Meta tags:
Headings (most frequently used words):
2025, 17, मी, ह्या, movie, review, तर, छावा, cinema, poetry, memoirs, ranjeet, paradkar, रणजित, पराडकर, रसप, माझ्या, शब्दखुणा, thursday, december, 11, wednesday, september, friday, august, 08, monday, february, linkwithin, अनुक्रमणिका, featured, post, वाचकांची, आवड, चाहते, वाचकसंख्या, indi, फेसबुकवर, घडीचे, वाचक, माझे, आवडते, ब्लॉग्स, ब्लॉगवर, धुंडाळा, साडे, तीन, तासांचा, सफाईदारपणा, धुरंधर, dhurandhar, खपलीनंतर, नवीन, खपली, संपलो, संपून, उरलो, आवर्जून, पाहावा, chhaava, तुला, जायचे, असेल, किमान, इतके, करून, जा,
Text of the page (most frequently used words):
आहे (106), आणि (60), नाही (50), आहेत (26), ह्या (22), काही (19), असं (18), छावा (17), #december (15), तरी (15), #february (14), मला (14), म्हणून (14), june (13), september (13), किंवा (13), नाहीय (13), त्या (13), august (12), march (12), share (12), संभाजी (12), काम (12), होता (11), november (11), january (11), आला (11), सिनेमा (11), इथे (11), शंभूराजे (11), सिनेमात (11), movie (10), कविता (10), तेव्हा (10), करून (10), july (10), october (10), april (10), होतं (10), त्यात (10), करतो (10), म्हणजे (10), कहाणी (10), ranjeet (9), paradkar (9), असेल (9), may (9), अजून (9), त्याला (9), review (8), असो (8), त्याने (8), अगदी (8), कवी (8), होती (8), धुरंधर (7), अजिबात (7), होते (7), मात्र (7), केलं (7), केला (7), त्यांच्या (7), सगळं (7), गझल (7), रणजित (6), पराडकर (6), अशी (6), किती (6), त्याची (6), करत (6), अनेक (6), खूप (6), दाखवलं (6), वेळी (6), हवा (6), कुठे (6), सिनेमाची (6), असा (6), दोन (6), जरा (6), भागात (6), वृत्त (6), तासांचा (5), रसप (5), 2025 (5), येत (5), लोक (5), वाटलं (5), असताना (5), असता (5), एका (5), जातं (5), विकी (5), फार (5), जबरदस्त (5), केवळ (5), नक्कीच (5), केली (5), त्याचा (5), केलेला (5), दाखवला (5), म्हणूनच (5), इतका (5), कमी (5), पार्श्वसंगीत (5), काय (5), तसं (5), हल्ला (5), साडे (4), गेली (4), चित्रपट (4), pinterest (4), facebook (4), blogthis (4), email (4), this (4), posted (4), सिनेमे (4), इतिहास (4), हवं (4), गरजेचं (4), दाखवलेलं (4), नव्हता (4), केलेलं (4), गोष्टी (4), त्यावर (4), वाटतं (4), प्रसंग (4), इतकं (4), झालं (4), त्याच्या (4), समजून (4), उत्तम (4), लक्षात (4), जेव्हा (4), खाली (4), कधी (4), औरंगजेबाच्या (4), एकत्र (4), माझ्या (4), भाग (4), ऐतिहासिक (4), नाहीत (4), आता (4), घेऊन (4), आलं (4), संगीत (4), रहमान (4), असतो (4), पूर्ण (4), झाला (4), सगळ्या (4), कलशाने (4), ओळी (4), प्रत्येक (4), गाणी (4), the (3), तीन (3), सफाईदारपणा (3), मराठी (3), तुला (3), labels (3), comments (3), प्रश्न (3), शकतो (3), लोकांना (3), त्याचं (3), भ्रष्ट (3), आधी (3), विशेष (3), पडद्यावर (3), दाखवताना (3), ह्यात (3), असलेलं (3), मूळ (3), केलेले (3), तितकंच (3), एकाच (3), शिवाजी (3), उरी (3), कलश (3), औरंगजेब (3), नीट (3), भूमिकेत (3), बाकी (3), जास्त (3), कमाल (3), त्यातही (3), त्याचे (3), अक्षय (3), खरं (3), पात्र (3), साकार (3), म्हणतात (3), ह्याचा (3), छाप (3), साधारण (3), हात (3), दुसरा (3), सुरु (3), पाहून (3), मोठा (3), अडीच (3), त्यांचा (3), जिथे (3), आवाज (3), जात (3), व्यक्तिरेखा (3), कधीच (3), नेहमी (3), मुख्य (3), शंभूराजेंनी (3), असत (3), दोन्ही (3), असतं (3), आधीच (3), कुणी (3), आलेला (3), आहेच (3), कडी (3), त्याच्यावर (3), असलेली (3), होत (3), नीच (3), औरंगजेबाशी (3), मध्ये (3), ह्याच (3), झाली (3), जीभ (3), समोर (3), मात्रा (3), होतो (3), बनवला (3), दुसरी (3), सगळे (3), वाटत (3), बहुतांश (3), जोड (3), व्यावसायिक (3), post (2), dhurandhar (2), धून (2), जाताना (2), शब्द (2), थोड़ा (2), माझी (2), हैं (2), जायचे (2), किमान (2), इतके (2), posts (2), परीक्षण (2), एकाहून (2), त्यांच्यासाठी (2), करायला (2), असे (2), आठवण (2), ओळख (2), त्यासाठी (2), म्हणत (2), फक्त (2), पाहिला (2), खटकल्या (2), शकला (2), तेही (2), हिंसा (2), भडकपणा (2), सहजपणे (2), पार (2), ठिकाणी (2), पकड (2), ट्रेलर (2), त्यातलं (2), थिएटरमध्ये (2), भारी (2), अप्रतिम (2), वेगळा (2), येणार (2), म्हटल्याप्रमाणे (2), साकारताना (2), केलेली (2), दिसतो (2), ह्यासाठी (2), मेहनत (2), घेतली (2), अभ्यास (2), प्रयत्न (2), करेल (2), उलट (2), हंबीरराव (2), येसूबाई (2), सगळी (2), कौशल (2), संजू (2), सॅम (2), बहादूर (2), आशुतोष (2), औरंगजेबाचा (2), मुलगा (2), व्यवस्थित (2), वाव (2), मिळाला (2), भूमिका (2), गेट (2), ज्या (2), डोळे (2), थोडी (2), दाखवतो (2), मृत्यूची (2), बातमी (2), कलशाच्या (2), खन्ना (2), नातं (2), आग्र्याहून (2), पलायन (2), स्वराज्यासाठी (2), तयार (2), सिंगने (2), बोलतात (2), अखेरच्या (2), कैदेत (2), जगदंब (2), प्रभाव (2), येसूबाईंच्या (2), तिने (2), तिच्या (2), तितकाच (2), शेवटचा (2), पाऊण (2), भगवा (2), तोंडावर (2), ठेवून (2), प्रकारचा (2), उल्लेख (2), चित्रण (2), झालेलं (2), त्यांच्यात (2), पडतायत (2), सगळा (2), आणतो (2), आपला (2), बसल्या (2), तासांत (2), प्रामाणिक (2), जातो (2), असलेले (2), अनावश्यक (2), जितकं (2), आवश्यक (2), बादशहाचा (2), कुठल्या (2), स्वप्नात (2), पाहताना (2), होतात (2), उंची (2), सुरुवात (2), माहित (2), प्रवास (2), भीती (2), त्यातला (2), उथळपणा (2), आयुष्य (2), कायम (2), सांगताना (2), वेग (2), सूर (2), सुरुवातीपासून (2), शेवटपर्यंत (2), अक्षरश (2), करणाऱ्या (2), नावडलं (2), दिली (2), असावा (2), मराठे (2), कारण (2), भागांत (2), दुसरं (2), हातांत (2), अख्ख्या (2), असाच (2), मांडला (2), सिंघम (2), अगेन (2), मधल्या (2), एकंदर (2), सुमार (2), संगीताचा (2), महत्वाचा (2), संगीतात (2), महाराज (2), असोत (2), अशीही (2), पसारा (2), कसा (2), जडणघडण (2), युवराज (2), त्यांना (2), माझा (2), समज (2), कलशाची (2), छाटली (2), छोट्या (2), आक्रमण (2), अत्याचार (2), इतक्या (2), औरंगजेबाने (2), आपल्या (2), म्हटलं (2), असतानाही (2), नाहीच (2), त्यामुळे (2), तुम (2), आवर्जून (2), २०२५ (2), झोप (2), तुझी (2), चांगली (2), एकदा (2), रस्त्याने (2), मीच (2), उरलो (2), संपून (2), संपलो (2), पुन्हा (2), जागा (2), खपलीनंतर (2), नवीन (2), खपली (2), चांगला (2), सरकारची (2), आपण (2), सिनेमाला (2), थिअरी (2), जरी (2), दृष्टीने (2), पाहता (2), येऊ (2), सुस्पष्ट (2), च्या (2), सरकार (2), दहशतवादी (2), गेला (2), सरकारने (2), चूक (2), विमान (2), गोष्ट (2), सांगता (2), तिला (2), लांबीची (2), मर्यादा (2), लांबी (2), साडेतीन (2), साऊंड (2), आदित्य (2), गोळीबार (2), राहतं (2), जुन्या (2), बेदी (2), कमजोर (2), अर्जुन (2), संजय (2), तिथे (2), खतरनाक (2), आडमाप (2), देहयष्टी (2), असती (2), विचार (2), करणारा (2), असतात (2), गुंड (2), पिळदार (2), अश्या (2), वास्तवाची (2), सफाईदार (2), फिल्मी (2), हिंदी (2), क्रूर (2), क्रिकेट (2), cinema (2), poetry (2), memoirs (2), copyright, simple, theme, powered, blogger, ब्लॉगवर, धुंडाळा, अनुभूती, rahul, thosar, photography, दिवाळी, पहाट, सृजनस्वप्न, music, director, project, salil, choudhary, aniket, wonderland, आतून, अग्निसखा, रस्ते, कवडसे, आभाळाच्या, डोक्यावरती, रमेश, ठोंबरे, ramesh, thombre, सख्य, बागेश्री, bageshree, निलेश, पंडित, २८४, दक्षिणेकडं, अब्द, माझे, आवडते, ब्लॉग्स, घडीचे, वाचक, create, your, badge, फेसबुकवर, indi, वाचकसंख्या, चाहते, view, complete, profile, जग्गा, जासूस, jagga, jasoos, hindi, रिमझिम, पाउस, निनादत, रसग्रहण, ज़्यादा, रुस्तम, rustom, मोहेंजोदडो, हिंमतीला, दाद, mohenjo, daro, उत्स्फूर्त, अनौपचारिक, संवादी, मैफल, पहिलं, प्रेम, चौथीमधलं, नागराज, कमर्शियल, मंजुळेंचा, पसरट, सैराट, sairat, लाडकी, लेक, असावी, पाजीराव, भन्साळी, bajirao, mastani, not, ताण, जान, jab, tak, hain, jaan, वाचकांची, आवड, घरासमोरील, अंगणी, विषण्ण, आकाशमोगरा, आवडायचे, म्हणुन, झुले, थरारून, बावरा, हरेक, फांदीस, पापणी, featured, 2008, 2009, 2010, 228, 2011, 178, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023, revi, अनुक्रमणिका, linkwithin, subscribe, atom, home, older, विषयक, भवानी, मराठ्यांच्या, समग्र, इतिहासात, असंख्य, कहाण्या, ज्यांवर, बनू, शकतील, आजची, पिढी, जिला, कोण, हाही, पडू, कहाण्यांचं, भांडार, खुलं, बनायला, हवे, इतिहासाकडे, आकर्षित, करण्यासाठी, देण्यासाठी, विकृतीकरण, विद्रूपीकरण, सादरीकरण, करणं, सारखे, राहणं, अखेरीस, कसंही, हास्यास्पद, निमित्ताने, इतिहासाची, त्याविषयी, माहिती, घेऊ, पाहतात, महत्वाचं, बाजीराव, मस्तानी, दिग्दर्शक, लक्ष्मण, उतेकरचा, मिमी, मॅग्नम, ओपस, असल्याप्रमाणे, सविस्तर, मांडल्या, आहेतच, अजूनही, उंचीवर, जाऊ, नसे, थोडके, पायंडे, मोडले, प्रभावीपणा, धाग्याचं, अंतर, दाखवलेली, भडक, वाटली, पाहत, निर्विकारही, राहू, शकलो, पुस्तकातील, कहाणीत, इतिहासातही, थोडेफार, बदल, असले, दाखवणाऱ्याची, लपत, हेही, यशच, कौशलचं, पार्वती, पतये, महादेव, ऐकून, ऐकतानाही, कौशलच्या, कामाचा, कळस, किंबहुना, अथपासून, इतिपर्यंत, प्रभावीपणे, कोणताही, काढून, सगळ्यात, म्हणता, त्यांच्यासारखी, वेशभूषा, कामात, प्रामाणिकपणा, जाणवतं, घेण्याचा, निदान, पहिल्या, सिनेमापासून, नियमितपणे, ह्याविषयी, शंका, नव्हती, निराशही, अपेक्षा, उंचावतो, समीकरणं, परस्परभिन्न, मसान, हंबीररराव, मोहितेंच्या, राणा, मिर्झा, अकबर, नील, भूपालम, सोयराबाई, दिव्या, दत्ता, रायाजी, शिंदे, संतोष, जुवेकर, औरंगजेबाची, मुलगी, झीनत, सगळेच, आपापलं, निभावतात, राणाला, सहाय्यकांपेक्षा, थोडा, असेना, राहतो, डायना, पेंटी, नकारात्मक, मस्त, जमून, अपला, सहजतेने, वागवतो, तोड, चेहराभर, केस, डोळ्यांतून, भाव, व्यक्त, करायचे, व्यक्तिरेखेशी, साजेसे, मिचमिचे, पाठीला, जरासा, बाक, असल्याने, मानही, झुकलेली, तेव्हढ्या, तिरक्या, नजरेतही, जरब, क्रौर्य, हताशाही, शिवरायांच्या, कळल्यावर, खुदा, जन्नत, दरवाजे, खुले, रखना, शेर, रहा, पंक्ती, ऐकल्यावर, निर्ममतेने, मजा, नहीं, आया, संवाद, समेवर, थाप, पडल्यासारखे, परफॉर्मन्स, बराच, काळ, राहील, गुंतागुंतीचं, माणूस, ब्राह्मण, कवीही, असूनही, पराक्रमी, शूर, योद्धाही, ह्याचं, स्वराज्यभूमीशी, जन्माचं, उत्तरेकडचा, महाराजांनी, शिताफीने, भूमीसाठी, शंभूराजेंसाठी, प्राणांची, आहुती, द्यायला, भावुक, रुद्र, उग्र, विनीत, कुमार, ताकदीने, इथेही, कुठला, टाळीबाज, आवेश, जितके, तितकेच, डोळेही, शंभूराजेंसोबत, क्षणांत, काव्यमुकाबला, प्रसंगाची, उत्कटता, उंच, नेतो, गेले, समजल्यानंतरची, घाव, सहन, करणारे, वेगळाच, पडतो, रश्मीका, मंदानाला, मर्यादित, सोडते, येसूबाईंचं, बेचैनी, प्रसंगांतसुद्धा, महाराणीपणाचा, राखला, संपूर्ण, वागण्या, बोलण्यात, जितका, लाघवीपणा, घरंदाजपणासुद्धा, सुखद, आश्चर्याचा, धक्काच, एकंदरीत, तासाचा, चांगल्या, अर्थी, असह्यपणा, गाठतो, तास, कुणाही, नर्मदिल, माणसासाठी, बाजूला, बसलेला, टिळा, लावलेला, मुसमुसत, crescendo, गाठण्यात, अनेकांचा, सहभाग, लहानमोठ्या, लढाया, अखेरची, संगमेश्वरची, लढाई, तिचा, करायलाच, लढाईचं, अंगावर, येणारं, उत्कट, आजतागायत, आपल्याकडे, कुठल्याच, पाहिलेलं, थोडं, विचित्र, वाटेल, गेम, थ्रोन्स, पाहिलेल्यांना, battle, bastards, आठवल्याशिवाय, राहणार, हजारो, बंदिस्त, जागेत, घुसून, एकमेकांशी, लढतायत, चेंगराचेंगरी, होतेय, तलवारी, ढाली, मेलेले, पाय, अडकून, जिवंतही, शिरतच, भयंकर, कल्लोळ, खुर्चीच्या, टोकावर, तिथल्या, सैनिकांना, जागी, श्वास, कोंडतो, पाहूनच, गुदमरल्यासारखं, कालखंड, सिनेमॅटिक, लिबर्टी, घेतो, गाळतो, त्याच्याशी, होईल, तितकं, राहण्याचा, प्रयत्नसुद्धा, सोयराबाईंसोबत, मिळून, अण्णाजी, दत्तो, इतरांनी, कारस्थान, शिर्क्यांनी, विश्वासघातही, मोहितेंचा, शंभूराजेंवर, असलेला, कलशासोबत, मैत्रीपूर्ण, संबंधही, स्वराज्याकडे, वाकड्या, नजरेने, पाहणाऱ्या, मुघलांना, भिडणारा, रासवट, जसा, तसाच, सहवासात, हळवा, होणारा, पती, श्रीसखा, भव्य, सेट्स, चकचकीत, पोशाख, दागदागिन्यांची, रेलचेल, ह्याही, stereotype, तोडतो, मुघल, मावळे, दिखावे, देखावे, दरबार, दाखवायचा, दरबारच, महालात, झुंबरं, लटकतायत, काहीही, संबंध, शिवरायांचा, ऐकतायत, लहान, वयाचा, शंभू, अंधाऱ्या, गुहेत, अडकला, स्वप्न, दचकून, जागे, दिसले, पाहिजेत, शयनगृहाला, खिडक्या, बुरहानपूरच्या, लुटीपासून, शेवट, होणार, आपल्याला, असतंच, इथून, तिथपर्यंत, जायचा, हातचं, राखलं, फोल, ठरवतो, chhava, breaks, all, stereotypes, मुघलांच्या, थोरवी, गाणाऱ्या, निर्लज्ज, बॉलिवूड, सिनेमांच्या, भाऊगर्दीत, ठरतो, ह्याआधी, तान्हाजीनेही, वेगळेपण, कौशलने, घेतला, नुसतंच, बॉडी, बनवून, दाढी, वाढवून, गेटअप, साकारण्याचा, भंपकपणा, शंभूराजेंचं, संघर्षाचं, शिवरायांचंही, तसंच, राजपुतान्यातल्या, राजांसारखे, दिवाणखान्यात, पसरून, हुक्के, पीत, बसले, नव्हते, चोहोबाजूंनी, शत्रूंच्या, घेऱ्यात, असलेल्या, रात्रंदिन, आम्हां, युद्धाचा, अशीच, परिस्थिती, बालवयात, घरापासून, दूर, एकटे, राहिले, त्यांचं, पराकोटीच्या, शक्याशक्यतांनी, अतिशयोक्तीने, भरलेलं, महापुरुषांची, सतत, थरार, ठाय, नव्हे, द्रुत, हवी, सिनेमाचा, खर्जाचा, ठहराववाला, टिपेचा, पकडला, सिंहासोबतची, झुंज, दाखवली, खुर्चीत, अस्वस्थ, संगमेश्वरच्या, युद्धचित्रणातही, खटकलं, मुद्दामच, मांडलं, भागाकडे, वळायला, मोकळा, कलशाला, छंदोगामात्य, उपाधी, उच्चार, चंदोगामात्य, चंडोगामात्य, hopefully, ऐकण्याचा, दोष, दणदणाटी, पार्श्वसंगीतात, समजलं, नसावं, चिलखत, शिरस्त्राण, वगैरे, आपादमस्तक, लोखंडी, युद्धपोशाख, घालून, लढत, ह्यावर, संशय, माहितीनुसार, चपळ, काटक, युद्धपोशाखाविना, light, weight, खिंडी, डोंगराळ, शत्रूला, गाठत, वैशिष्ट्य, हत्यारं, लढणे, तरवारी, दांडपट्टा, लढणारा, एकही, मावळा, दिसला, करता, वाला, अनेकांनी, मीही, मांडतो, सिनेमाचे, पडला, त्याच्याऐवजी, घेता, पडतोच, वैयक्तिक, सांगायचं, रहमानचं, पहिल्यांदा, गेल्या, वर्षांपासून, कंटाळा, सगळ्यांच्या, कानावर, आदळत, अधूनमधून, चक्क, जाणवलं, ह्यांनी, मधून, कॉपी, पेस्ट, खास, नरसिंघा, कायसं, भयाण, आरडाओरडा, गाणं, सिंघा, चीच, नक्कल, मेलडी, ह्यांचं, जवळचं, नव्हतं, नात्यात, प्रचंड, दुरावाही, जाणवला, म्हणायच्याही, लायकीचं, ढणढणाटात, संवादही, शिवराय, जिव्हाळ्याचा, विषय, आपल्याकडच्या, अतिशय, एखादा, संगीतकार, ज्याच्या, गाण्यांत, चालबांधणीत, यांत्रिकपणा, ह्युमन, रहमानच्या, क्वचित, बाजही, पकडता, दाक्षिणात्य, सूफी, संगीताची, केल्या, पुसली, जातच, दिग्दर्शकही, जबादार, मानायला, व्हिजन, संगीतकारापर्यंत, पोहोचवू, दोघांपैकी, कुणाचीही, कहाणीशिवाय, हलकट, समजण्यासाठी, जाणणं, त्याशिवाय, त्याच्याविरोधात, ठाकले, कळणार, शिवरायांचं, वेळ, वेगळं, अर्ध्या, कारकीर्दीनंतर, सामना, लढले, औरंगजेबही, पुस्तकातही, पुस्तकाशी, बरीच, फारकत, घेतलेली, मांडणं, व्यक्तिरेखाच, अपुरी, लिहिली, गेल्याने, उणीव, जाणवतेच, औरंगजेबाचं, दख्खनला, येण्यापर्यंत, त्यापुढे, दुसऱ्या, कथानक, मांडता, अर्थात, एखाद्या, महापुरुषाची, दाखवायची, बरेच, शॉर्ट, कट्स, मारावेच, लागतील, अन्यथा, तासात, बसणारच, बाहुबलीसारखी, संपुर्णपणे, कपोलकल्पित, अचाट, अतर्क्य, देशात, बिनधास्त, दाखवण्याची, हिंमत, यशस्वीही, खऱ्याखुऱ्या, महापराक्रमांची, गाथा, कोंबायची, गरज, शंभूराजेंची, लहानपणापासून, त्यानंतर, वर्षं, अज्ञातवास, तोही, मुलुखात, फिरवली, वर्षांनी, सुखरूप, घरी, पोहोचलेला, आग्र्याला, छोटं, पोरगं, परत, बारा, गावाचं, पाणी, पिऊन, दुनियादारी, शिकून, तावून, सुलाखून, कणखर, बनलेला, तरुण, किरकोळ, अदखलपात्र, त्यानंतरच्या, आयुष्यात, पन्हाळ्यावर, नजरकैदेत, ठेवण्यापर्यंतच्या, घडलेल्या, घटना, संदिग्ध, वादविवाद, होऊ, शकतात, टाळल्या, समजू, बाकीचं, बऱ्याच, बदललेल्या, विषयच, versions, खोटं, करण्याइतका, आजवर, ऐकलं, त्यावरून, हाच, सर्वात, शंभूराजेंचीही, दोघांचे, फोडले, अंगावरची, कातडी, ओरबाडून, सोलली, मीठ, चोळले, त्यांची, धिंडही, काढली, सरतेशेवटी, दोघांचा, शिरच्छेद, ठार, मारले, क्रूरपणाचा, नंगानाच, जवळजवळ, दीड, महिने, चित्रपटात, दाखवल्याप्रमाणे, दिवसांत, उरकला, शंभूराजेंचा, संघर्ष, अनन्यसाधारण, त्याव्यतिरिक्तही, वर्षांच्या, कारकिर्दीत, महत्वाचे, टप्पे, गोव्याच्या, पोर्तुगीजांवर, साफ, अक्षम्य, दुर्लक्ष, पोर्तुगीजांनी, गोव्यात, ऐकायला, वाचायला, मिळत, अत्याचारांवर, वचक, बसण्यासाठी, गोव्यावर, चाल, तिखट, पोर्तुगीजांची, पाचावर, धारण, बसली, त्यांनी, देवाला, नवस, बोलून, मदत, मागायला, महत्वाच्या, भागाचा, साधा, उल्लेखसुद्धा, महाराजांना, उद्देशून, लिहिलेल्या, बुरहानपूर, लुटल्यावर, संतापलेल्या, प्रतिज्ञा, जोपर्यंत, संभाजीचा, अंत, करणार, डोक्यावर, ताज, ठेवणार, संगमेश्वरला, इतर, घेतलं, गेलं, औरंगजेबासमोर, उभं, करण्यात, खुदाचे, आभार, मानत, आलमगीर, सिंहासनावरून, उठून, वरील, उत्स्फूर्तपणे, उच्चारल्या, वेगळ्याही, मुद्दा, आसन, सोडून, कैद, केलेल्या, जखमी, जखडलेल्या, अवस्थेत, मृत्यू, दिसत, आपलं, शीघ्रकवित्व, गमावलं, त्यासोबतच, त्याच्यातला, खमकेपणा, शंभूराजेंवरची, आदर, प्रेमयुक्त, निष्ठा, खोचक, चिमटे, काढणारी, विनोदबुद्धीही, गमावली, खिजवणाऱ्या, राजाचे, गुणगान, फेकून, मारायची, गुस्ताखी, चवताळून, छाटायचे, फर्मान, सोडले, तत्क्षणी, अंमलही, देखत, चंड, प्रताप, जही, तखत, त्यजत, औरंग, राजन, साँच, खरे, खूब, लढे, जंग, पाहावा, chhaava, monday, ऑगस्ट, उगवलो, उद्या, झाले, बरे, सरला, दिवस, शिरलो, आरश्यातुन, तुलासुद्धा, भेटलो, दिसलो, यायची, विझलो, अव्यक्त, आवडतो, अंधार, आतला, विसरलो, शब्दच, नेमके, आठवली, जीवनाची, बनलो, मूर्तीच, भक्ती, समजलो, बाबाच, परतलो, गेलो, पुढे, असलो, खरोखर, वाटते, हरलो, जिंकलो, friday, comment, सप्टेंबर, कळवळते, प्याला, भरल्यानंतर, दिवसभर, जागेपण, विस्मरते, लागली, चिवट, वाळवी, जीवनास, पोखरते, ओढाताण, निराशा, दुःखे, अन्, विवंचना, झाडावर, नवी, कळी, मुसमुसते, झाडाच्या, फुलांस, तोडून, चुरडलेस, अस्तित्वाची, जुनी, जखम, ठसठसते, धरते, wednesday, पाहण्यासारखा, बनला, चुकीचा, सांगणारे, तळी, उचलणारे, वर्षानुवर्षं, आलो, आहोत, विनाकारण, गोष्टीचा, बाऊ, करण्यापेक्षा, पाहायला, विशिष्ट, मांडायची, प्रकारे, यायला, काँग्रेसप्रणित, सरकारांवर, टीका, आजच्या, भलामणसुद्धा, नाकारता, शकत, वास्तवातही, हल्ल्यानंतर, आपले, हातावर, बसून, राहिलं, अमेरिकेच्या, दबावामुळे, कसलीही, प्रतिक्रियात्मक, कारवाई, कबूल, इतकंच, पाकिस्तानकडून, झालेला, इस्लामी, स्व, करवलेला, खपवायचा, निर्लज्जपणा, वेळच्या, कुचकामीपणाही, कचखाऊपणाही, दाखवत, खाल्ल्यामुळे, खवखवत, कंदहार, अपहरण, प्रकरणाच्या, भाजप, खाल्ली, असंही, दुर्लक्षिली, जातेय, प्रोपगंडा, म्हणतो, तुम्हाला, नसेल, सीरिजमधूनच, मांडायला, जबरदस्तीने, सिनेमाच, अति, लांबतो, सारखं, मॅचच्या, हायलाईट्स, पाहिल्यासारखं, धुरंधरमधल्या, व्यक्तिरेखेची, बॅकस्टोरीज, उल्लेखाने, गुंडाळल्या, कसलीच, नसती, मोठ्या, कॅनव्हासवर, चित्र, साकारता, त्याचाही, मार्च, रोजी, घातलेला, सहा, सात, मालमसाला, सरळ, एखादी, मिनी, सिरीज, एपिसोड्सची, सीरीजच, करायची, धुरंधरबाबत, ऐकल्या, डिझाईनचा, धरच्या, चंही, डिझाईन, इथंही, सिगरेट, पेटण्याचा, हातातल्या, ब्रेसलेटचं, किणकिणणं, स्फोट, छोट्यातला, छोटा, मोठ्यातला, सुयोग्य, स्पष्टपणे, प्रेक्षकांपर्यंत, पोहोचतो, ह्याची, जिवंत, होणारे, आपल्याच, आजूबाजूला, वाटून, सस्पेन्शन, डिसबिलिफ, प्रकारची, जादूच, जणू, सामान्य, राहत, गाण्यांचा, वापर, ओरिजिनल, तिथं, प्रभावी, आजकालच्या, ट्रेंडनुसार, ऍक्शनपट, म्हटल्यावर, कानठळ्या, बसवणारा, गोंगाट, म्हणजेच, सुदैवाने, दुसरीकडे, क्वचितच, मिळालेला, राकेश, कुणीही, पाकिस्तानी, accent, पकडतो, सारा, कमीच, पडली, कदाचित, धटिंगण, पुरुषांत, एकमेव, स्त्री, अगदीच, चणीचं, अभिनयातसुद्धा, चमक, दाखवता, आलेली, एसपी, चौधरी, अस्लम, दत्त, दत्तच, आपली, अमर्याद, कुवत, दाखवून, कुवतीच्या, बाबा, नेहमीच्याच, स्वॅगमध्ये, वावरतो, कुठल्याही, क्षणी, मुन्नाभाई, एमबीबीएस, नाचायला, लागेल, कास्टिंगमध्ये, रामपालचा, मेजर, इक्बाल, येतो, सगळ्यांना, पुरून, उरतो, पुढच्या, भागातल्या, रोलची, उत्सुकता, वाटावी, माधवनसुद्धा, वेळाच्या, कामातही, स्वतःची, सोडतो, पुढच्याही, खन्नाचा, डकैतदेखील, जमला, कामाला, तोडच, रणवीरसारखी, डकैतच्या, रोलला, शोभली, रोल, रणवीरने, पद्मावतच्या, खिलजीपेक्षा, रणवीर, नेहमीच, पडद्याबाहेर, माकडचाळे, पडद्यावरच्या, कामामुळेच, माफ, रोलसाठी, भरपूर, घेणारा, जीव, ओतून, अत्यंत, गुणी, अभिनेता, एकच, गंडलेलं, हमजा, अफगाणिस्तानातून, भले, स्टोरी, खोटी, असली, परिस्थितीने, नाडलेला, मनुष्य, ज्याच्याकडे, पैसे, राहायला, खायला, अन्न, अंगापिंडाने, असू, पठाण, त्यांचे, जीन्सच, तसे, सुरुवातीच्या, मंडळी, चिकना, लाईन, मारतात, करायचाही, भरभक्कम, माणसाला, विश्वसनीय, रूप, उघड, पाडू, शकते, दुकानात, पोऱ्या, शोभला, पाहिजे, कास्टिंग, धुरंधरची, खासियत, तगडा, स्क्रीन, प्रेझेन्स, क्षमता, आल्यामुळे, खूपच, वाढते, खटकलेली, बाब, उगाच, वाईट, तासांच्या, टुकार, ठेवायची, गरजच, तेव्हढीच, मिनिटं, नसावा, सरळसोट, पद्धतीने, linear, मांडली, धरचा, ह्याआधीच, सुद्धा, बरं, कहाणीसुद्धा, कसलाही, सस्पेन्स, समोरच, सगळंच, प्रॉब्लेम, वाटला, धुरंधरला, कंदाहार, अपहरणाच्या, प्रकरणातून, भारताची, नाचक्की, तिथून, सगळ्याची, नंतर, संसदेवरील, मुंबई, जोडलं, सगळ्याला, बांधण्यासाठी, कराचीतल्या, कुप्रसिद्ध, ल्यारी, गँगवॉरची, मध्यवर्ती, भारतीय, गुप्तहेर, गुंफला, अस्सल, व्यावसायिकच, असला, पटांसारखा, ठीकठाक, पट्टीत, बनवायच्याही, पद्धती, साचेबाज, बाबतींत, पक्का, पार्शवसंगीतातही, सिनेमांची, गाण्यांमधल्या, म्युझिक, पीसेसचे, तुकडे, मसाल्याला, चाखून, कसलं, पौष्टिक, म्हणणारे, अनहायजिनिक, नाकं, मुरडणारे, प्रकारच्या, लोकांकडे, कमालीची, माझ्याकडे, नसावी, सिनेमाकडे, वेगळ्या, आलंच, आनंदही, रेसिपी, हीच, वास्तव, खलनायक, राजकारणी, पोलीस, सगळ्यांचे, त्यांच्यासारखेच, साथीदार, काउंटरपार्ट्स, ह्यांच्या, शरीरयष्टीचा, देखणा, नायक, कोवळी, चिकणी, पोरगी, नायकाची, सोबतची, छोटीशी, लव्हस्टोरी, सुंदर, लोकेशन्स, सगळ्याच्या, जोडीला, देशप्रेम, भारत, पाकिस्तान, टाळीखेच, शिट्टीबाज, डायलॉग्ज, हाणामाऱ्या, पाठलाग, जिन्नस, केले, हमखास, पदार्थ, बनतो, तिकीटबारीवर, डल्ला, मारतो, पब्लिकमध्ये, कल्ला, thursday, सब्स्क्राईब, करा, सुनीत, व्यक्तिचित्रणपर, अक्षर, छंद, गीत, विनोदी, ललित, भावानुवाद, मुक्त, लयबद्ध, 108, 125, मुक्तछंद, 153, 158, 371, शब्दखुणा, गझला, आठवणी, थापा, बरंच
Text of the page (random words):
ची तिच्या सोबतची छोटीशी लव्हस्टोरी २ ३ गाणी सुंदर लोकेशन्स ह्या सगळ्याच्या जोडीला देशप्रेम भारत पाकिस्तान टाळीखेच शिट्टीबाज डायलॉग्ज हाणामाऱ्या पाठलाग गोळीबार असे सगळे जिन्नस एकत्र केले की एक हमखास पदार्थ बनतो त्याला म्हणतात व्यावसायिक सिनेमा जो तिकीटबारीवर डल्ला मारतो आणि पब्लिकमध्ये कल्ला करतो धुरंधर ची रेसिपी हीच आहे फक्त त्याला थोडी वास्तवाची जोड दिली आहे पण ही जोड आहे पूर्ण वास्तव नाही अस्सल व्यावसायिकच असला तरी बहुतांश व्यावसायिक पटांसारखा सुमार ते ठीकठाक ह्या पट्टीत तो येत नाही व्यावसायिक सिनेमा बनवायच्याही दोन पद्धती असतात एक सफाईदार आणि दुसरा साचेबाज धुरंधर सफाईदार आहे बहुतांश बाबतींत तरी पण पक्का फिल्मी इतका फिल्मी की पार्शवसंगीतातही जुन्या हिंदी सिनेमांची गाणी आहेत गाण्यांमधल्या म्युझिक पीसेसचे तुकडे आहेत ह्या सगळ्या मसाल्याला चाखून हे कसलं पौष्टिक आहे असं म्हणणारे आणि हे किती अनहायजिनिक आहे म्हणून नाकं मुरडणारे अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांकडे असलेली सिनेमाची कमालीची समज माझ्याकडे नसावी म्हणून मला ह्या सिनेमाकडे वेगळ्या कुठल्या दृष्टीने पाहता आलंच नाही मी एक सिनेमा म्हणूनच पाहिला आणि सिनेमा म्हणूनच मला त्याचा आनंदही मिळाला आधीच म्हटल्याप्रमाणे धुरंधरला वास्तवाची जोड आहे कंदाहार विमान अपहरणाच्या प्रकरणातून जी भारताची नाचक्की झाली तिथून ह्या सगळ्याची सुरुवात होते नंतर संसदेवरील हल्ला २६ ११ चा मुंबई हल्ला असं सगळं ह्यात जोडलं जातं ह्या सगळ्याला एकत्र बांधण्यासाठी कराचीतल्या कुप्रसिद्ध ल्यारी गँगवॉरची मध्यवर्ती कहाणी घेऊन त्यात एक भारतीय गुप्तहेर गुंफला आहे सिनेमाची कहाणी सरळसोट पद्धतीने linear मांडली आहे आदित्य धरचा ह्याआधीच सिनेमा उरी सुद्धा बहुतांश असाच होता बरं ही कहाणीसुद्धा अशी आहे की त्यात कसलाही सस्पेन्स नाही जे आहे ते समोरच आणि सगळंच हा एक मुख्य प्रॉब्लेम मला वाटला दुसरी खटकलेली बाब म्हणजे अनावश्यक गाणी जास्त नाहीत २ ३ च आहेत पण उगाच आहेत आणि मुख्य म्हणजे वाईट आहेत आधीच आपला पसारा साडेतीन तासांच्या वर जात आहे अश्या वेळी ही टुकार गाणी ठेवायची गरजच काय होती तेव्हढीच १० १२ मिनिटं कमी झाली असती हा विचार का केला नसावा माहित नाही कास्टिंग ही धुरंधरची खासियत आहे एक एक तगडा स्क्रीन प्रेझेन्स आणि जबरदस्त क्षमता असलेले लोक एकत्र आल्यामुळे सिनेमाची उंची खूपच वाढते रणवीर सिंगने जबरदस्त काम केलं आहे नेहमीच करतो पडद्याबाहेर तो जे काही माकडचाळे करतो ते सगळे त्याला त्याच्या पडद्यावरच्या कामामुळेच माफ होतात तो प्रत्येक रोलसाठी भरपूर मेहनत घेणारा आणि जीव ओतून काम करणारा अत्यंत गुणी अभिनेता आहे एकच जरा गंडलेलं वाटलं त्याने साकार केलेला हमजा हा अफगाणिस्तानातून आलेला दाखवला आहे भले ती त्याची स्टोरी खोटी असली तरी परिस्थितीने नाडलेला एक मनुष्य