Meta tags:
Headings (most frequently used words):
2026, बोशांको, ची, भेट, भाग, august, tuesday, मी, काली, आणि, अब्द, शब्द, pages, thursday, 13, saturday, july, 18, april, 21, february, 24, sitemeter, बुक, शोध, two, more, blogs, जुनी, पाने, वाचक, कोण, typical, khasi, house, labels, वाचते, वाचकांची, आवड, subscribe, to, blogadda, footsteps, 2014, onwards, २८४, दक्षिणेकडं, जाताना, विविधांगी, माणसं, चेन्नेमध्ये, बसचा, प्रवास, २८३, मेघनाद, मंदिर, गिरीश, मंच, मेघनादवध, काव्य, गौतम, हालदार, २८२, जुनं, कोलकाता, २८१, शांतिनिकेतन,
Text of the page (most frequently used words):
आणि (153), आहे (127), ago (86), years (69), मला (55), आहेत (54), नाही (54), होते (52), काही (46), होती (45), असं (42), त्या (39), एका (35), होता (35), होतं (33), इथं (32), मध्ये (31), म्हणजे (30), दोन (26), त्यांनी (24), म्हणून (22), तिथं (21), माहिती (20), नाव (19), #शांतिनिकेतन (18), माझ्या (17), आम्ही (17), आलं (17), अनेक (17), त्यांना (17), बंगाली (17), त्यामुळे (16), वाटलं (16), नव्हतं (15), अशा (15), 2014 (14), तीन (14), जागा (14), 2013 (14), मेट्रो (14), प्रवास (14), कोलकाता (14), चित्रं (14), तरी (13), यांच्या (13), february (13), 2010 (13), 2011 (13), 2012 (13), होत्या (13), यांनी (13), भाषा (12), माणसं (12), इतिहास (12), april (12), केवळ (12), केली (12), केलं (12), परिसरात (12), झाली (12), फक्त (12), ट्रेन (12), जास्त (11), भेट (11), भाग (11), लक्षात (11), july (11), june (11), पाहायला (11), काय (11), अशी (11), मुख्य (11), बर्थ (11), august (10), येत (10), गेले (10), march (10), 2026 (10), कळलं (10), आली (10), फार (10), सांगितलं (10), तिकिट (10), लोअर (10), कविता (9), आधी (9), ठिकाणी (9), घेऊन (9), भागात (9), आला (9), किंवा (9), 2009 (9), may (9), september (9), 2015 (9), केला (9), दुसऱ्या (9), करत (9), त्यांच्या (9), तास (9), गर्दी (9), खूप (9), अगदी (9), मंदिर (9), काळ (8), केंद्र (8), बाहेर (8), शब्द (8), कोलकात्यात (8), मेघनाद (8), माझी (8), पुन्हा (8), रेल्वे (8), रामकृष्ण (8), पुस्तक (8), october (8), december (8), january (8), 2016 (8), झालं (8), तरीही (8), सगळं (8), वेळ (8), आम्हाला (8), संग्रहालय (8), झाला (8), प्रसिद्ध (8), आता (8), तेव्हा (8), स्थानकावर (8), स्थानक (8), चेन्नै (8), आजही (7), आपण (7), this (7), english (7), जायचं (7), मराठी (7), विचार (7), मूर्ती (7), याच (7), एकदा (7), months (7), मुलं (7), बंगाल (7), गौतम (7), november (7), जुन्या (7), राहिले (7), आपल्याला (7), असतं (7), गेलो (7), दिसलं (7), प्रयोग (7), पाहून (7), टागोर (7), दिवस (7), नव्हती (7), हिंदी (7), उभं (7), हुगळी (7), दिसली (7), मोठी (7), ट्राम (7), रांगेत (7), गप्पा (7), comments (6), कला (6), पाच (6), याची (6), you (6), want (6), read (6), post (6), available (6), here (6), दक्षिणेश्वर (6), पाँडिचेरीला (6), थोडा (6), पाणी (6), शिक्षण (6), पश्चिम (6), अनुभव (6), पूर्ण (6), असे (6), प्रश्न (6), दिसतं (6), दोन्ही (6), संवाद (6), अंतर (6), पाहताना (6), भाषेत (6), गेलं (6), छान (6), दिसत (6), राहिलं (6), वर्ष (6), त्याचं (6), इतर (6), छोट्या (6), रवीन्द्रनाथांनी (6), इथल्या (6), भवन (6), बाजूला (6), बाडी (6), घरात (6), पाठ (6), वगैरे (6), शांत (6), जातं (6), जाऊन (6), असतो (6), जागतिक (6), नव्हता (6), हावडा (6), ब्रिटिश (6), इमारत (6), मोठ्या (6), सुमारे (6), दहा (6), दिवशी (6), चालू (6), लोक (6), गेली (6), हालदार (6), शहर (5), रात्री (5), संस्कृती (5), मनात (5), सुंदर (5), आपली (5), नवा (5), रस्ता (5), तरुण (5), आमच्या (5), blog (5), बुक (5), झाले (5), पुणे (5), विवेकानंद (5), पुस्तकं (5), गंगा (5), 2019 (5), 2023 (5), 2024 (5), 2025 (5), असून (5), आपल्या (5), समोर (5), याचं (5), असा (5), प्रदर्शन (5), फोटो (5), नाहीत (5), आणखी (5), वाटत (5), असेल (5), लागलं (5), रवीन्द्रनाथांच्या (5), सरकारी (5), काळात (5), रवीन्द्रनाथ (5), तयार (5), त्यात (5), बांग्ला (5), पाहता (5), करताना (5), अजूनही (5), वर्ग (5), आश्रम (5), परिसर (5), सांस्कृतिक (5), स्थापना (5), यांचा (5), पर्याय (5), बंद (5), टागोरांनी (5), कारण (5), झालेली (5), योग्य (5), भव्य (5), बंगालच्या (5), थेट (5), कॉफी (5), बोई (5), पारा (5), विविध (5), असते (5), काव्य (5), बसले (5), गिरीशचंद्र (5), गिरीश (5), लोकांना (5), ताई (5), सगळे (5), posts (4), सकाळी (4), बँकॉक (4), आले (4), पडलो (4), कल्पना (4), अवघड (4), मुली (4), बोशांको (4), काली (4), जाताना (4), पुरुष (4), स्त्री (4), कुठं (4), ऐतिहासिक (4), अर्थात (4), राजकीय (4), प्रवासी (4), चित्रकला (4), labels (4), 2017 (4), जुनी (4), posted (4), aativas (4), पुढच्या (4), किती (4), समजून (4), प्रयत्न (4), पाहिलं (4), जाणवलं (4), अतिशय (4), जिवंत (4), त्यांची (4), शांतिनिकेतनला (4), शांतिनिकेतनमध्ये (4), बोस (4), मात्र (4), बरीच (4), सांगत (4), काम (4), नंतर (4), काहीच (4), देत (4), नावं (4), वेगवेगळ्या (4), संग्रहालयात (4), चर्चा (4), महात्मा (4), गांधी (4), आठवण (4), गायक (4), करता (4), सर्वात (4), जुनं (4), पुढं (4), त्यांचं (4), लहान (4), प्रकारचा (4), दिलं (4), मोठं (4), भेटीत (4), लागले (4), तिकिटं (4), हेरिटेज (4), विश्वभारती (4), स्थानिक (4), भारतीय (4), तसंच (4), लगेच (4), गोष्टी (4), लोकांच्या (4), कमी (4), कोलकात्याच्या (4), सरस्वती (4), तिथल्या (4), येऊन (4), असल्याने (4), आतमध्ये (4), निघालो (4), कुणी (4), पूर्णपणे (4), अर्थ (4), महत्त्वाचं (4), स्मारक (4), प्रत्यक्षात (4), किलोमीटर (4), व्यवस्था (4), अत्यंत (4), राणी (4), नेताजी (4), मन्नाडे (4), हाऊस (4), सुरू (4), सहज (4), जोरासांको (4), पूल (4), पूर्वी (4), अजून (4), स्थानकं (4), मंदिरात (4), त्याचा (4), यांचं (4), असतात (4), असलेल्या (4), बोलणं (4), प्रान्तिक (4), अडीच (4), मधल्या (4), मेघनादवध (4), बदलून (4), मंच (4), दर्शन (4), उभे (4), त्यांच्याशी (4), उभ्या (4), राहिल्या (4), त्याने (4), सेंट्रल (4), गटाच्या (4), साईड (4), all (3), atom (3), खरं (3), पोचले (3), अब्द (3), कोण (3), चालले (3), वेळी (3), निवांत (3), सात (3), सोबत (3), दिशा (3), उत्साहाने (3), करणारी (3), अनोळखी (3), कोलकात्यातला (3), मुक्काम (3), संपत (3), वर्षांत (3), २८४ (3), दक्षिणेकडं (3), च्या (3), मार्ग (3), the (3), जन्म (3), माझे (3), करू (3), मेकप (3), माणूस (3), year (3), weeks (3), सामाजिक (3), संस्कृ्ती (3), समाज (3), मुंबई (3), मातीचं (3), बोलपूर (3), बदल (3), निसर्ग (3), उत्तर (3), अरविंद (3), 2018 (3), उपलब्ध (3), नक्की (3), नवी (3), दृष्टी (3), दिली (3), तिचं (3), आपलं (3), कशी (3), साधेपणा (3), घ्यायला (3), असणाऱ्या (3), विश्व (3), ठेवून (3), सगळी (3), कळत (3), अर्थातच (3), दालनात (3), कसं (3), तिथून (3), इतकी (3), गणेश (3), कदाचित (3), लागेल (3), प्रतिकृती (3), मिळतात (3), दिसला (3), झालेला (3), काढलेली (3), सर्व (3), पुतळा (3), चार (3), परत (3), घेतला (3), संदर्भ (3), तशी (3), फारशी (3), वाटली (3), भारती (3), वादक (3), होऊन (3), वर्णन (3), गृह (3), याही (3), इमारतीत (3), झालेल्या (3), पर्यटक (3), त्याच्या (3), घेत (3), सुरूवात (3), वापरात (3), उंच (3), पहिल्या (3), महत्त्व (3), ठिकाणं (3), काढून (3), इंग्रजी (3), वगळता (3), वॉक (3), होतो (3), येणाऱ्या (3), येऊ (3), परंपरा (3), पुढे (3), सुरु (3), करणं (3), जाणं (3), घेतली (3), केलेला (3), दिसतो (3), गोष्ट (3), हळूहळू (3), वस्तू (3), बाजार (3), येतं (3), आठवतं (3), निर्माण (3), करून (3), गेल्या (3), असल्यामुळे (3), राहिला (3), दीड (3), म्हणत (3), जवळजवळ (3), म्हटलं (3), नेमका (3), सोय (3), इंडो (3), संगम (3), साध्या (3), गरज (3), अनेकदा (3), कळल्यावर (3), सध्या (3), भारत (3), घरी (3), नाहीये (3), एकूण (3), नदी (3), लागते (3), करण्यात (3), पांढऱ्या (3), सत्यजित (3), गेल्यावर (3), असत (3), झाल्या (3), जागेत (3), कॉलेज (3), पुस्तकांची (3), शेकडो (3), तिकडं (3), दिसतात (3), तशीच (3), रांग (3), असल्याचं (3), कधी (3), चपला (3), पडलं (3), परिसरातल्या (3), म्हणूनच (3), चालत (3), दिसले (3), आहोत (3), माणसाला (3), रासमणी (3), जगबंधु (3), मंदिरं (3), जाता (3), प्रवेश (3), स्वामी (3), विषय (3), राहून (3), नदीत (3), विचारलं (3), सार्वजनिक (3), पूजा (3), ब्रिज (3), जणू (3), शांतपणे (3), मजा (3), इतक्या (3), प्रवाह (3), त्यांचे (3), समजत (3), मधुसूदन (3), नाट्यप्रयोग (3), नसून (3), परमहंस (3), माझ्यासाठी (3), अमेरिकन (3), मंदिराचं (3), स्केच (3), हवा (3), बँक (3), नेहमी (3), बाई (3), सुमारास (3), बेलूर (3), तामिळ (3), बसमध्ये (3), मदत (3), चेन्नैला (3), एमएएस (3), दरवाजे (3), एआयने (3), कोयम्बेडू (3), बॅगा (3), राहण्याची (3), तिरुपतीला (3), रेणिगुंठाला (3), गाडी (3), मिनिटं (3), गंमत (3), प्रवासात (3), काका (3), आदराने (3), simple (2), subscribe (2), चित्र (2), तसं (2), अचानक (2), धावती (2), अधिकृत (2), भिंत (2), सांगणं (2), बसून (2), चहा (2), ज्या (2), दरवेशी (2), पहिली (2), चढून (2), येणारी (2), पाऊस (2), २८३ (2), बऱ्याचा (2), सहजच (2), कधीतरी (2), शेवटची (2), show (2), दरम्यान (2), marathi (2), review (2), साहित्य (2), शुभेच्छा (2), वढाय (2), बाबासाहेब (2), सामान (2), मांडणी (2), चिन्ह (2), बाबा (2), रोचक (2), प्रा (2), हरी (2), नरके (2), आपला (2), पार (2), निवडणूक (2), प्रेम (2), प्रभू (2), month (2), दुर्गा (2), स्त्रिया (2), परीक्षा (2), समुद्र (2), वैचारिक (2), वेदान्त (2), रमण (2), प्रदेश (2), धर्म (2), दृष्टिकोन (2), हवेली (2), आंबेडकर (2), जगणं (2), कन्याकुमारी (2), कथा (2), आनंद (2), २०१९ (2), 2021 (2), स्वतंत्र (2), लेख (2), आंतरजालावर (2), निवडक (2), अंश (2), प्रकाशित (2), शोध (2), इथे (2), home (2), जाऊ (2), राहील (2), जगात (2), नेमकं (2), समजलं (2), साधना (2), सौंदर्य (2), खरी (2), लिपी (2), येतील (2), माझ्यासारख्या (2), अद्भुत (2), सुखावणारं (2), प्रकार (2), शांतिनिकेतनच्या (2), तरूण (2), तोही (2), चित्रांचं (2), ऋत्विक (2), घटक (2), बैज (2), मुखर्जी (2), बिनोद (2), बिहारी (2), डोळ्याने (2), काढत (2), वारंवार (2), प्रदर्शनाची (2), यावं (2), रवीन्द्रनाथांचं (2), बहुतेकांना (2), देणारे (2), महत्त्वाचे (2), नंदलाल (2), तिथली (2), ट्रेसिंग (2), नीट (2), कर्मचारी (2), सहा (2), केलेली (2), असतील (2), पडला (2), विकत (2), लक्ष (2), नव्हते (2), खरेदी (2), उत्साह (2), वेगवेगळे (2), उदिची (2), वेगवेगळी (2), घरं (2), श्यामली (2), घरांमध्ये (2), लोकांशी (2), पत्रव्यवहार (2), काढायला (2), परवानगी (2), फिरताना (2), श्रीमंत (2), जाणवतं (2), १९६१ (2), मिळालेल्या (2), नोबेल (2), पारितोषिकाची (2), रवीन्द्रनाथांचा (2), आइन्स्टाईन (2), मृत्यूनंतर (2), १९४२ (2), उभारलं (2), दुसरं (2), स्मरणार्थ (2), दिला (2), मातीची (2), चूल (2), खाल्ला (2), इथली (2), शाळकरी (2), मुला (2), प्रजासत्ताक (2), उशीर (2), नूतन (2), १९०२ (2), बांधलेलं (2), परिसरातलं (2), लिहिल्या (2), नेमक्या (2), आठवत (2), यांची (2), नृत्याचा (2), सराव (2), आपल्याकडं (2), आसपास (2), असो (2), चांगलं (2), कार्यालय (2), १९०१ (2), उल्लेख (2), रंग (2), आवडला (2), रचना (2), रोजच्या (2), वर्तुळ (2), विद्यार्थी (2), बसतात (2), आकाशाखालचे (2), भरतात (2), सप्तपर्णी (2), वृक्ष (2), ध्यान (2), बऱ्याच (2), अंतरावरून (2), छंद (2), घेता (2), ठेवली (2), मार्गदर्शक (2), बोलणाऱ्या (2), तोरण (2), यातली (2), पाहिली (2), जरा (2), बोलपूरला (2), पोचल्याने (2), ओळखलं (2), श्रीनिकेतन (2), मिळून (2), जातो (2), नकाशा (2), लोकांसाठी (2), वारसा (2), शिक्षणाचा (2), संपूर्ण (2), बौद्धिक (2), आंदोलन (2), कलाकार (2), देश (2), जिथं (2), १९२१ (2), याला (2), शैक्षणिक (2), शिक्षणाच्या (2), नाथ (2), न्द्र (2), नावाच्या (2), देवेन्द्रनाथांनी (2), एकर (2), मोकळ्या (2), १८६३ (2), रवींद्रनाथ (2), वडील (2), सुदैवाने (2), रोज (2), उलगडत (2), प्रकारे (2), फिरायचं (2), व्यक्तीला (2), टागोरांचं (2), टिकून (2), नसलेले (2), ऐकलं (2), tuesday (2), समजल्या (2), कोलकात्याचं (2), असावं (2), सणांमध्ये (2), बरंच (2), आयुष्यात (2), योग्यच (2), नेहमीप्रमाणे (2), जाणीव (2), घेतलं (2), मोडक्यातोडक्या (2), पडले (2), एखादं (2), श्वास (2), आलेली (2), तेही (2), जमलं (2), काळातील (2), मिळते (2), परदेशी (2), आकर्षक (2), केले (2), थोडी (2), दिसायला (2), गोथिक (2), बांधकाम (2), गाईडने (2), सरकार (2), पाण्याचे (2), वापर (2), तलाव (2), साधारण (2), काहीही (2), आणलं (2), दुपारी (2), संगमरवरी (2), विस्तीर्ण (2), आवडलं (2), हातात (2), जुने (2), छायाचित्रं (2), शक्य (2), इंडियन (2), हॉल (2), सुभाषचंद्र (2), एकत्र (2), १८७६ (2), केलेल्या (2), अल्बर्ट (2), पासून (2), जावंच (2), शब्दांत (2), पंधरा (2), युनिवर्सिटी (2), हेअर (2), स्कूल (2), हिंदू (2), सोसायटी (2), सहकारी (2), दुकानं (2), बाजारपेठ (2), आशियातली (2), दुर्मिळ (2), इमारतीच्या (2), नागरिक (2), काळी (2), दिलेल्या (2), नोंद (2), त्यातून (2), आधारित (2), पेन (2), द्वारकानाथ (2), पन्नासपेक्षा (2), १८६१ (2), रोजी (2), ठाकुर (2), मानलं (2), रस्ते (2), नमस्कार (2), करणारे (2), उदाहरणार्थ (2), वाचून (2), याचा (2), येणं (2), गोंधळ (2), १९८४ (2), कोलकातामध्ये (2), मेट्रोचं (2), लाईन्स (2), प्रकारचे (2), १८७३ (2), इलेक्ट्रिक (2), मंद (2), मार्गांवर (2), थांबलो (2), व्यवस्थित (2), घराच्या (2), गल्लीत (2), विवेकानंदांच्या (2), सुप्रसिद्ध (2), आलेले (2), पहिल्यांदा (2), स्टेडियम (2), दुसरा (2), वेगळ्या (2), आमच्याशी (2), मराठीत (2), जातील (2), देबाहुती (2), कोलकात्याचा (2), दूरवर (2), मोठाल्या (2), वसंतपंचमीच्या (2), घाटाला (2), लागून (2), उभा (2), आलो (2), त्यावर (2), स्थानकाच्या (2), जाण्याचा (2), कोणत्याही (2), लागली (2), घाटावर (2), स्थानकात (2), फलाटांच्या (2), प्रशस्त (2), उशीरा (2), झालमुडी (2), ट्रेनमध्ये (2), जवळ (2), फलाट (2), दिशेने (2), ऐकताना (2), रंगभूमीवर (2), रौद्र (2), मंदोदरी (2), लक्ष्मण (2), राम (2), दाखवणारे (2), टाकलेली (2), ठेवलं (2), नसताना (2), सादर (2), अभिनेते (2), दिग्दर्शक (2), तीस (2), वर्षांच्या (2), हजार (2), रुपये (2), नवल (2), मिळाली (2), एकच (2), देणं (2), घोष (2), देण्यात (2), व्यावसायिक (2), होतात (2), त्यासाठी (2), उभी (2), जात (2), पाहणं (2), पाँडिचेरी (2), प्रतीक्षाने (2), तुम्हाला (2), मंदिराच्या (2), येईल (2), पारंपारिक (2), शिखरं (2), नदीच्या (2), एकाच (2), जाणाऱ्या (2), ब्राह्मण (2), त्याला (2), पुजारी (2), लागला (2), घाण (2), म्हणाल्या (2), एवढी (2), रांगा (2), त्यातल्या (2), त्यांच्यासोबत (2), पुढचे (2), निमलष्करी (2), अधिकारी (2), येतात (2), माझं (2), बोलायला (2), लागल्या (2), गंगेचा (2), माणसांनी (2), बाहेरून (2), साधारणपणे (2), बसला (2), पाँडिचेरीत (2), चेन्नेत (2), बोलता (2), भरावा (2), जाणारी (2), एसी (2), नसली (2), करुन (2), बॅग (2), होत (2), फलक (2), त्यांच्यासाठी (2), शिकणं (2), दुसरी (2), मेट्रोमध्ये (2), बहुतेक (2), नेहमीच्या (2), प्लॅटफॉर्म (2), वेगळा (2), उतरायला (2), उतरले (2), समोरच (2), central (2), बायकांच्या (2), पुरुषांच्या (2), फरक (2), आधीच (2), आग्रहाने (2), रिकामी (2), काकांना (2), तुम्ही (2), टीसी (2), घेतलेल्या (2), घरचं (2), जेवण (2), कौतुक (2), एकदम (2), ट्रेनने (2), योगी (2), निवृत्त (2), कारगिल (2), माझ्याशी (2), जाणार (2), संभाषण (2), कानांवर (2), बदलत (2), आग्रह (2), सोडून (2), विरळाच (2), सुपरफास्ट (2), पावलं (2), एआयला (2), theme, powered, blogger, footsteps, onwards, blogadda, प्रसंगाला, वर्षांपेक्षा, उलटून, गेलाय, जसच्या, डोळयांसमोर, राहतं, शनिवारच्या, ११७, सांभाळ, द्यायच्या, यादीत, कामासाठी, गुरूवारी, थाई, लँडच्या, २३८, गटाची, मीटिंग, संपली, सगळ्याजणी, ग्रामपंचायतीच्या, कार्यालयातून, स्वयं, सहाय्यता, भारदस्त, असलं, रुपयांची, यातलं, चाल, फूलघर, झाडांनी, वेढलेली, संध्याकाळच्या, सगळेजण, पीत, तेजस्वी, आवाज, विचारतो, मनुष्याला, ११८, पाउले, आकाशी, चालावे, नसलो, सावली, शोधावा, पायांना, फुटल्याच, आहेतच, गावे, प्रत्येक, शिबिराची, संध्याकाळ, डोंगर, दमून, प्रफुल्लित, चेह, मुल, त्यांच, स्वागत, तितक्याच, महेश, काल, परवा, पुण्यात, वीज, दंगामस्तीसह, हमखास, अनिलांची, पेर्ते, व्हा, संग्रहातली, अनिलांचा, वाचकांची, आवड, एस्पीडीपी, शुभांगी, डोक्यातल्या, खोक्यात, भ्रम, णगाथा, रमलखुणा, मांडवगण, how, about, मधुरिमा, कुळकर्णी, रमेशची, कैफियत, स्वच्छंदी, manatla, thodasa, निमित्ताने, darmyaan, त्रिवेणी, murali, खताचा, खांब, धागे, दोरे, व्यवहार, रसिक, सानुल्या, सैंपाकघरी, remichi, boli, रेमीची, बोली, साठी, पिंजरा, संवादिनी, कुठला, म्हणेल, बलात्कार, व्हायलाच, हवेत, मुकामार, पाय, isolated, portal, mayuresh, kulkarni, नळदुर्गच्या, किल्ल्यात, वटवाघळांचा, घरोबा, amazing, bats, निसर्गवार्ता, ग्रीनवॉशिंग, ग्राहकांची, जागरूकता, iravati, अरुंधती, आनंदोत्सव, दीपोत्सव, फराळोत्सव, फटाकेत्सव, सरदेसाईज, दवबिंदु, उमेद, कागद, अन्, लेखणी, मार्केसचा, जादुई, वास्तववाद, तिसरे, literature, शाणपट्टी, शुऽऽऽ, बोलायचं, पांढर्, यावरचं, काळं, नवे, मोनो, सुचलेलं, अभिनंदन, avinash, dharmadhikari, ripple, creative, mau, मनातला, किल्ला, मनातले, गॉड, स्मॉल, थिंग्झ, शतपावली, वाचू, त्यानंदे, टॅलीनामा, करड्या, छटांचा, मागोवा, आतून, अग्निसखा, थोडे, जरुरत, restiscrime, संघासमोरचे, आव्हान, उलट, तपासणी, बिर्याणीस्तोत्रम्, hymn, biryani, manogate, इतका, लळा, अफ़ू, गुणी, गोडगप्पा, लसणाचे, आक्षे, लढाई, टेनिस, कोर्टची, उधाण, वार्, याचे, सर्वस्पर्शी, विशेषांक, प्रकाशन, बातम्या, घेतात, कृती, कोहम, जास्वंदाची, फुलं, विद्रोह, ढोंग, नेमाने, नेमाडे, बाप्पाची, new, facebook, page, मेरा, कुछ, टिकवण्यासाठी, एवढं, मनस्पंदने, अर्थक्रांती, ढोबळ, विपरीत, तर्क, भुरळ, पाडणारा, प्रचार, ओसरी, हुमुहुमुनुकूनुकूआप्वा, हवाई, मेमरीज, tangents, मॉन्सून, रंजन, केळकर, ह्यांच्या, परिचय, मोकळीक, ledge, आल्हादक, प्रतिबिंब, अप्राप्य, शहाणपणाची, vaiddyacha, वैद्याचा, ब्लॉग, बाप, वटवट, सत्यवान, सूक्ष्मजीवांना, घाबरतो, मनगुज, तुंबाड, विशुभाऊ, फळा, वाढदिवस, पुष्पगुच्छ, केक, swings, mind, स्पंदन, एकत्व, आपुले, विचारयज्ञ, vicharyadnya, परमेश्वराचा, अवतार, अळवावरचे, वनवास, मनमौजी, आतल्यासहित, शांतवन, भिजपाऊस, लंडन, क्षणचित्रे, नॅचरल, हिस्टरी, म्युझियम, pre, तरंग, सहेला, रंजक, सेरीज, आठवणिंचे, पिंपळपान, आॅस्ट्रेलिया, आयलंड, काॅंटिनेंट, सफर, सिडने, मेलबोर्न, tarang, किर्तीमहल, माझिया, मना, मोकळे, आकाश, meek, will, not, inherit, earth, डीडीच्या, दुनियेत, akhil, world, अखिलचं, आरक्षण, गेल्याने, ओबीसी, संकटात, prof, hari, narke, वाईन, स्टेट, zula, unke, dushman, hai, bahut, aadmi, aacha, hoga, रक़्स, करना, sahajach, हरवलेल्या, हिवाळ्याच्या, शब्दवेल, परिचित, प्रवाहाविरोधातला, फ्लो, सिनेमास्कोप, बेड़ा, अत्रे, उवाच, साडे, तासांचा, सफाईदारपणा, धुरंधर, movie, dhurandhar, रणजित, पराडकर, ranjeet, paradkar, रसप, द्वार, द्वारका, कोडं, राफा, तुलसी, अनोखी, अनुभूती, श्रुतीसंवेदना, what, achieved, india, now, quantum, communications, and, why, significant, aksharadhool, सुनीताबाईंचा, डोडी, गाजलेली, मैफिल, निळाईची, गाज, नरेन्द्र, घरातली, मोसम, सत्तेचाळीस, वर्षांची, अनुभवसंपन्नता, नरेंद्र, गोळे, महालक्ष्मी, पूर्वतरंग, भागवतांच्या, भाषांतरात, वॉल्डन, विल्हेवाट, रेघ, वेदमूर्ती, पक्षी, week, लोगोकथा, पार्ले, कथापौर्णिमा, days, अमेरिकेची, पूर्वेकडची, ट्रीप, photo, स्मृति, वाचते, हॉस्पिटल, हरियाणा, स्मरणशक्ती, स्थापत्य, सौमित्र, सिंगापूर, सिक्कीम, साहित्यभूषण, सावित्रीबाई, फुले, सावित्री, सावरकर, कार्यकर्ते, सातपु़डा, शीख, शतशब्दकथा, शंकराचार्य, विविधता, विज्ञान, विचित्रपणा, विकास, वासंती, मुझुमदार, वाचननोंद, लष्करी, सत्ता, ललित, रेचल, कार्सन, रामानुजाचार्य, राजस्थान, महर्षी, म्यानमा, मौन, मोझाम्बिक, मेघालय, मुक्तक, महाराष्ट्र, मर्ढेकर, मध्वाचार्य, मध्य, मणिपूर, भटकंती, बिहार, बोरकर, फिलिपिन्स, प्राणी, प्रसारमाध्यमं, प्रभा, गणोरकर, पोलीस, पॉण्डिचेरी, रेगे, पानिपत, पर्यावरण, पंजाब, नारायण, सुर्वे, नाती, नर्मदा, दिल्ली, दादरा, नगर, दहशतवाद, त्रिवेंद्रम, त्रिपुरा, तालिबान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, डवाव, जीवनशैली, जलव्यवस्थापन, छत्तीसगढ, चरित्र, बुद्ध, गोवा, गुजरात, गांधीजी, गणित, खेडी, खाद्यसंस्कृती, केशवसुत, केरळ, केनिया, कुसुमाग्रज, कुरुक्षेत्र, काबूल, ओडिशा, उपनिषद, उत्तराखंड, आरती, आन्जी, आदिवासी, अहिंसा, अफगाणिस्तान, 