Meta tags:
description= देवेन;
Headings (most frequently used words):
लेख, ब्लॉग, टिव, दवबिंदु, मेनू, 2013, in, review, खेळ, मांडला, पोस्टचे, नॅव्हिगेशन, अभिमान, आहे, अशी, पाखरे, येती, आता, भेट, देणारे, पाहुणे, ताजे, दवबिंदू, वाचकांना, आवडलेले, वर्गीकरण, कालानुक्रमे, वाचकांची, प्रतिक्रिया, कुण्या, गावाच, आल, पाखरू, मला, खुणावणारे, मराठी, पेपर्स, विरंगुळा, उचलेगिरीस, सक्त, मनाई, मी, ऑरकुटवर, डिरेक्टरी, flickr, photos, देवेन,
Text of the page (most frequently used words):
खेळ (61), आहे (37), ह्या (24), आणि (23), आहेत (20), अँग्री (16), ह्यात (16), 2010 (12), 2013 (12), तसेच (12), आपल्याला (11), च्यावर (10), 2011 (10), आता (10), कँडी (10), काही (10), आपण (9), टेम्पल (9), #दवबिंदु (8), तुमच्या (8), इथे (8), गुगल (8), बर्डस (8), करून (8), नाही (8), तुम्ही (8), wordpress (7), com (7), करा (7), जास्त (7), तुम्हाला (7), खेळात (7), पुढे (7), असा (7), अनेक (7), सुरु (6), मला (6), 2012 (6), 2009 (6), डिसेंबर (6), त्या (6), उपलब्ध (6), भाग (6), प्रकरण (6), शक्ती (6), this (5), काय (5), the (5), फक्त (5), मध्ये (5), असते (5), शकतो (5), स्वँपी (5), davbindu (4), मराठी (4), review (4), भेट (4), जुलै (4), नोव्हेंबर (4), जानेवारी (4), अशी (4), वॉटर (4), खांब (4), क्रिकेट (4), असलेला (4), डाउनलोड (4), होते (4), कारण (4), सुरुवातीला (4), इथून (4), अश्या (4), हळूहळू (4), प्ले (4), सगळ्या (4), त्यांच्या (4), सगळ्यात (4), पूर्ण (4), होतो (4), विविध (4), बाजूला (4), व्यसन (4), लागले (4), comments (3), report (3), blog (3), अधिक (3), अशेरीभाईंची (3), मांडला (3), विक्रम (3), देवेंद्र (3), चुरी (3), ऑगस्ट (3), सप्टेंबर (3), ऑक्टोबर (3), मार्च (3), जून (3), मनोरंजन (3), देणारे (3), व्हेअर (3), माय (3), गेम (3), मोबाईल (3), नवा (3), रोप (3), अँड्रॉइड (3), डोक्याला (3), म्हणजे (3), किंवा (3), खेळा (3), खेळांना (3), वरील (3), सुंदर (3), करू (3), असेल (3), झाला (3), पहिल्यापासून (3), दूर (3), त्याला (3), तरी (3), अडथळ्यांपासून (3), सर्वात (3), रस्त्यात (3), खेळही (3), होणाऱ्या (3), पक्षांच्या (3), बर्ड (3), डाऊनलोड (3), लोकप्रिय (3), तुमचा (3), प्रत्येक (3), पातळ्या (3), खेळण्यासाठी (3), बदक (3), खाली (3), पाणी (3), नंतर (3), तीन (3), धावत (3), सर्व (3), पळा (3), site (2), नाव (2), required (2), join (2), other (2), subscribers (2), घ्या (2), ब्लॉग (2), टिव (2), सामना (2), लोकसत्ता (2), तरुण (2), सिनेमा (2), माझ्या (2), कविता (2), उधाण (2), भुंगा (2), साराभाई (2), फेब्रुवारी (2), एप्रिल (2), महिना (2), कालानुक्रमे (2), uncategorized (2), सामाजिक (2), माहिती (2), माझ्याबद्दल (2), भटकंती (2), तंत्रज्ञान (2), बॉक्स (2), https (2), लेख (2), दवबिंदू (2), अभिमान (2), हॅपी (2), फॉल (2), स्पीड (2), मोटो (2), सापशिडी (2), संत्रे (2), लिंबू (2), विषामृत (2), विटी (2), दांडू (2), लुडो (2), लगोरी (2), लंगडी (2), बॉटल (2), शुटर (2), बुद्धीबळ (2), फ्रूट (2), निन्जा (2), पत्ते (2), पकडापकडी (2), व्यापार (2), ड्रॉप (2), डूडल (2), जंप (2), टीपीटीपी (2), टीप (2), टॉप (2), चोर (2), पोलीस (2), गोट्या (2), रेसर (2), आयफोन (2), posted (2), राहिले (2), इंडस्ट्री (2), गेम्स (2), लाखो (2), खेळांच (2), काळ (2), झाली (2), खेळायला (2), कुठे (2), कसा (2), लहान (2), लागू (2), सुद्धा (2), साधे (2), ट्राय (2), शकता (2), खेळून (2), कंटाळा (2), येत (2), प्लेवरून (2), चालना (2), नोम (2), असणारे (2), लेव्हल (2), परत (2), कँडीला (2), घेऊन (2), जातात (2), असतात (2), सोपा (2), डोक (2), खाजवायला (2), पाडतो (2), वाचत (2), वाट (2), जगतात (2), अँड्रॉइडन (2), माझा (2), आवडता (2), पहिला (2), स्वत (2), च्या (2), चार (2), टील्ट (2), उड्या (2), मारत (2), होतात (2), पडण्यापासून (2), असणाऱ्या (2), स्क्रिन (2), कधीही (2), संपणारा (2), वेगवेगळ्या (2), प्लेवर (2), चकटफू (2), विचार (2), चला (2), बघा (2), समीकरण (2), उलटी (2), डुकरांना (2), बर्डसचे (2), स्पेस (2), संगणक (2), खेळाने (2), तयार (2), मदतीने (2), इतका (2), असलेले (2), बॅग (2), गेले (2), राज्यात (2), माध्यमातून (2), जातो (2), होता (2), अजून (2), पक्षी (2), किती (2), जोर (2), शिरला (2), वरून (2), अगदी (2), ह्यातील (2), एकूण (2), मुक्त (2), जशी (2), पुढील (2), एका (2), करत (2), पोहोचवायच (2), रबरी (2), इतर (2), आवश्यक (2), मिस्ट्री (2), दुसरा (2), असत (2), पाच (2), तिसरा (2), क्रँन्की (2), स्टोरी (2), सगळी (2), पातळ्यांची (2), दोन (2), संपतो (2), लाखाहून (2), अतिशय (2), वाचून (2), राक्षस (2), येतात (2), येते (2), दिशेला (2), बोट (2), फिरवा (2), जाण्यासाठी (2), छोटी (2), करायची (2), गोळा (2), पात्र (2), सक्रिय (2), म्हणजेच (2), खेळलोय (2), महत्वाची (2), असून (2), त्यावरील (2), खेळांची (2), होण्यात (2), हातात (2), टीवी (2), धरू (2), आपल्या (2), आठवणी (2), वाढ (2), खेळांमुळे (2), वाढते (2), शिकवतात (2), सात (2), here (2), see (2), concert (2), sydney (2), opera (2), house (2), people (2), about (2), for (2), देवेन (2), करूया, design, like, with, वेबसाईट, ईमेल, write, comment, loading, collapse, bar, content, लॉग, साइन, manage, subscriptions, view, reader, गोपनियता, have, account, log, now, sign, 141, subscribed, देणगी, सबस्क्राइब, फोटो, flickr, photos, डिरेक्टरी, 100, tweets, http, www, orkut, main, profile, uid, 2558415042811304899, ऑरकुटवर, उचलेगिरीस, सक्त, मनाई, मायबोली, वर्ल्ड, माती, मनोगत, नेटभेट, उपक्रम, विरंगुळा, सकाळ, लोकमत, महाराष्ट्र, टाईम्स, बातम्या, कॉम, भारत, केसरी, पेपर्स, हरकत, नाय, कॅनव्हास, सहजच, मोगरा, फ़ुलला, मैथीली, थिंक्स, माझी, सह्यभ्रमंती, माझिया, मना, माऊ, मनाचे, बांधकाम, मनमौजी, वार्, याचे, भानस, भट्कंती, unlimited, बाबाची, भिंत, प्रकाशरानातून, चालतांना, डोक्यात, भुणभुणणारा, वाटेल, अभिलेख, अब्द, शब्द, अनुक्षरे, ऐसी, अक्षरे, मेळविन, खुणावणारे, कुण्या, गावाच, पाखरू, shree, korde, yashwant, महाराष्ट्राचा, एव्हरेस्ट, ऑफबीट, वाटेने, किल्ला, कोहोजचा, मिशन, तांदुळवाडी, sneha, patel, neha, mahale, मीच, देवा, sandeep, gavali, पाऊस, पडत, असताना, मॅड, अस्सल, सोलापुरी, sanjay, patil, वाचकांची, प्रतिक्रिया, निवडा, व्यक्ति, आणी, वल्ली, ललित, पुस्तक, पाउस, चारोळी, काहीतरी, कथा, इतिहास, इडीअट, आरोग्य, अर्थविश्व, अनुवाद, वर्गीकरण, ब्लॉगवर, लावण्यासाठी, खालील, कोड, कॉपी, पेस्ट, href, target, _blank, img, src, files, davbindu01, 125, jpg, वाचकांना, आवडलेले, क्यामेरा, साथभी, गवाँरा, नही, करायचे, ताजे, पाहुणे, 262, 082, भेटी, पाखरे, येती, 905, जोड़ा, email, address, ब्लॉगवरील, लिखाण, मेलद्वारे, मागवण्यासाठी, विरोपाचा, पत्ता, दया, शोधा, older, posts, पोस्टचे, नॅव्हिगेशन, tagged, temple, run, ios, google, play, games, doodle, jump, cut, rope, cricket, विडियो, angry, birds, android, कालाय, तस्मै, नमः, नुसते, नाहीयेत, करिअरचा, पर्याय, म्हणूनही, समोर, येतोय, कोट्यवधींची, उलाढाल, असलेली, जपान, युरोपातील, देशात, सिनेमापेक्षाही, कमाई, देणारी, ठरली, लोकांना, ह्यातून, रोजगार, मिळतोय, सगळ्यांना, खुलं, आमंत्रण, असतं, हव्या, तऱ्हेचा, असतो, रेसिंग, अँक्शन, अॅडवेंचर, खाद्य, स्ट्रॅटेजी, पझल्स, वेळ, पाळायच, बंधन, रात्र, फुटबॉल, खेळणार, मैदान, जागाच, शिवाय, कधी, खेळायचा, तुमच्यावर, घरी, बसून, कंटाळलात, आरामात, पीसी, लॅपटॉपवर, प्रवास, बोअर, करतोय, मोबाईलवर, लहानांसाठी, संकल्पनाच, उरलेली, वयाची, वयस्कर, बायका, पोर, थोर, सगळ्यांनाच, याचं, वेड, लागलंय, खेळांप्रमाणेच, तेच, छोटेमोठे, १३४, एकाच, ठेवा, देणारा, छोट्या, हावरट, राक्षसाला, पुरवत, राहाणं, खेळाचा, उद्देश, लावलेल्या, दोऱ्यांवरुन, बोटं, फिरवून, दोऱ्या, तोडायच्या, नोमपर्यंत, पोहोचवायच्या, धागे, तोडताना, स्टार्स, घ्यायला, विसरायचं, मधल्या, काट्यांपासून, लांब, ठेवायची, कँडीचा, काट्यांना, स्पर्श, हवेचे, बुडबुडे, वरवर, बुडबुड्यांबरोबर, उडवण्यासाठी, हवेच्या, पिशव्याही, आपली, कोळ्यांपासून, वाचवायला, हवी, कोळी, खातात, मध्येमध्ये, विजेचे, स्पार्क्सही, स्पर्शजरी, वाटत, असला, तेव्हा, सगळया, खायला, द्यायची, बघतोय, द्याल, शिरायच्या, आधीपासून, नोकीयावर, खेळत, व्हायच्या, आधीचा, विकत, घेतलेलाही, यायच्या, आधीपर्यंत, डाउनलोड्सचे, नावावर, असणारा, पायाचा, डूड्लर, आडव्या, उभ्या, हलणार्यां, तुटणाऱ्या, पायऱ्यांवर, न्यायच, अधूनमधून, कमी, वेळात, अंतर, कापण्यासाठी, स्प्रिंग, जेटपॅक, रॉकेट, सोयीही, सांभाळताना, राक्षसांपासून, यूएफओ, काळ्या, विवरांपासून, वाचायचं, राक्षसांना, टॅप, गोळ्या, मारून, संपवू, प्रमाणे, थीम, वापरून, डूड्लरचा, लुक, खेळाच, बॅकग्राउंड, बदलु, दिवसापूर्वीपर्यंत, कसला, करता, डूड्लच्या, जगात, बर्डसचेच, निर्माते, रोवियो, यांनी, बनवलेला, बॅड, पिगीज, मजेदार, थोडी, उडणाऱ्या, रोल, स्पीन, क्रॅश, उपकरणांतून, अंड्यापर्यंत, पोहचवायच, रियो, सिजन्स, स्टारवॉर्स, वर्जन्स, गेली, प्लॅटफॉर्मवर, वर्जन्सच्या, बिलीयन्सपेक्षा, मिळवण्याचा, चमत्कार, केला, ह्यातला, करण्यात, आलाय, चक्क, नासा, बच्चेकंपनीत, चित्र, शर्ट, स्कूल, कंपासपेटी, बर्डसच्या, बाहुल्या, त्यावर, आधारित, मार्केटमध्ये, सहज, खपून, कधीतरी, असाच, आल्यावर, शिरा, रागाच्या, स्ट्रेस, निघून, कसे, ताजेतवाने, अनुभवा, मोबाईलमध्ये, नसेल, पटकन, उतरवून, म्हणाव, खेळाबद्दल, मोठी, क्रांती, घडवून, आणणारा, आतापर्यंत, झालेला, जवळजवळ, सगळ्याच, फोन्समध्ये, विभागात, गेलात, दिसतो, कॉमन, त्यांची, अंडी, डुकरांनी, चोरली, म्हणून, झाले, त्यांना, धडा, शिकवायचा, पक्षाच, वेगळी, ताकद, समजून, बेचकीच्या, कितीचा, कोन, वापरायचा, लावायचा, ठरवून, दिलेलं, टास्क, करायचं, एकदा, तिथे, चांगलेच, गुंग, खेळाला, अँडिक्ट, मुलांच्या, देत, त्यांच, करण्याची, कामगिरी, चोख, बजावतो, तुम्हीही, सोनू, मोनुला, द्या, मोठा, खेळातील, लॉजिक, नुसार, प्रकरणात, २००, भागात, पहिल, मिट, रबराची, मिळवाल, त्याप्रमाणे, संख्येनुसार, होत, नावाच्या, शहराच्या, राहणाऱ्या, मगरीला, अडथळे, आंघोळीसाठी, त्याबरोबरच, स्वँपीसाठी, वस्तूही, मिळवायच्या, विज्ञानाच, प्राथमिक, ज्ञान, असण, भागही, सारखाच, स्वँपीपर्यंत, पोहोचवण्याबरोबरच, मिळवण, पातळी, होण्यासाठी, प्रत्येकात, क्रँन्कीच्या, जेवणावरील, अल्गी, करण्यासाठी, पाण्याएवजी, अॅसिड, क्रँन्कीपर्यंत, प्रत्यकी, भागाबरोबरच, लॉस्ट, लेवल्स, बोनस, दिलेला, रनच, लागण्याआधी, डिस्नेने, केलेला, चांगलाच, लावणारा, ह्यातल्या, झाल्या, बरोबर, व्यसनही, संपते, डक्स, रनच्या, यशामुळे, त्याच्याशी, साधर्म्य, प्लेस्टोर, आढळतात, त्यापैकी, खेळायचाच, करु, एजंट, डॅश, सबवे, सर्फर, फेसबुकवर, सुमारे, जणांनी, पसंती, दर्शवलेली, आलेल्या, नव्या, पहिल्या, दिवसात, वेळा, होऊन, गेमिंगमध्ये, वेगळाच, उच्चांक, गाठला, ग्राफिक्स, ५००, वाटेत, येणाऱ्या, सतत, रहायचं, जरा, अडकलात, मागचे, पकडून, लागलीच, फडशा, पाडतात, संपल्यावर, ज्या, कारणाने, कारणाला, अनुसुरून, मनोरंजक, वाक्य, लिहून, वाचायला, खरोखर, मजा, उजव्या, डाव्या, वळण्यासाठी, तसच, उडी, मारण्यासाठी, पुढच्या, झोपून, खालच्या, फिरवाव, लागत, आजूबाजूला, फोन, असतांना, वेगवेगळी, ध्येय, मिळणारी, पिवळ्या, रंगाची, नाणीही, त्यांच्याद्वारे, प्राप्त, घेता, नाण्यांचा, रंग, किमतीप्रमाणे, वाढून, लाल, निळा, नाण्यांबरोबरच, इतरही, मिळतात, अदृश्य, होण्याची, नाण्यांच, चुंबक, अतिजलद, धाव, नाण्यांची, संख्या, किंमत, वाढवायची, मिळवलेल्या, नाण्यांद्वारे, काळासाठी, आपल्याकडे, ठेऊ, नाण्यांनी, जीवदान, पंख, जातांना, नाणी, करणही, तितकच, महत्वाच, जाता, अडथळ्यांच, प्रमाण, तीव्रता, वेग, वाढत, धावता, लावलेला, खेळातल, पुरातन, मंदिरातून, जुनी, मूर्ती, चोरून, मंदिराबाहेर, पडता, भयंकर, माकडरुपी, मागे, लागतात, वैधानिक, सूचना, नमूद, केलेले, अँड