Meta tags:
description= 1 post published by Anukshre during January 2015;
Headings (most frequently used words):
anukshre, गढूळ, पाण्यातील, पारदर्शी, फ्लेमिंगो, पृष्ठे, अलीकडील, पोस्ट, विषयानुसार, आत्तापर्यंत, दिनदर्शिका, माझे, वाचक,
Text of the page (most frequently used words):
गढूळ (14), 2010 (11), आणि (11), फ्लेमिंगो (11), असते (11), गुलाबी (10), #पाण्यात (10), होते (9), anukshre (8), त्या (7), पाणी (7), जानेवारी (6), खूप (6), पाण्यातील (6), पारदर्शी (6), कॅमेरा (6), सुद्धा (6), माझे (5), आहे (5), पाय (5), पक्षी (5), झाले (5), this (4), wordpress (4), com (4), ऑक्टोबर (4), 2015 (4), फेब्रुवारी (4), 2011 (4), 2017 (4), काही (4), ह्या (4), आपल्या (4), शांत (4), करून (4), असतो (4), लागते (4), असतात (4), होती (4), जून (3), 2009 (3), डिसेंबर (3), मार्च (3), जुलै (3), अनुक्षरे (3), फोटोग्राफर (3), असे (3), स्थिर (3), करतात (3), प्रतिबिंब (3), असलेला (3), निसर्ग (3), नाही (3), येते (3), फक्त (3), त्याच (3), पणा (3), लागले (3), गाळ (3), तळाशी (3), स्वच्छ (3), जेंव्हा (3), झाडे (3), फोटो (3), कॅमेरात (3), रंग (3), मात्र (3), आहेत (3), स्तब्ध (3), स्थलांतरित (3), त्यांच्या (3), होऊन (3), site (2), required (2), करा (2), counter (2), वाचक (2), नोव्हेंबर (2), एप्रिल (2), ऑगस्ट (2), सप्टेंबर (2), 2014 (2), ललित (2), सुंदर (2), स्पेस (2), श्री (2), अनिरुद्ध (2), बापू (2), माझ्याबद्दल (2), थोडेसे (2), विश्व (2), शांतपणा (2), सहज (2), इंटरनेट (2), अनुभव (2), टिपून (2), नवीन (2), लागतो (2), टिपण्याची (2), साद (2), पायांचे (2), ऐकू (2), अलगद (2), निसर्गात (2), अलवार (2), जगत (2), मला (2), सौंदर्य (2), खाडीच्या (2), उग्र (2), जाणवले (2), जाणवत (2), भरती (2), तसे (2), खाजण (2), खारफुटीच्या (2), सहजतेने (2), प्रमाणे (2), जागा (2), होतेच (2), त्यात (2), बसला (2), शांतता (2), काढणे (2), उत्तम (2), म्हणजे (2), अविर्भाव (2), भाव (2), हेच (2), कसे (2), अंगी (2), देतात (2), पक्ष्यांचे (2), बगळे (2), ठिकाणी (2), उभे (2), त्यांची (2), त्यांचे (2), लहान (2), मोठे (2), पारदर्शकता (2), दिसत (2), एकत्र (2), असूनही (2), पायांनी (2), करत (2), होता (2), मिळाला (2), सुरु, करूया, design, like, with, वेबसाईट, नाव, ईमेल, write, comment, loading, comments, collapse, bar, report, content, लॉग, साइन, manage, subscriptions, view, reader, गोपनियता, have, account, log, now, sign, subscribed, देणगी, घ्या, सबस्क्राइब, blog, web, hit, please, not, change, code, for, perfect, fonctionality, your, widget, दिनदर्शिका, 2012, 2013, 2016, 2020, 