (3), मेळ (3), त्यामुळे (3), अनेक (3), जानेवारीला (3), गणना (3), येत (3), दिवस (3), चांद्र (3), मला (3), निश्चित (3), april (3), होती (3), दोन (3), किनारी (3), इंग्रजी (3), ऐकिवात (3), किनार् (3), लढाई (3), मोनो (3), एकदा (3), नुकसान (2), आम्हाला (2), तिची (2), वाटा (2), मोठा (2), द्या (2), वर्षांपूर्वी (2), जैतापुर (2), तेव्हा (2), त्यांची (2), वर्षांनी (2), महाराष्ट्र (2), सनाला (2), कोठे (2), कुतूहल (2), ज्यू (2), वीज (2), लेख (2), नकोच (2), सिद्ध (2), आपल्या (2), काळ (2), स्थान (2), होत्या (2), वगैरे (2), समाजाला (2), होण्याची (2), प्रमुख (2), बातम्या (2), लांबलचक (2), हीच (2), होता (2), घटनेचा (2), असला (2), मुंबईच्या (2), खरी (2), व्याप्ति (2), जरा (2), केला (2), चर्चेत (2), दूर (2), दुसरे (2), जुना (2), पहिले (2), भासली (2), होत (2), गणनेची (2), वापर (2), वाटत (2), वर्षांच्या (2), जनता (2), करावा (2), कदाचित (2), गेले (2), फारशी (2), कशी (2), मोठ्या (2), कोणी (2), मुंबईत (2), उल्लेख (2), नाव (2), युधिष्ठिर (2), किंवा (2), मुस्लिम (2), कां (2), शालिवाहन (2), सत्तेच्या (2), हिजरी (2), निर्माण (2), सुचलेलं (2), सेप्टेंबर (2), असणार (2), भारतातील (2), पानिपतची (2), कधी (2), ईश्वराने (2), केले (2), मतलबाचा (2), साल (2), त्यातील (2), महिने (2), मिळणार (2), anno (2), असेल (2), नवे (2), जातो (2), कमी (2), december (2), यांचे (2), पाइपलाइन (2), ब्लॉगवर (2), दीड (2), काम (2), अर्थातच (2), october (2), september (2), वर्षात (2), august (2), असते (2), जाईल (2), शक्य (2), बांधली (2), 2013 (2), देईल (2), आंध्र (2), posts (2), तेहि (2), भाग (2), निर्मिति (2), मुख्य (2), त्यांच्या (2), २५० (2), वाचक (2), अखेर (2), सृष्टीची (2), जगभर (2), वाटते (2), वांद्रे (2), आयातीची (2), महिना (2), त्यात (2), बनते (2), पूर्ण (2), म्हणतात (2), फक्त (2), गॅसहि (2), ब्लॉग (2), एका (2), पडतो (2), हाच (2), अधिकमहिना (2), नाते, अडचण, जगात, संस्कृति, संक्रांतीचा, स्वस्थानावर, यावर, तेव्हापासून, मानतात, महिन्याची, तरतूदच, नसल्यामुळे, वेळेपासून, इस्लामी, दरवर्षी, लवकर, होतात, ऋतु, चव्हाणांच्या, वर्षानी, महिन्याचा, पृथ्वीराज, प्रारंभ, कल्पना, येतो, वर्षारंभ, रस्त्याची, बांधण्याबद्दल, सणवार, उलगडील, बसला, असतील, वर्षांत, तारखेला, निघाले, अबदालीच्या, सैन्याला, बगल, कायम, सरकली, देऊन, निसटून, जाणे, नव्हतेच, यंदा, झालीच, संध्याकाळपर्यंत, ३६५, सैन्याचा, वर्षांमध्ये, २६०००, दिवसाने, लढाईला, संक्रांत, पडलेले, अंतर, वर्षे, म्हटले, उत