Meta tags:
description= Marathi stories,poems;
Headings (most frequently used words):
2024, वार्तालाप, february, me, monday, 2023, december, ३०, अहल्या, पाहे, वाट, शिळा, राघवे, मुक्त, महासंकटि, केली, गजेंद्रू, विचित्र, विवेक, स्वप्न, स्वप्नात, आली, ती, इच्छापूर्ती, कर्माची, फळे, का, मिळत, नाही, स्वास्थ्यवर्धक, उकडीचे, ३१, blogger, translate, 27, कविता, ललित, लेख, इत्यादी, thursday, 22, tuesday, january, wednesday, add, about, labels, featured, post, total, pageviews, blog, archive, blogroll, पटाईत, templates, दहीवडे,
Text of the page (most frequently used words):
आहे (41), #नाही (41), आणि (38), #share (15), #february (15), #केले (15), #december (14), #काही (13), #june (13), #july (13), मला (13), august (13), काय (12), may (12), november (12), सर्व (12), january (12), निशा (11), झाली (11), आपल्या (11), april (11), september (10), october (10), स्वप्न (10), march (10), होती (9), तिला (9), कथा (9), करत (9), होता (9), #अहल्या (9), विचारले (9), म्हणाली (9), झाले (9), लेख (9), #विवेक (9), समाजाने (9), असे (8), होते (8), म्हणतात (8), कविता (8), इच्छा (8), कचरा (8), पुन्हा (8), करून (8), वार्तालाप (8), केला (8), नष्ट (7), त्याला (7), सांसारिक (7), मुक्त (7), समर्थ (7), गौतम (7), 2024 (7), माझ्या (7), भगवंताचे (7), पूर्ण (7), हजारो (7), स्वीकार (7), राम (6), ऋषी (6), फळे (6), म्हणजे (6), असो (6), न्याय (6), माता (6), होतो (6), मनात (6), तरी (6), करू (6), उत्तम (6), फक्त (6), तिच्या (6), शिळा (6), मध्ये (6), मिळत (5), म्हणाले (5), आपण (5), धर्मदेव (5), घरात (5), आले (5), आपली (5), त्यांच्या (5), अनेक (5), आली (5), झाला (5), श्रीराम (5), blogthis (5), labels (5), मानव (5), अचानक (5), दिला (5), 2023 (5), कर्म (5), इत्यादी (5), facebook (5), twitter (5), pinterest (5), comments (5), email (5), this (5), करतो (4), होईल (4), प्रेम (4), आतिथ्य (4), एका (4), लोक (4), विचार (4), सतत (4), बहुतेक (4), कधीच (4), सुरू (4), चिप्स (4), करायची (4), अहंकार (4), पटाईत (4), बहिष्कृत (4), समस्त (4), गोष्ट (4), पूर्वी (4), सोबत (4), नामस्मरण (4), सकाळी (4), भगवंत (4), आला (4), किंवा (4), आपल्याला (4), नुपेक्षी (4), वाट (4), कदा (4), ऋषींच्या (4), घेऊन (4), केली (4), आश्रमात (4), स्पर्श (4), कधी (4), येते (4), मंजू (4), महर्षि (4), पीक (3), व्यापार (3), उद्योग (3), शेती (3), नेहमीच (3), नको (3), शकत (3), स्वामीजींनी (3), आधिभौतिक (3), बांधले (3), कर्माची (3), हातात (3), त्या (3), तिथे (3), प्रयत्न (3), अधिकार (3), लागली (3), प्रश्न (3), समर्थांनी (3), मगर (3), येतात (3), दासाभिमानी (3), श्रीरामांच्या (3), कारण (3), एकदा (3), खर्च (3), वडिलांच्या (3), जीव (3), तुला (3), चहा (3), म्हणून (3), असतात (3), स्वप्नात (3), पहाटे (3), नितीनच्या (3), काहीच (3), त्यावेळी (3), गजेंद्र (3), गेले (3), आहेत (3), बंद (3), सत्य (3), ठेवली (3), गप्पा (3), वर्णन (3), बेडरूम (3), धूपबत्ती (3), निर्दोष (3), तिने (3), राघवे (3), करता (3), करताना (3), गेल्या (3), गजेंद्रू (3), महासंकटि (3), बघितले (3), भोग (3), विश्वामित्र (3), अशोक (3), हसत (3), तिचे (3), माझे (3), पुढे (3), परिस्थिती (3), असल्याने (3), नितीन (3), दिसत (3), पाहे (3), ललित (3), कुठे (2), घरे (2), पाशातून (2), दैवी (2), मोह (2), गजेंद्रने (2), लागला (2), माहित (2), आणून (2), उपदेश (2), राजा (2), पीडित (2), लावली (2), मुळे (2), मीही (2), घरची (2), राहतो (2), तिच्याकडे (2), श्लोकाचा (2), चाकरी (2), उभी (2), व्यापारी (2), सडपातळ (2), लोकांना (2), बोललो (2), आसुरी (2), हाय (2), जेंव्हा (2), सर्वांची (2), पालन (2), गाडी (2), परिणाम (2), चाय (2), कसेबसे (2), क्षत्रिय (2), गया (2), ऐकून (2), आपले (2), दूर (2), घरी (2), सीटवर (2), हळू (2), आहेस (2), डोळे (2), तेंव्हा (2), घ्यायला (2), मार्कशीट (2), थंडीत (2), मिळणार (2), इथे (2), डास (2), वारे (2), गेला (2), मोठ्या (2), वादळ (2), स्थिती (2), पूजा (2), समाजात (2), तुम्हाला (2), सोडून (2), जगण्याचा (2), आचार्य (2), त्यांना (2), पत्रकाराने (2), मुनी (2), बहिष्कार (2), सहज (2), अहल्येवर (2), वाल्मिकी (2), दरवर्षी (2), विसरून (2), मोठे (2), नाम (2), कसे (2), भगवंताची (2), होऊ (2), कोणीच (2), इच्छापूर्ती (2), टाकले (2), वाळीत (2), स्वामींच्या (2), मंदिर (2), भव्य (2), निर्णय (2), घेण्याचा (2), स्वामी (2), मृत्यू (2), होत (2), व्यक्तीचे (2), कडे (2), पहात (2), नव्हता (2), मंत्र (2), कान (2), रात्री (2), शाळा (2), आता (2), मनुवादी (2), करा (2), करीत (2), दोषी (2), ठरवले (2), गेली (2), क्या (2), समाजाला (2), तुम्ही (2), नये (2), उपेक्षा (2), देतात (2), स्वयं (2), भगवंताने (2), पिता (2), झोपेत (2), देण्यासाठी (2), करतात (2), मागू (2), आम्ही (2), मंजुला (2), ताप (2), ऋषींचे (2), घेऊ (2), चरणांचा (2), चरण (2), monday (2), भेट (2), अहल्याने (2), त्रास (2), साठलेले (2), अश्रू (2), दुःखी (2), वेदवाणी (2), आश्रम (2), बाह्य (2), त्याचे (2), म्हणालो (2), वर्षांपासून (2), पाणी (2), शेतकरी (2), भेळ (2), टाका (2), भोगलिप्सा (2), अवश्य (2), जातात (2), बहुधा (2), अन्न (2), असते (2), पृथ्वी (2), आपल्यालाच (2), बटाटा (2), अधिकांश (2), वनस्पती (2), आम्हाला (2), विषाक्त (2), आवडतो (2), आमच्या (2), जिथे (2), यांनी (2), स्वरूपात (2), याचना (2), आजच्या (2), home (2), पडले (2), खरे (2), करण्यासाठी (2), वाक्य (2), कोदंडधारी (2), कित्येक (2), वात्रटिका (2), कळले (2), blogger (2), vivek (2), patait (2), पाण्यात (2), पुराण (2), ट्रफिक (2), विनाश (2), जाम (2), दुसरा (2), चालता (2), चालत (2), उन्हात (2), मानवाला (2), पक्षी (2), मुले (2), पशु (2), आधीच (2), करावे (2), माझा (2), धावत (2), कुणालाही (2), लघु (2), शक्य (2), मार्गावर (2), जातीला (2), posts (2), मार्ग (2), धंधा (2), मिळणे (2), अनुरूप (2), व्यक्ती (2), सरोवरात, नशीबी, सदैव, तत्पर, आयुष्य, अश्या, जन्म, दुःखच, भक्तवत्सल, प्रभू, रामाचे, अखेर, उपनिषदात, जगतो, श्रीरामचंद्र, शिणली, त्यात, उध्दार, मानवाच्या, आश्चर्य, बुडालेल्या, भोगलिप्सेत, होणारी, तृप्त, पाहिजे, ज्ञात, चक्रातून, मरणाच्या, भाकड, महा, घटना, गजेंद्रला, कुणाशीही, अद्वितीय, दाखवितात, स्त्रीला, प्राप्तीचा, परमार्थाच्या, भोगून, प्रत्यक्षात, एकमेव, बलशाली, पाहतो, धारणा, लोकांची, सुशिक्षित, प्राण्यांमध्ये, अशक्यच, भक्तांची, मगरपाश, मुक्ती, इतिहासातील, वंचित, हेतूने, बुद्धिमान, जलक्रीडा, श्री, मुनींनी, त्यांचे, दृश्य, पाहून, स्वर्गातील, मत्सर, देवतांनी, पुष्पवृष्टी, बुध्दीचा, शक्ती, जीवसृष्टी, घटकेला, सहित, रामांच्या, कृतीचे, समर्थन, मारून, रामायणात, जनावरांना, टाकलेला, केलेल्या, निर्मित, कळते, संपला, असेना, वासना, बलवती, सरोवरातील, पुसले, tuesday, मोहपाशातून, पाद्यपूजा, शेतीला, उत्पन्न, स्वागत, स्वतः, पाण्याने, श्रीरामांचे, कीटक, धुऊन, वस्त्राने, श्रीरामाच्या, होतेच, उदाहरण, सृष्टीचे, अहल्येला, त्याचेच, श्लोकात, अपरिमित, लक्ष्मणाने, भोगण्यासाठी, आपल्याच, प्रति, वाटते, नमस्कार, मगराने, परिवारासंगे, ऑफिस, देव, सर्वांच्या, सुरेंद्र, हाक, आर्त, आलेली, गजेन्द्रची, सोमवारी, मदतीची, तसा, स्मरण, बोर्डच, बाहेर, भक्ताभिमानी, वाचविण्यासाठी, लागलेला, ऑफिसमध्ये, थोडे, मारत, येतीलच, सांगायचे, राहिले, दिल्ली, जात, तुझ्याशी, बोलायचे, उतरली, जपतो, अडखळत, आर्थिक, वर्गातील, सर्वच, stories, तिच्यावर, लाईन, marathi, मारण्याचा, दाद, द्यायची, लक्ष, thursday, रघुवीर, तोच, ११८, बिकट, बिन, धांवता, सारखे, पाहताच, श्रीहरी, कारणे, कशी, तया, जीवदानी, जाहला, घातली, उडी, असा, स्वतःचा, क्रीडा, निशाने, पुढच्या, टाकू, बसला, उपटून, चौघ, एकमेकांना, चिकटून, मागच्या, सोंडेने, बसलो, वेळाने, वृक्षांना, हात, नाश्ता, भल्या, घेतला, जमिनीवर, ओढू, डोळ्यांत, स्पष्ट, रात्रीचे, घृणा, धरले, पाय, कल्पना, विचित्र, भगवंताच्या, कारच्या, थोडा, खरेतर, नव्हती, उपयोग, गोड, शब्द, शक्तींचा, तुडवू, सुखावलो, बोलावे, दुसरे, स्वतःच्या, पायावर, राहण्याची, औकात