2022, आत्तापर्यंत, uncategorized, माहितीविषयक, विषयानुसार, मातीचे, गोकुळ, शिकण्यासारखे, बऱ्याच, वेळेला, असं, होतं, असतं, सगळंच, अवघड, परि, आईची, अलीकडील, पोस्ट, पृष्ठे, href, https, target, _blank, img, title, alt, src, http, goo, mma1, html, कोड, द्वारे, आपण, ब्लॉग, घेऊ, शकता, मनास, आलेला, सकाळ, फारच, लिहून, पाठवतो, त्यातूनच, उलगडली, फोटोग्राफी, अबोलपणाचा, कॅमेराचा, शब्दात, बोलका, फ्लेमिंगोचे, मनात, कॅमेरानी, घेतले, मोबाईल, रिंगटोन, नको, वेळी, वाजून, लक्ष, सेकंद, विचलित, सेकंदात, स्वतःचे, पाहत, असणारा, बगळा, निघून, जातो, नजरेचा, वेध, चुकल्याने, चुटपुटत, बसत, विव्हळत, बसायचे, नसते, पुढच्या, पक्ष्याकडे, आशेने, शोध, घ्यावा, हातात, डोळ्यांनी, हौस, समोर, घालतोच, आकर्षण, अशी, छोटीशी, सफर, सांगून, जाते, थोड्या, अंतरावर, समुद्राचा, खळखळाट, येत, भरतीचे, खडी, मिठीत, घेते, आलेले, गाळावर, पसरते, भाषा, सहकाऱ्यांना, साथ, घेण्याची, फुलत, असलेले, प्रेम, सादाला, प्रतिसाद, कसा, द्यावा, उत्फुल्ल, आजूबाजूचा, नेहमीच, सुखावतो, डोंगरांचे, बघता, वासामध्ये, खाडीचा, वास, जशी, भरू, झाडात, विसावलेले, अनेक, स्वप्ने, सोडून, वास्तव, तितक्याच, स्वीकारतात, सूर्य, जसा, चढू, ओहोटीच्या, खाजणातील, आपली, बदलतात, अगदी, बदल, आपलासा, बोलणारे, अबोल, शोधू, हळूच, डोकावून, माझेच, दिसते, आजमावयला, बसल्याने, डोकावयाचे, सारा, माझ्यात, प्रवाही, आले, पाहू, तेंव्हा, मनाच्या, मलाच, पाहून, लाभले, करड्या, पांढुरक्या, पंखांच्या, सहायाने, अचानक, पणे, मनी, भिनू, खरखरीत, खारफुटीची, मोहक, वाटतात, तेही, सरावाचा, भाग, निदान, परिसरात, आपल्याला, शोधणे, सोप्पे, हाताळणारा, बोलणारा, कवी, लेखक, मुख्य, जाणणारा, बरेच, आणतात, आंम्ही, भावनांना, अवास्तव, महत्व, देत, नाहीत, अशाच, मागे, दिसणारे, डोळ्यात, साठवून, घेतात, जागी, वेगवेगळे, तेच, विविध, रुपात, सदर, निशब्द, ह्यांना, जोडणारा, दुवा, दिसतात, काय, पहायचे, ठरवावे, पहावे, साठी, पक्षांचे, आयुष्य, हवे, पायांचा, करडा, पांढुरका, त्याचे, रूप, रंगांचे, जगण्याचा, प्रेमाचा, संदेश, कसाही, असो, प्रेमाच्या, रंगात, परिस्थितीत, ठामपणा, किरकोळ, दिसणाऱ्या, पायाच्या, शक्तीत, भक्कम, टिपताना, थवे, लांब, देठाच्या, फुलाचे, उडणे, वाटते, डोळे, धडपड, स्थिरपणे, करावी, च्या, मनातले, द्वंद, पक्ष्यांच्या, स्थलांतराची, बरीच, माहिती, उपलब्ध, आहेच, बरोबर, पांढरे, शुभ्र, राहून, चिंतनाचा, आणून, खाद्याकडे, डोळा, ठेवून, पक्ष्यांना, बगळ्यांनी, जपली, गावाचे, कायमचे, आलेल्या, पाहुण्यांना, जपणे, अगत्य, आवडले, मध्ये, दोन, प्रकार, आकाराने, जातीचे, फ्लेमिगो, टिपणे, छान, त्याहूनही, अधिक, भावली, पाण्याने, दिलेली, कसं, होत, उलटी, असलेली, काठावरची, जणू, साधे, पान, पाडत, नसतील, इतका, स्वतःला, सांभाळतो, प्रथमच, अशा, डोळ्यांच्या, कॅमेराने, पाहण्यापेक्षा, असावे, शिकवते, खाडीचे, स्थिरावले, वाढीने, समृद्ध, जीवन, तिथे, चैतन्य, पाहताना, पाण्याची, विलक्षण, सारे, पाण्यावर, रेष, उमटत, नव्हती, काटकुळ्या, मजबूत, असताना, त्यांचा, आवाज, नेटवर्क, काम, जेवढे, तेवढेच, हालचाल, नसल्याने, पाण्यालाही, एवढी, काठाला, उभी, असणारी, आरशासारखी, दिवस, लिहीत, याचा, विचार, लिहिण्यासारखे, विशेष, नव्हते, विषय, गढूळपणाचा, शहाणा, गढूळपणा, पाण्याशी, निगडीत, असा, शब्द, पिण्यास, अपायकारक, पक्षांचा, प्रमुख, अन्न, स्त्रोत, जैविक, विविधता, भारतातील, समुद्राच्या, खाड्या, स्थान, प्रतिक्रिया, मुखपृष्ठ,
Text of the page (random words):
जानेवारी 2015 anukshre anukshre अनुक्षरे माझे विश्व मुखपृष्ठ माझ्याबद्दल थोडेसे ॐ श्री अनिरुद्ध बापू गढूळ पाण्यातील पारदर्शी फ्लेमिंगो 05 जानेवारी 2015 5 प्रतिक्रिया by anukshre in ललित खूप दिवस झाले मी लिहीत का बर नाही याचा विचार करत होते लिहिण्यासारखे विशेष काही नव्हते आज विषय मिळाला गढूळपणाचा शहाणा अनुभव मिळाला गढूळपणा हा पाण्याशी निगडीत असा शब्द आहे गढूळ पाणी पिण्यास अपायकारक असते पण हेच पाणी स्थलांतरित पक्षांचा एक प्रमुख अन्न स्त्रोत असतो त्याच गढूळ पाण्यात जैविक विविधता असते फ्लेमिंगो हे खर तर भारतातील स्थलांतरित पक्षी आहेत समुद्राच्या खाड्या त्यांचे स्थान असते गढूळ पाण्यातील फ्लेमिंगो पाहताना पाण्याची एक विलक्षण शांतता जाणवत होती खूप सारे एकत्र असूनही त्यांच्या पायांनी पाण्यावर रेष ही उमटत नव्हती आपल्या काटकुळ्या पण मजबूत पायांनी ते स्थिर उभे होते एकत्र असताना त्यांचा आवाज मात्र त्यांच्या नेटवर्क चे काम करत होता पाणी जेवढे शांत तेवढेच गढूळ असूनही त्यात हालचाल नसल्याने पाण्यातील गाळ तळाशी बसला होता गढूळ पाण्यालाही एवढी पारदर्शकता होती कि काठाला उभी असणारी झाडे पाण्यात आरशासारखी स्वच्छ दिसत होती कॅमेरा ने फ्लेमिगो टिपणे हे छान होतेच पण त्याहूनही अधिक भावली ती गढूळ पाण्याने दिलेली पारदर्शकता प्रतिबिंब पण कसं स्वच्छ होत पाण्यात उलटी दिसत असलेली काठावरची झाडे सुद्धा जणू काही साधे पान सुद्धा पाण्यात पाडत नसतील निसर्ग इतका स्वतःला सांभाळतो हे प्रथमच अशा ठिकाणी जाणवले मन शांत आणि स्तब्ध झाले डोळ्यांच्या कॅमेराने पाहण्यापेक्षा फ्लेमिंगो होऊन स्तब्ध कसे असावे हे शिकवते झाले खाडीचे पाणी खाजण होऊन स्थिरावले होते खारफुटीच्या वाढीने समृद्ध असे जीवन तिथे चैतन्य होऊन जगत होते फ्लेमिंगो बरोबर पांढरे शुभ्र बगळे सुद्धा त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून चिंतनाचा अविर्भाव आणून खाद्याकडे डोळा ठेवून होते स्थलांतरित पक्ष्यांना त्यांची जागा त्यांची स्पेस त्या बगळ्यांनी जपली होती बगळे त्या गावाचे कायमचे होते पण