Meta tags:
description= Posts about माझ्याबद्दल written by देवेंद्र चुरी;
Headings (most frequently used words):
लेख, ब्लॉग, टिव, दवबिंदु, मेनू, category, archives, माझ्याबद्दल, क्यामेरा, साथभी, गवाँरा, नही, 2012, in, review, पोस्टचे, नॅव्हिगेशन, अभिमान, आहे, अशी, पाखरे, येती, आता, भेट, देणारे, पाहुणे, ताजे, दवबिंदू, वाचकांना, आवडलेले, वर्गीकरण, कालानुक्रमे, वाचकांची, प्रतिक्रिया, कुण्या, गावाच, आल, पाखरू, मला, खुणावणारे, मराठी, पेपर्स, विरंगुळा, उचलेगिरीस, सक्त, मनाई, मी, ऑरकुटवर, डिरेक्टरी, flickr, photos, देवेन,
Text of the page (most frequently used words):
2010 (12), च्यावर (10), 2012 (10), 2011 (10), 2013 (10), ह्या (10), दवबिंदु (9), आणि (8), भटकंती (7), आहे (7), this (6), wordpress (6), com (6), #माझ्या (6), 2009 (6), जानेवारी (6), माझ्याबद्दल (6), कॅमेरा (6), फोटो (5), मार्च (5), वर्ष (5), नाही (5), छायाचित्र (5), तेव्हा (5), blog (4), davbindu (4), मराठी (4), काय (4), मला (4), review (4), भेट (4), खेळ (4), जुलै (4), नोव्हेंबर (4), डिसेंबर (4), इथे (4), नव्या (4), पोस्ट (4), कोडॅक (4), झेड (4), काश्मीर (4), भटकंतीच्या (4), दोन (4), अनेक (4), comments (3), report (3), करा (3), ब्लॉग (3), अशेरीभाईंची (3), मांडला (3), देवेंद्र (3), चुरी (3), ऑगस्ट (3), सप्टेंबर (3), ऑक्टोबर (3), जून (3), तुमच्या (3), ब्लॉगवर (3), क्यामेरा (3), साथभी (3), गवाँरा (3), नही (3), आता (3), लिखाण (3), film (3), गेल (3), दवबिंदुवर (3), साथ (3), ९८१ (3), परत (3), येथील (3), क्षण (3), आहेत (3), जिवंत (3), मध्ये (3), करूया (2), site (2), required (2), view (2), join (2), other (2), subscribers (2), अधिक (2), टिव (2), सामना (2), सकाळ (2), लोकसत्ता (2), सिनेमा (2), कविता (2), माझी (2), भुंगा (2), मीच (2), विक्रम (2), साराभाई (2), फेब्रुवारी (2), एप्रिल (2), कालानुक्रमे (2), पाउस (2), तंत्रज्ञान (2), खालील (2), https (2), आपण (2), करायचे (2), लोकप्रिय (2), वाचकांना (2), लेख (2), दवबिंदू (2), भेटी (2), tagged (2), शुभेच्छा (2), posted (2), here (2), the (2), were (2), नवीन (2), बघायला (2), ह्यावर्षी (2), फक्त (2), प्रयत्न (2), डीएसएलआर (2), डिजीटल (2), सोबत (2), योग्य (2), तरी (2), यल्लो (2), डांग (2), गुजरात (2), माझा (2), आनंद (2), गुलमर्ग (2), राजस्थानातील (2), सर्वात (2), उंच (2), म्हणजेच (2), मुड (2), सिद्धगडावरील (2), सूर्यास्त (2), अहुपे (2), काही (2), त्या (2), पोस्टमध्ये (2), माझ्याकडे (2), करण्याच (2), काम (2), माझ्याबरोबर (2), म्हणूनच (2), दवबिंदुवरील (2), कितीतरी (2), विकत (2), कोडॅकचा (2), काढलेले (2), दिल्ली (2), आग्रा (2), अश्या (2), आठवणी (2), तीन (2), अगदी (2), फिर (2), असे (2), अनमोल (2), सुरु, design, like, with, वेबसाईट, नाव, ईमेल, write, comment, loading, collapse, bar, content, लॉग, साइन, manage, subscriptions, reader, गोपनियता, have, account, log, now, sign, 141, subscribed, देणगी, घ्या, सबस्क्राइब, flickr, photos, डिरेक्टरी, 100, tweets, http, www, orkut, main, profile, uid, 2558415042811304899, ऑरकुटवर, उचलेगिरीस, सक्त, मनाई, मायबोली, वर्ल्ड, माती, मनोगत, नेटभेट, उपक्रम, विरंगुळा, लोकमत, महाराष्ट्र, टाईम्स, बातम्या, कॉम, तरुण, भारत, केसरी, पेपर्स, हरकत, नाय, कॅनव्हास, सहजच, मोगरा, फ़ुलला, मैथीली, थिंक्स, सह्यभ्रमंती, माझिया, मना, माऊ, मनाचे, बांधकाम, मनमौजी, उधाण, वार्, याचे, भानस, भट्कंती, unlimited, बाबाची, भिंत, प्रकाशरानातून, चालतांना, डोक्यात, भुणभुणणारा, वाटेल, अभिलेख, अब्द, शब्द, अनुक्षरे, ऐसी, अक्षरे, मेळविन, खुणावणारे, कुण्या, गावाच, पाखरू, shree, korde, yashwant, महाराष्ट्राचा, एव्हरेस्ट, ऑफबीट, वाटेने, किल्ला, कोहोजचा, मिशन, तांदुळवाडी, sneha, patel, neha, mahale, देवा, sandeep, gavali, पाऊस, पडत, असताना, मॅड, अस्सल, सोलापुरी, sanjay, patil, वाचकांची, प्रतिक्रिया, महिना, निवडा, uncategorized, सामाजिक, व्यक्ति, आणी, वल्ली, ललित, माहिती, मनोरंजन, पुस्तक, चारोळी, काहीतरी, कथा, इतिहास, इडीअट, बॉक्स, आरोग्य, अर्थविश्व, अनुवाद, वर्गीकरण, लावण्यासाठी, कोड, कॉपी, पेस्ट, href, target, _blank, img, src, files, davbindu01, 125, jpg, आवडलेले, ताजे, देणारे, पाहुणे, 262, 094, अशी, पाखरे, येती, 905, जोड़ा, email, address, ब्लॉगवरील, मेलद्वारे, मागवण्यासाठी, विरोपाचा, पत्ता, दया, शोधा, अभिमान, older, posts, पोस्टचे, नॅव्हिगेशन, year, २०१३, २०१२, वार्षिक, अहवाल, click, see, complete, 329, films, submitted, cannes, festival, had, views, each, would, power, festivals, 000, excerpt, चला, उमेदीने, स्वप्नांनी, वर्षाचे, स्वागत, सर्वांनाच, धमाल, आनंदाचे, जावो, सदिच्छा, सक्रिय, झाल, वर्षभरात, टाकल्या, तरीही, आकडेवारी, पाहता, तूम्ही, तुमचा, लोभ, तसाच, ठेवता, अजून, वाढवलाच, दिसून, येते, जगभरातल्या, तब्बल, देशातून, वाचकांच्या, ०००, दवबिंदुला, लाभल्या, प्रेमामुळेच, कंटाळ्याला, झटकून, वर्षात, नियमित, करायचा, करेन, म्हटलंय, दवबिंदुच्या, समस्त, ख्रिस्ती, नववर्षाच्या, हार्दिक, trek, sony, photo, nikkon, kodak, dslr, canon, camera, सोनी, निकॉन, अल्बम, album, मुझे, क्या, कमी, सोडतांना, कॅनॉन, ११००, मित्राशी, गट्टी, जमवली, डीएसएलआरच्या, जगात, शिरायची, वेळ, माहीत, केव्हातरी, शिरायचं, होतच, नको, मित्राच्या, सोबतीने, प्रगट, होईनच, लिये, जाताजाता, म्हणावास, वाटतेय, slideshow, requires, javascript, गावातील, स्वीट, फेल्लो, मोराचा, झोडणी, योग, समाधीत, मग्न, मनीमाऊ, सिद्धेश्वर, मंदिर, सोलापूर, महल, कँप, ध्यानस्थ, योगी, बघतोस, आकाशी, झेप, पाखरा, पाचगणी, फुलांच्या, बागेतील, मोहक, फुल, विसाव्याचा, अमरनाथ, यात्रा, अविष्कार, लेक, पोपटराव, शालिनी, पॅलेस, कोल्हापूर, बर्फाचा, लुटतांना, सूर्या, नदी, आमच्या, घरापासून, पाच, किमी, गोल्ड, गाय, शिखर, गुरुशिखर, घंटा, माउंटअबू, वरील, सनसेट, पाँइंट, देख, मुडमुडके, धसई, मासेमारी, प्रकल्पाच, बॉयज, एक्शन, गाव, फोटोग्राफी, फिरताना, लिहित, फोटोच्या, साह्याने, क्रमाक्रमाने, आठवत, लिहतो, ज्या, लिहल्या, काढलेल्या, छायाचित्रावरूनच, तसेच, नुसत, लेखनात, गुंतवून, ठेवण्याइतक, शब्दसामर्थ्य, नसल्याने, आकर्षक, बनवायचं, चांगल्या, रितीने, व्यक्त, छायाचित्रांनी, केल, ९८१चे, खूप, उपकार, असतांना, त्याची, सोडली, जीवाभावाचा, सोबती, नाहीये, त्याच्यासाठी, लिहायला, घेतली, प्रत्यक्ष, नसला, त्याने, टिपलेल्या, असंख्य, छायाचित्रातून, नेहमीच, असणार, त्यातली, बरीचशी, तुम्ही, पाहिली, असतीलच, ड्राफ्टसच्या, दुष्टचक्रात, अडकल्यामुळे, प्रकट, झालेली, जोडतो, तेव्हापासून, कळसूबाईच्या, शिखरापासून, अमरनाथच्या, गुहेपर्यंत, जमीनीवरील, नंदनवनापासून, कासच्या, निसर्गसौंदर्याने, नटलेल्या, पठारापर्यंत, गुजरातमधील, कर्नाटकातील, याना, गर्द, जंगलात, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजाभवानी, ज्योतिबा, महालक्ष्मी, मांढरदेवी, ह्यांच, दर्शन, घेत, शिखरावरील, दत्तांच्या, जम्मूतील, वैष्णोदेवीच्या, चरणी, नतमस्तक, होतांना, सह्याद्रीच्या, कड्याकपा, यातून, तहानभूक, विसरून, भटकतांना, सोसाट्याचा, वारा, अंगावर, झेलत, गडमाथ्यांवर, पोहोचल्याचा, उपभोगताना, सावलीप्रमाणे, दिली, वर्षापूर्वी, नोकरीला, लागलो, ट्रेनिंगसाठी, राजस्थानला, जाण्यासाठी, निघालो, इच्छेखातर, वडिलांनी, माझ्यासाठी, महागड्या, वस्तू, घेऊन, दिलेल्या, सोनीचा, वॉकमन, रीळवाला, रीळाचे, आकडे, पाहत, जपून, धुवून, येईपर्यंत, असलेली, उत्सुकता, दिवस, होते, यार, खरच, फीलची, मजा, आजच्या, डीजीटल, युगात, जयपूर, अजमेर, पुष्कर, चित्तोड, ठिकाणच्या, तेव्हाच्या, वेगवेगळ्या, अल्बम्समध्ये, पुढे, बरीच, मोठ्या, भावाने, घेतलेला, निकॉनचा, कर्नाटक, मध्यप्रदेश, सिक्कीम, गंगटोक, मथुरा, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश, मसुरी, ठिकाणी, नाचवत, त्याच्यापेक्षा, जास्त, वापरला, नंतर, ट्रेकिंगचा, किडा, जास्तच, वळवळायला, लागल्यावर, दिल, मांगे, मोअर, उमजून, एक्स, झूम, असलेला, घेतला, खरतर, घ्यायचा, होता, बर्याच, फोरम्सवर, वाचल्यावर, जाणवलं, सरळ, तिथे, वळणे, गेली, मनसोक्त, करतोय, वेड्यासारखा, फिरतोय, गेल्या, वर्षातील, सुट्ट्यांचे, उच्चांक, ह्याचे, साक्षीदार, मागे, वळून, पाहायाची, सवय, नाहीच, आपल्याला, कधी, आयुष्याचा, हिशोब, लावायला, त्यात, सुट्ट्यांच्या, वेळेच्या, बदली, कमावल, असा, प्रश्न, आला, त्याच, उत्तर, असेल, स्वीज, बँकेतही, सामावणार, नाहीत, फील, एकदा, देण्याच, करतात, काढलेली, मेंदूच्या, हार्डडिस्कमधून, पुसून, गेलेल्या, रिस्टोर, करायचं, कामही, करत, असतात, म्हटलं, त्यातला, अविभाज्य, घटक, म्हणजे, category, archives, ब्लॉगर, मित्र, मैत्रीणी, पद्य, गाणी, भावलेली, इतरत्र, मटा, मुखपृष्ठ, सामग्री, वगळा, मेनू, देवेन,
Text of the page (random words):
माझ्याबद्दल दवबिंदु दवबिंदु देवेन मेनू सामग्री वगळा मुखपृष्ठ मटा मध्ये लोकसत्ता मध्ये सामना मध्ये इतरत्र गाणी मला भावलेली पद्य ब्लॉगर मित्र मैत्रीणी भटकंती माझ्याबद्दल लोकप्रिय category archives माझ्याबद्दल क्यामेरा साथभी गवाँरा नही गेली दोन तीन वर्ष मी अगदी मनसोक्त भटकंती करतोय अगदी वेड्यासारखा फिर फिर फिरतोय गेल्या दोन वर्षातील माझ्या सुट्ट्यांचे उच्चांक ह्याचे जिवंत साक्षीदार आहेत मागे वळून पाहायाची सवय तर नाहीच आपल्याला पण कधी आयुष्याचा हिशोब लावायला गेल आणि त्यात जर ह्या सुट्ट्यांच्या वेळेच्या बदली काय कमावल असा प्रश्न आला तर त्याच उत्तर असेल स्वीज बँकेतही सामावणार नाहीत असे अनेक अनमोल क्षण आणि असे हे अनेक अनमोल क्षण परत जिवंत करण्याच ते फील परत एकदा देण्याच काम करतात ती मी काढलेली छायाचित्र मेंदूच्या हार्डडिस्कमधून पुसून गेलेल्या अनेक आठवणी रिस्टोर करायचं कामही हि छायाचित्र करत असतात म्हणूनच तर भटकंती म्हटलं कि त्यातला एक अविभाज्य घटक म्हणजे कॅमेरा १० वर्षापूर्वी नोकरीला लागलो आणि ट्रेनिंगसाठी दोन वर्ष राजस्थानला जाण्यासाठी निघालो तेव्हा माझ्या इच्छेखातर वडिलांनी माझ्यासाठी दोन महागड्या वस्तू विकत घेऊन दिलेल्या सोनीचा वॉकमन आणि कोडॅकचा कॅमेरा रीळवाला तेव्हा रीळाचे आकडे पाहत जपून काढलेले फोटो आणि काढलेले फोटो धुवून येईपर्यंत असलेली उत्सुकता काय दिवस होते यार खरच त्या फीलची मजा आजच्या डीजीटल युगात नाही तर जयपूर अजमेर पुष्कर चित्तोड दिल्ली आग्रा अश्या अनेक ठिकाणच्या तेव्हाच्या आठवणी आज माझ्याकडे तीन वेगवेगळ्या अल्बम्समध्ये जिवंत आहेत पुढे बरीच वर्ष मोठ्या भावाने घेतलेला निकॉनचा डिजीटल कॅमेरा एल १८ कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश सिक्कीम गंगटोक दिल्ली आग्रा मथुरा वृंदावन हरिद्वार ऋषिकेश मसुरी अश्या कितीतरी ठिकाणी नाचवत त्याच्यापेक्षा