Meta tags:
Headings (most frequently used words):
2012, sunday, saturday, july, don, panic, 16, september, 14, tuesday, 30, june, 25, march, subscribe, to, blog, archive, about, me, followers, visitors, माणसं, cdg, protocol, काउचसर्फिंग, युरोट्रीप, कहानी, में, ट्वीस्ट,
Text of the page (most frequently used words):
आणि (73), आहे (29), आम्ही (28), नाही (24), होती (24), आम्हाला (24), anish (23), होता (22), त्याने (19), होतं (17), काही (17), आता (16), त्यामुळे (16), फोन (16), cdg (16), kavin (16), चित्रपट (15), काय (15), असं (15), shall (15), म्हणजे (14), flight (14), the (13), झाली (13), एका (13), for (13), there (13), मला (12), विचार (12), आहेत (11), त्या (11), करून (11), पुन्हा (11), असा (11), म्हणून (11), and (11), not (11), case (11), 2012 (10), झालं (10), केला (10), मित्राने (9), समजलं (9), घरी (9), रात्री (9), आमच्या (8), प्रश्न (8), नंतर (8), सांगितलं (8), protocol (8), hotel (8), landing (8), paris (8), all (7), comments (7), होते (7), email (7), किंवा (7), झोरा (7), एल्विर (7), तिला (7), june (6), गोष्टी (6), झाला (6), सरळ (6), बंद (6), आली (6), गेली (6), अशा (6), कुठे (6), नव्हतं (6), होतो (6), आला (6), केलं (6), विचारलं (6), दोन (6), सगळं (6), बाहेर (6), गेलो (6), तिने (6), wait (6), बॅगा (6), माणसं (5), posted (5), बघितले (5), अनेक (5), असणार (5), त्यात (5), काहितरी (5), ट्वीस्ट (5), काम (5), शोध (5), खरं (5), ठरवलं (5), दिवस (5), वेळ (5), शेवटी (5), मध्ये (5), तेव्हा (5), काउचसर्फिंग (5), फुकट (5), लगेच (5), झालो (5), त्याच्या (5), जरा (5), करायचं (5), तिथे (5), थिबॉ (5), दिवशी (5), लोकं (5), सायकल (5), आमची (5), खोली (5), arrival (5), check (5), after (5), terminal (5), meet (5), रस्ता (5), नव्हता (5), posts (4), labels (4), कहानी (4), कथा (4), याचा (4), अजून (4), असल्यामुळे (4), त्याला (4), अशी (4), असेल (4), ज्युरी (4), माहिती (4), eurotrip (4), गेला (4), दुसऱ्या (4), plan (4), तयार (4), अनुभव (4), एकत्र (4), माणसाला (4), अमेरिकी (4), दिला (4), कोण (4), केली (4), दिली (4), बहुतेक (4), मुलगी (4), जागा (4), स्विस (4), पॅरीस (4), रेनाता (4), फ्रेंच (4), माझ्या (4), पूर्ण (4), येत (4), निघून (4), करत (4), तिच्या (4), time (4), before (4), how (4), with (4), reach (4), meets (4), mission (4), accomplished (4), hurray (4), free (4), are (4), level (4), टर्मिनल (4), reception (4), profile (3), september (3), july (3), atom (3), angry (3), men (3), दोन्ही (3), बरेच (3), येतो (3), तरी (3), पहिल्या (3), अर्थात (3), वाटत (3), मनात (3), वाटलं (3), बघायला (3), मिळालं (3), travelogy (3), करायची (3), काहीच (3), किं (3), दरिद्रता (3), सुरुवात (3), खर्च (3), यावर (3), कधी (3), कसं (3), कोणी (3), होत (3), एकदम (3), पर्यंत (3), करता (3), पुढे (3), स्थानिक (3), म्हणतात (3), होस्ट (3), याची (3), लोकांनी (3), सुरुवातीला (3), आधी (3), राहायला (3), मुलभूत (3), काहीतरी (3), द्यायला (3), तरीही (3), थोडं (3), लागला (3), एकदा (3), मुख्य (3), जाणार (3), तिथल्या (3), पर्याय (3), मित्र (3), सर्वात (3), तयारी (3), दाखवली (3), मुक्काम (3), घराची (3), दोघेही (3), चावी (3), गेले (3), गप्पा (3), छान (3), आल्या (3), परत (3), वाजता (3), स्वित्झर्लंडमध्ये (3), माणसाने (3), पोचलो (3), आले (3), वाट (3), म्हटलं (3), रूम (3), मदत (3), शब्द (3), विमानतळावर (3), details (3), can (3), colombo (3), other (3), gets (3), both (3), times (3), shuttle (3), http (3), www (3), aeroportsdeparis (3), adp (3), scripts (3), plans (3), interactifs (3), श्रीलंकन (3), पॅरिसला (3), बॅग (3), होत्या (3), सामान (3), प्रयत्न (3), भारतिय (3), अर्थातच (3), you (3), कविनने (3), सोडलं (3), कार्ड (3), desk (3), may (2), 2011 (2), march (2), subscribe (2), ब्लॉग (2), लिखाण (2), कारण (2), हल्लीच (2), linear (2), असलेले (2), इंग्रजी (2), खुला (2), शेवट (2), अशाप्रकारे (2), बघितल्यामुळे (2), आधीच (2), अंदाज (2), कहितरी (2), हवं (2), वाटायला (2), लागतं (2), कथेत (2), शिल्लक (2), अर्धा (2), तपशील (2), रहस्यपट (2), लक्ष (2), मधील (2), चर्चा (2), गुन्हेगार (2), रहातो (2), ह्या (2), सगळ्या (2), दृष्टीने (2), वगैरे (2), माझा (2), थोडा (2), भारतात (2), पद्धती (2), असतं (2), घेऊन (2), मिळाली (2), करण्यात (2), sunday (2), आम्हा (2), योजने (2), असतात (2), लोकांना (2), असे (2), दिले (2), याविषयी (2), काहीही (2), तेच (2), जायचं (2), कोणीही (2), आपला (2), काढला (2), असलेल्या (2), पंचाईत (2), वेळेला (2), वेगवेगळ्या (2), वाईट (2), परिणाम (2), saturday (2), दिलं (2), विषयी (2), त्याची (2), हेही (2), करायला (2), हवा (2), काउचसर्फिंगला (2), प्रवास (2), सर्फर (2), host (2), सोय (2), करायचा (2), मुलांना (2), त्यातून (2), आलं (2), नफा (2), कमावणारी (2), नोंदणी (2), देशात (2), देईल (2), होतेच (2), त्रास (2), हवी (2), वाचले (2), उत्तरं (2), बरं (2), असतो (2), शेंगेन (2), शंका (2), त्याचा (2), मिळाला (2), करावं (2), देशी (2), जिथे (2), विनंती (2), couch (2), पाठवल्या (2), सर्व (2), मुलीने (2), स्वत (2), ज्यांचे (2), चांगले (2), मेट्रोने (2), घेतला (2), पॅरीसचा (2), कोपरा (2), कुठल्या (2), फंडे (2), अॅपलचा (2), कसा (2), मिनिटे (2), घेउन (2), पीत (2), फ्रांस (2), झाल्या (2), कुठल्याही (2), घ्यायची (2), जाता (2), सफर (2), उशीर (2), पोचल्या (2), मागून (2), अभ्यास (2), वेळात (2), आमचा (2), घरात (2), हालचाल (2), मंडळी (2), म्हणावं (2), इथे (2), उचलला (2), गोंधळ (2), आतापर्यंत (2), बोलणं (2), कळेना (2), who (2), थोड्या (2), विचारला (2), जर्मनी (2), भिंत (2), भरली (2), तिची (2), पुस्तक (2), सुद्धा (2), शाळेत (2), बसले (2), कळलं (2), किती (2), जाणीव (2), नावाचा (2), माणूस (2), बघता (2), वाटेल (2), प्रोटोकॉल (2), पॅरीसला (2), विमान (2), तास (2), जवळ (2), वेगवेगळे (2), rfc (2), this (2), that (2), meeting (2), point (2), sit (2), one (2), any (2), conditions (2), goes (2), sends (2), him (2), checks (2), baggage (2), collection (2), figure (2), out (2), metro (2), service (2), gate (2), exit (2), gates (2), map (2), magnifying (2), glass (2), tool (2), did (2), reasons (2), allowed (2), missed (2), delayed (2), lands (2), applicable (2), counters (2), hsbc (2), hours (2), from (2), 3hrs (2), mins (2), near (2), part (2), bar (2), 2nd (2), airlines (2), एअरलाईन्सचं (2), प्रमाणे (2), वरून (2), पोलिस (2), पट्टयावर (2), फिरत (2), नविन (2), येईल (2), बोहनी (2), जाताना (2), अधिकाऱ्याला (2), निष्फळ (2), ठरला (2), घेतलं (2), लोकांमध्ये (2), गूगलचा (2), शर्ट (2), घातला (2), गूगलकन्या (2), स्वित्झर्लंड (2), चेक (2), गाडी (2), टोल (2), सहभागी (2), छोट्या (2), गाडीत (2), आमच्याकडे (2), इकडे (2), तिकडे (2), बाई (2), आहोत (2), लिहून (2), घेतली (2), thank (2), देता (2), येणार (2), don (2), panic (2), watermark, theme, powered, blogger, visitors, followers, view, complete, about, august, october, 2010, january, blog, archive, home, older, filmology, बर्, याच, दिवसांनी, करतोय, लिहीण्यास, विद्या, बालन, असलेला, हिंदी, १९५७, सालचा, चांगलेच, कथांमध्ये, कहिही, साम्य, non, स्पॅनिश, थोडेसा, चित्रपटात, चित्रपटामध्ये, रहस्यमय, गृहित, धरल्यावर, इतकच, रहातं, बघितल्यावर, त्याचाही, रहातात, बारीक, सारीक, थोडेसे, संदर्भ, निदान, बघेपर्यंत, कथेकडे, द्यावं, ज्युरींमधली, ज्युरीरूम, आरोपीला, विरुद्ध, ठरवण्यापासून, सुरू, झालेली, एकमताने, निर्दोष, ठरवते, मिनिटांमध्येच, समजते, ज्युरीची, पार्श्वभूमी, त्यांच, मतपरिवर्तन, महत्त्वाच्या, आहेतच, कथेच्या, तपशीलाचाच, भाग, imdb, बघताना, नायक, तोच, कदचित, तर्कही, मनातल्या, मांडले, त्यातलं, काहिच, निघालं, त्या्मुळे, भ्रमनिरास, inception, edge, heaven, असही, तसही, एकंदरीत, फारच, लागले, रहस्यप्रधान, चित्रपटांमध्ये, क्लिष्ट, गुंतागंतीची, आवश्यक, रूका, हुआ, फ़ैसला, हिंदीत, रूपांतरही, याचं, फ़ार, ज्युरींमध्ये, निवड, असती, न्यायालयाच, भत्ता, त्यानिमित्ताने, भारतातील, पद्धतीबद्दल, घेताना, रंजक, ऐतिहासिक, खटल्यापसून, बनण्याची, आपली, संधी, कायमची, nanavati, state, maharashtra, में, germany, गेल्या, वर्षीच, मित्रांचा, चंद्रावर, जाव, असाही, बाजार, जगप्रदक्षिणा, टाकावी, वचने, च्या, धरतीवर, योजना, प्रत्यक्षात, कबन, पार्कातसुद्धा, गेलेलो, वर्षी, श्रीलंकेपासून, मार्चमध्ये, जायचा, मांडला, बारगळला, ढासू, सार, पास, everest, base, camp, भूतान, लिहिलं, व्हायचं, आश्चर्याची, गोष्ट, एकमत, कुठेही, गेलं, जुनाच, बूट, युरोपला, जाऊया, ऐकल्यावर, पटकन, एतद्देशीय, अमेरिकेच्या, फॉरीन, idea, उचलून, धरली, माझी, मूड, खरंच, करावा, लागणार, मनाचा, हिय्या, जाण्याच, युरोट्रीपची, कहाणी, वर्णन, कालानुक्रमे, एकमेकांशी, सम्बंध, घटना, लिहिले, लडाखप्रमाणे, याही, prime, mover, सांगितल्यामुळेच, लिखाणामुळे, समस्त, मानव, जातीवर, बरे, होतील, त्यासाठी, सुहासला, जबाबदार, धरण्यात, यावं, सुहास, युरोट्रीप, काउचसर्फिंगविषयी, कधीतरी, शाळा, कॉलेजात, असताना, वाचलं, आपल्यासाठी, नसतात, समजून, सोडून, वाचताना, काउचसर्फिंगशी, स्पर्धा, ultra, low, budget, युरोट्रीपसाठी, पर्यायांचा, प्रवासी, माणसाच्या, पाहुण्यासारखा, काउचसर्फिंगच्या, परिभाषेत, करणाऱ्या, surfer, संकेतस्थळ, यांची, गाठ, घालून, द्यायचं, करतं, 1999, साली, कॅसी, फेंटन, casey, fenton, नामक, विद्यार्थ्याला, आईसलंडच, तिकीट, प्रवासाची, झाल्यावर, राहायच, आईसलंडमधील, विद्यापीठातील, spam, 1500, प्रतिसाद, जन्माला, धर्मादाय, संस्था, काउचसर्फिंगची, कंपनी, साहजिकच, साशंक, अश्या, राहण्यामध्ये, सुरक्षेची, हमी, परक्या, परक्याच्या, स्वतःच्या, अनोळखी, दिलंच, कशी, भाषा, समजेल, सगळे, राहणार, त्यांना, देणं, योग्य, फुल, फुलाची, पाकळी, भेटवस्तू, असले, उपप्रश्न, मित्रांनीसुद्धा, कल्पना, हसण्यावारीच, नेली, नकारात्मकच, पौष्टिक, तत्त्वानुसार, faqs, उपप्रश्नांची, अगदी, विस्तृत, त्यावरच्या, गटांचा, शहरांचा, देशांचा, स्वतःचा, बंगळूरू, मुंबई, युरोप, गटांत, शामिल, आपल्यासारखे, गर्दीचा, आधार, ईश्वराहून, मोठा, हेच, विसाची, समाधान, बराच, उपयोग, विसा, मित्राला, स्वभावानुसार, open, everything, चेंडू, परतवला, आमचं, प्रवासाचं, वेळापत्रक, प्रकाशित, असंच, लोकांचे, profiles, प्रश्नांनी, डोकं, काढलं, मुलगे, सुरक्षेच्या, असणं, मध्यम, मार्ग, विवाहित, राहणारे, लोक, सगळा, पॅरीससाठी, requests, बाजुने, कारणास्तव, अर्ज, फेटाळून, लावले, कोच, काउचसर्फिंगचा, आपोआपच, मिटला, दिवसातच, here, हून, जागेची, उपलब्धता, कळवली, अपयशाने, खचून, गेल्यावर, मोठच, दुसरा, पाठवायचो, आपल्याला, जुळेल, पद्धतीने, पडताळणी, ज्यांच्याविषयी, नोंदवले, अशांना, स्वतःच, नवीन, आम्हीही, नवे, कळत, आपलं, टाकू, खरच, मागाहून, बघू, तात्पुरता, होकार, कळवून, टाकला, first, kill, शहाणा, जगातील, लोकप्रिय, पर्यटन, स्थळ, पर्यटक, येतात, मिळणं, कठीण, पॅरीसच्या, शहरापासून, दूर, जोडलेल्या, ठिकाणी, renata, thibault, मंडळींनी, हॉटेलमध्ये, त्यांच्याकडे, राहायचं, ठरलं, म्युनिक, स्टुटगार्ट, प्राग, लुसर्न, इथेही, मुळची, हंगेरियन, थिबॉच, आयुष्य, मधेच, गेलेलं, बनवून, जायचे, बघायचं, crêpe, croissant, याचेही, तसेच, पंखा, लुव्रेमध्ये, अॅपलच, दूकान, ऑपेराच्या, झेंडा, मिळाले, चावीच, अवाक, शेजाऱ्यांना, देताना, करतो, यांनी, पाहिलेल्या, देवून, टाकली, सगळ्यात, लक्षात, राहिलं, yeah, यॅऽह, काहीसा, उच्चार, etcetera, बोलीभाषेतील, वापर, ट्रीपमध्ये, मजा, वापरला, बार, महाशय, वाईनसुद्धा, नाहीत, मारता, हंगेरी, भारत, अमेरिका, बऱ्याच, शेवटची, मेट्रो, चुकल्यामुळे, सायकलचा, निवडला, स्टँडवरून, स्टँडवर, व्यवस्था, महाशयांनी, फिरवलं, आयफेल, टॉवर, सीन, नदी, अमेरिकेतल्या, स्वतंत्र्य, देवीची, प्रतिकृती, दाखवल्या, अविस्मरणीय, ज्यांना, लुसर्नला, पोचू, अपेक्षा, कारणांचा, लुसर्नपासून, तासाभराच्या, अंतरावर, झालाच, एल्विरला, सांगायचं, खूप, आजची, रात्र, काढतो, उद्या, भल्या, इथेच, दाखवलं, झोपायची, माफी, झोपायला, झोपली, उठलो, कामावर, झोराशी, भेट, कॅन्सर, रुग्णांच्या, मानसिकतेविषयी, तीही, थोड्याच, कॉलेजला, ताब्यात, देऊन, तीन, दिवसांचं, जागरण, होतंच, रोज, चालणं, याने, थकून, भटकल्यावर, कोणीच, पलंगावर, पडलो, झोप, लागली, पत्ताच, लवकर, उठून, पडायचा, आटपून, बसलो, दिसेना, पहावी, वाजून, दिसत, नव्हती, एल्विरने, मीच, झोपमोड, झालेल्या, महाशयांना, कोणाशी, बोलतायत, कवीनने, basically, guy, staying, your, house, गप्पांमध्ये, सहज, करतोस, प्लंबर, क्षण, छानच, करीना, गणित, विषयांचे, शिक्षक, होण्यासाठी, शिकत, मुनिकला, तिच्याकडे, त्यादिवशी, युरोकपमधील, नेदरलंड, सामना, मित्रांकडे, मित्राची, लिविंग, हॉल, पुस्तकांनी, भरून, दुसरी, dvd, मतानुसार, धूम्रपान, वाचलेल्या, पैशातून, करीनाच्या, अभ्यासाची, पुस्तकं, गणिताचं, उघडून, बघितलं, जर्मनमध्ये, algebra, रेषीय, बीजगणित, म्हणताना, विचित्र, वाटतंय, सेरा, शिक्षिका, तिचे, मैत्रिणी, सिगरेट, बीअर, इथल्या, नक्की, शिकवतात, पडला, घाना, महिने, स्वयंसेवी, संस्थेमार्फत, शिक्षिकेच, अझरबैजान, मधेही, बोलण्यातून, विकसित, देशांत, गृहीत, धरल्या, जातात, अविकसित, सामान्य, गोष्टींसाठीसुद्धा, श्रम, करावे, लागतात, पुरेपूर, तिच्याच, घरामध्ये, खालच्या, मजल्यावर, स्टेफान, विमा, कंपनीमध्ये, करणारा, राहत, ग्रँड, कॅन्यन, लास, वेगास, लॉस, एंजेलिस, हार्ले, डेविडसन, आपल्या, वडिलांबरोबर, सोल्केम, परतताना, सोल्केमच्या, काळी, कुछ, गया, काले, लोगों, एरिया, क्राईम, रेट, कितना, ज्यादा, ऐकवलं, खोलीत, रहात, कोणाही, द्यायची, संपूर्ण, नवा, नाविन्यपूर्ण, गोष्टीं, ऐकायला, मिळाल्या, नव्या, शहरात, वावरताना, अप्रसिद्ध, वैशिष्ट्यपूर्ण, लोकांच्या, आयुष्यात, डोकावून, couchsurfing, com, airbnb, techcrunch, tuesday, तंत्रज्ञान, एखाद्या, चित्रपटाचं, नाव, suspense, thriller, चित्रपटातील, सांकेतिक, वस्तुत, चार्ल्स, गॅाल, charles, gaulle, भेटायचं, दोघांकडेही, नव्हते, मिनिटेच, दोघांच्या, विमानांच्या, पोचण्याच्या, तासांचं, अंतर, विमानं, टर्मिनलला, उशीरा, पोचल, सगळ्याचा, chat, केल्यावर, जबाबदारी, माझ्यावर, सोपवली, हापिसात, पायऱ्या, लिहिल्या, यासाठी, संच, झाले, स्पष्ट, शब्दात, लिहील, ड्राफ्ट, ietf, कडे, प्रमाणिकरणासाठी, पाठवावा, following, looks, okay, add, take, printout, tomorrow, seriously, exhausted, writing, 20pm, 1st, space, comes, early, inside, restaurant, leaving, airport, drop, describing, reached, person, precedence, over, possible, have, combination, such, method, followed, 5pm, 3pm, flights, land, their, respective, scheduled, around, 30am, status, 30pm, close, two, travelex, multiple, etc, cafee, ritazza, pharmacy, baby, care, t1_, cdgval, val, t1_a, bank, counter, follow, only, sheraton, lobby, second, floor, rer, tgv, station, t2e, t2e_, barestaurants, resto, entrance, illy, iiiy, italian, fast, food, joint, corridor, nearest, public, seats, 40am, rilankan, 563, local, set, world, clock, mobile, india, san, francisco, srilankan, 172, bangalore, 00pm, 0085, air, france, अनिल, अवचटांचा, लेख, संग्रह, त्यांची, क्षमा, पोचलं, सागळं, आवरून, सीमा, immigration, border, police, अाहे, कस्टमनंतर, घ्यायला, नेहमीप्रमाणे, आपआपल्या, घेत, वेळाने, येणं, थांबलं, यायची, बघत, अस्मादिकही, त्यामधलेच, फलकावर, संदेश, आवरलंय, थाई, एअरचं, हरवणं, पहिल्याच, जणांमध्ये, गोरे, काळे, बाकी, सावळे, गर्दीच्या, आधाराची, वयस्कर, गोऱ्या, बाईने, उत्तर, सवयीप्रमाणे, संभाषण, ऐकायचा, सेवानिवृत्त, शासकिय, अधिकारी, त्यांनी, शुद्ध, ईंग्रजीमधे, अधिकाऱ्याशी, कोणालाही, काहिही, फक्त, इतकी, वाटतयं, अधिकाऱ्याने, फोनाफोनी, केल्यवर, आलयं, ट्रॉलीमधला, डब्बा, उघडायचा, राहिला, उघडलाय, भले, शाब्बास, मिनीटांमध्ये, प्रत, काढली, निघालो, नुसार, जायची, शटल, शोधत, माझं, वेधून, चिंकी, एशियन, प्रकारांत, मोडत, वंशवादी, वापरण्यापेक्षा, म्हणतो, १च्या, शटलच्या, फलाटाकडे, जाणाऱ्या, दरवाजापाशी, आलो, दरवाजातून, आलेल्या, शटलमधील, माणसांमधून, मुलगा, घाईघाईने, गूगलकन्येला, मिठी, मारली, तिचा, भाऊ, तक्रारीच्या, सूरांत, ईतका, ऊशीर, grossly, underestimated, गूगलकन्येने, could, बिनडोक, विचारू, नयेत, थोडंच, protocolच, महत्त्व, जाणवलं, अॉस्ट्रिया, प्रजासत्ताक, पाचही, देशांमध्ये, जास्त, आवडली, सगळी, मदतीला, तत्पर, सहन, करूनसुद्धा, तुम्हाला, करतात, सुरूवातच, पोलिसापासून, फ्रांसची, हद्द, ओलांडून, जर्मनीत, शिरली, नसणारा, शोधला, प्रवेश, करताच, चेकपोस्ट, लागलं, करारामध्ये, युरोझोन, युरोपियन, युनियनमध्ये, थोडी, तपासणी, असावेत, पोलिसाने, प्रथम, पासपोर्ट, त्यालाच, नसलेला, त्यानेही, दाखवला, एल्विरचं, शोधताना, नाकीनऊ, जवळजवळ, खेड्यात, दिसणार, अवस्था, बघितली, बसून, दाखवायची, पत्त्यावर, लिहिलच, लौटरब्रूनेनहून, lauterbrunnen, येताना, ब्रुनेनला, तिथली, मायाला, वाटेत, रेल्वे, स्थानकांत, नाणी, क्रेडीट, स्विकारत, सूचना, चित्रे, यांतून, पामरांना, अर्थबोध, प्रीपेड, कविन, बसला, पद्धतीप्रमाणे, फिरून, दिसतंय, घ्यायचा, तेवढ्यात, बुवा, खाली, उतरली, तिचीच, बघतोय, वाटू, नये, excuse, करू, शकेन, चौकशी, पहिला, ईंग्रजी, वेगळया, भाषेत, यावेळेला, माझ्याकडून, नंबर, स्वतः, लागल्यावर, माझ्याकडे, उत्तम, फोनही, पैसेही, त्याच, गाडीतल्या, बुवाची, गाडीतून, नकाशा, गाडीच्या, बॉनेटवर, पसरला, आपण, ब्रुनेन, कुठले, exits, घ्यायचे, कविनच्या, मधे, निघायच्या, होतीच, बुवांचा, मान, राखायचा, कागदावर, मार्गस्थ, दूसऱ्या, माया, श्विझमधील, मध्ययुगीन, वजा, संग्रहालय, दाखवायला, वेळी, एकच, भारतातून, आलोय, म्हटल्यावर, तिकीटसुद्धा, प्रश्नांची, अॉस्ट्रीयात, आमच्यावर, हॉटेल, जवळच्या, बजेटमधे, बसणाऱ्या, हॉटेलला, कोणितरी, रात्रीसाठी, पलिकडच्या, झालंय, लाच, इनची, दूपारी, अवाक्, वरच, रात्रीसाठीसुध्दा, अॉस्ट्रीयन, सरंजामशाही,
