Meta tags:
Headings (most frequently used words):
मनामनातल्या, गोष्टी, monday, may, 23, 2016, followers, blog, archive, about, me,
Text of the page (most frequently used words):
आणि (14), त्या (12), माझी (10), मला (10), होते (8), जोशी (7), सुनील (7), मेक (6), आता (6), होती (6), २००९ (5), मामा (5), माझ्या (5), क्रमशः (5), घेउन (5), दिवस (4), होता (4), मागे (4), खुप (4), तिच्या (4), may (3), मधली (3), बिना (3), बाहेर (3), नाही (3), तिला (3), यायची (3), येत (3), गेला (3), एकदम (3), आईने (3), नजर (3), जरा (3), शांत (3), होत्या (3), हसत (3), देत (3), शाळेत (3), manamanatalya (2), goshtee (2), october (2), november (2), june (2), बरेच (2), झालेत (2), 2016 (2), posts (2), जाहली (2), असेल (2), दिसला (2), भेटायला (2), हळु (2), आधी (2), नव्हती (2), हॉस्टल (2), रडत (2), मात्र (2), आतून (2), रवानगी (2), निर्णय (2), कसले (2), जवळ (2), वेळी (2), खेळत (2), म्हणे (2), धाड़ (2), दिसत (2), भटक (2), दोन (2), गायब (2), तिचे (2), वेळ (2), होणे (2), काकाची (2), वाढत (2), शिकत (2), ताया (2), त्याना (2), काही (2), मास्तर (2), सोडून (2), तसा (2), बसायची (2), बराच (2), काकांना (2), उकिरड्यावरची (2), पैदास (2), मनामनातल्या (2), गोष्टी (2), skip (2), view, complete, profile, post, graduate, mechanical, engineer, working, lecturer, government, polytechnic, have, interests, poetry, orkutting, gaining, and, retaining, friends, aur, kya, basss, about, december, 2008, january, february, april, august, september, 2009, july, 2011, ब्लॉग, लिहिले, गेले, नाहीये, gte, mso, normal, blog, archive, followers, subscribe, atom, home, older, comments, posted, पूर्णविराम, आहे, अजुनही, त्यात, स्मृति, कोपरयात, मनाच्या, सुखिया, बघून, फोफावलं, उकिर्ड्याच्या, अंकुरलं, रुजलं, संपली, पर्यंत, सांगितले, त्याने, मार्केट, एकदा, मनाची, घेतलीये, काढून, समजूत, समजुन, शकणार, भेटू, ठेवलय, जपून, करून, बंद, कवाडात, हृदयाच्या, अशी, यावी, म्हणजे, आठवत, तशी, उपसंहार, दिसतोय, फोटो, हां, टेबल, महीने, महीना, आठवडे, आठवड्याला, भेटायची, बाहेरच, च्या, वरवर, दाखवत, असावं, आलं, दाटून, उरात, डोळ्यात, पाठवताना, ठरला, मुहुर्त, पाठवणीचा, केली, कठीण, आयुष्यातला, घेतला, तिने, प्रोब्लेम, भाषा, सुधरती, नजरा, काकांच्या, जास्तच, अंमळ, माझ्यापेक्षा, व्हायचा, त्रास, त्याचा, कळवळणे, रोजचेच, कळवळण्यातच, लागली, रडायला, हमसाहमशी, घेतलं, मुस्कटात, दिली, तितक्यात, कळवळले, पळुन, ठिकाणी, नको, चिमटा, चिडलेला, तरातरा, रागान, आली, गेलं, लक्ष, आईचं, त्याच, निघालं, आपसुक, तोंडून, त्याची, लोचट, खूंखार, वरच्यावर, झेलल्यात, हवेतच, बिट्ट्या, उडालेल्या, बसला, येउन, बाजुला, आला, मधेच, एकटीच, सागरगोटे, परसदारी, संध्याकाळी, उजाडला, पडली, कमीच, गर्दी, केला, नव्ह्ता, होतं, कसं, सगलं, वळले, घराकडे, लागल्यावर, पडाया, अंधार, थोड़ा, भटकले, तास, मागच्या, झालेला, बरोब्बर, गडबडित, एवढ्या, बरोबर, तिघा, खिदळत, उभ्या, लांब, बाया, पोलिशीण, पकड़लेलं, कोणी, नव्हत, त्यांना, धम्मक, पिवळी, साखळी, गळ्यात, झाकलेले, चेहेरे, जवान, गब्रू, तीन, त्यांच्या, मोडत, बोटं, कडाकडा, शाप, शिव्या, बोम्बलत, म्हातारी, तिची, मागुन, अंगावर, नव्हते, कपडे, नेत, ओढत, मावशी, मनी, गल्लीतुन, बाजुच्या, ख़ास, असावी, गड़बड़, काहीतरी, उभी, गाडी, मोट्ठी, नीळी, तोंडाशीच, गल्लीच्या, घरी, शाळेतून, दिवशी, पंखाखालुनी, पिल्लाला, करण्याची, मुक्त, समजणे, कदाचित, सहमणे, अन्, भांडण, काय, अवतरणे, रागिणिचे, संरक्षण, करण्या, पिलाचे, आपुल्या, शेर, बिल्लिचे, भिग्या, चवताळणे, आईचे, कारण, आईसी, उठांया, चवतालूंन, दिवशीच्या, आणिक, सहज, जवळच्याच, आव्हान, नजरेला, ओढाळ, पथिकाच्या, येणार्या, आकारत, शरीर, नकळत, मासी, दिसा, झालाय, मास्तरचा, कळालं, गेल्यात, बरय्याच, सोबत, त्याच्या, झाली, तक्रार, नंतर, मास्तरची, कुरुवाळायाचा, अगदी, शाळेनंतर, करायचा, लाड, त्यांचे, बसायाचा, मारत, काहिना, पैकी, आमच्या, वाटायचा, काकांसारखा, वेगळाच, छान, बाई, तिथल्या, जायचे, ज्या, आणून, सगळ्याना, आम्हा, टाकलेल्या, जवळच्या, चांगला, शिकली, शाळा, वाटायची, आवडायची, आईच, काढायची, उशिरा, बऱ्याच, कुशीत, बरेचदा, झाकलेलं, तोंड, काकांचं, मैत्रीणी, मझ्यासारख्याच, रात्री, घ्यायची, ओढून, पडदा, जायची, खोलीत, आतल्या, केलेली, यायचा, त्याला, म्हणायचे, मामाच, फारसं, नव्हतं, कळत, लहानशी, म्हणा, उकिरडा, निर्नाम, लीला, ललिता, monday, sidebar, main,
Text of the page (random words):
मनामनातल्या गोष्टी skip to main skip to sidebar मनामनातल्या गोष्टी monday may 23 2016 पैदास उकिरड्यावरची मी ललिता लीला निर्नाम पैदास माझी उकिरड्यावरची तसा उकिरडा बराच असेल म्हणा लहानशी होते कळत नव्हतं फारसं मामा मामाच म्हणायचे त्याला तो काही काकांना घेउन यायचा मेक अप केलेली माझी आई हसत आतल्या खोलीत जायची काकांना घेउन पडदा ओढून घ्यायची मी रात्री खेळत बसायची बराच वेळ मझ्यासारख्याच त्या माझ्या मैत्रीणी त्या काकांचं तोंड झाकलेलं आई हसत त्याना बाहेर सोडून यायची बरेचदा मला कुशीत घेउन मग रडत बसायची बऱ्याच उशिरा मेक अप काढायची बिना मेक अप मधली ती ती आईच मला आवडायची ती मला माझी आई वाटायची सुनील जोशी १५ १२ २००९ क्रमशः शाळा शिकली मामा तसा चांगला होता आईने जवळच्या टाकलेल्या शाळेत मला आणि आम्हा सगळ्याना सोडून आणून देत होता मी ज्या शाळेत जायचे तिथल्या बाई छान होत्या पण तो मास्तर ना जरा ना जरा वेगळाच होता तो मास्तर मला त्या काकांसारखा वाटायचा आमच्या पैकी काहिना खुप मारत बसायाचा आणि काही ताया होत्या त्यांचे ना लाड करायचा शाळेनंतर त्याना अगदी जवळ घेउन कुरुवाळायाचा त्या मास्तरची म्हणे नंतर तक्रार झाली तो गेला आणि त्याच्या सोबत बरय्याच ताया पण गेल्यात मागे कळालं की त्या मास्तरचा पण मामा झालाय सुनील जोशी १६ १२ ०९ काकाची ती नजर दिसा मासी होते मी वाढत नकळत होते शरीर आकारत येणार्या पथिकाच्या ओढाळ नजरेला होते आव्हान देत जवळच्याच शाळेत शिकत शिकत ग म भ न सहज होते मी वाढत आणिक त्या दिवशीच्या त्या काकाची ती नजर चवतालूंन उठांया आईसी कारण आईचे ते चवताळणे भिग्या बिल्लिचे ते शेर होणे आपुल्या पिलाचे करण्या संरक्षण रण रागिणिचे ते अवतरणे काय रे भ आणि मग ते भांडण अन् मग एकदम सहमणे आणि मग एकदम ते शांत होणे कदाचित ते तिचे समजणे जाहली मुक्त करण्याची वेळ पिल्लाला पंखाखालुनी सुनील जोशी १७ १२ ०९ क्रमशः धाड़ त्या दिवशी शाळेतून घरी येत होते गल्लीच्या