आलेल्या पाहुण्यांना जपणे हे त्यांचे अगत्य आवडले फ्लेमिंगो मध्ये पण दोन प्रकार असतात लहान आणि मोठे आकाराने असतात त्यांच्या गुलाबी पायांचे रंग लहान मोठे जातीचे आहेत त्या प्रमाणे असतात पायांचा गुलाबी रंग आणि अंगी मात्र करडा पांढुरका असे त्याचे रूप असते गुलाबी रंगांचे पाय गढूळ पाण्यात सुद्धा जगण्याचा गुलाबी प्रेमाचा संदेश देतात अंगी रंग कसाही असो पाय मात्र प्रेमाच्या रंगात आहेत आहे त्या परिस्थितीत गुलाबी ठामपणा किरकोळ दिसणाऱ्या पायाच्या शक्तीत भक्कम पणा देतात कॅमेरात फोटो टिपताना फ्लेमिंगो चे थवे म्हणजे गुलाबी लांब देठाच्या फुलाचे उडणे वाटते कॅमेरात पक्ष्यांचे डोळे आणि भाव टिपण्याची धडपड खूप स्थिरपणे करावी लागते फोटोग्राफर च्या मनातले द्वंद शांत होते ते असते पक्ष्यांचे फोटो काढणे ह्या पक्ष्यांच्या स्थलांतराची बरीच माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहेच कॅमेरा हाताळणारा न बोलणारा कवी लेखक वाचक आणि मुख्य म्हणजे तो उत्तम मन जाणणारा असतो बरेच जण हा अविर्भाव आणतात कि आंम्ही भावनांना अवास्तव महत्व देत नाहीत पण अशाच कॅमेरा मागे न दिसणारे भाव डोळ्यात साठवून कॅमेरात टिपून घेतात पक्षी त्याच जागी असतात फक्त वेगवेगळे कॅमेरा तेच पक्षी विविध रुपात सदर करतात निशब्द निसर्गात असलेला शांतपणा हा कॅमेरा आणि पक्षी ह्यांना जोडणारा दुवा असतो हेच फ्लेमिंगो गढूळ पाण्यात सुद्धा पारदर्शी दिसतात काय पहायचे हे ठरवावे लागते पण कसे पहावे ह्या साठी पक्षांचे आयुष्य हवे बोलणारे माझे मन अबोल झाले आणि त्याच गढूळ पाण्यात पारदर्शी पणा शोधू लागले हळूच पाण्यात डोकावून माझेच प्रतिबिंब दिसते का हे आजमावयला लागले पाणी गाळ तळाशी बसल्याने स्वच्छ होतेच फक्त त्यात डोकावयाचे माझे मन गढूळ होते खूप सारा गढूळ पणा माझ्यात प्रवाही करून आले होते तो जेंव्हा ह्या पाण्यात पाहू लागले तेंव्हा तो गाळ हि मनाच्या तळाशी बसला आणि मलाच पारदर्शी पाहून फ्लेमिंगो चे गुलाबी पाय मला लाभले करड्या पांढुरक्या पंखांच्या सहायाने स्थिर झाले अचानक जेंव्हा शांतता जेंव्हा अलवार पणे मनी भिनू लागते आणि खाडीच्या पाण्यातील खरखरीत खारफुटीची झाडे सुद्धा मोहक वाटतात फोटो काढणे तेही उत्तम हा सरावाचा भाग आहे पण निदान परिसरात आपल्याला शोधणे हे सोप्पे असते आजूबाजूचा निसर्ग हा नेहमीच मला सुखावतो डोंगरांचे सौंदर्य मन वर करून सहज बघता येते खाडीच्या उग्र वासामध्ये सुंदर सौंदर्य असते हे जाणवले खाडीचा उग्र वास जाणवत नाही जशी भरती येते तसे खाजण भरू लागते आणि खारफुटीच्या झाडात विसावलेले अनेक पक्षी स्वप्ने सोडून वास्तव तितक्याच सहजतेने स्वीकारतात सूर्य जसा वर वर चढू लागतो तसे हे गुलाबी पाय भरती ओहोटीच्या प्रमाणे खाजणातील आपली जागा बदलतात अगदी सहजतेने बदल आपलासा करतात थोड्या अंतरावर असलेला समुद्राचा