, मनाला, जाऊन, बेचैन, करणारी, शांतता, तेवढ्यात, मागून, आवाज, फायदा, थोड्यावेळ, मारल्यानंतर, सर्वांना, जवळ, पायदळी, सिंहलाही, करणार, मान, येईल, विशेष, नाहीच, सुख, बलात्कार, अहल्येलाच, राहू, बसता, अडकून, पाशात, भोगरुपी, असेच, आश्रमावर, टाकला, बदललेली, परमार्थ, स्त्रीवर, ग्रस्त, अत्याचार, स्त्रीलाच, दोष, उठता, व्याधीने, मानसिक, इंद्रासोबत, अहल्येलाही, शारीरिक, श्लोकाच्या, पत्नी, जेवता, कुणाला, जातीच, मुनीं, सोवत, योनीत, हीन, मिथिलेत, पोहोचले, मते, लक्षावधी, श्रीरामांना, वर्षे, ओसाड, अब्जावधी, निर्जन, इंद्राने, केल्याने, दिसले, श्रीरामाने, मनाच्या, विश्वामित्रांना, ब्रह्मचारी, काम, देवराज, याशिवाय, उद्भवत, प्रश्नच, होण्याचा, सिद्ध, मिळेल, रामायणातील, भटकावे, सौपा, पदी, लागतां, दिव्य, हें, होऊनी, नेमस्त, जना, भोगातून, मुक्तीचा, टक्के, सर्वात, उपाय, पुढें, १००, बाण, कधीही, भक्ताची, भक्तांच्या, नाव, काहीही, येत, कोणत्याही, विधि, काळाचेही, विधानाचे, लागत, मानी, देखतां, कथेत, खरोखर, मुक्तीसाठी, शोधण्याचा, अल्प, मिठीतून, माध्यमाने, बुध्दीने, होताच, भोगरूपी, रुपी, हाच, श्लोक, वाचतना, चरणाचा, सिणली, होतास, मूळ, संभव, समर्थांच्या, भावार्थ, येणारच, धनुष्य, दीनानाथ, भरारी, काळपोटीं, जया, वेळ, वर्णिता, लक्ष्मण, लागेल, आडवा, प्रतिष्ठीत, प्राप्त, याची, पावती, देणे, गरजेचे, हवेत, मर्यादा, यासाठीच, समाजातील, रसायन, वासनेची, वरिष्ठ, उदा, देण्याची, गावातील, सरपंच, इत्यादींना, उभोगाची, व्यक्तिला, एवढेच, जहर, जमिनीत, उत्तर, राबविण्यासाठी, ज्या, शांत, उडवा, जेवण, रोटी, प्रमाणे, मदतीला, ताठ, मार्गात, जगणे, स्मरणाने, कोणी, मोठा, शिक्षणासाठी, ब्रम्हचारी, येऊ, परमार्थाचा, लागले, यज्ञादी, गाव, एवढा, कार्य, सौप्या, शब्दांत, मानवाचा, खायचे, जातो, सुगम, कीटकांचा, करणे, करण्याची, पावतीच, व्यक्तीने, व्यक्तीशी, बेटीचा, मोक्ष, शकू, भक्तीत, हातभार, लागतात, भोगावे, लावू, आधार, दुष्कृत्यांचा, शोधला, पालटते, मानवीय, वेगाने, सृष्टी, दुःख, अति, वृत्ती, मरत, पीडा, युद्धात, तपस्वी, प्रभुरामचंद्रांच्या, विद्वानांचे, मानवापाशी, स्मरणात, दंग, बुद्धिमत्ता, चालण्याची, मातेच्या, वाचविण्यात, व्यवहार, अतिवृष्टी, नव्हे, मानवाची, व्यक्तीची, एवढे, एखाद्या, रोजचे, वाळवंटातील, दगडा, सारखीच, अहल्येची, अशीच, दुष्काळ, समर्थाने, दोहनामुळे, संबोधित, परमेश्वरापासून, बिघडले, वातावरण, पृथ्वीच्या, वॉर्मिग, चालून, ग्लोबल, दूषित, वायू, जीवनात, विनाशापासून, अहल्येने, परंपरा, awesome, करण्यास, post, विविध, 131, साहित्य, वैदिक, व्यंग, शतशब्द, featured, दहीवडे, उकडीचे, स्वास्थ्यवर्धक, लाग, करावाच, म्हण, प्राचीन, ठरतात, 137, profile, complete, view, आठवणीतून, 111, हित, इतिहास, ग्राहक, दुसऱ्यांचे, धार्मिक, पर्यावरण, पाककृती, पीएनामा, पहाटेचे, नाक्यावर, रस्त्यावर, गल्लीत, मुरमुरे, पोहे, केलेली, भूक, स्टेशन, बरोबरच, आल्या, पॅकट, भुजीयाचे, आलू, अड्यावर, पहा, दहीवड्याचे, होत्या, रविवारी, चोरोळ्या, साजण, परिस्, धर्ती, त्याच, लिहिल्या, हिंदीत, चारोळी, पहेलियाँ, मनोरंजक, विषया, साजन, खुसरो, अमीर, संवेदनशील, लेखन, आमचे, नंतर, कर्माचे, आपदांमुळे, शेतकऱ्याला, देतो, दगा, पाऊस, पेरणी, सारख्या, जाते, हातातून, गारपीट, कापणीच्या, राखतो, निगा, भूकंप, आपदा, पेरतो, गाझा, मृत्युमुखी, भोगावी, कृत्यांची, नसलेल्या, संबंध, आतंकवाद्यांची, इजराईल, कर्मावर, ढासळत्या, पर्वत, हॉटेल्स, राज्यात, हिमाचल, नुकतेच, फिरवितात, शेताची, शेतात, कर्माच्या, करणारा, राहतात, धंदे, आपापले, उद्योजक, तरीही, नौकरी, गीतेत, older, atom, subscribe, about, आवड, वाचनाची, श्रीमद्भगवत, तापांचा, बियाणे, करण्याचा, युद्ध, रक्षणासाठी, धर्म, धर्माचे, कर्तव्य, याचाही, पलायन, प्रभावामुळे, युद्धातून, अर्जुनाला, भगवंतांनी, समजविण्यासाठी, नसतो, आपला, फळांवर, चिरंजीव, संध्याकाळी, धन्दे, blog, ब्लॉग, हिंदी, pageviews, total, archive, लाल, 2022, 2021, 2020, 2019, तारखेला, रंगाच्या, 2018, शरीरा, यातना, मरण, थांबणे, जीवनाचा, प्रवाह, चालणे, झाल्यामुळे, एसी, ठिकाणी, ठीक, राजमार्गावर, हृदयाच्या, जाताना, कार्यालयात, मधून, 