Meta tags:
description= सहजच... Over a cup of coffee.;
Headings (most frequently used words):
आठवणीतली, गाणी, आणि, गदिमा, coffee, break, with, alka, about, me, भेट, क्रमांक, blog, archive, विशेष, copyright, labels, मराठी, ब्लॉगर्स, पृथक्, प्रेरणा, मी, वाजवीन, मुरली, दृष्टिकोन, विनवित, मेघा, तुला, निमित्त, नेम, kilimanjaro, summit, मर्मबंधातली, ठेव, ही, प्रेममय, शत, जन्म, शोधितांना, गीत, रामायण, शेक्सपिअर, साठवताना, outsourcing, सय, जित्या, गळ्याचा, माणूस, यमक, श्री, आरसा,
Text of the page (most frequently used words):
आहे (213), आणि (157), नाही (69), काही (67), गाणी (55), असं (48), share (45), आहेत (45), मला (38), #आठवणीतली (37), एका (37), मराठी (37), त्या (35), म्हणून (35), alka (34), vibhas (32), त्यांच्या (31), होती (31), posted (30), होते (27), शब्द (27), किंवा (25), अशी (25), तरी (24), त्यांनी (24), माझ्या (23), कधी (23), दोन (22), आपल्या (21), त्यात (21), अनेक (21), होतं (21), फार (20), यांनी (20), असा (19), गाणं (19), म्हणजे (19), होता (19), बदल (18), आता (18), अगदी (17), अशा (17), झाली (17), म्हणतात (17), गीत (17), this (16), गदिमा (16), विचार (16), केला (16), labels (16), फक्त (16), गेली (16), pinterest (15), facebook (15), blogthis (15), email (15), read (15), user (15), comments (15), करून (15), त्यामुळे (15), माझा (15), असल्याने (15), marathi (15), पुढे (15), खूप (14), अनुभव (14), याची (14), तिला (14), असे (14), इथे (14), कविता (14), च्या (14), त्याला (14), परत (14), अर्थ (14), त्याच्या (13), असेल (13), एकदा (13), तिच्या (13), मध्ये (13), कवी (13), खरं (13), स्वत (13), वेळा (12), करत (12), येईल (12), अधिक (12), सुलोचना (12), माझे (11), वर्णन (11), तसं (11), ललित (11), त्यांना (11), भेट (11), सर्व (11), गेलं (11), किती (11), काय (11), घेऊन (11), सगळं (10), तसंच (10), याच (10), अर्थाने (10), सहजच (10), असते (10), वर्षे (10), आला (10), येते (10), यात (10), झाला (10), तुला (10), आपण (10), खड्ग (10), कसं (9), वापर (9), घेतला (9), येतो (9), तेव्हा (9), नाव (9), अरुण (9), केलं (9), आमच्या (9), गेले (9), आले (9), दूध (9), त्याची (9), म्हणतो (9), फोन (9), त्यातील (9), सन्यस्त (9), सेनापती (9), ठेव (9), आनंद (8), गदिमांनी (8), केले (8), समोर (8), प्रत्येक (8), आली (8), ज्या (8), विषय (8), जेव्हा (8), केवळ (8), करताना (8), एखाद्या (8), माझी (8), करता (8), श्री (8), गायक (8), दाते (8), यांच्या (8), केली (8), खास (8), चाल (8), त्यांचा (8), माहिती (8), you (8), aathavanitli (8), gani (8), नाहीत (8), झाले (8), आम्ही (8), शेक्सपिअर (8), वल्लभ (8), संदर्भ (8), मर्मबंधातली (8), रात्र (8), लिए (8), झालं (7), वेगळा (7), यमक (7), असतात (7), लिहिलं (7), तिथे (7), जसं (7), वैचारीक (7), दोन्ही (7), म्हणता (7), गझल (7), स्थान (7), लागले (7), चर्चा (7), उल्लेख (7), सुधीर (7), अवघड (7), तीन (7), मनात (7), केलेली (7), वाटतं (7), सगळा (7), कमी (7), लक्ष (7), जाऊन (7), संगीत (7), मागे (7), संपूर्ण (7), जरी (7), वसंत (7), सगळे (7), kilimanjaro (7), मेघा (7), break (6), काव्य (6), असलेल्या (6), रसग्रहण (6), होत (6), उपलब्ध (6), एकाच (6), कारण (6), वेगळं (6), शब्दांचा (6), आधी (6), नेमक्या (6), चित्रपटात (6), तसा (6), नेहमी (6), संस्कार (6), वाण (6), चित्रपट (6), भावगीत (6), झालेला (6), घेतलं (6), असतं (6), जन्म (6), म्हणाले (6), मोघे (6), प्रश्न (6), संगीतकार (6), त्यांचे (6), पिशवी (6), मात्र (6), सुद्धा (6), शेवटी (6), प्रयत् (6), लक्षात (6), सुरू (6), प्रवास (6), अर्थातच (6), त्याचा (6), पाऊल (6), असताना (6), थेट (6), वेबसाइट (6), म्हणू (6), आपल्याला (6), काळात (6), नाहीये (6), रामायण (6), त्याचे (6), लागेल (6), सावरकरांच्या (6), शोधितांना (6), असू (6), summit (6), uhuru (6), peak (6), विनवित (6), डबा (6), ओळी (5), मूळ (5), करते (5), वेळेस (5), जाते (5), गीतरामायण (5), केलेल्या (5), गाते (5), तिचं (5), हात (5), करतात (5), अतिशय (5), लागतो (5), आणखी (5), बिजलीचा (5), म्हंटलं (5), व्यक्त (5), लेख (5), सहा (5), पाच (5), होऊन (5), असतो (5), पाणी (5), माणूस (5), साय (5), उतू (5), गोष्ट (5), सगळ्या (5), करावी (5), आमची (5), तयारी (5), आम्हाला (5), सगळ्यात (5), पुढील (5), the (5), जाड (5), नको (5), love (5), भाग (5), थोडं (5), तयार (5), असावा (5), तिचा (5), वाटलं (5), आधार (5), रचना (5), माझं (5), मोठा (5), आमचा (5), लिखाण (5), झालेल्या (5), वाटते (5), सावरकर (5), बुद्ध (5), विक्रमसिंह (5), शोध (5), काढून (5), पहिल्या (5), फोटो (5), नाटकाच्या (5), सोडून (5), पाय (5), point (5), सांगितले (5), कृष्ण (5), वाजवीन (5), शाळेत (5), शाळा (5), may (5), june (5), september (5), november (5), february (5), march (5), coffee (4), तब्बल (4), गीते (4), येतं (4), असंख्य (4), गदिमांच्या (4), स्वरूपात (4), होतो (4), सहज (4), कशी (4), कुणी (4), कसा (4), साडी (4), याचे (4), दिल (4), उंची (4), याचं (4), जित्या (4), यातील (4), मुलगी (4), तिची (4), येत (4), gadima (4), वेळोवेळी (4), वेगवेगळ्या (4), नेमकं (4), हेच (4), प्रेम (4), अरुणजींनी (4), याला (4), येथे (4), अंगावर (4), जावं (4), करू (4), आपली (4), दिवस (4), त्यांचं (4), आपलं (4), जन् (4), गेला (4), मधली (4), त्याचं (4), मंगेशकर (4), असायचा (4), गप्पा (4), अशासाठी (4), दुसर् (4), जात (4), नसेल (4), खोलात (4), मुद्दामहून (4), येतात (4), शेळके (4), इतक्या (4), करतो (4), यांना (4), पहिले (4), याचा (4), लागतं (4), गरज (4), that (4), काहीच (4), रंग (4), काम (4), असलेले (4), आत्ता (4), वर्ष (4), फारसं (4), reminder (4), when (4), माझ्यासाठी (4), जातो (4), त्यांची (4), निरोप (4), निवड (4), चालू (4), सतत (4), शब्दांचे (4), यांचा (4), अभिप्राय (4), देणं (4), बरवा (4), सुंदर (4), गाण्याची (4), नंतर (4), इंटरनेटवर (4), घेतली (4), विचारात (4), करायला (4), गेल्या (4), माडगूळकर (4), चार (4), तोंडी (4), स्पष्ट (4), यांचे (4), नाटकातील (4), तोच (4), युद्धबंदी (4), गाठी (4), तसे (4), घेतले (4), हजार (4), खाली (4), तास (4), climb (4), वाटून (4), जेवण (4), रात्रीची (4), यातली (4), trekking (4), shell (4), jacket (4), शेवटच्या (4), सुरुवात (4), भाषेत (4), आरसा (4), संस्कृत (4), बसून (4), म्हणुनिया (4), विफल (4), विनवणी (4), बरवी (4), ह्या (4), सही (4), माया (4), मुरली (4), october (4), december (4), january (4), all (3), उपलब्द्ध (3), रहावं (3), पुस्तक (3), कदाचित (3), गदिमांची (3), यावर (3), तंत्र (3), कुठला (3), पार (3), बाजूला (3), पूर्वी (3), होतात (3), वेष (3), पहा (3), तुझ्या (3), ओळीत (3), सारखा (3), म्हणते (3), झाल्या (3), डावा (3), चित्र (3), सिद्धहस्त (3), जसे (3), सचिव (3), कंगवा (3), गाण्यात (3), हळू (3), स्वप् (3), वहिनी (3), गोरी (3), छान (3), नेमके (3), शुक्रतारा (3), प्रसिद्ध (3), पुणे (3), टप्प्यांवर (3), अजून (3), सांगीतिक (3), गायलेल्या (3), केलेले (3), जोशी (3), घालून (3), जवळपास (3), वार् (3), शकत (3), कुणीही (3), रसिकांच्या (3), लागली (3), देखील (3), सारख्या (3), कार्यक्रमात (3), अरुणजींच्या (3), देता (3), त्याच (3), पाडगांवकर (3), राधा (3), सांग (3), निर्माण (3), स्वर (3), येणारा (3), जपून (3), इतका (3), खोल (3), संपर्क (3), हैं (3), चर्चेत (3), गायकाचं (3), सांगायचे (3), दोघांच्या (3), याच्या (3), गाण्याचा (3), चेहरा (3), दिशा (3), गाण्याच्या (3), वेळ (3), नसलेल्या (3), गाण्याचे (3), प्रचलित (3), बरेच (3), सत्य (3), गळ्याचा (3), सापडला (3), शोधतो (3), दूधाची (3), घरी (3), दुबईला (3), भारतातील (3), लहानपणी (3), पातेले (3), पातेल्यात (3), देण्याची (3), बरोबर (3), बरीच (3), अती (3), करणे (3), वाक्य (3), पुन्हा (3), जाण्यासाठी (3), नवर् (3), झालंय (3), काहीही (3), जाताना (3), काळ (3), प्रकार (3), पोहे (3), प्रकारचे (3), सांगितलं (3), इतकी (3), वगैरे (3), नवीन (3), टाकलं (3), home (3), कधीही (3), अत्यंत (3), महत्त्वाच्या (3), जाता (3), वर्षांची (3), थोडक्यात (3), तुम्ही (3), घ्यावा (3), रेडिओवर (3), करणं (3), वर्षं (3), सुरुवातीला (3), लिखित (3), राग (3), मनातील (3), भावना (3), गाण्याला (3), महत्त्वाचं (3), कुठल्याही (3), शांत (3), राज्याचे (3), कुठलाही (3), आशाताई (3), पान (3), दाखवला (3), तीच (3), ठेवली (3), संगणक (3), प्रयोग (3), नव्हतं (3), महिन्यात (3), भरून (3), करावं (3), संकेतस्थळ (3), दूर (3), होणारे (3), लवकरच (3), लागत (3), संख्या (3), प्रेरणा (3), शकता (3), वाट (3), स्वगत (3), आनंदाने (3), हेही (3), छोटासा (3), ठाम (3), शब्दश (3), वर्षांचा (3), इतिहास (3), किंग (3), लिअर (3), मधे (3), मोजकी (3), अनुप्रासांचा (3), sonnet (3), रूपक (3), वापरले (3), time (3), कां (3), नाटकात (3), मोठी (3), गदिमांचे (3), पदाचे (3), हाच (3), शस् (3), आक्रमण (3), दोघे (3), तिथून (3), आर्ति (3), व्यर्थ (3), शब्दाचा (3), प्रियकर (3), होऊ (3), ओळीतील (3), घडली (3), नुकतीच (3), क्षण (3), नाटकाचा (3), बरंच (3), savarkar (3), रचियता (3), नेईं (3), राजकीय (3), दिसते (3), नावाच्या (3), दीनानाथ (3), सुलोचन (3), पती (3), वसंतराव (3), बाहेर (3), जीव (3), करावे (3), बेस (3), जणांनी (3), भारतीय (3), एकत्र (3), वाजता (3), आधीच (3), योग्य (3), fleece (3), pants (3), gloves (3), पर्वत (3), पोचलं (3), gilman (3), माझ्याकडे (3), देत (3), तासात (3), जितेंद्र (3), अभिषेकी (3), दर्द (3), मिळाली (3), श्लोक (3), लगेच (3), आषाढ (3), मेघदूत (3), सुजनी (3), शठी (3), सफला (3), रामदास (3), विनंती (3), कुछ (3), रंजिश (3), फिर (3), मुझ (3), राधेला (3), वर्गाच्या (3), घास (3), प्रार्थनेच्या (3), शिक्षक (3), दिन (3), समर्थ (3), देऊं (3), तुकाराम (3), पडते (3), शांता (3), पृथक् (3), july (3), august (3), copyright (2), 2011 (2), powered (2), com (2), server (2), 2010 (2), blogger (2), posts (2), अनंत (2), संकेतस्थळावर (2), ठळकपणे (2), प्रकाशझोत (2), गंगाधर (2), कवीने (2), सखोल (2), काव्यप्रतिभेचा (2), दिला (2), नव्हे (2), म्हणूनच (2), बुडी (2), मोह (2), अनावर (2), बघू (2), प्रतिभेचा (2), त्यावर (2), मंत्र (2), टाकतात (2), नुसती (2), अट्टहास (2), राहत (2), येणारी (2), झालेली (2), कथेतील (2), व्यक्तीरेखा (2), वळण (2), उदाहरणे (2), जाणीवपूर्वक (2), पलीकडे (2), सारखं (2), झालेलं (2), नेहमीच्या (2), गाण्यांच्या (2), साधण्यासाठी (2), गायकाने (2), द्यावी (2), दोन्हीही (2), खूपच (2), प्रीत (2), सगळंच (2), करायचं (2), विश्व (2), तुझा (2), गडे (2), घातला (2), गीतात (2), ओतला (2), बैल (2), सैल (2), भली (2), आपल्यासमोर (2), निरिक्षण (2), जरा (2), भाषेचे (2), बरसात (2), फुलांची (2), गाण्यातली (2), आनंदात (2), रेखा (2), वाम (2), समानार्थी (2), वापरत (2), साधत (2), शैलीत (2), आडवा (2), राजा (2), सांगताना (2), राहू (2), मेघ (2), सोलीव (2), चक्क (2), निरागस (2), सखी (2), हवा (2), लहर (2), गाताना (2), असावी (2), गोरीपान (2), चांदण्याच्या (2), पदराला (2), फुलासारखी (2), वर्ण (2), गव्हाळी (2), वाणाचा (2), हसरा (2), मुखडा (2), सिद्धी (2), प्रवेश (2), शब्दांत (2), असावेत (2), सुप्रसिद्ध (2), प्रथम (2), थोर (2), आयुष्याच्या (2), कितीही (2), जाणून (2), कलाकार (2), दशकांची (2), हून (2), गाण्यांचे (2), जगभर (2), रसिकांचा (2), प्रचंड (2), याचि (2), दिलेल्या (2), उत्तुंग (2), इमारत (2), काळाचा (2), अजिबात (2), नेऊन (2), राज्य (2), आवड (2), असलेला (2), आवाज (2), खानदानी (2), उदाहरण (2), जगजीत (2), उर्दू (2), गात (2), असत (2), सुमारास (2), गायले (2), जन्माला (2), भावसंगीताच्या (2), राखून (2), येशिल (2), तरल (2), संयत (2), आवाजात (2), राहिला (2), मधला (2), डोळ्यांत (2), येतील (2), चाल् (2), त्यांच्यासाठी (2), लिहिलेला (2), तितक्याच (2), दृढतेने (2), कारणही (2), नेहासिस (2), गायिका (2), आभ्यास (2), वहीं (2), गुरुस्थानी (2), त्यांच्याकडे (2), कोणाचं (2), संगीतकाराचं (2), म्हणणं (2), बोलायचे (2), ऐकायचे (2), मते (2), टप्प्यात (2), रसिकांचंच (2), व्हायलाच (2), हवं (2), तौलनिक (2), मतं (2), मांडायचे (2), गीतकार (2), व्यक्तीश (2), गीताच्या (2), वेगळ्या (2), लावली (2), येई (2), जाण्याची (2), तेव्हाच (2), साहेबांनी (2), गाण्यांचा (2), पडतो (2), ऐकता (2), केलेला (2), आविष्कार (2), शोधात (2), यांची (2), मंद (2), धुंद (2), कधीतरी (2), वर्षांनी (2), रुंजी (2), घालू (2), लागतात (2), मंगेश (2), उगीच (2), गर्दीत (2), कोलाहलात (2), त्यांचीच (2), माणसांच्या (2), उभ्या (2), गाणे (2), arun (2), date (2), सकाळी (2), कारणाने (2), राहून (2), सायीचं (2), टोक (2), करीत (2), पातेलं (2), माखलं (2), किरकोळ (2), आठवण (2), पर्यंत (2), तसेच (2), ठेवायचे (2), दूधाच्या (2), नाशिकच्या (2), तशीच (2), इतकंच (2), texture (2), दुपारी (2), आईला (2), ठोस (2), पहिल्यांदा (2), नक्की (2), धुवून (2), आणावे (2), चहा (2), करण्याची (2), तत्परता (2), करावा (2), तरीही (2), झाल्यावर (2), संध्याकाळी (2), कळलं (2), अचानक (2), नाती (2), checklists (2), येऊ (2), वाढदिवस (2), असलं (2), असलेली (2), असली (2), तत्परतेने (2), sun (2), उपयोग (2), नव्हता (2), अवलंबून (2), यादी (2), रूप (2), सांगावं (2), पातळ (2), करणार् (2), जास्त (2), महिन्यांपूर्वी (2), बसत (2), पुण्यात (2), दुबईहून (2), उत् (2), नसल्याने (2), बरं (2), तेच (2), today (2), tell (2), दुबईत (2), and (2), मंगळवार (2), कुठून (2), समजावून (2), म्हणत (2), but (2), such (2), सरळ (2), location (2), येऊन (2), घरात (2), देतो (2), आठवणीतल्या (2), येथील (2), क्षमता (2), मुळे (2), बालगीत (2), नारायण (2), पेठ (2), समस्तांस (2), घेता (2), शब्दांच्या (2), दिलं (2), यासारखे (2), समजून (2), संकेतस्थळाला (2), जशी (2), कार्यक्रमासाठी (2), गीतांची (2), ऐकावी (2), शक्य (2), एकीकडे (2), तंत्रज्ञान (2), संपन्न (2), ब्लॉग (2), विविध (2), गायकांनी (2), गीताचा (2), जिथे (2), अनन्य (2), घडतं (2), लेखात (2), हृदयनाथ (2), गातात (2), त्यातून (2), रसिक (2), non (2), अनेकांना (2), मदत (2), करणारं (2), महाराष्ट्र (2), ऐकत (2), दृश्य (2), लागणार (2), लिहिणं (2), शोधणं (2), नेम (2), यातून (2), जायला (2), ॠतू (2), नमूद (2), गाण्यातला (2), एखादा (2), उलगडतो (2), गदिमांचं (2), तोंडपाठ (2), असलेलं (2), मान (2), देतात (2), ज्येष्ठ (2), प्रभाकर (2), दुसरे (2), दोघांचीही (2), दोघांनीही (2), चांगलं (2), प्रोत्साहन (2), दिशादर्शक (2), यांच्याकडे (2), देवकीताई (2), वयाच्या (2), भटांची (2), त्यांनीच (2), गायला (2), गाऊन (2), समृध्द (2), प्रथमत (2), गायकी (2), असावं (2), गीतं (2), इतिहासात (2), नक्कीच (2), साली (2), आलो (2), दिनक्रम (2), भारतात (2), नव्हते (2), ऐकलेल्या (2), वही (2), त्यास (2), हाती (2), जाणीव (2), असायची (2), वेगवेगळया (2), आतापर्यंत (2), एवढा (2), ईमेल (2), दोघं (2), अडचण (2), नंबर (2), दोघांनी (2), दिली (2), सध्या (2), निवडक (2), व्हावी (2), जणू (2), सन्मान (2), विभागात (2), दिले (2), त्यावरून (2), कल्पना (2), भिडतं (2), अथवा (2), पैकी (2), डोंगर (2), पडत (2), पाहिला (2), अंक (2), मिडिया (2), media (2), हीरक (2), महोत्सव (2), आशा (2), आभार (2), सुमित्र (2), साजरा (2), जोंवरि (2), रामायणाच्या (2), पातळीवरील (2), साहित्य (2), ज्यास (2), साम्य (2), एकूण (2), नाटक (2), झालेले (2), प्रतिभेच्या (2), नादमधूर (2), नंतरच्या (2), परिणाम (2), प्रमूख (2), सुयोग्य (2), खेळ (2), कैक (2), करी (2), प्रतिमा (2), रूपकांचा (2), metaphor (2), करण्यासाठी (2), thou (2), नसे (2), आणिक (2), भरत (2), तूं (2), वृक्ष (2), शिष्य (2), flesh (2), मोजक्या (2), असो (2), उभी (2), मुळातून (2), संपन् (2), not (2), high (2), done (2), घेत (2), मिणमिणत्या (2), geet (2), ramayan (2), स्वातंत्र्यवीर (2), कथानक (2), घेऊ (2), रत् (2), सावरकरांनी (2), पुस्तके (2), उद्देश (2), आपले (2), अहिंसा (2), पात्रं (2), सिद्धार्थ (2), गौतम (2), बुद्धांच्या (2), त्रसंन्यास (2), जातात (2), चाळीस (2), पुत्र (2), पुष्कळ (2), नसते (2), बुद्धांना (2), सुलोचनेच्या (2), पत् (2), नुकतंच (2), प्रेमसंवादात (2), वल्लभास (2), दूत (2), शाक्यांचे (2), उधळून (2), पदाचा (2), सावरकरांचा (2), भव्य (2), दिव्य (2), तेजस्वी (2), अभिमान (2), तिचे (2), जित (2), सैनिक (2), पतीसह (2), वीरमरण (2), त्री (2), फेर् (2), असला (2), आर्तता (2), दीपावली (2), विझाल्या (2), म्हणताना (2), टाकला (2), वाटत (2), कुठे (2), घातली (2), शब्दाने (2), पोचणे (2), संपून (2), क्षणांत (2), पाहिलं (2), अध्यात्मिक (2), इतके (2), जाई (2), shat (2), janma (2), shodhitana (2), शंकर (2), हरोनी (2), ठेविं (2), जपोनि (2), हेतू (2), मार्ग (2), आलेले (2), सादरीकरण (2), पूरक (2), करण्यात (2), लिहून (2), आचार (2), माळ (2), शरण (2), मारत (2), कोण (2), अलि (2), लढता (2), खरा (2), रागात (2), शकते (2), प्रेममय (2), ठेवा (2), पाकळी (2), सखा (2), marma (2), bandhatali (2), thev (2), उंचीवर (2), चढत (2), kili (2), ninjas (2), कालच्या (2), वास्तव्य (2), वेळी (2), लागून (2), ट्रेकिंग (2), फुटांची (2), त्यासाठी (2), रोज (2), दहा (2), एव्हाना (2), line (2), कोणी (2), guys (2), पोचलो (2), sleeping (2), bag (2), साडे (2), blog (2), शकतो (2), woolen (2), base (2), layer (2), down (2), बर्फावर (2), चालण्यासाठी (2), cleats (2), सगळी (2), बारा (2), पर्वताच्या (2), सर्वाधिक (2), भागात (2), पोले (2), वाजले (2), प्रत्येकाच्या (2), रुपिंदरने (2), समजूत (2), ताबा (2), फारसा (2), पडणं (2), सिद्ध (2), प्रासंगिक (2), पर्वतारोहण (2), गिर्यारोहण (2), travel (2), निमित्त (2), गाण्याचं (2), प्रभाताई (2), सुरेश (2), भावनिक (2), नास (2), कळत (2), गीताचे (2), अशोकजी (2), परांजपे (2), संत (2), अभंग (2), शौनक (2), शिनवे (2), आवाजातलं (2), सिनेमातलं (2), देऊन (2), काढला (2), सादर (2), वेधून (2), केलेत (2), हातात (2), दृष्टीकोन (2), धावपळ (2), शंभर (2), नकोस (2), सापडतील (2), पानी (2), जागा (2), गाण्याने (2), रूक्ष (2), बाकी (2), दूरदर्शनवरील (2), मिळाला (2), काकतकर (2), पाऊसं (2), सात (2), चित्रफित (2), पटवर्धन (2), चांगली (2), होणे (2), आवडत (2), इतकं (2), चौदहवीं (2), रात (2), तेरा (2), कहा (2), कुणा (2), नुसते (2), वाटेल (2), शेरात (2), वाह (2), घेते (2), सूर (2), दिवसभर (2), मुझे (2), छोड़ (2), जाने (2), कभी (2), किस (2), प्रेयसी (2), नाराज (2), सोहळा (2), गोखले (2), होत्या (2), मोहन (2), पवार (2), प्रेमास (2), बंध (2), बंधने (2), राधे (2), वाळूत (2), तुझी (2), वृक्षी (2), जितक्या (2), तितक्या (2), अबोली (2), चित्रपटातील (2), रिमझिम (2), राहिलं (2), वाटे (2), रूपास (2), भाळलो (2), शक्यता (2), सालच्या (2), फळ्यावर (2), आजच्या (2), मुलीने (2), आणलेल्या (2), शाळेने (2), भास्वर (2), teacher (2), day (2), school (2), देव (2), तें (2), ज्ञानेश्वरी (2), आपुला (2), जाहला (2), हाचि (2), भला (2), क्रम (2), shanta (2), shelke (2), dubai (2), april (2), skip (2), rights, reserved, templatemonster, designed, dedicated, wordpress, themes, sharepoint, marc, jacobs, handbags, subscribe, atom, older, सार्थ, काव्यरचनांचे, मितीस, ३१४३, गाण्यांपैकी, ४३३, गाण्यांमधून, त्रवत, यावरून, काव्यजाणिवेचा, केवढा, अवकाश, व्यापतात, ओळीं, आत्तापर्यंत, विश्, लेषण, रचनांवर, टाकतं, विविधरंगी, झोतांमध्ये, अधिकच, झळाळतं, महाम्, बरे, व्यासंगी, अभ्यासपूर्ण, आस्वाद, रसिकांना, वाचल्यामुळे, एखादी, वेगळी, खुबी, नजरेस, मारण्याचा, भावलेली, हाताळणी, म्हणावं, जमतंय, व्याकरणाच्या, दृष्टीने, शब्दालंकार, कवितेचं, सौंदर्य, वाढवण्याचं, जोडण्याची, यांत्रिकता, ओघाने, शब्दरचना, कधीकधी, जुळणी, आश्चर्याचा, आनंदाचा, देते, गीतकाराच्या, मर्यादा, प्रसंग, गाणारी, गीताने, कथेच्या, प्रवाहाचे, कुठले, अपेक्षित, सर्जशीलता, बंधनांना, ओलांडून, शोधताना, ठेवू, शेक्, सपिअर, नेहमीचं, झाड, वाकडे, घननिळा, लडिवाळा, उद्, धृत, ठेवूया, चला, काहीतरी, सव्वाशे, पलीकडचं, शोधू, पद्धतीने, यमकावर, land, पट्टीच्या, लयीला, हूल, समेवर, उतरावं, आकर्षक, शिकवा, दिसणं, वागणं, प्रियकराच्या, मनासरखं, विचाराने, व्यापलं, लिहितात, आवडसी, ध्यास, आवडतो, तुजसी, साधा, आवडीच्या, मुशीत, स्वभाव, सरधोपट, सांगत्ये, ऐका, तल्या, पहाट, गदिमांचा, काव्यहंस, नादचित्र, रेखाटतो, अंगे, झिंझाडून, उभे, ठाकले, लावणी, लावणीची, अदा, करणारीने, नेसली, अंगरखा, नेसणार्, त्रीने, परिधान, अस्वस्थ, बारीक, नसत्या, पदराकडे, धावतो, दिलवरा, ओळखा, मापणे, मोजणे, शब्दात, कोकणी, किंचित, घोवाला, कोकण, दाखव, ताना, गोमू, माहेरला, नाखवा, माडांची, जवळून, मापवा, सुखात, सर्वत्र, सुगंधाने, भारलेला, वाटतो, तळहातीच्या, भाकित, जुईच्या, शाखा, अनुप्रास, बन्सीधर, कृष्णाचं, चित्रकाराच्या, स्ट्रोक्, चितारतात, बाहुवर, कपोल, अधरि, धरितो, पावा, गोकुळीचा, होडीत, गर्भार, नार, बसली, होडी, चालव, नावाड्याला, मैत्रिणी, बेतात, नावेचा, वेग, चालु, जसा, श्रावण, निळा, समिंदर, निळीच, नौका, गेयतेच्या, परिमाणात, बसणार्, गाण्यांमध्ये, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात, बोटे, घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक, यमकाचे, कार्य, साधतात, सेक्रेटरी, युगुलगीतात, डोळ्यापुढे, दिसे, सजीव, घरातली, गृहिणी, चपखल, बसला, पदरावरती, जरतारीचा, मोर, नाचरा, केसावरती, उठविली, फिरवुन, भोवतीचा, किळसवाणा, गुंतवळा, झटकतो, गोड, वाटायला, सुलोचनाबाई, चव्हाण, माधुर्य, आणतात, छोटी, परीकथांचं, दादाची, बायको, नरंजन, नातलीच, दैवी, गाडी, हरणांची, अंधारासारखी, काळीभोर, साडीवर, चांदण्या, चिकटवल्या, साडीचा, पदर, चमचमणार्, बिजलीसारखा, झळाळता, दादा, सावळारामांनी, वापरला, पाण्याला, देशपांडेंनी, अणिमा, महिमा, गरिमा, सारखीच, परकाया, त्यामुळेच, गदिमांना, भाव, आत्मचरित्रात, शब्दांकन, सुलभा, तेरणीकर, मोरया, प्रकाशन, आवृत्ती, २०१६, कलाकारांभोवती, नेहमीच, उत्सुकतेचे, वलय, कुतूहलाचे, निवारण, त्याच्यांवरील, लेखांमधून, मुलाखतींमधून, जातं, माणसं, जाणणं, दशांगुळे, उरतंच, व्यक्तिमत्त्व, टोलेजंग, माणसाविषयी, कारकीर्द, २६००, स्वतः, कार्यक्रम, यामुळे, आदर, देही, डोळा, बघण्याचे, भाग्य, अरुणजींना, लाभले, एन्, बबनराव, नावडीकर, गजाननराव, वाटवे, पायावर, परंपरेची, उभारली, इमारतीस, पिढ्यांचे, मजले, मजल्यांमधून, गीतांचं, प्रसन्, वारं, झुळझुळत, शिळेपणा, शिवलेला, शिवूच, रसिकाने, आश्रयास, यावं, घ्यावी, ताजंतवानं, भावगीते, जनसामान्यांपर्यंत, पोचवली, मनांना, भिडली, हृदयांवर, आकाशवाणीच्या, साहेबांचं, वाजलं, विरळाच, बोजड, नसलेले, वेधक, चाली, त्यावरचा, कळस, अरुणजींचा, मार्दवपूर्ण, शैली, शालीनतेचा, साज, मिरवीत, समांतर, समकालीन, सिंह, यांचं, जगजीतजींच्या, जगजीतजींनी, गझलेला, मनांत, रुजवलं, गळ्यावर, चढवलं, १९६२, अरुणजी, पहिलं, मंदवारा, शुक्र, ग्रह, अवकाशात, माहित, खळे, त्रयीच्या, तेव्हापासून, शुक्राची, चांदणी, अवकाशातलं, अढळ, भारलेल्या, स्वरांनी, भारला, कायमचाच, हातातुन, पहिलीच, राणी, श्रीरंस, सांवळा, गौरकाय, सखे, गाण्यांनी, प्रेमाची, परिभाषा, सच्ची, मुहब्बत, मृदू, रसिकांपर्यंत, पोहोचू, प्रेमतरंगांवर, लहरत, भातुकलीच्या, खेळा, तडप, वाळवंटातून, भीषण, वैराण, एकटेपणा, धुके, दाटलेले, मधले, औदासिन्य, जन्मावर, जगण्यावर, जिंदादिली, असेन, नसेन, शाश्वतता, सोबती, चित्रपटतील, देवाघरच्या, फुलातली, असहय्यता, सांजवेळी, समजूतदारपणा, अखेरचे, फकिरी, पोरी, मधलं, लावण्य, पाडगांवकरांनी, विनंतीवरून, लावणा, आपल्यापर्यंत, पोचवलं, भावसंगीतावर, उमटवलेला, ठसा, ठळक, जणु, व्हावेत, धाडशी, विधान, करण्याचं, चॅटर्जी, नावाचे, बंगाली, मित्र, लता, यांच्यावर, लेखन, लताबाईंच्या, गाण्यांसाठी, माझ्याशी, साधला, अनेकवेळा, स्वाभाविकपणे, दिदींच्या, भावगीतांचा, दातेजी, अंतीम, भुमिकांबद्द्लची, एकाच्या, बाजूने, पारडं, कागदावर, उतरली, मार्गाने, नशिबाने, म्हंटलेलं, प्रवक्ता, शब्दरचनेविषयी, चालीविषयी, बोललं, उरलेला, पूर्णवेळ, लौकिक, पुष्टी, संगदिल, हिंदी, में, समा, गयें, सजन, वजनावर, मराठीतल्या, छंदात, महाम्बरे, हृदयनाथांनी, संधीकाली, धुंदल्या, चांद, अंबरी, इतिसासात, तपशीलाचं, महत्त्व, अन्यथा, आपल्यासाठी, दातेंचं, गाण्यांना, सर्वाथाने, जाताजाता, नावावर, करायचा, बोलायाचे, बोलणार, पाऊस, कधीचा, क्काल, अरुणजींच्याही, अरुणजींसारख्या, पाठोपाठ, ऐकण्याचा, युगुलगीतांच्या, ध्वनीमुद्रीत, स्वरुपाच्या, शांताबाई, सहगायिका, कुंदा, बोकिल, वारा, रातराणी, स्मृतीने, मानले, आभास, ठरावा, दोघांतला, साहू, अता, दुरवा, आकाशवाणीवर, ऐकलेली, नजरेसमोर, कविवर्य, शोधत, केव्हाच, कित्येक, रसिकरंजन, सार्, काळ्या, तिजोऱ्या, खरीदणाऱ्या, येणे, अनुभवापासून, अंदाजे, वंचित, प्लॅस्टीकच्या, कॅनमधले, सुपरमार्केटमधून, आणलेले, पुण्याला, दिवसांसाठी, अमूलचे, tetra, pack, वापरते, दही, ताक, लोणी, तूप, बेरी, तीवर, पिठीसाखर, खाणे, आठवड्यांच्या, नाचानाचीत, पूर्णत्वास, नेता, पुण्यातल्या, मुक्कामात, आणली, तापवताना, गॅसचा, नॉब, पकडून, उभं, क्षणी, दुर्लक्ष, दूधाला, आलेला, उमाळा, आवरता, पातेल्यावरून, ओघळलं, नादाने, दूधाचे, मोजकेच, थेंब
Text of the page (random words):
सुप् त हेतू शाक्यांचे राष्ट्र सर्वप्रकारे लुटून नेणे हाच आहे पटदीप रागात बांधलेले हे पद पटदीपची आणि विरहाची आर्तता थेट पोचवतं अनेक सिद्धहस्त गायकांनी गाऊन त्यास लोकप्रिय केलं आहे स्वत मा दीनानाथ मंगेशकर पं वसंतराव देशपांडे पं प्रभाकर कारेकर आशाताई भोसले आशाताई खाडीलकर नाटकाच्या बाहेर या पदाच्या मुखड्याने एक वेगळीच उंची गाठली आहे मर्मबंधातली ठेव हे एखाद्या पुस्तकाचे शीर्षक असू शकते एखाद्या लेखाचा मथळा किंवा एखाद्या हृदयस्पर्शी गाण्यांच्या कार्यक्रमाचे नाव अशी ठेव तर जपून ठेवण्यासाठीच असते जशी वाक्प्रचार म्हणून मर्मबंधातली ठेव ही उक्ती प्रचलीत होत गेली तसं कुठेतरी नेईं हरोनी जाऊन ठेविं जपोनि हा बदल झाला असावा related post शत जन् म शोधितांना read user s comments 0 posted by alka vibhas email this blogthis share to x share to facebook share to pinterest शत जन्म शोधितांना posted by alka vibhas labels marathi savarkar shat janma shodhitana कविता मराठी रसग्रहण वैचारीक शत जन् म शोधितांना सावरकर या पदाचे रसग्रहण करताना सर्वप्रथम मला असे नमूद करावयाचे आहे की हे पद स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित सन्यस्त खड्ग या नाटकाचं भरतवाक्य नाही तसंच ते या नाटकाचे सार किंवा सारांशही नाही अगदी मूलभूत स्तरावर ते एका विरहिणीचे भावगीत आहे एक प्रेमकविता आहे हे नीटसं समजण्यासाठी आधी सन्यस्त खड्ग त्याचे कथानक आणि नाटकातील ज्या पात्राच्या तोंडी हे पद येतं ती सुलोचना यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत् नागिरीला स्थानबद्ध असताना सावरकरांनी सन्यस्त खड्ग लिहिलं या काळात त्यांना राजकारणात जाण्यास बंदी होती तिथे त्यांनी भरपूर लिखाण केले लेख पुस्तके नाटकही लिखाणाचा उद्देश आपले