Meta tags:
Headings (most frequently used words):
2026, बोशांको, ची, भेट, भाग, august, tuesday, मी, काली, आणि, अब्द, शब्द, pages, thursday, 13, saturday, july, 18, april, 21, february, 24, sitemeter, बुक, शोध, two, more, blogs, जुनी, पाने, वाचक, कोण, typical, khasi, house, labels, वाचते, वाचकांची, आवड, subscribe, to, blogadda, footsteps, 2014, onwards, २८४, दक्षिणेकडं, जाताना, विविधांगी, माणसं, चेन्नेमध्ये, बसचा, प्रवास, २८३, मेघनाद, मंदिर, गिरीश, मंच, मेघनादवध, काव्य, गौतम, हालदार, २८२, जुनं, कोलकाता, २८१, शांतिनिकेतन,
Text of the page (most frequently used words):
आणि (153), आहे (128), ago (86), years (69), मला (55), आहेत (54), नाही (54), होते (52), काही (47), होती (45), असं (41), त्या (39), एका (35), होता (35), होतं (33), इथं (32), मध्ये (31), म्हणजे (30), दोन (26), त्यांनी (24), म्हणून (22), माहिती (21), तिथं (21), #शांतिनिकेतन (18), नाव (18), माझ्या (17), आलं (17), अनेक (17), त्यांना (17), बंगाली (17), त्यामुळे (16), वाटलं (16), आम्ही (16), नव्हतं (15), अशा (15), 2014 (14), तीन (14), जागा (14), 2013 (14), मेट्रो (14), प्रवास (14), कोलकाता (14), चित्रं (14), यांच्या (13), february (13), 2010 (13), 2011 (13), 2012 (13), होत्या (13), यांनी (13), मुख्य (12), तरी (12), भाषा (12), माणसं (12), इतिहास (12), april (12), केवळ (12), केली (12), केलं (12), परिसरात (12), झाली (12), फक्त (12), ट्रेन (12), जास्त (11), भेट (11), लक्षात (11), भाग (11), july (11), june (11), पाहायला (11), काय (11), अशी (11), बर्थ (11), august (10), येत (10), अगदी (10), गेले (10), march (10), 2026 (10), कळलं (10), आली (10), फार (10), सांगितलं (10), तिकिट (10), लोअर (10), कविता (9), आधी (9), ठिकाणी (9), घेऊन (9), भागात (9), आला (9), किंवा (9), 2009 (9), may (9), september (9), 2015 (9), केला (9), दुसऱ्या (9), करत (9), त्यांच्या (9), तास (9), गर्दी (9), खूप (9), मंदिर (9), काळ (8), शब्द (8), केंद्र (8), कोलकात्यात (8), मेघनाद (8), माझी (8), पुन्हा (8), रेल्वे (8), रामकृष्ण (8), पुस्तक (8), october (8), december (8), january (8), 2016 (8), झालं (8), तरीही (8), सगळं (8), वेळ (8), आम्हाला (8), संग्रहालय (8), झाला (8), प्रसिद्ध (8), आता (8), तेव्हा (8), स्थानकावर (8), स्थानक (8), चेन्नै (8), आजही (7), आपण (7), this (7), english (7), जायचं (7), मराठी (7), विचार (7), मूर्ती (7), याच (7), एकदा (7), months (7), मुलं (7), बंगाल (7), गौतम (7), november (7), जुन्या (7), राहिले (7), आपल्याला (7), असतं (7), गेलो (7), दिसलं (7), प्रयोग (7), पाहून (7), टागोर (7), दिवस (7), नव्हती (7), बाहेर (7), हिंदी (7), उभं (7), हुगळी (7), दिसली (7), मोठी (7), ट्राम (7), रांगेत (7), गप्पा (7), comments (6), असा (6), पुस्तकं (6), कला (6), याची (6), you (6), want (6), read (6), post (6), available (6), here (6), पाँडिचेरीला (6), दक्षिणेश्वर (6), थोडा (6), पाणी (6), शिक्षण (6), पश्चिम (6), अनुभव (6), पूर्ण (6), असे (6), प्रश्न (6), दिसतं (6), दोन्ही (6), संवाद (6), अंतर (6), पाहताना (6), भाषेत (6), गेलं (6), छान (6), दिसत (6), राहिलं (6), वर्ष (6), त्याचं (6), इतर (6), छोट्या (6), रवीन्द्रनाथांनी (6), इथल्या (6), भवन (6), बाजूला (6), बाडी (6), घरात (6), पाठ (6), वगैरे (6), शांत (6), जातं (6), जाऊन (6), असतो (6), जागतिक (6), नव्हता (6), हावडा (6), ब्रिटिश (6), इमारत (6), मोठ्या (6), सुमारे (6), दहा (6), दिवशी (6), चालू (6), लोक (6), गेली (6), हालदार (6), मनात (5), शहर (5), रात्री (5), संस्कृती (5), सुंदर (5), आपली (5), नवा (5), रस्ता (5), आमच्या (5), तरुण (5), blog (5), बुक (5), झाले (5), पुणे (5), विवेकानंद (5), गंगा (5), 2019 (5), 2023 (5), 2024 (5), 2025 (5), असून (5), आपल्या (5), समोर (5), याचं (5), प्रदर्शन (5), फोटो (5), नाहीत (5), आणखी (5), वाटत (5), असेल (5), लागलं (5), रवीन्द्रनाथांच्या (5), सरकारी (5), पाच (5), काळात (5), रवीन्द्रनाथ (5), तयार (5), त्यात (5), बांग्ला (5), पाहता (5), करताना (5), अजूनही (5), वर्ग (5), आश्रम (5), परिसर (5), सांस्कृतिक (5), स्थापना (5), यांचा (5), पर्याय (5), बंद (5), टागोरांनी (5), कारण (5), झालेली (5), योग्य (5), भव्य (5), बंगालच्या (5), थेट (5), कॉफी (5), बोई (5), पारा (5), विविध (5), असते (5), काव्य (5), बसले (5), गिरीशचंद्र (5), गिरीश (5), लोकांना (5), ताई (5), सगळे (5), posts (4), सकाळी (4), पुस्तकांची (4), कल्पना (4), अवघड (4), बँकॉक (4), आले (4), मुली (4), जाताना (4), बोशांको (4), काली (4), पुरुष (4), स्त्री (4), कुठं (4), ऐतिहासिक (4), अर्थात (4), राजकीय (4), weeks (4), प्रवासी (4), चित्रकला (4), labels (4), 2017 (4), जुनी (4), posted (4), aativas (4), पुढच्या (4), किती (4), समजून (4), प्रयत्न (4), पाहिलं (4), जाणवलं (4), अतिशय (4), जिवंत (4), त्यांची (4), शांतिनिकेतनला (4), शांतिनिकेतनमध्ये (4), बोस (4), मात्र (4), बरीच (4), सांगत (4), काम (4), नंतर (4), काहीच (4), देत (4), नावं (4), वेगवेगळ्या (4), संग्रहालयात (4), चर्चा (4), महात्मा (4), गांधी (4), आठवण (4), गायक (4), करता (4), सर्वात (4), जुनं (4), पुढं (4), त्यांचं (4), लहान (4), प्रकारचा (4), दिलं (4), मोठं (4), भेटीत (4), लागले (4), तिकिटं (4), हेरिटेज (4), विश्वभारती (4), स्थानिक (4), भारतीय (4), तसंच (4), लगेच (4), गोष्टी (4), लोकांच्या (4), कमी (4), कोलकात्याच्या (4), सरस्वती (4), तिथल्या (4), येऊन (4), असल्याने (4), आतमध्ये (4), निघालो (4), कुणी (4), पूर्णपणे (4), अर्थ (4), महत्त्वाचं (4), स्मारक (4), प्रत्यक्षात (4), किलोमीटर (4), व्यवस्था (4), अत्यंत (4), राणी (4), नेताजी (4), मन्नाडे (4), हाऊस (4), सुरू (4), सहज (4), जोरासांको (4), पूल (4), पूर्वी (4), अजून (4), स्थानकं (4), मंदिरात (4), त्याचा (4), यांचं (4), असतात (4), असलेल्या (4), बोलणं (4), प्रान्तिक (4), अडीच (4), मधल्या (4), मेघनादवध (4), बदलून (4), मंच (4), दर्शन (4), उभे (4), त्यांच्याशी (4), उभ्या (4), राहिल्या (4), त्याने (4), सेंट्रल (4), गटाच्या (4), साईड (4), all (3), atom (3), नोंद (3), अब्द (3), कोण (3), चालले (3), खरं (3), पोचले (3), वेळी (3), निवांत (3), सात (3), सोबत (3), दिशा (3), उत्साहाने (3), करणारी (3), अनोळखी (3), वर्षांत (3), २८४ (3), दक्षिणेकडं (3), कोलकात्यातला (3), मुक्काम (3), संपत (3), च्या (3), मार्ग (3), the (3), जन्म (3), माझे (3), करू (3), मेकप (3), माणूस (3), year (3), सामाजिक (3), संस्कृ्ती (3), समाज (3), मुंबई (3), मातीचं (3), बोलपूर (3), बदल (3), निसर्ग (3), उत्तर (3), अरविंद (3), 2018 (3), उपलब्ध (3), नक्की (3), नवी (3), दृष्टी (3), दिली (3), तिचं (3), आपलं (3), कशी (3), साधेपणा (3), घ्यायला (3), असणाऱ्या (3), विश्व (3), ठेवून (3), सगळी (3), कळत (3), अर्थातच (3), दालनात (3), कसं (3), तिथून (3), इतकी (3), गणेश (3), कदाचित (3), लागेल (3), प्रतिकृती (3), मिळतात (3), दिसला (3), झालेला (3), काढलेली (3), सर्व (3), पुतळा (3), चार (3), परत (3), घेतला (3), संदर्भ (3), तशी (3), फारशी (3), वाटली (3), भारती (3), वादक (3), पडलो (3), होऊन (3), वर्णन (3), गृह (3), याही (3), इमारतीत (3), झालेल्या (3), पर्यटक (3), त्याच्या (3), घेत (3), सुरूवात (3), वापरात (3), उंच (3), पहिल्या (3), महत्त्व (3), ठिकाणं (3), काढून (3), इंग्रजी (3), वगळता (3), वॉक (3), होतो (3), येणाऱ्या (3), येऊ (3), परंपरा (3), पुढे (3), सुरु (3), करणं (3), जाणं (3), घेतली (3), केलेला (3), दिसतो (3), गोष्ट (3), हळूहळू (3), वस्तू (3), बाजार (3), येतं (3), आठवतं (3), निर्माण (3), करून (3), गेल्या (3), असल्यामुळे (3), राहिला (3), दीड (3), म्हणत (3), जवळजवळ (3), म्हटलं (3), नेमका (3), सोय (3), इंडो (3), संगम (3), साध्या (3), गरज (3), अनेकदा (3), कळल्यावर (3), सध्या (3), भारत (3), घरी (3), नाहीये (3), एकूण (3), नदी (3), लागते (3), करण्यात (3), पांढऱ्या (3), सत्यजित (3), गेल्यावर (3), असत (3), झाल्या (3), जागेत (3), कॉलेज (3), शेकडो (3), तिकडं (3), दिसतात (3), तशीच (3), रांग (3), असल्याचं (3), कधी (3), चपला (3), पडलं (3), परिसरातल्या (3), म्हणूनच (3), चालत (3), दिसले (3), आहोत (3), माणसाला (3), रासमणी (3), जगबंधु (3), मंदिरं (3), जाता (3), प्रवेश (3), स्वामी (3), विषय (3), राहून (3), नदीत (3), विचारलं (3), सार्वजनिक (3), पूजा (3), ब्रिज (3), जणू (3), शांतपणे (3), मजा (3), इतक्या (3), प्रवाह (3), त्यांचे (3), समजत (3), मधुसूदन (3), नाट्यप्रयोग (3), नसून (3), परमहंस (3), माझ्यासाठी (3), अमेरिकन (3), मंदिराचं (3), स्केच (3), हवा (3), बँक (3), नेहमी (3), बाई (3), सुमारास (3), बेलूर (3), तामिळ (3), बसमध्ये (3), मदत (3), चेन्नैला (3), एमएएस (3), दरवाजे (3), एआयने (3), कोयम्बेडू (3), बॅगा (3), राहण्याची (3), तिरुपतीला (3), रेणिगुंठाला (3), गाडी (3), मिनिटं (3), गंमत (3), प्रवासात (3), काका (3), आदराने (3), simple (2), subscribe (2), चित्र (2), तसं (2), साठी (2), चांगली (2), वाचननोंदी (2), सांगणं (2), अचानक (2), धावती (2), बसून (2), चहा (2), ज्या (2), दरवेशी (2), पाऊस (2), पहिली (2), चढून (2), येणारी (2), बऱ्याचा (2), सहजच (2), कधीतरी (2), शेवटची (2), २८३ (2), show (2), दरम्यान (2), marathi (2), review (2), साहित्य (2), शुभेच्छा (2), वढाय (2), बाबासाहेब (2), सामान (2), मांडणी (2), चिन्ह (2), बाबा (2), रोचक (2), प्रा (2), हरी (2), नरके (2), आपला (2), पार (2), निवडणूक (2), प्रेम (2), प्रभू (2), दुर्गा (2), स्त्रिया (2), परीक्षा (2), समुद्र (2), वैचारिक (2), वेदान्त (2), रमण (2), प्रदेश (2), धर्म (2), दृष्टिकोन (2), हवेली (2), आंबेडकर (2), जगणं (2), कन्याकुमारी (2), कथा (2), आनंद (2), २०१९ (2), 2021 (2), स्वतंत्र (2), लेख (2), आंतरजालावर (2), निवडक (2), अंश (2), प्रकाशित (2), शोध (2), इथे (2), home (2), जाऊ (2), राहील (2), जगात (2), नेमकं (2), समजलं (2), साधना (2), सौंदर्य (2), खरी (2), लिपी (2), येतील (2), माझ्यासारख्या (2), अद्भुत (2), सुखावणारं (2), प्रकार (2), शांतिनिकेतनच्या (2), तरूण (2), तोही (2), चित्रांचं (2), ऋत्विक (2), घटक (2), बैज (2), मुखर्जी (2), बिनोद (2), बिहारी (2), डोळ्याने (2), काढत (2), वारंवार (2), प्रदर्शनाची (2), यावं (2), रवीन्द्रनाथांचं (2), बहुतेकांना (2), देणारे (2), महत्त्वाचे (2), नंदलाल (2), तिथली (2), ट्रेसिंग (2), नीट (2), कर्मचारी (2), सहा (2), केलेली (2), असतील (2), पडला (2), विकत (2), लक्ष (2), नव्हते (2), खरेदी (2), उत्साह (2), वेगवेगळे (2), उदिची (2), वेगवेगळी (2), घरं (2), श्यामली (2), घरांमध्ये (2), लोकांशी (2), पत्रव्यवहार (2), काढायला (2), परवानगी (2), फिरताना (2), श्रीमंत (2), जाणवतं (2), १९६१ (2), मिळालेल्या (2), नोबेल (2), पारितोषिकाची (2), रवीन्द्रनाथांचा (2), आइन्स्टाईन (2), मृत्यूनंतर (2), १९४२ (2), उभारलं (2), दुसरं (2), स्मरणार्थ (2), दिला (2), मातीची (2), चूल (2), खाल्ला (2), इथली (2), शाळकरी (2), मुला (2), प्रजासत्ताक (2), उशीर (2), नूतन (2), १९०२ (2), बांधलेलं (2), परिसरातलं (2), लिहिल्या (2), नेमक्या (2), आठवत (2), यांची (2), नृत्याचा (2), सराव (2), आपल्याकडं (2), आसपास (2), असो (2), चांगलं (2), कार्यालय (2), १९०१ (2), उल्लेख (2), रंग (2), आवडला (2), रचना (2), रोजच्या (2), वर्तुळ (2), विद्यार्थी (2), बसतात (2), आकाशाखालचे (2), भरतात (2), सप्तपर्णी (2), वृक्ष (2), ध्यान (2), बऱ्याच (2), अंतरावरून (2), छंद (2), घेता (2), ठेवली (2), मार्गदर्शक (2), बोलणाऱ्या (2), तोरण (2), यातली (2), पाहिली (2), जरा (2), बोलपूरला (2), पोचल्याने (2), ओळखलं (2), श्रीनिकेतन (2), मिळून (2), जातो (2), नकाशा (2), लोकांसाठी (2), वारसा (2), शिक्षणाचा (2), संपूर्ण (2), बौद्धिक (2), आंदोलन (2), कलाकार (2), देश (2), जिथं (2), १९२१ (2), याला (2), शैक्षणिक (2), शिक्षणाच्या (2), नाथ (2), न्द्र (2), नावाच्या (2), देवेन्द्रनाथांनी (2), एकर (2), मोकळ्या (2), १८६३ (2), रवींद्रनाथ (2), वडील (2), सुदैवाने (2), रोज (2), उलगडत (2), प्रकारे (2), फिरायचं (2), व्यक्तीला (2), टागोरांचं (2), टिकून (2), नसलेले (2), ऐकलं (2), tuesday (2), समजल्या (2), कोलकात्याचं (2), असावं (2), सणांमध्ये (2), बरंच (2), आयुष्यात (2), योग्यच (2), नेहमीप्रमाणे (2), जाणीव (2), घेतलं (2), मोडक्यातोडक्या (2), पडले (2), एखादं (2), श्वास (2), आलेली (2), तेही (2), जमलं (2), काळातील (2), मिळते (2), परदेशी (2), आकर्षक (2), केले (2), थोडी (2), दिसायला (2), गोथिक (2), बांधकाम (2), गाईडने (2), सरकार (2), पाण्याचे (2), वापर (2), तलाव (2), साधारण (2), काहीही (2), आणलं (2), दुपारी (2), संगमरवरी (2), विस्तीर्ण (2), आवडलं (2), हातात (2), जुने (2), छायाचित्रं (2), शक्य (2), इंडियन (2), हॉल (2), सुभाषचंद्र (2), एकत्र (2), १८७६ (2), केलेल्या (2), अल्बर्ट (2), पासून (2), जावंच (2), शब्दांत (2), पंधरा (2), युनिवर्सिटी (2), हेअर (2), स्कूल (2), हिंदू (2), सोसायटी (2), सहकारी (2), दुकानं (2), बाजारपेठ (2), आशियातली (2), दुर्मिळ (2), इमारतीच्या (2), नागरिक (2), काळी (2), दिलेल्या (2), त्यातून (2), आधारित (2), पेन (2), द्वारकानाथ (2), पन्नासपेक्षा (2), १८६१ (2), रोजी (2), ठाकुर (2), मानलं (2), रस्ते (2), नमस्कार (2), करणारे (2), उदाहरणार्थ (2), वाचून (2), याचा (2), येणं (2), गोंधळ (2), १९८४ (2), कोलकातामध्ये (2), मेट्रोचं (2), लाईन्स (2), प्रकारचे (2), १८७३ (2), इलेक्ट्रिक (2), मंद (2), मार्गांवर (2), थांबलो (2), व्यवस्थित (2), घराच्या (2), गल्लीत (2), विवेकानंदांच्या (2), सुप्रसिद्ध (2), आलेले (2), पहिल्यांदा (2), स्टेडियम (2), दुसरा (2), वेगळ्या (2), आमच्याशी (2), मराठीत (2), जातील (2), देबाहुती (2), कोलकात्याचा (2), दूरवर (2), मोठाल्या (2), वसंतपंचमीच्या (2), घाटाला (2), लागून (2), उभा (2), आलो (2), त्यावर (2), स्थानकाच्या (2), जाण्याचा (2), कोणत्याही (2), लागली (2), घाटावर (2), स्थानकात (2), फलाटांच्या (2), प्रशस्त (2), उशीरा (2), झालमुडी (2), ट्रेनमध्ये (2), जवळ (2), फलाट (2), दिशेने (2), ऐकताना (2), रंगभूमीवर (2), रौद्र (2), मंदोदरी (2), लक्ष्मण (2), राम (2), दाखवणारे (2), टाकलेली (2), ठेवलं (2), नसताना (2), सादर (2), अभिनेते (2), दिग्दर्शक (2), तीस (2), वर्षांच्या (2), हजार (2), रुपये (2), नवल (2), मिळाली (2), एकच (2), देणं (2), घोष (2), देण्यात (2), व्यावसायिक (2), होतात (2), त्यासाठी (2), उभी (2), जात (2), पाहणं (2), पाँडिचेरी (2), प्रतीक्षाने (2), तुम्हाला (2), मंदिराच्या (2), येईल (2), पारंपारिक (2), शिखरं (2), नदीच्या (2), एकाच (2), जाणाऱ्या (2), ब्राह्मण (2), त्याला (2), पुजारी (2), लागला (2), घाण (2), म्हणाल्या (2), एवढी (2), रांगा (2), त्यातल्या (2), त्यांच्यासोबत (2), पुढचे (2), निमलष्करी (2), अधिकारी (2), येतात (2), माझं (2), बोलायला (2), लागल्या (2), गंगेचा (2), माणसांनी (2), बाहेरून (2), साधारणपणे (2), बसला (2), पाँडिचेरीत (2), चेन्नेत (2), बोलता (2), भरावा (2), जाणारी (2), एसी (2), नसली (2), करुन (2), बॅग (2), होत (2), फलक (2), त्यांच्यासाठी (2), शिकणं (2), दुसरी (2), मेट्रोमध्ये (2), बहुतेक (2), नेहमीच्या (2), प्लॅटफॉर्म (2), वेगळा (2), उतरायला (2), उतरले (2), समोरच (2), central (2), बायकांच्या (2), पुरुषांच्या (2), फरक (2), आधीच (2), आग्रहाने (2), रिकामी (2), काकांना (2), तुम्ही (2), टीसी (2), घेतलेल्या (2), घरचं (2), जेवण (2), कौतुक (2), एकदम (2), ट्रेनने (2), योगी (2), निवृत्त (2), कारगिल (2), माझ्याशी (2), जाणार (2), संभाषण (2), कानांवर (2), बदलत (2), आग्रह (2), सोडून (2), विरळाच (2), सुपरफास्ट (2), पावलं (2), एआयला (2), theme, powered, blogger, footsteps, onwards, blogadda, प्रसंगाला, वर्षांपेक्षा, उलटून, गेलाय, जसच्या, डोळयांसमोर, राहतं, शनिवारच्या, ११७, सांभाळ, वाचलेल्या, थोडक्यात, सांगतेय, हेतू, स्वत, ठेवणं, वाचकांना, यातून, सापडली, १८९, यातलं, चाल, द्यायच्या, यादीत, कामासाठी, गुरूवारी, थाई, लँडच्या, २३८, फूलघर, झाडांनी, वेढलेली, संध्याकाळच्या, सगळेजण, पीत, तेजस्वी, आवाज, विचारतो, मनुष्याला, ११८, पाउले, आकाशी, चालावे, नसलो, सावली, शोधावा, पायांना, फुटल्याच, आहेतच, गावे, प्रत्येक, काल, परवा, पुण्यात, वीज, दंगामस्तीसह, हमखास, अनिलांची, पेर्ते, व्हा, संग्रहातली, अनिलांचा, शिबिराची, संध्याकाळ, डोंगर, दमून, प्रफुल्लित, चेह, मुल, त्यांच, स्वागत, तितक्याच, महेश, वाचकांची, आवड, एस्पीडीपी, शुभांगी, डोक्यातल्या, खोक्यात, भ्रम, णगाथा, रमलखुणा, मांडवगण, how, about, मधुरिमा, कुळकर्णी, रमेशची, कैफियत, स्वच्छंदी, manatla, thodasa, निमित्ताने, darmyaan, त्रिवेणी, murali, खताचा, खांब, धागे, दोरे, व्यवहार, रसिक, सानुल्या, सैंपाकघरी, remichi, boli, रेमीची, बोली, पिंजरा, संवादिनी, कुठला, म्हणेल, बलात्कार, व्हायलाच, हवेत, मुकामार, पाय, isolated, portal, mayuresh, kulkarni, नळदुर्गच्या, किल्ल्यात, वटवाघळांचा, घरोबा, amazing, bats, निसर्गवार्ता, ग्रीनवॉशिंग, ग्राहकांची, जागरूकता, iravati, अरुंधती, आनंदोत्सव, दीपोत्सव, फराळोत्सव, फटाकेत्सव, सरदेसाईज, दवबिंदु, उमेद, कागद, अन्, लेखणी, मार्केसचा, जादुई, वास्तववाद, तिसरे, literature, शाणपट्टी, शुऽऽऽ, बोलायचं, पांढर्, यावरचं, काळं, नवे, मोनो, सुचलेलं, अभिनंदन, avinash, dharmadhikari, ripple, creative, mau, मनातला, किल्ला, मनातले, गॉड, स्मॉल, थिंग्झ, शतपावली, वाचू, त्यानंदे, टॅलीनामा, करड्या, छटांचा, मागोवा, आतून, अग्निसखा, थोडे, जरुरत, restiscrime, संघासमोरचे, आव्हान, उलट, तपासणी, बिर्याणीस्तोत्रम्, hymn, biryani, manogate, इतका, लळा, अफ़ू, गुणी, गोडगप्पा, लसणाचे, आक्षे, लढाई, टेनिस, कोर्टची, उधाण, वार्, याचे, सर्वस्पर्शी, विशेषांक, प्रकाशन, बातम्या, घेतात, कृती, कोहम, जास्वंदाची, फुलं, विद्रोह, ढोंग, नेमाने, नेमाडे, बाप्पाची, new, facebook, page, मेरा, कुछ, टिकवण्यासाठी, एवढं, मनस्पंदने, अर्थक्रांती, ढोबळ, विपरीत, तर्क, भुरळ, पाडणारा, प्रचार, ओसरी, हुमुहुमुनुकूनुकूआप्वा, हवाई, मेमरीज, tangents, मॉन्सून, रंजन, केळकर, ह्यांच्या, परिचय, मोकळीक, ledge, आल्हादक, प्रतिबिंब, अप्राप्य, भिंत, शहाणपणाची, vaiddyacha, वैद्याचा, ब्लॉग, बाप, वटवट, सत्यवान, सूक्ष्मजीवांना, घाबरतो, मनगुज, तुंबाड, विशुभाऊ, फळा, वाढदिवस, पुष्पगुच्छ, केक, swings, mind, स्पंदन, एकत्व, आपुले, विचारयज्ञ, vicharyadnya, परमेश्वराचा, अवतार, अळवावरचे, वनवास, मनमौजी, आतल्यासहित, शांतवन, भिजपाऊस, लंडन, क्षणचित्रे, नॅचरल, हिस्टरी, म्युझियम, pre, तरंग, सहेला, रंजक, सेरीज, आठवणिंचे, पिंपळपान, आॅस्ट्रेलिया, आयलंड, काॅंटिनेंट, सफर, सिडने, मेलबोर्न, tarang, किर्तीमहल, माझिया, मना, मोकळे, आकाश, meek, will, not, inherit, earth, डीडीच्या, दुनियेत, akhil, world, अखिलचं, आरक्षण, गेल्याने, ओबीसी, संकटात, prof, hari, narke, वाईन, स्टेट, zula, unke, dushman, hai, bahut, aadmi, aacha, hoga, रक़्स, करना, sahajach, हरवलेल्या, हिवाळ्याच्या, शब्दवेल, परिचित, प्रवाहाविरोधातला, फ्लो, सिनेमास्कोप, बेड़ा, अत्रे, उवाच, साडे, तासांचा, सफाईदारपणा, धुरंधर, movie, dhurandhar, रणजित, पराडकर, ranjeet, paradkar, रसप, द्वार, द्वारका, कोडं, राफा, तुलसी, अनोखी, अनुभूती, श्रुतीसंवेदना, what, achieved, india, now, quantum, communications, and, why, significant, aksharadhool, सुनीताबाईंचा, डोडी, गाजलेली, मैफिल, निळाईची, गाज, नरेन्द्र, month, घरातली, मोसम, सत्तेचाळीस, वर्षांची, अनुभवसंपन्नता, नरेंद्र, गोळे, महालक्ष्मी, पूर्वतरंग, भागवतांच्या, भाषांतरात, वॉल्डन, विल्हेवाट, रेघ, वेदमूर्ती, पक्षी, week, लोगोकथा, पार्ले, कथापौर्णिमा, days, अमेरिकेची, पूर्वेकडची, ट्रीप, photo, स्मृति, वाचते, हॉस्पिटल, हरियाणा, स्मरणशक्ती, स्थापत्य, सौमित्र, सिंगापूर, सिक्कीम, साहित्यभूषण, सावित्रीबाई, फुले, सावित्री, सावरकर, कार्यकर्ते, सातपु़डा, शीख, शतशब्दकथा, शंकराचार्य, विविधता, विज्ञान, विचित्रपणा, विकास, वासंती, मुझुमदार, वाचननोंद, लष्करी, सत्ता, ललित, रेचल, कार्सन, रामानुजाचार्य, राजस्थान, महर्षी, म्यानमा, मौन, मोझाम्बिक, मेघालय, मुक्तक, महाराष्ट्र, मर्ढेकर, मध्वाचार्य, मध्य, मणिपूर, भटकंती, बिहार, बोरकर, फिलिपिन्स, प्राणी, प्रसारमाध्यमं, प्रभा, गणोरकर, पोलीस, पॉण्डिचेरी, रेगे, पानिपत, पर्यावरण, पंजाब, नारायण, सुर्वे, नाती, नर्मदा, दिल्ली, दादरा, नगर, दहशतवाद, त्रिवेंद्रम, त्रिपुरा, तालिबान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, डवाव, जीवनशैली, जलव्यवस्थापन, छत्तीसगढ, चरित्र, बुद्ध, गोवा, गुजरात, गांधीजी, गणित, खेडी, खाद्यसंस्कृती, केशवसुत, केरळ, केनिया, कुसुमाग्रज, कुरुक्षेत्र, काबूल, ओडिशा, उपनिषद, उत्तराखंड, आरती, आन्जी, आदिवासी, अहिंसा, अफगाणिस्तान, 161, अनिल, अण्णा, हजारे, २०१७, २०१४, shillong, meghalaya, typical, khasi, house, view, complete, profile, वाचक, पाने, transient, bonds, photoblog, times, change, two, more, blogs, ब्लॉगवरील, लेखन, पूर्णत, लेखी, पूर्वपरवानगी, घेतल्याविना, इथले, अन्यत्र, छापील, स्वरूपात, नयेत, विवेकानंदांचा, वाचा, अभिप्राय, जरूर, कळवा, sitemeter, older, भटकंतीत, शांतिनिकेतनने, गारूड, माझ्यावर, काळच, सांगेल, नातं, कुणाशी, कशाशी, पुरेसं, कलेची, करण्याइतकी, तिच्याशी, बांधिलकी, कलाकारांना, दिसू, शकतं, निसर्गाकडं, पाहण्याची, खरोखर, जगण्यात, चित्रांची, हवी, नुसती, अगणित, शक्यता, निरक्षर, व्यक्तीसाठी, नवं, एकाचवेळी, परक्यासारखं, वागणारं, बोलपूरमधली, प्रदर्शनं, चित्रकलेतलं, अपार, मिळाला, विद्यार्थ्याने, सोप्या, समजावून, सांगायचा, डोक्यावरून, प्रिंटमेकर, पेंटिंग, जीवनकार्यावरचं, यांचे, फारसे, चित्रपट, पाहिलेले, कृष्णा, रेड्डी, तीही, अप्रतिम, सगळीच, अंध, दूरचे, नसे, वास्तवदर्शी, आल्याने, निघावं, पाहण्यासाठी, सुरेख, benode, behari, mukherjee, ram, kinker, baij, रामकिंकर, nandalal, bose, आपल्यापैकी, त्यांच्यासमवेत, योगदान, चित्रकार, आमच्याविना, कुणीच, प्रकाशयोजना, दिसतंच, तिथले, सुरक्षा, उत्साही, अजंठामध्ये, शोधलं, सरांचं, विषयवारचं, पुस्तकात, सविस्तर, मार्गांनी, शोधावी, देणारं, पोस्टर, ajanta, mural, tracing, ganesh, haloi, हलोई, विक्रीकक्षात, चित्रांच्या, नेहमीचा, खाक्या, लोकांकडं, माझाही, करण्याचा, मावळला, घरांच्या, बांधणीत, केलेले, चकित, कोणार्क, उदयन, पुनश्च, घरांना, पाचही, वास्तव्य, उत्तरायण, पंधराशेपेक्षा, वर्गातली, गरीब, मध्यमवर्गीय, प्रकारची, आस्थेने, पहात, थबकून, बंगालसाठी, अभिमानाचा, अस्मितेचा, आस्थेचा, बिंदू, romain, rolland, आश्चर्यजनक, वैविध्यपूर्ण, इत्यादी, जन्मशताब्दी, रवीन्द्रनाथांना, रोमा, रोलां, बिचित्र, संग्रहालयाचं, रबीन्द्र, बाबासाहेबांचा, चौकात, चहाच्या, टपऱ्या, आंबेडकरांचा, कौतुकाने, दिल्लीतल्या, गृहस्थाने, वडिलांच्या, येताना, आलू, चाप, उच्चारलेही, ट्रेनमधल्या, वडिलांची, सहप्रवासी, आधीची, पोस्ट, कार्यक्रमाला, गर्दीही, त्यातही, मुलींची, संख्या, ड़ॉ, राज्यघटना, जानेवारीला, दिनाच्या, कार्यक्रमासाठी, पोचायला, प्रमुख, पाहुणे, पाहुण्यांनी, दिन, कार्यक्रम, चित्रप्रदर्शनं, भटकलो, तूफान, तल्लीन, गात, ऐकतानाही, प्रसन्न, शब्दांमध्ये, येणार, नतुन, मृणालिनी, देवी, पत्नी, कस्तुरबा, यातल्या, कुठल्या, इमारतीतील, भिंतींवर, छतावर, दिल, खुष, गया, ताजी, गाण्यावर, भवनमधली, पाहताहेत, गोष्टींकडं, अजिबात, सरावात, रममाण, एकला, चलो, वडाचं, झाड, रेंगाळताना, पारंब्यांवर, झोके, शेजारच्या, कट्ट्यावर, वास्तूकला, विलक्षण, नव्याचा, स्वीकार, जुन्यातलं, टिकवून, ठेवायची, साधली, प्रथमदर्शनी, फ्युजन, विद्यार्थ्यांना, भवनची, प्राथमिक, माध्यमिक, बिनभिंतींच्या, वर्गाचा, भवनचा, इमारतीचा, इमारतीची, शैलीही, भावली, शैलींचं, १९१९, बौद्ध, शैलीत, बांधलेला, घंटाताल, ठिकठिकाणी, वृक्षांच्या, आजूबाजूला, दगडी, वर्तुळाकार, कट्टा, वर्तुळाचा, भागापेक्षा, शिक्षक, शिक्षिका, बिनभितींचे, पहिलीपासूनचे, छातिम, ज्याला, वृक्षांखाली, देवेन्द्रनाथ, १८६२, जागेचं, कुंपणापलिकडून, पाहावे, बहुतांश, लांबूनच, न्याहाळता, समाजाला, लागलेलं, सेल्फीचं, वेड, भिंतीवर, कोरण्याचा, पर्यटकांमध्ये, वास्तूंमध्ये, आवश्यक, अनासुआने, भाषांमधले, गाईड्स, गटाबरोबर, गाईडसोबत, चालायला, लागलो, माहितीपत्रकात, छातिमतल, उपासना, तालध्वज, देहली, संतोषालय, घंटातल, पूर्व, सिंह, सदन, दिनांत्रिका, चीना, जागांचा, बाकी, वॉकचं, शुल्क, जास्तच, रविवारी, शनिवारी, हाच, आमचा, पहिला, उपक्रम, विद्यापीठीय, अभिव्यक्ती, जीवनदृष्टीची, औपचारिक, जीवनदृष्टी, शेती, समाजविकासाच्या, प्रयोगांसाठी, म्हणजेच, भौगोलिक, ग्रामीण, पुनर्रचना, मानवविद्येचे, विभाग, संगीत, विश्वभारतीचा, विस्तृत, विद्यापीठाचा, केंद्रबिंदू, ओळखला, शिकवणारी, विद्यार्थ्यांसाठी, दर्जा, स्थळा, unesco, मानवी, नातेसंबंध, ऋतू, मानणारा, त्यामुळेच, वर्गखोलीतलं, ज्ञान, सामूहिक, प्रयत्नातून, राहिलेलं, बनलं, विचारवंत, व्यक्तीचं, स्वप्न
Text of the page (random words):
ि बांग्ला जानि ना म्हणायचे मग पुढचा संवाद मोडक्यातोडक्या हिंदी इंग्रजीत व्हायचा ते मला इंग्रजी पुस्तकं दाखवायचे नाही म्हणत म्हणत खरेदी झालीच एक बांग्ला पुस्तकही घेतलं पुस्तक महोत्सवात लेखक कवी साहित्यिकांच्या मुलाखती योग्यच आहेत पण नृत्य गायन भाषणं आणि मुख्य म्हणजे खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्स नसतील तर गर्दी कमी होईल आणि पुस्तकप्रेमींना शांततेत पुस्तकं पाहता येतील असं मला पुन्हा एकदा वाटलं नेहमीप्रमाणे मी अल्पमतात आहे याची मला जाणीव आहे या दीड दिवसाचा विचार केला तर तो फक्त ठिकाणं पाहण्याचा राहिला नाही तर कोलकात्याला थोडंफार समजून घेण्याची एक सुरुवात झाली एका बाजूला प्रान्तिकपासून हावडा हुगळी घाट सरस्वती पूजनाचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला जुन्या कोलकात्याच्या गल्ल्या घरं विचारवंतांचा वारसा आणि पुस्तकांच्या रस्त्यांवरची बौद्धिक चहलपहल हे सगळं एकमेकांत गुंतलेलं दिसलं इथं इतिहास फक्त संग्रहालयात बंद नाही तर तो रोजच्या आयुष्यात सणांमध्ये आणि लोकांच्या वागण्यात जिवंत आहे वेळ कमी असल्यामुळे बरंच काही राहिलं काही गोष्टी अर्धवट समजल्या आणि काही नव्याने प्रश्न निर्माण करून गेल्या कदाचित तेच कोलकात्याचं वैशिष्ट्य असावं posted by aativas at 9 57 pm 12 comments labels कोलकाता पश्चिम बंगाल पुस्तक प्रवास इतिहास संस्कृ्ती tuesday february 24 2026 २८१ बोशांको ची भेट भाग २ शांतिनिकेतन if you want to read this post in english it is available here भाग १ बोलपूर शांतिनिकेतन हे नाव ऐकलं की आपल्याला लगेच रवीन्द्रनाथ टागोर हे नाव आठवतं भिंतींचं बंधन नसलेले खुले वर्ग झाडाखाली बसलेली मुलं गुरुदेव विश्वभारती असं एक चित्र डोळ्यांसमोर येतं आपल्याल हे एक शैक्षणिक सांस्कृतिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखीचं आहे जिथं शिक्षण