Meta tags:
Headings (most frequently used words):
2026, बोशांको, ची, भेट, भाग, august, tuesday, मी, काली, आणि, अब्द, शब्द, pages, thursday, 13, saturday, july, 18, april, 21, february, 24, sitemeter, बुक, शोध, two, more, blogs, जुनी, पाने, वाचक, कोण, typical, khasi, house, labels, वाचते, वाचकांची, आवड, subscribe, to, blogadda, footsteps, 2014, onwards, २८४, दक्षिणेकडं, जाताना, विविधांगी, माणसं, चेन्नेमध्ये, बसचा, प्रवास, २८३, मेघनाद, मंदिर, गिरीश, मंच, मेघनादवध, काव्य, गौतम, हालदार, २८२, जुनं, कोलकाता, २८१, शांतिनिकेतन,
Text of the page (most frequently used words):
आणि (153), आहे (127), ago (86), years (69), मला (55), आहेत (54), नाही (54), होते (52), काही (46), होती (45), असं (42), त्या (39), एका (35), होता (35), होतं (33), इथं (32), मध्ये (31), म्हणजे (30), दोन (26), त्यांनी (24), म्हणून (22), तिथं (21), माहिती (20), नाव (19), #शांतिनिकेतन (18), माझ्या (17), आम्ही (17), आलं (17), अनेक (17), त्यांना (17), बंगाली (17), त्यामुळे (16), वाटलं (16), नव्हतं (15), अशा (15), 2014 (14), तीन (14), जागा (14), 2013 (14), मेट्रो (14), प्रवास (14), कोलकाता (14), चित्रं (14), तरी (13), यांच्या (13), february (13), 2010 (13), 2011 (13), 2012 (13), होत्या (13), यांनी (13), भाषा (12), माणसं (12), इतिहास (12), april (12), केवळ (12), केली (12), केलं (12), परिसरात (12), झाली (12), फक्त (12), ट्रेन (12), जास्त (11), भेट (11), भाग (11), लक्षात (11), july (11), june (11), पाहायला (11), काय (11), अशी (11), मुख्य (11), बर्थ (11), august (10), येत (10), गेले (10), march (10), 2026 (10), कळलं (10), आली (10), फार (10), सांगितलं (10), तिकिट (10), लोअर (10), कविता (9), आधी (9), ठिकाणी (9), घेऊन (9), भागात (9), आला (9), किंवा (9), 2009 (9), may (9), september (9), 2015 (9), केला (9), दुसऱ्या (9), करत (9), त्यांच्या (9), तास (9), गर्दी (9), खूप (9), अगदी (9), मंदिर (9), काळ (8), केंद्र (8), बाहेर (8), शब्द (8), कोलकात्यात (8), मेघनाद (8), माझी (8), पुन्हा (8), रेल्वे (8), रामकृष्ण (8), पुस्तक (8), october (8), december (8), january (8), 2016 (8), झालं (8), तरीही (8), सगळं (8), वेळ (8), आम्हाला (8), संग्रहालय (8), झाला (8), प्रसिद्ध (8), आता (8), तेव्हा (8), स्थानकावर (8), स्थानक (8), चेन्नै (8), आजही (7), आपण (7), this (7), english (7), जायचं (7), मराठी (7), विचार (7), मूर्ती (7), याच (7), एकदा (7), months (7), मुलं (7), बंगाल (7), गौतम (7), november (7), जुन्या (7), राहिले (7), आपल्याला (7), असतं (7), गेलो (7), दिसलं (7), प्रयोग (7), पाहून (7), टागोर (7), दिवस (7), नव्हती (7), हिंदी (7), उभं (7), हुगळी (7), दिसली (7), मोठी (7), ट्राम (7), रांगेत (7), गप्पा (7), comments (6), कला (6), पाच (6), याची (6), you (6), want (6), read (6), post (6), available (6), here (6), दक्षिणेश्वर (6), पाँडिचेरीला (6), थोडा (6), पाणी (6), शिक्षण (6), पश्चिम (6), अनुभव (6), पूर्ण (6), असे (6), प्रश्न (6), दिसतं (6), दोन्ही (6), संवाद (6), अंतर (6), पाहताना (6), भाषेत (6), गेलं (6), छान (6), दिसत (6), राहिलं (6), वर्ष (6), त्याचं (6), इतर (6), छोट्या (6), रवीन्द्रनाथांनी (6), इथल्या (6), भवन (6), बाजूला (6), बाडी (6), घरात (6), पाठ (6), वगैरे (6), शांत (6), जातं (6), जाऊन (6), असतो (6), जागतिक (6), नव्हता (6), हावडा (6), ब्रिटिश (6), इमारत (6), मोठ्या (6), सुमारे (6), दहा (6), दिवशी (6), चालू (6), लोक (6), गेली (6), हालदार (6), शहर (5), रात्री (5), संस्कृती (5), मनात (5), सुंदर (5), आपली (5), नवा (5), रस्ता (5), तरुण (5), आमच्या (5), blog (5), बुक (5), झाले (5), पुणे (5), विवेकानंद (5), पुस्तकं (5), गंगा (5), 2019 (5), 2023 (5), 2024 (5), 2025 (5), असून (5), आपल्या (5), समोर (5), याचं (5), असा (5), प्रदर्शन (5), फोटो (5), नाहीत (5), आणखी (5), वाटत (5), असेल (5), लागलं (5), रवीन्द्रनाथांच्या (5), सरकारी (5), काळात (5), रवीन्द्रनाथ (5), तयार (5), त्यात (5), बांग्ला (5), पाहता (5), करताना (5), अजूनही (5), वर्ग (5), आश्रम (5), परिसर (5), सांस्कृतिक (5), स्थापना (5), यांचा (5), पर्याय (5), बंद (5), टागोरांनी (5), कारण (5), झालेली (5), योग्य (5), भव्य (5), बंगालच्या (5), थेट (5), कॉफी (5), बोई (5), पारा (5), विविध (5), असते (5), काव्य (5), बसले (5), गिरीशचंद्र (5), गिरीश (5), लोकांना (5), ताई (5), सगळे (5), posts (4), सकाळी (4), बँकॉक (4), आले (4), पडलो (4), कल्पना (4), अवघड (4), मुली (4), बोशांको (4), काली (4), जाताना (4), पुरुष (4), स्त्री (4), कुठं (4), ऐतिहासिक (4), अर्थात (4), राजकीय (4), प्रवासी (4), चित्रकला (4), labels (4), 2017 (4), जुनी (4), posted (4), aativas (4), पुढच्या (4), किती (4), समजून (4), प्रयत्न (4), पाहिलं (4), जाणवलं (4), अतिशय (4), जिवंत (4), त्यांची (4), शांतिनिकेतनला (4), शांतिनिकेतनमध्ये (4), बोस (4), मात्र (4), बरीच (4), सांगत (4), काम (4), नंतर (4), काहीच (4), देत (4), नावं (4), वेगवेगळ्या (4), संग्रहालयात (4), चर्चा (4), महात्मा (4), गांधी (4), आठवण (4), गायक (4), करता (4), सर्वात (4), जुनं (4), पुढं (4), त्यांचं (4), लहान (4), प्रकारचा (4), दिलं (4), मोठं (4), भेटीत (4), लागले (4), तिकिटं (4), हेरिटेज (4), विश्वभारती (4), स्थानिक (4), भारतीय (4), तसंच (4), लगेच (4), गोष्टी (4), लोकांच्या (4), कमी (4), कोलकात्याच्या (4), सरस्वती (4), तिथल्या (4), येऊन (4), असल्याने (4), आतमध्ये (4), निघालो (4), कुणी (4), पूर्णपणे (4), अर्थ (4), महत्त्वाचं (4), स्मारक (4), प्रत्यक्षात (4), किलोमीटर (4), व्यवस्था (4), अत्यंत (4), राणी (4), नेताजी (4), मन्नाडे (4), हाऊस (4), सुरू (4), सहज (4), जोरासांको (4), पूल (4), पूर्वी (4), अजून (4), स्थानकं (4), मंदिरात (4), त्याचा (4), यांचं (4), असतात (4), असलेल्या (4), बोलणं (4), प्रान्तिक (4), अडीच (4), मधल्या (4), मेघनादवध (4), बदलून (4), मंच (4), दर्शन (4), उभे (4), त्यांच्याशी (4), उभ्या (4), राहिल्या (4), त्याने (4), सेंट्रल (4), गटाच्या (4), साईड (4), all (3), atom (3), खरं (3), पोचले (3), अब्द (3), कोण (3), चालले (3), वेळी (3), निवांत (3), सात (3), सोबत (3), दिशा (3), उत्साहाने (3), करणारी (3), अनोळखी (3), कोलकात्यातला (3), मुक्काम (3), संपत (3), वर्षांत (3), २८४ (3), दक्षिणेकडं (3), च्या (3), मार्ग (3), the (3), जन्म (3), माझे (3), करू (3), मेकप (3), माणूस (3), year (3), weeks (3), सामाजिक (3), संस्कृ्ती (3), समाज (3), मुंबई (3), मातीचं (3), बोलपूर (3), बदल (3), निसर्ग (3), उत्तर (3), अरविंद (3), 2018 (3), उपलब्ध (3), नक्की (3), नवी (3), दृष्टी (3), दिली (3), तिचं (3), आपलं (3), कशी (3), साधेपणा (3), घ्यायला (3), असणाऱ्या (3), विश्व (3), ठेवून (3), सगळी (3), कळत (3), अर्थातच (3), दालनात (3), कसं (3), तिथून (3), इतकी (3), गणेश (3), कदाचित (3), लागेल (3), प्रतिकृती (3), मिळतात (3), दिसला (3), झालेला (3), काढलेली (3), सर्व (3), पुतळा (3), चार (3), परत (3), घेतला (3), संदर्भ (3), तशी (3), फारशी (3), वाटली (3), भारती (3), वादक (3), होऊन (3), वर्णन (3), गृह (3), याही (3), इमारतीत (3), झालेल्या (3), पर्यटक (3), त्याच्या (3), घेत (3), सुरूवात (3), वापरात (3), उंच (3), पहिल्या (3), महत्त्व (3), ठिकाणं (3), काढून (3), इंग्रजी (3), वगळता (3), वॉक (3), होतो (3), येणाऱ्या (3), येऊ (3), परंपरा (3), पुढे (3), सुरु (3), करणं (3), जाणं (3), घेतली (3), केलेला (3), दिसतो (3), गोष्ट (3), हळूहळू (3), वस्तू (3), बाजार (3), येतं (3), आठवतं (3), निर्माण (3), करून (3), गेल्या (3), असल्यामुळे (3), राहिला (3), दीड (3), म्हणत (3), जवळजवळ (3), म्हटलं (3), नेमका (3), सोय (3), इंडो (3), संगम (3), साध्या (3), गरज (3), अनेकदा (3), कळल्यावर (3), सध्या (3), भारत (3), घरी (3), नाहीये (3), एकूण (3), नदी (3), लागते (3), करण्यात (3), पांढऱ्या (3), सत्यजित (3), गेल्यावर (3), असत (3), झाल्या (3), जागेत (3), कॉलेज (3), पुस्तकांची (3), शेकडो (3), तिकडं (3), दिसतात (3), तशीच (3), रांग (3), असल्याचं (3), कधी (3), चपला (3), पडलं (3), परिसरातल्या (3), म्हणूनच (3), चालत (3), दिसले (3), आहोत (3), माणसाला (3), रासमणी (3), जगबंधु (3), मंदिरं (3), जाता (3), प्रवेश (3), स्वामी (3), विषय (3), राहून (3), नदीत (3), विचारलं (3), सार्वजनिक (3), पूजा (3), ब्रिज (3), जणू (3), शांतपणे (3), मजा (3), इतक्या (3), प्रवाह (3), त्यांचे (3), समजत (3), मधुसूदन (3), नाट्यप्रयोग (3), नसून (3), परमहंस (3), माझ्यासाठी (3), अमेरिकन (3), मंदिराचं (3), स्केच (3), हवा (3), बँक (3), नेहमी (3), बाई (3), सुमारास (3), बेलूर (3), तामिळ (3), बसमध्ये (3), मदत (3), चेन्नैला (3), एमएएस (3), दरवाजे (3), एआयने (3), कोयम्बेडू (3), बॅगा (3), राहण्याची (3), तिरुपतीला (3), रेणिगुंठाला (3), गाडी (3), मिनिटं (3), गंमत (3), प्रवासात (3), काका (3), आदराने (3), simple (2), subscribe (2), चित्र (2), तसं (2), अचानक (2), धावती (2), अधिकृत (2), भिंत (2), सांगणं (2), बसून (2), चहा (2), ज्या (2), दरवेशी (2), पहिली (2), चढून (2), येणारी (2), पाऊस (2), २८३ (2), बऱ्याचा (2), सहजच (2), कधीतरी (2), शेवटची (2), show (2), दरम्यान (2), marathi (2), review (2), साहित्य (2), शुभेच्छा (2), वढाय (2), बाबासाहेब (2), सामान (2), मांडणी (2), चिन्ह (2), बाबा (2), रोचक (2), प्रा (2), हरी (2), नरके (2), आपला (2), पार (2), निवडणूक (2), प्रेम (2), प्रभू (2), month (2), दुर्गा (2), स्त्रिया (2), परीक्षा (2), समुद्र (2), वैचारिक (2), वेदान्त (2), रमण (2), प्रदेश (2), धर्म (2), दृष्टिकोन (2), हवेली (2), आंबेडकर (2), जगणं (2), कन्याकुमारी (2), कथा (2), आनंद (2), २०१९ (2), 2021 (2), स्वतंत्र (2), लेख (2), आंतरजालावर (2), निवडक (2), अंश (2), प्रकाशित (2), शोध (2), इथे (2), home (2), जाऊ (2), राहील (2), जगात (2), नेमकं (2), समजलं (2), साधना (2), सौंदर्य (2), खरी (2), लिपी (2), येतील (2), माझ्यासारख्या (2), अद्भुत (2), सुखावणारं (2), प्रकार (2), शांतिनिकेतनच्या (2), तरूण (2), तोही (2), चित्रांचं (2), ऋत्विक (2), घटक (2), बैज (2), मुखर्जी (2), बिनोद (2), बिहारी (2), डोळ्याने (2), काढत (2), वारंवार (2), प्रदर्शनाची (2), यावं (2), रवीन्द्रनाथांचं (2), बहुतेकांना (2), देणारे (2), महत्त्वाचे (2), नंदलाल (2), तिथली (2), ट्रेसिंग (2), नीट (2), कर्मचारी (2), सहा (2), केलेली (2), असतील (2), पडला (2), विकत (2), लक्ष (2), नव्हते (2), खरेदी (2), उत्साह (2), वेगवेगळे (2), उदिची (2), वेगवेगळी (2), घरं (2), श्यामली (2), घरांमध्ये (2), लोकांशी (2), पत्रव्यवहार (2), काढायला (2), परवानगी (2), फिरताना (2), श्रीमंत (2), जाणवतं (2), १९६१ (2), मिळालेल्या (2), नोबेल (2), पारितोषिकाची (2), रवीन्द्रनाथांचा (2), आइन्स्टाईन (2), मृत्यूनंतर (2), १९४२ (2), उभारलं (2), दुसरं (2), स्मरणार्थ (2), दिला (2), मातीची (2), चूल (2), खाल्ला (2), इथली (2), शाळकरी (2), मुला (2), प्रजासत्ताक (2), उशीर (2), नूतन (2), १९०२ (2), बांधलेलं (2), परिसरातलं (2), लिहिल्या (2), नेमक्या (2), आठवत (2), यांची (2), नृत्याचा (2), सराव (2), आपल्याकडं (2), आसपास (2), असो (2), चांगलं (2), कार्यालय (2), १९०१ (2), उल्लेख (2), रंग (2), आवडला (2), रचना (2), रोजच्या (2), वर्तुळ (2), विद्यार्थी (2), बसतात (2), आकाशाखालचे (2), भरतात (2), सप्तपर्णी (2), वृक्ष (2), ध्यान (2), बऱ्याच (2), अंतरावरून (2), छंद (2), घेता (2), ठेवली (2), मार्गदर्शक (2), बोलणाऱ्या (2), तोरण (2), यातली (2), पाहिली (2), जरा (2), बोलपूरला (2), पोचल्याने (2), ओळखलं (2), श्रीनिकेतन (2), मिळून (2), जातो (2), नकाशा (2), लोकांसाठी (2), वारसा (2), शिक्षणाचा (2), संपूर्ण (2), बौद्धिक (2), आंदोलन (2), कलाकार (2), देश (2), जिथं (2), १९२१ (2), याला (2), शैक्षणिक (2), शिक्षणाच्या (2), नाथ (2), न्द्र (2), नावाच्या (2), देवेन्द्रनाथांनी (2), एकर (2), मोकळ्या (2), १८६३ (2), रवींद्रनाथ (2), वडील (2), सुदैवाने (2), रोज (2), उलगडत (2), प्रकारे (2), फिरायचं (2), व्यक्तीला (2), टागोरांचं (2), टिकून (2), नसलेले (2), ऐकलं (2), tuesday (2), समजल्या (2), कोलकात्याचं (2), असावं (2), सणांमध्ये (2), बरंच (2), आयुष्यात (2), योग्यच (2), नेहमीप्रमाणे (2), जाणीव (2), घेतलं (2), मोडक्यातोडक्या (2), पडले (2), एखादं (2), श्वास (2), आलेली (2), तेही (2), जमलं (2), काळातील (2), मिळते (2), परदेशी (2), आकर्षक (2), केले (2), थोडी (2), दिसायला (2), गोथिक (2), बांधकाम (2), गाईडने (2), सरकार (2), पाण्याचे (2), वापर (2), तलाव (2), साधारण (2), काहीही (2), आणलं (2), दुपारी (2), संगमरवरी (2), विस्तीर्ण (2), आवडलं (2), हातात (2), जुने (2), छायाचित्रं (2), शक्य (2), इंडियन (2), हॉल (2), सुभाषचंद्र (2), एकत्र (2), १८७६ (2), केलेल्या (2), अल्बर्ट (2), पासून (2), जावंच (2), शब्दांत (2), पंधरा (2), युनिवर्सिटी (2), हेअर (2), स्कूल (2), हिंदू (2), सोसायटी (2), सहकारी (2), दुकानं (2), बाजारपेठ (2), आशियातली (2), दुर्मिळ (2), इमारतीच्या (2), नागरिक (2), काळी (2), दिलेल्या (2), नोंद (2), त्यातून (2), आधारित (2), पेन (2), द्वारकानाथ (2), पन्नासपेक्षा (2), १८६१ (2), रोजी (2), ठाकुर (2), मानलं (2), रस्ते (2), नमस्कार (2), करणारे (2), उदाहरणार्थ (2), वाचून (2), याचा (2), येणं (2), गोंधळ (2), १९८४ (2), कोलकातामध्ये (2), मेट्रोचं (2), लाईन्स (2), प्रकारचे (2), १८७३ (2), इलेक्ट्रिक (2), मंद (2), मार्गांवर (2), थांबलो (2), व्यवस्थित (2), घराच्या (2), गल्लीत (2), विवेकानंदांच्या (2), सुप्रसिद्ध (2), आलेले (2), पहिल्यांदा (2), स्टेडियम (2), दुसरा (2), वेगळ्या (2), आमच्याशी (2), मराठीत (2), जातील (2), देबाहुती (2), कोलकात्याचा (2), दूरवर (2), मोठाल्या (2), वसंतपंचमीच्या (2), घाटाला (2), लागून (2), उभा (2), आलो (2), त्यावर (2), स्थानकाच्या (2), जाण्याचा (2), कोणत्याही (2), लागली (2), घाटावर (2), स्थानकात (2), फलाटांच्या (2), प्रशस्त (2), उशीरा (2), झालमुडी (2), ट्रेनमध्ये (2), जवळ (2), फलाट (2), दिशेने (2), ऐकताना (2), रंगभूमीवर (2), रौद्र (2), मंदोदरी (2), लक्ष्मण (2), राम (2), दाखवणारे (2), टाकलेली (2), ठेवलं (2), नसताना (2), सादर (2), अभिनेते (2), दिग्दर्शक (2), तीस (2), वर्षांच्या (2), हजार (2), रुपये (2), नवल (2), मिळाली (2), एकच (2), देणं (2), घोष (2), देण्यात (2), व्यावसायिक (2), होतात (2), त्यासाठी (2), उभी (2), जात (2), पाहणं (2), पाँडिचेरी (2), प्रतीक्षाने (2), तुम्हाला (2), मंदिराच्या (2), येईल (2), पारंपारिक (2), शिखरं (2), नदीच्या (2), एकाच (2), जाणाऱ्या (2), ब्राह्मण (2), त्याला (2), पुजारी (2), लागला (2), घाण (2), म्हणाल्या (2), एवढी (2), रांगा (2), त्यातल्या (2), त्यांच्यासोबत (2), पुढचे (2), निमलष्करी (2), अधिकारी (2), येतात (2), माझं (2), बोलायला (2), लागल्या (2), गंगेचा (2), माणसांनी (2), बाहेरून (2), साधारणपणे (2), बसला (2), पाँडिचेरीत (2), चेन्नेत (2), बोलता (2), भरावा (2), जाणारी (2), एसी (2), नसली (2), करुन (2), बॅग (2), होत (2), फलक (2), त्यांच्यासाठी (2), शिकणं (2), दुसरी (2), मेट्रोमध्ये (2), बहुतेक (2), नेहमीच्या (2), प्लॅटफॉर्म (2), वेगळा (2), उतरायला (2), उतरले (2), समोरच (2), central (2), बायकांच्या (2), पुरुषांच्या (2), फरक (2), आधीच (2), आग्रहाने (2), रिकामी (2), काकांना (2), तुम्ही (2), टीसी (2), घेतलेल्या (2), घरचं (2), जेवण (2), कौतुक (2), एकदम (2), ट्रेनने (2), योगी (2), निवृत्त (2), कारगिल (2), माझ्याशी (2), जाणार (2), संभाषण (2), कानांवर (2), बदलत (2), आग्रह (2), सोडून (2), विरळाच (2), सुपरफास्ट (2), पावलं (2), एआयला (2), theme, powered, blogger, footsteps, onwards, blogadda, प्रसंगाला, वर्षांपेक्षा, उलटून, गेलाय, जसच्या, डोळयांसमोर, राहतं, शनिवारच्या, ११७, सांभाळ, द्यायच्या, यादीत, कामासाठी, गुरूवारी, थाई, लँडच्या, २३८, गटाची, मीटिंग, संपली, सगळ्याजणी, ग्रामपंचायतीच्या, कार्यालयातून, स्वयं, सहाय्यता, भारदस्त, असलं, रुपयांची, यातलं, चाल, फूलघर, झाडांनी, वेढलेली, संध्याकाळच्या, सगळेजण, पीत, तेजस्वी, आवाज, विचारतो, मनुष्याला, ११८, पाउले, आकाशी, चालावे, नसलो, सावली, शोधावा, पायांना, फुटल्याच, आहेतच, गावे, प्रत्येक, शिबिराची, संध्याकाळ, डोंगर, दमून, प्रफुल्लित, चेह, मुल, त्यांच, स्वागत, तितक्याच, महेश, काल, परवा, पुण्यात, वीज, दंगामस्तीसह, हमखास, अनिलांची, पेर्ते, व्हा, संग्रहातली, अनिलांचा, वाचकांची, आवड, एस्पीडीपी, शुभांगी, डोक्यातल्या, खोक्यात, भ्रम, णगाथा, रमलखुणा, मांडवगण, how, about, मधुरिमा, कुळकर्णी, रमेशची, कैफियत, स्वच्छंदी, manatla, thodasa, निमित्ताने, darmyaan, त्रिवेणी, murali, खताचा, खांब, धागे, दोरे, व्यवहार, रसिक, सानुल्या, सैंपाकघरी, remichi, boli, रेमीची, बोली, साठी, पिंजरा, संवादिनी, कुठला, म्हणेल, बलात्कार, व्हायलाच, हवेत, मुकामार, पाय, isolated, portal, mayuresh, kulkarni, नळदुर्गच्या, किल्ल्यात, वटवाघळांचा, घरोबा, amazing, bats, निसर्गवार्ता, ग्रीनवॉशिंग, ग्राहकांची, जागरूकता, iravati, अरुंधती, आनंदोत्सव, दीपोत्सव, फराळोत्सव, फटाकेत्सव, सरदेसाईज, दवबिंदु, उमेद, कागद, अन्, लेखणी, मार्केसचा, जादुई, वास्तववाद, तिसरे, literature, शाणपट्टी, शुऽऽऽ, बोलायचं, पांढर्, यावरचं, काळं, नवे, मोनो, सुचलेलं, अभिनंदन, avinash, dharmadhikari, ripple, creative, mau, मनातला, किल्ला, मनातले, गॉड, स्मॉल, थिंग्झ, शतपावली, वाचू, त्यानंदे, टॅलीनामा, करड्या, छटांचा, मागोवा, आतून, अग्निसखा, थोडे, जरुरत, restiscrime, संघासमोरचे, आव्हान, उलट, तपासणी, बिर्याणीस्तोत्रम्, hymn, biryani, manogate, इतका, लळा, अफ़ू, गुणी, गोडगप्पा, लसणाचे, आक्षे, लढाई, टेनिस, कोर्टची, उधाण, वार्, याचे, सर्वस्पर्शी, विशेषांक, प्रकाशन, बातम्या, घेतात, कृती, कोहम, जास्वंदाची, फुलं, विद्रोह, ढोंग, नेमाने, नेमाडे, बाप्पाची, new, facebook, page, मेरा, कुछ, टिकवण्यासाठी, एवढं, मनस्पंदने, अर्थक्रांती, ढोबळ, विपरीत, तर्क, भुरळ, पाडणारा, प्रचार, ओसरी, हुमुहुमुनुकूनुकूआप्वा, हवाई, मेमरीज, tangents, मॉन्सून, रंजन, केळकर, ह्यांच्या, परिचय, मोकळीक, ledge, आल्हादक, प्रतिबिंब, अप्राप्य, शहाणपणाची, vaiddyacha, वैद्याचा, ब्लॉग, बाप, वटवट, सत्यवान, सूक्ष्मजीवांना, घाबरतो, मनगुज, तुंबाड, विशुभाऊ, फळा, वाढदिवस, पुष्पगुच्छ, केक, swings, mind, स्पंदन, एकत्व, आपुले, विचारयज्ञ, vicharyadnya, परमेश्वराचा, अवतार, अळवावरचे, वनवास, मनमौजी, आतल्यासहित, शांतवन, भिजपाऊस, लंडन, क्षणचित्रे, नॅचरल, हिस्टरी, म्युझियम, pre, तरंग, सहेला, रंजक, सेरीज, आठवणिंचे, पिंपळपान, आॅस्ट्रेलिया, आयलंड, काॅंटिनेंट, सफर, सिडने, मेलबोर्न, tarang, किर्तीमहल, माझिया, मना, मोकळे, आकाश, meek, will, not, inherit, earth, डीडीच्या, दुनियेत, akhil, world, अखिलचं, आरक्षण, गेल्याने, ओबीसी, संकटात, prof, hari, narke, वाईन, स्टेट, zula, unke, dushman, hai, bahut, aadmi, aacha, hoga, रक़्स, करना, sahajach, हरवलेल्या, हिवाळ्याच्या, शब्दवेल, परिचित, प्रवाहाविरोधातला, फ्लो, सिनेमास्कोप, बेड़ा, अत्रे, उवाच, साडे, तासांचा, सफाईदारपणा, धुरंधर, movie, dhurandhar, रणजित, पराडकर, ranjeet, paradkar, रसप, द्वार, द्वारका, कोडं, राफा, तुलसी, अनोखी, अनुभूती, श्रुतीसंवेदना, what, achieved, india, now, quantum, communications, and, why, significant, aksharadhool, सुनीताबाईंचा, डोडी, गाजलेली, मैफिल, निळाईची, गाज, नरेन्द्र, घरातली, मोसम, सत्तेचाळीस, वर्षांची, अनुभवसंपन्नता, नरेंद्र, गोळे, महालक्ष्मी, पूर्वतरंग, भागवतांच्या, भाषांतरात, वॉल्डन, विल्हेवाट, रेघ, वेदमूर्ती, पक्षी, week, लोगोकथा, पार्ले, कथापौर्णिमा, days, अमेरिकेची, पूर्वेकडची, ट्रीप, photo, स्मृति, वाचते, हॉस्पिटल, हरियाणा, स्मरणशक्ती, स्थापत्य, सौमित्र, सिंगापूर, सिक्कीम, साहित्यभूषण, सावित्रीबाई, फुले, सावित्री, सावरकर, कार्यकर्ते, सातपु़डा, शीख, शतशब्दकथा, शंकराचार्य, विविधता, विज्ञान, विचित्रपणा, विकास, वासंती, मुझुमदार, वाचननोंद, लष्करी, सत्ता, ललित, रेचल, कार्सन, रामानुजाचार्य, राजस्थान, महर्षी, म्यानमा, मौन, मोझाम्बिक, मेघालय, मुक्तक, महाराष्ट्र, मर्ढेकर, मध्वाचार्य, मध्य, मणिपूर, भटकंती, बिहार, बोरकर, फिलिपिन्स, प्राणी, प्रसारमाध्यमं, प्रभा, गणोरकर, पोलीस, पॉण्डिचेरी, रेगे, पानिपत, पर्यावरण, पंजाब, नारायण, सुर्वे, नाती, नर्मदा, दिल्ली, दादरा, नगर, दहशतवाद, त्रिवेंद्रम, त्रिपुरा, तालिबान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, डवाव, जीवनशैली, जलव्यवस्थापन, छत्तीसगढ, चरित्र, बुद्ध, गोवा, गुजरात, गांधीजी, गणित, खेडी, खाद्यसंस्कृती, केशवसुत, केरळ, केनिया, कुसुमाग्रज, कुरुक्षेत्र, काबूल, ओडिशा, उपनिषद, उत्तराखंड, आरती, आन्जी, आदिवासी, अहिंसा, अफगाणिस्तान, 