विचार मांडणे हाच असल्याने सन्यस्त खड्ग हे नाटकसुद्धा सावरकारांची वैचारिक सुस्पष्टता घेऊन येते नाटकाची कथा अहिंसा धर्म कर्म यांचा ऊहापोह करत नाटकातील पात्रांद्वारे विचारांचे मंडन खंडन करीत पुढे जाते प्रमूख पात्रं आहेत बुद्ध विक्रमसिंह वल्लभ आणि सुलोचना सिद्धार्थ गौतम बुद्ध होऊन काही वर्ष लोटली आहेत विक्रमसिंह हे बुद्धांच्या वडिलांच्या शुद्धोदन राज्याचे शाक्य सेनापती बुद्धांच्या सांगण्यावरून ते शस् त्रसंन्यास घेतात पटत नसतानाही केवळ प्रयोग म्हणून तथागतांबरोबर भिक्षु म्हणून प्रवासास जातात या घटनेला चाळीस वर्षे लोटतात दरम्यान विक्रमसिंहांचा पुत्र वल्लभ राज्याचा सेनापती होतो वल्लभ सुद्धा शूर पराक्रमी आहे या चाळीस वर्षात बुद्ध धर्माचा आणि त्यात सांगितलेल्या अहिंसेचा पुष्कळ प्रसार झाला आहे तेवढ्यात शेजारच्या कोसला राज्याचे शाक्यांवर आक्रमण होते अहिंसामार्गी झालेल्या या राज्याची युद्धाची तयारी नसते बरीच वाताहत होते सेनापती वल्लभ पकडले जातात ही वार्ता पोचताच विक्रमसिंह तथागतांच्या मनाविरुद्ध खड्ग निष्कोषित करतात आणि युद्धात सामिल होतात जाताना ते बुद्धांना म्हणतात मी अहिंसा सोडत आहे बुद्धांना नाही हे पद नाटकात सुलोचनेच्या तोंडी येतं सुलोचना ही वल्लभ दयिता पत् नी त्यांच्या प्रीतिविवाहाला नुकतंच एक वर्ष झालंय हा वाढदिवस साजरा करतानाच्या प्रेमसंवादात ती दोघे मग् न आहेत तोच वल्लभास राजसभेचे तातडीचे निमंत्रण येते आणि तो तिथून जातो तो परत आल्यावर त्याच्याशी कसं बोलावं रुसावं का किती या विचारात ती असतानाच दूत निरोप आणतो सेनापती तर परस्पर युद्धावर गेले ही भेट अर्धीच राहिली याची तिला खंत सतावते काही दिवसांतच अशीही बातमी येते की शाक्यांचे सैन्य उधळून गेले आणि सेनापती वल्लभ युद्धबंदी झाले तेव्हा तिच्या तोंडी येते ते हे पद शत जन्म शोधितांना या पदाचा संपूर्ण अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सावरकरांचा चष्मा घालावा लागेल भावनेची तीव्रता उत्कटता हातचं राखून काहीच नाही भव्य दिव्य तेजस्वी आणि प्रखरही स्वत जळून इतरांस ऊर्जा देण्याचं सामर्थ्य असलेलं सुलोचना ही सामान्य राजस् नुषा नाही फक्त प्रेमसंवादात तिचं मन रमत नाही तो ती करतेच पण ती कर्तृत्ववान आहे स् त्रीसुलभ भावनांबरोबर विचारांची परिपक्वता तिच्यात आहे तिच्या जाणीवा प्रगल् भ आहेत धैर्यधर पतीचा तिला अभिमान आहे तो युद्धबंदी झाल्याचे समजताच तिचे पहिले वाक्य असते हा सेनापती अबल आहे म्हणून पराभूत नाहीये तर सबल परि ना राष्ट्रचि म्हणून अपजयी हा नसे जित पहा सेनानि पुढे जाऊन ती सैनिक वेष घालून रणांगणात युद्ध करते व आपल्या पतीसह वीरमरण पत्करते ही अशी स् त्री जेव्हा एक विरहगीत गाईल आणि तेही सावरकरांच्या लेखणीतून उतरलेलं ती म्हणते शत जन्म शोधितांना शत आर्ति व्यर्थ झाल्या शत सूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या हा माझा माझ्या प्रियकराचा शोध जन्मजन्मांतरीचा आहे जन्म मरणाच्या अनेक फेर् यांतून गेलेला माझ्या या शोधापुढे शत आर्ति व्यर्थ आहेत आर्ति या शब्दाचा अर्थ जरी दु ख पीडा असला तरी इथे त्याची आर्तता थेट ज्ञानेश्वरांची आहे विश्वाचे आर्त शी नातं सांगणारी दीपावली सुद्धा तुम्हां आम्हांसारखी मिणमिणत्या पणतींची नाही तर तेजाळ देदिप्यमान सूर्यमालिकांची इथे कवी सावरकरांनी विझाल्या असं म्हणताना विझल्या तला कोरडेपणा काढून टाकला आहे या माझ्या शोधयज्ञात मी अशा शत दीपावलींची आहुती दिली आहे असे तिला वाटते तेव्हां पडे प्रियासी क्षण एक आज गांठी सुखसाधना युगांची सिद्धीस अंति गाठी प्रियकर मीलनाचे सायास तिला कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाही तिच्यासाठी ही आनंदाने केलेली साधना आहे जिची सिद्धी आतां कुठे होऊ घातली आहे येथे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा आणखी एक स्पर्ष जाणवतो वरील दोन्ही ओळीतील गाठी या शब्दाने त्यांनी यमक साधलाय आणि श्लेषही पहिल्या ओळीतील गाठी हे गाठभेट या अर्थाने येते तर दुसर् या ओळीतील गाठी हे पोचणे या अर्थाने युगायुगांच्या प्रतिक्षेनंतर आमची भेट घडली आहे तोच हा हाय जो न जाई मिठि घालु मी उठोनी क्षण तो क्षणांत गेला सखि हातचा सुटोनी नुकतीच तर कुठे आमची भेट झाली आहे जो मी उठून त्याला माझ्या प्रियकराला मिठी घालू पाहते तोच सगळं संपून गेलं मीलनाचा तो क्षण एका क्षणांत संपून गेला पुलंनी एका ठिकाणी असं म्हंटलं आहे या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल पारितोषिक द्यावं इतक्या श्रेष्ठ दर्जाची ही कवीकल्पना आहे सन्यस्त खड्ग या नाटकाचा संदर्भ ठेऊन पाहिलं तर असा सगळा अर्थ आहे पण या संदर्भाच्या पलीकडे जाऊन अध्यात्मिक स्तरावरही हे पद फार खरं ठरतं मानवी जीवनातील दु खाचं सातत्य सुखाची क्षणभंगूरता काळाची गतीमानता बुद्ध धर्मात वर्णन केल्याप्रमाणे जीवनाचं अनित्य असणं असं बरंच काही सावरकरांच्या या पदरचनेचे आपल्या मनातील स्थान इतके अनन्य असे आहे की नुसतं शत जन्म म्हंटलं तरी हा सगळा अध्यात्मिक पट आपल्यासमोर उलगडतो फोटो सौजन्य आंतरजाल read user s comments 0 posted by alka vibhas email this blogthis share to x share to facebook share to pinterest गीत रामायण गदिमा आणि शेक्सपिअर posted by alka vibhas labels gadima geet ramayan marathi गदिमा मराठी माडगूळकर गीतरामायण वैचारीक हा लेख २०१५ साली गीतरामायण हीरक महोत्सव स्मरणिका अवघ्या आशा श्रीरामार्पण मध्ये प्रसिद्ध झाला आहे आभार सुमित्र माडगूळकर आणि समस्त माडगूळकर परिवार गीत रामायणाचा हीरक महोत्सव आपण अतिशय आनंदाने साजरा करत आहोत ही कलाकृती म्हणजे प्रतिभेचा