जास्त मीच वापरला पण नंतर ट्रेकिंगचा किडा जास्तच वळवळायला लागल्यावर ये दिल मांगे मोअर हे उमजून कोडॅकचा २६ एक्स झूम असलेला झेड ९८१ हा कॅमेरा विकत घेतला खरतर तेव्हा डीएसएलआर घ्यायचा होता पण बर्याच फोरम्सवर वाचल्यावर जाणवलं कि सरळ तिथे वळणे योग्य नाही तेव्हापासून कळसूबाईच्या शिखरापासून अमरनाथच्या गुहेपर्यंत काश्मीर ह्या जमीनीवरील नंदनवनापासून कासच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या पठारापर्यंत गुजरातमधील डांग व कर्नाटकातील याना ह्या गर्द जंगलात पंढरपूर अक्कलकोट तुळजाभवानी ज्योतिबा महालक्ष्मी मांढरदेवी ह्यांच दर्शन घेत राजस्थानातील सर्वात उंच शिखरावरील दत्तांच्या व जम्मूतील वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक होतांना सह्याद्रीच्या कड्याकपा यातून तहानभूक विसरून भटकतांना सोसाट्याचा वारा उन पाउस अंगावर झेलत कितीतरी गडमाथ्यांवर पोहोचल्याचा आनंद उपभोगताना माझ्या सावलीप्रमाणे मला साथ दिली ती ह्या कोडॅक झेड ९८१ ने मी फिरताना तर काही लिहित नाही फोटोच्या साह्याने जस जस क्रमाक्रमाने आठवत तस ब्लॉगवर लिहतो म्हणजेच दवबिंदु वर ज्या भटकंतीच्या पोस्ट लिहल्या त्या ह्या काढलेल्या छायाचित्रावरूनच तसेच भटकंतीच्या पोस्टमध्ये नुसत लेखनात गुंतवून ठेवण्याइतक शब्दसामर्थ्य माझ्याकडे नसल्याने भटकंतीच्या पोस्ट आकर्षक बनवायचं आणि माझी भटकंती अधिक चांगल्या रितीने व्यक्त करण्याच काम ह्या छायाचित्रांनी केल तेव्हा बघायला गेल तर दवबिंदुवर ह्या कोडॅक झेड ९८१चे खूप उपकार आहेत आणि अस असतांना मी आज त्याची साथ सोडली आहे तो माझा जीवाभावाचा सोबती आज माझ्याबरोबर नाहीये आणि म्हणूनच त्याच्यासाठी ही पोस्ट लिहायला घेतली आज तो प्रत्यक्ष माझ्याबरोबर नसला तरी त्याने टिपलेल्या असंख्य छायाचित्रातून तो नेहमीच माझ्या सोबत असणार आहे त्यातली बरीचशी छायाचित्र तुम्ही दवबिंदुवरील भटकंतीच्या पोस्टमध्ये पाहिली असतीलच पण दवबिंदुवरील ड्राफ्टसच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे इथे प्रकट न झालेली काही छायाचित्र इथे जोडतो आहे गुलमर्ग काश्मीर सिद्धगडावरील सूर्यास्त फोटो ऑफ फोटोग्राफी अहुपे बॉयज इन एक्शन अहुपे गाव सिद्धगडावरील सूर्यास्त धसई येथील मासेमारी प्रकल्पाच तळ मुड मुड के ना देख मुडमुडके माउंटअबू वरील सनसेट पाँइंट राजस्थानातील सर्वात उंच शिखर म्हणजेच गुरुशिखर येथील घंटा दि गोल्ड गाय सूर्या नदी आमच्या घरापासून पाच किमी बर्फाचा आनंद लुटतांना गुलमर्ग काश्मीर पोपटराव शालिनी पॅलेस कोल्हापूर माझा अविष्कार दल लेक काश्मीर एक क्षण विसाव्याचा अमरनाथ यात्रा पाचगणी येथील फुलांच्या बागेतील मोहक फुल आकाशी झेप घे रे पाखरा बघतोस काय ध्यानस्थ योगी महल कँप डांग गुजरात