्रॉइडमार्केटवर, खरोखरच, तेही, लिहलेल्या, माहितीशी, त्यांचा, वास्तव, संबध, असले, व्यसनी, त्यामुळे, वेळेबरोबरच, डोळ्यांचीही, पुरती, शकते, सदर, नुकसानाला, जबाबदार, राहणार, ह्याची, नोंद, घ्यावी, महिन्यापूर्वीच, झालो, अॅप्स, बरोबरच, खेळांनी, मनाला, भुरळ, घातली, खेळांपासून, बराच, राहिलेलो, महिने, मनसोक्त, खेळलेल्या, खेळांतील, आवडलेल्या, ओळख, देतोय, काळानुसार, हरवायला, क्रिकेटने, नामशेष, महत्वाचा, वाटा, उचलला, क्रिकेटचाच, बॅट, सचिन, समजू, लागला, लावणारे, व्हिडिओ, आले, मैदानातला, घरच्या, सुपरमारियो, पॅकमन, कॉनट्रा, हंट, असे, फेर, सर्वसामान्यांच्या, आवाक्याबाहेर, घरोघरी, येऊ, बर्याच, ऑनलाईन, गर्दी, स्टेशन, एक्स, पेशल, खेळाची, उपकरण, आली, नथिंग, परमनंट, उक्तीप्रमाणे, खेळांमध्ये, झालेले, बदल, संक्रमण, पिढीने, अनुभवलं, राज्य, गुरुत्वाकर्षण, गती, दिशा, सेंसर्स, सेन्सिटिव, ह्यांसारखे, प्रत्यक्ष, खेळलो, ह्याचा, सार्थ, ह्यातले, बरेचसे, काढण्यासाठीच, बाकी, शालेय, अभ्यासाबरोबरच, मुलांची, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, जडण, घडण, भूमिका, बजावतात, मैदानी, शरिरास, व्यायाम, मिळतो, काहीं, संघभावना, वाढीस, लागते, नेतृत्व, गुणाची, कल्पकता, निर्णयक्षमता, नियम, पाळायला, पराभव, पचवायला, ज्याची, आयुष्यात, नितांत, गरज, मनावरील, ताण, नाहीसा, ताजतवान, करतात, तुमच, एकदम, कृष्णधवल, काळात, इस्टमनकलरयुगात, नक्कीच, गेल, यायचं, महिन्यात, झालाय, हरवलात, जुन्या, आठवणीत, खरच, नॉस्टॅल्जिक, टाकतात, बालपणीच्या, खेळांच्या, टॅम्प्लीज, साखळी, लपाछपी, रेडीका, रमी, मेंढीकोट, तीनपत्ते, चॅलेंज, डॉंकी, मंकी, गुलामचोर, किलबिल, बदाम, पत्त्यांचे, बंगले, कागदाची, विमान, होड्या, नागाफफू, डोंगर, डोंगराला, लागली, खोखो, मामाच, पत्र, भोवरा, कांदा, फोडी, हुश्श, click, complete, hall, holds, 700, was, viewed, times, were, would, take, sold, out, performances, that, many, 000, excerpt, stats, helper, monkeys, prepared, annual, ब्लॉगर, मित्र, मैत्रीणी, पद्य, गाणी, भावलेली, इतरत्र, मटा, मुखपृष्ठ, सामग्री, वगळा, मेनू,
Text of the page (random words):
दवबिंदु देवेन दवबिंदु देवेन मेनू सामग्री वगळा मुखपृष्ठ मटा मध्ये लोकसत्ता मध्ये सामना मध्ये इतरत्र गाणी मला भावलेली पद्य ब्लॉगर मित्र मैत्रीणी भटकंती माझ्याबद्दल लोकप्रिय 2013 in review the wordpress com stats helper monkeys prepared a 2013 annual report for this blog here s an excerpt the concert hall at the sydney opera house holds 2 700 people this blog was viewed about 25 000 times in 2013 if it were a concert at sydney opera house it would take about 9 sold out performances for that many people to see it click here to see the complete report डिसेंबर 31 डिसेंबर 31 2013 by देवेंद्र चुरी posted in uncategorized comments खेळ मांडला लगोरी विटी दांडू क्रिकेट गोट्या खांब खांब पकडापकडी टॅम्प्लीज साखळी लपाछपी रेडीका चोर पोलीस विषामृत टीपीटीपी टीप टॉप लंगडी संत्रे लिंबू बुद्धीबळ सापशिडी नवा व्यापार लुडो पत्ते रमी मेंढीकोट तीनपत्ते चॅलेंज डॉंकी मंकी सात आठ पाच तीन दोन गुलामचोर किलबिल बदाम सात पत्त्यांचे बंगले कागदाची विमान होड्या नागाफफू डोंगर का पाणी डोंगराला आग लागली पळा पळा पळा खोखो मामाच पत्र भोवरा कांदा फोडी हुश्श काय ही सगळी नाव वाचून तुमच मन एकदम कृष्णधवल काळात नाही पण इस्टमनकलरयुगात नक्कीच गेल असेल हो ना ह्या सगळ्या खेळांना उधाण यायचं ते मे महिन्यात आणि आता मे महिना सुरु झालाय काय परत हरवलात ना जुन्या आठवणीत खरच अगदी नॉस्टॅल्जिक करून टाकतात ह्या बालपणीच्या खेळांच्या आठवणी हे आणि ह्यांसारखे अनेक खेळ मी प्रत्यक्ष खेळलो आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे कारण ह्यातले बरेचसे खेळ आता फक्त अश्या आठवणी काढण्यासाठीच बाकी राहिले आहेत हे खेळ शालेय अभ्यासाबरोबरच मुलांची शारीरिक सामाजिक मानसिक वाढ तसेच बौद्धिक जडण घडण होण्यात