Meta tags:
Headings (most frequently used words):
2011, sunday, 2010, 23, saturday, january, सृजनस्वप्न, october, tuesday, august, thursday, december, 30, september, july, 25, total, pageviews, blog, archive, about, me, followers, दिवाळी, पहाट, गावझुला, लेखक, श्याम, पेठकर, एका, बंदिशीची, गोष्ट, सकाळनं, घडवलेली, सकाळ, संध्याछाया, भिवविती, हृदया, तिचं, प्राजक्ती, स्वप्न, आजोळ,
Text of the page (most frequently used words):
आणि (104), आहे (79), नाही (54), त्या (50), काही (44), आता (41), मला (37), तिला (37), होती (35), म्हणून (30), अगदी (30), असं (25), काय (24), त्याला (23), आहेत (23), तिच्या (22), तुला (22), आपल्या (21), खूप (20), करून (20), होतं (19), झाली (19), कविता (18), तरी (17), माझ्या (16), घेऊन (16), म्हणजे (16), कधी (15), त्याची (15), तिची (15), असतात (15), होता (14), कुणी (13), तिचं (12), त्यांच्या (12), होते (12), त्याच्या (12), होऊन (12), तुम्ही (12), पुन्हा (12), मध्य (12), प्रत्येक (11), अशी (11), अरे (11), झाला (11), दिवस (11), आपली (11), मनात (11), असतो (11), नाहीय (11), कोमल (11), दिवाळी (10), सगळी (10), सगळं (10), केली (10), दिलं (10), हाय (10), सुरू (10), यांच्या (10), आपण (10), सगळे (10), गाव (10), सूर (10), देव (9), तरीही (9), क्रांति (9), किती (9), केतकीला (9), रत्नामावशी (9), केतकी (9), गेली (9), तिचा (9), झालं (9), त्याचं (9), आले (9), काम (9), सांगितलं (9), सगळ्या (9), जातो (9), दिली (8), शास्त्रीय (8), मराठी (8), पहाट (8), करायला (8), कुठं (8), विषय (8), तेव्हा (8), असतं (8), कामं (8), त्यानं (8), नये (8), दोन (8), सखूबाई (8), कौतुक (8), तुझी (8), केवळ (8), अप्रतिम (8), दाद (8), करत (8), तीव्र (8), आवडतं (7), फक्त (7), posted (7), तिनं (7), मागे (7), पूजा (7), कमी (7), जाता (7), तसं (7), करता (7), गेला (7), कोण (7), बाबा (7), विलक्षण (7), मुलं (7), कितीतरी (7), केला (7), भेट (7), फोन (7), बंदिश (7), गंधार (7), माझा (6), माझं (6), वर्षी (6), लहान (6), गेले (6), प्रश्न (6), चार (6), सोडून (6), मोठ्या (6), त्यांनी (6), हेच (6), लागली (6), आला (6), आली (6), अजून (6), येत (6), सखूबाईंनी (6), आपलं (6), कारण (6), पुढे (6), करू (6), असा (6), त्यांना (6), आजी (6), अशा (6), गाणी (6), जातं (6), गाणं (6), स्वत (6), नाहीत (6), एका (6), प्रयत्न (6), किंवा (6), करतो (6), गझल (6), तुम्हाला (6), रहातो (6), खरंच (6), शब्द (6), भाव (6), सुरेल (6), हात (6), असते (6), लागतात (6), आयुष्य (5), काव्य (5), 2011 (5), माझे (5), बरं (5), झाले (5), तयारी (5), भाऊ (5), डोळे (5), सासू (5), त्याचा (5), जेव्हा (5), जरी (5), तशी (5), मात्र (5), कधीच (5), यावर (5), मिळवून (5), केलं (5), देत (5), सतत (5), केतकीनं (5), होत्या (5), जाते (5), त्यो (5), बोलली (5), वारकरी (5), भक्ती (5), बुवा (5), माय (5), येतो (5), नकोस (5), घरी (5), देतो (5), comments (5), करते (5), निघून (5), गात (5), अतिशय (5), माझी (5), आवाजात (5), सख्या (5), दिलंय (5), अपेक्षा (5), महत्त्व (5), कळत (5), घेत (5), जात (5), मध्यम (5), रंगरलियां (5), कुठे (5), तार (5), रहातात (5), गुरू (5), भ्रमंतीत (5), गावझुला (5), उठि (5), वयाच्या (4), यांनी (4), याची (4), january (4), 2010 (4), गुच्छ (4), त्यांचे (4), रत्नाच्या (4), घरात (4), पहिली (4), गावात (4), येऊन (4), जावा (4), धाकट्या (4), येईल (4), जास्त (4), शाळेत (4), पाहून (4), बाबांच्या (4), यांची (4), ठेवून (4), सेवा (4), सुरुवात (4), निरंजनला (4), पोरी (4), माज्या (4), न्हाई (4), येक (4), घिऊन (4), येते (4), हाती (4), सांगितली (4), आलं (4), मिळाली (4), वाट (4), हातात (4), वयात (4), तुमच्या (4), जवळजवळ (4), इतका (4), तसे (4), स्वप्न (4), समजून (4), जुन्या (4), होतेय (4), याच (4), असेल (4), व्यथा (4), म्हणतात (4), घालत (4), आजही (4), तत्वज्ञान (4), मित्र (4), काहीतरी (4), करी (4), सुंदर (4), राग (4), अनुभव (4), रसिकाला (4), नक्कीच (4), काहीही (4), झालेलं (4), अन् (4), नंबर (4), तुमची (4), असता (4), ग्रेस (4), लागतं (4), बंदिशीची (4), गोष्ट (4), रिषभ (4), सुरेख (4), मंद्र (4), धैवत (4), बंध (4), संत (4), ललितबंध (4), गावं (4), भूपाळी (4), गायला (4), आवाज (4), हळूहळू (4), आजीच्या (4), आजोबा (4), सुद्धा (3), संगीत (3), पूर्ण (3), विश्वास (3), चांगली (3), अर्थात (3), december (3), वेळ (3), रत्नामावशीचा (3), रत्नामावशीच्या (3), रत्ना (3), केतकीच्या (3), आईची (3), बालपण (3), आजारी (3), म्हणूनच (3), आलेलं (3), त्यांची (3), सोय (3), घरच्याच (3), रत्नासाठी (3), खरं (3), मुलगा (3), नवरा (3), लहानपणापासून (3), शिकली (3), बराच (3), त्यावेळी (3), दिसायला (3), पार (3), थोडी (3), मदत (3), नवर् (3), एवढी (3), त्यात (3), आणून (3), दूर (3), याला (3), नव्हतं (3), असलेल्या (3), घेतली (3), पोरानं (3), सार्थक (3), तृप्त (3), धन्यवाद (3), सोडलं (3), महत्त्वाचं (3), सोबत (3), वगैरे (3), चांगल्या (3), लागला (3), तिकडे (3), गेल्या (3), सोडणार (3), निरंजनच्या (3), तिकडं (3), जीव (3), बाई (3), मिळणार (3), इतके (3), इतकं (3), सांगते (3), माउली (3), भल्या (3), बुवानं (3), दरवर्षी (3), तवा (3), समजलं (3), वार् (3), ऐकून (3), म्हटलं (3), बसून (3), कसं (3), नको (3), त्यावर (3), नुकतीच (3), बागकाम (3), भानावर (3), लागेल (3), जसं (3), आवडतात (3), आणखी (3), तुझ्या (3), आम्ही (3), कुणीतरी (3), मोठं (3), माणूस (3), मिळेल (3), जायला (3), बंद (3), खास (3), त्यांचा (3), गेलेल्या (3), असावं (3), पहात (3), sunday (3), सुगंधी (3), प्राजक्ती (3), मनाला (3), जपत (3), काहीसं (3), सहज (3), जखम (3), नंतर (3), केलेली (3), मनाच्या (3), नसतात (3), म्हणा (3), जिव्हाळ्याचा (3), कळायला (3), यांचं (3), नातं (3), असंख्य (3), कुठेही (3), रिकामे (3), अर्थ (3), मधु (3), परी (3), नाती (3), कलावंताची (3), काळात (3), दिवसांत (3), इतकी (3), रसिका (3), सारं (3), देवाला (3), नैवेद्य (3), ज्या (3), नाव (3), द्यावं (3), गीत (3), वाटतंय (3), असे (3), पाणी (3), विसरून (3), सकाळ (3), मोबाईल (3), बोलताय (3), आपला (3), मनापासून (3), तुमचा (3), करतेय (3), तोवर (3), पुढचा (3), माझ्यासाठी (3), चांगलं (3), माणसं (3), मार्गदर्शन (3), हवेत (3), राहिले (3), अनमोल (3), प्रत्यक्ष (3), संगीतात (3), ताल (3), पियासंग (3), उभी (3), अवघ्या (3), चढत (3), निषादाला (3), खेळत (3), जाणून (3), असावी (3), लेखक (3), श्याम (3), पेठकर (3), डेबू (3), गरम (3), बैरागी (3), पाय (3), जमिनीवर (3), येणारा (3), फिरत (3), पात्रं (3), गावाचं (3), होतात (3), मामा (3), आरती (3), आजोबांनी (3), काकीआजी (3), उठा (3), काकडा (3), सगळेच (3), जाग (3), ओसरीत (3), मंदिरात (3), रूह (2), कविवर्य (2), सुरेश (2), प्रेरणा (2), निसर्ग (2), उर्दू (2), भाषा (2), लिहिते (2), खात्री (2), घ्यायला (2), july (2), september (2), august (2), october (2), posts (2), comment (2), उत्साह (2), वहात (2), कॉफी (2), आलेल्या (2), मुलाच्या (2), जय्यत (2), आजोळ (2), पहिला (2), वाढदिवस (2), घरातली (2), बहिणी (2), सगळ्यांत (2), जरा (2), करण्यात (2), गेलं (2), अक्षरशः (2), लागलं (2), हक्काची (2), काढला (2), घ्यावा (2), करावा (2), असती (2), हातातून (2), अखेरीस (2), ठरलं (2), रहाणारं (2), बायका (2), लेकरं (2), जागा (2), नैवेद्याची (2), करणं (2), सगळ्यात (2), मोठा (2), म्हणे (2), चर्चा (2), खोटं (2), जाणे (2), देणं (2), घेणं (2), पडली (2), गाय (2), दुसर् (2), संपलं (2), मानानं (2), गळ्यात (2), त्यामुळे (2), समोर (2), ठाऊक (2), कुठल्याही (2), तक्रार (2), यावरचं (2), आजीकडे (2), रहायची (2), असली (2), कधीतरी (2), माहिती (2), दिरांनी (2), काढलं (2), वाटा (2), दिला (2), नावही (2), रत्नानं (2), याच्या (2), होऊ (2), सोबतच (2), थोडं (2), सावरत (2), सासूला (2), दारात (2), पोराला (2), घेतलं (2), लावून (2), संगत (2), येताच (2), शिकायला (2), तेही (2), वेळोवेळी (2), मनानं (2), देऊन (2), पुढं (2), उडत (2), आठवण (2), केतकीची (2), ओंकारला (2), पीएचडी (2), बालपणापासून (2), कामाला (2), जशा (2), तसंच (2), नोकरी (2), खाऊ (2), घालायला (2), कुनी (2), लेक (2), इचार (2), अर्दा (2), इतं (2), द्येव (2), कष्ट (2), बसलाय (2), न्हवं (2), घरची (2), आशी (2), घेते (2), कुठली (2), बुवाच्या (2), पायी (2), नीट (2), पोरगा (2), मागं (2), तवर (2), बगा (2), रात (2), गावाकडं (2), नेऊन (2), विचित्र (2), माउलीला (2), समदी (2), हाकीकत (2), झोळीत (2), घालतो (2), सगळंच (2), सांगायला (2), भरून (2), घरातच (2), म्हनलं (2), संबाळ (2), उद्या (2), म्हणाली (2), रात्री (2), सखूबाईच्या (2), धर्माच्या (2), नणंदेची (2), ओंकार (2), हाक (2), उभ्या (2), पाहिलं (2), घालून (2), दोघी (2), भावनांचा (2), आल्या (2), मुळीच (2), माझ्याच (2), निवांत (2), रहाणं (2), करायचं (2), करावं (2), विद्या (2), इथं (2), मावशी (2), गोष्टी (2), पाळणाघर (2), आजीची (2), आलीय (2), झालो (2), हवंच (2), सगळ्यांसाठी (2), आयुष्यभर (2), सुकात (2), कसलं (2), संध्याकाळी (2), वेगवेगळे (2), खेळ (2), तिथं (2), यांना (2), पहाता (2), त्याच (2), काढून (2), झाल्या (2), पाहुणे (2), लक्ष (2), खूश (2), मैत्रिणी (2), सकाळी (2), मोकळी (2), वेळी (2), हळूच (2), खुळ्या (2), देतं (2), नव्या (2), उत्साहानं (2), चुकत (2), झालंय (2), मनाचं (2), साधी (2), सुख (2), प्रसन्न (2), मंद (2), मनाची (2), वाटता (2), वेदना (2), कालातीत (2), अंगाई (2), कवितेशी (2), पाखरं (2), झोप (2), अंघोळ (2), गोठ्यातली (2), सार् (2), जसा (2), अतूट (2), कधीही (2), रुंजी (2), सखी (2), तांबे (2), मधुघट (2), जशी (2), तशीच (2), कुठल्याशा (2), क्लास (2), समजावून (2), रसग्रहण (2), निरूपण (2), गेलंय (2), मागसी (2), एकतान (2), प्रेम (2), जीवनाचं (2), काव्याचा (2), विषयावर (2), बर् (2), दिसतात (2), पळभर (2), म्हणतील (2), विषयावरची (2), आयुष्याचं (2), कळकळ (2), उतरत्या (2), कहाणी (2), नवीन (2), लिहिलं (2), लागलीय (2), नवं (2), उत्तर (2), खरा (2), उतारवयात (2), करण्याचा (2), दया (2), तुझ्यासाठी (2), लक्षात (2), याचा (2), माझ्यावर (2), फूल (2), दादा (2), हाच (2), तोही (2), तांब्यांच्या (2), ओळीत (2), सहजी (2), व्यक्त (2), एकच (2), वाटी (2), अता (2), दुधाची (2), कोरांटी (2), कशी (2), सारा (2), सुचेल (2), करतोय (2), दुर्लक्षित (2), म्हणजेच (2), केलंय (2), टाकाऊ (2), ठेव (2), होईना (2), दुधाचा (2), मधुर (2), कोवळे (2), मागू (2), रसिक (2), तुझा (2), रहावं (2), रसिकानंही (2), हसं (2), सन्मानानं (2), पूर्वी (2), यातला (2), निघतात (2), ढळला (2), संध्याछाया (2), भिवविती (2), हृदया (2), लागले (2), संपले (2), भीती (2), गोड (2), देता (2), आयुष्याच्या (2), ठेवू (2), डोळ्यांत (2), अखेरच्या (2), श्वासापर्यंत (2), रोज (2), विश्वात (2), यात (2), स्वीकारावी (2), म्हणेल (2), बुधवार (2), उरकून (2), पांचाळे (2), लगेचच (2), कशाला (2), हवं (2), एवढं (2), आवडली (2), माझाही (2), कार्यालयात (2), बसेल (2), बोलतोय (2), होय (2), बोलत (2), एकुलता (2), निमित्तानं (2), मिळवलंय (2), मोठी (2), वेडी (2), शहाणी (2), कुणाच्या (2), ठीक (2), ठेवतो (2), बाहेर (2), दिवसभर (2), सगळ्यांना (2), काका (2), जोशी (2), गाण्याच्या (2), वर्षानं (2), व्यक्तिमत्वाचं (2), पावले (2), असतील (2), saturday (2), संगीताची (2), धाडस (2), स्वर (2), त्याशिवाय (2), भिन्न (2), पोहनकरजी (2), कृष्ण (2), मांडले (2), पिया (2), सास (2), सांगतेय (2), नणंद (2), त्रास (2), कठीण (2), पियाला (2), सखीला (2), विशेष (2), हवंय (2), एकेक (2), रागातली (2), गाइला (2), मैं (2), ओळींत (2), नायिकेच्या (2), स्वरांनी (2), असताना (2), पनघट (2), षड्ज (2), निषाद (2), जणु (2), सगळ्यांच्या (2), पियाशी (2), आलंय (2), धरून (2), रिषभावर (2), पाणवठ्याच्या (2), याचं (2), मोहे (2), दूजे (2), देरनिया (2), जेठनिया (2), निसदिन (2), रही (2), हमरी (2), मध्यमानं (2), षड्जाच्या (2), सप्तकातल्या (2), घुसमटून (2), निषादानं (2), सप्तकातला (2), यांच्याशी (2), रहाता (2), घेण्यासाठी (2), ऐकलेली (2), http (2), www (2), com (2), मनातल्या (2), श्री (2), गाडगेबाबा (2), साधू (2), त्याच्याकडे (2), डेबूला (2), गावक (2), शोधात (2), संकल्पना (2), नव्हे (2), झालेली (2), मनाशी (2), सरळ (2), जंजाळात (2), झालेला (2), आपल्याला (2), माती (2), उपदेश (2), असंही (2), वाटतं (2), रूपात (2), येणारी (2), स्त्रियांचं (2), गुरफटून (2), माणूसपण (2), अघोरी (2), मिळालेल्या (2), कृतीतून (2), कुठल्या (2), सारून (2), तीर्थ (2), धावत (2), शोधत (2), ठसे (2), मागोवा (2), उजळत (2), भेटलेल्या (2), आधीच (2), मिळून (2), दीर्घ (2), देणारा (2), रिता (2), घुमत (2), उठला (2), म्हण (2), एकवार (2), उडतात (2), उठवते (2), अरुण (2), प्रभात (2), ताज्या (2), लक्ष्मीपूजन (2), करायची (2), फुलांची (2), मंडळी (2), राजूदादा (2), मांडीवर (2), दिवाकरा (2), म्हणते (2), लागते (2), राजसा (2), उठी (2), राजिवा (2), अरुणोदय (2), काकीआजीचा (2), पैंजण (2), कानात (2), यावर्षी (2), आलाप (2), अंगणात (2), जागं (2), किलबिल (2), थवा (2), मंजुळ (2), विठू (2), देवांना (2), उठवा (2), ओढतो (2), हास्याचे (2), सरूमावशी (2), ताबा (2), घेउनी (2), आलेली (2), नसतो (2), आजीचा (2), घुमतो (2), रंगत (2), सूर्यनारायण (2), उन्हं (2), हलके (2), घेतंय (2), पान्हा (2), आईला (2), हसत (2), माईक (2), मुकुंदा (2), पुंडलीक (2), मनाचा (2), दारी (2), चंद्रभागा (2), लागतो (2), मामीचा (2), लाडकी (2), सुरात (2), सगुणा (2), विश्रांती (2), चला (2), सुधाधार (2), सुरांच्या (2), काकाआजोबा (2), सोन्यासारखी (2), निरांजन (2), मायबाई (2), तोंडावर (2), हसता (2), चिवडा (2), धूप (2), अभ्यंगस्नान (2), परडी (2), साग्रसंगीत (2), चिमणे (2), सृजनस्वप्न (2), picture, window, theme, powered, blogger, create, your, badge, kranti, sadekar, followers, view, complete, profile, क्रान्ति, प्राण, व्या, गज़ल, लिहिण्यासाठी, पूर्वसंचित, हिन्दुस्तानी, साहित्य, चांगुलपणा, गोष्टींवर, फ़ुलं, झाडं, नद्या, सागर, आकाश, जगातील, वस्तू, आवडते, हिन्दी, लिपी, कधीकधी, इंग्रजी, निराशावादी, आशावादी, चांगल्यासाठी, आत्मशोध, काव्यासाठी, तखल्लुस, उपनाम, आत्मा, about, 2009, march, blog, archive, total, pageviews, subscribe, atom, home, older, लावताय, पोरांनो, बघा, सहा, तयारही, सळसळून, कौतुकानं, मुलांनी, बनवलेले, दाखवले, पाळणाघराचा, साठीच्या, मूल, आनंदानं, रसरसलेलं, पहाताना, दूरच्या, नात्यातली, बहीण, यांच्यातली, धाकटी, लाभलंच, समज, येईतो, वडील, आजारपणं, काढण्यात, बहिण, भावाच्या, लग्नकार्यात, धावपळ, रत्नाचं, हरवूनच, गेल्यावर, रत्नाला, भावंडांच्या, दयेवरच, जगावं, लग्नकार्य, सणवार, यांत, कामवाली, सगळ्यांनी, उपयोग, घेतला, उलटून, लग्नाचं, पुढाकार, खर्च, दुसरं, मोलकरीण, आजीनं, भावंडांना, दटावलं, उघडले, वाढल्यानं, प्रथमवर, मिळणं, महागात, पडलं, थोरल्या, मेहुण्यानं, आणलेलं, बिजवराचं, स्थळ, बघायचं, तीर्थाच्या, ठिकाणी, कुटुंब, उपाध्येपण, वंशपरंपरागत, चालत, येणार्, यात्रेकरूंना, रहायला, व्यवसाय, रोजचं, १००, १५०, पान, जेवायला, पुरण, वरणाचा, स्वयंपाक, सुना, करायच्या, पाहिलेला, चाळिशी, गाठलेला, बायको, अपघातानं, आत्महत्या, वर्षांचा, असेना, त्याच्याशी, रत्नीला, उजवली, विचारायचाही, नव्हताच, कसंबसं, उरकायचं, लग्न, उरकलं, खटल्यात, दावं, गरीब, दाव्याला, बांधली, भावंडांचं, कर्तव्य, तिच्यापेक्षा, असल्या, वयानं, असल्यानं, साळसूदपणे, कष्टाची, आल्याबरोबर, घातली, तिखट, खवीस, तिरसट, नाटकं, बायकोपुढेच, चालायची, भावांपुढे, भिजल्या, मांजरासारखा, मुका, व्हायचा, सोसणं, मुकाट्यानं, सामना, गोष्टीची, चेहर्, हास्य, मावळू, आवडायची, यायची, भावंडं, रत्नामावशीसोबतच, तिच्याकडून, शिकण्यासारखं, असायचं, पुस्तकांच्या, अनुभवाच्या, लग्नानंतर, केतकीचा, संपर्क, एकदाच, केव्हातरी, देवीची, आईबरोबर, रत्नामावशीकडे, रडूच, फुटलं, बारीक, म्हातारीच, दहाजणींत, उठून, दिसणारी, रया, भेटीनंतर, भेटली, बदलीमुळे, संपर्कच, तुटला, तिच्याशी, लग्नातही, येऊ, शकली, नव्हती, आईकडून, थोडीफार, मिळत, भावाला, फसवून, घराबाहेर, मिळकतीतला, कणभरही, वडिलोपार्जित, संपत्तीत, खोट्यानाट्या, कागदपत्रांच्या, आधारे, लावलं, अचानक, संकटानं, खाल्ली, पडला, परिस्थितीतही, डगमगून, भावंडांची, गावकर्, बाजूच्या, स्वैपाकाची, धरली, खाण्यापिण्याची, औषधपाण्याची, आबाळ, कमाई, मिळायला, शिवण, टिपण, विणकाम, जमेल, वादळातल्या, नावेला, किनार्, न्यायची, धडपड, कशीबशी, अर्धांगाचा, झटका, स्वतःकडे, हक्काचा, नोकर, कसलीही, कुरकूर, दोन्ही, जिवांची, मुलाला, शाळेतून, वेडीवाकडी, बिघडतोय, कानावर, शांतपणे, मेहुण्यांच्या, मदतीनं, बोर्डिंग, घातलं, एव्हाना, गुणांची, पटली, वागण्याचा, पश्चातापही, जन्मजात, पाककौशल्यानं, वाढली, सासूच्या, आजाराच्या, खर्चासोबत, पोराच्या, शिक्षणाचीही, जमवलेल्या, गंगाजळीतून, लहानशी, जागाही, विकत, तिचे, बरे, पहिल्याच, चांगले, मार्क, कष्टांचं, नातवाची, प्रगती, उदंड, आशिर्वाद, देवाघरी, त्यापुढच्या, भरारी, सवतीचं, पोर, असूनही, भलेपणासाठी, झटणार्, बायकोला, यानं, मुलाचं, शिक्षण, रिकामा, वेळही, पापड, लोणची, शिकून, हुद्द्यावर, नोकरीला, परदेशात, आपल्यासोबत, आईलाही, नेलं, कळलं, वेगळीच, हुरहूर, वाटत, रत्नामावशीची, वर्षांखाली, रेल्वे, अपघातात, निरंजनचे, गुरूंसोबत, तीर्थयात्रेला, तेव्हापासून, लहानग्या, सांभाळण्यासाठी, अर्धवटच, ठेवली, फॅक्टरीत, जाणं, स्वैपाकाच्या, असल्याचं, त्यांच्याकडे, विश्वासाच्या, कारणही, असणार, लेकाला, मुंबैला, फ्याक्टरीत, हायला, मिलनार, लगीन, हुईपरेंत, पायजेल, हितं, करीन, यकटा, म्हने, तकडंच, निगाले, तितं, हायचा, त्यापरास, त्याच्यासंग, जमीनजजुमला, ठरीवनारा, कुटं, हायचं, सोडायचं, विरोध, करणंच, शक्य, तुमच्यासारखी, विश्वासाची, मीच, घरच, पूर्णपणे, तुमच्यावर, विसंबून, घरासाठी, केलेत, आपलेपण, असणारं, काळजी, आपन, कोन, करनार, फिकर, करनारा, माज्याच, शेजारी, हातीय, बिचारीच्या, जल्माची, चित्तरकता, आइकशीला, व्हशील, येळ, इट्टलानं, आनली, तिच्यावर, त्यालाच, ठावं, तुज्याकडं, माज्यापरीस, झ्याक, करतीया, हाताची, गोडी, हक्कानं, कालवन, मागून, जेवताना, डाव, बाईची, खरी, हवीच, विचारलं, द्येवाघरची, धर्माची, बहिन, म्हून, ताब्यात, सोपवली, सखूबाईंचा, वारी, करायचा, पंढरीची, विठ्ठलावर, कुटुंबाची, प्रचंड, सांगा, वर्सापल्याड, वारीला, गेलते, तवाची, गोस्ट, लायनीत, थांबलं, व्हतं, दर्सनासाटी, मदीच, बुवाला, बोलला, बाबाजी, आईसाटी, पानी, खायला, कायतरी, दर्सन, भजन, फराल, त्येचा, पत्त्याच, ठावठिकाना, इचारला, आजून, मुक्काम, व्हता, त्येंचा, पंडरीत, मंडळीतल्या, बायांच्या, दिऊन, जाऊन, तेला, मायला, वारीत, घराचा, सौदा, पैशे, घिऊनशान, गायब, सांग, म्हनावं, कर्माला, बाप, चक्रावूनच, पुडं, व्हनार, म्हनाले, इट्टलाच्या, भेटलीस, सोडीन, कवाच, मापी, देनार, माज्यासंगट, लक्षिमीच्या, तुमी, दोगी, ठरवा, कराचं, ऐकलेलं, आसे, दावले, इटूनं, आसल, काई, जल्माचं, म्या, आसं, रहानं, जवळच, खोली, किरायानं, साली, वरती, माज्याकडून, वचन, त्येनं, मरस्तोवर, आंतर, दिऊ, सोडू, म्हनतीय, म्हनून, तुज्या, वटीत, घालते, तूच, विनवलं, रविवार, निरंजनही, घरीच, जेवतानाच, चित्तरकथा, दोघांची, बरीच, चर्चाही, आईबाबावेड्या, गहिवरून, आपल्याकडून, जितकं, तितकं, ठरवलं, दुपार, सरत, रविवारची, जास्तीची, हातावेगळी, निरंजनचं, साफसफाई, संपवून, संध्याकाळच्या, कामांची, केतकीबाय, सखूबाईची, धावलीच, क्षण, व्यक्तीकडे, गळ्यातच, निरंजन, आश्चर्याला, पारावार, उरला, रत्नामावशीसाठी, झुरणार्, शोध, दारातच, गळे, भावनांना, ओसरल्यावर, रहायचं, कष्टावर, वाढलेला, जमायचं, कामच, निरंजनची, कमाल, वाटलं, समोरच्या, माणसाला, चांगलीच, अवगत, नकळत, संवादाची, सूत्रं, अहो, सासूबाई, म्हणणार, माझ्यासाठीही, रत्नामावशीच, रहाशील, राहूनच, येकली, हान्यापरास, तुजी, मानसं, त्येंच्यासोबर, दोगबी, ग्वाड, सोबावाची, हायेत, आगदी, घरच्यावानी, वागवलंया, दिस, त्येंनी, त्येंना, आईसारकी, करूस, अनुमोदनच, केतकीकडून, ऐकलंय, तुझ्याबद्दल, मुलांशी, खेळायला, मागच्या, आउट, हाउसमध्ये, काढू, ओंकारसह, ज्यांना, गरज, वरकामाच्या, सगुणाबाईंची, मनिषा, मॉंटेसरीचा, कोर्स, मदतीला, आम्हीही, आहोतच, लेकरा, म्हणू, बोलायला, शिल्लकच, ठेवलं, नाहीस, म्हातारीला, कंठ, दाटून, गेल्यापासून, एकाकी, होतो, आम्हालाही, हक्काचं, आलीस, आणली, निघाल्या, पायाला, बिलगली, भरल्या, गळ्यानं, हरवलेलं, दिलंत, ऋणात, राहीन, भोगले, माउलीनं, हाऊ, भावनाविवश, पन्नास, यायला, पाळणाघरात, आजोळच, मुलांचं, सुटीदिवशी, बसवत, रत्नाआजीचा, लळा, जाण्याआधी, शुभंकरोती, पाढे, कागदकाम, मजेत, आग्रहास्तव, घराण्यातली, पडलेली, वारकर्, जेवण, द्यायची, परंपराही, येण्यानं, भरभराट, वर्ष, घटनेला, आजोळाचा, फुगे, फुगवून, फुलांचे, बनवून, रांगोळ्या, मुंबईहून, येणार, सोहळ्याला, तुझं, शब्दांनी, आणलं, पालक, घरचं, कार्य, झटत, दृष्ट, मस्त, सोहळा, वाढदिवसाचा, रात्रभर, जिवाभावाच्या, नणंदभावजया, गप्पा, मारत, बसल्या, निघताना, सखूबाईला, भरगच्च, आहेर, भारावलेली, आभाळाकडं, इतकंच, बहिनीला, बगताय, तुमाला, दिलेल्या, वचनातुन, येतं, गोंजारतं, काढतं, कल्पनेत, रमायचं, वास्तवात, वास्तवाचं, भान, ठेवायचं, जाणीव, हळुवारपणे, जखमेवर, फुंकर, घालतं, स्वप्नाचं, अस्तित्व, उमेदीनं, दिवसाचं, हसून, स्वागत, तिच्यातला, बदल, स्वप्नही, सुखावतं, समजावणा, स्वप्नाची, अशीच, लाभत, रहावी, जगन्नियंत्याला, विनवणं, एवढंच, सैरभैर, जिवाची, चुकलेल्या, वासरासारखी, घालमेल, कशाकशात, लागत, लागलंय, खेळणं, घेतल्यावर, अवस्था, अस्वस्थ, घायाळ, हरिणीसारखी, मुक्यानंच, आतल्या, रडतंय, ज्यावेळी, इच्छा, करण्याच्या, नादात, भेटच, म्हणायला, हवी, जखमेतून, उमललं, सुंदरसं, स्वप्नानं, भरभरून, जगायचं, स्फूर्ती, प्राजक्तासारखं, टवटवीत, सुगंध, उधळत, गौरी, गणपतीचे, सगळीकडे, हिरवाई, उल्हास, जल्लोष, जुनी, बुजली, खपली, भळभळून, वहायला, चुकीशिवाय, कारणाशिवाय, तशाही, जखमा, होतच, काळ, खांवरचं, औषध, मुळात, लागायच्याही, आधीपासून, उघडल्यापासून, मावशीची, आत्याबाई, काकू, कौतुकाची, बाळगाणी, इथूनच, तोंडओळख, निंबोणीच्या, झाडामागे, झोपलेला, चंद्र, खुणावतो, पापणीच्या, पंखात, स्वप्नांची, झोपतात, बाळाची, झाल्यावर, घालताना, गंगा, यमुना, भागीरथी, बाळाला, रिझवतात, अडगुलं, मडगुलं, सोन्याचं, कडगुलं, रुप्याचा, वाळा, तान्ह्या, बाळा, तीट, लावा, बाळाचा, नट्टापट्टा, घास, भरवताना, काऊ, चिऊ, मनीमाऊ, गाई, वासरं, गोळा, खेळीमेळीत, अंगतपंगत, गीतसोहळा, प्रसंगाशी, बांधलेला, सांगायचा, उद्देश, एवढाच, ऐकलेल्या, शिकलेल्या, वाचलेल्या, कवितांपैकी, कवितांशी, सख्य, जुळून, रहाते, जिवाभावाची, असणारी, पहिल्या, दिवसापासून, नाळ, जुळलेली, गाण्याशीही, जुळल्यामुळे, लताबाईंच्या, सुमधूर, ऐकलेलीच, एसएससीच्या, अभ्यासक्रमाच्या, क्रमिक, पुस्तकातही, एसएससीचे, इतिहास, भूगोल, विषयांचे, घ्यायचे, बाबांनी, विद्यार्थ्यांना, साधारणपणे, वर्षाच्या, डोक्यात, तिथंच, तस्संच, कळायचं, नव्हतंही, कळत्या, भिनून, डोळ्यांसमोर, बाबांचा, सांगणारे, तल्लीन, ऐकणारे, विद्यार्थी, विषयांना, सामावून, घेणार्, सार, मानवी, प्रवृत्ती, आवाका, आवडता, मृत्यू, मरणात, खरोखर, जगते, आणखीही, नसली, जवळपास, जाणारी, मृत्यूच्या, आधीची, प्रेमकविता, अद्वितीय, सांगणारी, तळमळ, अगतिकता, दाखवणारी, काळातल्या, कलावंताचीच, सहजच, म्हणाला, तांबेजी, नवनव्या, रसभरीत, ऐकायची, वाचायची, सवय, ऐकवा, उत्कट, मधुघटचि, पडती, कल्पनेचा, नाविन्याचा, मागतोयस, काहीच, सुचत, कल्पनेच्या, मधाच्या, घागरी, रिकाम्या, पडल्या, खंत, अट्टाहास, कशासाठी, आजवरी, कमलाच्या, द्रोणी, मधू, पाजिला, भरोनी, पूर्वीची, स्मरोनी, रोष, विनय, समर्पणभावना, आजवर, विविध, प्रकारांनी, हव्या, पद्धतीनं
Text of the page (random words):
यिकेच्या किती भावनांचं इंद्रधनू गुंफलं आहे स्वरांनी ही बंदिश शिकत असताना अक्षरश त्या नायिकेच्या भूमिकेत स्वत ला ठेवावं इतकं एकरूप केलं त्या भावना शब्द आणि स्वरांनी मैं कर आई पियासंग रंगरलियां आलि जात पनघट की बाट स्थायीमधल्या या दोन ओळींत तिचा खट्याळ लाजरा हसरा चेहरा दिसतो मैंs कर आई पियासंग रंगरलियाsss मंद्र निषादापासून सुरू होणारी षड्ज तीव्र मध्यम गंधार कोमल रिषभ यांच्या साथीनं पुन्हा षड्जावरून खाली उतरत मंद्र धैवत मंद्र निषाद षड्ज कोमल रिषभ अशी वर चढत मध्य षड्जावर संपणारी पहिली ओळ त्या सखीला जणु सांगतेय की घरच्या सगळ्या कटकटी विसरून सासू नणंद जावा सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मी पियाशी रंगरलियां या रंगरलियां शब्दातलं पहिलंच अक्षर समेवर आलंय कोमल धैवतावरची ही सम त्या रंगरलियांचं महत्त्व आणखीनच वाढवतेय चेष्टामस्करी शृंगार करून आले तो कुठे तर आsलि जाsत पनघट कि बाsट पाणी भरायच्या निमित्तानं पाणवठ्यावर जाता जाता सख्यानं मला घेरलं मंद्र निषादावरून कोमल रिषभाचा हात धरून गंधार तीव्र मध्यम अशा पायर् यांवरून वर चढत चढत मध्य निषादाला स्पर्शून गंधार आणि तीव्र मध्यमासोबत धैवताच्या भोज्याला शिवून पुन्हा कोमल रिषभावर उतरणारी ही दुसरी ओळ या लाजर् या न् साजर् या मुखड्याचा आरसाच आहे जणु काय सुख मिळालं असेल तिला त्या अवघ्या काही क्षणांच्या भेटीत पण तरीही ती इतकी खुललेली फुललेली आहे की जसं अख्खं आयुष्य जगलीय त्या क्षणांत आता यात कसलं आलंय कौतुक पाणवठ्याच्या वाटेवर पियाशी रंगरलियां करण्यात काय विशेष याचं उत्तर दिलंय अंतरेत एक डर है मोहे सास ननंदको दूजे देरनिया जेठनिया सतावे निसदिन कर रही हमरी बात हे आहे तिचं दु ख तिची व्यथा आणि म्हणून तिला पियाला भेटण्यासाठी पाणवठ्याच्या वाटेचा सहारा घ्यावा लागलाय एक डर हैs मोहे साsस ननंदकोs गंधारानं सजवलेलं तिचं दु ख तीव्र मध्यमानं धैवतासोबत वाढवत नेऊन दिलंय तार षड्जाच्या हाती आणि त्यानं मागे वळून मध्य निषादाला सोपवलंय पण निषादाला ते सहन न होऊन त्यानं तार सप्तकातल्या कोमल रिषभाला हाताशी धरत पुन्हा ते तार षड्जाकडे सुपूर्द केलंय तिच्या त्या दु खातली तीव्रता तिचं ते घाबरणं घुसमटून रहाणं केवळ स्वरांतून जाणवतं दूजे देरनीsया जेठनीsया सताsवे या सासू