Meta tags:
Headings (most frequently used words):
मराठी, february, 2013, माझा, ब्लॉग, २०१०, restiscrime, नमस्कार, pages, wednesday, 27, sunday, 10, बाबा, जागवा, शिवाजी, क्षणोक्षणी, पाटीचं, पुस्तक, स्टार, मी, लेखनस्पर्धा, copyright, about, me, followers, total, pageviews, popular, posts, blog, archive, flicker, jpg, तुमच्या, ब्लॉगवर, रेस्टइजक्राइम, लावण्यासाठी, खालील, कोड, कॉपी, पेस्ट, करा, जगत, मंडळी, ब्लॉगविश्व, माझ्या, मित्रमैत्रिणी, feedjit, मित्र, पुन्हा, वाचन, आणि, चित्रपट,
Text of the page (most frequently used words):
नाही (23), आणि (22), #माझ्या (20), आपण (19), आहे (19), ह्या (17), मला (16), असते (15), मित्र (14), त्या (14), काही (13), काय (12), परंतु (12), आपल्या (12), असे (10), जाते (10), तिच्या (10), चित्रपट (9), देखील (9), म्हणून (9), आपल्याला (9), मात्र (9), माझा (8), आयुष्य (8), जेव्हा (8), कधी (8), होत (8), तिला (8), समोर (8), february (7), येते (7), पुस्तक (7), होती (7), होते (7), त्यावेळी (7), आपला (6), april (6), june (6), october (6), पुन्हा (6), म्हणजे (6), ज्या (6), share (6), तिने (6), घटना (6), त्यातील (6), सर्व (6), विचार (6), तिचे (6), स्वत (6), असा (6), माझे (5), july (5), august (5), september (5), november (5), january (5), छोट्या (5), एका (5), फक्त (5), असतो (5), घेत (5), त्यांच्या (5), करून (5), हायडी (5), असावा (5), माझी (4), झाले (4), मराठी (4), anagha (4), may (4), december (4), march (4), 2013 (4), अगदी (4), नव्हे (4), आठवणी (4), नवरा (4), इथे (4), त्याने (4), करीत (4), posts (4), त्यात (4), गेले (4), आपले (4), आहेत (4), तिथे (4), त्याच (4), आहोत (4), निर्णय (4), कुठे (4), मनात (4), स्त्री (4), लागली (4), पिओनी (4), त्याच्या (4), एखाद्या (4), समुद्र (4), blog (3), ब्लॉग (3), बाबा (3), तुमच्या (3), काम (3), प्रेम (3), घेऊन (3), आता (3), काळात (3), श्वास (3), वाटते (3), आलेला (3), बाहेर (3), आपल्यासमोर (3), तेव्हा (3), ह्याचा (3), एकेक (3), पुढे (3), उभी (3), राहू (3), मारीजान (3), दूर (3), कशी (3), आले (3), अॅनिमेशन (3), गेला (3), वेळी (3), प्रश्न (3), कळत (3), केले (3), गेलेली (3), चित्रपटाने (3), चियो (3), समज (3), आम्ही (3), आयुष्यात (3), आणून (3), theme (2), feedjit (2), वढाय (2), मोकळे (2), माणूस (2), bak (2), भिंत (2), मंडळी (2), वाचन (2), घेतलेलं (2), शिक्षण (2), पुढला (2), तोच (2), गोष्टी (2), जाऊन (2), झाली (2), झालं (2), आपलं (2), खंबीर (2), शक्ती (2), टाकते (2), केलेले (2), एकटीच (2), त्यामुळे (2), २०१० (2), home (2), pinterest (2), facebook (2), blogthis (2), email (2), this (2), comments (2), posted (2), वर्षांपूर्वी (2), झालेल्या (2), आली (2), फार (2), बरेच (2), एखादी (2), बदलून (2), नसते (2), आपल्यावर (2), अचानक (2), खोल (2), येतो (2), अजून (2), होऊ (2), कुठेतरी (2), अशा (2), स्त्रिया (2), असण्याची (2), शक्यता (2), असल्याने (2), वडिलांच्या (2), मेघना (2), फारशी (2), अनोळखी (2), वाटत (2), रोज (2), बऱ्याच (2), मुली (2), तरीही (2), नसतो (2), दिवस (2), उजाडतो (2), काल (2), पटले (2), संबंध (2), लागलेली (2), वेगाने (2), असताना (2), तेच (2), आल्यावर (2), शकत (2), वयाच्या (2), बघितली (2), शाळेमध्ये (2), प्रकारे (2), चित्रात (2), आईवडील (2), मोठी (2), ज्यावेळी (2), अतिशय (2), लेकीला (2), परदेशी (2), वाचले (2), नकळत (2), प्रथम (2), टीव्हीवर (2), दाखवली (2), सिरीज (2), बागडणारी (2), आजारी (2), गेली (2), केली (2), आम्हां (2), गेशा (2), जपानमधील (2), चित्र (2), दिले (2), त्यासाठी (2), घेतलेले (2), एकत्र (2), पान (2), जातो (2), प्रेमात (2), असणे (2), आयुष्याचे (2), स्वीकारतो (2), आलो (2), नाहीतर (2), कॉलेजमध्ये (2), वगैरे (2), टाकले (2), त्याला (2), उभा (2), करता (2), किंवा (2), असं (2), होईल (2), मनाची (2), घागर (2), आरसा (2), प्रसंग (2), स्पर्श (2), किनाऱ्यावर (2), किनारा (2), पोस्ट (2), हट्ट (2), धरला (2), ह्याची (2), झाला (2), असू (2), restiscrime (2), watermark, images, powered, blogger, merrymoonmary, live, stats, सौरभ, सांगत्ये, ऐका, सरदेसाईज, वटवट, सत्यवान, सह्यभ्रमंती, मराठा, इतिहासाची, दैनंदिनी, मनाचे, बांधकाम, मोगरा, फुलला, डोलची, आकाश, आमची, भटकंती, सिनेमास्कोप, आतल्यासहित, अपर्णा, माझिया, मना, shrirajmoré, sahajach, raindrop, ignited, mind, golf, life, coffee, break, batcheet, aur, bahot, kuch, aks, abhilekh, अभिलेख, मित्रमैत्रिणी, ब्लॉगविश्व, जगत, ब्लॉगवर, रेस्टइजक्राइम, लावण्यासाठी, खालील, कोड, कॉपी, पेस्ट, करा, http, www, jpgmag, com, people, jpg, photos, clicked, flicker, 2009, 232, 2010, 152, 2011, 2012, 2014, 2015, 2016, archive, हातात, तिसरं, पहिलं, होतं, मुलामुलींच्या, गणवेषांचं, दुसरं, पाड्याच्या, पाणी, साठव, थोडा, थोडे, जरुरत, छोट्यात, जीवाविषयी, आत्मीयता, वाटायला, हवी, माणुसकीच्या, दृष्टीतूनच, सांगावे, नेमका, जन्म, असला, मांजर, मामी, मासे, tell, you, what, त्याचं, माहितेय, तुला, कसलं, मूळव्याध, माया, मोजण्याच्या, नव्हेत, त्यांचे, अस्तित्व, सुखद, जसा, एखादा, वृक्ष, पुनर्ओळखीची, गोष्ट, वाचावे, नेट, रेस्टइजक्राइमचा, लोकसत्तामध्ये, उल्लेख, बारा, तारखेला, दहा, वर्षं, सिद्ध, गेलं, मरतबिरत, नववर्षाच्या, आरंभदिनी, कुणाविना, पाळंमुळं, खोलवर, नेणं, ताठ, मानेनं, उभं, रहाणं, सहजसाध्य, नसतच, दिवसरात्र, ऊनपावसात, नाजूक, मुळांमध्ये, येईस्तोवर, अख्खा, पिंपळ, कितीद, टूर, आजचा, तास, चित्रकलेचा, कॉलेजच्या, दिवसांत, नवऱ्याने, शरदने, काढलेली, स्केचेस, जलरंग, चित्रकला, सुरुवातीच्या, रांगोळी, काढत, सुरुवात, आईबाबांच्या, संसाराची, पाच, हजार, रुपयांची, पागडी, भरून, त्यांचं, पिढ्या, ठिपक्यांच्या, घरात, रहातो, त्याबद्दल, असतं, आपलेपणा, नीटनेटकं, दिसावं, ह्यासाठी, प्रयत्न, अकलेचा, उकिरडा, popular, total, pageviews, followers, view, complete, profile, about, copyright, लेखनस्पर्धा, स्टार, पाटीचं, जागवा, शिवाजी, क्षणोक्षणी, subscribe, atom, older, newer, मध्यंतरीच्या, बलात्कार, स्त्रीची, मुलाखत, वाचनात, वाक्य, म्हटले, सांगून, पटून, वेगळेच, नक्कीच, कोणतीही, घडते, आदळते, आरपार, छेदून, खरेच, म्हणजेच, त्यापलीकडले, कोणी, विहिरीत, ढकलून, दिल्यावर, हातपाय, मारतो, घुसमट, होताहोता, पहिला, महत्वाचा, त्यापुढील, प्रत्येक, हात, मारावयास, शिकवतो, तलाव, पोहू, लागतो, नव्या, दमाने, शक्तिशाली, शकले, काहीतरी, कमी, पडते, जगभरच्या, हळव्या, जगण्याचे, देणाऱ्या, कथा, माहितीप्रमाणे, कादंबरीवर, २००८, साली, प्रियांका, चोप्राचा, फॅशन, ह्यावरील, कादंबरी, दिसत, जाहिरातक्षेत्रात, वावरत, क्षेत्राचे, बॉलीवूडचे, नाते, ओळखीचे, आहेच, इच्छेविरुद्ध, चित्रपटात, नाव, कमावण्यासाठी, घरातून, पडलेली, मुलींबरोबर, अशाच, कुठल्या, कुठल्यातरी, शहरातून, शिकून, मुंबईत, स्थायिक, झाल्या, पार्टी, पर्सन, नसले, पार्ट्या, टाळता, येण्यासारख्या, नसतात, दारू, नृत्य, बेभान, जातं, दुसरा, रात्री, उघड्या, डोळ्यांनी, बघितलेले, स्मृतिकोषातून, कायमचे, हद्दपार, करावयाचे, काडीचाही, ठेवायचा, कुटुंबाशी, तोडून, टाकावे, व्यवसायक्षेत्राची, पायरी, चढते, घसरत, बेधुंद, अवस्थेत, माणसाबरोबर, बिछान्यात, एके, दिवशी, जाग