महत्वाची भूमिका बजावतात मैदानी खेळांमुळे शरिरास व्यायाम मिळतो काहीं खेळांमुळे संघभावना वाढीस लागते नेतृत्व गुणाची वाढ होते कल्पकता वाढते निर्णयक्षमता वाढते खेळ आपल्याला नियम पाळायला शिकवतात तसेच पराभव पचवायला शिकवतात ज्याची पुढील आयुष्यात आपल्याला नितांत गरज असते हे खेळ आपल्या मनावरील ताण नाहीसा करून आपल्याला ताजतवान करतात पण काळानुसार वरील अनेक खेळ हळूहळू हरवायला लागले क्रिकेटने अनेक खेळांना नामशेष होण्यात महत्वाचा वाटा उचलला प्रत्येक जण फक्त क्रिकेटचाच विचार करत हातात बॅट हातात घेऊन स्वत ला सचिन समजू लागला पुढे व्यसन लावणारे टीवी व्हिडिओ गेम आले मैदानातला खेळ घरच्या टीवी मध्ये शिरला सुपरमारियो पॅकमन कॉनट्रा डक हंट असे खेळ फेर धरू लागले मग सुरुवातीला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले संगणक घरोघरी येऊ लागले मग त्यावरील विविध खेळ जोर धरू लागले बर्याच ऑनलाईन खेळांची गर्दी झाली पुढे प्ले स्टेशन एक्स बॉक्स अशी पेशल खेळाची उपकरण आली नथिंग इज परमनंट ह्या उक्तीप्रमाणे खेळांमध्ये हळूहळू झालेले हे बदल संक्रमण आपल्या पिढीने अनुभवलं आणि आता राज्य आल आहे ते अँड्रॉइड आणि आयफोन वरील गुरुत्वाकर्षण गती दिशा अशी सेंसर्स असणाऱ्या टच सेन्सिटिव खेळांच तर काही महिन्यापूर्वीच मी अँड्रॉइडन झालो आणि त्यावरील विविध अॅप्स बरोबरच विविध खेळांनी मनाला भुरळ घातली खेळांपासून बराच काळ दूर राहिलेलो मी गेले काही महिने मनसोक्त खेळ खेळ खेळलोय तर मी खेळलेल्या खेळांतील मला आवडलेल्या काही खेळांची मी इथे तुम्हाला ओळख करून देतोय वैधानिक सूचना खाली नमूद केलेले सर्व खेळ हे अँड्रॉइडमार्केटवर खरोखरच तेही चकटफू उपलब्ध असून इथे लिहलेल्या सर्व माहितीशी त्यांचा वास्तव संबध आहे हे सर्व खेळ साधे असले तरी अतिशय व्यसनी असून त्यामुळे तुमच्या वेळेबरोबरच तुमच्या डोळ्यांचीही पुरती वाट लागू शकते सदर नुकसानाला दवबिंदु जबाबदार राहणार नाही ह्याची नोंद घ्यावी टेम्पल रन मला सगळ्यात जास्त व्यसन लावलेला किंवा मी सर्वात जास्त खेळलोय असा हा खेळ तुम्ही म्हणजेच खेळातल पात्र एका पुरातन मंदिरातून एक महत्वाची जुनी मूर्ती चोरून मंदिराबाहेर पडता आणि भयंकर माकडरुपी राक्षस तुमच्या मागे लागतात आणि सुरु होतो टेम्पल रन कधीही न संपणारा असा हा खेळ आहे वाटेत येणाऱ्या अडथळ्यांपासून वाचून तुम्हाला सतत धावत रहायचं आहे कुठे जरा अडकलात कि मागचे राक्षस तुम्हाला पकडून तुमचा लागलीच फडशा पाडतात ह्यात खेळ संपल्यावर ज्या कारणाने खेळ संपतो त्या कारणाला अनुसुरून मनोरंजक वाक्य लिहून येतात जी वाचायला खरोखर मजा येते ह्यात उजव्या आणि डाव्या बाजूला वळण्यासाठी त्या दिशेला बोट स्क्रिन वर फिरवा तसच उडी मारण्यासाठी पुढच्या बाजूला तर खाली झोपून जाण्यासाठी खालच्या बाजूला बोट फिरवाव लागत आजूबाजूला जाण्यासाठी फोन त्या दिशेला टील्ट करा फिरवा आणि अस धावत असतांना वेगवेगळी छोटी छोटी ध्येय आपल्याला पूर्ण करायची असतात तसेच रस्त्यात मिळणारी पिवळ्या रंगाची नाणीही आपण गोळा करायची कारण त्यांच्याद्वारे आपल्याला पुढे वेगवेगळ्या शक्ती प्राप्त करून घेता येतात पुढे ह्या नाण्यांचा रंग त्यांच्या किमतीप्रमाणे वाढून लाल निळा असा होतो ह्या नाण्यांबरोबरच रस्त्यात तुम्हाला इतरही शक्ती मिळतात ह्यात अदृश्य होण्याची शक्ती नाण्यांच चुंबक अतिजलद धाव नाण्यांची संख्या व किंमत वाढवायची शक्ती अश्या शक्ती आहेत आपण मिळवलेल्या नाण्यांद्वारे आपण ह्या शक्ती जास्त काळासाठी आपल्याकडे ठेऊ शकतो तसेच नाण्यांनी आपण खेळात इतर पात्र सक्रिय करू शकतो तसेच पडण्यापासून जीवदान देणारे पंख सक्रिय करू शकतो म्हणजेच एकूण अडथळ्यांपासून वाचत धावत जातांना नाणी गोळा करणही तितकच महत्वाच आहे आणि जस जस तुम्ही पुढे पुढे जाता अडथळ्यांच प्रमाण आणि तीव्रता तसेच तुमचा वेग वाढत जातो तर बघा तुम्हाला किती धावता येते ते हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा फेसबुकवर टेम्पल र न ला सुमारे ७५ लाखाहून अधिक जणांनी पसंती दर्शवलेली आहे तर टेम्पल रन २ ह्या त्यांच्या नंतर आलेल्या नव्या