Meta tags:
Headings (most frequently used words):
माझा, 28, 2014, blog, अग्निसखा, thursday, october, 15, 2015, sunday, december, tuesday, january, subscribe, to, agnisakha, total, pageviews, पहिला, पुरस्कार, गझलसंग्रह, काव्यसंग्रह, labels, archive, मराठी, कविता, समूह, क्रान्तिचं, पूर्वसंचित, मित्रमंडळी, marathi, vishwa, मी, इथेही, about, me, दीपज्योती, २०११, आतून, हरवलेलं, आभाळ, आयुष्या,
Text of the page (most frequently used words):
कविता (10), #आयुष्या (10), share (9), माझा (7), #october (7), december (7), आतून (7), आणि (6), आहे (6), मला (6), january (6), march (5), april (5), may (5), june (5), july (5), august (5), september (5), november (5), होते (5), जेव्हा (5), उमलते (5), माझं (4), क्रांति (4), february (4), posts (4), तुला (4), आभाळ (4), माझ्या (3), 2014 (3), comments (3), atom (3), pinterest (3), facebook (3), blogthis (3), email (3), this (3), येथे (3), द्वारा (3), पोस्ट (3), केलेले (3), अन् (3), हरवलेलं (3), अग्निसखा (3), theme (2), रूह (2), सुद्धा (2), प्राण (2), पूर्वसंचित (2), आवडतं (2), काव्य (2), मराठी (2), उर्दू (2), नाही (2), फक्त (2), भाषा (2), लिहिते (2), कधी (2), blog (2), 2015 (2), त्या (2), मुक्तछंद (2), गझल (2), all (2), subscribe (2), लेबले (2), नकोसा (2), तुझा (2), वाटतो (2), तुझ्या (2), पुरे (2), comment (2), तुझं (2), पहाणारं (2), watermark, images, powered, blogger, sndrk, दीपज्योती, २०११, view, complete, profile, क्रान्ति, आयुष्य, वयाच्या, व्या, वर्षी, कविवर्य, सुरेश, यांनी, गज़ल, लिहिण्यासाठी, प्रेरणा, दिली, हिन्दुस्तानी, शास्त्रीय, संगीत, साहित्य, चांगुलपणा, देव, गोष्टींवर, पूर्ण, विश्वास, निसर्ग, फ़ुलं, झाडं, नद्या, सागर, आकाश, जगातील, प्रत्येक, चांगली, वस्तू, आवडते, हिन्दी, लिपी, कधीकधी, इंग्रजी, निराशावादी, तरीही, आशावादी, होतं, चांगल्यासाठी, याची, खात्री, आत्मशोध, घ्यायला, म्हणून, काव्यासाठी, तखल्लुस, उपनाम, अर्थात, आत्मा, अशी, नागपूर, महाराष्ट्र, india, about, इथेही, marathi, vishwa, क्रान्तिचं, मित्रमंडळी, समूह, 106, 2009, 2010, 101, 2011, 112, 2012, 2013, archive, गाण्यासाठी, रुबाई, भक्तिधारा, त्रिधारा, जरा, हटके, 123, काव्यकण, 204, आठोळी, अनुवादिता, labels, काव्यसंग्रह, गझलसंग्रह, पहिला, पुरस्कार, total, pageviews, agnisakha, home, older, होतसे, हल्ली, शेजार, तुलाही, सांग, भार, कुणीही, कोणत्याही, कारणांनी, फायदा, घ्यावा, कशासाठी, असा, झालास, लाचार, जाळून, केल्या, खुल्या, वाटा, प्रकाशाला, दिव्यांनी, माखला, माथी, अंधार, सुखांनी, ताप, वाढावा, व्यथांनी, गोठावा, कोणता, झाला, नवा, आजार, नको, थोटी, अपेक्षा, नकोसे, पांगळे, नाते, आधार, नाकारण्याचाही, धोका, सांभाळणेही, जोखमीचे, फार, जरासा, स्पर्श, होण्याने, मने, रक्ताळती, कट्यारीची, निष्पापतेला, धार, खंतावणे, आता, निरोपाच्या, क्षणाआधी, दिले, तुझे, घेऊन, साभार, tuesday, शोधू, माझंही, गवसेलच, कुठंतरी, कधीतरी, क्षितिजाच्या, काठावर, जिथं, सारं, काही, गवसतं, अनायास, अवचित, नव्या, नवलाईच्या, रुपड्यात, दिसेल, तिथं, आपलं, निळंसावळं, कृष्णदेखणं, कोवळ्या, जावळाच्या, लेकरासारखं, इवलीशी, मूठ, चोखत, खुदुखुदु, हसत, निळ्याशार, दुलईत, लपेटलेलं, तुझीमाझी, वाट, आपल्याला, पाहताच, हात, पसरून, कवेत, येऊ, लाडिकशा, हुंकारांनी, भारून, टाकणारं, मखमली, स्पर्शाचं, इवलं, sunday, कृत्रिमतेच्या, सजावटीविण, सुंदरतेची, व्याख्या, दाहक, शब्दांवाचुनसुद्धा, धगधगणारी, ज्वाला, कल्पकतेची, कोमल, काया, प्रतिभेची, छाया, वादळवारा, चांदणपारा, श्रावण, मोरपिसारा, उरतच, आत्म्याची, thursday, क्रान्तिच्या, फिनिक्स, प्रमाणे, खरोखरच, स्वत, च्या, राखेतून, जन्मलेल्या, ज्यांच्यामुळे, ज्यांच्यासाठी, जगते,
Text of the page (random words):
