Meta tags:
description= वाचाल तर ऑनलाईन ट्रेकींग कराल.. !;
Headings (most frequently used words):
पोस्टचे, नॅव्हिगेशन, किल्ला, वाचाल, तर, ऑनलाईन, ट्रेकींग, कराल, blog, yorocks, साद, गिरनारची, सोमनाथ, गीर, अभयारण्य, उपरकोट, जुनागढ, गुरुशिखर, धोदणी, मार्गे, माथेरान, पेब, आणि, बरचं, काही, चलो, हरिहर, फक्त, ट्रेकींगच्या, गोष्टी, वृत्तांत, भटकंतीचा, follow, via, email, stats,
Text of the page (most frequently used words):
आता (84), आम्ही (81), होती (55), होता (51), त्या (50), अगदी (49), होते (46), नाही (43), वाट (40), होतो (40), पुढे (35), आहे (31), होत (31), काही (28), एका (28), आणि (27), सुरु (26), पुन्हा (25), दोन (25), ट्रेक (24), म्हणून (24), च्या (22), काय (22), #किल्ला (21), फक्त (21), वगैरे (20), तरी (20), वेळ (20), म्हटलं (20), तेव्हा (19), आमच्या (19), पेब (17), गाडी (17), मागे (17), करुन (16), एसटी (16), घेत (16), आमची (16), म्हणजे (15), आलो (15), करत (15), गेलो (15), घेऊन (15), मंदिर (15), हरिहर (14), माथेरान (14), झाला (14), करून (14), आला (14), घेतले (14), मात्र (14), नव्हता (14), कारण (14), डोंगर (14), सुरू (14), सोमनाथ (13), झाली (13), आम्हाला (13), बाहेर (13), मस्त (13), मध्ये (13), भाग (12), म्हणत (12), अशी (12), पायर् (12), ग्रुप (12), नव्हती (12), आले (12), आहेत (12), इथे (12), रोमा (12), जात (12), पाऊस (12), गेले (11), त्यात (11), ट्रेन (11), आली (11), चढून (11), असलेल्या (11), खाली (11), गिरनार (11), राजकोट (11), टप्पा (10), गर्दी (10), झालेला (10), समोर (10), असेल (10), उतरायला (10), परिसर (10), इथवर (10), एव्हाना (10), तिथे (10), पार (10), पोहोचलो (10), अंदाज (10), एकदम (10), पायऱ्या (10), दर्शन (9), अश्या (9), त्यांना (9), तास (9), झालो (9), बघत (9), सुमारास (9), वाटलं (9), गेली (9), तीन (9), खूप (9), शेवटी (9), सरळ (9), देत (9), विजू (9), असा (8), प्रवास (8), होतं (8), इथेच (8), आलेले (8), कळले (8), जल्ला (8), पर्वत (8), नव्हते (8), गेला (8), लागले (8), बाजूला (8), ह्या (8), होणार (8), येउन (8), आमचा (8), लक्ष (8), झाले (8), जेवण (8), हर्षु (8), डोंगरावर (7), मार्ग (7), असे (7), जाऊ (7), जाणारी (7), लागली (7), पटापट (7), मुख्य (7), बाजूस (7), असलेला (7), बघून (7), घेतला (7), पाणी (7), वरती (7), बर् (7), त्याला (7), दिसत (7), दिशेने (7), होउन (7), सॅक (7), अजून (7), त्याने (7), जाऊन (7), बाकी (7), चिंब (7), वाटचाल (7), केली (7), शिडी (6), सुंदर (6), राजगड (6), अंतिम (6), अनुभव (6), तसा (6), अजुन (6), अचानक (6), इतका (6), कसारा (6), आलेलो (6), अंधार (6), पडला (6), तोच (6), झालेली (6), थेट (6), हाताशी (6), याच (6), दिसले (6), येण्यास (6), नजरेस (6), यापैंकी (6), हाच (6), जागा (6), आधीच (6), इकडून (6), पडलो (6), चढत (6), उतरलो (6), आमचे (6), सकाळी (6), इकडे (6), तिकडे (6), रोमाला (6), किती (6), जवळ (6), वाटेने (6), लागला (6), वाटत (6), पडत (6), बाजूने (6), देखील (6), हॉटेल (6), जाते (6), काम (6), उत्तम (6), ड्रायवर (6), वारा (6), नाव (5), तोरणा (5), चलो (5), मार्गे (5), बरेच (5), ठळक (5), पहाटे (5), म्हणुन (5), म्हटले (5), घेउन (5), तिथून (5), म्हटल (5), अवघड (5), पाहिले (5), सगळे (5), मला (5), जाण्यास (5), नव्हतो (5), असलेली (5), छोट्या (5), फार (5), निघालो (5), सरकलो (5), होत्या (5), वळून (5), लागलो (5), दरीत (5), कमी (5), असते (5), झालं (5), करायला (5), सोबतीला (5), मनात (5), आलं (5), इति (5), बघता (5), उशीर (5), बसल्या (5), दिसला (5), बंद (5), विनायक (5), जिथे (5), वातावरण (5), अंतर (5), देऊन (5), त्यांची (5), जवळपास (5), कधी (5), आमचं (5), निसर्ग (5), आस्वाद (5), अंतरावर (5), दोन्ही (5), पाण्याचा (5), जंगल (5), खरच (5), अमित (5), अम्या (5), मंदिराच्या (5), प्लॅन (5), बुकिंग (5), this (4), yorocks (4), blog (4), email (4), जातो (4), घाट (4), धबधबा (4), मोहीम (4), फत्ते (4), दरी (4), वासोटा (4), किल्ले (4), पावसाळी (4), वाटेवर (4), उपरकोट (4), जुनागढ (4), गुरुशिखर (4), खरी (4), दिवस (4), वर्षे (4), करायचा (4), इगतपुरी (4), केला (4), थोड (4), सगळा (4), मिळाली (4), त्र्यंबक (4), चार (4), बसलो (4), जवळच (4), आलेला (4), उतरुन (4), मारत (4), उत्सुक (4), दुसर् (4), झालेल्या (4), लागल्या (4), दिली (4), रोमाने (4), गडाच्या (4), उजव्या (4), गडावर (4), येणारे (4), पठारावर (4), उतरताना (4), चढताना (4), सगळ (4), कातळटप्पा (4), केलेल्या (4), म्हणतात (4), प्रत्येक (4), वार् (4), इथून (4), लागतो (4), छोटा (4), काढत (4), वाटा (4), घ्यायचा (4), नव्हतं (4), तुम्हाला (4), वाटेला (4), असणारी (4), सोडून (4), हजर (4), रात्री (4), थंड (4), पब्लिक (4), लक्षात (4), कामावर (4), गेलेलो (4), ओल्या (4), कपडे (4), बैल (4), अंगावर (4), फिरून (4), सवंगडी (4), किल्ल्याच्या (4), पावसात (4), होऊन (4), मोबाईल (4), उतरत (4), रोमाच्या (4), त्रास (4), घेता (4), असो (4), लागेल (4), जास्त (4), अंतरावरच (4), येणार् (4), शुभ्र (4), डोंगराच्या (4), जोरकस (4), बिलगून (4), माथेरानचा (4), दस्तुरी (4), दृश्य (4), शक्य (4), बाप्पा (4), चालत (4), दिसू (4), पक्षी (4), पावसाच्या (4), समोरच (4), असलेले (4), कोणी (4), धोदाणे (4), चहा (4), गेलेली (4), जागेत (4), चाल (4), पनवेल (4), लगबगीने (4), असल्यामुळे (4), करणारे (4), सोय (4), परिसरात (4), येऊन (4), मार्च (4), wordpress (3), com (3), घ्या (3), posts (3), चांदवड (3), मुलखात (3), सह्यमेळावा (3), धोदणी (3), साद (3), वाचाल (3), ऑनलाईन (3), ट्रेकींग (3), कराल (3), trek (3), easy (3), posted (3), आपले (3), किल्ल्यावर (3), थोडी (3), जाण (3), प्रवासाचा (3), रेल्वे (3), अन्यथा (3), असली (3), असतो (3), तिकीट (3), घोटी (3), येइल (3), पेटपुजा (3), विचार (3), स्टँडवर (3), वाजले (3), प्रश्ण (3), वाहन (3), यांना (3), गाडीत (3), पुढच्या (3), सांगितलेले (3), वेगाने (3), अपेक्षेप्रमाणे (3), एकदा (3), परत (3), हळुहळू (3), स्मिता (3), असल्याने (3), पडले (3), सेल्फी (3), शिवाय (3), इतकी (3), वर्दळ (3), यायला (3), भक्कम (3), दिसतो (3), मंदीर (3), सहा (3), सात (3), मॅगी (3), दिड (3), आटपून (3), बायको (3), असणार् (3), किल्ल्याचा (3), एकंदर (3), असुनही (3), मागच्या (3), बघू (3), पाहून (3), गणपती (3), वळण (3), कोरलेल्या (3), जेमतेम (3), ज्या (3), चालू (3), येइपर्यंत (3), थोडा (3), खास (3), उभ्या (3), थांबत (3), याची (3), जीव (3), उठून (3), तिघच (3), चला (3), सांगून (3), बडबड (3), डाव्या (3), उभा (3), थरारक (3), चढाई (3), कधीच (3), समजून (3), कार्यक्रम (3), माहिती (3), अगदीच (3), जाणवत (3), आलेल्या (3), शेवटच्या (3), क्षणाला (3), करु (3), गप्पा (3), अडीच (3), कधीतरी (3), मजा (3), त्यासाठी (3), धावपळ (3), नसल्यामुळे (3), जाउन (3), चांगलाच (3), बरच (3), उद्दिष्ट (3), येणारा (3), जाणाऱ्या (3), लवकरच (3), रिक्षा (3), पहिल्यांदाच (3), गोंधळ (3), एकत्र (3), संधी (3), जाणार (3), बसलेलो (3), झाल्या (3), कसा (3), असताना (3), येतो (3), ढगांनी (3), अंधारुन (3), धुमशान (3), टॉर्च (3), जंगलातून (3), असत (3), अंधारात (3), पुढची (3), वाटेचा (3), बस्स (3), टाकला (3), सर्व (3), होइल (3), तसच (3), उत्सुकता (3), हंडी (3), कचरा (3), त्याच्या (3), दाखवत (3), घेतली (3), फोटो (3), समाधान (3), शांत (3), कुठे (3), वातावरणात (3), माथ्यावर (3), बांधलेल्या (3), अरुंद (3), दूर (3), ऐकून (3), ढगांचा (3), ठरलेलं (3), तुम्ही (3), येताना (3), सनसेट (3), बरीच (3), डोंगररांगेवर (3), त्यातच (3), मोठी (3), पावसाची (3), मार्केट (3), गोल (3), आवाज (3), दिला (3), ट्रेकचा (3), जोडपं (3), नसेल (3), चाहूल (3), झाडाखाली (3), टपरीवर (3), एकीकडे (3), खळखळाट (3), डोंगररांग (3), सभोवताली (3), ढगांचे (3), वारे (3), करताना (3), पाहिलं (3), असणारा (3), आराम (3), बऱ्यापैकी (3), नव्या (3), केलेला (3), दिवसाच्या (3), लागतात (3), म्हणाले (3), वाढत (3), अंजली (3), गप्पाटप्पा (3), तिच्या (3), येईपर्यंत (3), येईल (3), डोली (3), केलं (3), दुसऱ्या (3), पडलेले (3), सांगितले (3), पायऱ्यांची (3), खाऊन (3), दुकान (3), करणारी (3), एवढा (3), गोरखनाथ (3), शिखरावर (3), चोहुबाजूंनी (3), केलेलं (3), वेधून (3), आल्याची (3), ठरले (3), तत्पूर्वी (3), लाईट्स (3), साठी (3), विहीर (3), सफारी (3), गिर (3), परिसरातील (3), आरबीआय (3), विमानाने (3), एअरपोर्ट (3), करूया (2), site (2), required (2), करा (2), join (2), other (2), subscribers (2), address (2), follow (2), कलावंतीण (2), ट्रेकची (2), हरिश्चंद्रगड (2), कुस्ती (2), अलंग (2), मदन (2), संगे (2), उन्हाळी (2), कमाल (2), दोघांची (2), नागेश्वरः (2), रतनगड (2), गोष्ट (2), माकडाची (2), भटकंतीचा (2), शिवथरघळ (2), नजारा (2), पाबरा (2), केळवे (2), पालघर (2), माझे (2), पद्मदुर्ग (2), बरचं (2), गिरनारची (2), गीर (2), अभयारण्य (2), शोधा (2), गोष्टी (2), older (2), पोस्टचे (2), नॅव्हिगेशन (2), हवा (2), ट्रेकला (2), उशीराने (2), सुरवात (2), चुल (2), पेटवून (2), आमच्यासाठी (2), एखादा (2), होणारा (2), आनंद (2), औरच (2), शेवटचा (2), मुंबई (2), वर्षांनी (2), हायवे (2), स्टँडला (2), आश्चर्य (2), पुढचा (2), मिनिटांनी (2), झाल (2), जीप (2), एसटीच (2), बसायला (2), सीट (2), येणारी (2), उशीरा (2), घोटीला (2), जाणार् (2), पहायची (2), तिघ (2), रांग (2), हुकली (2), करायचे (2), गावकर् (2), वीसेक (2), प्रवासात (2), शरीर (2), गेलं (2), खरे (2), चप्पल (2), मातीच्या (2), विश्वास (2), गमावला (2), माणूस (2), ट्रेकच (2), साहाजिकच (2), नशिबाने (2), समोरुन (2), थांबलेला (2), पथ्यावर (2), शेंदुर (2), फासलेला (2), समजुन (2), तासभर (2), मोठे (2), बहुतेक (2), जवळच्या (2), उंच (2), अवशेष (2), खिडकी (2), सुद्धा (2), आपली (2), ब्रम्हगिरी (2), डोंगराला (2), भंडारदुर्ग (2), वर्षापुर्वी (2), आठवण (2), तब्बल (2), भेट (2), तळ्याकाठी (2), यात (2), दोघांनी (2), त्यामुळे (2), महत्वाचा (2), थांबली (2), मंदीराच्या (2), पाण्याच (2), टाक (2), पुढच (2), घिरट्या (2), इतक्या (2), दिल (2), हुआ (2), माझी (2), तिने (2), खोल (2), जातील (2), कातळात (2), सलाम (2), कुणाला (2), बांधकाम (2), सोप्पा (2), आकर्षण (2), अंदाजे (2), चढता (2), माहित (2), जाताना (2), फणीचा (2), चाललेली (2), एकदाचे (2), पसारा (2), नाकासमोर (2), डावीकडच्या (2), कातकरी (2), निरोप (2), घ्यायला (2), जाणारे (2), तिचा (2), नवरा (2), भेटले (2), शोधत (2), तेच (2), पाहिजे (2), हात (2), घातला (2), करणार् (2), म्हणूनदेखील (2), धावत (2), मोकळ्या (2), वळालो (2), तिथल्या (2), साडे (2), वाजता (2), मोठा (2), सगळंच (2), प्रायवेट (2), करण्याचा (2), झोपुन (2), दिले (2), रात्रीचे (2), वाटून (2), पाच (2), सकाळच्या (2), थंडीचा (2), गारवा (2), ठरवलेले (2), रेल्वेस्थानकावर (2), हवेचे (2), ठिकाण (2), महिना (2), मेल (2), गेल्या (2), देणे (2), आपला (2), घालत (2), मागून (2), जणांचा (2), येते (2), चांगले (2), ठाण्याला (2), डबा (2), उभे (2), डोळा (2), करण्याची (2), वेळेच (2), नये (2), चांगलीच (2), अधुन (2), मधून (2), अशीच (2), मित्र (2), माझं (2), म्हणाल (2), आधी (2), रोमाचा (2), येणार (2), करता (2), प्रतिक्रिया (2), आरामशीर (2), भटकंती (2), धुकं (2), पल्ला (2), निसर्गाच्या (2), कसलेही (2), भटकायला (2), असं (2), पट्टी (2), पॉईंट (2), येऊ (2), नेरळ (2), वीस (2), अवस्था (2), कपडयातच (2), काढून (2), फलाटावर (2), पिकनिक (2), खरं (2), घरी (2), आम्हा (2), मिळाले (2), विनायकला (2), तसेच (2), सुरूच (2), विचारले (2), तिकडेच (2), मारक्या (2), गेलात (2), नाहीतर (2), प्रकाशात (2), वाजून (2), मुक्काम (2), काहीच (2), साथ (2), गावात (2), खूपच (2), जाणवू (2), नसलेला (2), झाडी (2), आमच (2), चांगल (2), सोडला (2), नादी (2), असणार (2), सरकत (2), ओसंडून (2), ओलांडून (2), अखेरीस (2), त्याच (2), गरजेच (2), लावून (2), आलेलं (2), ह्याच (2), फायदा (2), लाखोली (2), पेबचा (2), अडचण (2), टेंशन (2), घोडदौड (2), थोडस (2), दिसणारा (2), होतेच (2), ओले (2), उतरणार (2), पश्चिम (2), मस्तच (2), नजारे (2), हिरवी (2), महत्व (2), वाजुन (2), चक्क (2), पलिकडे (2), उतरण (2), अधुनमधून (2), पंचाईत (2), म्हणजेच (2), केलेली (2), धबधब्याच्या (2), वाया (2), देव (2), अधिक (2), बेभान (2), आम्हीदेखील (2), अंधारून (2), कड्याला (2), यांचा (2), विचारत (2), ढगांना (2), वाऱ्याच्या (2), नव्याने (2), कळस (2), अप्रतिम (2), उधाण (2), नजर (2), ठेवून (2), उघडीप (2), असच (2), भासत (2), नतमस्तक (2), केले (2), मागेच (2), स्पष्ट (2), प्रसिद्ध (2), कड्यावरचा (2), आजूबाजूच्या (2), दिसणाऱ्या (2), ढगांच्या (2), फटीतून (2), गर्द (2), रंगाचे (2), योगायोग (2), कदाचित (2), सफर (2), बाजूच्या (2), घनदाट (2), आजारी (2), दिलेला (2), गेल्यावर (2), ट्रेनच्या (2), अमन (2), लॉज (2), वाटेत (2), पावलं (2), मघाशी (2), प्रभाव (2), एखादी (2), नेणार (2), ऐकू (2), शर्यत (2), ठेवला (2), रस्ता (2), रविवार (2), ढेकर (2), भारी (2), पडेल (2), एकतर (2), गाठीशी (2), चालायला (2), लागणारे (2), जायचं (2), होतीच (2), म्हणता (2), याच्या (2), तालावर (2), मका (2), बाजुला (2), दुसरीकडे (2), उद्गार (2), मध्येच (2), व्वा (2), चालताना (2), थोडं (2), जायच (2), निकॉन (2), ठाऊक (2), छोटी (2), मोकळा (2), वामकुक्षी (2), नक्कीच (2), असती (2), शिळ (2), ऐकलेली (2), आताही (2), ढगाच्या (2), धुक्यात (2), मंद (2), ऐकत (2), रमत (2), गमत (2), सहजसोप्पी (2), धरणाच्या (2), एकच (2), तोंडावर (2), नाश्तापाणी (2), लागलं (2), त्याची (2), जाण्याचा (2), योग (2), पर्यंत (2), गाडीने (2), जाणे (2), उंचीवर (2), हिरवे (2), सोयीस्कर (2), स्थान (2), घरात (2), आवाहन (2), झाडं (2), वाहत्या (2), पोहोचली (2), नको (2), बातम्या (2), आवश्यक (2), सगळं (2), रात्रीच (2), जायचे (2), पडलेलो (2), सरी (2), नभातून (2), बरसू (2), तयार (2), जणू (2), घेण्यासाठी (2), प्लॅटफॉर्म (2), मिनिटं (2), प्रश्न (2), पाहता (2), प्रसाद (2), अन्नछत्र (2), शिस्त (2), एवढ्या (2), चवदार (2), कमिटमेंट (2), जोडी (2), मंदिराजवळ (2), कसोटी (2), राहत (2), हळूहळू (2), दोनेक (2), त्रिकुट (2), ठरलं (2), विचारून (2), म्हणाली (2), कळलं (2), त्यांचे (2), पायरीवर (2), गेलेले (2), विजूला (2), मामा (2), आपण (2), असल्या (2), हर्षुला (2), तिला (2), लवकर (2), आगरी (2), बाणा (2), निघालेली (2), झाल्याने (2), करताच (2), कमानी (2), आपसूकच (2), अंजु (2), लढा (2), वापर (2), वाढलेली (2), कान (2), काका (2), विचारपूस (2), ग्रेट (2), उरकून (2), तिकडून (2), गरम (2), वाराच (2), पुढील (2), शिखर (2), पहिल्या (2), आतापर्यंत (2), उसंत (2), क्या (2), बात (2), हेच (2), ब्रेक (2), याचा (2), येईस्तोवर (2), आसमंतची (2), पूर्वकिनार (2), तांबडा (2), तपकिरी (2), रंगांच्या (2), छटांनी (2), उजाळून (2), पिसाळल्यागत (2), घोंघावत (2), उजडणाऱ्या (2), स्वागताची (2), जय्यत (2), तयारी (2), प्रभात (2), कल्लोळात (2), नजरेसोमरील (2), स्थितप्रज्ञ (2), शिखरे (2), एकमेकांना (2), उभी (2), शिखरं (2), शिखरांच्या (2), माथ्यावरील (2), घुमट्या (2), ह्यांच्या (2), आकृत्या (2), क्षणीच (2), काळजात (2), वेगळाच (2), हुरूप (2), मिळाला (2), वेगळ्याच (2), जगात (2), अनुभती (2), साजेशी (2), वेगळेच (2), नावाच्या (2), संध्याकाळी (2), हॉटेलात (2), मिळतात (2), परतलो (2), मिनिटांच्या (2), खाऊ (2), सामान (2), हॉटेलच्या (2), चढण्यास (2), थोडाफार (2), साथीला (2), हर्षुचा (2), तोफा (2), अस्मादिक (2), आतमध्ये (2), बौद्धकालीन (2), लेणी (2), माझ्या (2), काळात (2), खोदलेली (2), राजकोटी (2), गाडीचालकाने (2), नेमकं (2), तेथील (2), जिप्सी (2), छान (2), लेन्स (2), कॅमेरा (2), आखून (2), सिंह (2), हरीण (2), सावलीत (2), लावलेल्या (2), गाईड (2), भल्ल (2), श्रीकृष्ण (2), त्रिवेणी (2), संगम (2), मंदिरात (2), प्रवेश (2), लेजर (2), रोषणाई (2), जेवणाची (2), ट्रस्ट (2), पुण्यात (2), सुट्टी (2), ऑडिट (2), नक्की (2), वाले (2), पहिलीच (2), निघालेले (2), चोची (2), फोन (2), पिकअप (2), स्थानक (2), नाश्ता (2), स्थानकात (2), अथांग (2), समुद्र (2), design, like, with, वेबसाईट, ईमेल, write, comment, loading, comments, collapse, bar, report, content, लॉग, साइन, manage, subscriptions, view, reader, गोपनियता, have, account, log, now, sign, subscribed, देणगी, सबस्क्राइब, create, free, website, 781, hits, stats, पाठलाग, enter, your, and, receive, notifications, new, via, रायगडावरी, कनकेश्वर, कोर्लाईचा, सप्तशृंगी, भिमाशंकर, व्हाया, ध्यास, सुळक्याचा, छोटुसा, साधासा, पेठचा, कोहोजगड, अधुर्, कहाणी, ब्रम्हगिरीच्या, नळीच्या, वाटेतून, शुर, मायबोलीकर, ढाक, बहिरी, प्रेमदिन, सेलिब्रेशन, कुलंग, उनाड, माबोकरांचा, वर्षाविहार, गडांचा, राजा, राजियांचा, चंदेरी, विही, वॉटरफॉल, रॅपलिंग, धमाल, मायबोलीवीरांची, कुलंगवारी, पाउले, चालती, माहुली, तुंग, कठीणगड, शुभारंभ, तोरणापासून, लक्ष्यवेध, संपूर्णम, सांधण, अग्गोबाई, कळसुबाई, सिद्धगड, भ्रमणगाथा, सिंदोळा, भाग१, बोटीचा, भाग२, नागेश्वर, भागः, रोमांचक, थरार, ट्रेकमय, झिंदगी, आजा, उर्फ, आजोबा, धुंदमय, महाबळेश्वर, प्रतापगड, अहुपे, स्वर्गीय, सह्याद्रीचे, आभुषण, सुधागड, सहवासात, हडसर, निमगीरी, राजधेर, इंद्राई, नवलाई, रंगमहाल, गडाचं, गडगडा, जीवधन, नाणेघाट, शेवट, कल्ला, गोप्या, केळद, मढे, निमित्त, मायबोली, त्रिंगलवाडी, पवनचक्कींच्या, राज्यात, दुबेर, बितनगड, खांदेरी, बेटावर, चावंड, शिवनेरी, धोडप, सप्तश्रुंगी, दूधसागरास, मनमोहक, इर्शाळ, जंजिरा, भैरोबा, शिरगावचा, डुंगोबा, निवती, कावनई, बळवंतगड, बेटावरी, जंजिरे, अर्नाळा, शब्दपुष्पांजली, दुर्गभ्रमण, सह्यभटकंतीमध्ये, रमतो, रायगडाची, चौल्हेर, पिंपळा, अंजनेरीच्या, शिवकालीन, जलदुर्ग, वृत्तांत, ट्रेकींगच्या, यावर, नोंदवा, महिन्यांनी, करुनही, ट्रेकमध्ये, खाणं, अनुभवण, पुरत, समाधानकारक, नाशिकमधल्या, गडकिल्ल्यांच्या, लिस्टमधल्या, शिक्कामोर्तब, दगदग, पदधतीचे, हृदयाच्या, कप्प्यात, नोंद, जातात, महिने, राहीला, किल्लाच, स्टेशनला, काढताना, भेटलेल्या, ग्रुपमधील, मुलगा, भेटला, म्हटल्यावर, वाटलच, अभिमान, भेलपुरी, खाण, शेअरींगवाली, कोंबून, भरण, भरल्याशिवाय, सोडत, नाहीत, बरी, अर्धा, लोटला, तोबा, मच्छरांचा, एकदाची, पाचला, पाचच, मिनीटांनी, रिलॅक्स, धडधड, एसटीची, मोठया, दगडावर, पाहतोय, रांगेला, पोटात, खजुरचा, खुराक, ढकलला, पोचायला, येथून, पडण्यास, पटकन, मिळत, भिवंडी, पावणेपाच, तुडुंब, भरलेल्या, देखिल, दाटीवाटीनं, रोडला, मिळून, फाट्यावर, उतरवतो, मिळेल, गाडीवाल्याने, मिनीटाच्या, चांगलच, आखडून, थांबायच, इराद्याने, बायकोची, खाउ, उतरावर, कितीवेळा, घसरली, पडली, रडली, सेटल, होतच, काढणार, हालत, उतरण्याची, काहिसा, दरीची, खोली, दाखवणारा, गांगरलेली, उतरण्यासाठी, गरदोळात, दरवाज्यापाशी, दरवाज्याला, क्लिक, घेतल्या, ऑलरेडी, वेळेच्या, आहोत, चुकलेलो, स्मिताला, आमच्यासारखी, उडया, उतरायची, सवय, पायात, साध्या, चप्पला, परतायला, हर्षवाडीतून, शनिवारीच, रविवारी, नकोच, गडावरच्या, टेकाडावर, तेवढा, इमारतीचे, अवस्थेत, इमारतीमध्ये, खोल्या, आतून, सगळया, भिंतीवर, गिरपटवून, अडाणी, लोकांनी, बिनअकलेची, छाप, सोड्लीय, खोलीच्या, टाक्या, टोकावरुन, समोरचा, संलग्न, डोंगरावरील, गोमुख, जटाधारी, सारा, नकळतपणे, त्याचवेळी, खरेतर, कोपर्, चुलीचे, आयते, दगड, भूका, घेउ, घातली, निरगुडपाड्याहून, परतीसाठी, सहमत, पोटोबा, मानत, काटयाकुट्या, टाकून, टोप, काढली, स्मिताने, चूलीचा, ताबा, फटाफट, टोकाकडे, मंदीरापाशीच, मारुती, तळ्याच्या, पिण्याच्या, मधुर, बाजुच्या, गावाकडून, कुटुंब, आलेली, पुढ, थोडया, वाटचालीनंतर, पडतो, निशाण, फडकवलेलं, दिसल, तिथेही, पाचजण, शनिवार, हनुमान, मंदीराजवळ, पुढ्यात, खराब, बांधून, काढलेले, छोट, महादेव, नंदी, भुयारातून, कोरत, नेल्या, दरवाज्यातून, स्वागतासाठी, गिधाडं, जवळून, उडताना, खुश, करेल, शंका, सुरवातीला, दचकली, धास्ती, पाहिलेच, संपल्या, दरवाजा, कातळाच्या, कपारीतून, तत्पुर्वी, डावीकडे, निमुळती, धारदार, मजबूत, यांमध्ये, खोदलेल्या, खोबण्या, आधार, एकावेळी, माणस, इतकीच, खोदताना, परिश्रम, घेणार्, कारागिरांना, सुचल, सरळसोट, चढणीची, संपली, कातळकडयाला, भिडणार, पोहोचले, गडाचे, यांपाशी, कोनात, दोनशे, फुटापर्यंत, चढणे, थरारच, याव्यात, खोबणी, सुंदरतेमुळे, ब्रिटीशांनी, उध्वस्त, गडापैंकी, दुर्मिळ, भास्करगड, उनाचा, तडाखा, वाढतच, टप्प्याला, हवासुद्धा, पाण्याची, बाटली, रिकामी, झुळूक, सुखावून, डावीकडचा, आमच्यामागे, भास्करगडाचा, आसमंतामध्ये, विस्तारलेला, हर्षेवाडी, नावाची, वाडी, म्हणे, वाडीतलेच, जाल, स्मितहास्य, मोबदला, देउन, मार्गी, शेतमळ्यामधून, शनिवारची, स़काळ, शेतमळे, सरले, फुटल्या, पलिकडून, बाईने, आरोळी, रुपाने, गिर्, हाईक, म्हणूनच, जनावरं, चुकालं, बसाल, आमच्याबरोबरच, घालू, दोनदा, व्यर्थ, जबरदस्तीच, देउ, स्विकारले, डायरेक्ट, मुद्द्यालाच, पावसाचे