म्हणजे परीक्षा नाही तर अनुभव आहे आणि कला म्हणजे चौकटीत बंदिस्त नसलेली गोष्ट आहे अशी एक सुंदर आणि काहीशी आदर्शवादीही प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे आज हे सगळं तसंच टिकून आहे का की बदललं आहे असंही एक कुतुहल मनात जागतं नुसतंच पर्यटक म्हणून जायचं तर शांतिनिकेतन पाहायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला एक दिवस पुरेसा आहे टागोरांचं घर संग्रहालय हस्तकला बाजार आठवड्याच्या हाटमधून आठवण म्हणून घेतलेली एखादी वस्तू आणि मग परत फिरायचं शांत आणि सुंदर अशी या जागेची ओळख जितकी खरी आहे तितकीच अपुरीही आहे कारण शांतिनिकेतन केवळ एका भेटीत उरकून टाकण्याची जागा नाही आजही ती एक प्रकारे अंतर्मुख करणारी जागा आहे शांतिनिकेतन म्हणजे केवळ टागोरांची आठवण नाही तर टागोरांनी रुजवलेली एक दृष्टी एक विचारधारा आहे माणूस निसर्ग शिक्षण कला आणि समाज यांच्यातली सीमारेषा पुसून टाकण्याचा टागोरांनी केलेला प्रयत्न अजूनही इथं दिसतो मला सुदैवाने पर्यटकांसारखी पाहायची आणि निघायची घाई नव्हती स्थानिक लोकांबरोबर राहायचं आणि त्यांच्या शिफारसीनुसार रोज एक निवडक गोष्ट करायची असं मला करत आलं शांतिनिकेतन हळूहळू पाहताना मग त्याचे अनेक पैलू उलगडत गेले अर्थात सगळं पाहून झालं नाही आणि सगळं कळलेलंही नाही पण शांतिनिकेतनच्या ओळखीची सुरूवात तर झाली इतिहास १८६३ मध्ये रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवे न्द्र नाथ टागोर यांनी बोलपूरजवळ या मोकळ्या रुक्ष जमिनीत एक छोटंसं आश्रमस्थळ उभारलं शांतिनिकेतन म्हणजे शांततेचं घर सिन्हा नावाच्या जमिनदाराकडून देवेन्द्रनाथांनी वीस एकर जमीन विकत घेतली देवेन्द्रनाथांनी ध्यान साधना आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत जीवन अनुभवण्यासाठी आदर्श जागा म्हणून या जमिनीची निव़ड केली या खरेदीचा उद्देश ब्राह्मो समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक शिक्षणाला पलीकडे घेऊन जाणं निसर्गाशी संवाद साधणं आणि भौतिक शिक्षणाच्या चौकटींपेक्षा बाहेरचा जीवनाचा अभ्यास सुरु करणं हा होता त्या काळात कोणीही कल्पना केली नसेल की हे शांत थोडंसं एकाकी ठिकाण पुढे जागतिक विचारांचं केंद्र बनेल रवी न्द्र नाथ टागोरांनी या जागेला केवळ आश्रम म्हणून नव्हे तर शिक्षणाच्या प्रयोगशाळा म्हणून पाहिलं १९०१ मध्ये त्यांनी इथं ब्रह्मचर्य आश्रम शाळेची स्थापना केली वर्ग भिंतींमध्ये बंद न ठेवता झाडांच्या सावलीत नेण्याचा निर्णय हा केवळ शैक्षणिक नव्हता तर राजकीय आणि सांस्कृतिकही होता वसाहतवादी शिक्षणपद्धतीला पर्याय देण्याचा भारतीय परंपरा आणि जागतिक विचार यांचा संवाद घडवण्याचा तो प्रयत्न होता इथं पाठांतरापेक्षा निरीक्षण स्पर्धेपेक्षा सहअस्तित्व आणि परीक्षेपेक्षा समज याला महत्त्व दिलं गेलं १९२१ मध्ये विश्वभारती ची स्थापना झाली यत्र विश्वं भवत्येकनीडम् जिथं संपूर्ण जग एक घर बनतं हे विश्वभारतीचं केवळ घोषवाक्य नाही तर इथल्या जगण्याची दिशा होती देश विदेशातील विद्यार्थी कलाकार विचारवंत इथं येऊ लागले शांतिनिकेतन हे एका व्यक्तीचं स्वप्न राहिलं नाही तर सामूहिक प्रयत्नातून उभं राहिलेलं बौद्धिक आणि सांस्कृतिक आंदोलन बनलं संपूर्ण जग एक घर मानणारा हा प्रयोग त्यामुळेच इथं शिक्षण म्हणजे फक्त वर्गखोलीतलं ज्ञान नाही इथं ऋतू सण कला निसर्ग आणि मानवी नातेसंबंध हे सगळं शिक्षणाचा भाग आहे आज unesco ने शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळा चा दर्जा दिला आहे पण स्थानिक लोकांसाठी आणि इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शांतिनिकेतन अजूनही जगणं शिकवणारी जागा आहे विश्व भारती परिसर नकाशा आज शांतिनिकेतन हा एक स्वतंत्र परिसर म्हणून ओळखला जातो जो विश्वभारती विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन हे दोन मुख्य भाग मिळून विश्वभारतीचा विस्तृत परिसर तयार होतो शांतिनिकेतनमध्ये कला संगीत भाषा आणि मानवविद्येचे विभाग आहेत तर श्रीनिकेतन ग्रामीण पुनर्रचना शेती आणि समाजविकासाच्या प्रयोगांसाठी ओळखलं जातं म्हणजेच शांतिनिकेतन ही केवळ भौगोलिक जागा नाही तर एक जीवनदृष्टी आहे आणि विश्वभारती ही त्या जीवनदृष्टीची औपचारिक विद्यापीठीय अभिव्यक्ती हेरिटेज वॉक शांतिनिकेतन आश्रम हेरिटेज वॉक फक्त रविवारी असतो आम्ही बोलपूरला शनिवारी रात्री पोचल्याने हेरिटेज वॉक हाच आमचा पहिला उपक्रम होता हेरिटेज वॉकचं शुल्क जरा जास्तच वाटलं माहितीपत्रकात छातिमतल शांतिनिकेतन गृह उपासना गृह तालध्वज नूतन बाडी देहली संतोषालय घंटातल पूर्व तोरण पश्चिम तोरण सिंह सदन पाठ भवन दिनांत्रिका चीना भवन आणि हिंदी भवन या जागांचा उल्लेख आहे यातली एक दोन ठिकाणं वगळता बाकी सगळी पाहिली अनासुआने पुढं जाऊन तिकिटं काढून ठेवली होती बांग्ला इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमधले गाईड्स मार्गदर्शक उपलब्ध होते आम्ही आणखी एका गटाबरोबर हिंदी बोलणाऱ्या गाईडसोबत चालायला लागलो बंगाली भाषेत छातिम असं ज्याला नाव आहे तो म्हणजे सप्तपर्णी वृक्ष इथल्या दोन सप्तपर्णी वृक्षांखाली देवेन्द्रनाथ टागोर यांनी त्यांच्या पहिल्या भेटीत म्हणजे १८६२ मध्ये ध्यान केलं होतं हे या जागेचं महत्त्व कुंपणापलिकडून बऱ्याच अंतरावरून हे वृक्ष पाहावे लागले बहुतांश ठिकाणं अशी लांबूनच न्याहाळता आली आपल्या समाजाला लागलेलं सेल्फीचं वेड आणि भिंतीवर आपलं नाव कोरण्याचा छंद लक्षात घेता पर्यटकांमध्ये आणि वास्तूंमध्ये हे अंतर आवश्यक आहे शांतिनिकेतन आश्रम परिसरात पहिलीपासूनचे वर्ग भरतात आकाशाखालचे वर्ग ठिकठिकाणी