खळखळाट ऐकू ही येत नाही भरतीचे पाणी खडी अलगद आपल्या मिठीत घेते नवीन आलेले पाणी गाळावर अलगद पसरते ऐकू येते ती फक्त फ्लेमिंगो ची भाषा आपल्या सहकाऱ्यांना साथ घेण्याची साद असते निसर्गात फुलत असलेले अलवार प्रेम सादाला प्रतिसाद कसा द्यावा हे उत्फुल्ल जगत असते मोबाईल चे रिंगटोन नको त्या वेळी वाजून फोटोग्राफर चे लक्ष एक सेकंद विचलित करतात त्या सेकंदात पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहत असणारा बगळा निघून जातो नजरेचा वेध चुकल्याने चुटपुटत बसत विव्हळत बसायचे नसते तर पुढच्या पक्ष्याकडे नवीन आशेने शोध घ्यावा लागतो कॅमेरा हातात असतो डोळ्यांनी टिपण्याची हौस असते समोर असलेला निसर्ग साद घालतोच गुलाबी पायांचे आकर्षण असते अशी ही छोटीशी सफर खूप काही सांगून जाते अबोलपणाचा कॅमेराचा अनुभव शब्दात बोलका करून गढूळ पाण्यातील पारदर्शी फ्लेमिंगोचे गुलाबी पाय मनात स्थिर करून कॅमेरानी टिपून घेतले मनास आलेला शांतपणा फोटोग्राफर सकाळ फारच शांत आहे असे सहज लिहून इंटरनेट वर पाठवतो आणि त्यातूनच उलगडली गढूळ पाण्यातील पारदर्शी फ्लेमिंगो फोटोग्राफी अनुक्षरे माझे विश्व ह्या html कोड द्वारे आपण आपल्या ब्लॉग वर अनुक्षरे घेऊ शकता a href https anukshre wordpress com target _blank img title anukshre alt anukshre src http goo gl mma1 पृष्ठे माझ्याबद्दल थोडेसे ॐ श्री अनिरुद्ध बापू अलीकडील पोस्ट आईची स्पेस सगळंच अवघड परि आहे सुंदर बऱ्याच वेळेला असं होतं असतं खूप काही शिकण्यासारखे मातीचे गोकुळ विषयानुसार माहितीविषयक ललित uncategorized आत्तापर्यंत मार्च 2022 1 जुलै 2020 1 डिसेंबर 2017 2 ऑगस्ट 2017 1 जुलै 2017 5 फेब्रुवारी 2017 1 जून 2016 2 जानेवारी 2015 1 ऑक्टोबर 2014 1 फेब्रुवारी 2014 1 एप्रिल 2013 1 सप्टेंबर 2012 2 जून 2011 1 मार्च 2011 2 फेब्रुवारी 2011 1 जानेवारी 2011 1 डिसेंबर 2010 5 नोव्हेंबर 2010 5 ऑक्टोबर 2010 3 सप्टेंबर 2010 6 ऑगस्ट 2010 3 जुलै 2010 1 मे 2010 1 एप्रिल 2010 1 मार्च 2010 4 फेब्रुवारी 2010 4 जानेवारी 2010 7 डिसेंबर 2009 11 नोव्हेंबर 2009 14 ऑक्टोबर 2009 5 दिनदर्शिका जानेवारी 2015 मं बु गु शु श र सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 ऑक्टोबर जून माझे वाचक please do not change this code for a perfect fonctionality of your counter widget web hit counter blog at wordpress com देणगी घ्या सबस्क्राइब करा subscribed anukshre sign me up have a wordpress com account log in now गोपनियता anukshre view site in reader manage subscriptions साइन अप करा लॉग ईन report this content collapse this bar loading comments write a comment ईमेल required नाव required वेबसाईट design a site like this with wordpress com सुरु करूया
|