161, अनिल, अण्णा, हजारे, २०१७, २०१४, shillong, meghalaya, typical, khasi, house, view, complete, profile, वाचक, पाने, transient, bonds, photoblog, times, change, two, more, blogs, ब्लॉगवरील, लेखन, पूर्णत, लेखी, पूर्वपरवानगी, घेतल्याविना, इथले, अन्यत्र, छापील, स्वरूपात, नयेत, विवेकानंदांचा, वाचा, अभिप्राय, जरूर, कळवा, sitemeter, older, भटकंतीत, शांतिनिकेतनने, गारूड, माझ्यावर, काळच, सांगेल, नातं, कुणाशी, कशाशी, पुरेसं, कलेची, करण्याइतकी, तिच्याशी, बांधिलकी, कलाकारांना, दिसू, शकतं, निसर्गाकडं, पाहण्याची, खरोखर, जगण्यात, चित्रांची, हवी, नुसती, अगणित, शक्यता, निरक्षर, व्यक्तीसाठी, नवं, एकाचवेळी, परक्यासारखं, वागणारं, बोलपूरमधली, प्रदर्शनं, चित्रकलेतलं, अपार, मिळाला, विद्यार्थ्याने, सोप्या, समजावून, सांगायचा, डोक्यावरून, प्रिंटमेकर, पेंटिंग, जीवनकार्यावरचं, यांचे, फारसे, चित्रपट, पाहिलेले, कृष्णा, रेड्डी, तीही, अप्रतिम, सगळीच, अंध, दूरचे, नसे, वास्तवदर्शी, आल्याने, निघावं, पाहण्यासाठी, सुरेख, benode, behari, mukherjee, ram, kinker, baij, रामकिंकर, nandalal, bose, आपल्यापैकी, त्यांच्यासमवेत, योगदान, चित्रकार, आमच्याविना, कुणीच, प्रकाशयोजना, दिसतंच, तिथले, सुरक्षा, उत्साही, अजंठामध्ये, शोधलं, सरांचं, विषयवारचं, पुस्तकात, सविस्तर, मार्गांनी, शोधावी, देणारं, पोस्टर, ajanta, mural, tracing, ganesh, haloi, हलोई, विक्रीकक्षात, चित्रांच्या, नेहमीचा, खाक्या, लोकांकडं, माझाही, करण्याचा, मावळला, घरांच्या, बांधणीत, केलेले, चकित, कोणार्क, उदयन, पुनश्च, घरांना, पाचही, वास्तव्य, उत्तरायण, पंधराशेपेक्षा, वर्गातली, गरीब, मध्यमवर्गीय, प्रकारची, आस्थेने, पहात, थबकून, बंगालसाठी, अभिमानाचा, अस्मितेचा, आस्थेचा, बिंदू, romain, rolland, आश्चर्यजनक, वैविध्यपूर्ण, इत्यादी, जन्मशताब्दी, रवीन्द्रनाथांना, रोमा, रोलां, बिचित्र, संग्रहालयाचं, रबीन्द्र, बाबासाहेबांचा, चौकात, चहाच्या, टपऱ्या, आंबेडकरांचा, कौतुकाने, दिल्लीतल्या, गृहस्थाने, वडिलांच्या, येताना, आलू, चाप, उच्चारलेही, ट्रेनमधल्या, वडिलांची, सहप्रवासी, आधीची, पोस्ट, कार्यक्रमाला, गर्दीही, त्यातही, मुलींची, संख्या, ड़ॉ, राज्यघटना, जानेवारीला, दिनाच्या, कार्यक्रमासाठी, पोचायला, प्रमुख, पाहुणे, पाहुण्यांनी, दिन, कार्यक्रम, चित्रप्रदर्शनं, भटकलो, तूफान, तल्लीन, गात, ऐकतानाही, प्रसन्न, शब्दांमध्ये, येणार, नतुन, मृणालिनी, देवी, पत्नी, कस्तुरबा, यातल्या, कुठल्या, इमारतीतील, भिंतींवर, छतावर, दिल, खुष, गया, ताजी, गाण्यावर, भवनमधली, पाहताहेत, गोष्टींकडं, अजिबात, सरावात, रममाण, एकला, चलो, वडाचं, झाड, रेंगाळताना, पारंब्यांवर, झोके, शेजारच्या, कट्ट्यावर, वास्तूकला, विलक्षण, नव्याचा, स्वीकार, जुन्यातलं, टिकवून, ठेवायची, साधली, प्रथमदर्शनी, फ्युजन, विद्यार्थ्यांना, भवनची, प्राथमिक, माध्यमिक, बिनभिंतींच्या, वर्गाचा, भवनचा, इमारतीचा, इमारतीची, शैलीही, भावली, शैलींचं, १९१९, बौद्ध, शैलीत, बांधलेला, घंटाताल, ठिकठिकाणी, वृक्षांच्या, आजूबाजूला, दगडी, वर्तुळाकार, कट्टा, वर्तुळाचा, भागापेक्षा, शिक्षक, शिक्षिका, बिनभितींचे, पहिलीपासूनचे, छातिम, ज्याला, वृक्षांखाली, देवेन्द्रनाथ, १८६२, जागेचं, कुंपणापलिकडून, पाहावे, बहुतांश, लांबूनच, न्याहाळता, समाजाला, लागलेलं, सेल्फीचं, वेड, भिंतीवर, कोरण्याचा, पर्यटकांमध्ये, वास्तूंमध्ये, आवश्यक, अनासुआने, भाषांमधले, गाईड्स, गटाबरोबर, गाईडसोबत, चालायला, लागलो, माहितीपत्रकात, छातिमतल, उपासना, तालध्वज, देहली, संतोषालय, घंटातल, पूर्व, सिंह, सदन, दिनांत्रिका, चीना, जागांचा, बाकी, वॉकचं, शुल्क, जास्तच, रविवारी, शनिवारी, हाच, आमचा, पहिला, उपक्रम, विद्यापीठीय, अभिव्यक्ती, जीवनदृष्टीची, औपचारिक, जीवनदृष्टी, शेती, समाजविकासाच्या, प्रयोगांसाठी, म्हणजेच, भौगोलिक, ग्रामीण, पुनर्रचना, मानवविद्येचे, विभाग, संगीत, विश्वभारतीचा, विस्तृत, विद्यापीठाचा, केंद्रबिंदू, ओळखला, शिकवणारी, विद्यार्थ्यांसाठी, दर्जा, स्थळा, unesco, मानवी, नातेसंबंध, ऋतू, मानणारा, त्यामुळेच, वर्गखोलीतलं, ज्ञान, सामूहिक, प्रयत्नातून, राहिलेलं, बनलं, विचारवंत, व्यक्तीचं, स्वप्न
Text of the page (random words):
्या दुसऱ्या अध्यायात होता मेघनादवध काव्य हा नाट्यप्रयोग त्यासाठी आम्ही गिरीश मंच च्या दिशेने निघालो धार्मिक विश्वातून थेट रंगभूमीच्या जगात गिरीश मंच कोलकात्याच्या बागबाजार या ऐतिहासिक भागात असलेलं गिरीश मंच हे बंगाली नाट्यसृष्टीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे आधुनिक बंगाली रंगभूमीचे जनक अशी उपाधी देण्यात आलेले प्रसिद्ध नाटककार दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीशचंद्र घोष यांचं नाव या नाट्यगृहाला देण्यात आलं आहे हे गिरीश दुसरेतिसरे कुणी नसून रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते हे कळल्यावर उगाचंच छान वाटलं इथं प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारचे नाट्यप्रयोग होतात गिरीशचंद्र घोष नास्तिक होते ते दारूच्या आहारी गेले होते पण रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं महेन्द्रनाथ गुप्त यांनी एम या नावाने लिहिलेल्या श्रीश्री रामकृष्ण कथामृत या ग्रंथात रामकृष्ण परमहंस आणि गिरीशचंद्र यांच्यातील हृद्य नात्याचे वर्णन आहे गिरीशचंद्र यांनी बुद्धदेव चरित बिल्वमंगल तपस्या यांसारखी नाटकं बंगाली रंगभूमीवर सादर केली विवेकानंद आणि गिरीशचंद्र एकमेकांना खूप जवळचे होते दक्षिणेश्वरहून गिरीश मंच मध्ये जाणं हा म्हणूनच एक प्रकारचा सुसंगत प्रवास होता त्यात काहीही विरोधाभास नव्हता मेघनादवध काव्य आणि गौतम हालदार इथं आम्ही आलो होतो ते मेघनादवध काव्य प्रयोग पाहायला हे काव्य मायकेल मधुसूदन दत्त १८२४ १८७३ यांनी लिहिलं होतं १८६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या दीडशे वर्षांच्या जुन्या काव्यावर आज २०२६ मध्ये प्रयोग व्हावा त्याची एक हजार रुपये किंमत असेलेली तिकिटं तत्काळ संपावीत याचं मला नवल वाटलं आमच्या मैत्रिणींनी आमची तिकिटं पुरेशी आधी काढलेली असल्याने आम्हाला पुढच्या रांगेत जागा मिळाली इथंही एकच सीट नंबर दोन व्यक्तींना देणं वगैरे घोळ होते त्यावरुन झालेली बंगाली भाषेतली वादावादी ऐकताना आपल्याचा गावात आहोत असं वाटलं नाट्यप्रयोग गौतम हालदार सादर करत होते १९६३ मध्ये जन्मलेले गौतम हालदार हे केवळ एक अभिनेते नसून ते दिग्दर्शक गायक आणि नृत्यकार असे बहुआयामी कलावंत आहेत गेल्या तीस वर्षांत गौतम हालदार यांनी देश विदेशात मेघनादवध काव्यचे शेकडो प्रयोग केले आहेत हा जवळपास एकपात्री प्रयोग आहे रंगमंचावर काही वादक आणि गायक बसले होते ते कोरस आणि वादनात साथ देत होते पण रंगमंचावरचं सुमारे अडीच तास चालणारं सादरीकरण गौतम हालदार यांचं एकट्याचं होतं प्रयोग पूर्णपणे बंगाली भाषेत होता दोन प्रसंगाच्या मधल्या विरामात मी माझ्या शेजारी बसलेल्या बंगाली दीदींना काही वाक्यांचा अर्थ विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे प्राचीन बंगाली त्यांनाही समजत नाहीये शिवाय बंगाली कळत नसताना हे लोक इथं का आलेत असं प्रश्नचिन्हं दिसलं ते वेगळंच मेघनाद वध झाल्यानंतरचं सगळं वर्णन पहिल्या प्रसंगात होतं असं त्यांनी मला आत्मविश्वासाने सांगितलं पण प्रत्यक्षात प्रयोगात मेघनाद वध फार नंतर आला कथा सुरुवातीला फारशी समजत नव्हती हळूहळू ती उलगडत गेली मेघनाद वध हे महाकाव्य बंगाली साहित्यातील मैलाचा दगड मानलं जातं या काव्याचा गाभा रामायणातील लंकेच्या युद्धावर आधारित आहे पण दृष्टिकोन अपारंपरिक आहे मधुसूदन यांनी या महाकाव्यात रावणाला एक उदात्त स्वाभिमानी आणि दुर्दैवी राजा दाखवलं आहे तर त्याचा मुलगा मेघनाद इंद्रजित याला देशासाठी प्राणांची आहुती देणारा एक परमवीर नायक म्हणून उभं केलं आहे तसंच राम आणि लक्ष्मण यांच्या मर्यादा आणि त्यांच्याकडून झालेल्या चुकांवर कवीने बोट ठेवलं आहे हे काव्य एकूण नऊ सर्गांमध्ये भागांमध्ये विभागलेलं असून त्यात वीर करुण आणि रौद्र रसांचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो मधुसूदन यांनी बंगाली भाषेत पहिल्यांदाच अमित्राक्षर छंद blank verse यशस्वीपणे आणला बंगाली कवितेला त्यांनी यमकांच्या बंधनातून मुक्त केलं या काव्यातील बंगाली भाषा ही आजची साधी किंवा बोलीभाषा नाही ती अत्यंत संस्कृतप्रचुर जड गंभीर आणि अभिजात classical bengali आहे गौतम हालदार यांचा कायिक आणि वाचिक अभिनय जबरदस्त होता कोणत्याही पात्राचा पोषाख न बदलता केवळ आपल्या हातातील एका साध्या उपरण्याच्या आणि शरीराच्या अद्भूत लवचिकतेच्या जोरावर ते काही सेकंदात रावणाचे रौद्र रूप धारण करतात तर दुसऱ्याच क्षणी पुत्राच्या विरहाने व्याकुळ झालेली मंदोदरी किंवा पतिव्रता प्रमिला बनतात भीती क्रोध दु ख आनंद प्रेम तिरस्कार द्वेष शांती अशा विविध पात्रांच्या रावण मंदोदरी सीता लक्ष्मण मेघनाद बिभीषण राम भावना ते अत्यंत उत्कटपणे व्यक्त करत होते एका बाजूला युद्धाची भयानकता दाखवणारे त्यांचे आक्रमक डोळे आणि पायांमधील ताठरता असते तर दुसऱ्या बाजूला रावणाचा पराभव आणि असहाय्यता दाखवणारी शरीराची मान टाकलेली अवस्था बंगाली समजत नसलं तरी त्यांची अभिनयाची भाषा थेट पोचणारी होती मजा आली बोशांकोतून परतण्याची वेळ झाली बोलपूरमधलं मातीचं घर रवीन्द्रनाथांचं शांतिनिकेतन कोलकात्याचा इतिहास दक्षिणेश्वरची भक्ती आणि रंगभूमीवर पुन्हा जिवंत झालेला मेघनाद या आठ दिवसांत मला बंगालचे अनेक रंग दिसले इथं अनेक सुप्त प्रवाह आहेत गंगेसारखेच काही कळले काहींची फक्त चाहूल लागली पाहुणी म्हणून आले होते बंगालच्या अंगणात बसून त्याच्या गुजगोष्टी ऐकताना काही काळ तरी इथलीच होऊन गेले posted by aativas at 12 29 am 19 comments labels इतिहास कविता कोलकाता धर्म पश्चिम बंगाल माणसं समाज संस्कृती tuesday april 21 2026 २८२ बोशांको ची भेट भाग ३ जुनं कोलकाता if you want to read this post in english it is available here अखेर एक दिवस बोलपूरचा मुक्काम संपवून आम्ही कोलकात्याच्या दिशेने निघालो हा प्रवास ट्रेनचा होता प्रान्तिक नावाच्या रेल्वे स्थानकावर गेलो छोटंस स्थानक तीन चारच फलाट प्रान्तिक रेल्वे स्थानक गर्दी अजिबातच नाही प्रान्तिक नावाचा अर्थ शोधताना लक्षात आलं की रवीन्द्रनाथांच्या एका कवितासंग्रहाचं हे नाव आहे रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रान्तिक शांतिनिकेतनला जवळ आहे एका अर्थी शांतिनिकेतनचं हे प्रवेशद्वारच हल्ली ट्रेन जशा उशीरा असतात तशी आमचीही ट्रेन सुमारे दोन तास उशीरा आली बोलपूरला इतक्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या जत्रेत झालमुडी मात्र खायची राहून गेली होती भूक नव्हती तरी मग हौस म्हणून ट्रेनमध्ये झालमुडी खाल्ली धावती भेट हावडा स्थानकावर देबाहुती आम्हाला घ्यायला आली होती हावडा रेल्वे स्थानकात काही फलाटांजवळ थेट चारचाकी येऊ शकते हे मला फार आवडलं दोन फलाटांच्या मध्ये प्रशस्त रस्ता पाहून मजा वाटली हावडा रेल्वे स्थानकात दोन फलाटांच्या मधला रस्ता स्थानकाच्या बाहेर पडलो थेट घरी न जाता थोडं फिरून जाण्याचा बेत होता आणि मग लगेच कोलकातातल्या वाहनांची इतर कोणत्याही मोठ्या शहरात असते अगदी तशीच गर्दी दिसायला लागली हुगळी नदीकडं गेलो तिथल्या घाटावर काही काळ शांतपणे थांबलो समोर पसरलेलं पाणी त्यावर हलकेच उमटणाऱ्या लाटांची हालचाल आणि त्यामागे उभा असलेला भव्य हुगळी ब्रिज थोड्याशा अंतरावरून सुप्रसिद्ध हावडा ब्रिज दिसला आणि कोलकात्यात आपण आलो हे जणू अधोरेखित झालं हावडा ब्रिज घाटाला लागून असलेल्या रुळांवरून एक लोकल ट्रेन धडधडत गेली तेव्हा बोलणं थांबवून आम्ही सगळ्यांनी लहान मुलांप्रमाणे ती ट्रेन पाहिली नदीत काही मोठाल्या मूर्ती तरंगत होत्या त्याबद्दल विचारलं असता इथल्या सरस्वती पूजन