खेळाने पहिल्या १३ दिवसात ५०० लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड होऊन मोबाईल गेमिंगमध्ये एक वेगळाच उच्चांक गाठला आहे टेम्पल रन २ च ग्राफिक्स अतिशय सुंदर आहे टेम्पल रनच्या यशामुळे त्याच्याशी साधर्म्य असणारे अनेक खेळ आपल्याला प्लेस्टोर वर आढळतात त्यापैकी खेळायचाच असेल तर सबवे सर्फर आणि एजंट डॅश हे खेळ तुम्ही ट्राय करु शकता व्हेअर इज माय वॉटर टेम्पल रनच व्यसन लागण्याआधी माझा सर्वात आवडता खेळ होता तो व्हेअर इज माय वॉटर डिस्नेने तयार केलेला हा खेळही चांगलाच व्यसन लावणारा आहे पण ह्यातल्या सगळ्या पातळ्या पूर्ण झाल्या कि खेळ संपतो आणि बरोबर व्यसनही संपते ह्या खेळात तीन भाग आहेत पहिला स्वँपी दुसरा मिस्ट्री डक्स आणि तिसरा क्रँन्की स्टोरी स्वँपी हा ह्यातील सगळ्यात मोठा भाग ह्यात खेळातील लॉजिक नुसार १० प्रकरण आहेत प्रत्येक प्रकरणात २० अश्या एकूण २०० पातळ्या ह्या भागात आहेत पण सुरुवातीला फक्त ह्यातील पहिल प्रकरण मिट स्वँपी हे खेळण्यासाठी मुक्त असते जशी जशी तुम्ही रबराची बदक मिळवाल त्याप्रमाणे त्यांच्या संख्येनुसार पुढील प्रकरण खेळण्यासाठी मुक्त होत जातात ह्यात आपल्याला स्वँपी नावाच्या शहराच्या खाली राहणाऱ्या एका मगरीला विविध अडथळे दूर करत आंघोळीसाठी पाणी पोहोचवायच आहे त्याबरोबरच रबरी बदक व स्वँपीसाठी इतर वस्तूही मिळवायच्या आहेत सुरुवातीला सोपा असलेला हा खेळ नंतर नंतर आपल्याला डोक खाजवायला भाग पाडतो हा खेळ खेळण्यासाठी विज्ञानाच प्राथमिक ज्ञान असण आवश्यक आहे मिस्ट्री डक हा दुसरा भागही स्वँपी सारखाच आहे फक्त ह्यात पाणी स्वँपीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच रबरी बदक मिळवण हे ती पातळी पूर्ण होण्यासाठी आवश्यक असत ह्यात पाच प्रकरण आहेत व प्रत्येकात २० पातळ्या आहेत तिसरा भाग म्हणजे क्रँन्की स्टोरी ह्यात सगळी समीकरण उलटी होतात कारण ह्यात आपल्याला क्रँन्कीच्या जेवणावरील अल्गी बाजूला करण्यासाठी पाण्याएवजी अॅसिड क्रँन्कीपर्यंत पोहोचवायच असत ह्यात प्रत्यकी २० पातळ्यांची चार प्रकरण आहेत ह्या तीन भागाबरोबरच ह्या खेळात दि लॉस्ट लेवल्स हा अजून एक बोनस भाग दिलेला आहे ह्यात १० १० पातळ्यांची दोन प्रकरण आहेत लहान मुलांच्या डोक्याला चालना देत त्यांच मनोरंजन करण्याची कामगिरी हा खेळ अगदी चोख बजावतो तर तुम्हीही खेळा तुमच्या सोनू मोनुला ही खेळायला द्या हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा अँग्री बर्डस अँग्री बर्डस काय म्हणाव ह्या खेळाबद्दल सगळ्यात लोकप्रिय असा हा खेळ खेळ जगतात मोठी क्रांती घडवून आणणारा हा खेळ गुगल प्लेवर आतापर्यंत सगळ्यात जास्त डाऊनलोड झालेला हा खेळ आता जवळजवळ सगळ्याच फोन्समध्ये खेळ विभागात गेलात तर हा खेळ दिसतो इतका कॉमन झाला आहे हा अँग्री बर्डस तर काय आहे ह्या खेळात खेळात आहेत काही पक्षी त्यांची अंडी काही डुकरांनी चोरली आहेत आणि म्हणून हे पक्षी अँग्री झाले आहेत त्यांना आता तुमच्या मदतीने त्या डुकरांना धडा शिकवायचा आहे ह्यात प्रत्येक पक्षाच वेगळी ताकद असते ती समजून बेचकीच्या माध्यमातून कितीचा कोन वापरायचा किती जोर लावायचा हे ठरवून दिलेलं टास्क पूर्ण करायचं असते पण एकदा का आपण ह्या पक्षांच्या राज्यात शिरला कि तिथे आपण चांगलेच गुंग होतो आणि हळूहळू ह्या खेळाला अँडिक्ट होतो अँग्री बर्डसचे अँग्री बर्डस अँग्री बर्डस रियो अँग्री बर्ड सिजन्स अँग्री बर्ड स्पेस आणि अँग्री बर्डस स्टारवॉर्स अशी अनेक वर्जन्स हळूहळू येत गेली गुगल प्ले आय ओ एस तसेच संगणक ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या वर्जन्सच्या एक बिलीयन्सपेक्षा जास्त डाऊनलोड मिळवण्याचा चमत्कार ह्या खेळाने केला आहे ह्यातला अँग्री बर्ड स्पेस हा खेळ तर तयार करण्यात आलाय तो चक्क नासा च्या मदतीने बच्चेकंपनीत तर हा खेळ इतका लोकप्रिय आहे कि अँग्री बर्डसचे चित्र असलेले लाखो टी शर्ट वॉटर बॅग स्कूल बॅग कंपासपेटी तसेच अँग्री बर्डसच्या बाहुल्या व त्यावर आधारित अनेक खेळ मार्केटमध्ये सहज खपून गेले कधीतरी असाच कंटाळा आल्यावर ह्या पक्षांच्या राज्यात शिरा