्तरायणाचा, हजारो, लढाईची, सर्वमान्य, मकरसंक्रांत, sunday, पानपतावर, भाऊसाहेब, कोडे, पेशवा, नोंदली, नक्कीच, उत्तरायण, घटनेची, वाट, पहात, सैन्याची, उपासमार, दुसर्, जानेवारी, बांधून, कोणती, कागदपत्रांत, तारखेचा, नसेल, सोडून, फ्रेंच, दिवशी, पोर्तुगीझ, पत्रव्यवहारांत, एवढ्या, गोल, सैन्य, पराभव, जाण्याचा, वरळी, हवी, निघून, पूर्वेला, खाडी, ओलांडून, महापे, भागापर्यंत, अतिशय, स्टेशनाना, जोडणारी, टोकाला, विक्रोळी, बॅलार्ड, इस्टेट, शिवाजी, चर्चगेट, नरिमन, पॉइंट, मोनोरेल, खासच, रस्तेहि, रुंद, स्टेशनपासून, रेल्वेच्या, उंच, ठाणे, मार्गाला, समांतर, सेवा, सीप्झ, पूर्व, धावणार्, झाल्या, जास्त, ठरतील, मिरारोड, पूर्वपश्चिम, मध्य, जोडणारा, दुवा, ठरून, भरपूर, दाट, भरण्यापूर्वी, अडचणी, येतील, आणखी, अशक्य, असल्यामुळे, खांबांवर, उत्तर, असं, वर्तमानपत्रे, वाचताना, ऐकताना, वेळीहि, सुचत, राहातं, लोकांसमोर, मांडावं, वाटतं, विषयांवर, वेळोवेळी, लिहिणार, वाचकाना, उपक्रम, आवडेल, त्यांच्याहि, विचारांना, चालना, आशा, रोज, friday, बांधणे, मार्गाने, होऊ, शकेल, अर्थात, असताना, त्रास, सोसावा, लागेल, किनारा, बांधतानाच, त्याच, मोनोरेलहि, मिळेल, मोटरवाल्यांसाठी, खर्चिक, आक्षेप, उरणार, रेल्वेवरचा, भार, रेल्वे, स्टेशनांपासून, असलेल्याना, रेल्वेच्याच, दिसते, सेतु, बंगले, लॉंच, मालाडमधून, निघणारा, येवढेच, रहदारीचे, भूभागामध्ये, कारणामुळे, वस्ती, श्रीमंतांचे, एवढा, पडलेला, खर्च, बांधण्यामागे, हेतु, भागातून, वरसोवा, मेट्रोची, तेथून, थेट, मुंबईपर्यंत, मदिनेला, वरसोव्याहून, अलग, उपलब्ध, वरसोव्यापर्यंत, वाढवून, हाजीअलीपर्यंत, नेणे, खर्चाचे, असल्याने, आला, वरळीपासून, टोकापर्यंतच, मर्यादित, वाढली, यानजीक, भूमीपासून, मारवे, पर्यंत, याचे, मागे, अर्थकारण, याचा, वास्तविक, मार्वे, भूभाग, राजमार्ग, भूभागाचे, आधी, झाल्यावरच, हतबल, निर्विवाद, मोनोरेलची, पहिली, अर्धी, सातरस्त्यापर्यंत, पुरी, करिरोड, अबाधितच, स्टेशनला, जोडली, असती, उत्तम, तसा, प्लॅन, दिसत, लाइन्स, राहणार, साटेलोटे, उघड, आकाराचे, प्रचंड, प्रमाणावर, मोठमोठ्या, अनेकमजली, इमारती, उभ्या, राहतील, राजेशाही, 3bhk, त्याहून, फ्लॅट, सत्ताधीश, बनतील, बिल्डरांचे, उखळ, पांढरे, जनतेच्या, खर्चाने, राजवट, बदलली, तरीहि, बिल्डर, प्रयाण, picture, मक्केहून, चालवली, किंमत, होणार्, पॉवरचा, तामिळनाडुला, उरलेल्या, साठी, कर्नाटकानी, मोर्चेबांधणी, सार्, जयललिताने, यात, दाभोळची, महाग, मागितल्याचे, वाचनात, एन्रॉन, समुद्रात, बुडवण्याचे, सहकार्य, त्यासाठी, झाल्याचे, तामिळनाडु, वापरला, आंध्रच्या, यावरील, छोट्या, बंदरातहि, लिक्विडगॅस, मोठी, गॅससाठी, कर्नाटक, जुमानता, वाटणी, मागत, कुडनकुलम, येथील, पॉवरस्टेशन, मतलबी, विरोधाला, पर्यावरणाचे, गुहागर, केरळ, दिसले, दाभोळचा, wednesday, फेसबुकवर, काहीबाही, दखल, घेतली, लेखनाकडे, हवा, वळावे, माझे, विखुरले, असणारच, नम्र, आमंत्रण, वाचा, प्रोत्साहन, अमर, सर्वाना, परिसराचे, देणार, झाल्याचेहि, उद्या, वाढेलहि, आम्हा, महाराष्ट्रियाना, जमिनीखालून, गोव्यालाहि, महाराष्ट्राला, असाल, भ्रष्टाचार, चालेल, कोणाला, म्हणावेसे, गाढ, झोपला, क्षुद्र, कुरघोडीचे, राजकारण, कर्नाटकातच, येणारा, लेखनाचे, 2011, mumbai, california, maharashtra, united, states, about, november, san, 2012, blog, archive, माझा, वाचकांना, पसंत, ramon, citizen, वाचकभेटींवरून, followers, theme, powered, blogger, विखुरलेले, सप्ताहातील, वाचकभेटी, flag, counter, view, senior, complete, profile, ज्येष्ठ, नागरिक, साहित्य, संगीत, प्रेमी, वाढत्या, वाचकांनी, गॅसजेटी, मिळण्याची, टाकण्याचे, महाराष्ट्राच्या, तीनचार, जिल्ह्यांतून, वाटेतल्या, कोणत्याहि, शहराला, त्यातून, लाइनवरील, दाभोळपासून, छोट्यामोठ्या, शहरांना, पॉवरस्टेशनहि, गॅसवर, चालणार, एकूण, कोची, अशीच, बंगलोरपर्यंत, लागतील, टीकाटिपण्या, atom, करण्यास, अनमान, करूं, नये, हव्यातच, वाचकांचे, स्वागत, subscribe, home, लागूं, older, दाभोळच्या, जेटीबद्दल, जेटीवर, गॅसची, जहाजे, लवकरच, ब्लॉगवरील, स्वरूप, पैगंबरांनी, निज, होतो, ज्या, वर्षी, घ्यायचा, त्यावर्षी, असतात, पहिला, दुसरा, आपल्याप्रमाणेच, वर्षाचा, cycle, मध्ये, ठरलेल्या, वर्षांमध्येच, मोजला, पद्धतीने, शेवटचा, पद्धतीत, वर्षांचा, तेही, सहज, कालगणनांचा, शोध, धर्म, खूप, तेव्हां, पाहिले, कळले, आपल्याप्रमाणे, करतात, मोजतात, चांद्रवर्ष, सौरवर्ष, यांत, बराच, फरक, घालण्यासाठी, अधिकमासाचा, सौर, बर्, लिहून, ज्यूंच्या, जुनी, domini, म्हणत, आठवत, jan, common, era, वर्षापुढे, ५८०१, munde, लिहितात, आपल्याला, माहीत, आहेच, इस्लाम, प्रमाणे, धर्मकल्पनांप्रमाणे, २०४०, याच, वाचावयास, अंशीं, जुळवला, थोडेफार, पूर्वीहि, वाचले, लोक, कोणता, पाळतात, मिळाले, ५७६७, आधीआसून, ०००२, साली, सृष्टि, २००६, रोजी, त्यांचे, झाल्यावर, window, सारखेच, अजून, सनाच्या, जगव्यवहारातील, स्थानामुळे, अंमल, आपण, वापरतो, सणवारांसाठी, जुन्या, वापरात, व्यवहारापुरत्याच, खरे, व्यवहारात, सत्य, नाकारता, तिन्ही, गणनांची, सुरवात, एकमेकांपासून, वापरल्या, धार्मिक, प्रष्न, आजतागायत, राहील, monday, भारतात, इंग्रज, राजसत्ता, येण्याचे, आधीपासून, काळात, दोन्ही, सनाचा, उपयोग, आपले, धरून, अमलात