अग्निसखा अग्निसखा या क्रान्तिच्या कविता आणि फक्त कविता अग्निसखा फिनिक्स प्रमाणे खरोखरच स्वत च्या राखेतून जन्मलेल्या ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी ती जगते thursday october 15 2015 आतून कृत्रिमतेच्या सजावटीविण सुंदरतेची व्याख्या होते जेव्हा ती आतून उमलते दाहक शब्दांवाचुनसुद्धा धगधगणारी ज्वाला होते जेव्हा ती आतून उमलते कल्पकतेची कोमल काया अन् प्रतिभेची छाया होते जेव्हा ती आतून उमलते वादळवारा चांदणपारा श्रावण मोरपिसारा होते जेव्हा ती आतून उमलते कविता कविता उरतच नाही ती आत्म्याची भाषा होते जेव्हा ती आतून उमलते द्वारा पोस्ट केलेले क्रांति येथे 4 54 am 1 comment email this blogthis share to x share to facebook share to pinterest sunday december 28 2014 हरवलेलं आभाळ चल शोधू हरवलेलं आभाळ तुझं अन् माझंही गवसेलच कुठंतरी कधीतरी क्षितिजाच्या त्या काठावर जिथं हरवलेलं सारं काही गवसतं अनायास अवचित नव्या नवलाईच्या रुपड्यात दिसेल तिथं आपलं आभाळ निळंसावळं कृष्णदेखणं कोवळ्या जावळाच्या लेकरासारखं इवलीशी मूठ चोखत खुदुखुदु हसत निळ्याशार दुलईत लपेटलेलं तुझीमाझी वाट पहाणारं आपल्याला पाहताच हात पसरून कवेत येऊ पहाणारं लाडिकशा हुंकारांनी तुझं माझं मन भारून टाकणारं मखमली स्पर्शाचं इवलं आभाळ द्वारा पोस्ट केलेले क्रांति येथे 5 53 am 1 comment email this blogthis share to x share to facebook share to pinterest लेबले मुक्तछंद tuesday january 28 2014 आयुष्या नकोसा होतसे हल्ली तुझा शेजार आयुष्या तुलाही वाटतो ना सांग माझा भार आयुष्या कुणीही कोणत्याही कारणांनी फायदा घ्यावा कशासाठी असा झालास तू लाचार आयुष्या तुला जाळून तू केल्या खुल्या वाटा प्रकाशाला दिव्यांनी माखला माथी तुझ्या अंधार आयुष्या सुखांनी ताप वाढावा व्यथांनी प्राण गोठावा तुला हा कोणता झाला नवा आजार आयुष्या नको थोटी अपेक्षा अन् नकोसे पांगळे नाते तुझा तू घे मला माझा पुरे आधार आयुष्या तुला नाकारण्याचाही नकोसा वाटतो धोका तुला सांभाळणेही जोखमीचे फार आयुष्या जरासा स्पर्श होण्याने मने रक्ताळती का रे कट्यारीची तुझ्या निष्पापतेला धार आयुष्या पुरे खंतावणे आता निरोपाच्या क्षणाआधी दिले तू जे तुझे घेऊन जा साभार आयुष्या द्वारा पोस्ट केलेले क्रांति येथे 7 49 am 2 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest लेबले गझल older posts home subscribe to posts atom subscribe to agnisakha posts atom posts all comments atom all comments total pageviews माझा पहिला पुरस्कार माझा गझलसंग्रह माझा काव्यसंग्रह labels अनुवादिता 35 आठोळी 2 कविता 204 काव्यकण 7 गझल 123 जरा हटके 2 त्रिधारा 3 भक्तिधारा 23 मुक्तछंद 22 रुबाई 14 ही कविता त्या गाण्यासाठी 4 blog archive 2015 1 october 1 आतून 2014 3 december 1 january 2 2013 67 december 2 november 6 october 1 september 5 august 17 july 6 june 4 may 3 april 4 march 7 february 4 january 8 2012 112 december 11 november 8 october 14 september 5 august 6 july 10 june 10 may 13 april 10 march 9 february 8 january 8 2011 101 december 7 november 19 october 7 september 13 august 3 july 17 june 6 may 3 april 7 march 7 february 4 january 8 2010 51 december 4 november 7 october 5 september 3 august 4 july 5 june 1 may 6 april 2 march 5 february 4 january 5 2009 106 december 5 november 8 october 8 september 10 august 5 july 10 june 25 may 19 april 9 march 7 मराठी कविता समूह क्रान्तिचं पूर्वसंचित मित्रमंडळी marathi blog vishwa मी इथेही about me क्रांति नागपूर महाराष्ट्र india मी क्रान्ति आणि रूह सुद्धा कविता माझा प्राण आहे कविता माझं आयुष्य आहे माझ्या वयाच्या १४ व्या वर्षी कविवर्य सुरेश भट यांनी गज़ल लिहिण्यासाठी मला प्रेरणा दिली हे माझं पूर्वसंचित मला आवडतं हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत काव्य साहित्य चांगुलपणा आणि देव या गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे निसर्ग फ़ुलं झाडं नद्या सागर आकाश आणि जगातील प्रत्येक चांगली वस्तू मला आवडते मी मराठी हिन्दी उर्दू लिपी नाही फक्त भाषा काव्य लिहिते कधीकधी इंग्रजी सुद्धा कधी कधी मी निराशावादी लिहिते पण तरीही मी आशावादी आहे जे होतं ते चांगल्यासाठी याची मला खात्री आहे मला आत्मशोध घ्यायला आवडतं म्हणून माझ्या उर्दू काव्यासाठी माझं तखल्लुस उपनाम आहे रूह अर्थात आत्मा तर अशी मी आणि या माझ्या कविता view my complete profile दीपज्योती २०११ watermark theme theme images by sndrk powered by blogger
|