, चुकण्यासारखं, जाउदे, बाईकडे, दुर्लक्ष, फुरसतमध्ये, घाई, पुढं, वेडीवाकडी, बेफाम, वेगानं, डांबरी, रस्त्यान, ओसाड, वाटणार्, प्रदेशात, निरगुडपाड्याला, दहाच्या, कडे, रस्त्याच्या, दिमाखात, येउनही, राहिलेला, पावसातच, अनुभवाव, ठरवलेल, मुहुर्त, पाहुन, कितीची, विश्रांतीनंतर, चारच्या, स्टँड, गाठला, सुटण्याच, वेळापत्रक, चक्रावून, हवी, वैतरणा, कल्याणमस्तु, साडेआठ, ग्रुपने, नाद, पावणेसहाची, भंडारदरा, पकडण्याचे, ठरवले, विनाकारण, काढले, गारव्यात, भज्जीवर, भज्जी, वडयावर, वडा, खात, चहापानाचा, उकडायला, अडीचची, रेल्वेस्थानकावरच, काढायचे, पहाटेची, स्टँडवरुन, तोकडी, नेटवर, मिळवलेली, पसरण्यासाठी, वेटींग, रुम, रिजर्व, तिकीटधारकांसाठी, खोलीत, स्थानकावरच, बाकडे, अडवले, डिसेंबर, नसली, थंडीने, लपेटण्याआधीच, जाकीट, स्वेटर्स, घातलेले, मेलच्या, इंजिनच्या, भसाडया, आवाजातदेखील, झोपलेले, तिघांनी, धोक्याचे, गुरखा, शस्त्र, आर्मी, लोक, पोलिस, लोक्स, हटकवले, विशेष, मेलमधून, उतरला, स्मिताकडे, बुट, सँडल, घेण्यास, वेळही, घालूनच, पोचलो, ठाण्याहून, उशीरातली, इगतपुरीला, थांबणारी, एक्प्रेस, पकडायचे, ऐनवेळी, ठराव, जनरल, जिंदाबाद, घुसखोरी, रहायला, मिळवली, घडयाळ्याचे, काटे, ट्रेकच्याच, इथल्या, मोबाइलशी, चाळे, स्टेशन, यायची, तासाचा, लागेस्तोवर, दरवेळी, घेउनच, करावा, ट्रांसपोर्टची, मदत, गणित, मांडा, जरा, किंवा, राहते, पारंपारिक, पद्धतीचा, शिरस्ता, मोडायचा, करतच, खुमखुमी, मागचं, नेमका, शनिवारी, मिळालेला, सिझन, फ्लो, अंजनेरी, संदेश, सलग, आठवडे, याहून, भाग्य, कुठले, मागच्याच, आठवड्यात, पद्मदुर्गला, क्षणी, भरताना, म्हणाल्या, तीसुद्धा, माझ्याबरोबर, चलायच, जून, नेहमीसारखा, टिपिकल, एकदिवसीय, यामुळे, thrilling, प्रकार, थोडाफारं, वाढलेला, लांबचा, केल्याने, व्यायम, घडला, ट्रेकमुळे, पूर्णतः, समाधानी, अनुभवलं, सौंदर्यात, हरखून, ठेवता, हाश्याची, उंबरडेेवाडीतून, शिवाजी, लेडर, रुट, गार्बेट, ट्री, हील, अनेक, पालथ्या, घालायच्या, स्टेशनाजवळ, पोहोचलेली, प्रत्येकी, रुपये, भलतंच, स्वस्त, पडलं, २००, मागितले, सीएसटी, फास्ट, अंगावरच्या, चाटच, एवढी, धक्काबुक्की, कसतरी, कावकाव, नाईट, शिफ्ट, निघायचं, भिवपुरी, कर्जतच्या, पिकनीक, पब्लिकनेच, भरुन, आल्या, गेल्यापण, फलाटावरील, तशीच, साध, लटकता, समोरच्या, कर्जतला, येण्यासाठी, गर्दीतही, तिघांना, बदलायला, मिळालीच, परतीचा, झाल्यामुळे, अवतारातच, मस्ती, कळून, चुकलं, भटकंतीसाठी, झपाटलेली, भुतं, तिघंही, काढताच, दाटीवाटीने, पावसाचं, धुमाशान, पावसापुढे, सुके, बदलता, रिक्षामध्ये, बसल्याच, चालकाचे, आभार, मानले, त्याच्याशी, गावापुढेच, रिक्षावाले, राहतात, समजल्यावर, केल्या, चमकून, वासरू, असतानाच, नेलेले, ठेवलं, धावून, अतिरिक्त, वाईट, एकटा, फिरणार, त्याचे, कुणी, चिडचिड्या, कुठेही, थांबता, बरंच, उतरून, मिळालं, ठीक, असह्य, तंगडतोड, पक्कीच, काहीही, म्हणा, रटाळवाणा, ठरतो, अंधुकश्या, उर्वरीत, टेकाड, उतरेपर्यंत, ठोकला, दिवसभर, दिलेली, गावापर्यंत, सोडायला, सर्वांग, मुसळधार, मिळणं, मुश्किल, अंधारही, इथं, तिथं, फिरताना, सामोरी, भांड्यात, खिंडीत, आलेल, जाता, उजवीकडच्या, अंधाराच, संकट, लागल, खडकाळ, बरा, आटापिटा, चुकवायची, नाहितर, समिकरण, चुकल, फसायला, कॅमेरे, ध्यान, उड्या, झुडुपांतून, खडकांमधून, नशिब, नवख्या, विनायकने, स्लो, सातत्य, कशाला, शोधण्यात, जाउ, कॉल, वाटेतच, वाहणारा, ठाउक, चुकण्याची, शक्यता, उरली, म्हणावी, पायाखालची, सुटकेचा, निश्वास, पावसानेही, आवरते, दिडवर्षापुर्वी
Text of the page (random words):
खुष हुआ आम्ही ठरवल्याप्रमाणे आमचा ट्रेक झालेला आता पुढच काही ठरवल नव्हतं हाश्याच्या पट्टी या वेगळ्या वाटेने पुन्हा धोदाणे गावातच उतरुन धबधब्याकडे जायचं की माथेरान बघत दस्तुरी ना़क्यावरुन टॅक्सी करुन नेरळ गाठायच या विचारात होतो तोच रोमाने बाँब टाकला पेब किल्ला करु वाट सरळ आहे मॅपवर पाहिलय वगैरे वगैरे बघू कस काय ते म्हणत मी कानडोळा केला त्या मकेवाल्याला विचारल तर त्याने दुजारा दिला की लांब आहे पण वाट ठळक आहे सरळ चालत रहा पुढे मार्केटजवळ रेल्वेची पटरी लागेल तिथून पुढे अगदी कड्यावरचा गणपती दिसेपर्यंत चालत रहायच दिड दोन तास लागतील आम्ही चालायला घेतले लाल मातीच्या पायघडया घातलेली वाट दुतर्फा असलेले भले मोठे वृक्ष अधुनमधून लागणारे धुक्याचे साम्राज्य नि त्यात रानकिटकांची सततची चालू असणारी किर्रर्र पिपारी बाकी सगळ शांत एखाद दुसर जोडपं वा फॅमिली ग्रुप सनसेटपॉइंटकडे जाण्यास निघालेला अन्यथा आम्ही तिघचं कदाचित दुपारची वेळ म्हणुन कोणी फिरकल नसेल काही अंतरावर डिजेचा आवाज ऐकू आला तसा पार मुडच बदलून गेला त्या शर्यत आयोजकांनी डिजे सुरु ठेवला होता असो पुढे मार्केट येइपर्यंत पुन्हा धुक्यातला रस्ता मार्केट आले तसं दुकानांची रांग सुरु व आमचा खाण्यासाठी हॉटेल शोध सुरु रविवार तेव्हा कोंबडीशिवाय पर्यायच ठेवला नाही हॉटेल रुचिरा मध्ये हंडी मस्तपैंकी हादडली नि तृप्त ढेकर दिला म्हटल बस्स झाला आता थोडसं फिरुन घरी पण रोमा तो रोमा पेब करुयाच म्हणू लागला विनायक पण आग्रह करु लागला म्हटल दोन वाजुन गेलेत भारी पडेल एकतर मस्त जेवलोय पण रोमा फॉर्मात होइल म्हणून फक्त एका सोप्याश्या ट्रेकचा अनुभव गाठीशी असुनही विनायक पण जाऊच म्हणत होता त्याला म्हटलं जल्ला या रोमाच्या नादी लागू नकोस तुलाच भारी पडेल शेवटी काय खूप धावपळ होणार