152, शिवाय, attribution, translate, license, international, noderivatives, noncommercial, commons, templates, creative, under, licensed, powered, theme, add, blogroll, 2017, 2016, 2015, 2014, 2013, 2012, 2011, पर्याय, चालण्याचा, शनिवारी, पडलेल्यानी, कोर्टात, आशेने, न्यायाच्या, कळवा, प्रतिक्रिया, वाचावा, प्रेमात, माणसांना, करण्या, marathis, www, http, चोरला, सरळ, सामान्य, देवतेच्या, प्रकाशित, किलोचे, पोटात, दिवशी, उपासाच्या, पुरतात, वर्षभर, करतेच, डोळ्यावर, गृहलक्ष्मी, आमची, महिन्यात, मार्च, देवता, बांधलेली, पट्टी, लोकांनी, २०१०, भेटले, पाहिले, हरवले, अंधारात, रात्रीच्या, होरपळे, कडक, दुपारच्या, कोवळ्या, उन्हाळ्याच्या, पहाटेच्या, राहणार, अनोखळी, सोयरे, सगे, वाटेत, दोन, सुट्टीत, दिनांक, मराठीसृष्टी, प्रथम, थालीपीठ, भाजणीचे, भाजणी, खायला, घरीच, महाग, भाज्या, उन्हाळ्यात, आवडते, चरायला, मुलांना, वाढत्या, लोकांचे, बुडाले, घायाळ, झाल्यावर, दारे, खिडक्या, धूप, शेवटी, फिरली, सर्वत्र, दरवळत, रूम, तासभर, किमान, सुगंध, धूपेचा, देवघरातील, दिव्या, धूर, भरून, पुटपुटण्याबाबत, ताडकन, आलेला, घाम, कपाळावर, कुडकुडत्या, दिल्लीच्या, उघडले, दचकलो, जाईल, शकलो, बोलू, राहिलो, बघत, भयंकर, जानेवारीच्या, जास्त, आठवत, याद, करते, देऊ, डोळ्यात, भाव, चेहऱ्यावरचे, असताना, म्हणत, त्यावर, नंबर, सांगून, तुझा, शेवटची, वर्षांपूर्वी, तीन, विचारपूस, तुझी, बरेच, inc, ऐसे, यादें, कोई, हमें, काश, ताजा, पुरानी, विसरु, लगता, बात, कारोनात, तुझ्यासमोर, उल्लेख, निशाचा, शकली, फुटपटलली, जेव्हाही, कहो, भाभीजी, रही, पीने, चहाचे, ११वी, झाल्या, गोष्टी, जगात, पाहत, माझ्याकडे, राहिली, लाए, बोर्डाचा, उलटलेली, मराठमोळ्या, डोळ्यांनी, पाणीदार, ठेंगणी, सुबक, सारखी, मुली, असली, रिझल्ट, पंजाबी, टेकून, कारला, शर्मा, गेलो, शाळेत, पाहण्यासाठी, दिसली, साठी, उशीच्या, पटकन, सहा, चार, भागात, मोटार, पाण्याची, उठली, वाजले, पर्यंत, पाच, साडे, बापरे, उचलला, मोबाईल, ठेवलेला, शेजारी, साडेसहा, साला, आम्हा, थांबलेली, समोर, पसरलो, सोफ्यावर, शिरलो, उतरलो, गाडीतून, घरासमोर, येथील, नगर, भंगली, तंद्रा, आवाजाने, तेरा, भेटायची, सांगितले, लागलेल्या, चॅरीटेबल, विचारला, याबाबत, यासाठी, रुपये, कोट्यवधी, हॉस्पिटल, वृध्दाश्रम, जमते, अनाथाश्रम, कॉलेजेस, स्मृतीत, वर्षांत, पुढील, कोणताही, कृपा, म्हटले, विकून, गुहेत, त्रिकालदर्शी, केल्या, स्वर्गीय, सेवा, करणाऱ्या, जमापूंजी, महाराजांनी, करतील, तुमच्या, आदेश, उभारण्याचा, कानमंत्र, कोणता, साध्य, दैवीय, ह्यालाच, बसले, दिसतात, फलेषु, कर्मण्येवाधिकारस्ते, श्रीमद्भगवद्गीतेत, अनेकदा, तात्पर्य, उदाहरणे, जिवलग, शेकडो, फेक्ट्री, दुकान, वर्षी, आगी, लावलेल्या, कुणी, कदाचन, मित्र, निराश, केल्यावर, प्रभावांमुळे, पडतो, प्रभाव, जगाचा, कर्मांवर, मिळतेच, नका, श्लोकावर, आहात, शोषण, श्रमिकांचे, म्हणतो, प्रेमाने, म्हणाला, टिप्पणी, ध्यानस्थ, स्वप्नाबाबत, च्या, कहाणीची, भंगलेल्या, अर्धवट, इरादा, तिचा, असेल, कदाचित्, झोप, मृत्यूनंतर, आठवण, मुलीची, नावाच्या, वर्ष, सुरुवात, येणार, उठले, बाबत, पाहिलेल्या, काल, बाब, सिरीयस, नकोस, फिरकी, फोन, जाणार, राहवले, उद्या, देणार, वचनांचे, दिलेल्या, वाटू, भिती, तब्बल, काहूर, वर्षाचे, मिळालेल्या, ईच्छा, तोटा, व्यापारात, समाजसेवेसाठी, भाग, फायद्याचा, व्यापारातून, समाजसेवा, त्यांची, असमय, वडिलांचा, मांडत, समस्या, दर्शनार्थ, युवा, असूनही, शकले, विचारांचे, शकतो, टंकताना, जेवल्यानंतर, दुपारी, wednesday, धर्मदेवला, स्वामीजी, समयी, कळत, हेच, कश्या, एवढ्या, दिले, वचन, करण्याचे, kavita,
Text of the page (random words):