161, अनिल, अण्णा, हजारे, २०१७, २०१४, shillong, meghalaya, typical, khasi, house, view, complete, profile, वाचक, पाने, transient, bonds, photoblog, times, change, two, more, blogs, ब्लॉगवरील, लेखन, पूर्णत, लेखी, पूर्वपरवानगी, घेतल्याविना, इथले, अन्यत्र, छापील, स्वरूपात, नयेत, विवेकानंदांचा, वाचा, अभिप्राय, जरूर, कळवा, sitemeter, older, भटकंतीत, शांतिनिकेतनने, गारूड, माझ्यावर, काळच, सांगेल, नातं, कुणाशी, कशाशी, पुरेसं, कलेची, करण्याइतकी, तिच्याशी, बांधिलकी, कलाकारांना, दिसू, शकतं, निसर्गाकडं, पाहण्याची, खरोखर, जगण्यात, चित्रांची, हवी, नुसती, अगणित, शक्यता, निरक्षर, व्यक्तीसाठी, नवं, एकाचवेळी, परक्यासारखं, वागणारं, बोलपूरमधली, प्रदर्शनं, चित्रकलेतलं, अपार, मिळाला, विद्यार्थ्याने, सोप्या, समजावून, सांगायचा, डोक्यावरून, प्रिंटमेकर, पेंटिंग, जीवनकार्यावरचं, यांचे, फारसे, चित्रपट, पाहिलेले, कृष्णा, रेड्डी, तीही, अप्रतिम, सगळीच, अंध, दूरचे, नसे, वास्तवदर्शी, आल्याने, निघावं, पाहण्यासाठी, सुरेख, benode, behari, mukherjee, ram, kinker, baij, रामकिंकर, nandalal, bose, आपल्यापैकी, त्यांच्यासमवेत, योगदान, चित्रकार, आमच्याविना, कुणीच, प्रकाशयोजना, दिसतंच, तिथले, सुरक्षा, उत्साही, अजंठामध्ये, शोधलं, सरांचं, विषयवारचं, पुस्तकात, सविस्तर, मार्गांनी, शोधावी, देणारं, पोस्टर, ajanta, mural, tracing, ganesh, haloi, हलोई, विक्रीकक्षात, चित्रांच्या, नेहमीचा, खाक्या, लोकांकडं, माझाही, करण्याचा, मावळला, घरांच्या, बांधणीत, केलेले, चकित, कोणार्क, उदयन, पुनश्च, घरांना, पाचही, वास्तव्य, उत्तरायण, पंधराशेपेक्षा, वर्गातली, गरीब, मध्यमवर्गीय, प्रकारची, आस्थेने, पहात, थबकून, बंगालसाठी, अभिमानाचा, अस्मितेचा, आस्थेचा, बिंदू, romain, rolland, आश्चर्यजनक, वैविध्यपूर्ण, इत्यादी, जन्मशताब्दी, रवीन्द्रनाथांना, रोमा, रोलां, बिचित्र, संग्रहालयाचं, रबीन्द्र, बाबासाहेबांचा, चौकात, चहाच्या, टपऱ्या, आंबेडकरांचा, कौतुकाने, दिल्लीतल्या, गृहस्थाने, वडिलांच्या, येताना, आलू, चाप, उच्चारलेही, ट्रेनमधल्या, वडिलांची, सहप्रवासी, आधीची, पोस्ट, कार्यक्रमाला, गर्दीही, त्यातही, मुलींची, संख्या, ड़ॉ, राज्यघटना, जानेवारीला, दिनाच्या, कार्यक्रमासाठी, पोचायला, प्रमुख, पाहुणे, पाहुण्यांनी, दिन, कार्यक्रम, चित्रप्रदर्शनं, भटकलो, तूफान, तल्लीन, गात, ऐकतानाही, प्रसन्न, शब्दांमध्ये, येणार, नतुन, मृणालिनी, देवी, पत्नी, कस्तुरबा, यातल्या, कुठल्या, इमारतीतील, भिंतींवर, छतावर, दिल, खुष, गया, ताजी, गाण्यावर, भवनमधली, पाहताहेत, गोष्टींकडं, अजिबात, सरावात, रममाण, एकला, चलो, वडाचं, झाड, रेंगाळताना, पारंब्यांवर, झोके, शेजारच्या, कट्ट्यावर, वास्तूकला, विलक्षण, नव्याचा, स्वीकार, जुन्यातलं, टिकवून, ठेवायची, साधली, प्रथमदर्शनी, फ्युजन, विद्यार्थ्यांना, भवनची, प्राथमिक, माध्यमिक, बिनभिंतींच्या, वर्गाचा, भवनचा, इमारतीचा, इमारतीची, शैलीही, भावली, शैलींचं, १९१९, बौद्ध, शैलीत, बांधलेला, घंटाताल, ठिकठिकाणी, वृक्षांच्या, आजूबाजूला, दगडी, वर्तुळाकार, कट्टा, वर्तुळाचा, भागापेक्षा, शिक्षक, शिक्षिका, बिनभितींचे, पहिलीपासूनचे, छातिम, ज्याला, वृक्षांखाली, देवेन्द्रनाथ, १८६२, जागेचं, कुंपणापलिकडून, पाहावे, बहुतांश, लांबूनच, न्याहाळता, समाजाला, लागलेलं, सेल्फीचं, वेड, भिंतीवर, कोरण्याचा, पर्यटकांमध्ये, वास्तूंमध्ये, आवश्यक, अनासुआने, भाषांमधले, गाईड्स, गटाबरोबर, गाईडसोबत, चालायला, लागलो, माहितीपत्रकात, छातिमतल, उपासना, तालध्वज, देहली, संतोषालय, घंटातल, पूर्व, सिंह, सदन, दिनांत्रिका, चीना, जागांचा, बाकी, वॉकचं, शुल्क, जास्तच, रविवारी, शनिवारी, हाच, आमचा, पहिला, उपक्रम, विद्यापीठीय, अभिव्यक्ती, जीवनदृष्टीची, औपचारिक, जीवनदृष्टी, शेती, समाजविकासाच्या, प्रयोगांसाठी, म्हणजेच, भौगोलिक, ग्रामीण, पुनर्रचना, मानवविद्येचे, विभाग, संगीत, विश्वभारतीचा, विस्तृत, विद्यापीठाचा, केंद्रबिंदू, ओळखला, शिकवणारी, विद्यार्थ्यांसाठी, दर्जा, स्थळा, unesco, मानवी, नातेसंबंध, ऋतू, मानणारा, त्यामुळेच, वर्गखोलीतलं, ज्ञान, सामूहिक, प्रयत्नातून, राहिलेलं, बनलं, विचारवंत, व्यक्तीचं, स्वप्न
Text of the page (random words):
िक आणि माध्यमिक शिक्षण दिलं जातं ज्या बिनभिंतींच्या वर्गाचा मी आधी उल्लेख केला आहे तो पाठ भवनचा भाग आहे आता या जुन्या इमारतीत कार्यालय आहे मला या इमारतीचा रंग फार आवडला इमारतीची रचना शैलीही मला भावली शांतिनिकेतनमध्ये अनेक शैलींचं फ्युजन दिसतं मग ती वास्तूकला असो की चित्रकला एक प्रकारचा साधेपणा आणि तरीही विलक्षण सौंदर्य असं शांतिनिकेतनमध्ये आजही जाणवतं नव्याचा स्वीकार करताना जुन्यातलं चांगलं ते टिकवून ठेवायची कला शांतिनिकेतनला साधली आहे असं प्रथमदर्शनी वाटलं वडाचं एक जुनं झाड त्या परिसरात आहे त्याच्या आसपास रेंगाळताना शांत वाटलं एक दोन लहान मुलं तिथं पारंब्यांवर झोके घेत होती शेजारच्या एका कट्ट्यावर एकला चलो रे या गाण्यावर पाठ भवनमधली मुलं मुली नृत्याचा सराव करत होती पर्यटक आपल्याकडं पाहताहेत का वगैरे गोष्टींकडं त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं ते त्यांच्या सरावात रममाण झाले होते नूतन बाडी बांग्ला भाषेत नतुन बाडी हे मृणालिनी देवी रवीन्द्रनाथ यांच्या पत्नी यांच्या मृत्यूनंतर १९०२ मध्ये बांधलेलं घर महात्मा गांधी आणि कस्तुरबा या घरात काही काळ राहिले आहेत शांतिनिकेतन गृह हे या परिसरातलं सर्वात जुनं घर याही इमारतीत महात्मा गांधी राहिले आहेत रवीन्द्रनाथांनी त्यांच्या पुढं प्रसिद्ध झालेल्या अनेक कविता याच घरात लिहिल्या आहेत यातल्या नेमक्या कुठल्या ते आठवत नाही पण एका इमारतीतील भिंतींवर आणि छतावर नंदलाल बोस यांची चित्रं पाहता आली दिल खुष हो गया इतकी ताजी आणि जिवंत चित्रं होती ती ती चित्रं पाहून काय वाटलं याचं वर्णन मला शब्दांमध्ये करता येणार नाही परिसरात दोन तास भटकलो आणि बाहेर पडलो बाहेर तूफान गर्दी होती त्यात हे दोन वादक गायक तल्लीन होऊन