त्यांच्या रागाच्या माध्यमातून तुमचा स्ट्रेस कसा निघून जातो आणि तुम्ही कसे ताजेतवाने होता हे अनुभवा जर अजून हा खेळ तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर चला पटकन इथून उतरवून घ्या अँग्री बर्डसचेच निर्माते रोवियो यांनी बनवलेला बॅड पिगीज हा मजेदार खेळही तुम्ही खेळून बघा ह्यात समीकरण थोडी उलटी आहेत उडणाऱ्या रोल होणाऱ्या स्पीन होणाऱ्या क्रॅश होणाऱ्या उपकरणांतून तुम्हाला डुकरांना पक्षांच्या अंड्यापर्यंत पोहचवायच आहे हा खेळ इथे उपलब्ध आहे डूडल जंप मी अँड्रॉइड जगतात शिरायच्या आधीपासून माझ्या नोकीयावर खेळत असलेला आणि अँड्रॉइडन व्हायच्या आधीचा माझा सर्वात आवडता असा हा खेळ तसेच मी विकत घेतलेलाही हा पहिला खेळ अँग्री बर्डस यायच्या आधीपर्यंत डाउनलोड्सचे अनेक विक्रम स्वत च्या नावावर असणारा असा हा खेळ ह्यात एक चार पायाचा डूड्लर आहे आपल्याला मोबाईल टील्ट करून त्याला आडव्या उभ्या हलणार्यां तुटणाऱ्या पायऱ्यांवर उड्या मारत वर वर न्यायच आहे ह्यात अधूनमधून कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी स्प्रिंग जेटपॅक व रॉकेट अश्या सोयीही उपलब्ध होतात पडण्यापासून सांभाळताना रस्त्यात असणाऱ्या राक्षसांपासून तसेच यूएफओ काळ्या विवरांपासून ही आपल्याला वाचायचं असते राक्षसांना आपण स्क्रिन वर टॅप करून गोळ्या मारून संपवू शकतो टेम्पल रन प्रमाणे हा खेळही कधीही न संपणारा असा आहे ह्यात आपण वेगवेगळ्या थीम वापरून डूड्लरचा लुक व खेळाच बॅकग्राउंड बदलु शकतो काही दिवसापूर्वीपर्यंत ५३ ० रु ला असलेला खेळ आता गुगल प्लेवर चकटफू उपलब्ध आहे मग कसला विचार करता चला उड्या मारत ह्या डूड्लच्या जगात हा खेळ गुगल प्लेवरून इथून डाउनलोड करा कट दि रोप कट द रोप हा सुद्धा एक सुंदर व डोक्याला चालना देणारा खेळ आहे ह्या खेळात ओम नोम ह्या छोट्या हावरट राक्षसाला कँडी पुरवत राहाणं हा या खेळाचा उद्देश आहे कँडी लावलेल्या दोऱ्यांवरुन बोटं फिरवून त्या दोऱ्या तोडायच्या आहेत आणि कँडी ओम नोमपर्यंत पोहोचवायच्या आहेत धागे तोडताना मध्ये असणारे स्टार्स घ्यायला विसरायचं नाही तसेच मधल्या काट्यांपासून कँडी लांब ठेवायची कँडीचा काट्यांना स्पर्श झाला तर लेव्हल परत पहिल्यापासून सुरु होते हवेचे बुडबुडे आहेत ते कँडीला वरवर घेऊन जातात या बुडबुड्यांबरोबर कँडीला दूर उडवण्यासाठी हवेच्या पिशव्याही आहेत तसेच आपली कँडी कोळ्यांपासून वाचवायला हवी कारण हे कोळी कँडी खातात आणि पहिल्यापासून सुरु होते मध्येमध्ये विजेचे स्पार्क्सही असतात त्याला स्पर्शजरी झाला तरी लेव्हल पहिल्यापासून सुरु होते सुरुवातीला सोपा वाटत असला तरी हा खेळ पुढे डोक खाजवायला भाग पाडतो तेव्हा ह्या सगळया अडथळ्यांपासून वाचत ओम नोम ला कँडी खायला द्यायची आहे तो वाट बघतोय तुम्ही त्याला कँडी द्याल ना हा खेळ गुगल प्लेवरून इथे उपलब्ध आहे वरील खेळांप्रमाणेच ड्रॉप फ्रूट निन्जा हॅपी फॉल स्पीड मोटो कँडी रेसर बॉटल शुटर हे सुद्धा काही साधे आणि सुंदर खेळ तुम्ही ट्राय करू शकता तेच खेळ खेळून कंटाळा येत असेल तर छोटेमोठे १३४ खेळ एकाच खेळात असलेला हा खेळ डाउनलोड करून ठेवा हे खेळ आता काही नुसते खेळ राहिले नाहीयेत तो एक नवा करिअरचा पर्याय म्हणूनही समोर येतोय खेळ आता कोट्यवधींची उलाढाल असलेली एक इंडस्ट्री आहे जपान आणि युरोपातील काही देशात सिनेमापेक्षाही ही गेम्स इंडस्ट्री जास्त कमाई करून देणारी ठरली आहे लाखो लोकांना ह्यातून रोजगार मिळतोय ह्या खेळांच सगळ्यांना खुलं आमंत्रण असतं तुम्हाला हव्या त्या तऱ्हेचा खेळ इथे उपलब्ध असतो रेसिंग आहे अँक्शन आहे अॅडवेंचर आहे डोक्याला खाद्य देणारे स्ट्रॅटेजी गेम्स आहेत पझल्स आहेत इथे काळ वेळ पाळायच बंधन नाही म्हणजे रात्र झाली तर फुटबॉल क्रिकेट कस खेळणार किंवा क्रिकेट खेळायला मैदान जागाच नाही अस इथे नाही शिवाय खेळ कुठे कधी कसा खेळायचा ते तुमच्यावर आहे घरी बसून कंटाळलात आरामात पीसी किंवा लॅपटॉपवर खेळा प्रवास बोअर करतोय मोबाईलवर खेळा खेळ म्हणजे फक्त लहानांसाठी ही संकल्पनाच आता उरलेली नाही ह्या खेळांना वयाची काही अट नाही तरुण वयस्कर