नणंदेची भीती कमी झाली म्हणून की काय धाकट्या जावा देरनिया आणि मोठ्या जावाही जेठनिया त्रास देत रहातात या ओळीत मध्य निषादानं आळवलेलं दु ख तार सप्तकातल्या कोमल रिषभानं तार गंधार आणि मध्य निषादासोबत खो खो खेळत मध्य धैवत मध्य निषाद मध्य सप्तकातला तीव्र मध्यम मध्य गंधार मध्य सप्तकातला कोमल रिषभ यांच्या वळणावळणानं जात षड्जाच्या झोळीत घातलंय निसदिन कर रही हमरी बाsत पुन्हा मंद्रातल्या निषादानं मध्यातल्या कोमल रिषभाच्या हातात हात गुंफून गंधार तीव्र मध्यम धैवत मध्य निषादापर्यंत चढवत नेलेली तिची अगतिक कैफियत तीव्र मध्यमानं मध्य धैवत गंधार यांच्याशी खो खो खेळत कोमल रिषभावर आणून पोहोचवली आहे धाकट्या तर ठीक आहे त्यांना काही कळत नाही पण निदान मोठ्या जावांनी तरी समजून घ्यायला हवंय ना त्या माझ्याच वाटेनं गेलेल्या असतील ना पण छे त्याही मेल्या माझ्याबद्दल कुचुकुचु बोलत रहातात हे सगळे सगळे भाव त्या सुरावटींनी इतके सुरेख आणि सुरेल मांडले आहेत की गुंतून जायला होतं त्या बंदिशीत ही बंदिश एक बंदिश न रहाता केवळ एका रागाचं रूप जाणून घेण्यासाठी शिकलेली किंवा ऐकलेली रचना न रहाता त्या अल्लड वयातल्या त्रासलेल्या पण तरीही उत्साहानं उधाणलेल्या नायिकेची गोष्ट होते आणि हा सारा त्या स्वरावलीचा खेळ अतिशय अप्रतिम अशी ही बंदिश इथे ऐकायला मिळेल ऐका आणि जाणून घ्या तिची गोष्ट http www youtube com watch v v8boehrz_kc posted by क्रांति at 6 08 am 1 comment saturday january 1 2011 सकाळनं घडवलेली सकाळ बुधवार दि २९ १२ २०१० ची प्रसन्न सकाळ सकाळची थोडी कामं उरकून गरमागरम चहाच्या घोटाबरोबर पेपर चाळावा म्हणून हॊलमध्ये आले तेवढ्यात मोबाईल वाजला हॆलो आपण क्रांति साडेकर बोलताय हो आपण कोण बोलताय मागेन एवढे मी हातून या घडावे काही नवे निराळे अन् जातिवंत आता या आपल्या ओळी खूप भावल्या म्हणून आवर्जून फोन केला तेव्हा मला लक्षात आलं की आज बुधवार सकाळमध्ये गझल गुंजन या सदराचा समारोप करताना माझी माझा वसंत ही गझल निवडली आहे असं पांचाळे काकांनी सांगितलं होतं सकाळ विशेषमध्ये पाहिलं तर त्या गझलसोबत मोबाईल नंबरही दिलेला धन्यवाद सर आपण कोण बोलताय तुम्हाला लगेचच दाद मिळावी म्हणूनच मोबाईल नंबर देता ना मिळाली ना दाद मग मी कोण आहे हे कशाला कळायला हवं ही माझ्या काव्याला मिळालेली पहिली दाद आहे म्हणून आपला नंबर मी सेव्ह करून ठेवेन त्याचं काही एवढं महत्त्व नाही तुमची गझल माझ्या वाचनात आली मला ती मनापासून आवडली तुमचा नंबर होता सोबत म्हणून मी तुम्हाला फोन केला बरं कुठं असता तुम्ही काय करता सर मी नागपूरला बीएसएनएलमध्ये काम करते अच्छा माझाही बीएसएनएलचा दूरध्वनी आहे तुम्ही कोणत्या कार्यालयात असता सर मी सक्करदरा कार्यालयात आहे आपला कोणता एरिया आहे मी धंतोलीत रहातो क्षणभर काही अंदाज घेण्याचा प्रयत्न करतेय तोवर पुढचा प्रश्न आला आता माझं नाव सांगू विश्वास बसेल तुमचा हो सर मी ग्रेस बोलतोय सर आपण मी अवाक काहीही कळत नाहीय मला चक्क सूर्याची काजव्याला दाद मी स्वप्नात तर नाही माझ्या घरातच आहे मी की चंद्रमाधवीच्या प्रदेशात होय मी ग्रेस बोलतोय मी कधीही खोटं बोलत नाही नागपुरात ग्रेस या नावाचा एकुलता एकच माणूस आहे माझा कुणीही जुळा भाऊ नाही आणि माझी कुठं शाखाही नाही मी काय ऐकतेय काय बोलतेय मला काहीही कळत नाहीय सर मला आपली भेट घ्यायची होती पण पण काय तुम्ही मला शोधायचा प्रयत्न नाही केला या गझलच्या निमित्तानं मी तुम्हाला शोधलंय तुम्ही मला शोधलं नाहीय मी तुम्हाला मिळवलंय तुम्ही मला नाही मिळवलं सर आपली ही दाद माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे आज मी खरंच खूप काही मिळवलंय ते आता तुम्ही पहा तुमची गझल मला मनापासून आवडली मी तुम्हाला दाद दिली मला चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला आवडतं सर मी नक्कीच आपली भेट घेईन आपल्या कविता मला खूप आवडतात मी आपल्या कवितांची वेडी आहे अरे असं चांगलं लिहिणारी माणसं वेडी नसतात खूप शहाणी असतात माझी भेट तुम्ही केव्हाही घेऊ शकता पण एक आहे मी कुणाला कवितांसाठी मार्गदर्शन वगैरे करत नाही तुम्ही या पण मार्गदर्शन मिळेल ह्या अपेक्षेनं नाही काही हरकत नाही सर आणि तसंही तुमचं काव्य सांगतंय की तुम्हाला या सार् या सोपस्कारांची गरजही नाही कुणाच्या चार ओळींनी किंवा प्रस्तावनेनं कुणाचं काव्य मोठं होत नाही मुळातच जे चांगलं आहे त्याला दाद मिळणारच तेव्हा लिहित रहा असंच चांगलं आतून आलेलं मनापासून लिहा तुमच्या काव्यप्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर ठीक आहे आता मी फोन ठेवतो तुमचा सकाळचा बराच बहुमूल्य वेळ घेतलाय मी आणि फोन बंद झाला मी अजूनही हवेत हे सगळं जे घडलं ते खरंच खरं होतं या धुंदीतून बाहेर येऊन बहिणीला स्वातीला फोन केला ती बोलते सण आहे आज तुझ्यासाठी खरंच सणच होता तो दिवस खुळ्यासारखी ही वार्ता लेक बंधुराज आई बहिणी सगळ्या मित्र मैत्रिणींना सांगत सुटले आणि स्वत चंच कौतुक करून घेत राहिले दिवसभर एखाद्या लहान मुलानं शाळेत मिळालेलं बक्षिस दाखवत सुटावं सगळ्यांना तस्सं स्वत पांचाळे काका तुषार जोशी सुरुची नाईक रूपालीताई बक्षी स्मिताताई जोशी गाण्याच्या क्लासमधल्या मैत्रिणी सगळे सगळे खूश झाले अगदी विजयाताई मारोतकर म्हणाल्या मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि माझाही कारण मी तुझी मैत्रिण आहे बघ जाता जाता जुन्या वर्षानं तुला केवढं मोठं देणं दिलंय प्रमोद देवकाकांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं तुझ्या या अनुभवावर एक स्फुट लिही म्हणजे आपल्या जालावरच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही आनंदवार्ता कळेल त्यांनी लगेचच ईसकाळ कॊम वरचा दुवा शोधून काढला त्यावर फक्त लेख दिसतोय गझल दिसत नाही म्हणून सकाळच्या संपादकीय विभागात फीडबॆकही दिला नंतर दिवसभर सगळ्या विदर्भातून गझल आवडल्याबद्दल फोन येत राहिले मेसेज येत राहिले पण पहिली दाद माझ्यासाठी अमृताचा घोट होती या सरत्या वर्षानं मला जाता जाता जे दिलंय ते खरंच खूप अनमोल आहे मर्मबंधातली ठेव आहे ती माझी वयाच्या १४व्या वर्षी प्रत्यक्ष गझलसम्राटाचं मराठी गझलक्षेत्रातल्या शंकराचार्यांचं कै सुरेश भट काकांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि आज वयाच्या ४८व्या वर्षी मराठी काव्यातल्या ग्रेस नामक वलयांकित ध्रुवतार् यासारख्या अढळ पदावरील व्यक्तिमत्वाचं माझ्यासारख्या कोशातल्या सुरवंटाची दखल घेणं माझ्या आयुष्याच्या प्रवासातले हे दोन टप्पे म्हणजे मैलाचे दगड ठरले आहेत माझ्यासाठी मी लिहीत रहावं म्हणून मला सतत प्रोत्साहन देत रहाणारे प्रसंगी रागावणारे माझे बाबा आणि भट काका आज या जगात नाहीत पण तरीही या प्रसंगानं ते नक्कीच समाधान पावले असतील posted by क्रांति at 7 25 am 11 comments thursday december 30 2010 संध्याछाया भिवविती हृदया मराठी कविता ही प्रत्येक मराठी मनाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मुळात कळायला लागायच्याही आधीपासून अगदी डोळे उघडल्यापासून आईची आजीची अंगाई मावशीची आत्याबाई काकू यांची कौतुकाची बाळगाणी इथूनच मराठी मनाची कवितेशी तोंडओळख होते कधी निंबोणीच्या झाडामागे झोपलेला चंद्र खुणावतो तर कधी पापणीच्या पंखात स्वप्नांची पाखरं झोपतात बाळाची झोप झाल्यावर अंघोळ घालताना गंगा यमुना भागीरथी गाणी गात बाळाला रिझवतात अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीट लावा असं गात गात बाळाचा नट्टापट्टा केला जातो घास भरवताना काऊ चिऊ मनीमाऊ गोठ्यातली गाई वासरं सार् यांना गोळा करून खेळीमेळीत अंगतपंगत केली जाते हा गीतसोहळा असा प्रत्येक प्रसंगाशी बांधलेला असतो जसा काही म्हणूनच बालपणापासून मराठी माणूस आणि कविता यांचं अतिशय अतूट असं नातं आहे हे सगळं कौतुक सांगायचा उद्देश एवढाच की लहानपणापासून ऐकलेल्या शिकलेल्या वाचलेल्या असंख्य कवितांपैकी काही कवितांशी आपलं इतकं सख्य जुळून जातं की कुठेही कधीही ती कविता आपल्या मनात रुंजी घालत रहाते अगदी जिवाभावाची सखी होते ती कविता आपली माझी अशी सखी असणारी कविता आहे कविवर्य भा रा तांबे यांची रिकामे मधुघट ही जशी कवितेशी पहिल्या दिवसापासून नाळ जुळलेली तशीच गाण्याशीही जुळल्यामुळे लताबाईंच्या सुमधूर आवाजात ती सतत ऐकलेलीच होती आणि जुन्या एसएससीच्या कुठल्याशा अभ्यासक्रमाच्या क्रमिक पुस्तकातही ती होती माझे बाबा जुन्या एसएससीचे मराठी इतिहास भूगोल या विषयांचे क्लास घ्यायचे घरी त्यावेळी बाबांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ही कविता समजावून दिली होती आणि तिचं जे रसग्रहण निरूपण केलं होतं ते त्या लहान वयात म्हणजे साधारणपणे ६ ते ७ वर्षाच्या वयात जे डोक्यात बसून गेलंय ते आजही तिथंच तस्संच आहे तसं तर ते वय या गोष्टी कळायचं नव्हतंही पण कळत्या वयात तो अर्थ इतका भिनून गेला की आजही मधु मागसी माझ्या सख्या परी हे गाणं कुठेही लागलं की डोळ्यांसमोर येतो बाबांचा तो क्लास ते अगदी एकतान होऊन कविता समजावून सांगणारे बाबा ते तल्लीन होऊन ऐकणारे विद्यार्थी आणि ते निरूपण भा रा तांबे यांच्या कविता कितीतरी विषयांना स्वत त सामावून घेणार् या अगदी प्रेम भक्ती जीवनाचं सार नाती निसर्ग मानवी प्रवृत्ती असा मोठा आवाका आहे त्या काव्याचा पण त्यांचा स्वत चा अतिशय आवडता विषय म्हणजे मृत्यू या विषयावर त्यांच्या बर् याच कविता दिसतात जन पळभर म्हणतील हाय हाय मरणात खरोखर जग जगते आणखीही कितीतरी रिकामे मधुघट ही कविता जरी त्या विषयावरची नसली तरी जवळपास जाणारी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीची ती प्रेमकविता नाही तर आयुष्याचं अद्वितीय तत्वज्ञान सांगणारी कलावंताची तळमळ कळकळ अगतिकता दाखवणारी ती कविता आहे आणि उतरत्या काळातल्या प्रत्येक कलावंताचीच ती कहाणी आहे त्या काळात कुणी मित्र सहजच त्यांना म्हणाला होता तांबेजी बर् याच दिवसांत तुम्ही काही नवीन लिहिलं नाहीत तुमच्या नवनव्या रसभरीत कविता ऐकायची वाचायची इतकी सवय लागलीय मनाला ऐकवा ना काहीतरी नवं यावरचं उत्तर म्हणजे हे उत्कट काव्य मधु मागसी माझ्या सख्या परी मधुघटचि रिकामे पडती घरी सख्या अरे तू काव्याचा कल्पनेचा नाविन्याचा मध मागतोयस खरा पण या मनात आता नवीन काही येत नाहीय रे काहीच सुचत नाहीय कल्पनेच्या मधाच्या घागरी जशा रिकाम्या पडल्या आहेत एका कलावंताची ही विलक्षण खंत आहे उतारवयात नवं काहीतरी करण्याचा अट्टाहास कशासाठी आजवरी कमलाच्या द्रोणी मधू पाजिला तुला भरोनी सेवा ही पूर्वीची स्मरोनी करी न रोष सख्या दया करी किती हा विनय किती ही समर्पणभावना रसिका आजवर तुझ्यासाठी खूप सुंदर सुंदर काही लिहिलं खूप काही दिलं तुला विविध प्रकारांनी तुला हव्या त्या पद्धतीनं मांडणी केली तुझी मनोभावे सेवा केली ती लक्षात घे आणि आता मला काही जमत नाहीय याचा राग नको