Text of the page (random words):
तिकडे फिरून कोणी दिसतंय का याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेवढ्यात एक गाडी आली एक बुवा आणि एक बाई आत बसले होते बाई खाली उतरली मी तिचीच वाट बघतोय असं तिला वाटू नये म्हणून जरा इकडे तिकडे करून तिला excuse me म्हटलं मी फोन कसा करू शकेन याची चौकशी केली अर्थातच पहिला प्रयत्न निष्फळ ठरला तिला ईंग्रजी येत होतं पण तिला काही कळलं नाही पुन्हा जरा वेगळया भाषेत तेच विचारलं यावेळेला तिला समजलं तिने माझ्याकडून नंबर घेतला आणि स्वतः फोन केला फोन लागल्यावर माझ्याकडे दिला उत्तम झालं फोनही झाला आणि पैसेही वाचले आता मदत करायची वेळ त्याच गाडीतल्या बुवाची होती आम्ही खरं तर रस्ता विचारला नव्हता पण त्याने गाडीतून नकाशा बाहेर काढला गाडीच्या बॉनेटवर पसरला आपण कुठे आहोत ब्रुनेन कुठे आहे कुठले exits घ्यायचे ते सांगितलं कविनच्या फोन मधे ही आम्ही निघायच्या आधी लिहून घेतली होतीच पण बुवांचा मान राखायचा म्हणून पुन्हा एका कागदावर लिहून घेतली thank you thank you म्हणून आम्ही मार्गस्थ झालो दूसऱ्या दिवशी माया श्विझमधील मध्ययुगीन घर वजा संग्रहालय दाखवायला घेऊन गेली खरं म्हणजे आम्ही गेलो त्या वेळी ते बंद असतं पण आम्ही एकच दिवस आहोत भारतातून आलोय म्हटल्यावर तिने आम्हाला आत सोडलं वर तिकीटसुद्धा घेतलं नाही आमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली अॉस्ट्रीयन सरंजामशाही अॉस्ट्रीयात आम्हाला आमच्यावर रात्री १० वाजता हॉटेल रूम घ्यायची वेळ आली आम्ही एका जवळच्या आणि मुख्य म्हणजे आमच्या बजेटमधे बसणाऱ्या हॉटेलला फोन केला कोणितरी फोन उचलला कविनने सांगितलं की एका रात्रीसाठी खोली हवी आहे पलिकडच्या माणसाने सांगितलं रूम आहे पण आता देता येणार नाही कारण आता reception बंद झालंय आम्ही reception desk लाच फोन केला होता कविनने पुन्हा विचारलं त्याने सांगितलं चेक इनची वेळ दूपारी २ ते रात्री ९ आहे त्यामुळे आता खोली देता येणार नाही आम्ही दोघेही अवाक् झालो हा माणूस reception desk वरच होता आणि तरीही reception desk बंद आहे म्हणून तो आम्हाला एका रात्रीसाठीसुध्दा खोली द्यायला तयार नव्हता posted by anish at 11 04 pm no comments labels eurotrip travelogy saturday 14 july 2012 cdg protocol cdg protocol हे खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाचं नाव वाटेल किंवा suspense thriller चित्रपटातील काहीतरी सांकेतिक शब्द वाटेल वस्तुत हा प्रोटोकॉल म्हणजे मी आणि माझा मित्र पॅरीसला चार्ल्स द गॅाल charles de gaulle विमानतळावर कसं भेटायचं याचा प्रोटोकॉल होता पॅरीसला विमानतळावर दोघांकडेही फोन नव्हते विमानतळावर wi fi 15 मिनिटेच फुकट होतं दोघांच्या विमानांच्या पोचण्याच्या वेळात 3 4 तासांचं अंतर होतं दोन्ही विमानं वेगवेगळ्या टर्मिनलला जाणार होती त्यात पुन्हा विमान उशीरा पोचल तर काय करायचं या सगळ्याचा विचार करून तास भर chat केल्यावर मित्राने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली मग मी हापिसात जवळ जवळ 3 4 तास खर्च करून काही पायऱ्या लिहिल्या मी काय करायचं आणि मित्राने काय करायचं यासाठी दोन वेगवेगळे संच झाले ते सगळं एकत्र करून जे काही स्पष्ट शब्दात लिहील तो ड्राफ्ट म्हणजे हा cdg protocol आमचा विचार आहे की तो ietf कडे प्रमाणिकरणासाठी पाठवावा rfc 2012 following is a rfc for this protocol if it looks okay the add hotel details and to it so that i can take printout tomorrow seriously i am exhausted by this protocol writing all times are local times in paris set world clock in mobile for india paris and sf kavin s flight air france af 0085 san francisco to paris cdg arrival time in paris 2 00pm 2nd june 2012 anish flight srilankan airlines ul 172 bangalore colombo arrival time in colombo 10 20pm 1st june 2012 s rilankan airlines ul 563 colombo paris cdg arrival time in paris 9 40am 2nd june 2012 1 at the meeting point if there is no space to sit one who comes early can sit at one of the nearest public seats not inside any restaurant 2 in any case before leaving airport we shall check email and drop an email to other describing how can he be reached by other person 3 case 1 and 2 gets precedence over