तोंडाशीच नीळी मोट्ठी गाडी उभी काहीतरी गड़बड़ असावी ख़ास बाजुच्या गल्लीतुन मनी मावशी तिला ओढत नेत होते तिचे कपडे धड नव्हते अंगावर तिच्या मागुन तिची म्हातारी बोम्बलत येत होती शिव्या शाप देत होती कडाकडा बोटं मोडत त्यांच्या मागे तीन गब्रू जवान चेहेरे झाकलेले पण गळ्यात साखळी पिवळी धम्मक दिसत होती त्यांना नव्हत कोणी पकड़लेलं दोन पोलिशीण बाया लांब उभ्या हसत खिदळत होत्या त्या तिघा बरोबर एवढ्या गडबडित मामा मात्र दिसला नाही ऐन वेळी बरोब्बर गायब झालेला मी मग मागच्या मागे गायब दोन तास भटक भटक भटकले थोड़ा अंधार पडाया लागल्यावर घराकडे वळले सगलं कसं शांत शांत होतं आता आईने आज मेक अप नव्ह्ता केला गर्दी पण जरा कमीच दिसत होती धाड़ पडली होती म्हणे सुनील जोशी १७ १२ २००९ क्रमशः तो दिवस आणि तो दिवस उजाडला संध्याकाळी परसदारी सागरगोटे खेळत होते मी एकटीच मधेच तो आला माझ्या बाजुला येउन बसला आणि वर उडालेल्या बिट्ट्या हवेतच झेलल्यात वरच्यावर खूंखार लोचट त्याची नजर माझ्या तोंडून आपसुक निघालं भो त्याच वेळी आईचं ही लक्ष गेलं ती आतून बाहेर आली रागान तरातरा आणि चिडलेला तो मला चिमटा घेउन नको त्या ठिकाणी पळुन गेला मी कळवळले आणि तितक्यात आईने ही दिली एक मुस्कटात अन मग मला एकदम जवळ घेतलं हमसाहमशी रडायला लागली तो दिवस मग कळवळण्यातच गेला सुनील जोशी १८ १२ २००९ क्रमशः रवानगी आता हे रोजचेच कळवळणे मग त्याचा खुप त्रास व्हायचा मला आणि माझ्यापेक्षा तिला अंमळ जास्तच काकांच्या नजरा माझी सुधरती भाषा आणि कसले कसले प्रोब्लेम न तिने मग निर्णय घेतला तिच्या आयुष्यातला कठीण निर्णय मग माझी रवानगी हॉस्टल ला केली पाठवणीचा मुहुर्त ठरला पाठवताना तिच्या डोळ्यात तिच्या उरात खुप दाटून आलं असावं दाखवत नव्हती वरवर आतून मात्र रडत होती खुप माझी आई ती यायची मला भेटायला पण हॉस्टल च्या आत येत नव्हती बाहेरच भेटायची आधी आधी दर आठवड्याला यायची मग हळु हळु २ आठवडे मग महीना आणि आता बरेच महीने झालेत माझ्या टेबल वर हां फोटो दिसतोय ना ती माझी आई बिना मेक अप मधली माझी आई सुनील जोशी १९ १२ २००९ क्रमशः उपसंहार आता मला आई तशी आठवत नाही म्हणजे भेटायला यावी अशी तिला माझ्या हृदयाच्या कवाडात बंद करून जपून ठेवलय ती आता भेटू शकणार नाही हे समजुन समजूत काढून घेतलीये मनाची मागे एकदा मामा दिसला होता मार्केट ला त्याने सांगितले की आता पर्यंत ती संपली पण असेल हे एक बी रुजलं अंकुरलं आणि उकिर्ड्याच्या बाहेर फोफावलं हे बघून ती सुखिया जाहली पण मनाच्या त्या कोपरयात त्या स्मृति आणि त्यात अजुनही आहे माझी ती आई बिना मेक अप मधली माझी आई सुनील जोशी २७ १२ २००९ पूर्णविराम posted by manamanatalya goshtee at 5 30 pm no comments older posts home subscribe to posts atom followers blog archive 2016 2 may 2 if gte mso 9 normal 0 बरेच दिवस झालेत या ब्लॉग वर लिहिले गेले नाहीये आ 2011 3 july 2 june 1 2009 33 november 9 october 7 september 2 august 1 june 4 may 1 april 4 february 1 january 4 2008 20 december 2 november 8 october 10 about me manamanatalya goshtee i am post graduate mechanical engineer working as lecturer at government polytechnic i have interests in poetry orkutting gaining and retaining friends aur kya basss view my complete profile
|