गात होते ते ऐकतानाही प्रसन्न वाटलं वादक प्रजासत्ताक दिन कार्यक्रम आणि चित्रप्रदर्शनं २६ जानेवारीला सकाळी पुन्हा विश्व भारती परिसरात गेलो ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला त्यामुळे प्रमुख पाहुणे कोण होते ते नेमकं कळलं नाही पण त्या पाहुण्यांनी राज्यघटना आणि ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर हे दोन शब्द उच्चारलेही नाहीत त्यामुळे मला ट्रेनमधल्या त्या तरूण वडिलांची माझे सहप्रवासी आठवण आली संदर्भ आधीची पोस्ट कार्यक्रमाला तशी फारशी गर्दीही नव्हती होती त्यातही शाळकरी मुला मुलींची संख्या जास्त वाटली तिथून परत येताना एका ठिकाणी आलू चाप खाल्ला आणि चहा घेतला इथली मातीची चूल छान होती मातीची चूल या छोट्या चौकात तीन चार चहाच्या टपऱ्या होत्या एका बाजूला डॉ आंबेडकरांचा पुतळा दिसला म्हणून कौतुकाने पाहायला गेले नवी दिल्लीतल्या एका गृहस्थाने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा पुतळा भेट म्हणून दिला आहे छान वाटलं ते पाहून बाबासाहेबांचा पुतळा एक दिवस रबीन्द्र भवन पाहिलं रवीन्द्रनाथांच्या मृत्यूनंतर १९४२ मध्ये हे उभारलं गेलं टागोर संग्रहालय असं याचं दुसरं नाव आहे इथल्या संग्रहालयाचं नाव आहे बिचित्र म्हणजे आश्चर्यजनक वैविध्यपूर्ण सुंदर इत्यादी १९६१ मध्ये रवीन्द्रनाथ जन्मशताब्दी हे संग्रहालय तयार केलं गेलं इथं रवीन्द्रनाथांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे रवीन्द्रनाथांचा आइन्स्टाईन महात्मा गांधी रोमा रोलां romain rolland अशा लोकांशी झालेला पत्रव्यवहार आहे रवीन्द्रनाथांनी काढलेली पंधराशेपेक्षा जास्त चित्रं आहेत इथं फोटो काढायला परवानगी नाही या संग्रहालयात फिरताना जाणवलं की सर्व वर्गातली गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथं आस्थेने पहात होती थबकून चर्चा करत होती बंगालसाठी आजही रवीन्द्रनाथ हा अभिमानाचा अस्मितेचा आणि आस्थेचा बिंदू आहे हे वारंवार जाणवतं उत्तरायण मध्ये पाच वेगवेगळी घरं आहेत कोणार्क श्यामली उदयन पुनश्च उदिची अशी छान नावं या घरांना आहेत या पाचही घरांमध्ये रवीन्द्रनाथांनी वेगवेगळ्या काळात वास्तव्य केलं आहे श्यामली हे मातीचं घर आहे उदिची या घरांच्या बांधणीत केलेले वेगवेगळे प्रयोग पाहून चकित झाले विक्रीकक्षात रवीन्द्रनाथांच्या चित्रांच्या छोट्या प्रतिकृती विकत मिळतात असं कळलं होतं पण मला तर काहीच दिसलं नाही इथं नेहमीचा सरकारी खाक्या दिसला कर्मचारी लोकांकडं लक्ष देत नव्हते त्यामुळे माझाही काही खरेदी करण्याचा उत्साह मावळला गणेश हलोई ganesh haloi यांच्या ajanta mural tracing चं प्रदर्शन पाहायला गेलो प्रदर्शनाची माहिती देणारं पोस्टर तिथं आमच्याविना कुणीच नव्हतं तिथली प्रकाशयोजना अशी होती की ट्रेसिंग नीट दिसतंच नव्हतं तिथले सुरक्षा कर्मचारी मात्र उत्साही होते बरीच माहिती सांगत होते गणेश सर अजंठामध्ये सहा वर्ष काम करत होते त्यांनी केलेली ट्रेसिंग सुंदर आहेत कशी केली असतील हा प्रश्न पडला पण त्याचं उत्तर काही शोधलं नाही गणेश सरांचं या विषयवारचं पुस्तक प्रकाशित झालं आहे असं नंतर कळलं कदाचित पुस्तकात सविस्तर माहिती असेल किंवा इतर मार्गांनी ती शोधावी लागेल रवीन्द्रनाथांचं नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतं पण शांतिनिकेतनमध्ये त्यांच्यासमवेत योगदान देणारे आणखी तीन चित्रकार महत्त्वाचे आहेत नंदलाल बोस nandalal bose रामकिंकर बैज ram kinker baij आणि बिनोद बिहारी मुखर्जी benode behari mukherjee बैज आणि मुखर्जी यांच्या चित्रांचं प्रदर्शन दुसऱ्या दालनात होतं तीही चित्रं अप्रतिम होती सगळीच चित्रं अतिशय जिवंत वाटत होती बिनोद बिहारी एका डोळ्याने अंध होते तर दुसऱ्या डोळ्याने त्यांना दूरचे दिसत नसे तरीही त्यांची चित्रं अतिशय वास्तवदर्शी आहेत कसं काय चित्रं काढत असेल हा माणूस असं वारंवार वाटत राहिलं प्रदर्शनाची वेळ संपत आल्याने आम्हाला तिथून निघावं लागलं पण केवळ चित्रं पाहण्यासाठी शांतिनिकेतनला पुन्हा यावं इतकी सगळी चित्रं सुरेख होती आणखी एका सकाळी ऋत्विक घटक यांच्या जीवनकार्यावरचं फोटो प्रदर्शन पाहिलं ते पाहताना आपण यांचे फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत हे जाणवलं दुसऱ्या एका दालनात कृष्णा रेड्डी यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं प्रिंटमेकर पेंटिंग असा एक नवा प्रकार इथं पाहायला मिळाला शांतिनिकेतनच्या एका तरूण विद्यार्थ्याने तोही तिथं प्रदर्शन पाहायला आला होता मला सोप्या भाषेत ते समजावून सांगायचा प्रयत्न केला पण माझ्या ते सगळं डोक्यावरून गेलं चित्रं अर्थातच छान होती शांतिनिकेतन बोलपूरमधली ही सगळी प्रदर्शनं पाहताना आपल्याला चित्रकलेतलं काही कळत नाही याचं अपार दु ख झालं चित्रकला निरक्षर असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हे एक पूर्ण नवं विश्व होतं एकाचवेळी अद्भुत सुखावणारं आणि तरीही परक्यासारखं अंतर ठेवून वागणारं चित्रांची भाषा समजून घ्यायला हवी खरी नुसती एक नवी लिपी नाही तर नवा विचार नवा संवाद यांच्या अगणित शक्यता त्यामुळे समोर येतील आपल्या जगण्यात साधेपणा आणि सौंदर्य दोन्ही आहे का निसर्गाकडं पाहण्याची आपली दृष्टी खरोखर कशी आहे कलाकारांना जे दिसतं ते आपल्याला दिसू शकतं का कलेची साधना करण्याइतकी तिच्याशी आपली बांधिलकी आहे का या जगात आपलं नातं नेमकं कुणाशी कशाशी आहे हे आपल्याला पुरेसं समजलं आहे का असे अनेक प्रश्न या भटकंतीत माझ्या मनात येत राहिले शांतिनिकेतनने मला नक्की एक नवी दृष्टी दिली