, धक्का, बसतो, उध्वस्त, करावासा, वाटतो, प्रसंगातून, जाणीव, एकच, माणसाला, माणसांची, कुटुंबाची, मानसिक, आधाराची, गरज, त्याचे, मनोबल, भान, पाठींब्याच्या, बळावर, क्षेत्रात, पहाते, कुठलाही, अडथळा, रोखू, टाळ्यांच्या, कडकडाटात, राहिलेली, पहातच, चित्रपटगृह, सोडतो, पर्सपोलीस, सत्रपी, इराणी, मुलीच्या, कॉमिक, पुस्तकाच्या, काळ्या, पांढऱ्या, चित्रपटलातून, येतात, सहाव्या, वर्षापासून, सांगत, थेट, चौदाव्या, वर्षापर्यंत, आठवणींना, पार्श्वभूमी, इराणमधील, बदलांची, चित्रे, नीट, वेळा, प्रतीके, सापडतात, मिश्र, स्त्रियांवर, बुरखा, घेण्याची, सक्ती, करण्यात, चिमुरड्या, मैत्रिणी, बदल, कशा, स्वीकारतात, बघण्यासारखे, मध्यमवर्गीय, पुढारलेल्या, विचारांचे, सुशिक्षित, होणाऱ्या, धार्मिक, राजकीय, बदलांवर, आपापसात, चर्चा, रोजच्याच, ऐकतच, त्यातून, स्वतंत्र, करण्याची, सवय, तेहरान, मधील, परिस्थिती, इराकच्या, हल्ल्याने, अस्थिर, लाडक्या, आपल्यापासून, ठेवण्याचा, पाठवण्याचा, घेतात, त्यानंतर, वळणे, भरकटते, सावरते, चित्रातून, येत, वाटतं, मारीजानचे, बघतो, गोष्टीची, हेच, शब्दांत, इतके, परिणामकारक, पुस्तकावर, केला, बघितलेला, कामामध्ये, वापरण्याची, नेहेमीच, चित्रपटाची, युट्यूबची, लिंक, समोरच्याला, दाखवत, संपूर्ण, बघण्याचा, योग, नेहेमीप्रमाणे, मारिजानच्या, गोष्टीजागी, ठेवून, बघते, शहर, असुरक्षित, झाल्याने, पाठवेन, विचारते, उगाच, उत्तर, नकारार्थी, व्ह्यावयाचे, एकत्रच, मुलीला, युद्धप्रसंगी, जगात, एकटी, पाठवू, मनाशी, निश्चय, बऱ्याचदा, वाचलेली, पुस्तके, पाहिलेले, ह्यात, जगभरातील, त्यांच्यावरील, अन्याय, अत्याचार, स्त्रीत्वाविषयी, भूमिका, संदर्भात, कोरले, गुंफले, अन्यायाविषयी, चिंतन, सर्वात, आठवण, चिमुकल्या, आल्प्ससारख्या, बर्फाळ, प्रदेशात, आजोबांसमवेत, रहाणारी, चिमुरडी, माझ्याकडे, फारा, मोठ्या, प्रेमाने, रुसून, बसणारी, आजोबांपासून, पाठवली, गेल्याकारणाने, सतत, पडू, लेकीइतकीच, लाडकी, लेकही, वयाची, असल्याकारणाने, जीव, हायडीवरील, संकटे, बघून, तीळतीळ, तुटे, ह्यांची, तुलना, झुकते, माप, नेहेमी, पुस्तकाकडे, हायडीच्या, बाबतीत, तसे, पडद्यावर, दुसरी, लेक, दुपारी, ठरलेल्या, पुढ्यात, येई, वेदना, डोळे, दोघींचे, अश्रू, एकाच, आमच्या, गालावर, ओघळू, लागत, मेमॉयर्स, आधी, नंतर, बघितला, आतवर, नक्की, नजरेसमोर, पुस्तकात, चियोबरोबर, बालपणापासून, अनुभव, दिला, त्रयस्थच, राहिले, माझ्यासमोर, चित्ररुपाने, दाखवित, पुस्तकाने, भरपूर, लहान, वयापासून, तयार, जाणे, कष्ट, व्यावसायिक, चढाओढ, स्वार्थ, सूड, भावना, आत्मचिंतन, करावयास, भाग, पाडू, लागल्या, आमचे, देश, संकल्पना, वेगळ्या, जपानी, वाटले, देशातील, बालपणी, तिच्यावर, लादले, निवड, आयुष्यातील, चुकीचे, बरोबर, गेलेले, दोघींनी, बसून, पाहिल्यावर, माझ्यापासून, अक्षरश, जाऊ, दोघींमध्ये, करू, घातली, प्रयत्नपूर्वक, भिंतीची, वीट, पाडावी, पर्ल, जगप्रसिद्ध, लेखिकेची, १८५०, मध्ये, चीनमधील, ज्यू, कुटुंबामध्ये, विकली, चिनी, घराने, नोकरापेक्षा, वरची, लेकीपेक्षा, खालची, जागा, दिलेली, उलटत, घरातील, एकुलत्या, मुलाचे, बालपण, हसणे, खेळणे, तारुण्यात, पदार्पण, पडणे, त्याच्याशी, विवाह, अशक्यप्राय, कटू, सत्य, जिरवणे, दिमतीला, सदैव, तैनात, तिच्याबरोबरच, जगतो, घेतलेला, शेवटचा, निर्णयाबरोबर, जीवन, स्वीकारते, आपणही, शेवटचे, बंद, करतो, शिवाय, आपली, खात्री, पिओनीला, जिथे, सोडून, सुरक्षित, मनाविरुद्ध, शरीराविरुद्ध, कुठलीही, ह्यापुढे, घडणार, sunday, रक्षाबंधन, नेमेचि, येतेच, सहविद्यार्थी, आला, क्षणी, पडले, ह्याच्याशीच, लग्न, मनाने, आपोआप, दिसणारा, हुशार, विद्यार्थी, कसा, समजून, घेतले, प्रियकर, इतकं, सगळं, सोपं, कोषातील, वयामध्ये, वाटलं, त्यातूनच, असणारच, घेतला, कोणताही, पुरावा, नव्हता, कुठल्याही, प्रसंगात, आपल्यासाठी, शकतो, येण्याइतकी, बुद्धीची, कुवत, नव्हती, अनुभवानेच, शिकल्या, जातात, पुढच्यास, ठेच, मागचा, शहाणा, जिवलग, मलेरिया, असेल, विषमज्वर, डेंग्यू, कावीळ, शेवटी, तीही, म्हणता, क्षयरोग, होता, साक्षात, कर्करोग, ठाकला, वाटलंच, कर्ण, कवचकुंडलं, जन्माला, असंच, रहातं, शरीर, रणक्षेत्र, मानावे, कर्करोगाने, सैन्य, चारी, दिशांना, पसरवलेले, पुढचा, लढा, अनिश्चित, ज्याच्यापुढे, बोलता, यावे, डूब, अपार, खोली, आपल्यालाच, पुरती, रिकामी, गाळ, बदाबदा, घासून, चकाकवून, फडताळावर, ठेवता, पुरुष, विचारांचा, वेगळा, देतो, घटनेचा, असेन, प्रसंगाचे, दुसरे, रूप, धरलेला, ओळखीचाच, धुडकावून, लावला, उलट, आरश्यात, डोकावून, आरश्याची, मागील, बाजू, ठेवत, आजतागायत, असेच, किती, बांध, फुटला, पसरलेला, राणीच्या, नेकलेसचा, भरतीचा, उसळता, डोळ्यांचा, गदगदणारा, दोन्ही, तितक्यात, शांतपणे, तटस्थतेने, निरखले, सावरले, अंगाला, बोटाचाहि, भरती, पोटात, दडलेले, टाकून, काहीही, लपवता, मोकळी, आलेल्या, लोंढ्याला, थांबवले, कवटाळले, नसलेला, धोक्याचा, खरं, इंग्रजी, शब्दाचे, मराठीमध्ये, भाषांतर, लेख, नव्हेच, आलेले, अनुभवांवर, बेतलेले, आयुष्याचा, जोडीदार, शोधला, अपेक्षा, धरली, व्याख्या, स्त्रीला, शोधावाच, गरजच, अनेक, उभे, शकतात, कदाचित, तुम्ही, वातावरणात, मोठे, असाल, अनुसरून, येणार, नाहीत, पती, परमेश्वर, सोडा, निदान, तरी, नाहक, हट्टाचे, परिणाम, भोगले, मित्रबित्र, प्रकरण, वेळच, कारण, मुळातच, मुलांशी, बोलत, नसू, साधं, मुलाच्या, बाजूने, जाण्याचा, ओढवलाच, साईड, प्लीज, तिथल्या, उभ्या, रहात, मुलगा, बाजूला, भवताली, फिरणाऱ्या, हवेच्या, कणांचा, होणार, काळजी, सरकत, पाऊल, आसपास, बिनधास्त, फिरणारी, मुलं, दिसू, येऊन, आम्हा, मुलींशी, बोलू, मुलाला, म्हणण्याची, हिंमत, प्रत्येकीने, प्रत्येकीच्या, स्वभावधर्मानुसार, वेगवेगळा, व्यतीत, मिळवली, wednesday, pages, नमस्कार,
Text of the page (random words):
restiscrime february 2013 restiscrime नमस्कार pages home wednesday 27 february 2013 मित्र खरं तर ही काही पोस्ट नव्हे आणि पोस्ट ह्या इंग्रजी शब्दाचे मराठीमध्ये भाषांतर म्हणजे लेख तो तर हा नव्हेच हे विचार आहेत माझ्या मनात आलेले माझ्या अनुभवांवर बेतलेले आयुष्याचा जोडीदार शोधला आणि तो मित्र असावा असा हट्ट धरला अपेक्षा धरली मित्र ह्याची व्याख्या होईल काय आणि एखाद्या स्त्रीला मित्र असावा काय किंवा असा मित्र तिने शोधावाच का तिला गरजच काय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उभे राहू शकतात वा कदाचित तुम्ही ज्या वातावरणात मोठे झाला असाल त्याला अनुसरून असे प्रश्न तुमच्या मनात येणार देखील नाहीत परंतु पती हा परमेश्वर सोडा पण निदान मित्र तरी असावा असा मी नाहक हट्ट धरला आणि ह्या हट्टाचे परिणाम देखील भोगले शाळेमध्ये हे मित्रबित्र प्रकरण असण्याची वेळच आली नाही कारण मुळातच आम्ही मुली मुलांशी बोलत नसू साधं कुठे एखाद्या मुलाच्या बाजूने जाण्याचा प्रसंग ओढवलाच तर साईड प्लीज असे म्हणून तिथल्या तिथे उभ्या रहात असू व तो मुलगा बाजूला झाला तर त्याच्या भवताली फिरणाऱ्या हवेच्या कणांचा देखील आपल्याला स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घेत आम्ही पुढे सरकत असू मात्र कॉलेजमध्ये पाऊल टाकले आणि हे चित्र बदलून गेले आसपास बिनधास्त फिरणारी मुलं दिसू लागली व ती पुढे येऊन आम्हा मुलींशी बोलू वगैरे लागली परंतु एखाद्या मुलाला मित्र म्हणण्याची हिंमत प्रत्येकीने प्रत्येकीच्या स्वभावधर्मानुसार वेगवेगळा काल व्यतीत करून मिळवली नाहीतर रक्षाबंधन हे नेमेचि येतेच माझा नवरा जेव्हा कॉलेजमध्ये सहविद्यार्थी म्हणून माझ्या समोर आला त्यावेळी त्या