, सनाने, आश्रयामुळे, पटकावले, सर्वात, पडला, असूनहि, एकटे, शिवाजीमहाराजच, राज्याभिषेक, प्रबळ, प्रेरणा, औरंगजेबाचे, परचक्र, अविरत, जाणवली, झगड्यानंतर, परतवून, लावणार्, सत्तेला, कारभारात, तिचा, अनिवार्य, वाटले, अस्तित्वात, आवश्यकता, सुरु, लोटली, दहावे, बासष्टावे, होण्यापूर्वी, एखाद्या, सांगण्यासाठी, कालाचे, माप, शतके, गरजच, विक्रमसंवत, शकगणना, पद्धत, लुप्त, केव्हा, ऐकलेले, विक्रमापुर्वीच्या, अमुक, मधील, आधीचा,
Text of the page (random words):
आज सुचलेलं आज सुचलेलं रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे friday january 23 2015 नवे मेट्रो मोनो मार्ग मुंबईत एक मेट्रो लाइन चालू झाली तिची उपयुक्तता निर्विवाद सिद्ध झाली आहे मोनोरेलची पहिली लाइन अर्धी सुरू झाली आहे पण तिची उपयुक्तता लाइन सातरस्त्यापर्यंत पुरी झाल्यावरच सिद्ध होईल ती करिरोड स्टेशनला जोडली गेली असती तर उत्तम झाले असते पण तसा प्लॅन दिसत नाही नवीन दोन मेट्रो लाइन्स चर्चेत आहेत व त्यातील नं ३ आधी होईल असे दिसते ही लाइन उत्तर दक्षिण आहे म्हणजे ती पश्चिम रेल्वेच्याच मार्गाला समांतर सेवा देईल वांद्रे ते सीप्झ हा भाग निश्चित उपयुक्त ठरेल मला असे वाटते कीं मेट्रो मोनो पूर्व पश्चिम धावणार् या झाल्या तर जास्त उपयुक्त ठरतील मिरारोड ते ठाणे अशी मेट्रो झाली तर ती पूर्वपश्चिम जोडणारा दुवा ठरून निश्चित भरपूर उपयुक्त ठरेल तो भाग दाट भरण्यापूर्वी लाइन बांधली गेली तर कमी अडचणी येतील आणखी १० वर्षांनी कदाचित ते अशक्य होईल मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्टेशनपासून निघून एक लाइन पूर्वेला खाडी ओलांडून महापे भागापर्यंत गेली तर अतिशय उपयुक्त ठरेल मात्र ती स्टेशनाना जोडणारी हवी मुंबईच्या दक्षिण टोकाला बॅलार्ड इस्टेट शिवाजी चर्चगेट नरिमन पॉइंट अशी मोनोरेल खासच उपयुक्त ठरेल तेथे रस्तेहि रुंद असल्यामुळे उंच खांबांवर लाइन बांधणे शक्य होऊ शकेल अर्थात काम चालू असताना त्रास सोसावा लागेल नवीन किनारा मार्ग बांधतानाच त्याच मार्गाने मोनोरेलहि बांधली तर फक्त मोटरवाल्यांसाठी खर्चिक रस्ता असा आक्षेप उरणार नाही आणि पश्चिम रेल्वेवरचा भार जरा कमी होईल प रेल्वे स्टेशनांपासून दूर असलेल्याना प रे ला पर्याय मिळेल posted by प्रभाकर फडणीस p k phadnis at 10 19 pm 1 comment email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest thursday january 22 2015 मतलबाचा किनारी मार्ग गेले काही दिवस मुंबईत पश्चिम किनार् यावर नवीन रस्ता बांधण्याबद्दल बातम्या व लेख येत आहेत या रस्त्याची कल्पना पृथ्वीराज चव्हाणांच्या वेळेपासून चर्चेत आहे वांद्रे वरळी सेतु