all other conditions i e it is possible to have all or combination of conditions 1 2 4 5 in such a case method for 1 or 2 shall be followed that is to go to hotel and wait there case 1 if anish s flight is not landing before 5pm kavin goes to the hotel he sends an email with details of how to reach hotel anish meets him there mission accomplished hurray case 2 kavin s flight is not landing before 3pm anish goes to the hotel he sends an email with details of how to reach hotel anish meets him there mission accomplished hurray case 3 both flights land to cdg at their respective scheduled times after all checks baggage collection anish shall be free at around 11 30am he shall check the status of kavin s flight he shall figure out free shuttle metro service to terminal 2e he shall reach terminal 2e arrival gate he shall wait for kavin at exit of gates there is iiiy italian bar fast food joint in the corridor anish shall wait at the entrance of illy for kavin for 2 hours from landing of kavin s flight check map with magnifying glass tool http www aeroportsdeparis fr adp scripts plans interactifs uk cdg t2e t2e_ a barestaurants bar resto if we did not meet there for reasons anish is not allowed to be there or we missed part 2 we go to rer tgv station 2 meet there in sheraton lobby on second floor if we do not meet for 3hrs 30 mins after landing of kavin s flight we both go to the hotel kavin meets anish mission accomplished hurray case 4 anish s flight gets delayed and lands in paris cdg before landing of kavin s flight follow case 3 only if case 1 and 2 are not applicable case 5 anish s flight gets delayed and lands in paris cdg after landing of kavin s flight and case 1 and 2 are not applicable after all checks baggage collection kavin shall be free at 3 30pm he shall check anish s flight he shall figure out free shuttle metro service to terminal 1 he shall reach terminal 1 arrival gate at level 3 he shall wait for anish at exit of gates there is hsbc bank counter near meeting point close to two travelex counters there are multiple hsbc counters on level 1 2 etc so kavin shall go to level 3 kavin shall wait there for anish for 2 hours from landing of anish s flight check map with magnifying glass tool http www aeroportsdeparis fr adp scripts plans interactifs uk cdg t1 t1_a if we did not meet there for reasons kavin is not allowed to be there or we missed part 2 we go to level 0 cdg val http www aeroportsdeparis fr adp scripts plans interactifs uk cdg t1 t1_ cdgval of terminal 1 we wait at cafee ritazza near pharmacy and baby care if we do not meet for 3hrs 30 mins after landing of anish s flight we both go to the hotel kavin meets anish mission accomplished hurray posted by anish at 4 14 pm 4 comments labels eurotrip plan travelogy तंत्रज्ञान tuesday 3 july 2012 काउचसर्फिंग काउचसर्फिंगविषयी मी कधीतरी शाळा कॉलेजात असताना वाचलं होतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नसतात असं समजून सोडून दिलं पुढे techcrunch वाचताना airbnb विषयी समजलं आणि काउचसर्फिंगशी त्याची सरळ स्पर्धा आहे हेही समजलं आमच्या ultra low budget युरोट्रीपसाठी या पर्यायांचा विचार करायला हवा असं वाटलं काउचसर्फिंग म्हणजे प्रवासी एका स्थानिक माणसाच्या घरी पाहुण्यासारखा रहातो काउचसर्फिंगला काउचसर्फिंगच्या परिभाषेत cs म्हणतात असा प्रवास करणाऱ्या माणसाला सर्फर surfer म्हणतात आणि स्थानिक माणसाला होस्ट host म्हणतात couchsurfing com हे संकेतस्थळ अशा सर्फर आणि होस्ट यांची गाठ घालून द्यायचं काम करतं याची सुरुवात झाली 1999 साली कॅसी फेंटन casey fenton नामक अमेरिकी विद्यार्थ्याला आईसलंडच तिकीट मिळालं प्रवासाची सोय झाल्यावर राहायच काय करायचा असा प्रश्न आला त्याने सरळ आईसलंडमधील विद्यापीठातील मुलांना email spam केलं 1500 मधील 50 लोकांनी प्रतिसाद दिला त्यातून काउचसर्फिंग जन्माला आलं सुरुवातीला ती नफा न कमावणारी धर्मादाय संस्था होती पण हल्लीच 2011 मध्ये काउचसर्फिंगची नफा कमावणारी कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली साहजिकच मी सुरुवातीला साशंक होतो अश्या राहण्यामध्ये सुरक्षेची काय हमी एक तर परक्या देशात आणि परक्याच्या घरी काही झालं तर आधी असं स्वतःच्या घरी अनोळखी माणसाला कोण राहायला देईल दिलंच तर सोय कशी असेल भाषा समजेल की नाही असे सगळे मुलभूत प्रश्न होतेच वर पुन्हा मग फुकट राहणार तर त्यांना त्रास देणं योग्य नाही काहीतरी फुल न फुलाची पाकळी भेटवस्तू द्यायला हवी असले उपप्रश्न पण होतेच 1 2 मित्रांनीसुद्धा कल्पना हसण्यावारीच नेली त्यामुळे सुरुवातीला मत नकारात्मकच होतं पण तरीही फुकट ते पौष्टिक तत्त्वानुसार मी नोंदणी केली आपला profile तयार केला faqs वाचले मुलभूत आणि उपप्रश्नांची अगदी विस्तृत उत्तरं दिली होती थोडं बरं वाटलं नंतर त्यावरच्या गटांचा शोध लागला बहुतेक शहरांचा आणि देशांचा स्वतःचा गट असतो मी लगेच बंगळूरू मुंबई आणि युरोप अशा गटांत शामिल झालो त्यात एक समजलं की आपल्यासारखे बरेच जण आहेत गर्दीचा आधार ईश्वराहून मोठा असतो हेच खरं शेंगेन विसाची माहिती आणि शंका समाधान करायला त्याचा बराच उपयोग झाला एकदा विसा मिळाला आणि मग पुन्हा मुख्य प्रश्न आला काउचसर्फिंग करावं की नाही मी पुन्हा देशी अमेरिकी मित्राला विचारलं त्याने त्याच्या स्वभावानुसार i am open to everything असं म्हणून चेंडू परतवला मग मी cs वर आमचं प्रवासाचं वेळापत्रक प्रकाशित केलं आणि असंच जिथे जिथे जाणार तिथल्या लोकांचे profiles बघायला सुरुवात केली पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांनी डोकं वर काढलं आम्ही दोन मुलगे जाणार तर कोण मुलगी राहायला जागा देईल आम्हाला पण सुरक्षेच्या दृष्टीने मुलगी असणं आम्हाला बरं वाटत होतं पुन्हा पंचाईत मग मध्यम मार्ग म्हणून विवाहित किंवा एकत्र राहणारे लोक हा पर्याय होता असा सगळा विचार करून मी पॅरीससाठी काही विनंती couch requests पाठवल्या मित्राने त्याच्या बाजुने काही पाठवल्या सर्व लोकांनी काही ना काही कारणास्तव सर्व अर्ज फेटाळून लावले आम्हाला कोच द्यायला कोणीही तयार नव्हतं त्यामुळे काउचसर्फिंगचा प्रश्न आपोआपच मिटला 2 3 दिवसातच मला email आला की here is my couch एका स्विस मुलीने आम्हाला स्वत हून जागेची उपलब्धता कळवली होती पहिल्या अपयशाने खचून गेल्यावर हे मोठच यश होतं दुसरा प्रश्न आला मी विनंती पाठवायचो ते जरा विचार करून आपल्याला सगळं जुळेल अशा पद्धतीने ज्यांचे profile पडताळणी झाली आहे ज्यांचे अनेक मित्र आहेत ज्यांच्याविषयी लोकांनी चांगले अनुभव नोंदवले आहेत अशांना ही मुलगी स्वतःच काउचसर्फिंगला नवीन होती आम्हीही नवे त्यामुळे काय करावं कळत नव्हतं मी आपलं आता हो म्हणून टाकू खरच वेळ आली तर काय करायचं ते मागाहून बघू असा विचार करून तात्पुरता होकार कळवून टाकला first kill नंतर मी जरा शहाणा झालो पॅरीस हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे त्यामुळे तिथे बरेच पर्यटक येतात आणि त्यामुळे कोणी host मिळणं कठीण आहे हे समजलं त्यामुळे मी पॅरीसच्या मुख्य शहरापासून थोडं दूर पण मेट्रोने जोडलेल्या ठिकाणी शोध घेतला आणि यश मिळालं रेनाता renata आणि थिबॉ thibault या मंडळींनी तयारी दाखवली पहिल्या दिवशी हॉटेलमध्ये मुक्काम करून नंतर 2 दिवस त्यांच्याकडे राहायचं असं ठरलं नंतर म्युनिक स्टुटगार्ट प्राग लुसर्न इथेही लोकं मिळाली रेनाता आणि थिबॉ रेनाता ही मुळची हंगेरियन आणि थिबॉच सगळं आयुष्य पॅरीस मधेच गेलेलं त्यामुळे त्याला पॅरीसचा कोपरा न कोपरा माहिती होता त्याने लगेच आम्हाला plan बनवून दिला कुठल्या मेट्रोने कुठे जायचे काय बघायचं हे सगळं सांगितलं फ्रेंच crêpe किंवा croissant कुठे चांगले असतात याचेही फंडे दिले तसेच तो अॅपलचा पंखा असल्यामुळे त्याने लुव्रेमध्ये कसं अॅपलच दूकान आहे ऑपेराच्या बाहेर कसा अॅपलचा झेंडा आहे हेही फंडे मिळाले आणि त्याने आम्हाला त्याच्या घराची चावीच दिली आम्ही दोघेही दोन मिनिटे अवाक झालो आम्ही शेजाऱ्यांना चावी देताना विचार करतो आणि यांनी कोण कुठल्या कधी न पाहिलेल्या लोकांना सरळ घराची चावी देवून टाकली माझ्या सगळ्यात लक्षात राहिलं ते म्हणजे त्याचा yeah चा यॅऽह असा काहीसा उच्चार आणि etcetera चा बोलीभाषेतील वापर जो आम्ही पुढे पूर्ण ट्रीपमध्ये मजा म्हणून वापरला दुसऱ्या रात्री रेनाता आणि थिबॉ आम्हाला बार मध्ये घेउन गेले आणि आम्हाला शोध लागला की हे फ्रेंच थिबॉ महाशय वाईनसुद्धा पीत नाहीत पण तिथे गप्पा छान मारता आल्या पॅरीस फ्रांस हंगेरी भारत आणि अमेरिका अशा बऱ्याच गप्पा झाल्या रात्री शेवटची मेट्रो चुकल्यामुळे आम्हाला बस किंवा सायकल हे दोन पर्याय होते आम्ही सायकलचा पर्याय निवडला कुठल्याही सायकल स्टँडवरून