तिचं गारूड माझ्यावर किती काळ राहील हे काळच सांगेल पुढच्या भागात जाऊ जुन्या कोलकात्यात posted by aativas at 5 34 pm 5 comments labels अनुभव इतिहास चित्रकला पश्चिम बंगाल बोलपूर शिक्षण संस्कृ्ती older posts home subscribe to posts atom sitemeter ई बुक विवेकानंदांचा वेदान्त विचार हे ई बुक इथे उपलब्ध आहे वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा शोध या ब्लॉगवरील लेखन पूर्णत स्वतंत्र असून माझी लेखी पूर्वपरवानगी घेतल्याविना इथले लेख अन्यत्र आंतरजालावर वा छापील स्वरूपात पूर्ण लेख वा निवडक अंश प्रकाशित करू नयेत two more blogs english blog times change photoblog transient bonds जुनी पाने 2026 6 august 2026 1 २८४ दक्षिणेकडं जाताना july 2026 1 april 2026 1 february 2026 2 january 2026 1 2025 6 september 2025 3 june 2025 1 april 2025 1 february 2025 1 2024 4 august 2024 1 june 2024 1 february 2024 1 january 2024 1 2023 8 december 2023 2 september 2023 2 july 2023 1 june 2023 3 2021 1 april 2021 1 2019 5 july 2019 1 june 2019 2 may 2019 1 march 2019 1 2018 2 april 2018 1 march 2018 1 2017 5 september 2017 2 may 2017 1 february 2017 2 2016 12 november 2016 3 october 2016 1 september 2016 1 june 2016 4 may 2016 1 march 2016 1 february 2016 1 2015 17 december 2015 2 october 2015 2 july 2015 1 june 2015 2 april 2015 2 march 2015 3 february 2015 2 january 2015 3 2014 34 december 2014 4 november 2014 1 october 2014 1 september 2014 3 august 2014 2 july 2014 3 june 2014 1 may 2014 4 april 2014 4 march 2014 4 february 2014 4 january 2014 3 2013 38 december 2013 3 november 2013 1 october 2013 2 september 2013 4 august 2013 2 july 2013 2 june 2013 1 may 2013 3 april 2013 4 march 2013 8 february 2013 5 january 2013 3 2012 39 december 2012 3 november 2012 2 october 2012 3 september 2012 3 august 2012 2 july 2012 2 june 2012 4 may 2012 3 april 2012 4 march 2012 4 february 2012 4 january 2012 5 2011 49 december 2011 5 november 2011 4 october 2011 6 september 2011 4 august 2011 5 july 2011 4 june 2011 4 may 2011 4 april 2011 3 march 2011 3 february 2011 4 january 2011 3 2010 42 december 2010 3 november 2010 4 october 2010 4 september 2010 5 august 2010 4 july 2010 5 june 2010 3 may 2010 2 april 2010 2 march 2010 3 february 2010 2 january 2010 5 2009 15 december 2009 2 november 2009 4 october 2009 3 july 2009 1 may 2009 1 april 2009 1 march 2009 2 february 2009 1 वाचक मी कोण view my complete profile typical khasi house shillong meghalaya august 11 labels २०१४ 2 २०१७ 3 २०१९ 5 अण्णा हजारे 5 अनिल 1 अनुभव 161 अफगाणिस्तान 12 अरविंद 1 अहिंसा 1 आदिवासी 14 आनंद 1 आन्जी 18 आरती प्रभू 1 इतिहास 21 उत्तर प्रदेश 4 उत्तराखंड 3 उपनिषद 2 ओडिशा 1 कथा 10 कन्याकुमारी 6 कविता 2 काबूल 11 कुरुक्षेत्र 1 कुसुमाग्रज 1 केनिया 1 केरळ 1 केशवसुत 1 कोलकाता 3 खाद्यसंस्कृती 1 खेडी 27 गंगा 1 गणित 1 गांधीजी 1 गुजरात 3 गोवा 1 गौतम बुद्ध 2 चरित्र 1 चित्रकला 1 छत्तीसगढ 3 जगणं 63 जलव्यवस्थापन 2 जीवनशैली 24 डवाव 4 डॉ आंबेडकर 1 तत्त्वज्ञान 23 तंत्रज्ञान 4 तालिबान 4 त्रिपुरा 2 त्रिवेंद्रम 1 दहशतवाद 13 दादरा नगर हवेली 1 दिल्ली 21 दृष्टिकोन 54 धर्म 33 नर्मदा 1 नाती 44 नारायण सुर्वे 1 निवडणूक 10 निसर्ग 1 पंजाब 1 पर्यावरण 5 पश्चिम बंगाल 4 पानिपत 1 पु शि रेगे 1 पुणे 5 पुस्तक 1 पुस्तकं 17 पॉण्डिचेरी 5 पोलीस 1 प्रभा गणोरकर 1 प्रवास 5 प्रवास इतिहास 1 प्रसारमाध्यमं 2 प्राणी 4 फिलिपिन्स 4 बँकॉक 4 बदल 32 बा भ बोरकर 2 बिहार 1 बोलपूर 2 भटकंती 43 भाषा 16 मणिपूर 1 मध्य प्रदेश 3 मध्वाचार्य 1 मर्ढेकर 1 महाराष्ट्र 24 माझ्या कविता 21 माणसं 55 मातीचं घर 1 मुक्तक 1 मुंबई 4 मुलं 2 मुली 31 मेघालय 2 मोझाम्बिक 5 मौन 2 म्यानमा 8 रमण महर्षी 2 राजकीय 9 राजस्थान 2 रामकृष्ण 1 रामानुजाचार्य 1 रेचल कार्सन 1 रेल्वे 1 ललित 44 लष्करी सत्ता 1 वाचननोंद 6 वासंती मुझुमदार 1 विकास 17 विचित्रपणा 2 विज्ञान 1 विविधता 1 विवेकानंद 25 वेदान्त 11 वैचारिक 4 शंकराचार्य 5 शतशब्दकथा 21 शहर 7 शिक्षण 11 शीख 1 समाज 6 समुद्र 1 संस्कृती 16 संस्कृ्ती 2 सातपु़डा 1 सामाजिक 60 सामाजिक कार्यकर्ते 3 सावरकर 1 सावित्री 1 सावित्रीबाई फुले 2 साहित्य 1 साहित्यभूषण परीक्षा 1 सिक्कीम 1 सिंगापूर 1 सौमित्र 1 स्त्रिया 37 स्थापत्य 2 स्मरणशक्ती 2 हरियाणा 2 हॉस्पिटल 1 मी वाचते स्मृति अमेरिकेची पूर्वेकडची ट्रीप photo 3 5 days ago कथापौर्णिमा लोगोकथा पार्ले जी 1 week ago मी एक प्रवासी पक्षी वेदमूर्ती 2 weeks ago रेघ दुर्गा भागवतांच्या भाषांतरात वॉल्डन ची विल्हेवाट 3 weeks ago पूर्वतरंग महालक्ष्मी 3 weeks ago नरेंद्र गोळे सत्तेचाळीस वर्षांची अनुभवसंपन्नता 1 month ago मोसम x y z च्या घरातली आई 1 month ago नरेन्द्र प्रभू गाजलेली मैफिल आणि निळाईची गाज 2 months ago पु ल प्रेम सुनीताबाईंचा डोडी 3 months ago aksharadhool what is achieved by india now in quantum communications and why is it so significant 5 months ago श्रुतीसंवेदना तुलसी एक अनोखी अनुभूती 7 months ago राफा निवडणूक 8 months ago शब्द पट म्हणजे कोडं द्वार का द्वारका 9 months ago रणजित पराडकर ranjeet