योग समाधीत मग्न मनीमाऊ सिद्धेश्वर मंदिर सोलापूर झोडणी मन मोराचा यल्लो यल्लो स्वीट फेल्लो गावातील एक सकाळ this slideshow requires javascript कोडॅक झेड ९८१ ची सोबत सोडतांना मी कॅनॉन ११०० डी ह्या नव्या मित्राशी गट्टी जमवली आहे डीएसएलआरच्या जगात शिरायची ही वेळ योग्य आहे कि माहीत नाही पण केव्हातरी शिरायचं होतच तर आता का नको तेव्हा आता नव्या मित्राच्या सोबतीने परत इथे प्रगट होईनच तब तक के लिये तरी जाताजाता म्हणावास वाटतेय कॅमेरा साथ है तो मुझे क्या कमी है मार्च 8 मार्च 8 2013 by देवेंद्र चुरी posted in तंत्रज्ञान भटकंती माझ्याबद्दल tagged album अल्बम कॅमेरा कोडॅक छायाचित्र डिजीटल डीएसएलआर निकॉन फोटो भटकंती सोनी camera canon dslr kodak nikkon photo sony trek comments 13 2012 in review दवबिंदुच्या समस्त वाचकांना ख्रिस्ती नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तस बघायला गेल तर ह्यावर्षी दवबिंदुवर सक्रिय अस लिखाण झाल नाही वर्षभरात फक्त ७ पोस्ट ब्लॉगवर टाकल्या पण तरीही खालील आकडेवारी पाहता तूम्ही दवबिंदुवर तुमचा लोभ फक्त तसाच न ठेवता अजून वाढवलाच आहे हे दिसून येते ह्यावर्षी जगभरातल्या तब्बल ८८ देशातून वाचकांच्या ४१ ००० भेटी दवबिंदुला लाभल्या तुमच्या ह्या प्रेमामुळेच माझ्या कंटाळ्याला झटकून नवीन वर्षात नियमित लिखाण करायचा प्रयत्न करेन प्रयत्न म्हटलंय हा चला तर नव्या उमेदीने नव्या स्वप्नांनी ह्या नवीन वर्षाचे स्वागत करूया हे वर्ष सर्वांनाच धमाल आनंदाचे जावो हि सदिच्छा here s an excerpt 4 329 films were submitted to the 2012 cannes film festival this blog had 41 000 views in 2012 if each view were a film this blog would power 9 film festivals click here to see the complete report जानेवारी 1 जानेवारी 1 2013 by देवेंद्र चुरी posted in माझ्याबद्दल tagged 2012 2013 दवबिंदु ब्लॉग वर्ष वार्षिक अहवाल शुभेच्छा २०१२ २०१३ blog report year comments 3 पोस्टचे नॅव्हिगेशन older posts अभिमान आहे शोधा ब्लॉगवरील लिखाण ई मेलद्वारे मागवण्यासाठी इथे तुमच्या विरोपाचा पत्ता दया email address मला जोड़ा join 905 other subscribers अशी पाखरे येती 262 094 भेटी आता भेट देणारे पाहुणे ताजे लेख 2013 in review खेळ मांडला आपण हे करायचे का क्यामेरा साथभी गवाँरा नही भेट अशेरीभाईंची दवबिंदू दवबिंदू वाचकांना आवडलेले लेख लोकप्रिय 2013 in review खेळ मांडला आपण हे करायचे का क्यामेरा साथभी गवाँरा नही तुमच्या ब्लॉगवर दवबिंदु लावण्यासाठी खालील कोड कॉपी पेस्ट करा a href https davbindu wordpress com target _blank img src https davbindu files wordpress com 2011 10 davbindu01 125 jpg a वर्गीकरण