अतुलनीय आविष्कार आहे तसेच तीने लोकप्रियतेचेही उत्तुंग शिखर गाठलं आहे गेली चार पिढ्या आणि सहा दशकं गीत रामायण मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहे आणि पुढील अनेक शतके गाजवेल हेही निश्चित आहे यातील हनुमंताच्या तोंडी असलेल्या ओळींमध्ये छोटासा बदल करून असं म्हणता येईल जोंवरि हें जग जोंवरि भाषण तोंवरि नूतन गीत रामायण गीत रामायणाच्या शाश्वततेवर इतका ठाम विश्वास जेव्हा एवढा मोठा जनसमुदाय एकमताने ठेवतो तेव्हा या विश्वासाचा आधार वैश्विक पातळीवरील काही कलाकृतींमध्ये शोधता येतो का असा एक विचार मनात आला असं साहित्य ज्यास शब्दश शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि ज्यास जन सामान्यांइतकीच भाषाप्रभूंची मान्यता आहे अर्थात शेक्सपिअरपेक्षा मोठं नाव समोर येईना शेक्सपिअरचे लिखाण साधारणत इ स १५९० ते १६१३ या काळातले इंग्रजी भाषेतले तात्कालीन आंग्ल संस्कृतीचा प्रभाव आणि संदर्भित विषय असलेले त्यामुळे गदिमांच्या गीत रामायणाशी त्याचे ना विषयाचे ना संस्कृतीचे साम्य पण दोन्हींमध्ये काही समान धागे आहेत तसं आधुनिक काम आहे सर्वमान्य आहे आणि कॅलेंडरची पानं झुगारून देण्याची क्षमता आहे या अनुषंगाने गीत रामायण व शेक्सपिसरीअन साहित्य यात शैलीची काही साम्यस्थळं शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत् न आहे शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या एकूण ३८ नाटकांपैकी ३४ नाटकांची बीजे कथासूत्रे किंवा नाटक म्हणूनही त्यांच्या आधी लिहिलेले होते जसे रोमिओ ज्युलिएट हे आर्थर ब्रूक यांनी १५६२ मध्ये लिहिले होते किंग लिअर मॅकबेथ इ हॉलिंशेड्स् क्रॉनिकल्स् मध्ये १५८७ मधे प्रकाशित झालेले होते याची सप्रमाण माहिती उपलब्ध आहे पण या मूळ कथाविष्कारांवर शेक्सपिअर यांनी आपल्या शब्दसंपन् नतेची अशी काही झळाळी चढवली की काळाचा ओरखडा त्यांवर ओढणे केवळ अशक्य रामकथेस हजारो वर्षांचा इतिहास आहे अनेक व्यक् तींनी विविध भाषांमधून काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती समर्थपणे मांडली आहे वाल्मीकी तुलसीदास मोरोपंत ही त्यातील काही मोजकी ठोस नावे गदिमांनी या असंख्य वेळा अभिव्यक् त झालेल्या रामकथेचे गीत रामायणाच्या रुपाने सोने केले ते निव्वळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर शब्दांची नादमधूर मांडणी पटकथेसारखा असलेला कथानकाचा नाट्य चित्रमय बहाव यांच्या बळावर गीत रामायण दीर्घायू चिरायु हे होणारच शेक्सपिअर हे त्यांच्या नाटकांसाठी जरी प्रामुख्याने ओळखले जात असले तरी त्यांचे वर्णन प्रथमत कवी आणि मग नाटककार असे करता येईल त्यांनी कविता सुनितें sonnets ही कारर्किर्दीच्या सुरुवातीच्या काळात लिहिली नंतरच्या काळात काव्य त्यांच्या नाटकांचा जवळपास सत्तर टक्के भाग व्यापू लागले त्यांच्या काव्यात जात्याच स्वर तालांचा मेळ असतो हा परिणाम साधण्यासाठी त्यांनी जी अनेक तंत्रे वापरली त्यातील एक प्रमूख तंत्र alliteration म्हणजे अनुप्रासांचा सुयोग्य आणि चौफेर वापर हे होय उदा १ for as you were when first your eye i eyed sonnet 104 २ when to sessions of sweet silent thought i summon up remembrance of things past sonnet 30 गदिमांच्या गीत रामायणातही नादांची गुंफण ताल स्वरांचे गुंजन भरून ओसंडते आहे त्यांनीही अनुप्रासांचा भरगच्च वापर केला आहे कुठलाही अट्टहास न करता शब्दांचा सहज सुंदर खेळ करत हे साधणं ही माडगूळकरांची signature style आहे याची काही मोजकी उदाहरणे १ कैक कैकयी करी नवसासी २ दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला ३ जिवासवें जन्मे मृत्यू जोड जन्मजात ४ प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावती अनुप्रासांचा मंजुळ खेळ जर श्रुति सुखावण्यासाठी आहे तर रूपकांचा metaphor प्रभावी वापर चित्र अधिक स्पष्ट करण्यासाठी शब्दचित्राचे रंग गडद आणि गहिरे करण्यासाठी sonnet 73 मध्ये वार्ध्यक्यासाठी हेमंती निष्पर्णतेचे रूपक शेक्सपिअर यांनी वापरले आहे ते म्हणतात that time of year thou mayst in me behold when yellow leaves or none or few do hang अयोध्येच्या प्रजाजनांच्या नजरेतून आदर्श असा जो नृपती राजा दशरथ याचे वर्णन करताना गदिमांनी कल्पतरूचे रूपक वापरले आहे ते म्हणतात कल्पतरूला फूल नसे कां वसंत सरला तरी रूपकाचे आणिक काही गदिमा स्पर्श जेव्हा भरत कैकयीला विचारतो शाखेसह तूं वृक्ष तोडिला फळां इच्छिसी वाढ वाल्मीकींचे शिष्य म्हणून लव कुश ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल वसंत वैभव गाते कोकिल हॅम्लेट च्या आधीचे शेक्सपिअर यांचे लिखाण काहिसे अलंकारीक शब्दबंबाळ वाटते तो त्यांच्या कारकीर्दीचा पूर्वार्ध आहे उत्तरार्धात मात्र साध्या सोप्या गेयता नसलेल्या शब्दांचा वापर सढळ आहे अगदी टोकाची भावना व्यक्त करताना सुद्धा जसे राग त्वेष संताप किंग लिअर या नाटकात किंग लिअर आपली मोठी मुलगी गोनरील हिला म्हणतो जिने त्याचे राज्य घेऊन त्याला घराबाहेर काढले आहे but yet thou art my flesh my blood my daughter or rather a disease that s in my flesh which i must needs call mine अंक २ प्रवेश ५ आणि हेच तर नेमके आपल्या गदिमांचे वैशिष्ट्य आहे कुठेही शब्दांचे अवडंबर नाही नेमक्या मोजक्या शब्दांचा सहजाविष्कार मग भावना कुठलीही असो हेच पहा ना माता न तूं वैरिणी मधे भरत कैकयीस म्हणतो श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात उभी न राही पळभर येथें काळें कर जा वनीं शेक्सपिअर यांचे लिखाण आणि गदिमांचे गीत रामायण यांच्यात आणखी एक महत्वाचे साम्य आहे ज्याला इंग्रजीत coining a