paradkar रसप साडे तीन तासांचा सफाईदारपणा धुरंधर movie review dhurandhar 9 months ago अत्रे उवाच बेड़ा पार 1 year ago आपला सिनेमास्कोप परिचित प्रवाहाविरोधातला फ्लो 1 year ago शब्दवेल हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता 1 year ago sahajach s blog रक़्स करना है तो 2 years ago unke dushman hai bahut aadmi aacha hoga ओ पुणे 3 years ago zula वाईन स्टेट 4 years ago prof hari narke प्रा हरी नरके राजकीय आरक्षण पुन्हा एकदा गेल्याने ओबीसी संकटात प्रा हरी नरके 4 years ago akhil s world अर्थात अखिलचं जग काळ आला होता 5 years ago डीडीच्या दुनियेत the meek will not inherit the earth 6 years ago झाले मोकळे आकाश बाबा 6 years ago माझिया मना किर्तीमहल 6 years ago tarang आॅस्ट्रेलिया आयलंड काॅंटिनेंट ची सफर सिडने व मेलबोर्न 6 years ago आठवणिंचे पिंपळपान रोचक रंजक सेरीज 7 years ago मी माझे मला सहेला रे 7 years ago pre तरंग लंडन क्षणचित्रे १ नॅचरल हिस्टरी म्युझियम 7 years ago भिजपाऊस शांतवन 7 years ago आतल्यासहित माणूस मेकप मेकप मेकप 7 years ago मनमौजी वनवास 7 years ago अळवावरचे पाणी परमेश्वराचा अवतार 7 years ago विचारयज्ञ vicharyadnya एकत्व आपुले 7 years ago swings of mind स्पंदन वाढदिवस पुष्पगुच्छ केक आणि शुभेच्छा 7 years ago विशुभाऊ चा फळा तुंबाड 7 years ago मनगुज आपण सूक्ष्मजीवांना का घाबरतो 8 years ago वटवट सत्यवान बाप पु डे 8 years ago vaiddyacha blog वैद्याचा ब्लॉग शहाणपणाची भाषा 8 years ago बाबा ची भिंत अप्राप्य २ 8 years ago चिन्ह 8 years ago आल्हादक प्रतिबिंब a ledge 9 years ago मोकळीक मॉन्सून रंजन केळकर ह्यांच्या ई बुक चा परिचय 9 years ago tangents हुमुहुमुनुकूनुकूआप्वा हवाई मेमरीज १ 9 years ago ओसरी अर्थक्रांती ढोबळ मांडणी विपरीत तर्क आणि भुरळ पाडणारा प्रचार 9 years ago मनस्पंदने मराठी टिकवण्यासाठी एवढं करू याच 9 years ago मेरा कुछ सामान new facebook page 10 years ago मन माझे बाप्पाची मूर्ती 10 years ago नेमाने नेमाडे विद्रोह का ढोंग 10 years ago जास्वंदाची फुलं ऐक नं 10 years ago कोहम जळ 2 10 years ago आधी विचार जन्म घेतात मग कृती सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातम्या 10 years ago मन उधाण वार् याचे लढाई टेनिस कोर्टची 10 years ago मन वढाय वढाय लसणाचे आक्षे 10 years ago गोडगप्पा माझी गुणी 10 years ago अफ़ू इतका आहे लळा 10 years ago manogate s blog बिर्याणीस्तोत्रम् the hymn of biryani 10 years ago उलट तपासणी संघासमोरचे ऐतिहासिक आव्हान 10 years ago restiscrime थोडा है थोडे कि जरुरत है ३ 10 years ago अग्निसखा आतून 10 years ago करड्या छटांचा मागोवा 10 years ago टॅलीनामा वाचू ई त्यानंदे 11 years ago शतपावली गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ 11 years ago माझ्या मनातले काही मनातला किल्ला 11 years ago creative mau simple ripple 11 years ago avinash dharmadhikari s blog अभिनंदन आणि शुभेच्छा 11 years ago आज सुचलेलं नवे मेट्रो मोनो मार्ग 11 years ago पांढर् यावरचं काळं नु शुऽऽऽ कुठं बोलायचं नाही 12 years ago शाणपट्टी तू ता 12 years ago मराठी साहित्य marathi literature मार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग 12 years ago शब्द कागद अन् लेखणी विचार एक विचार एक उमेद 12 years ago दवबिंदु 2013 in review 12 years ago सरदेसाईज आनंदोत्सव दीपोत्सव फराळोत्सव फटाकेत्सव 12 years ago iravati अरुंधती ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता 12 years ago निसर्गवार्ता नळदुर्गच्या किल्ल्यात वटवाघळांचा घरोबा amazing bats 13 years ago isolated portal mayuresh kulkarni पाय 13 years ago मुकामार कुठला पुरुष किंवा स्त्री म्हणेल की बलात्कार व्हायलाच हवेत 13 years ago संवादिनी साठी आणि पिंजरा 14 years ago remichi marathi boli रेमीची मराठी बोली माझ्या सानुल्या सैंपाकघरी 14 years ago रसिक व्यवहार 14 years ago धागे दोरे खताचा खांब 14 years ago murali 14 years ago darmyaan दरम्यान मराठी त्रिवेणी fd च्या निमित्ताने 15 years ago manatla thodasa घर 15 years ago स्वच्छंदी मधुरिमा कुळकर्णी २ रमेशची कैफियत 15 years ago how about this मांडवगण 16 years ago रमलखुणा भ्रम णगाथा डोक्यातल्या खोक्यात शुभांगी एस्पीडीपी show 10 show all वाचकांची आवड २८४ दक्षिणेकडं जाताना if you want to read this post in english it is available here पाँडिचेरीला बऱ्याचा वर्षांत गेले नाही हे सहजच कधीतरी लक्षात आलं शेवटची २८३ बोशांको ची भेट भाग ४ काली आणि मेघनाद if you want to read this post in english it is available here कोलकात्यातला मुक्काम संपत आला होता कोलकात्यात जायचं तर दक्षिणेश्वर आणि ५ अनिलांचा पाऊस काल परवा पुण्यात आमच्या भागात वीज आणि ढग यांच्या दंगामस्तीसह पाऊस आला अशा वेळी मला हमखास अनिलांची पेर्ते व्हा या संग्रहातली ह ७५ अनोळखी शिबिराची पहिली संध्याकाळ डोंगर चढून दमून येणारी पण प्रफुल्लित चेह याची तरुण मुल आणि मुली त्यांच स्वागत तितक्याच उत्साहाने करणारी महेश ६ दरवेशी पण आपण चालावे दरवेशी नसलो तरी सोबत घेऊन आपली सावली शोधावा नवा रस्ता पायांना जर फुटल्याच आहेत दिशा आणि जर आहेतच गावे प्रत्येक र ११८ सात पाउले आकाशी फूलघर ही झाडांनी वेढलेली एक सुंदर जागा संध्याकाळच्या वेळी तिथं बसून सगळेजण चहा पीत आहेत न...
|