सायकल घ्यायची आणि कुठल्याही सायकल स्टँडवर परत करायची अशी व्यवस्था मग थिबॉ महाशयांनी आम्हाला पॅरीस फिरवलं आयफेल टॉवर सीन नदी अमेरिकेतल्या स्वतंत्र्य देवीची प्रतिकृती अशा गोष्टी जाता जाता दाखवल्या ती सायकल सफर अविस्मरणीय झाली झोरा आणि एल्विर सर्वात वाईट अनुभव ज्यांना आम्ही दिला असं आम्हाला वाटत ते म्हणजे झोरा आणि एल्विर आम्ही लुसर्नला रात्री 8 9 वाजता पोचू अशी आमची अपेक्षा होती अनेक कारणांचा एकत्र परिणाम असा झाला की रात्री 11 पर्यंत आम्ही स्वित्झर्लंडमध्ये लुसर्नपासून तासाभराच्या अंतरावर होतो उशीर तर झालाच होता तेव्हा आम्ही एल्विरला फोन करून सांगायचं ठरवलं की आम्हाला खूप उशीर होतो आहे तर आम्ही आता येत नाही आजची रात्र आम्ही कुठे तरी काढतो आणि उद्या येतो त्या भल्या माणसाने लगेच सांगितलं की इथेच या मी जागा आहे शेवटी आम्ही रात्री 12 30 पर्यंत त्याच्या घरी पोचलो त्याने पोचल्या पोचल्या आम्हाला घर दाखवलं झोपायची जागा दाखवली आणि घराची चावी दिली आमची माफी मागून तो झोपायला गेला झोरा आधीच झोपली होती दुसऱ्या दिवशी मी उठलो तर एल्विर कामावर निघून गेला होता झोराशी भेट झाली ती काहीतरी अभ्यास करत होती कॅन्सर रुग्णांच्या मानसिकतेविषयी अभ्यास करत होती तीही थोड्याच वेळात कॉलेजला निघून गेली पूर्ण घर आमच्या ताब्यात देऊन ते दोघेही निघून गेले होते दोन तीन दिवसांचं जागरण झालं होतंच आणि रोज चालणं प्रवास याने थकून गेलो होतो पूर्ण दिवस भटकल्यावर रात्री 8 30 9 ला घरी पोचलो तर घरी कोणीच नव्हतं मी पलंगावर पडलो आणि मला झोप लागली एल्विर आणि झोरा कधी आले आणि काय याचा मला काही पत्ताच लागला नाही दुसऱ्या दिवशी लवकर उठून बाहेर पडायचा असा आमचा विचार होता आम्ही सगळं आटपून बसलो पण घरात काहीच हालचाल दिसेना मंडळी बाहेर गेली म्हणावं तर खोली बंद होती आम्ही वाट पहावी असं ठरवलं आता नऊ वाजून गेले होते इथे तर काहीच हालचाल दिसत नव्हती शेवटी माझ्या मित्राने फोन करायचं ठरवलं की हे घरात आहेत कि नाही त्याने फोन केला आणि एल्विरने उचलला गोंधळ असा झाला की आतापर्यंत सगळं बोलणं मीच केलं होतं त्यामुळे झोपमोड झालेल्या एल्विर महाशयांना कळेना ते कोणाशी बोलतायत शेवटी माझ्या मित्राने कवीनने सांगितलं basically i am the guy who is staying in your house नंतर एल्विर आणि झोरा बाहेर आले आमच्या थोड्या गप्पा झाल्या गप्पांमध्ये मी त्याला सहज विचारला कि तू काय करतोस त्याने सांगितलं की तो प्लंबर आहे मी दोन क्षण कळेना की काय म्हणावं मी छान छानच म्हटलं करीना इंग्रजी आणि गणित या विषयांचे शिक्षक होण्यासाठी ती शिकत होती आम्ही मुनिकला तिच्याकडे गेलो त्यादिवशी युरोकपमधील जर्मनी नेदरलंड सामना होता त्यामुळे ती आम्हाला घेउन तिच्या मित्रांकडे गेली तिच्या मित्राची लिविंग रूम किंवा हॉल होता त्याची एक भिंत पूर्ण पुस्तकांनी भरून गेली होती आणि दुसरी भिंत cd dvd ने भरली होती त्याच्या मतानुसार तो धूम्रपान करत नाही त्यामुळे वाचलेल्या पैशातून त्याने ती खोली भरली होती करीनाच्या घरी तिची अभ्यासाची पुस्तकं होती त्यात गणिताचं पुस्तक होतं उघडून बघितलं तर ते जर्मनमध्ये linear algebra च पुस्तक होतं आणि आम्हाला रेषीय बीजगणित म्हणताना सुद्धा विचित्र वाटतंय सेरा ही शाळेत शिक्षिका होती आम्ही गेलो तेव्हा ती आणि तिचे मित्र मैत्रिणी सिगरेट फुकट बीअर पीत बसले होते त्यामुळे इथल्या शाळेत मुलांना नक्की काय शिकवतात असा प्रश्न मला पडला नंतर कळलं की तिने घाना मध्ये 9 महिने स्वयंसेवी संस्थेमार्फत शिक्षिकेच काम केलं होतं अझरबैजान मधेही तिने काम केलं होतं तिच्या बोलण्यातून विकसित देशांत किती गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि अविकसित देशात सामान्य गोष्टींसाठीसुद्धा किती श्रम करावे लागतात याची तिला पुरेपूर जाणीव होती हे समजलं तिच्याच घरामध्ये खालच्या मजल्यावर स्टेफान नावाचा विमा कंपनीमध्ये काम करणारा माणूस राहत होता त्याने ग्रँड कॅन्यन लास वेगास लॉस एंजेलिस अशी सफर हार्ले डेविडसन वर केली होती आपल्या वडिलांबरोबर सोल्केम परतताना पॅरीसचा एक दिवस मुक्काम सोल्केमच्या घरी मुक्काम होता आम्ही तिच्या घरी पोचलो आणि आम्हाला समजलं की ती काळी मुलगी आहे अमेरिकी देशी मित्राने लगेच मला कुछ हो गया तो काले लोगों के एरिया मै क्राईम रेट कितना ज्यादा होता है हे ऐकवलं ती एका खोलीत रहात होती पण तरीही तिची कोणाही माणसाला फुकट राहायला जागा द्यायची तयारी होती काउचसर्फिंग हा संपूर्ण नवा अनुभव आम्हाला मिळाला काही नाविन्यपूर्ण गोष्टीं ऐकायला मिळाल्या नव्या शहरात वावरताना मदत झाली काही अप्रसिद्ध पण वैशिष्ट्यपूर...
|