अनुवाद 5 अर्थविश्व 7 आरोग्य 2 इडीअट बॉक्स 4 इतिहास 1 कथा 2 कविता 10 काहीतरी 6 खेळ 6 चारोळी 13 तंत्रज्ञान 3 पाउस 9 पुस्तक 8 भटकंती 22 मनोरंजन 20 माझ्याबद्दल 30 माहिती 24 ललित 1 व्यक्ति आणी वल्ली 13 सामाजिक 19 सिनेमा 21 uncategorized 2 कालानुक्रमे कालानुक्रमे महिना निवडा डिसेंबर 2013 1 मे 2013 1 मार्च 2013 2 फेब्रुवारी 2013 1 जानेवारी 2013 2 डिसेंबर 2012 1 नोव्हेंबर 2012 1 जुलै 2012 3 जून 2012 1 जानेवारी 2012 1 नोव्हेंबर 2011 1 ऑक्टोबर 2011 2 सप्टेंबर 2011 3 ऑगस्ट 2011 3 जुलै 2011 5 जून 2011 2 एप्रिल 2011 1 मार्च 2011 2 जानेवारी 2011 4 डिसेंबर 2010 1 नोव्हेंबर 2010 3 ऑक्टोबर 2010 3 सप्टेंबर 2010 5 ऑगस्ट 2010 6 जुलै 2010 1 जून 2010 5 मे 2010 5 एप्रिल 2010 5 मार्च 2010 5 फेब्रुवारी 2010 4 जानेवारी 2010 8 डिसेंबर 2009 1 नोव्हेंबर 2009 6 ऑक्टोबर 2009 9 सप्टेंबर 2009 8 ऑगस्ट 2009 3 जुलै 2009 19 वाचकांची प्रतिक्रिया देवेंद्र चुरी च्यावर डॉ विक्रम साराभाई sanjay patil च्यावर डॉ विक्रम साराभाई अस्सल सोलापुरी च्यावर मॅड sandeep gavali च्यावर पाऊस पडत असताना ४ neha mahale च्यावर मीच का देवा sneha patel च्यावर खेळ मांडला भेट अशेरीभाईंची दवबिंदु च्यावर मिशन तांदुळवाडी भेट अशेरीभाईंची दवबिंदु च्यावर किल्ला कोहोजचा yashwant च्यावर महाराष्ट्राचा एव्हरेस्ट सर ऑफबीट वाटेने shree korde च्यावर 2012 in review कुण्या गावाच आल पाखरू ब्लॉग मला खुणावणारे ऐसी अक्षरे मेळविन अनुक्षरे अब्द शब्द अभिलेख काय वाटेल ते डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा प्रकाशरानातून चालतांना बाबाची भिंत भट्कंती unlimited भानस भुंगा मन उधाण वार् याचे मनमौजी मनाचे बांधकाम माऊ माझिया मना माझी सह्यभ्रमंती माझ्या कविता मैथीली थिंक्स मोगरा फ़ुलला सहजच सिनेमा कॅनव्हास हरकत नाय मराठी ई पेपर्स केसरी तरुण भारत बातम्या कॉम महाराष्ट्र टाईम्स लोकमत लोकसत्ता सकाळ सामना विरंगुळा उपक्रम नेटभेट मनोगत मराठी माती मराठी वर्ल्ड मायबोली उचलेगिरीस सक्त मनाई मी ऑरकुटवर http www orkut co in main profile rl mp uid 2558415042811304899 टिव टिव tweets by davbindu davbindu wordpress com 72 100 ब्लॉग डिरेक्टरी flickr photos अधिक फोटो blog at wordpress com देणगी घ्या सबस्क्राइब करा subscribed दवबिंदु join 141 other subscribers sign me up have a wordpress com account log in now गोपनियता दवबिंदु view site in reader manage subscriptions साइन अप करा लॉग ईन report this content collapse this bar loading comments write a comment ईमेल required नाव required वेबसाईट design a site like this with wordpress com सुरु करूया
|