नाम स्मरणाने परमार्थाचा मार्ग सहज सुगम होतो एवढेच नव्हे तर या मार्गावर चालून आपण समस्त मानव जातीला ही विनाशापासून वाचविण्यात हातभार लावू शकू माझ्या मते समर्थांनी मनाच्या या श्लोकाच्या माध्यमाने मानव जातीला हाच उपदेश केला आहे at february 22 2024 no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels वात्रटिका वार्तालाप monday february 5 2024 वार्तालाप ३० अहल्या शिळा राघवे मुक्त केली अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागतां दिव्य होऊनी गेली जया वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी समर्थ म्हणतात श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली हा श्लोक वाचतना अनेक प्रश्न मनात आले अहल्या खरोखर शिळा झाली होती का श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली हे कसे संभव आहे समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे महर्षि विश्वामित्र राम लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले श्रीरामाने महर्षि विश्वामित्रांना विचारले या आश्रमात ऋषी मुनी आचार्य ब्रह्मचारी इत्यादी कोणीच का दिसत नाही ऋषी विश्वामित्र म्हणाले हे आश्रम गौतम ऋषींचे आहे पूर्वी देवराज इंद्राने महर्षि गौतम ऋषींच्या पत्नी अहल्येवर बलात्कार केला होता अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले आणि गौतम ऋषींच्या आश्रमावर बहिष्कार टाकला आज ही परिस्थिती विशेष बदललेली नाही स्त्रीवर अत्याचार झाला तरी लोक स्त्रीलाच दोष देतात त्यावेळी ही समाजाने इंद्रासोबत अहल्येलाही दोषी ठरवले तिला वाळीत टाकले एकदा समाजाने ज्या व्यक्तीशी रोटी आणि बेटीचा व्यवहार बंद करून वाळीत टाकले की त्या व्यक्तीची स्थिती एखाद्या वाळवंटातील दगडा सारखीच होते अहल्येची स्थिती अशीच झाली होती म्हणून समर्थाने तिला शिळा असे संबोधित केले समाजाने बहिष्कृत केले तरी काय झाले परमेश्वरापासून तिला कोणीच दूर करू शकत नव्हता माता अहल्येने श्रीरामांच्या भक्तीत जगण्याचा आधार शोधला आपले दुःख आणि पीडा विसरून ती तपस्वी प्रभुरामचंद्रांच्या नाम स्मरणात दंग झाली असो समाजातील वरिष्ठ प्रतिष्ठीत लोकांना उदा गावातील सरपंच ते राजा इत्यादींना बहिष्कृत व्यक्तिला पुन्हा समाजात घेण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता पण निर्णय राबविण्यासाठी समाजाने त्या व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करून त्याला पुन्हा समाजाने स्वीकार केले याची पावती देणे ही गरजेचे बहुधा यासाठीच बहिष्कृत व्यक्तीने समाजाला किंवा गाव जेवण देण्याची परंपरा सुरू झाली सौप्या शब्दांत बहिष्कृत व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करणे म्हणजे समाजाने त्याला स्वीकार करण्याची पावतीच माता अहल्या निर्दोष आहे समाजाने तिच्या स्वीकार केला पाहिजे या हेतूने श्रीराम गौतम ऋषींच्या आश्रमात आले गौतम ऋषी आणि माता अहल्याने सर्वांची पाद्यपूजा करून स्वागत केले स्वतः माता अहल्याने पाण्याने श्रीरामांचे चरण धुऊन ते वस्त्राने पुसले श्रीरामाच्या चरणांचा स्पर्श अहल्येला झाला त्याचेच वर्णन समर्थांनी श्लोकात केले आहे श्रीराम आणि लक्ष्मणाने माता अहल्या आणि गौतम ऋषींचे चरण स्पर्श करून त्यांना नमस्कार केला श्रीराम महर्षि विश्वामित्र सहित अनेक ऋषी मुनींनी त्यांचे आतिथ्य स्वीकार केले ते दृश्य पाहून स्वर्गातील देवतांनी पुष्पवृष्टी करून श्री रामांच्या कृतीचे समर्थन केले असे वर्णन वाल्मिकी रामायणात आहे माता अहल्येवर समाजाने टाकलेला बहिष्कार संपला तिला पुन्हा समाजात मान ताठ करून जगणे शक्य झाले गौतम ऋषींच्या आश्रमात पुन्हा ऋषी मुनी आचार्य आणि शिक्षणासाठी ब्रम्हचारी येऊ लागले पूर्वी प्रमाणे आश्रमात यज्ञादी कार्य पुन्हा सुरू झाले असो अहल्या उध्दार ज्ञात इतिहासातील एकमेव अद्वितीय घटना आहे जिथे एक राजा एका पीडित निर्दोष स्त्रीला न्याय देण्यासाठी स्वयं तिच्या घरी गेला तिचे आतिथ्य स्वीकार केले समर्थ पुढे म्हणतात श्रीराम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही वंचित पीडित समाजाला न्याय देण्यासाठी श्रीरामचंद्र सदैव तत्पर असतात अश्या भक्तवत्सल प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी ही शिणली त्यात आश्चर्य काय at february 05 2024 no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels वार्तालाप tuesday january 2 2024 विचित्र स्वप्न स्वप्नात आली ती काही सत्य काही कल्पना रात्रीचे स्वप्न ११वी बोर्डाचा रिझल्ट लागला आणि तो पाहण्यासाठी मी शाळेत गेलो निशा शर्मा नितीनच्या कारला टेकून उभी होती पंजाबी असली तरी मराठमोळ्या मुली सारखी सडपातळ सुबक ठेंगणी होती तिचे