पुढे वाढवून हाजीअलीपर्यंत नेणे फार खर्चाचे होणार असल्याने त्याला पर्याय म्हणून किनारी मार्ग पुढे आला त्यामुळे तेव्हा त्याची व्याप्ति वरळीपासून मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतच मर्यादित होती मात्र आता त्याची व्याप्ति फार वाढली आहे वरसोव्यापर्यंत किनार् यानजीक रस्ता करून मग एक लांबलचक बोगदा करून तो मारवे पर्यंत जाणार आहे याचे मागे काय अर्थकारण आहे याचा विचार पडतो वास्तविक मार्वे मढ वगैरे भूभाग मुख्य भूमीपासून अलग पडलेला आहे वरसोव्याहून लॉंच किंवा मालाडमधून निघणारा एक लांबलचक रस्ता येवढेच रहदारीचे मार्ग आहेत या भूभागामध्ये या कारणामुळे फारशी वस्ती नाही श्रीमंतांचे बंगले वगैरे आहेत मग एवढा मोठा खर्च करून बोगदा बांधण्यामागे काय हेतु आहे एकदा बोगदा झाला व या भागातून वरसोवा मेट्रोची सोय व तेथून थेट दक्षिण मुंबईपर्यंत जाण्याचा राजमार्ग उपलब्ध झाला कीं या भूभागाचे काय होईल हे उघड आहे येथे प्रचंड प्रमाणावर मोठमोठ्या अनेकमजली इमारती उभ्या राहतील त्यात अर्थातच राजेशाही 3bhk वा त्याहून मोठ्या आकाराचे फ्लॅट बनतील बिल्डरांचे उखळ पांढरे होईल हे सर्व जनतेच्या खर्चाने होणार राजवट बदलली तरीहि बिल्डर व सत्ताधीश यांचे साटेलोटे अबाधितच राहणार आहे जनता हतबल आहे posted by प्रभाकर फडणीस p k phadnis at 6 48 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest thursday january 15 2015 पानिपतची लढाई कधी झाली पानपतावर भाऊसाहेब पेशवा उत्तरायण सुरू होण्याची वाट पहात बसला होता सैन्याची उपासमार होत होती मकरसंक्रांत झाली आणि दुसर् या दिवशी मराठी सैन्य गोल बांधून तळ सोडून निघाले मात्र अबदालीच्या सैन्याला बगल देऊन निसटून जाणे शक्य नव्हतेच अखेर लढाई झालीच व संध्याकाळपर्यंत मराठी सैन्याचा पूर्ण पराभव झाला या लढाईला १४ जानेवारीला २५० वर्षे झाली असे म्हटले जात आहे उत्तरायणाचा व संक्रांतीचा मेळ हजारो वर्षांपूर्वी असला तरी आता फार अंतर पडलेले आहे दर ७० ७२ वर्षांनी संक्रांत एक दिवसाने पुढे जात आहे २६००० वर्षांमध्ये पूर्ण ३६५ दिवस पुढे जाईल गेल्या काही वर्षांत ती १४ जानेवारीला येत असली तरी यंदा १५ जानेवारीला सरकली आहे व आता १५ तारीख कायम होणार आहे २५० वर्षांपूर्वी ती १० ११ तारखेला झाली असली पाहिजे मग लढाईची तारीख १२ १३ जानेवारी असली पाहिजे मग खरी तारीख कोणती मराठी कागदपत्रांत तारखेचा उल्लेख नसेल कदाचित पण इंग्रजी फ्रेंच पोर्तुगीझ डच पत्रव्यवहारांत एवढ्या मोठ्या घटनेची तारीख नक्कीच नोंदली गेली असली पाहिजे हे कोडे कोणी उलगडील काय posted by प्रभाकर फडणीस p k phadnis at 3 42 pm 1 comment