phrase म्हणतात अनेक वाक् प्रचारांच्या idioms च्या रुपात या दोघांनी आपल्या पावलांचे ठसे त्यांच्या त्यांच्या भाषेवर उमटवले आहेत ज्यांच्या लिखाणाने मुळातून भाषाच अधिक संपन् न व्हावी एवढे कर्तुत्व या दोघांचे आहे अशा वाक्प्रचारांची यादी खरं तर खूप मोठी आहे वानगीदाखल काही सांगायचे झाले तर शेक्सपिअर १ all that glitters is not gold the merchant of venice २ high time comedy of errors ३ what s done is done macbeth गदिमा गीत रामायणात १ अभिषिक् तातें गुण वय नाहीं २ अतर्क्य ना झालें काहीं जरी अकस्मात ३ दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट याच सूत्राचा आधार घेत शेवटी असं म्हणेन आजचे माझे हे लिखाण हा एका मिणमिणत्या ज्योतीने शब्दशारदेच्या आकाशातील या दोन तेजांची आरती करण्याचा एक नम्र प्रयत् न आहे read user s comments 0 posted by alka vibhas email this blogthis share to x share to facebook share to pinterest आठवणीतली गाणी साठवताना posted by alka vibhas labels aathavanitli gani marathi media आठवणीतली गाणी मराठी मिडिया सहजच स्वगत साप् ताहिक विवेक दिवाळी अंक २०१७ या आठवणीतल्या गाण्यांमुळे icuतून ढगांत जाता जाता वाचलो येथील गाणी ऐकणे ही माझ्यासाठी थेरपी होती किंवा मी २२ वर्षांची असताना माझ्या दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता गेली मी hearing handicapped आहे पण आठवणीतली गाणी मुळे मला खूप गाणी वाचता व गुणगुणता येतात रोजचा दिवस एका तरल आनंदात जातो कधी अशी थेट भावनेला हात घालणारी ईमेल्स येतात तर कधी लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला हे बालगीत माझे आजोबा नारायण गोविंद शुक्ल यांनी लिहिलं आहे ते कसबा पेठ पुणे इथे राहतात मी निमिषा त्यांची नात त्यांच्यासह आम्हां सगळयांना फार आनंद झाला की असा एक गीतसंग्रह असावा आणि त्यात स्थान मिळवून या गाण्याचा आनंद समस्तांस घेता यावा किंवा इतकी वर्षे गाणी म्हणतेय म्हणजे तो माझा व्यवसायच आहे पण शब्दांच्या अचूकतेकडे कधी फारसं लक्ष दिलं गेलं नाही आता असोवरी मेखला यासारखे शब्द अगदी बरोबर आणि अर्थ समजून गायल्याने माझे गायन अधिक परिणामकारक होते यासारखे निरोप थोडक्यात काय आठवणीतली गाणी या माझ्या संकेतस्थळाला नियमित भेट देणाऱ्याने एकाने म्हटलं आहे तसं ही वेबसाइट माझ्या कामाची नाही असं कुणीही म्हणू शकत नाही जशी तुमची प्रकृती प्रवृत्ती तसा तुम्ही अनुभव घ्यावा आता आपली आवड सारख्या कार्यक्रमासाठी रेडिओवर अवलंबून राहण्याची गरज नाही फक्त आपल्याला आवडणाऱ्या गीतांची निवड करावी आणि ती मनसोक्त ऐकावी हे आता सहज शक्य झालंय ते आठवणीतली गाणी मुळे www aathavanitli gani com ही वेबसाइट तयार करणं चालवणं हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे एकीकडे मराठीतील गीतरत्नं शोधावी दुसरीकडे बदलतं तंत्रज्ञान शिकावं ते आठवणीतली गाणी वर अंमलात आणावं असा समन्वय साधत माझा प्रवास चालू आहे यांस अनेकविध मार्गांनी कसं संपन्न करता येईल हा सजग विचार सतत मनात असतो चौदा वर्षं झाली सुरुवातीला फक्त गाण्यांचे शब्द लिखित स्वरूपात होते आता तेवढंच सीमित राहिलेलं नाही अवघड शब्दांचे अर्थ ब्लॉग संदर्भलेख संतांच्या रचनांचा भावार्थ विविध गायकांनी केलेले एकाच गाण्याचे स्वराविष्कार गीताचा राग असे अनेक आयाम जोडले गेले जिथे गाणी ऐकता येतात अशी अनेक संकेतस्थळं आंतरजालावर उपलब्ध आहेत पण वर दिलेल्या आपल्याच अशा खास वैशिष्टयांमुळे आठवणीतली गाणी चं स्थान अनन्य असं आहे उपलब्ध माहिती दुर्मीळ आणि अनुभव संपन्न आहे या निमित्ताने अनेक कलाकारांच्या त्यांच्या वारसदारांच्या अभ्यासूंच्या भेटी घडत असतात प्रत्येक व्यक्ती प्रत्येक चर्चा या गीतरचनांवर वेगवेगळा प्रकाशझोत टाकते तसंच खूप वाचनही घडतं मध्यंतरी वि स खांडेकर यांचा एक लेख वाचनात आला त्यात त्यांनी कुसुमाग्रजांच्या पाचोळा कवितेविषयी लिहिलं आहे त्यांचीच प्रस्तावना असलेल्या विशाखा या कविता संग्रहातील ही कविता तिचा त्यांनी लावलेला अर्थ कवी मायदेव यांना वाटलेला सापेक्ष अर्थ आणि खुद्द कवीच्या मनातील कविता लिहितानाची भावना यातील तफावत याचं गमतीदार वर्णन या लेखात त्यांनी केलं आहे मग मी पुढे जाऊन पं हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेची चाल बांधताना कुठला अर्थसंस्कार केला असेल याचा विचार करू लागले मग दोन संगीतकार जेव्हा एकाच गाण्याला चाल लावतात तेव्हा त्यांचा काय विचार असेल तसंच एकच गाणं दोन गायक गातात त्यातून मिळणारा आनंद हे सर्व रसिक श्रोत्यांना पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटलं ही सर्व माहिती आठवणीतली गाणी वर वेळोवेळी संकलित केल्याने तिचा विस्तार एकसुरी राहिलेला नाही गदिमांच्या शब्दांचा आधार घेऊन या माझ्या उपक्रमाचं वर्णन असं करता येईल ज्ञानदेविच्या मराठियेच्या नगरीतून हिंडून आणिले टिपुनी अमृतकण आठवणीतली गाणी संपूर्णत अव्यावसायिक तत्त्वावर आहे म्हणजे non commercial non profit या कामासाठी कुणाकडूनही आर्थिक किंवा कुठल्याही स्वरूपात मोबदला घेतला जात नाही त्यामुळे इथे जाहिरातींचा गोंधळ नाही तसंच इथल्या पानांवर भेट देणाऱ्यांचे अभिप्राय टिप्पण्या नाहीत त्यामुळे आठवणीतली गाणी हा एक निवांत असा अनुभव आहे येथे भेट देणं अनेकांना मन शांत करण्यास मदत करणारं वाटतं असे अभिप्राय येतच असतात श्री आबा पाटील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना नेमक्या याच कारणासाठी अनेक वेळा ते येथील गाणी ऐकत असत त्यांनी तसं कळवलं होतं काही मानसोपचारतज्ज्ञ संगीत आवडणाऱ्यांना या संकेतस्थळाला मुद्दामहू...
|