क्षणी मी प्रेमात पडले आणि अगदी ह्याच्याशीच लग्न वगैरे आयुष्याचे निर्णय मनाने आपोआप घेऊन टाकले म्हणजे हा समोर दिसणारा हुशार विद्यार्थी एक मित्र म्हणून कसा आहे हे समजून घेतले गेले नाही प्रियकर आणि मग नवरा झालं इतकं सगळं सोपं हे त्या कोषातील वयामध्ये वाटलं आणि त्यातूनच मग आपला नवरा हा आपला मित्र तर असणारच असा समज नकळत करून घेतला गेला त्याला कोणताही पुरावा नव्हता कुठल्याही प्रसंगात तो आपल्यासाठी फक्त मित्र म्हणून उभा राहू शकतो काय ह्याचा विचार करता येण्याइतकी माझ्या बुद्धीची कुवत तेव्हा नव्हती ह्या सर्व गोष्टी अनुभवानेच शिकल्या जातात वा पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशा प्रकारे आज माझा जिवलग मित्र अतिशय आजारी आहे प्रथम मलेरिया असेल नाहीतर विषमज्वर किंवा डेंग्यू ते नाही तर कावीळ आणि शेवटी तीही नाही म्हणता तर क्षयरोग असावा असे स्वत चे समज करून घेत होता आणि साक्षात कर्करोग उभा ठाकला हे असं काही मला होईल असं कधी वाटलंच नाही गं मला आपण कर्ण आहोत कवचकुंडलं घेऊन जन्माला आलो आहोत असंच आपल्याला का वाटत रहातं शरीर एक रणक्षेत्र मानावे तर कर्करोगाने आपले सैन्य चारी दिशांना पसरवलेले आहे पुढचा लढा अनिश्चित मित्र हा असा असावा ज्याच्यापुढे मन मोकळे करून बोलता यावे मनाची डूब अपार असते आपल्या मनाची खोली आपल्यालाच कळत नाही परंतु आपण एखादी घागर पुरती रिकामी केली तर त्यातील गाळ देखील बदाबदा बाहेर येतो व घागर घासून चकाकवून पुन्हा फडताळावर ठेवता येते हा माझा मित्र पुरुष असल्याने मला विचारांचा तो एक वेगळा आरसा समोर आणून देतो एखाद्या घटनेचा मी एक स्त्री म्हणून विचार करीत असेन तर त्याच प्रसंगाचे दुसरे रूप मी त्याच्या समोर धरलेला आरसा हा माझ्या ओळखीचाच नाही असे म्हणून त्याने कधी धुडकावून लावला नाही तर त्या उलट माझ्या आरश्यात डोकावून मग तो त्या आरश्याची मागील बाजू माझ्या समोर आणून ठेवत असतो आजतागायत हे असेच झाले आहे माझ्या आयुष्यात किती असे प्रसंग आले जेव्हा माझा बांध फुटला आहे समोर पसरलेला राणीच्या नेकलेसचा भर भरतीचा उसळता समुद्र आणि माझ्या डोळ्यांचा गदगदणारा समुद्र हे दोन्ही त्याने तितक्यात शांतपणे तटस्थतेने निरखले मला सावरले अंगाला एका बोटाचाहि स्पर्श न करता जेव्हा भरती येते त्यावेळी समुद्र आपल्या पोटात दडलेले सर्व किनाऱ्यावर आणून टाकून जातो मी ही तेच केले काहीही न लपवता मी ह्या माझ्या किनाऱ्यावर मोकळी होत होते माझा किनारा त्याने ना कधी आलेल्या लोंढ्याला थांबवले ना ते कवटाळले किनारा नसलेला समुद्र धोक्याचा posted by anagha at 3 21 00 pm 24 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest sunday 10 february 2013 पुन्हा वाचन आणि चित्रपट मनाशी काही निश्चय करून नव्हे परंतु बऱ्याचदा वाचलेली पुस्तके व पाहिलेले चित्रपट ह्यात जगभरातील स्त्रिया त्यांच्यावरील अन्याय व अत्याचार त्यांच्या स्त्रीत्वाविषयी भूमिका ह्या संदर्भात वाचले जाते व ते मनात कुठे ना कुठेतरी कोरले जाते त्यात कधी स्वत ला गुंफले जाते आपल्यावर कळत नकळत झालेल्या अन्यायाविषयी चिंतन केले जाते सर्वात प्रथम आठवण होते ती चिमुकल्या हायडी ची आल्प्ससारख्या बर्फाळ प्रदेशात आपल्या आजोबांसमवेत रहाणारी चिमुरडी हायडी माझ्याकडे हे पुस्तक आहे टीव्हीवर फारा वर्षांपूर्वी दाखवली गेलेली अॅनिमेशन सिरीज देखील मी मोठ्या प्रेमाने बघितली होती ती बागडणारी रुसून बसणारी हायडी आजोबांपासून दूर पाठवली गेल्याकारणाने सतत आजारी पडू लागलेली हायडी माझ्या लेकीइतकीच माझी लाडकी होती आणि ज्यावेळी ही सिरीज टीव्हीवर दाखवली गेली त्यावेळी माझी लेकही त्याच वयाची असल्याकारणाने तर माझा जीव हायडीवरील संकटे बघून तीळतीळ तुटे पुस्तक आणि चित्रपट ह्यांची जर तुलना केली तर माझे झुकते