धरूस रे मनात एवढी दया कर माझ्यावर आठवला गुरुदत्तजींचा कागज़ के फूल तसेच त्यांचे स्वत चे शेवटचे दिवस स्व गीता दत्त यांनीही सचिनदांना फोन करून म्हटलं होतं दादा आप तो हमें भूल ही गए आणि मग त्यांनी कनू रॊय यांच्या संगीतनिर्देशनातील अनुभव चित्रपटातली कोई चुपकेसे आके आणि मुझे जा न कहो मेरी जां ही दोन गाणी त्यांना दिली होती पडत्या काळात कलावंताचा हाच अनुभव असतो का आणि तोही प्रत्येक क्षेत्रात तो अनुभव तांब्यांच्या या चार ओळीत किती सहजी व्यक्त झालाय नैवेद्याची एकच वाटी अता दुधाची माझ्या गाठी देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी सगळं काही संपलंय रे आता अगदी मोजकंच उरलंय आयुष्य पूर्वीचं सारं सारं काही सरलंय सारा मान सन्मान हारतुरे तो दिव्यांचा लखलखाट सगळं विसरलोय मी आता फक्त माझं माझ्यापुरतं राहिलंय आयुष्य रसिकाला देव मानणार् या या कलावंताजवळ आता मधुमधुर काही उरलं नाहीय केवळ इवलीशी दुधाची वाटी आहे नैवेद्यापुरती या रसिकदेवतेसाठी या उरल्यासुरल्या दिवसांत जे काही सुचेल ते सुचेल तसं तुला द्यायचा प्रयत्न करतोय ते गुलाबासारखं डौलदार मोगर् यासारखं सुगंधी नाहीय तर विनासायास कुठंही उगवणार् या आणि दुर्लक्षितपणे फुलत रहाणार् या कोरांटीसारखं आहे पण कोरांटी जरी दुर्लक्षित असली तरी तिचं हे वैशिष्ट्य आहे की ती देवपुजेला चालते म्हणजेच रसिकाला देव मानून या कलावंतानं हे आर्जव केलंय की जे काही मी या शेवटच्या दिवसांत तुला देतोय ते थोडं कमी दर्जाचं असेल पण टाकाऊ नक्कीच नाही अरे देवासाठी का कुणी काही टाकाऊ देतं तेव्हा तेही तू सांभाळून ठेव कसंतरी का होईना पण सांभाळ देवाला नैवेद्य दाखवणं महत्वाचं मग तो अगदी पंचपक्वानांचा असो की घोटभर दुधाचा तरुणतरुणिंची सलज्ज कुजबुज वृक्षझर् यांचे गूढ मधुर गुज संसाराचे मर्म हवे तुज मधु पिळण्या परी बळ न करी तांब्यांच्या कवितेत काय नाहीय प्रेमकाव्य आहे डोळे हे जुल्मी गडे नववधू प्रिया मी निसर्गसौंदर्य पिवळे तांबुस ऊन कोवळे भक्ती भाग्य उजळले तुझे चरण पाहिले जीवनविषयक तत्वज्ञान जन पळभर म्हणतील कळा ज्या लागल्या जीवा घन तमी शुक्र बघ राज्य करी काय नाही दिलंय मी तुला रसिका प्रेम दिलं निसर्गाचं कौतुक दिलं संसाराचं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं आता मात्र तू यातलं काहीही मागू नकोस रसिक म्हणून तुझा माझ्यावर हक्क आहे खरा पण आता तो गाजवू नकोस एवढीच विनंती जोरजबरदस्तीनं उतारवयात कलाकारानंही लोकांना आवडेल म्हणून किंवा नाव रहावं म्हणून काहीही वाटेल ते करू नये रसिकानंही त्या कलावंताकडून तशी अपेक्षा करू नये आणि त्याचं हसं करू नये त्याला सन्मानानं निवृत्त होऊ द्यावं ही कळकळ या शब्दांतून कवींनी व्यक्त केलीय आणि ती कालातीत आहे आजही ती समर्पक आहे तलत मेहमूद यांच्या रेशमी आवाजातलं बेचैन नजर बेताब जिगर हे यास्मीन चित्रपटातलं गीत पूर्वी रेकॊर्ड झालेलं आणि नंतर कधीतरी त्यांनी गाइलेलं यातला फरक दर्दी रसिकाला अगदी चटकन जाणवतो आणि मग लगेच अरेरे नाही तर छे हे काहीतरीच वाटतंय असे उद्गार निघतात त्याच्या तोंडून ही वेळ रसिकानं आपल्या आवडत्या कलाकारावर आणू नये हेच कवींचं सांगणं असेल ना ढळला रे ढळला दिन सखया संध्याछाया भिवविती हृदया अता मधूचे नाव कासया लागले नेत्र रे पैलतिरी अरे आता माझे दिवस संपले सांज आलीय आयुष्याची त्या लांबत जाणार् या सावल्या भीती दाखवतात रे त्या हेच सांगतात की तुझी सद्दी संपली आता मधाची अपेक्षा नकोस करू माझ्याकडून तारुण्यात जे काही उत्तम गोड सुंदर मधुर देता आलं तुला माझ्या कलेच्या माध्यमातून ते सारं काही दिलं पण आता आयुष्याच्या उतरणीवर अशी काही अपेक्षा ठेवू नकोस रसिका अरे आता मला पैलतीर खुणावतोय तिकडे जायचे वेध लागले आहेत आता उरलेलं आयुष्य ईशचिंतनात घालवू दे मला काहीतरी भलतं नको मागू सख्या डोळ्यांत पाणी आणणारी ही अप्रतिम काव्यरचना केवळ एका कवीच्या आयुष्यापुरती मर्यादित नाही तर ती जवळजवळ प्रत्येक कलाकाराची मनोव्यथा आहे अर्थात अखेरच्या श्वासापर्यंत रंगमंच गाजवणारे विठ्ठल उमपही असतात पण ते एखादेच वयाच्या सत्तरी पंचाहत्तरीतही आपल्या आवाजाच्या मोहिनीनं जनतेला वेड लावणार् या लताबाई आशाबाईंसारख्या देवकन्या रोज रोज येत नसतात या विश्वात कोणे एके काळी अगदी डोक्यावर घेऊन नाचणारा रसिक उतरत्या काळात विदूषकी भूमिका करून पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करणार् या कलाकाराला संपूर्णपणे दुर्लक्षित करतो कधी त्याची कीव करतो तर कधी त्याचं नावही विसरून जातो त्याला बदनाम करायलाही मागेपुढे पहात नाही यात त्या रसिकाची काही चूक नाही ही समस्त मानवजातीची मानसिकताच आहे त्यामुळे त्या कलाकारानंच आपलं हसं करून घेण्यापूर्वी मानानं निवृत्ती स्वीकारावी आणि रसिकानंही त्याला बाध्य करू नये तसं करायला कदाचित याला कुणी पलायनवाद म्हणेल कुणी हार म्हणेल त्या कलावंताची पण आपली पत ठेवून सन्मानानं जगणार् या कलावंतासाठी ही कविता नक्कीच एक प्रेरणा आहे posted by क्रांति at 7 21 am 4 comments sunday september 5 2010 तिचं प्राजक्ती स्वप्न पुन्हा गौरी गणपतीचे दिवस आले सगळीकडे हिरवाई उत्साह उल्हास जल्लोष घेऊन पण तिच्या मनाची एक जुनी जखम बुजली असेल असं वाटता वाटता खपली निघून पुन्हा भळभळून वहायला लागली कुठल्याही चुकीशिवाय कारणाशिवाय कुणीतरी केलेली जखम तशाही मनाच्या जखमा ब या होतच नसतात...
|