email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest sunday january 11 2015 कालगणना पुन्हा एकदा आधीचा लेख लिहून झाल्यावर सहज कुतूहल म्हणून इतर कालगणनांचा शोध केला ज्यू हा धर्म खूप जुना तेव्हां त्यांची कालगणना कशी आहे हे पाहिले तेव्हा कळले कीं तेही आपल्याप्रमाणे चांद्र वर्ष मोजतात चांद्रवर्ष व सौरवर्ष यांत बराच फरक आहे त्यामुळे मेळ घालण्यासाठी तेहि अधिकमासाचा वापर करतात मात्र त्यांच्या पद्धतीत फक्त वर्षाचा शेवटचा महिना हाच अधिकमहिना होतो त्याचे नाव adar असे आहे त्यामुळे ज्या वर्षी अधिकमहिना घ्यायचा असेल त्यावर्षी adar 1 and adar 2 असे दोन महिने असतात त्यातील पहिला अधिक व दुसरा निज असे आपल्याप्रमाणेच असते १९ वर्षांच्या एका cycle मध्ये ७ ठरलेल्या वर्षांमध्येच अधिक महिना मोजला जातो या पद्धतीने चांद्र व सौर वर्षांचा मेळ बर् याच अंशीं जुळवला जातो हे थोडेफार मी पूर्वीहि वाचले होते मात्र मला मुख्य कुतूहल होते ते म्हणजे ज्यू लोक कोणता शक पाळतात असे वाचावयास मिळाले कीं त्यांची वर्षगणना ईश्वराने सृष्टीची निर्मिति केली त्याचे एक वर्ष आधीआसून सुरू होते म्हणजे ईश्वराने ०००२ साली सृष्टि निर्माण केली आता २३ सेप्टेंबर २००६ रोजी त्यांचे ५७६७ साल सुरू झाले व ८ सेप्टेंबर २०४० ला ५८०१ साल सुरू होईल म्हणजे त्यांच्या धर्मकल्पनांप्रमाणे सृष्टीची निर्मिति फार जुनी नाही पूर्वी इसवी सनाला a d anno domini म्हणत हे आठवत असेल मात्र आता jan 11 2015 c a common era असे म्हणतात ज्यूंच्या वर्षापुढे a m anno munde असे लिहितात आपल्याला माहीत आहेच कीं इस्लाम प्रमाणे कालगणना पैगंबरांनी मक्केहून मदिनेला प्रयाण केले तेव्हापासून सुरू होते त्याला हिजरी सन असे म्हणतात तेहि चांद्र वर्ष मानतात मात्र अधिक महिन्याची तरतूदच नसल्यामुळे इस्लामी महिने दरवर्षी ८ १० दिवस लवकर सुरू होतात दर ३५ ३७ वर्षानी महिन्याचा प्रारंभ स्वस्थानावर येतो वर्षारंभ वा सणवार आणि ऋतु यांचे नाते काही नाही त्याना त्यात काही अडचण वाटत नाही जगात इतर अनेक संस्कृति होऊन गेल्या इतर अनेक वर्षगणना व शक असतील पण जगभर आता c a हाच शक सर्वमान्य झाला आहे posted by प्रभाकर फडणीस p k phadnis at 4 25 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest thursday january 8 2015 भारतातील कालगणना आपल्या भारतात इंग्रज किंवा मुस्लिम राजसत्ता येण्याचे आधीपासून शालिवाहन शक आणि विक्रम संवत अशा दोन कालगणना वर्षगणना चालू आहेत व त्या आजतागायत चालू आहेत मुस्लिम सत्तेच्या काळात हिजरी सनाचा उपयोग होत असला तरी या वर्षगणना आपले स्थान धरून होत्या इंग्रजी अमलात मात्र इसवी सनाने सत्तेच्या आश्रयामुळे प्रमुख स्थान पटकावले व या दोन्ही कालगणना धार्मिक व्यवहारापुरत्याच वापरल्या जात होत्या इसवी सनाच्या जगव्यवहारातील स्थानामुळे इंग्रजी अंमल गेला तरी इसवी सन हीच आता प्रमुख कालगणना आपण वापरतो सणवारांसाठी या जुन्या कालगणना अजून वापरात आहेत हे खरे पण व्यवहारात तारीख हीच खरी हे सत्य नाकारता येत नाही जरा विचार केला तर शक संवत व इसवी सन या तिन्ही गणनांची सुरवात एकमेकांपासून फार दूर नाही विक्रम संवत सर्वात जुना आहे मला प्रष्न पडला आहे तो असा कीं विक्रम संवत सुरु होऊन पहिले दुसरे दहावे बासष्टावे वर्ष अशी गणना सुरू होण्यापूर्वी एखाद्या घटनेचा काळ सांगण्यासाठी काय मार्ग होता वर्ष हे कालाचे माप निश्चित होऊन अनेक शतके लोटली असणार मग पहिले दुसरे अशी गणना सुरू होण्याची समाजाला गरजच भासली नाही कीं इतर अशी शकगणना पद्धत होती पण ती लुप्त झाली कां आणि केव्हा युधिष्ठिर शक असे एक नाव मी ऐकलेले आहे पण विक्रमापुर्वीच्या घटनेचा युधिष्ठिर शक अमुक मधील असा उल्लेख कोठे ऐकिवात नाही विक्रमसंवत ही गणना तरी कोणी सुरू केली त्याला तरी अशा गणनेची आवश्यकता कां भासली समाजाला अशा गणनेची उपयुक्तता कशी जाणवली विक्रम संवत व शालिवाहन शक अस्तित्वात असूनहि एकटे शिवाजीमहाराजच असे होऊन गेले कीं राज्याभिषेक शक सुरू करावा अशी प्रबळ प्रेरणा त्याना झाली मात्र औरंगजेबाचे परचक्र ३० वर्षांच्या अविरत झगड्यानंतर परतवून लावणार् या मराठी सत्तेला ती कालगणना पुन्हा सुरू करून आपल्या कारभारात तिचा वापर अनिवार्य करावा असे वाटले नाही आता काळ फार पुढे गेला आहे आणि इसवी सनाला आता पर्याय नाही posted by प्रभाकर फडणीस p k phadnis at 9 48 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest monday january 5 2015 या ब्लॉगवर गेल्या दीड वर्षात काही नवीन लिहिले नाही फेसबुकवर काहीबाही लिहिले पण त्याची फारशी दखल घेतली जात नाही असे दिसले आता पुन्हा ब्लॉग लेखनाकडे वळावे असा विचार आहे माझे वाचक विखुरले असणारच त्याना पुन्हा नम्र आमंत्रण कीं वाचा आणि प्रोत्साहन द्या ब्लॉगवरील लेखनाचे स्वरूप पूर्वी सारखेच राहील फडणीस posted by प्रभाकर फडणीस p k phadnis at 11 12 am 2 comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest wednesday july 31 2013 दाभोळचा गॅस दाभोळच्या गॅस जेटीबद्दल पूर्वी लिहिले होते त्या जेटीवर गॅसची जहाजे आता लवकरच लागूं लागतील दाभोळपासून बंगलोरपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम चालू आहे ही पाइपलाइन अर्थातच महाराष्ट्राच्या तीनचार जिल्ह्यांतून जाईल मात्र वाटेतल्या कोणत्याहि शहराला त्यातून गॅस मिळण्याची सोय असणार नाही कर्नाटकात मात्र त्या लाइनवरील