माप नेहेमी पुस्तकाकडे जाते परंतु हायडीच्या बाबतीत मात्र माझे तसे होत नाही छोट्या पडद्यावर बागडणारी हायडी ही माझी दुसरी लेक होती जी रोज अगदी दुपारी ठरलेल्या वेळी माझ्या पुढ्यात येई तिच्या वेदना माझ्या होत तिचे डोळे माझे होत आम्हां दोघींचे अश्रू एकाच वेळी आमच्या गालावर ओघळू लागत मेमॉयर्स ऑफ गेशा हे पुस्तक मी आधी वाचले नंतर चित्रपट बघितला गेला चित्रपटाने खोल आतवर जपानमधील चित्र नक्की नजरेसमोर दिले परंतु पुस्तकात चियोबरोबर तिच्या बालपणापासून मी मोठी झाले तो अनुभव मला त्या चित्रपटाने नाही दिला तिथे मी त्रयस्थच राहिले व चियो माझ्यासमोर तिच्या आठवणी फक्त चित्ररुपाने दाखवित गेली पुस्तकाने मात्र मला भरपूर दिले जपानमधील एक स्त्री तिचे अगदी लहान वयापासून गेशा म्हणून तयार होत जाणे त्यासाठी तिने घेतलेले कष्ट त्यातील व्यावसायिक चढाओढ स्वार्थ सूड ह्या सर्व भावना मला आत्मचिंतन करावयास भाग पाडू लागल्या आमचे देश त्यातील संकल्पना वेगळ्या परंतु काय चियो फक्त जपानी होती मला असे नाही वाटले ती एक स्त्री होती तिच्या देशातील बालपणी तिच्यावर लादले गेलेली निवड व समज आल्यावर आयुष्यातील काही चुकीचे तर काही बरोबर घेतलेले गेलेले निर्णय त्यासाठी तिने केलेले विचार हे पुन्हा आम्ही दोघींनी एकत्र बसून केले चित्रपट पाहिल्यावर ही चियो माझ्यापासून अक्षरश दूर जाऊ लागली चित्रपटाने आम्हां दोघींमध्ये एक भिंत उभी करू घातली व प्रयत्नपूर्वक मला त्या भिंतीची एकेक वीट पाडावी लागली पर्ल बक ह्या जगप्रसिद्ध लेखिकेची पिओनी १८५० मध्ये चीनमधील ज्यू कुटुंबामध्ये विकली गेलेली चिनी पिओनी त्या घराने तिला नोकरापेक्षा वरची परंतु लेकीपेक्षा खालची जागा दिलेली आहे आपण एकेक पान उलटत जातो ती व त्या घरातील एकुलत्या एका मुलाचे बालपण एकत्र हसणे खेळणे मग तारुण्यात पदार्पण तिचे त्याच्या प्रेमात पडणे परंतु त्याच्याशी विवाह अशक्यप्राय असणे आयुष्याचे हे कटू सत्य तिने जिरवणे परंतु तरीही त्याच्या दिमतीला सदैव तैनात असणे हे सर्व व अजून काही आपण तिच्याबरोबरच जगतो आयुष्यात तिने घेतलेला शेवटचा निर्णय आपण देखील स्वीकारतो त्या निर्णयाबरोबर जे जीवन पिओनी स्वीकारते आपणही स्वीकारतो शेवटचे पान आपल्यासमोर कधी आले ते कळत नाही पुस्तक आपण बंद करतो आपला पुढला दिवस मग पिओनी शिवाय उजाडतो मात्र आपली खात्री असते आपण पिओनीला जिथे सोडून आलो आहोत ती तिथे सुरक्षित आहे एक स्त्री म्हणून तिच्या आयुष्यात तिच्या मनाविरुद्ध शरीराविरुद्ध कुठलीही घटना आता ह्यापुढे घडणार नाही माझ्या माहितीप्रमाणे ह्या कादंबरीवर चित्रपट आलेला नाही आणि ते मला बरेच वाटते २००८ साली आलेला प्रियांका चोप्राचा फॅशन ह्यावरील कादंबरी असण्याची शक्यता दिसत नाही जाहिरातक्षेत्रात वावरत असल्याने ह्या क्षेत्राचे व बॉलीवूडचे नाते माझ्या ओळखीचे आहेच वडिलांच्या इच्छेविरुद्ध चित्रपटात नाव कमावण्यासाठी घरातून एकटीच बाहेर पडलेली मेघना मला फारशी अनोळखी वाटत नाही ज्या मुलींबरोबर मी रोज काम करीत असते त्यातील बऱ्याच मुली अशाच कुठल्या ना कुठल्यातरी छोट्या शहरातून शिकून आता इथे मुंबईत स्थायिक झाल्या आहेत मी फारशी पार्टी पर्सन नसले तरीही काही पार्ट्या ह्या टाळता येण्यासारख्या नसतात मग त्यातील दारू नृत्य हे सर्व आपल्यासमोर बेभान होत जातं आपण तिथे असतो व नसतो देखील आणि जेव्हा दुसरा दिवस उजाडतो तेव्हा काल रात्री आपण जे आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेले असते ते आपल्या स्मृतिकोषातून कायमचे हद्दपार करावयाचे असते इथे हे आपल्याला पटले नाही पटले ह्याचा काडीचाही संबंध आपण ठेवायचा नसतो कुटुंबाशी संबंध तोडून टाकावे लागलेली मेघना आपल्या व्यवसायक्षेत्राची एकेक पायरी ज्या वेगाने चढते त्याच वेगाने घसरत जाते बेधुंद अवस्थेत असताना