मोठे पाणीदार डोळ्यांनी कुणालाही घायाळ करण्यास समर्थ होते वर्गातील सर्वच मुले तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असे पण ती कुणालाही दाद द्यायची नाही माझे लक्ष कधीच तिच्याकडे गेले नाही घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रेम बिन सारखे विचार कधीच मनात आले नाही मला पाहताच तिने हाय केले मीही तिला हाय करत विचारले निशा कशी आहेस नितीन दिसत नाही मार्कशीट घ्यायला गेला आहे का ती उतरली नितीन अशोक सुरेंद्र आणि मंजू ही आलेली आहे मार्कशीट इत्यादी सोमवारी मिळणार आहे तसा बोर्डच ऑफिस बाहेर लागलेला आहे मी मग ते कुठे आहेत ती म्हणाली ऑफिसमध्ये थोडे गप्पा मारत आहे आता येतीलच हो एक सांगायचे राहिले विवेक मी दिल्ली सोडून जात आहे पण मला तुझ्याशी काही बोलायचे आहे अडखळत ती कसेबसे म्हणाली विवेक तू मला आवडतो खरेतर तिचे ते गोड शब्द ऐकून मीही मनात सुखावलो होतो पण काय बोलावे कळले नाही एक तर घरची परिस्थिती आणि दुसरे त्यावेळी स्वतःच्या पायावर उभी राहण्याची औकात ही नव्हती मी काहीच बोललो नाही फक्त मनाला बेचैन करणारी शांतता तेवढ्यात मागून नितीनच्या आवाज आला विवेक तू पण आला आहेस काही फायदा नाही थोड्यावेळ गप्पा मारल्यानंतर मी सर्वांना म्हणालो माझे घर जवळ आहे घरी जाऊन थोडा चहा नाश्ता घेऊ काय माहित पुन्हा आपली कधी भेट होईल की नाही अशोक नितीन सोबत कारच्या पुढच्या सीटवर बसला आम्ही चौघ मंजू निशा अशोक आणि मी कसेबसे एकमेकांना चिकटून मागच्या सीटवर बसलो सडपातळ असल्याने निशा आणि मी मध्ये होतो गाडी सुरू झाली काही वेळाने निशाने माझा हात तिच्या हातात घेतला मी तिच्याकडे बघितले तिच्या मोठ्या डोळ्यांत साठलेले अश्रू मला स्पष्ट दिसत होते मी डोळे बंद केले साला सो गया क्या तेरा घर आ गया है नितीनच्या आवाजाने तंद्रा भंगली गाडी माझ्या उत्तम नगर येथील घरासमोर थांबलेली होती मी गाडीतून उतरलो घरात शिरलो आणि सोफ्यावर पसरलो समोर बघितले तर आम्हा सर्वांची साठी उलटलेली होती पण निशा काही दिसली नाही मी मंजुला विचारले निशा कुठे राहिली ती माझ्याकडे पाहत ती म्हणाली तुला माहित नाही निशा या जगात नाही मी काहीच बोललो नाही गप्पा गोष्टी सुरू झाल्या सौ चहा घेऊन आली चहाचे कप पहात मंजू म्हणाली भाभीजी से कहो एक कप चाय और लाए निशा को चाय पीने की इच्छा हो रही है मी दचकलो ताडकन डोळे उघडले दिल्लीच्या कुडकुडत्या थंडीत ही कपाळावर घाम आलेला होता अचानक सौ झोपेत फुटपटलली इथे काय करते आहे दूर हो काय झाले मी विचारले सौ ने उशीच्या शेजारी ठेवलेला मोबाईल उचलला बापरे साडे पाच वाजले सौ पटकन उठली तिने पाण्याची मोटार लावली आमच्या भागात पाणी सकाळी चार ते सहा साडेसहा पर्यंत येते सकाळी चहा पिता पिता मी तिला झोपेत पुटपुटण्याबाबत विचारले ती म्हणाली बहुतेक स्वप्न बघितले होते पण आता आठवत नाही आज सकाळी पूजा करताना तिने दिव्या सोबत धूपबत्ती ही लावली देवघरातील धूपेचा सुगंध किमान तासभर घरात दरवळत राहतो पण आज पूजा झाल्यावर धूपबत्ती घेऊन सौ घरात सर्वत्र फिरली आणि शेवटी धूपबत्ती बेडरूम मध्ये आणून ठेवली मी सौ ला विचारले धूप बेडरूम मध्ये का ठेवली आधीच खिडक्या दारे बंद आहेत धूर रूम मध्ये भरून जाईल ती म्हणाली बेडरूम मध्ये डास जास्त झाले आहेत म्हणून इथे आणून ठेवली जानेवारीच्या भयंकर थंडीत डास मी फक्त सौ कडे बघत राहिलो पण काहीच बोलू शकलो नाही आज राहवले नाही मंजुला फोन केला तिला निशा बाबत विचारले ती हसत म्हणाली क्या बात है विवेक लगता है पुरानी यादें ताजा हो गई है काश हमें भी कोई ऐसे याद करता मंजू फिरकी घेऊ नकोस सिरीयस बाब आहे काल रात्री पाहिलेल्या स्वप्नाबाबत मी तिला सांगितले ती म्हणाली विवेक निशा जेव्हाही मला भेटायची तुझी विचारपूस करायची तीन वर्षांपूर्वी शेवटची भेट झाली होती त्यावेळी मी तिला तुझा नंबर देऊ का विचारले त्यावर ती म्हणाली नको पण असे म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यात साठलेले अश्रू बरेच काही सांगून गेले बहुतेक ती तुला विसरु शकली नाही तुला त्रास होऊ नये म्हणून मी कधी ही निशाचा उल्लेख तुझ्यासमोर केला नाही कारोनात ती गेली आज दुपारी जेवल्यानंतर ही गोष्ट टंकताना मनात विचारांचे काहूर उठले शाळा सोडून तब्बल ४६ वर्ष झाले निशा