वृक्षांच्या आजूबाजूला मोठं वर्तुळ दिसलं वर्तुळ म्हणजे दगडी वर्तुळाकार कट्टा इथं विद्यार्थी बसतात वर्तुळाचा एक भाग इत भागापेक्षा थोडा उंच आहे तिथं शिक्षक शिक्षिका बसतात अजूनही इथं आकाशाखालचे बिनभितींचे वर्ग भरतात १९१९ मध्ये बौद्ध शैलीत बांधलेला घंटाताल आजही रोजच्या वापरात आहे पाठ भवन हे आहे पाठ भवन कार्यालय १९०१ मध्ये पाच विद्यार्थ्यांना घेऊन पाठ भवनची सुरूवात झाली इथं आजही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिलं जातं ज्या बिनभिंतींच्या वर्गाचा मी आधी उल्लेख केला आहे तो पाठ भवनचा भाग आहे आता या जुन्या इमारतीत कार्यालय आहे मला या इमारतीचा रंग फार आवडला इमारतीची रचना शैलीही मला भावली शांतिनिकेतनमध्ये अनेक शैलींचं फ्युजन दिसतं मग ती वास्तूकला असो की चित्रकला एक प्रकारचा साधेपणा आणि तरीही विलक्षण सौंदर्य असं शांतिनिकेतनमध्ये आजही जाणवतं नव्याचा स्वीकार करताना जुन्यातलं चांगलं ते टिकवून ठेवायची कला शांतिनिकेतनला साधली आहे असं प्रथमदर्शनी वाटलं वडाचं एक जुनं झाड त्या परिसरात आहे त्याच्या आसपास रेंगाळताना शांत वाटलं एक दोन लहान मुलं तिथं पारंब्यांवर झोके घेत होती शेजारच्या एका कट्ट्यावर एकला चलो रे या गाण्यावर पाठ भवनमधली मुलं मुली नृत्याचा सराव करत होती पर्यटक आपल्याकडं पाहताहेत का वगैरे गोष्टींकडं त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं ते त्यांच्या सरावात रममाण झाले होते नूतन बाडी बांग्ला भाषेत नतुन बाडी हे मृणालिनी देवी रवीन्द्रनाथ यांच्या पत्नी यांच्या मृत्यूनंतर १९०२ मध्ये बांधलेलं घर महात्मा गांधी आणि कस्तुरबा या घरात काही काळ राहिले आहेत शांतिनिकेतन गृह हे या परिसरातलं सर्वात जुनं घर याही इमारतीत महात्मा गांधी राहिले आहेत रवीन्द्रनाथांनी त्यांच्या पुढं प्रसिद्ध झालेल्या अनेक कविता याच घरात लिहिल्या आहेत यातल्या नेमक्या कुठल्या ते आठवत नाही पण एका इमारतीतील भिंतींवर आणि छतावर नंदलाल बोस यांची चित्रं पाहता आली दिल खुष हो गया इतकी ताजी आणि जिवंत चित्रं होती ती ती चित्रं पाहून काय वाटलं याचं वर्णन मला शब्दांमध्ये करता येणार नाही परिसरात दोन तास भटकलो आणि बाहेर पडलो बाहेर तूफान गर्दी होती त्यात हे दोन वादक गायक तल्लीन होऊन गात होते ते ऐकतानाही प्रसन्न वाटलं वादक प्रजासत्ताक दिन कार्यक्रम आणि चित्रप्रदर्शनं २६ जानेवारीला सकाळी पुन्हा विश्व भारती परिसरात गेलो ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला त्यामुळे प्रमुख पाहुणे कोण होते ते नेमकं कळलं नाही पण त्या पाहुण्यांनी राज्यघटना आणि ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर हे दोन शब्द उच्चारलेही नाहीत त्यामुळे मला ट्रेनमधल्या त्या तरूण वडिलांची माझे सहप्रवासी आठवण आली संदर्भ आधीची पोस्ट कार्यक्रमाला तशी फारशी गर्दीही नव्हती होती त्यातही शाळकरी मुला मुलींची संख्या जास्त वाटली तिथून परत येताना एका ठिकाणी आलू चाप खाल्ला आणि चहा घेतला इथली मातीची चूल छान होती मातीची चूल या छोट्या चौकात तीन चार चहाच्या टपऱ्या होत्या एका बाजूला डॉ आंबेडकरांचा पुतळा दिसला म्हणून कौतुकाने पाहायला गेले नवी दिल्लीतल्या एका गृहस्थाने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा पुतळा भेट म्हणून दिला आहे छान वाटलं ते पाहून बाबासाहेबांचा पुतळा एक दिवस रबीन्द्र भवन पाहिलं रवीन्द्रनाथांच्या मृत्यूनंतर १९४२ मध्ये हे उभारलं गेलं टागोर संग्रहालय असं याचं दुसरं नाव आहे इथल्या संग्रहालयाचं नाव आहे बिचित्र म्हणजे आश्चर्यजनक वैविध्यपूर्ण सुंदर इत्यादी १९६१ मध्ये रवीन्द्रनाथ जन्मशताब्दी हे संग्रहालय तयार केलं गेलं इथं रवीन्द्रनाथांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे रवीन्द्रनाथांचा आइन्स्टाईन महात्मा गांधी रोमा रोलां romain rolland अशा लोकांशी झालेला पत्रव्यवहार आहे रवीन्द्रनाथांनी काढलेली पंधराशेपेक्षा जास्त चित्रं आहेत इथं फोटो काढायला परवानगी नाही या संग्रहालयात फिरताना जाणवलं की सर्व वर्गातली गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथं आस्थेने पहात होती थबकून चर्चा करत होती बंगालसाठी आजही रवीन्द्रनाथ हा अभिमानाचा अस्मितेचा आणि आस्थेचा बिंदू आहे हे वारंवार जाणवतं उत्तरायण मध्ये पाच वेगवेगळी घरं आहेत कोणार्क श्यामली उदयन पुनश्च उदिची अशी छान नावं या घरांना आहेत या पाचही घरांमध्ये रवीन्द्रनाथांनी वेगवेगळ्या काळात वास्तव्य केलं आहे श्यामली हे मातीचं घर आहे उदिची या घरांच्या बांधणीत केलेले वेगवेगळे प्रयोग पाहून चकित झाले विक्रीकक्षात रवीन्द्रनाथांच्या चित्रांच्या छोट्या प्रतिकृती विकत मिळतात असं कळलं होतं पण मला तर काहीच दिसलं नाही इथं नेहमीचा सरकारी खाक्या दिसला कर्मचारी लोकांकडं लक्ष देत नव्हते त्यामुळे माझाही काही खरेदी करण्याचा उत्साह मावळला गणेश हलोई ganesh haloi यांच्या ajanta mural tracing चं प्रदर्शन पाहायला गेलो प्रदर्शनाची माहिती देणारं पोस्टर तिथं आमच्याविना कुणीच नव्हतं तिथली प्रकाशयोजना अशी होती की ट्रेसिंग नीट दिसतंच नव्हतं तिथले सुरक्षा कर्मचारी मात्र उत्साही होते बरीच माहिती सांगत होते गणेश सर अजंठामध्ये सहा वर्ष काम करत होते त्यांनी केलेली ट्रेसिंग सुंदर आहेत कशी केली असतील हा प्रश्न पडला पण त्याचं उत्तर काही शोधलं नाही गणेश सरांचं या विषयवारचं पुस्तक प्रकाशित झालं आहे असं नंतर कळलं कदाचित पुस्तकात सविस्तर माहिती असेल किंवा इतर मार्गांनी ती शोधावी लागेल रवीन्द्रनाथांचं नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतं पण शांतिनिकेतनमध्ये त्यांच्यासमवेत योगदान देणारे आणखी तीन चित्रकार महत्त्वाचे आहेत नंदलाल बोस nandalal bose रामकिंकर बैज ram kinker baij आणि बिनोद बिहारी मुखर्जी benode behari mukherjee बैज आणि मुखर्जी यांच्या चित्रांचं प्रदर्शन दुसऱ्या दालनात होतं तीही चित्रं अप्रतिम होती सगळीच चित्रं अतिशय जिवंत वाटत होती बिनोद बिहारी एका डोळ्याने अंध होते तर दुसऱ्या डोळ्याने त्यांना दूरचे दिसत नसे तरीही त्यांची चित्रं अतिशय वास्तवदर्शी आहेत कसं काय चित्रं काढत असेल हा माणूस असं वारंवार वाटत राहिलं प्रदर्शनाची वेळ संपत आल्याने आम्हाला तिथून निघावं लागलं पण केवळ चित्रं पाहण्यासाठी शांतिनिकेतनला पुन्हा यावं इतकी सगळी चित्रं सुरेख होती आणखी एका सकाळी ऋत्विक घटक यांच्या जीवनकार्यावरचं फोटो प्रदर्शन पाहिलं ते पाहताना आपण यांचे फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत हे जाणवलं दुसऱ्या एका दालनात कृष्णा रेड्डी यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं प्रिंटमेकर पेंटिंग असा एक नवा प्रकार इथं पाहायला मिळाला शांतिनिकेतनच्या एका तरूण विद्यार्थ्याने तोही तिथं प्रदर्शन पाहायला आला होता मला सोप्या भाषेत ते समजावून सांगायचा प्रयत्न केला पण माझ्या ते सगळं डोक्यावरून गेलं चित्रं अर्थातच छान होती शांतिनिकेतन बोलपूरमधली ही सगळी प्रदर्शनं पाहताना आपल्याला चित्रकलेतलं काही कळत नाही याचं अपार दु ख झालं चित्रकला निरक्षर असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हे एक पूर्ण नवं विश्व होतं एकाचवेळी अद्भुत सुखावणारं आणि तरीही परक्यासारखं अंतर ठेवून वागणारं चित्रांची भाषा समजून घ्यायला हवी खरी नुसती एक नवी लिपी नाही तर नवा विचार नवा संवाद यांच्या अगणित शक्यता त्यामुळे समोर येतील आपल्या जगण्यात साधेपणा आणि सौंदर्य दोन्ही आहे का निसर्गाकडं पाहण्याची आपली दृष्टी खरोखर कशी आहे कलाकारांना जे दिसतं ते आपल्याला दिसू शकतं का कलेची साधना करण्याइतकी तिच्याशी आपली बांधिलकी आहे का या जगात आपलं नातं नेमकं कुणाशी कशाशी आहे हे आपल्याला पुरेसं समजलं आहे का असे अनेक प्रश्न या भटकंतीत माझ्या मनात येत राहिले शांतिनिकेतनने मला नक्की एक नवी दृष्टी दिली तिचं गारूड माझ्यावर किती काळ राहील हे काळच सांगेल पुढच्या भागात जाऊ जुन्या कोलकात्यात posted by aativas at 5 34 pm 5 comments labels अनुभव इतिहास चित्रकला पश्चिम बंगाल बोलपूर शिक्षण संस्कृ्ती older posts home subscribe to posts atom sitemeter ई बुक विवेकानंदांचा वेदान्त विचार हे ई बुक इथे उपलब्ध आहे वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा शोध या ब्लॉगवरील लेखन पूर्णत स्वतंत्र असून माझी लेखी पूर्वपरवानगी घेतल्याविना इथले लेख अन्यत्र आंतरजालावर वा छापील स्वरूपात पूर्ण लेख वा निवडक अंश प्रकाशित करू नयेत two more blogs english blog times change photoblog transient bonds जुनी पाने 2026 6 august 2026 1 २८४ दक्षिणेकडं जाताना july 2026 1 april 2026 1 february 2026 2 january 2026 1 2025 6 september 2025 3 june 2025 1 april 2025 1 february 2025 1 2024 4 august 2024 1 june 2024 1 february 2024 1 january 2024 1 2023 8 december 2023 2 september 2023 2 july 2023 1 june 2023 3 2021 1 april 2021 1 2019 5 july 2019 1 june 2019 2 may 2019 1 march 2019 1 2018 2 april 2018 1 march 2018 1 2017 5 september 2017 2 may 2017 1 february 2017 2 2016 12 november 2016 3 october 2016 1 september 2016 1 june 2016 4 may 2016 1 march 2016 1 february 2016 1 2015 17 december 2015 2 october 2015 2 july 2015 1 june 2015 2 april 2015 2 march 2015 3 february 2015 2 january 2015 3 2014 34 december 2014 4 november 2014 1 october 2014 1 september 2014 3 august 2014 2 july 2014 3 june 2014 1 may 2014 4 april 2014 4 march 2014 4 february 2014 4 january 2014 3 2013 38 december 2013 3 november 2013 1 october 2013 2 september 2013 4 august 2013 2 july 2013 2 june 2013 1 may 2013 3 april 2013 4 march 2013 8 february 2013 5 january 2013 3 2012 39 december 2012 3 november 2012 2 october 2012 3 september 2012 3 august 2012 2 july 2012 2 june 2012 4 may 2012 3 april 2012 4 march 2012 4 february 2012 4 january 2012 5 2011 49 december 2011 5 november 2011 4 october 2011 6 september 2011 4 august 2011 5 july 2011 4 june 2011 4 may 2011 4 april 2011 3 march 2011 3 february 2011 4 january 2011 3 2010 42 december 2010 3 november 2010 4 october 2010 4 september 2010 5 august 2010 4 july 2010 5 june 2010 3 may 2010 2 april 2010 2 march 2010 3 february 2010 2 january 2010 5 2009 15 december 2009 2 november 2009 4 october 2009 3 july 2009 1 may 2009 1 april 2009 1 march 2009 2 february 2009 1 वाचक मी कोण view my complete profile typical khasi house shillong meghalaya august 11 labels २०१४ 2 २०१७ 3 २०१९ 5 अण्णा हजारे 5 अनिल 1 अनुभव 161 अफगाणिस्तान 12 अरविंद 1 अहिंसा 1 आदिवासी 14 आनंद 1 आन्जी 18 आरती प्रभू 1 इतिहास 21 उत्तर प्रदेश 4 उत्तराखंड 3 उपनिषद 2 ओडिशा 1 कथा 10 कन्याकुमारी 6 कविता 2 काबूल 11 कुरुक्षेत्र 1 कुसुमाग्रज 1 केनिया 1 केरळ 1 केशवसुत 1 कोलकाता 3 खाद्यसंस्कृती 1 खेडी 27 गंगा 1 गणित 1 गांधीजी 1 गुजरात 3 गोवा 1 गौतम बुद्ध 2 चरित्र 1 चित्रकला 1 ...
|