उत्सवाबद्दल नव्यानेच कळलं बंगाल म्हणजे दुर्गापूजा हे समीकरण डोक्यात होतं सरस्वती पूजनाबद्दल मला काही माहिती नव्हतं वसंतपंचमीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक रीत्याही सरस्वतीची पूजा होते इथल्या लहान मुला मुलींसाठी शिक्षणाचा श्रीगणेशा मुळाक्षरं शिकण्याची प्रक्रिया वसंतपंचमीच्या दिवशी होते शाळांमध्ये महाविद्यालयांत वह्या पुस्तकांची पूजा होते सार्वजनिक उत्सवांमधल्या मूर्ती मोठ्या असतात आणि त्या मोठाल्या मंडपांमध्ये असतात दुर्गा आणि सरस्वती या दोन्ही परंपरांचा संगम बंगालच्या संस्कृतीत झालेला दिसतो घाटावरून परतताना दूरवर विधानभवन आणि आकाशवाणीची इमारत दिसली या छोट्याशा भटकंतीचा शेवट करताना आम्ही कोलकात्याचा प्रसिद्ध रोल खाल्ला गरमागरम मसालेदार आणि अतिशय चविष्ट जुनं कोलकाता कोलकाता समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा असणारं शहर एक महिना राहिलं तरी अनेक गोष्टी पाहायच्या राहून जातील इतकं भव्य शहर माझ्याकडं ते पाहायला फक्त दोन दिवस होते फारसं समजून न घेता खूप काही पाहता येतं पण त्या बकाबक पर्यटनाला काही अर्थ नसतो इथं येण्यापूर्वी देबाहुती आणि अनासुआ यांच्याशी बरीच चर्चा केली होती त्यातून अर्धा दिवस जुन्या कोलकात्यात उत्तर कोलकाता फिरायचं असं ठरलं सुबीरदा आमचे वाहनचालक होते त्यांनी तीन वर्ष सोलापूरच्या मिलमध्ये काम केलं होतं त्यामुळे त्यांनी आमच्याशी मोडक्यातोडक्या मराठीत बोलायची संधी घेतली गाईडचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा काहीच कळलं नाही जोगोबोंधो मग लक्षात आलं की ते जगबंधु आहे दोन वेगळ्या विचारधारेशी निष्ठा असणारी माणसं आहेत हे पहिल्या दहा मिनिटांतच लक्षात आलं ते एसआयआर special intensive revision सारख्या संवेदनशील विषयावरुन तसंच एक मोहन बगानचा पाठीराखा तर दुसरा इस्ट बंगाल फुटबॉल क्लबचा कोलकात्यात भटकताना इडन गार्डन्स सॉल्ट लेक स्टेडियम नेताजी स्टेडियम अशा अनेक स्टेडियमजवळच्या रस्त्यांवरून गेलो कोलकात्याचं क्रीडाप्रेम हा एक वेगळाच विषय आहे जुन्या कोलकात्यात पहिल्यांदा गेलो ते स्वामी विवेकानंदांच्या घरी स्वामी विवेकानंद यांचं घर १२ जानेवारी १८६३ रोजी या घरात स्वामीजींचा जन्म झाला होता मोडकळीस आलेले हे घर १९६२ मध्ये रामकृष्ण मिशनने ताब्यात घेऊन त्याचं पुनरूज्जीवन केलं तिथं आता संग्रहालय आहे संशोधन केंद्र आहे भाषा केंद्र आहे संगणक प्रशिक्षण केंद्र आहे आम्ही लवकर पोचल्याने संग्रहालय पाहता आलं नाही एका मोकळ्या जागेत तीन मुलं दोन प्रौढ मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार नृत्याचा सराव करत होती विवेकानंदांच्या घराच्या परिसरात एका छोट्या गल्लीत सुप्रसिद्ध गायक मन्नाडे यांचंही घर आहे मन्नाडे यांच्या घराच्या गल्लीत प्रवेश करताना घरात जाता येत नाही पण आम्ही मराठी आहोत असं कळल्यावर तिथं सध्या राहणाऱ्या गृहस्थांनी एका खोलीची मोठी खिडकी आमच्यासाठी उघडली तिथं मन्नाडे यांचा फोटो आणि त्यांना मिळालेली विविध पारितोषिकं स्मृतिचिन्हं वगैरे व्यवस्थित ठेवली होती याच परिसरातल्या एका इमारतीत मिर्झा गालिब एक वर्ष राहिले होते असं जगबंधु दादांनी सांगितलं परिसरातल्या अनेक घरांमध्ये कालीमाता आणि जगन्नाथ पुरी मंदिरं आहेत अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या ही मंदिरे जपली गेली आहेत कालीपूजा आणि रथयात्रा यांसारख्या सणांमध्ये या छोट्या मंदिरांना खूप महत्त्व असतं यातली एक कालीची मूर्ती ही आधी दक्षिणेश्वर मंदिरासाठी तयार करण्यात आली होती परंतु ती राणी रासमणी यांना आवडली नाही म्हणून ती मूर्ती इथल्या एका घरगुती मंदिरात आहे असं जगबंधु म्हणाले पण नंतर शोधूनही मला त्याचा नेमका काही संदर्भ अजून तरी मिळालेला नाही या परिसरातली मिठाईची दुकानं प्रसिद्ध आहेत पण आम्ही त्या दुकानांत थांबलो नाही या एका परिसरात किती इतिहास आहे कोलकाता ट्राम या भागात फिरताना कोलकाताची ट्राम एकदाची दिसली १८७३ मध्ये सुरू झालेली इथली ट्राम ही आशियातली सर्वात जुनी ट्राम वाहतूक आहे सुरूवातीची ट्राम घोडे ओढत असत १९०२ मध्ये ती इलेक्ट्रिक झाली १९८४ ८५ मध्ये कोलकाता भेटीत या ट्रामने मी प्रवास केल्याची आठवण आहे मंद गती वाहतुकीत निर्माण होणारा अडथळा आणि वाहतुकीचे नवनवे पर्याय यामुळे ट्राम आता कमी आहेत पूर्वी पन्नासपेक्षा जास्त मार्गांवरून चालणारी ट्राम आता फक्त तीन मार्गांवर चालू आहे १९८४ मध्ये कोलकातामध्ये सुरू झालेली मेट्रो ही भारततली सर्वात जुनी मेट्रो आहे जुनी मेट्रो जमिनीखालून होती आता मेट्रोचं जाळं पाच विविध लाईन्स आणि सुमारे साठ स्थानकं असं विस्तारलं आहे भूमिगत आणि उन्नत असे दोन्ही प्रकारचे मेट्रो मार्ग आहेत काही मेट्रो स्थानकांची नावं वाचून थोडा गोंधळ उडाला उदाहरणार्थ ऋत्विक घटक कवि सुभाष गीतांजली सत्यजित रे ही मेट्रो स्थानकाची काही नावं आहेत या नावाचं मोठेपण वादातीत आहे पण ते नाव वाचून आपण शहरातल्या नेमक्या कोणत्या भागात आहोत याचा अंदाज नवख्या माणसाला येणं कठीण आहे कोलकात्यात प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत काही जुने पर्याय अजूनही वापरात आहेत याची जाणीव हे पाहिल्यावर झाली पुढे कॉलेज स्ट्रीटवर यात बसलेले प्रवासी दिसले कोलकात्याच्या या भागाचं जुनेपण अजून टिकून आहे आणि म्हणूनच एक प्रकारचा जिवंतपणाही छोटे रस्ते जुन्या इमारती रस्त्यावर चपला बाजूला ठेवून देवाला नमस्कार करणारी माणसं रस्त्यावरच्या नळावर आंघोळ करणारे पुरुष रसरशीत ताजा भाजीपाला आणि घासाघीस करणारे ग्राहक येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चिन्ह