बायका पोर लहान थोर सगळ्यांनाच याचं वेड लागू लागलंय कालाय तस्मै नमः मे 2 मे 2 2013 by देवेंद्र चुरी posted in खेळ तंत्रज्ञान मनोरंजन माहिती tagged android angry birds अँग्री बर्डस अँड्रॉइड आयफोन कँडी रेसर कट दि रोप क्रिकेट खांब खांब खेळ गुगल पे गेम गोट्या चोर पोलीस टीपीटीपी टीप टॉप टेम्पल रन डूडल जंप ड्रॉप नवा व्यापार पकडापकडी पत्ते फ्रूट निन्जा बुद्धीबळ बॉटल शुटर मोबाईल लंगडी लगोरी लुडो विटी दांडू विडियो गेम विषामृत व्हेअर इज माय वॉटर संत्रे लिंबू सापशिडी स्पीड मोटो हॅपी फॉल cricket cut the rope doodle jump games google play ios temple run comments १ पोस्टचे नॅव्हिगेशन older posts अभिमान आहे शोधा ब्लॉगवरील लिखाण ई मेलद्वारे मागवण्यासाठी इथे तुमच्या विरोपाचा पत्ता दया email address मला जोड़ा join 905 other subscribers अशी पाखरे येती 262 082 भेटी आता भेट देणारे पाहुणे ताजे लेख 2013 in review खेळ मांडला आपण हे करायचे का क्यामेरा साथभी गवाँरा नही भेट अशेरीभाईंची दवबिंदू दवबिंदू वाचकांना आवडलेले लेख 2013 in review तुमच्या ब्लॉगवर दवबिंदु लावण्यासाठी खालील कोड कॉपी पेस्ट करा a href https davbindu wordpress com target _blank img src https davbindu files wordpress com 2011 10 davbindu01 125 jpg a वर्गीकरण अनुवाद 5 अर्थविश्व 7 आरोग्य 2 इडीअट बॉक्स 4 इतिहास 1 कथा 2 कविता 10 काहीतरी 6 खेळ 6 चारोळी 13 तंत्रज्ञान 3 पाउस 9 पुस्तक 8 भटकंती 22 मनोरंजन 20 माझ्याबद्दल 30 माहिती 24 ललित 1 व्यक्ति आणी वल्ली 13 सामाजिक 19 सिनेमा 21 uncategorized 2 कालानुक्रमे कालानुक्रमे महिना निवडा डिसेंबर 2013 1 मे 2013 1 मार्च 2013 2 फेब्रुवारी 2013 1 जानेवारी 2013 2 डिसेंबर 2012 1 नोव्हेंबर 2012 1 जुलै 2012 3 जून 2012 1 जानेवारी 2012 1 नोव्हेंबर 2011 1 ऑक्टोबर 2011 2 सप्टेंबर 2011 3 ऑगस्ट 2011 3 जुलै 2011 5 जून 2011 2 एप्रिल 2011 1 मार्च 2011 2 जानेवारी 2011 4 डिसेंबर 2010 1 नोव्हेंबर 2010 3 ऑक्टोबर 2010 3 सप्टेंबर 2010 5 ऑगस्ट 2010 6 जुलै 2010 1 जून 2010 5 मे 2010 5 एप्रिल 2010 5 मार्च 2010 5 फेब्रुवारी 2010 4 जानेवारी 2010 8 डिसेंबर 2009 1 नोव्हेंबर 2009 6 ऑक्टोबर 2009 9 सप्टेंबर 2009 8 ऑगस्ट 2009 3 जुलै 2009 19 वाचकांची प्रतिक्रिया देवेंद्र चुरी च्यावर डॉ विक्रम साराभाई sanjay patil च्यावर डॉ विक्रम साराभाई अस्सल सोलापुरी च्यावर मॅड sandeep gavali च्यावर पाऊस पडत असताना ४ neha mahale च्यावर मीच का देवा sneha patel च्यावर खेळ मांडला भेट अशेरीभाईंची दवबिंदु च्यावर मिशन तांदुळवाडी भेट अशेरीभाईंची दवबिंदु च्यावर किल्ला कोहोजचा yashwant च्यावर महाराष्ट्राचा एव्हरेस्ट सर ऑफबीट वाटेने shree korde च्यावर 2012 in review कुण्या गावाच आल पाखरू ब्लॉग मला खुणावणारे ऐसी अक्षरे मेळविन अनुक्षरे अब्द शब्द अभिलेख काय वाटेल ते डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा प्रकाशरानातून चालतांना बाबाची भिंत भट्कंती unlimited भानस भुंगा मन उधाण वार् याचे मनमौजी मनाचे बांधकाम माऊ माझिया मना माझी सह्यभ्रमंती माझ्या कविता मैथीली थिंक्स मोगरा फ़ुलला सहजच सिनेमा कॅनव्हास हरकत नाय मराठी ई पेपर्स केसरी तरुण भारत बातम्या कॉम महाराष्ट्र टाईम्स लोकमत लोकसत्ता सकाळ सामना विरंगुळा उपक्रम नेटभेट मनोगत मराठी माती मराठी वर्ल्ड मायबोली उचलेगिरीस सक्त मनाई मी ऑरकुटवर http www orkut co in main profile rl mp uid 2558415042811304899 टिव टिव tweets by davbindu davbindu wordpress com 72 100 ब्लॉग डिरेक्टरी flickr photos अधिक फोटो blog at wordpress com देणगी घ्या सबस्क्राइब करा subscribed दवबिंदु join 141 other subscribers sign me up have a wordpress com account log in now गोपनियता दवबिंदु view site in reader manage subscriptions साइन अप करा लॉग ईन report this content collapse this bar loading comments write a comment ईमेल required नाव required वेबसाईट design a site like this with wordpress com सुरु करूया
|