अनोळखी माणसाबरोबर एका बिछान्यात तिला एके दिवशी जेव्हा जाग येते त्यावेळी तिला धक्का बसतो ती उध्वस्त होते आपण हे काय करीत आहोत ह्याचा तिला विचार करावासा वाटतो त्या प्रसंगातून मला जाणीव झाली होती ती एकच माणसाला आपल्या माणसांची आपल्या कुटुंबाची त्यांच्या मानसिक आधाराची गरज असते तेच त्याचे मनोबल असते भान आल्यावर आपल्या आई वडिलांच्या पाठींब्याच्या बळावर पुढे जेव्हा जेव्हा त्याच क्षेत्रात ती पुन्हा उभी राहू पहाते तेव्हा कुठलाही अडथळा तिला रोखू शकत नाही तिला टाळ्यांच्या कडकडाटात खंबीर उभी राहिलेली पहातच आपण चित्रपटगृह सोडतो पुन्हा पुस्तक पर्सपोलीस मारीजान सत्रपी ह्या इराणी मुलीच्या आठवणी कॉमिक पुस्तकाच्या काळ्या पांढऱ्या चित्रपटलातून आपल्या समोर येतात ती वयाच्या तिच्या सहाव्या वर्षापासून आपल्याला आठवणी सांगत आहे ते थेट तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत तिच्या ह्या आठवणींना पार्श्वभूमी आहे इराणमधील बदलांची त्यातील चित्रे नीट बघितली तर आपल्याला त्यात बऱ्याच वेळा काही प्रतीके सापडतात मिश्र शाळेमध्ये शिक्षण घेत असताना अचानक स्त्रियांवर बुरखा घेण्याची सक्ती करण्यात येते व मग मारीजान व तिच्या चिमुरड्या मैत्रिणी हा बदल कशा प्रकारे स्वीकारतात ते चित्रात बघण्यासारखे आहे तिचे मध्यमवर्गीय आईवडील हे पुढारलेल्या विचारांचे व सुशिक्षित आहेत त्यामुळे त्यांच्या बाहेर होणाऱ्या धार्मिक व राजकीय बदलांवर त्यांच्या आपापसात चर्चा ह्या रोजच्याच आहेत त्या ऐकतच मारीजान मोठी होत असते व त्यातून तिला स्वतंत्र विचार करण्याची सवय होत जाते मात्र ज्यावेळी तेहरान मधील परिस्थिती इराकच्या हल्ल्याने अतिशय अस्थिर होते त्यावेळी आपल्या लाडक्या लेकीला आपल्यापासून दूर ठेवण्याचा परदेशी पाठवण्याचा निर्णय तिचे आईवडील घेतात त्यानंतर तिचे आयुष्य कशी वळणे घेत जाते ती कधी कुठे आणि कशी भरकटते ती कशी स्वत ला सावरते हे सर्व चित्रातून आपल्यासमोर येत जाते मला वाटतं मारीजानचे आयुष्य आपण चित्रात बघतो ही त्या गोष्टीची शक्ती आहे हेच जर शब्दांत आपल्या समोर आले असते तर ते इतके परिणामकारक झाले नसते ह्या पुस्तकावर अॅनिमेशन चित्रपट केला गेला आहे मी तो बघितलेला मात्र नाही मात्र ज्या ज्या वेळी माझ्या कामामध्ये अॅनिमेशन वापरण्याची शक्यता येते त्यावेळी मी नेहेमीच ह्या चित्रपटाची युट्यूबची लिंक समोरच्याला दाखवत असते संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग मात्र नाही आलेला नेहेमीप्रमाणे इथे देखील मी मारिजानच्या गोष्टीजागी स्वत ला ठेवून बघते शहर असुरक्षित झाल्याने मी माझ्या छोट्या लेकीला कुठे परदेशी पाठवेन काय असा मी स्वत ला प्रश्न विचारते उगाच आणि माझे स्वत ला उत्तर हे नकारार्थी येते काय व्ह्यावयाचे आहे ते आपले एकत्रच होऊ दे पण माझ्या मुलीला युद्धप्रसंगी जगात एकटी मी पाठवू शकत नाही असे मला वाटते हे पुस्तक अजून शक्तिशाली होऊ शकले असते त्यात कुठेतरी काहीतरी कमी पडते आहे असे मात्र मला फार वाटते ह्या अशा जगभरच्या स्त्रिया त्यांच्या कधी हळव्या कधी आपल्याला जगण्याचे बळ देणाऱ्या कथा मध्यंतरीच्या काळात काही वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या एका स्त्रीची मुलाखत वाचनात आली होती त्यात तिने एक वाक्य म्हटले होते ते मला फार काही सांगून गेले होते पटून गेले होते एक घटना म्हणजे आयुष्य नव्हे आयुष्य बरेच काही असते वेगळेच असते एखादी घटना आपले आयुष्य नक्कीच बदलून टाकते परंतु ती एक घटना म्हणजे आपले आयुष्य नसते फक्त कोणतीही एक घटना जेव्हा घडते त्यावेळी ती आपल्यावर आदळते आपल्याला आरपार छेदून जाते परंतु खरेच ती घटना म्हणजेच आयुष्य असते काय की आयुष्य त्यापलीकडले असते अचानक कोणी खोल विहिरीत ढकलून दिल्यावर आपण हातपाय मारतो वर