म्हणत नाईलाजाने चला जाऊ म्हटले काय करणार जल्ला अजूनही हंडी चे ढेकर देत होतो मार्केट सोडण्यापुर्वी रोमाला प्लॅस्टीकच तात्पुरता रेनकोट नि आम्हाला दोन गोल टोप्या इतकी शॉपिंग केली घोडेवाले विचारत होते किधर जाना है आता काय त्याला विचारायचं पेबला नेणार म्हणून एव्हाना ट्रेनच्या टपरीवरुन झपाझप पावलं टाकत सुटलो मघाशी सनसेट पॉइंट्वरुन येताना दिसलेलं गर्दीवजा माथेरान नि इथल गडबड गोंधळ करणार् या गर्दीने ओसंडून वाहणार माथेरान किती तो फरक धुक्याचा प्रभाव नव्हता पण पावसाळी काळोख जाणवत होता अधुन मधून एखादी सर येउन जात होती वाटेत भेटलेली टोळी ह्या ट्रेनच्या मार्गावरुनच आम्ही पेब किल्ल्याच्या वाटेला जाउन मिळणार होतो म्हणुन निश्चिंत होतो पण वेळ कमी होता आमच्या आडवी येणारी गर्दी ही फक्त अमन लॉज वा दस्तुरी नाक्यापर्यंतच असणार होती झालही तसच तिथवर आलो नि गर्दी सरली पण पावसाची भली मोठी सर येउन गेली आता रुळाच्या पटरीवर फक्त आम्ही तिघच नि सोबतीला चिंब निसर्ग झाडांमधून पावसाच्या टिपटिपणार् या थेंबांचे साग्रसंगीत फक्त सुरु होत त्या घनदाट झाडीतून रेल्वेरुळाचा मार्ग लवकरच उजेडात येताना दिसला समोरच एका बाजूला आजारी असलेला बिचारा घोडा तसाच सोडून दिलेला दिसला फोटोसाठी चांगल वाटल होत पण तो आजारी आहे ते जवळ गेल्यावर कळल आता अगदी नयनरम्य सफर सुरु झालेली ट्रेनचे ते छोटेखानी रूळ डोंगरकड्याला मस्तपैकी वळसे घेत घेत पुढे जात होते कधी ढगांच्या धुक्यातून तर कधी भर पावसात आमचं मार्गाक्रमण सुरु होत भवताली हिरवाकंच निसर्ग डाव्या बाजूच्या दरीत घुसळणारे ढग तर उजव्या बाजूच्या कडयावरुन कोसळणारे शुभ्र पाणी प्रत्येक टप्पा थांबून आस्वाद घ्यावा असा मनात आलं की पेब किल्ला नाही झाला तरी चालेल पण आस्वाद मन भरेपर्यंत घ्यायचा आमचा फंडाच तो त्यात भर म्हणून गर्द निळ्या जांभळया रंगाचे पक्ष्याचे जोडपे बागडताना दिसले हाच तो शिळकरी कस्तुरी इतकी वर्षे सदैव हुलकावणी देत असलेला हाच तो पक्षी योगायोग म्हणावा तर धुकसुद्धा आजिबात नव्हते अगदी स्पष्टपणे त्यांची हालचाल दिसत होती जवळपास घरटं असावं कदाचित आता पुन्हा अंधारून आलेले पुन्हा एक मोठी सर सुकलेलं अंग पुन्हा चिंब पण आम्ही चालतच होतो हवं तिथे मनसोक्त थांबायचं नि मग वेगात पुढचं अंतर गाठायचं असच काहीस सुरु होत आता पाऊस नुकताच थांबलेला आकाशाला पहिल्यांदाच ढगांपासून थोडी फुरसत मिळालेली पण ढग मात्र फिरस्ते बनून आजूबाजूच्या डोंगररांगेवर रेंगाळत होते संध्याकाळचा सूर्यप्रकाश अगदी ताजातवाना भासत होता त्यातच आमचे लक्ष दरीच्या पल्याड दिसणाऱ्या डोंगराकडे गेले एक टोक ढगांच्या फटीतून बाहेर आलेले हाच तो माथेरानचा सनसेट पॉईंट सकाळी त्या टोकावर होतो आणि आता इथवर मजल मारलेली त्या डोंगराच्या मागेच मग कलावंतीण व प्रबळगड यांच्या मधला v दिसू लागला बरीच उघडीप मिळाली म्हणून वातावरण स्पष्ट होत चाललेले म्हटलं मस्त पुढे काही अंतरावरच अचानक बाप्पा समोर आले इथला प्रसिद्ध कड्यावरचा गणपती निसर्गराजा अरे काय ती कलाकृती उभ्या कातळकड्यालाच तसा आकार देऊन रंगरंगोटी करून हा भलामोठा बाप्पा साकारलेला हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे बाप्पा खूपच गोड वाटत होते बरं तुम्ही पुढे चालत गेलात तरी बाप्पा तुमच्याकडेच लक्ष ठेवून आहेत असच भासत बाप्पापुढे नतमस्तक होण्यासाठी आम्ही वाट सोडून खास खाली उतरलो नाही इथूनच दर्शन घेत पुढे निघालो पुढे एक वळण पार केले व पेब किल्ल्याचा डोंगर समोर आला तिथून थकलं भागलेलं पब्लिक वर चढत येताना दिसलं पेबचा किल्ला आता समोर उभा त्या डोंगरावर तर ढगांना उधाण आलेले माथा दिसत नव्हता आमची उत्सुकता ताणलेली आतापर्यँत धरलेली रुळाची वाट सोडली नि खालच्या बाजूस जाणाऱ्या वाटेने उतरायला घेतले पावसामुळे वाट ओली निसरडी होती पण वेळेवर सारख नजर ठेवून होतो उघडीप असल्याचा फायदा घेत शक्य तितके पटापट अंतर कापायच ठरलेलं सुरवातच शिडी उतरण्यापासून होती शिडी उतरुन थोड खाली गेलो की कडयाला लागूनच वाट पुढे पेब किल्ल्याचा डोंगर व माथेरानचा डोंगर यांच्यामध्ये आणून सोडते तिथे पलीकडच्या दरीत तर ढगांना पुर आलेला वाफाळलेले ढग अगदी मुक्त विहार करत होते वार् याचही धुमशान सुरु होत त्या वाऱ्याच्या तडाख्यामुळे पेब माथ्यावरच्या ढगांचा मुक्काम हलला व नव्याने बांधलेल्या मंदीराचा कळस नजरेस पडला कसलं अप्रतिम दृश्य वाटलं अगदी फिल्मी आमची ओढ आणखीन वाढली अडथळा फक्त समोरुन येणार् या थकल्या भागल्या जीवांचा आम्हाला केविलपणे विचारत होते और कितना दूर है दस्तुरी नाका आणि आम्ही आता पेब करुन नेरळच्या बाजूने उतरणार ऐकून पण आश्चर्यकारक भाव देत होते पुढे गेलो पेब किल्ल्याच्या डोंगराला हात घातला देखील कुठल्याही क्षणाला पाऊस येइल अस वातावरण होत डोंगराच्या एका बाजूची दरी ढगांनी तुडूंब भरलेली होती थोड वर चढून मागे वळून पाहिल तर माथेरानचा हिरवा डोंगर पश्चिमेकडून येणार् या सुर्यकिरणांनी उजाळला होता ऊन पाऊस यांचा सुंदर मिलाफ साधला जात होता आता आमची वाटचाल डोंगराच्या दुसर् या बाजूने म्हणजे जिथे ढग येउन धडकत होते तिथून होती कातळकड्याच्या बाजूने पुन्हा अचानक अंधारून आले अगदी अडचणीच्या ठिकाणी जोरकस पाऊस सुरु झाला जिथे वाट अगदी कड्याला बिलगून अरुंद अशी व पुढे तटबंदीवर चढून जाण्यास बुरुजाच्या आधारावर एकावर एक अश्या दोन शिडया बसवल्या आहेत काही क्षणातच पावसाचा जोर ओसरला नि आमच्या पथ्यावर पडले आता कुठे सुकत असंणारे