इतर छोट्यामोठ्या शहरांना गॅस मिळणार आहे एक पॉवरस्टेशनहि गॅसवर चालणार आहे एकूण सर्व गॅस कर्नाटकात जाणार आहे कोची येथे अशीच एक गॅसजेटी बनते आहे तेथे येणारा गॅसहि केरळ व कर्नाटकातच वापरला जाणार आहे आंध्रच्या किनार् यावरील एका छोट्या बंदरातहि लिक्विडगॅस आयातीची मोठी सोय बनते आहे त्या गॅससाठी आंध्र तामिळनाडु कर्नाटक वाटणी मागत आहेत कुडनकुलम येथील पॉवरस्टेशन सर्व मतलबी विरोधाला न जुमानता अखेर सुरू झाले त्यासाठी जयललिताने सहकार्य केले त्याची किंमत म्हणून तेथे निर्माण होणार् या पॉवरचा मोठा वाटा तामिळनाडुला मिळणार आहे व उरलेल्या साठी आंध्र कर्नाटकानी मोर्चेबांधणी चालवली आहे या सार् यात महाराष्ट्र कोठे आहे आम्हाला काही नकोच आहे दाभोळची वीज महाग म्हणून नको गॅसहि नको वाटा मागितल्याचे वाचनात नाही एन्रॉन समुद्रात बुडवण्याचे काय झाले पर्यावरणाचे काही नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही गुहागर परिसराचे काही नुकसान झाल्याचेहि ऐकिवात नाही गॅस आयातीची सोय उद्या वाढेलहि पण आम्हा महाराष्ट्रियाना काय त्याचे गॅस जमिनीखालून कर्नाटकात गेला तर गेला गोव्यालाहि पाहिजे तर द्या आम्हाला नकोच जैतापुर नको नको ७० वीज महाराष्ट्राला देणार असाल तर जैतापुर चालेल असे कोणाला म्हणावेसे वाटत नाही महाराष्ट्र गाढ झोपला आहे क्षुद्र कुरघोडीचे राजकारण व भ्रष्टाचार सर्वाना हवा आहे जनता अमर आहे posted by प्रभाकर फडणीस p k phadnis at 1 20 am 1 comment email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest older posts home subscribe to posts atom वाचकांचे स्वागत माझा ब्लॉग वाचकांना पसंत पडतो आहे असे वाढत्या वाचकभेटींवरून वाटते वाचकांनी टीकाटिपण्या करण्यास अनमान करूं नये त्या हव्यातच blog archive 2015 6 january 6 नवे मेट्रो मोनो मार्ग मतलबाचा किनारी मार्ग पानिपतची लढाई कधी झाली कालगणना पुन्हा एकदा भारतातील कालगणना या ब्लॉगवर गेल्या दीड वर्षात काही नवीन लिहिले नाही 2013 13 july 2 june 1 may 1 april 1 march 2 february 3 january 3 2012 44 december 3 november 2 october 4 september 5 august 3 july 1 june 2 may 4 april 3 march 5 february 5 january 7 2011 61 december 8 october 3 september 3 august 7 july 6 june 1 may 6 april 11 march 10 february 6 about me प्रभाकर फडणीस p k phadnis san ramon and mumbai california and maharashtra united states ज्येष्ठ नागरिक साहित्य व संगीत प्रेमी senior citizen view my complete profile followers flag counter सप्ताहातील वाचकभेटी जगभर विखुरलेले वाचक picture window theme powered by blogger
|