ज्याच्याकडे पैसे नाहीत राहायला जागा खायला अन्न नाही तो अंगापिंडाने इतका आडमाप कसा असू शकतो तो पठाण दाखवला आहे आणि त्यांचे जीन्सच तसे असतात असं जरी म्हटलं तरी सुरुवातीच्या भागात त्याला गुंड मंडळी चिकना म्हणतात त्याच्यावर लाईन मारतात आणि त्याच्यावर अत्याचार करायचाही प्रयत्न केला जातो आता असं सगळं कुणी एका भरभक्कम पिळदार माणसाला करेल हे पडद्यावर पाहताना अजिबात विश्वसनीय वाटत नाही दुसरं तो तिथे एक रूप घेऊन गेला आहे त्याची अशी देहयष्टी त्याला उघड पाडू शकते दुकानात काम करणारा पोऱ्या म्हणून जरा तरी शोभला पाहिजे ना अक्षय खन्नाचा रहमान डकैतदेखील उत्तम जमला आहे तरी त्याच्या छावा मधल्या कामाला तोडच नाही उलट रणवीरसारखी आडमाप देहयष्टी रहमान डकैतच्या रोलला शोभली असती हा रोल रणवीरने केला असता तर तो पद्मावतच्या खिलजीपेक्षा खतरनाक झाला असता असा एक विचार आला अर्जुन रामपालचा मेजर इक्बाल खतरनाक झाला आहे ह्या भागात तरी तसं कमी काम आहे पण जेव्हा तो पडद्यावर येतो तेव्हा तो सगळ्यांना पुरून उरतो पुढच्या भागातल्या त्याच्या रोलची उत्सुकता वाटावी असं एक ट्रेलर ह्या भागात त्याने दाखवलं आहे माधवनसुद्धा कमी वेळाच्या कामातही स्वतःची छाप सोडतो पण त्याला पुढच्याही भागात फार काही काम असेल असं मला वाटत नाही एसपी चौधरी अस्लम च्या भूमिकेत संजय दत्त संजय दत्तच साकार करतो जिथे बाकी सगळे लोक आपली अमर्याद कुवत दाखवून किंवा कुवतीच्या मर्यादा पार करून काम करत आहेत तिथे संजू बाबा नेहमीच्याच स्वॅगमध्ये वावरतो कुठल्याही क्षणी तो मुन्नाभाई एमबीबीएस वर नाचायला लागेल असं वाटत राहतं कास्टिंगमध्ये ही एक कमजोर कडी आहे दुसरी कमजोर कडी म्हणजे सारा अर्जुन अख्ख्या सिनेमात ती प्रत्येक वेळी जरा कमीच पडली आहे का ते सांगता येणार नाही कदाचित इतक्या सगळ्या धटिंगण पुरुषांत हे एकमेव स्त्री पात्र आहे आणि तेही अगदीच छोट्या चणीचं त्यामुळे तसं वाटलं असेल पण अभिनयातसुद्धा अशी काही तिला विशेष चमक दाखवता आलेली नाही दुसरीकडे क्वचितच जरा चांगली लांबी असलेली भूमिका मिळालेला राकेश बेदी कमाल करतो जे बाकी कुणीही केलेलं नाही ते बेदी करतो पाकिस्तानी accent पकडतो संगीत अगदी सामान्य आहे लक्षात राहत नाही पण पार्श्वसंगीत मात्र लक्षात राहतं त्यात केलेला जुन्या गाण्यांचा वापर मात्र सिनेमाला जरा उथळपणा आणतो असं मला वाटलं मात्र जिथे ओरिजिनल पार्श्वसंगीत तिथं ते खूप प्रभावी झालं आहे आजकालच्या ट्रेंडनुसार ऍक्शनपट म्हटल्यावर कानठळ्या बसवणारा गोंगाट म्हणजेच पार्श्वसंगीत झालं आहे सुदैवाने इथे तसं नाहीय आवर्जून उल्लेख करायला हवा तो साऊंड डिझाईनचा आदित्य धरच्या उरी चंही साऊंड डिझाईन जबरदस्त होतं इथंही आहे सिगरेट पेटण्याचा असो हातातल्या ब्रेसलेटचं किणकिणणं असो किंवा गोळीबार स्फोट असोत छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा आवाज सुयोग्य स्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो ह्याची कमाल अशी होते की प्रत्येक प्रसंग जिवंत होतो होणारे आवाज आपल्याच आजूबाजूला होत आहेत असं वाटून एक सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ तयार होतो एक प्रकारची जादूच जणू धुरंधरबाबत दोन गोष्टी मी खूप ऐकल्या एक म्हणजे लांबी खूप आहे साडेतीन तासांचा सिनेमा आणि त्याचाही अजून एक भाग १९ मार्च रोजी येऊ घातलेला आहे म्हणजे साधारण साडे सहा सात तासांचा मालमसाला आहे मग सरळ एखादी मिनी सिरीज किंवा पूर्ण लांबीची ८ ९ एपिसोड्सची सीरीजच करायची की नक्कीच मी तर म्हणतो जी कहाणी तुम्हाला फार तर अडीच तासांत सांगता येत नसेल ती सिनेमाची नाहीच तिला सीरिजमधूनच मांडायला हवं जबरदस्तीने सिनेमाच बनवला तर तो एक तर अति लांबतो किंवा मग सॅम बहादूर सारखं मॅचच्या हायलाईट्स पाहिल्यासारखं वाटतं धुरंधरमधल्या प्रत्येक व्यक्तिरेखेची एक कहाणी आहे त्या सगळ्या बॅकस्टोरीज केवळ उल्लेखाने गुंडाळल्या आहेत जर लांबीची कसलीच मर्यादा नसती तर एका अजून मोठ्या कॅनव्हासवर चित्र साकारता आलं असतं दुसरी गोष्ट म्हणजे त्यातला प्रोपगंडा धुरंधर काँग्रेसप्रणित सरकारांवर टीका करतो आणि आजच्या सरकारची भलामणसुद्धा हे नाकारता येऊ शकत नाही इतकं सुस्पष्ट आहे सिनेमात पण ते तितकंच सुस्पष्ट वास्तवातही आहेच २६ ११ च्या हल्ल्यानंतर आपले सरकार हातावर हात ठेवून बसून राहिलं अमेरिकेच्या दबावामुळे आपण कसलीही प्रतिक्रियात्मक कारवाई केली नाही हे कबूल करून झालेलं आहे इतकंच काय तो हल्ला पाकिस्तानकडून झालेला इस्लामी दहशतवादी हल्ला नव्हता तर तो रा स्व सं ने करवलेला भगवा दहशतवादी हल्ला होता अशीही एक थिअरी खपवायचा निर्लज्जपणा केला गेला होता त्या वेळच्या सरकारने कुचकामीपणाही केला आहे आणि कचखाऊपणाही जर ते कुणी सिनेमात दाखवत आणि तसं म्हणत असेल तर त्यात चूक काय आहे खाल्ल्यामुळे खवखवत आहे का कंदहार विमान अपहरण प्रकरणाच्या वेळी भाजप सरकार होतं आणि त्या सरकारने कच खाल्ली असंही सिनेमात दाखवलेलं आहे त्यातही काही चूक नाहीय पण ही गोष्ट का दुर्लक्षिली जातेय चुकीचा इतिहास सांगणारे सरकारची तळी उचलणारे सिनेमे आपण वर्षानुवर्षं करत आलो आहोत विनाकारण ह्या गोष्टीचा बाऊ करण्यापेक्षा सिनेमाला सिनेमा म्हणून पाहायला हवं केवळ एक विशिष्ट थिअरी