नावाच्या मुलीची मला कधीच आठवण आली नाही अचानक ती तिच्या मृत्यूनंतर माझ्या स्वप्नात येते कदाचित् ती सौ च्या स्वप्नात ही आली असेल तिचा इरादा अर्धवट भंगलेल्या कहाणीची पुन्हा सुरुवात करायची तर नाही ना आज रात्री मला झोप येणार का ती आपल्या सोबत तर घेऊन नाही ना जाणार भिती वाटू लागली आहे मनात विचार आला सौ ला दिलेल्या वचनांचे काय होईल सौ असे होऊ देणार नाही उद्या काय होईल at january 02 2024 no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels कथा गोष्ट कविता wednesday december 27 2023 इच्छापूर्ती स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने ईच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही स्वामीजी धर्मदेव कडे पहात हसत हसत म्हणाले त्यांच्या सर्व इच्छा तू सहज पूर्ण करू शकतो स्वामीजींनी धर्मदेवला एक कान मंत्र दिला पुढील २० वर्षांत धर्मदेव यांनी वडिलांच्या स्मृतीत अनेक शाळा कॉलेजेस अनाथाश्रम वृध्दाश्रम बांधले एक मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल ही बांधले कोट्यवधी रुपये दरवर्षी ते यासाठी खर्च करतात एकदा एका पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला तुम्ही कोणताही व्यापार धंधा उद्योग करत नाही मग हे सर्व तुम्हाला कसे काय जमते धर्मदेव म्हणाले ही सर्व भगवंताची कृपा आहे स्वामी महाराजांनी मला कान मंत्र दिला आणि हे सर्व साध्य झाले पत्रकाराने विचारले स्वामीजींनी तुम्हाला कोणता कानमंत्र दिला होता स्वामीजींनी मला भगवंताचे भव्य मंदिर उभारण्याचा आदेश दिला आणि म्हणाले भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आपली सर्व जमापूंजी आणि व्यापार विकून मी इच्छापूर्ती करणाऱ्या भगवंताचे भव्य मंदिर बांधले मी भगवंताची सेवा करतो आणि भगवंताने माझ्या स्वर्गीय वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या at december 27 2023 no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels कथा गोष्ट कविता monday december 4 2023 वार्तालाप कर्माची फळे का मिळत नाही श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला तुम्ही मनुवादी लोक तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो श्रमिकांचे शोषण करीत आला आहात आम्हाला म्हणतात कर्म करा पण फळ मागू नका का मागू नये आम्ही कर्माची फळे मी त्याला म्हणालो कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही आपण दुःखी आणि निराश होतो ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो शेताची उत्तम निगा राखतो उत्तम पीक ही येते पण पीक कापणीच्या पूर्वी अचानक वादळ वारे येतात गारपीट होते आणि सर्व पीक हातातून जाते कधी पेरणी नंतर पाऊस दगा देतो शेतकऱ्याला दैवी आपदांमुळे कर्माचे फळ मिळत नाही वादळ वारे भूकंप सारख्या दैवी आपदा आपल्या कर्मावर पाणी फिरवितात नुकतेच हिमाचल राज्यात हजारो घरे हॉटेल्स शेती पर्वत ढासळत्या मुळे नष्ट झाली इजराईल आणि गाझा मध्ये ही आतंकवाद्यांची संबंध नसलेल्या हजारो लोकांना त्यांच्या आसुरी कृत्यांची फळे भोगावी लागली हजारो मृत्युमुखी पडले हजारो लोकांचे उद्योग धन्दे बुडाले घरे नष्ट झाली अचानक लागलेल्या किंवा कुणी लावलेल्या आगी दर वर्षी हजारो घर दुकान फेक्ट्री नष्ट करतात असे शेकडो उदाहरणे आपल्याला नेहमीच दिसतात तात्पर्य उत्तम कर्म केले तरी त्या कर्माची अनुरूप फळे अनेकदा मिळत नाही श्रीमद्भगवत गीतेत बहुतेक आधिभौतिक तापांचा प्रभावामुळे कर्म फळांवर आपला अधिकार नसतो हे समजविण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला या श्लोकाचा उपदेश दिला तू क्षत्रिय आहे युद्धातून पलायन करण्याचा विचार करू नको परिणाम काय होईल याचाही विचार करू नको फक्त तू आपले कर्तव्य कर क्षत्रिय धर्माचे पालन कर धर्म रक्षणासाठी युद्ध कर शेती असो उद्योग धंधा असो व्यापार असो किंवा नौकरी नेहमीच कर्माच्या अनुरूप फळे मिळणे शक्य नाही तरीही शेतकरी हजारो वर्षांपासून सतत शेती करतो उद्योजक आणि व्यापारी आपापले धंदे करत राहतात चाकरी करणारा चाकरी करत राहतो असो at december 04 2023 no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest older posts home subscribe to posts atom about me vivek patait