मिरवणारी पोस्टर्स चालत किंवा सायकलवर जाणारे सर्व वयाचे लोक सामानाच्या पिशव्या हातात घेऊन सावकाश चालत जाणाे लोक जोरासांको ठाकुर बाडी जोरा म्हणजे जोडी सांको म्हणजे बांबूचा पूल पूर्वी या परिसरातल्या ओढ्यावर बांबूचे दोन समांतर पूल होते म्हणून या परिसराला जोरासांको नाव पडलं असं मानलं जातं तर कुणी म्हणतं की या परिसरात दोन शिवमंदिरं होती त्यावरून जोरासांको हे नाव पडलं बाडी म्हणजे घर जोरासांको परिसरातलं ठाकुरांचं घर हे आहे टागोर घराण्याचे वडिलोपार्जित घर १७८४ मध्ये नीलमणी ठाकूर यांनी हे घर बांधलं घर कसलं म्हणायचं प्रचंड मोठी हवेली आहे ठाकुर बाडी प्रवेशद्वार द्वारकानाथ टागोरांनी या घराचा विस्तार केला ७ मे १८६१ या दिवशी रवीन्द्रनाथांचा जन्म इथं झाला त्यांचं बालपण या वास्तूमध्ये गेलं याच घरात रवीन्द्रनाथांनी अनेक कविता लिहिल्या याच घरात ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवीन्द्रनाथांनी अखेरचा श्वास घेतला या इमारतीच्या एका भागात १९६१ पासून रवीन्द्र भारती संग्रहालय आहे या संग्रहालयात पन्नासपेक्षा जास्त दालनं आहेत एका दालनात टागोर घराण्याचा इतिहास मांडला आहे रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ आणि वडील देबेन्द्रनाथ यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे त्यांचं कार्य आणि त्या काळातील कागदपत्रं इथं आहेत एकोणिसाव्या शतकातल्या बंगालमधलं एक प्रभावशील शिक्षित आणि श्रीमंत कुटुंब कसं जगत असेल याची एक झलक मिळते एक दालन अशाच प्रकारे रवीन्द्रनाथांच्या जीवनावर आधारित आहे त्यांनी वापरलेले कपडे टोप्या पेन चष्मा घड्याळ चपला अशा बऱ्याच वस्तू आहेत त्यांच्या अनेक प्रसिद्ध कवितांच्या आणि गाण्यांच्या हस्तलिखित प्रती इथं दिसतात लिहिताना त्यांनी खोडलेले शब्द आणि त्यातून तयार केलेली चित्रं रोचक आहेत महात्मा गांधी अल्बर्ट आइन्स्टाईन आणि इतर जागतिक नेत्यांशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार आहे त्यांनी काढलेली चित्रं आहेत १९१३ मध्ये त्यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे मला सगळ्यात जास्त आवडला तो रवीन्द्रनाथांच्या जागतिक प्रवासाचा नकाशा त्या काळी रवीन्द्रनाथांनी तीसपेक्षा जास्त देशांचा प्रवास केला होता या मोठ्या नकाशावर टागोरांनी भेट दिलेल्या देशांचे मार्ग आणि तो प्रवास कधी केली याची नोंद आहे नकाशासोबतच त्यांनी परदेश दौऱ्यात वापरलेल्या वस्तू पासपोर्ट आणि विविध जागतिक नेत्यांसोबतची त्यांची दुर्मिळ छायाचित्रं आहेत टागोरांचं जगाचं नागरिक असणं आणि त्यांनी विश्वभारतीची स्थापना करणं यांचा संबंध या नकाशातून काहीसा स्पष्ट होतो बाहेर पडताना इमारतीच्या आवारात मोठी रांग दिसली चौकशी करता ती एसआयआरसाठी असल्याचं कळलं बोई पारा बोई म्हणजे पुस्तक आणि पारा म्हणजे परिसर बोई पारा पुस्तकांचा परिसर कॉलेज स्ट्रीट असं या रस्त्याचं अधिकृत नाव आहे ही बाजारपेठ केवळ भारतातली नाही तर आशियातली सर्वात मोठी पुस्तकांची बाजारपेठ आहे इथं महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची पुस्तकं मिळतात तशीच दुर्मिळ पुस्तकंही मिळतात १८१७ मध्ये या भागात राजान राममोहन रॉय डेविड हेअर आणि अन्य सहकारी यांनी हिंदू कॉलेजची आता त्याचं नाव प्रेसिडेन्सी युनिवर्सिटी आहे स्थापना झाली साधारण तेव्हापासून पुस्तक बाजार सुरु झाला असं दिसतं बोई पारा हा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रस्ता आहे पुस्तकांची छोटी मोठी शेकडो दुकानं इथं आहेत नजर पडेल तिकडं पुस्तकंच दिसतात रविवार वगळता इतर दिवशी बाजार दिवसभर चालू असतो दहा पंधरा मिनिटांच्या चालण्याच्या अंतरात खूप महाविद्यालयं विद्यापीठं दिसली कोलकाता युनिवर्सिटी हेअर स्कूल हिंदू स्कूल संस्कृत कॉलेज ही सहज आठवणारी नावं तसंच बंगाल थिऑसऑफिकल सोसायटी महाबोधी सोसायटीचं भारतातलं मुख्यालय अशाही नामवंत संस्था या परिसरात आहेत विद्यार्थ्यांची विनोदबुद्धीही दिसली उजवीकडे एका कागदावर कॅन्टीनच्या अन्नाबाबतची तक्रार don t make canteen food too oily usa might invade our campus अशा खोडकर शब्दांत केली आहे बोई पारा परिसरात गेल्यावर इंडियन कॉफी हाऊस मध्ये जाणं हे एक शास्त्र असतं तिथं जावंच लागतं ही जागा बंगाली संस्कृती राजकारण आणि साहित्याचं एक ऐतिहासिक केंद्र आहे १८७६ पासून या जागेत अल्बर्ट हॉल होता १८७६ मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या भारत सभे चं हे मुख्य केंद्र होतं १८८३ मध्ये पहिली अखिल भारतीय नॅशनल कॉन्फरन्स याच हॉलमध्ये भरली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अनेक राजकीय सभा या ठिकाणी झाल्या होत्या इथं साहित्यिक कलाकार आणि विचारवंतांचे वैचारिक गट एकत्र येऊन चर्चा आणि विचारविनिमय करत असत रवींद्रनाथ टागोर नेताजी सुभाषचंद्र बोस सत्यजित रे आणि मृणाल सेन यांसारखे दिग्गज या ठिकाणी नियमित येत असत कोलकात्याची प्रसिद्ध अड्डा संस्कृती इथूनच विकसित झाली १९४२ मध्ये कॉफी बोर्डा ने हे हॉल भाड्याने घेतला तिथं कॉफी हाऊस सुरू केलं हेच ते इंडियन कॉफी हाऊस जिना चढून जाताना भिंतीवरची चित्रं दिसली आत गेल्यावर दिसलं ते उंच छत जुने पंखे आणि पांढऱ्या गणवेशातील वेटर रवीन्द्रनाथ नेताजी मन्नाडे सत्यजित रे अशा अनेकांची छायाचित्रं आत आहेत आम्ही गेलो त्यावेळी सुदैवाने फार गर्दी नव्हती पण आम्हाला जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं कॉफी पिऊन निघालो या भागात हिंडताना नागरी हक्कांबाबत आंदोलन करणाऱ्या संस्थां संघटना लोकांसाठी अजूनही जागा शिल्लक आहे असं दिसलं गर...
|