येतो घुसमट होताहोता पहिला श्वास घेत तोच श्वास महत्वाचा असतो आणि त्यापुढील आपला प्रत्येक श्वास हा आपल्याला हात मारावयास शिकवतो आणि आपण आपला तलाव पोहू लागतो नव्या दमाने posted by anagha at 5 23 00 pm 18 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest newer posts older posts home subscribe to posts atom बाबा जागवा शिवाजी क्षणोक्षणी पाटीचं पुस्तक स्टार माझा ब्लॉग माझा २०१० मी मराठी लेखनस्पर्धा २०१० copyright about me anagha view my complete profile followers total pageviews popular posts अकलेचा उकिरडा आपण ज्या घरात रहातो त्याबद्दल आपल्याला प्रेम असतं आपलेपणा असतो व त्यामुळे आपलं घर नीटनेटकं दिसावं ह्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो व घर स पिढ्या ठिपक्यांच्या सुरुवातीच्या काळात आई एकटीच रांगोळी काढत असे सुरुवात आईबाबांच्या संसाराची त्या काळात पाच हजार रुपयांची पागडी भरून घेतलेलं त्यांचं घर चित्रकला आजचा तास आहे चित्रकलेचा कॉलेजच्या दिवसांत माझ्या नवऱ्याने शरदने काढलेली स्केचेस इथे टाकते आहे त्याने केलेले जलरंग टूर की पाळंमुळं आत खोलवर नेणं व खंबीर ताठ मानेनं उभं रहाणं सहजसाध्य नसतच दिवसरात्र ऊनपावसात नाजूक मुळांमध्ये शक्ती येईस्तोवर अख्खा पिंपळ कितीद कुणाविना बारा तारखेला बाबा जाऊन दहा वर्षं झाली हे सिद्ध झालं की आपलं माणूस गेलं म्हणून आपण काही मरतबिरत नाही आता नववर्षाच्या आरंभदिनी नवरा जाऊन रेस्टइजक्राइमचा लोकसत्तामध्ये उल्लेख वाचावे नेट के पुनर्ओळखीची गोष्ट प्रेम माया ह्या काही मोजण्याच्या गोष्टी नव्हेत त्यांचे अस्तित्व हे सुखद आठवणी घेऊन येते जसा एखादा वृक्ष प्रेम ही त्या मूळव्याध i ll tell you what त्याचं काय आहे माहितेय का आई तुला कसलं काय आहे म्हणजे मांजर मामी आणि मासे अगदी छोट्यात छोट्या जीवाविषयी देखील आत्मीयता वाटायला हवी फक्त माणुसकीच्या दृष्टीतूनच नव्हे तर काय सांगावे नेमका पुढला जन्म तोच असला तर का थोडा है थोडे कि जरुरत है ३ मंडळी आपण हातात घेतलेलं हे तिसरं काम पहिलं काम होतं छोट्या मुलामुलींच्या गणवेषांचं म्हणजे शिक्षण दुसरं एका पाड्याच्या पाणी साठव blog archive 2016 2 january 2 2015 6 october 1 june 2 april 1 march 2 2014 18 november 1 october 1 september 2 august 3 june 1 april 3 february 3 january 4 2013 53 december 10 november 2 october 7 september 2 august 2 july 2 june 6 may 3 april 2 march 9 february 2 मित्र पुन्हा वाचन आणि चित्रपट january 6 2012 64 december 6 november 3 october 5 september 5 august 6 july 10 june 4 may 4 april 3 march 7 february 5 january 6 2011 152 december 15 november 10 october 10 september 10 august 8 july 13 june 10 may 14 april 15 march 16 february 12 january 19 2010 232 december 25 november 21 october 27 september 29 august 27 july 26 june 21 may 29 april 27 2009 3 july 3 flicker photos clicked by me jpg http www jpgmag com people anagha तुमच्या ब्लॉगवर रेस्टइजक्राइम लावण्यासाठी खालील कोड कॉपी पेस्ट करा मराठी ब्लॉग जगत मराठी मंडळी मराठी ब्लॉगविश्व माझ्या मित्रमैत्रिणी बाबा ची भिंत abhilekh अभिलेख aks batcheet bak bak aur bahot kuch coffee break golf life ignited mind raindrop sahajach s blog shrirajmoré अपर्णा माझिया मना आतल्यासहित माणूस आपला सिनेमास्कोप आमची भटकंती झाले मोकळे आकाश डोलची ब्लॉग मोगरा फुलला मन माझे मन वढाय वढाय मनाचे बांधकाम मराठा इतिहासाची दैनंदिनी माझी सह्यभ्रमंती वटवट सत्यवान सरदेसाईज सांगत्ये ऐका सौरभ feedjit feedjit live blog stats watermark theme theme images by merrymoonmary powered by blogger
|