कपडे पुन्हा चिंब चिंब गंमतच सुरु होती एव्हाना आमच्या कंपुतला विनायक या वातावरणात वारंवार होणारा बदल शिडयांची वाट हे सगळे बघून भारावून गेला होता थोडा गंभीरही झाला होता शिड्या पार चढण पार नि आम्ही पेब किल्ल्यावर पेब माथ्यावर बांधलेल्या मंदीराकडे जाण्यास फारसे उत्सुक नव्हतो कारण आतापर्यंतच्या वाटचालीत निसर्गरुपी देव दिसतच होता अंगावरचे ओले कपडे विंडचिटर सॅक अस सगळ काढून शरीर हलक करुन आम्ही शांत बसलेलो समोर असणार् या तटबंदीपलिकडचा माथेरान डोंगर अगदी नाकासमोर पण अर्ध्याहून अधिक भाग शुभ्र मेघांनी गिळंकृत बेभान वार् यात आम्हीदेखील बेहोश होउन गेलेलो यांतच आमचा देव धर्म सुख समाधान शांती वगैरे दडलेलं जेवल्यानंतर सुरु केलेली घोडदौड इथवर येइपर्यंत सुरुच होती इथेच मग पेटपुजा करुन घेतली नाही म्हटल तरी रोमा व मला जास्त आनंद झालेला दोन वर्षापुर्वी एका छोट्या चुकीमुळे आमचा पेब किल्ला हुकला होता धबधब्याच्या वाटेने जाऊन सुरवातीलाच चुकलो होतो आणि आज अगदी मोठा पल्ला पार करुन आलेलो इथेच मग रोमाच्या नविन मोबाईलमधून वाया सेल्फी ग्रुप फोटो झाला आटपायला घेता घेता रोमा म्हणाला मंदीरापर्यंत जाऊ पण मी तो प्रस्ताव सरळ धुडकावून लागला आता वेळेला महत्व होते संध्याकाळचे साडेपाच वाजुन गेले होते चक्क अंधार पडायला एक तास पकडून चाललो तोपर्यंत पलिकडे उतरण गरजेच होत पाऊस अधुनमधून डोकं वर काढत होता त्याने अंधारुन आणल तर आमची पंचाईत होणार होती रोमाने नकाशा बघून ठेवलेला आणि पलिकडच्या म्हणजेच नेरळहून येणार् या वाटेचा अर्ध्यापर्यंत तरी आम्हाला वाटेचा अंदाज होता तेव्हा तिथपर्यँत पोहोचण्यासाठी पटापट लेटस गो केल निघताना कडेला एका बाजूस बैल दिसला आम्ही गांगरुन गेलो बैल इथवर आला कसा म्हटलं आम्ही आता जिथून उतरणार होतो त्या वाटेने आला असेल पण या वाटेलासुद्धा शिडी व एक छोटा कातळटप्पा लागतो असुदे आम्हाला जास्त डोकेफोड करायला वेळ नव्हता आम्ही आता माथ्याच्या डाव्या बाजून पुढे सरकलो नशिबाने पावसाने विश्रांतीचा वेळ लांबवलेला सुर्याने आता पश्चिम क्षितीजपटलावर उतरायला घेतलेले त्याच्या किरणांनी आजुबाजूचे चिंब डोंगर मस्तच चमकत होते वाट संपुर्ण कडयाच्या एका बाजूने वेगवेगळे नजारे दाखवत पुढे नेत होती काही अंतरावरच उजव्या बाजूला गडावरील पडक्या वास्तूचे अवशेष दिसून आले सारं काही हिरवी वस्त्र नेसून नटलेलं अजुन पुढे आलो नि डोंगररांगेचा पसारा नजरेत भरला वाटेचे स्वरुप ओलाव्यामुळे थरारक वाटत होते कोरलेल्या पायर् या वरुन घरंगळणारे पाणी एका बाजूला पाण्याचे टाके नि एका उभ्या तटबंदीवरुन उतरायला काटकोनात असलेली भक्कम शिडी शिडीवरुन पाणी पडत होतेच तेव्हा उतरताना पुन्हा सुक्याचे ओले झालो या क्षणाला विनायक तर एकदम चाट पडला होता म्हटलं एन्जॉय वाट दिसतेय का याच वाटेवर एक गुहा आहे पण आता वेळेअभावी टाळून आम्ही त्या गुहेखालच्या वाटेने गेलो त्या वाटेवर थर्माकोल प्लास्टीक बॉटल वगैरे कचरा बघून त्या गुहेत गेलो नाही तेच बर झालं अस वाटून गेलो कितीतरी वेळेने असा दिसणारा कचरा एकदम खटकून गेला ढगांनी पुन्हा आसमंत व्यापून टाकला अंधारुन आल तस आमच थोड टेंशन वाढलच अजुन एक कातळटप्पा लागेल मग पटापट घोडदौड होइल असा अंदाज होता शेवटी तो कातळटप्पा आला अंगावर येणारा कातळ पुढे आल्याने चढता उतरताना थोडस अवघड होउन बसत पण एक दोरखंड बोल्ट मारुन लावून ठेवलाय तेव्हा काळजीपुर्वक उतरले की सोप्प होउन जात पाउस कोसळण्याअगोदर आम्ही तोही टप्पा उतरुन घेतला नि एकदम हायस वाटलं आता खिंडीत येउन पोहोचलो तेव्हा खूपच अंधारुन आलेल सरळ वाटेने न जाता आम्ही उजवीकडच्या वाटेला उतरलो नि धुमशान पाऊस सुरु झाला अंधाराच संकट जाणवू लागल टॉर्च होती सोबतीला पण पावसात जंगलातून खडकाळ वाट उतरताना अंधार नसलेला बरा म्हणून आटापिटा सुरु झाला काही करुन वाट चुकवायची नव्हती नाहितर वेळेच समिकरण चुकल असत नि अंधारात फसायला झाल असत मोबाईल कॅमेरे सगळ बंद करुन फक्त वाटेवर ध्यान देत उड्या मारत पटापट खाली उतरायला घेतले इथून पुढची सरळ अशी वाट नव्हती झाडी झुडुपांतून खडकांमधून मार्ग काढत उतरत होतो आमच नशिब चांगल होत की नवख्या विनायकने दम सोडला नव्हता थोडा स्लो होता पण सातत्य होते एव्हाना कशाला रोमाच्या नादी लागलो म्हणत असणार वाट शोधण्यात वेळ जाउ नये म्हणून मी पुढे जाउन वाटेचा अंदाज घेत रोमाला कॉल देत खाली सरकत होतो वाटेतच एक ओसंडून वाहणारा धबधबा लागला रोमाला ठाउक होते तो ओलांडून वाट आहे बस्स तिकडेच आता चुकण्याची शक्यता उरली होती धबधबा ओलांडून गेलो नि बर् यापैंकी म्हणावी अशी पायाखालची वाट सुरु झाली नि सुटकेचा निश्वास टाकला पावसानेही धुमशान आवरते घेतले होते अखेरीस आम्ही दिडवर्षापुर्वी जिथवर येउन मागे फिरलो होतो त्याच पठारावर पोहोचलो अंधार पडण्याआधी न चुकता इथवर येण गरजेच होतं तेव्हा सर्व अनुभव पणाला लावून उतरलो होतो डोक्यावर आलेलं दडपण अचानक नाहिस झालं आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन दोघांना लाखोली पण वाहिली हवा होता ना पेबचा ट्रेक घ्या खर तर कुठली अडचण न होता ट्रेक होइल याची खात्री होती पण कुठलीच चिंता त्रास न घेता खर तर मला आरामशीर ट्रेक करायचा होता ठरलेही तसच होत पण रोमाचा उत्साह नि विनायकची उत्सुकता कामाला लावलं जल्ला पोटातल चिकन हंडी पण कधीच पचली असो या ट्रेक निमित्ताने रोमा व माझ्याकडे असलेल्या अनुभवाची एक उजाळणी झाली तर विनायकला आतापर्यँतची वाटचाल अविश्वसनीय वाटत