मांडायची म्हणून बनवला जरी असेल तरी जर उत्तम प्रकारे बनवला असेल तर त्या दृष्टीने पाहता यायला हवं असो एकंदर धुरंधर चांगला आहे एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे अजून चांगला बनला असता का नक्कीच रणजित पराडकर posted by ranjeet paradkar at 16 11 no comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest wednesday september 17 2025 खपलीनंतर नवीन खपली खपलीनंतर नवीन खपली धरते आहे अस्तित्वाची जुनी जखम ठसठसते आहे ज्या झाडाच्या फुलांस तोडून चुरडलेस तू त्या झाडावर नवी कळी मुसमुसते आहे ओढाताण निराशा दुःखे अन् विवंचना चिवट वाळवी जीवनास पोखरते आहे झोप लागली असतानाही जागा होतो आणि दिवसभर जागेपण विस्मरते आहे हा शेवटचा म्हणून प्याला भरल्यानंतर तुझी आठवण पुन्हा पुन्हा कळवळते आहे रसप १७ सप्टेंबर २०२५ posted by ranjeet paradkar at 17 23 1 comment email this blogthis share to x share to facebook share to pinterest labels गझल गझल मात्रा वृत्त friday august 08 2025 संपलो संपून उरलो तर संपलो संपून उरलो तर जिंकलो मी मीच हरलो तर वाटते भीती मला माझी मी खरोखर मीच असलो तर ह्याच रस्त्याने पुढे गेलो ह्याच रस्त्याने परतलो तर नेहमी बाबाच असतो की एकदा आई समजलो तर खूप भक्ती चांगली नाही मी तुझी मूर्तीच बनलो तर जीवनाची धून आठवली नेमके शब्दच विसरलो तर आतला अंधार आवडतो पण असा अव्यक्त विझलो तर झोप आता यायची नाही मी मला स्वप्नात दिसलो तर भेटलो असतो तुलासुद्धा आरश्यातुन आत शिरलो तर हा दिवस सरला बरे झाले जर उद्या नाही उगवलो तर रसप ०८ ऑगस्ट २०२५ posted by ranjeet paradkar at 13 04 no comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest labels गझल गझल गण वृत्त monday february 17 2025 छावा आवर्जून पाहावा छावा chhaava movie review राजन तुम हो साँच खरे खूब लढे तुम जंग देखत तव चंड प्रताप जही तखत त्यजत औरंग कवी कलशाने संभाजी महाराजांना उद्देशून लिहिलेल्या ह्या ओळी शंभूराजेंनी बुरहानपूर लुटल्यावर संतापलेल्या औरंगजेबाने ही प्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत संभाजीचा अंत करणार नाही डोक्यावर ताज ठेवणार नाही संगमेश्वरला शंभूराजे कवी कलश आणि इतर काही लोकांना कैदेत घेतलं गेलं आणि त्यांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं त्या वेळी खुदाचे आभार मानत आलमगीर आपल्या सिंहासनावरून उठून खाली आला ते पाहून वरील ओळी कवी कलशाने उत्स्फूर्तपणे उच्चारल्या असं म्हटलं जातं काही ठिकाणी ह्या ओळी वेगळ्याही आहेत पण मुद्दा हा की जेव्हा औरंगजेब आसन सोडून खाली आला आणि कैद केलेल्या संभाजी व कवी कलशाच्या समोर आला तेव्हा कलशाने जखमी व जखडलेल्या अवस्थेत मृत्यू समोर दिसत असतानाही आपलं शीघ्रकवित्व तर गमावलं नाहीच पण त्यासोबतच त्याच्यातला खमकेपणा शंभूराजेंवरची आदर व प्रेमयुक्त निष्ठा आणि खोचक चिमटे काढणारी विनोदबुद्धीही गमावली नाही औरंगजेबाच्या तोंडावर त्याला खिजवणाऱ्या आणि आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या ओळी फेकून मारायची ही जी गुस्ताखी कलशाने केली त्यामुळे चवताळून औरंगजेबाने कलशाची जीभ छाटायचे फर्मान सोडले त्यावर तत्क्षणी अंमलही झाला छावा मध्ये हे दाखवलेलं नाहीय खरं तर बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आता इतिहास हा विषयच असा आहे की त्याची एकाहून अनेक versions आहेत त्यात खरं खोटं करण्याइतका अभ्यास माझा तरी नाही मात्र आजवर जितकं ऐकलं त्यावरून तरी माझा समज हाच होता की सर्वात आधी कलशाची जीभ छाटली गेली मग शंभूराजेंचीही जीभ छाटली मग दोघांचे डोळे फोडले अंगावरची कातडी ओरबाडून सोलली त्यावर मीठ चोळले हे सगळं करत असताना त्यांची धिंडही काढली गेली सरतेशेवटी दोघांचा शिरच्छेद करून ठार मारले औरंगजेबाच्या क्रूरपणाचा हा सगळा नंगानाच जवळजवळ दीड दोन महिने सुरु होता चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ३ ४ दिवसांत उरकला नव्हता शंभूराजेंचा औरंगजेबाशी संघर्ष अनन्यसाधारण महत्वाचा आहे पण त्याव्यतिरिक्तही त्यांच्या ९ १० वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे टप्पे आहेत गोव्याच्या पोर्तुगीजांवर केलेलं आक्रमण हा तर साफ आणि अक्षम्य दुर्लक्ष केलेला भाग आहे पोर्तुगीजांनी गोव्यात केलेले अत्याचार हा इतिहास कधीच कुठे ऐकायला वाचायला मिळत नाही ह्या अत्याचारांवर वचक बसण्यासाठी शंभूराजेंनी गोव्यावर चाल केली होती ते आक्रमण इतकं तिखट होतं की पोर्तुगीजांची पाचावर धारण बसली होती आणि त्यांनी त्यांच्या देवाला नवस बोलून मदत मागायला सुरु केलं होतं इतक्या महत्वाच्या भागाचा साधा उल्लेखसुद्धा छावा मध्ये येत नाही शंभूराजेंची जडणघडण लहानपणापासून झाली होती आग्र्याहून पलायन त्यानंतर काही वर्षं एक प्रकारचा अज्ञातवास तोही असा की सगळ्या मुलुखात त्यांच्या मृत्यूची बातमी फिरवली गेली होती मग काही वर्षांनी सुखरूप घरी पोहोचलेला युवराज संभाजी आग्र्याला जाताना छोटं पोरगं होतं परत आला तेव्हा अक्षरश बारा गावाचं पाणी पिऊन दुनियादारी पाहून शिकून आणि तावून सुलाखून कणखर बनलेला एक तरुण युवराज हा प्रवास किरकोळ नाही ही जडणघडण अदखलपात्र नाही त्यानंतरच्या त्यांच्या आयुष्यात