संवेदनशील मन लेखन व वाचनाची आवड view my complete profile labels आठवणीतून 8 कथा गोष्ट 111 कविता 137 ग्राहक हित 2 दुसऱ्यांचे लेख 1 धार्मिक 24 पर्यावरण लेख कविता 46 पाककृती 30 पीएनामा 4 प्राचीन इतिहास 3 लघु कथा 5 लघु कथा 22 वात्रटिका 89 वार्तालाप 31 विविध लेख 131 वैदिक साहित्य 6 व्यंग 9 शतशब्द कथा 10 featured post स्वास्थ्यवर्धक उकडीचे दहीवडे गेल्या रविवारी पहाटे पहाटे दहीवड्याचे स्वप्न पडले पहाटेचे स्वप्न खरे ठरतात हि म्हण आहे पण स्वप्न खरे करण्यासाठी प्रयत्न हा करावाच लाग home साजण काही चोरोळ्या हिंदीत अमीर खुसरो यांनी साजन या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या त्याच धर्ती वर आजच्या परिस् कचरा कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे मी केलेली पोहे मुरमुरे भेळ शनिवारी संध्याकाळी आमचे चिरंजीव घरात आले त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते आल्या बरोबरच आई भूक लागली आहे भेळ करून द बटाटा चिप्स मार्च महिन्यात आमची गृहलक्ष्मी ५ ७ किलोचे बटाटा चिप्स करतेच हे चिप्स बहुतेक वर्षभर पुरतात अधिकांश चिप्स उपासाच्या दिवशी पोटात जातात न्याय देवता न्यायाच्या आशेने लोक कोर्टात जातात सामान्य माणसांना बहुधा तिथे न्याय मिळत नाही कारण न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते न्याय प्रेम म्हणजे काय प्रेम करण्या पूर्वी किंवा प्रेमात पडलेल्यानी हा लेख अवश्य वाचावा आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा माझा हा लेख प्रथम मराठीसृष्टी वर दिनांक १३ ७ २०१० ला प्रकाशित केला होता कित्येक लोकांनी हा लेख सरळ चोरला होता http www marathis भाजणी आणि भाजणीचे थालीपीठ उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले घरीच असतात वाढत्या मुलांना सतत काही न काही चरायला आवडते उन्हाळ्यात आधीच भाज्या महाग खायला काय करावे हा ह स्वप्न दोन कविता 1 पहाटेच्या कोवळ्या उन्हात पाहिले एक स्वप्न दुपारच्या कडक उन्हात होरपळे एक स्वप्न रात्रीच्या अंधारात हरवले एक स्वप्न 2 पहाटे चालत राहणार चालणे प्रवाह जीवनाचा थांबणे मरण यातना पर्याय नाही दुसरा शिवाय चालण्याचा चालता चालता भेटले वाटेत जे सगे सोयरे अनोखळी वाट ट्रफिक जाम गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस एसी बस मधून कार्यालयात जाताना कळले हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीरा हिंदी ब्लॉग विवेक पटाईत total pageviews blog archive 2024 3 february 2 वार्तालाप ३१ गजेंद्रू महासंकटि वाट पाहे वार्तालाप ३० अहल्या शिळा राघवे मुक्त केली january 1 2023 48 december 2 november 2 october 3 september 2 august 7 july 9 june 2 may 3 april 4 march 6 february 4 january 4 2022 21 november 2 august 4 july 2 june 5 may 3 april 2 february 1 january 2 2021 24 december 5 november 2 october 1 september 2 august 4 july 6 june 1 may 1 january 2 2020 32 december 1 november 1 august 1 july 5 june 6 may 5 april 2 march 7 february 4 2019 47 november 6 october 2 august 3 july 8 june 4 may 6 april 7 march 1 february 4 january 6 2018 152 december 6 november 15 october 12 september 10 august 18 july 20 june 12 may 12 april 12 march 14 february 5 january 16 2017 9 september 3 august 4 july 1 june 1 2016 77 december 7 november 3 october 6 september 5 august 9 july 7 june 7 may 10 april 8 march 5 february 5 january 5 2015 69 december 3 november 2 october 6 september 5 august 8 july 8 june 7 may 9 april 5 march 5 february 8 january 3 2014 71 december 7 november 6 october 6 september 7 august 9 july 6 june 5 may 6 april 4 march 9 february 2 january 4 2013 30 december 5 november 1 october 1 september 4 august 5 july 2 june 4 may 2 april 2 march 3 february 1 2012 41 december 1 november 3 october 3 september 3 august 4 july 4 june 3 may 3 april 4 march 4 february 6 january 3 2011 42 december 4 november 3 october 10 september 3 august 1 july 4 june 5 may 4 april 2 march 6 blogroll blogge...
|