होती आम्ही आता कुठेही न थांबता सरळ उतरायला घेतले नाही म्हटलं तरी अजून बरंच खाली उतरून जाण बाकी होत परत तिथून वाहन मिळालं तर ठीक नाहीतर असह्य तंगडतोड पक्कीच काहीही म्हणा हा शेवटचा टप्पा खूप रटाळवाणा ठरतो अंधुकश्या प्रकाशात उर्वरीत टेकाड उतरेपर्यंत सात वाजून गेले मागे वळून पाहिले तर पेब किल्ल्याच्या डोंगरावर ढगांनी मुक्काम ठोकला होता काहीच दिसत नव्हतं दिवसभर दिलेली साथ कमी म्हणून की काय आता पाऊस गावापर्यंत सोडायला आला सर्वांग त्या मुसळधार पावसात चिंब होऊन गेलं म्हटलं अश्या पावसात आता वाहन मिळणं पण मुश्किल अंधारही पडला गावात इथं तिथं फिरताना अचानक रिक्षा सामोरी आली व जीव भांड्यात पडला तिघंही तसेच सॅक न काढताच दाटीवाटीने बसलेलो बाहेर पावसाचं धुमाशान सुरूच होत या पावसापुढे सुके कपडे सॅक मध्ये असुनही बदलता नाही आले रिक्षामध्ये बसल्या बसल्याच त्या चालकाचे आभार मानले त्याच्याशी गप्पा सुरु झाल्या तेव्हा कळले त्या गावापुढेच जवळ धबधबा आहे तिथे रिक्षावाले उभे राहतात आम्ही गडावर गेलेलो समजल्यावर त्याने गडाच्या गप्पा सुरु केल्या व विचारले वरती बैल दिसला का आम्ही पण चमकून विचारले हा तो तिकडे कसा आला शिडी वगैरे असताना तेव्हा कळले वासरू असतानाच त्याला वरती नेलेले व तिकडेच ठेवलं तो मारक्या बैल आहे जवळ गेलात तर अंगावर धावून येतो ही अतिरिक्त माहिती मिळाली वाईट वाटलं मारक्या होणार नाही तर काय एकटा जीव त्या डोंगरावर फिरून फिरून किती फिरणार त्याचे सवंगडी नाही वा कुणी नाही मग चिडचिड्या होणार नाही तर काय होणार आमची रिक्षा आता नेरळ स्टेशनाजवळ पोहोचलेली प्रत्येकी फक्त वीस रुपये घेतले भलतंच स्वस्त नि मस्त पडलं कारण आमची अवस्था बघता त्याने रु २०० मागितले असते तरी दिले असते रात्री ८ १० ची सीएसटी फास्ट लागली होती अंगावरच्या ओल्या कपडयातच तिकीट काढून फलाटावर आलो आणि चाटच पडलो गर्दी असेल अंदाज होता पण एवढी पहिल्यांदाच बघत होतो धक्काबुक्की करत कसतरी पुढे आलो सगळा पिकनिक ग्रुप नि हा कावकाव गोंधळ म्हटलं काही खरं नाही रोमाला तर घरी ठाण्याला जाऊन कामावर नाईट शिफ्ट ला निघायचं होत भिवपुरी कर्जतच्या पिकनीक व ट्रेक पब्लिकनेच भरुन आलेल्या दोन ट्रेन आल्या व गेल्यापण आमच्या फलाटावरील गर्दी तशीच कुणाला साध लटकता पण आलं नाही शेवटी सगळा पब्लिक समोरच्या फलाटावर कर्जतला जाऊन परत येण्यासाठी गेला ट्रेन आली व गर्दीतही आम्हा तिघांना अगदी एकत्र बसायला मिळाले कपडे बदलायला संधी मिळालीच नव्हती व आता ओल्या कपडयातच परतीचा प्रवास सुरु झालेला उशीर झाल्यामुळे रोमा तर थेट अश्या अवतारातच कामावर जाणार होता जल्ला किती ती मस्ती विनायकला एव्हाना कळून चुकलं होत ही भटकंतीसाठी झपाटलेली भुतं आहेत करायला गेलेलो आरामशीर भटकंती पण झाला नेहमीसारखा टिपिकल एकदिवसीय ट्रेक पाऊस धुकं यामुळे मात्र काय म्हणतात ते thrilling प्रकार थोडाफारं वाढलेला लांबचा पल्ला केल्याने चांगलाच व्यायम घडला पण या ट्रेकमुळे पूर्णतः समाधानी झालो होतो फक्त ट्रेकच नाही तर बरच काही अनुभवलं निसर्गाच्या सौंदर्यात तर अगदी हरखून गेलो होतो सोबतीला पाऊस पुन्हा एकदा कसलेही उद्दिष्ट न ठेवता इथे भटकायला यायला पाहिजे असं मनात आलं मग लक्षात आलं की अजून हाश्याची पट्टी उंबरडेेवाडीतून येणारा शिवाजी लेडर रुट गार्बेट पॉईंट वन ट्री हील इति माथेरान चढून जाणाऱ्या अनेक वाटा पालथ्या घालायच्या आहेत सो पुन्हा येऊ लवकरच 2 प्रतिक्रिया posted in trek it easy चलो हरिहर जून 22 ट्रेक दरवेळी प्रायवेट गाडी घेउनच का करावा कधीतरी एसटी ट्रेन अश्या पब्लिक ट्रांसपोर्टची मदत घेत ट्रेक करण्याची मजा काही औरच असते मग त्यासाठी वेळेच गणित मांडा आणि जरा इकडे तिकडे झालं किंवा होउन नये म्हणून होत असणारी धावपळ चांगलीच लक्षात राहते आम्हाला या पारंपारिक पद्धतीचा शिरस्ता मोडायचा नसल्यामुळे अधुन मधून असे ट्रेक करतच असतो अशीच खुमखुमी मित्र रोमाला आली या मागचं खर कारण तर नेमका शनिवारी त्याला कामावर मिळालेला ऑफ नि थंडीचा ऑन सिझन माझं म्हणाल तर मी बर् यापैंकी ट्रेक फ्लो मध्ये होतो आधी अंजनेरी मग पद्मदुर्ग नि आता रोमाचा संदेश चलो हरिहर सलग तीन आठवडे ट्रेक याहून भाग्य कुठले म्हटलं चलो मागच्याच आठवड्यात पद्मदुर्गला जाउन आलेल्या आमच्या सौ पण अगदी शेवटच्या क्षणी सॅक भरताना म्हणाल्या मी पण येणार म्हटलं चल तीसुद्धा सोप्पा आहे की अवघड हा विचार न करता फक्त माझ्याबरोबर चलायच म्हणून आली पण शेवटच्या क्षणाला येते म्हटले तरी स्मिताकडे चांगले बुट वा सँडल नव्हती आणि आता घेण्यास वेळही नव्हता तेव्हा चप्पल घालूनच आता ट्रेक करु म्हणत ठाण्याला पोचलो ठाण्याहून उशीरा उशीरातली इगतपुरीला थांबणारी मेल वा एक्प्रेस पकडायचे ठरवलेले ऐनवेळी ट्रेक ठराव होता तेव्हा जनरल डबा जिंदाबाद बर् यापैंकी घुसखोरी करुन उभे रहायला जागा मिळवली आता फक्त घडयाळ्याचे काटे ट्रेकच्याच इथल्या तिथल्या गप्पा नि मोबाइलशी चाळे करत इगतपुरी स्टेशन यायची वाट पहायची अडीच तीन तासाचा प्रवास डोळा लागेस्तोवर इगतपुरी आले रात्री अडीचची वेळ रेल्वेस्थानकावरच दोन तास काढायचे ठरवलेले पहाटेची स्टँडवरुन एसटी असते अशी तोकडी माहिती नेटवर मिळवलेली तेव्हा अगदी जाऊ पहाटे म्हणत रेल्वेस्थानकावर पसरण्यासाठी जागा बघू लागलो वेटींग रुम फक्त रिजर्व तिकीटधारकांसाठी होता नि त्या खोलीत अगदीच अंधार असल्याने आम्ही स्थानकावरच बाकडे अडवले इगतपुरी थंड हवेचे ठिकाण त्यात डिसेंबर...
|