त्यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यापर्यंतच्या घडलेल्या घटना संदिग्ध आहेत त्यावर वादविवाद होऊ शकतात म्हणून त्या टाळल्या समजू शकतो पण बाकीचं अर्थात एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाची कहाणी सिनेमात दाखवायची तर बरेच शॉर्ट कट्स मारावेच लागतील अन्यथा इतका मोठा पसारा दोन अडीच तासात बसणारच कसा पण मग जर बाहुबलीसारखी संपुर्णपणे कपोलकल्पित आणि अचाट व अतर्क्य कहाणी ह्याच देशात दाखवताना बिनधास्त दोन भागांत दाखवण्याची हिंमत करून ते यशस्वीही करून दाखवलं जातं तर ह्या खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक महापराक्रमांची गाथा सांगताना सगळं एकाच सिनेमात कोंबायची गरज काय आहे शिवाजी महाराज असोत वा शंभूराजे दोघांपैकी कुणाचीही कहाणी औरंगजेबाच्या कहाणीशिवाय पूर्ण होत नाही कारण औरंगजेब हा नीच हलकट होता हे समजण्यासाठी त्याची ती कहाणी जाणणं गरजेचं आहे त्याशिवाय त्याच्याविरोधात महाराज आणि शंभूराजे का ठाकले होते हे कळणार नाही शिवरायांचं तरी एक वेळ जरा वेगळं आहे त्यांच्या साधारण अर्ध्या कारकीर्दीनंतर औरंगजेबाशी त्यांचा सामना झाला असावा पण शंभूराजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत औरंगजेबाशी लढले आहेत हा औरंगजेबही छावा मध्ये पूर्ण मांडला जात नाही मूळ पुस्तकातही नाहीय पण मूळ पुस्तकाशी तर अशीही बरीच फारकत घेतलेली आहेच इथे एक सिनेमाची कहाणी म्हणून ती व्यक्तिरेखा मांडणं आवश्यक होतं तसं होत नाही अक्षय खन्ना अप्रतिम काम करतो पण व्यक्तिरेखाच अपुरी लिहिली गेल्याने त्यात खूप उणीव जाणवतेच म्हणूनच मग असं वाटतं की अगदी सहजपणे औरंगजेबाचं दख्खनला येण्यापर्यंत एका भागात आणि त्यापुढे दुसऱ्या भागात असं हे कथानक मांडता आलं असतं का असाच करता आलं असतं का वाला अजून प्रश्न अनेकांनी आधीच मांडला आहे मीही मांडतो तो म्हणजे सिनेमाचे संगीत इथे ए आर रहमान इतका कमी पडला आहे की त्याच्याऐवजी दुसरा कुणी घेता आला असता का हा प्रश्न पडतोच वैयक्तिक सांगायचं तर रहमानचं संगीत मला पहिल्यांदा नावडलं आहे असं अजिबात नाही गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा कंटाळा आलेला आहेच पण छावा मात्र सगळ्यांच्या वर कडी आहे पार्श्वसंगीत कानावर आदळत असताना अधूनमधून तर मला चक्क असं जाणवलं की हे ह्यांनी सिंघम अगेन मधून कॉपी पेस्ट केलं आहे की काय खास करून ते एक नरसिंघा का कायसं भयाण आरडाओरडा असलेलं गाणं किंवा पार्श्वसंगीत जे काही आहे ते तर सिंघम अगेन मधल्या सिंघा चीच नक्कल वाटतं रहमान आणि मेलडी ह्यांचं फार जवळचं नातं कधीच नव्हतं पण ह्या नात्यात इतका प्रचंड दुरावाही कधी जाणवला नव्हता एकंदर संगीत म्हणजे सुमार म्हणायच्याही लायकीचं नाहीय काही वेळी तर ह्या ढणढणाटात संवादही नीट समजून येत नाहीत शिवराय शंभूराजे हे जिव्हाळ्याचा विषय आहेत आणि आपल्याकडच्या सिनेमात संगीताचा भाग अतिशय महत्वाचा असतो इथे म्हणूनच एखादा असा संगीतकार हवा होता ज्याच्या गाण्यांत संगीतात चालबांधणीत यांत्रिकपणा कमी आणि एक ह्युमन टच जास्त असेल जो रहमानच्या संगीतात क्वचित असतो त्यात त्याला संगीताचा मराठी बाजही अजिबात पकडता आलेला नाही त्याच्यावर असलेली दाक्षिणात्य आणि सूफी संगीताची छाप काही केल्या पुसली जातच नाही ह्यासाठी दिग्दर्शकही तितकाच जबादार मानायला हवा त्याचा व्हिजन तो संगीतकारापर्यंत पोहोचवू शकला नाही हे नक्कीच अजून दोन गोष्टी खटकल्या त्या म्हणजे १ मराठे चिलखत शिरस्त्राण वगैरे आपादमस्तक लोखंडी युद्धपोशाख घालून लढत असत ह्यावर मला संशय आहे माझ्या माहितीनुसार मराठे चपळ काटक होते त्यांचा वेग जबरदस्त होता कारण युद्धपोशाखाविना ते light weight असत म्हणूनच ते नेहमी खिंडी डोंगराळ भागांत शत्रूला गाठत असत दुसरं अजून एक वैशिष्ट्य होतं दोन्ही हातांत हत्यारं घेऊन लढणे दोन्ही हातांत तरवारी किंवा दांडपट्टा घेऊन लढणारा एकही मावळा मला अख्ख्या सिनेमात दिसला नाही २ कवी कलशाला छंदोगामात्य अशी उपाधी शंभूराजेंनी दिली होती विकी कौशल ह्याचा उच्चार कायम चंदोगामात्य किंवा चंडोगामात्य असा करतो hopefully हा माझ्या ऐकण्याचा दोष असावा किंवा दणदणाटी पार्श्वसंगीतात नीट समजलं नसावं हे सगळं झालं जे खटकलं नावडलं ते सगळं मुद्दामच आधी मांडलं आता मी मुख्य भागाकडे वळायला मोकळा छावा शंभूराजेंचं आयुष्य कायम संघर्षाचं होतं शिवरायांचंही तसंच राजपुतान्यातल्या राजांसारखे हे दिवाणखान्यात पसरून कधीच हुक्के पीत बसले नव्हते चोहोबाजूंनी शत्रूंच्या घेऱ्यात असलेल्या मराठी स्वराज्यासाठी रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग अशीच परिस्थिती नेहमी होती त्यात शंभूराजे बालवयात घरापासून दूर एकटे राहिले त्यांचं आयुष्य पराकोटीच्या शक्याशक्यतांनी आणि अतिशयोक्तीने भरलेलं आहे ह्या महापुरुषांची कहाणी सांगताना सतत थरार वेग हवा ठाय नव्हे द्रुत लय हवी आणि सिनेमाचा सूर खर्जाचा ठहराववाला नाही टिपेचा हवा छावा ने हा सूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पकडला आहे अगदी सिंहासोबतची जी झुंज दाखवली आहे त्यातही आणि बसल्या खुर्चीत अक्षरश अस्वस्थ करणाऱ्या संगमेश्वरच्या युद्धचित्रणातही सिनेमाची सुरुवात बुरहानपूरच्या लुटीप...
|